✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट 2⃣  🎤   *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣ 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ 📅 दि. 03/12/2017 वार - रविवार =========ஜ۩۞۩ஜ========= 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= *जागतिक अपंग दिवस* 💥 ठळक घडामोडी :-  १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. २००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार. 💥 जन्म :- १८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती. १९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू. १९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू. १९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :-  ११५४ - पोप अनास्तासियस चौथा. १७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. १९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9404277298 =========ஜ۩۞۩ஜ=========    🌷  *आजच्या ठळक बातम्या*🌷 =========ஜ۩۞۩ஜ========= 1⃣ *केरळ : ओखी चक्रीवादळाला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांची केंद्र सरकारकडे मागणी* ----------------------------------------------------- 2⃣ *'ओखी’मुळे किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन, मुंबईत आकाश ढगाळ राहणार* ----------------------------------------------------- 3⃣ *पटसंख्येअभावी १,३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत या शाळा स्थलांतरित होत असल्याने, या शाळांमधील शिक्षकांच्या नोक-यांवर व विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंडांतर येणार नाही, असे सांगितले.* ----------------------------------------------------- 4⃣ *प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.* ----------------------------------------------------- 5⃣ *हॉकी वर्ल्ड लीग फायनल 2017 - भारताचा 2-3 ने इंग्लंडकडून पराभव.* ----------------------------------------------------- 6⃣ *पणजी - इंडिया प्रीमियर ओपन स्विमिंग चॅम्पियनशिपचे आयोजन ओखी वादळाच्या धोक्यामुळे पुढे ढकलले* ----------------------------------------------------- 7⃣ *कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर लंकेविरुद्ध ४ बाद ३७१ धावा उभारल्या.* ----------------------------------------------------- *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 =========ஜ۩۞۩ஜ=========          *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* =========ஜ۩۞۩ஜ========= *सरकारी शाळा बंद करण्याचा घाट * कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावल्याने सरकारने राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी वाचण्यात आली आणि शैक्षणिक क्षेत्रात उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी जिल्हा ......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post.html आपले अभिप्राय जरूर द्यावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद* ~~~~~~~~~~~~~~~~~~~ =========ஜ۩۞۩ஜ=========           🌷🍃   *विशेष माहिती* 🌷🍃 =========ஜ۩۞۩ஜ========= *डॉ. राजेंद्र प्रसाद* डॉ. राजेंद्र प्रसाद (३ डिसेंबर १८८४ - २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती होते. पेशाने वकील असलेले व भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद  बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या प्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलना दरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले. *संकलन :- क्रांती एस. बुध्देवार, बिलोली* सर्पमित्र तथा प्राथमिक शिक्षक 📱 7588427335 =========ஜ۩۞۩ஜ=========               *""फ्रेश सुविचार""* =========ஜ۩۞۩ஜ========= जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. *संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*  📱  9850296824 =========ஜ۩۞۩ஜ=========             *आजची प्रश्नमंजुषा* =========ஜ۩۞۩ஜ========= *१) संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. राजेंद्र प्रसाद *२) घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?* 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर *३) घटना समितीची स्थापना कधी झाली?* 👉 १९४६ *संकलन : संगीता देशमुख, वसमत* 📱 9975704311 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎂   *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 =========ஜ۩۞۩ஜ========= 👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद 👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली *सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा खालील क्रमांकावर पाठवू शकता. ] *संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद* 📱9423625769 =========ஜ۩۞۩ஜ=========            *!!! @@ गुगली @@ !!!