✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 जुलै 2025💠 वार - शनिवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Dy99TXq32/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 186 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :-• १६८७ – औरंगजेबाच्या हुकुमावरून मराठ्यांची सिद्दी जौहरविरुद्ध किल्ले पन्हाळगड येथील लढाई सुरू झाली.• १८११ – वेनेझुएला स्पेनपासून स्वतंत्र झाले.• १९४६ – फ्रान्समध्ये 'बिकिनी' या पोशाखाची पहिली झलक पॅरिसमध्ये प्रदर्शित झाली.• १९९४ – भारत सरकारने भारतातील खासगी रेडिओ स्टेशनसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला.👶 जन्मदिवस :-• १८२० – विलियम जॉन मॅकेनजी – स्कॉटिश गणितज्ञ• १९२७ – श्रीराम लागू – प्रख्यात मराठी नाट्य व चित्रपट अभिनेते• १९५१ – रामनाथ कोविंद – भारताचे १४वे राष्ट्रपती• १९७५ – अमर उपाध्याय – हिंदी टीव्ही व चित्रपट अभिनेता⚰️ मृत्यू :-• १९६९ – वसंत कानेटकर – मराठी नाटककार, लेखक• २०२० – आनंद शिंदे – मराठी गायक, अभंग गायक🌍 विशेष दिन :-• राष्ट्रीय शिक्षक दिवस (झेक प्रजासत्ताक)• राष्ट्रीय संस्कृती दिवस (अल्जेरिया)••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*परिपाठच्या माध्यमातून संस्कार*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पेनच्या विमानतळावर उत्साहात स्वागत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप 2025 स्पर्धेच्या चषकाचे केलं अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शालार्थ आय डी तातडीने देण्याचा प्रस्ताव विचारधीन मंत्री पंकज भोयर यांनी अधिवेशनात दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वीस दिवस आधीच भंडारदरा धरणातून विसर्ग, 15 दिवसांत पाणी जायकवाडीकडे झेपावणार, जिल्हा प्रशासनाकडून प्रवराकाठी सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंढरपुरात वारकऱ्यांसाठी विशेष आरोग्य व्यवस्था, 120 रुग्णवाहिकांद्वारे 8643 भाविकांना 24 तास आरोग्यसेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मालवाहतूक व्यवसायिकांचे राज्यव्यापी आंदोलन, जेएनपीटीत 100 टक्के तर पुणे जिल्ह्यात 75 टक्के व्यावसायिकांचा सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड सर्वबाद 407 धावा, मोहम्मद सिराजने घेतले सहा विकेट, हैरी ब्रुक व जेमी स्मिथचे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष कांबळे, सहशिक्षक महाराष्ट्र विद्यालय, निलंगा, लातूर👤 गजानन बुद्रुक, हिंगोली 👤 गिरीश कहाळेकर, नांदेड 👤 नरेश शिलारवार, धर्माबाद 👤 मारोती कदम, साहित्यिक, नांदेड 👤 नागनाथ भत्ते, विशेष शिक्षक, धर्माबाद 👤 गणपत बडूरकर, माध्यमिक शिक्षक, धर्माबाद 👤 संतोष शेळके, साहित्यिक, कर्जत 👤 बालकिशन कौलासकर, धर्माबाद 👤 डॉ. मनोज तानूरकर, हस्ताक्षर तज्ञ👤 रमेश आबूलकोडं, LIC प्रतिनिधी 👤 सुदर्शन जावळे पाटील 👤 सुधाकर चिलकेवार, शिक्षक, धर्माबाद 👤 अशोक पाटील, देगलूर 👤 विजय प्रकाश पाटील गाडीवान 👤 मोतीराम तोटलोड, धर्माबाद👤 अजय चव्हाण *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 18*खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल, फेकल्यावर पांढरा, ओळखा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - चुंबक ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे अधिक चांगले असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) "जानी हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे लेकिन तब, जब बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा" हा प्रसिद्ध डायलॉग कोणत्या चित्रपटातील आहे ?२) भारताची गुप्तहेर संस्था 'रॉ' च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली ?३) विम्बल्डन स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे ?४) 'फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात ? *उत्तरे :-* १) सौदागर ( १९९१ ) २) पराग जैन ३) टेनिस ४) सदावर्त, अन्नछत्र ५) प्रोटॉन आणि न्यूट्रॉन*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅*************************रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई || धृ ||भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||इतुक्यासाहित त्यां बा यावे, माझे रंगणी नाचावे || २ ||माझा रंग तुझे गुणी, म्हणे नामयाची जनी || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपली ओळख कितीही मोठ्या माणसांशी जरी असेल तरी ती ओळख आणि आपल्या कार्याची किंमत आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपले आरोग्य चांगले राहते तोपर्यंतच असते. जेव्हा आपले आरोग्य आणि आर्थिक स्थिती हळूहळू कमी व्हायला लागते तेव्हा, कितीही जवळचे लोक का असेनात क्षणात अनोळखी होऊन जातात. म्हणून ह्या सर्व व्यर्थ गोष्टींच्या भ्रमात किंवा गर्वाच्या भोवऱ्यात पडून कोणाचा अपमान करू नये. वेळ आल्यावर गरीबाच्याच घरी प्यायला पाणी मिळते आणि तिथेच आपले कितीही ओळखीचे जरी लोक असतील तरी आपल्याला कमी लेखतात असे अनेक चित्र याच समाजात बघायला मिळत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अहंकारी राजाला धडा*एक अहंकारी राजा होता. त्याला आपल्या ऐश्वर्याचा आणि राज्याचा गर्व होता. तसेच आपली शक्ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्याला गर्व चढायचा. आपल्यासमोर तो इतरांना तुच्छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. या कारणांमुळे लोक त्याच्यावर नाराज असायचे. त्याच राज्यात एका विद्वान पंडीताने त्याला वठणीवर आणण्याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्कारही केला नाही उलट त्याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्या, दान पाहिजे असेल तर दान घ्या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्य जे काही मागायचे ते तुम्ही माझ्याकडून मागून घ्या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्या हसण्याचे कारण काही कळेना, हसण्याचा भर ओसरल्यावर पंडीत म्हणाला,’’राजन, तुम्ही मला काय दान देणार कारण तुमच्याकडे मला देण्यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्याची इच्छा आहे काय असे विचारले. त्यावर पंडीतजी म्हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्याने विचार करा, तुमचा जन्मच मुळी तुमच्या इच्छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही जन्माला आलात. तुमचे धान्यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्या लेकरांसाठी अन्न पुरविले म्हणून तुम्ही ते सांभाळत आहात आणि खजिन्याचे म्हणाल तर धन हे करातून आलेले म्हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्य हे तुम्हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्ही मला काय म्हणून देणार आणि दिलेल्या गोष्टीचा काय म्हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्यादिवसापासून गर्व पण सोडून दिला.तात्पर्यः- जे आपले नाही त्यावर गर्व बाळगणे व्यर्थपणाचे आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 जुलै 2025💠 वार - शुक्रवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15cCQLzepG/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 185 वा दिवस 🔹 महत्त्वाच्या घटना:• १७७६ – अमेरिकेने ब्रिटिश सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य जाहीर केले. हा दिवस "अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन" म्हणून साजरा केला जातो.• १९७५ – पोर्तुगालने केप व्हर्डे या देशाला स्वातंत्र्य दिले.• २००५ – नासाच्या Deep Impact यानाने टेम्पेल-१ धूमकेतूपर्यंत पोहोचून त्यावर संशोधनासाठी यंत्र पाठवले.🎂 जन्म:• १८०७ – ज्यूसेपे गारिबाल्दी, इटालियन क्रांतीकारक.• १९०१ – विल्यम स्टीनबर्ग, जर्मन-अमेरिकन संगीत संचालक.• १९२७ – गिना लोब्रीजिदा, इटालियन अभिनेत्री.• १९५९ – काल्विन फिश, ब्रिटिश रेसिंग ड्रायव्हर व समालोचक.🕯️ मृत्यू:•|१९३४ – मेरी क्युरी, नोबेल पुरस्कार विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ व रसायनशास्त्रज्ञ.• १९६९ – अल्फ्रेड क्रेन्स, नोबेल पुरस्कार विजेते जर्मन लेखक.• २००३ – बेरी वाईट, प्रसिद्ध अमेरिकन गायक.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आईचं पत्र हरवलं*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी ठोस प्रयत्न होणार - शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाना येथील एनक्रूमा मेमोरीयल पार्कला दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *थॅलेसेमिया रुग्णांसाठी महत्त्वाचा निर्णय, एचपीएलसी चाचणी सक्तीची करण्यासाठी नवी नियमावली येणार; विवाहपूर्व चाचणीचाही विचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडली:, भंडारा जिल्ह्यात संततधार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एक वृक्ष आईच्या नावे, हिंगोलीत अखिल भारतीय अग्रवाल महासभेचा उपक्रम, १ हजार वृक्षलागवडीचा केला संकल्प*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून, संत ज्ञानेश्वर माऊली व संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पालखीची भेट, भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गिलचे धडाकेबाज द्विशतक, 21 चौकार, 2 षटकारांसह 311 चेंडूत 200 धावा, भारत सर्वबाद 587*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कवी गोविंद कवळे, नांदेड 👤 प्रभाकर शेळके👤 श्याम उपरे 👤 बंडोपंत लोखंडे, पदवीधर शिक्षक, नांदेड 👤 बंडू आंबटकर, सामाजिक कार्यकर्ता, चांदुर 👤 कमलाकर जमदाडे, पत्रकार, बिलोली 👤 श्रीपाद वसंतराव जोशी, धर्माबाद👤 वृषाली सानप काळे, साहित्यिक, मुंबई 👤 राजकुमार बिरादार 👤 गणेश मंडाळे👤 बालाजी मंडलेकर 👤 परमेश्वर मेहेत्रे 👤 अविनाश खोकले 👤 प्रदीप यादव *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 17*लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो, पण रबरासमोर मी हरतो,ओळखा पाहू मी कोण ....?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - बसचा वाहक / कंडक्टर••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्ञानाची भूक ही माणसाची मूलभूत गरज आहे, ती माणसास पशु कोटीतून वर काढते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या गुरुचे नाव काय ?२) रशियातील माउंट एल्ब्रस जिंकणारा जगातील सर्वात लहान गिर्यारोहक कोण बनला आहे ?३) महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली ?४) 'प्रेरणा देणारा' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) कोणते उपकरण दाब मोजण्यासाठी वापरला जाते ? *उत्तरे :-* १) राजकुमार शर्मा २) तेगबीर सिंग, पंजाब ( ६ वर्षे ९ महिने ) ३) रवींद्र चव्हाण ४) प्रेरक ५) बॅरोमीटर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦖 *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?* 🦖 ************************** पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ये हंसावरती बसून शारदे मायुरावरती बसून || धृ ||नेसून शुभ्र पातळ | गळा घालून मुक्ताफळकटी कंबरपट्टा कसून | शारदे मायुरावरती || १ ||हाती घेवूनीया वीणा | करी मंजुळ गयानाये सभेमध्ये बसून शारदे मायुरावरती || २ ||तुका म्हणे ब्रम्हानंदिनी | मम हृदयी विराजुनीदे अंतजीत बसून शारदे मायुरावरती || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• आपण