*  =========ஜ۩۞۩ஜ========= *" विचाराने "* कोणी कोणाच्या मागे तर कोणी सोबत आहे तू त्याच्या सोबत कसा कोणाची काय बाबत आहे सोबत असो की नसो ते विचाराने रहातात सगळं काही विचाराने वाटून वाटून खातात शरद ठाकर सेलू जि परभणी 8275336675 =========ஜ۩۞۩ஜ========= 🌟‼  *आजचा विचारधन* ‼🌟 =========ஜ۩۞۩ஜ========= *माणूस शरीराने थकतो कारण शरीर काळाशी बांधलेले असते. मृत्यू अटळ असला, तरी मृत्यूच्या आधी असे काही कर्तृत्व दाखवायला हवे, की पुढील भविष्यातही आपले स्मरण केले जाईल. मानवी जीवन हे नवीन आव्हाने स्विकारण्यासाठी आणि नवे काहीतरी शोधण्यासाठी आहे. त्यामुळे बदलांचा हसतमुखाने स्विकार करा. स्वत:ला छंदांमध्ये, वाचनात, कौटुंबिक आणि समाजकार्यात गुंतवा. दृष्टी आनंदी असेल, तर सृष्टी मोहक वाटते आणि प्रसन्नतेची वृष्टी होते.* *विन्स्टन चर्चिल म्हणतात, आशावादी व्यक्ती प्रत्येक संकटात संधी शोधते, तर निराशावादी व्यक्तिला प्रत्येक संधीत संकट दिसत असते.. प्रत्येक क्षण आपल्यासाठी काही ना काही घेऊन येतो. काहीवेळा दृष्टीकोन ही किरकोळ बाब वाटते. 'सकारात्मक दृष्टीकोन' हे फक्त सांगण्यापुरते आहे, असेही वाटते; परंतु हे तसे नाही. या दृष्टीकोनात जीवन घडविण्याची किंवा बिघडविण्याची क्षमता आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात,'जगात तुम्हाला तुमच्याशिवाय कोणीही दु:खी करू शकत नाही. तेव्हा आनंदी रहा... यशासाठी मधला मार्ग नाही.* ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 =========ஜ۩۞۩ஜ=========       *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* =========ஜ۩۞۩ஜ========= जमीवरुन सरपटणारा कोणताही साप कधीही सरळ चालत नाही तो वाकडातिकडा चालत ( सरपटत) असतो.त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली काही दुष्टप्रवृत्तीची माणसे वावरत असतात.त्यांना कितीही चांगल्या गोष्टी सांगा ते कधीच तुमचे ऐकून घेत नाहीत.ते आपलेच खरे मानतात.आम्ही जे काही करतो ते चांगलेच करतो असे समजून सामान्य लोकांना त्रास देतात.तर अशा लोकांपासून दूर राहणे केव्हाही चांगलेच.अशांची मैत्री कधीही करू नये.कारण यांची जातच सापासारखीच असते ते केव्हाही उलटू शकतात. *व्यंकटेश काटकर,नांदेड.*   संवाद..९४२१८३९५९०/             ८०८७९१७०६३. =========ஜ۩۞۩ஜ=========  *🎡 आजचा शालेय उपक्रम 🎡* =========ஜ۩۞۩ஜ========= *उपक्रमातून शिक्षण* *नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे चटकन शिकणे* वर्गातील मुलांना नवीन अक्षरे किंवा जोडाक्षरे जसे प्र,ऋ,ष्ट्र,ट्र यांसारखे इतर अक्षरे अवघड वाटतात. किंवा लक्षात राहत नाही. म्हणून शाळा सुटते वेळी मुले जेव्हा अभ्यासातून बाहेर पडतात. तेव्हा दररोज फळ्यावर एक एक अक्षर लिहून देणे त्याचे वाचन घेणे. व घरी जाईपर्यंत लक्षात ठेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा तो लिहून वाचन करण्यास सांगणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा जाणीवपूर्वक ते अक्षर विचारून, लिहून घेणे. दैनंदिन अभ्यासात मार्गदर्शन करून मूल्यमापन करावे मुलांची निरीक्षण क्षमता वाढते. नवीन अक्षर शिकल्यानंतर आनंदी होतात. वाचण्याचा प्रयत्न करतात. कामात गुंतून राहतात. हा उपक्रम दररोज चालू ठेवा. *शब्दांकन* *श्री. मा.स.गुंडेवार* जि.प.प्रा. शा. गोंडेमहागाव ता.किनवट.जि.नांदेड 📲9623124594 =========ஜ۩۞۩ஜ========= 🎭  *आजची फ्रेश बोधकथा* 🎭 =========ஜ۩۞۩ஜ========= *शर्यत* एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय कमी आहे की, आपण या भल्यामोठय़ा टॉवरवर चढू शकत नाही. सतत काय डबक्यात रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ. सगळे बेडूक ठरवतात की शर्यत लावायची. माणसांना, इतर प्राण्यांना ही बातमी समजते. तुफान गर्दी जमते. लोक हसतात. पाली चिडवतात. इतकंच काय उंदीर, घुशी, नाकतोडे, गांडूळंसुद्धा म्हणतात की, डबकं सोडून जाऊ नका, तुमच्यानं काहीच होणार नाही. उगंच पडाल, फुकट मराल. पण बेडूक काही ऐकत नाहीत. स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून सतत कानावर आवाज. ‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’ तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात. टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल. एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात. रडतात. हरतात. एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो. वर जाऊन पाहतो. ते विहंगम दृश्य पाहून खूश होतो. लोकं टाळ्या वाजवतात. इतर प्राणीही अवाक् होतात. हे घडलं कसं? तो बेडूक खाली उतरतो. सगळे त्याला विचारतात, तुला हे कसं जमलं? इतका विरोध? इतकी टवाळी? तरी तू डबकं कसं काय सोडलंस? तो बेडूक काहीच बोलत नाही. तेवढय़ात एक म्हातारा बेडूक येतो. म्हणतो, तो जन्मत:च कर्णबधिर आहे. त्याला ऐकूच येत नाही. सगळे गप्प होतात.. त्यावर तो म्हातारा बेडूक बाकीच्या बेडकांना म्हणतो, *टॉवरवर चढण्याची आस आणि डबकं सोडण्याची इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला चिडवतात, हरवतात, नाउमेद करतात तेव्हा चालत राहण्याचं बळ हवं.* इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल? यातून जमेल तर काहीतरी शिका..........प्रगती करताना लोकांच्या म्हणन्याकडे लक्ष देऊ नका. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त " शक्ती " असून चालत नाही , तर त्याला " सहनशक्तीचीही जोड असावी लागते. 〰〰〰〰〰〰〰〰〰 *📝   संकलन*  📝 *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड जि.प.प्रा.शा.वाटेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱  9403046894 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment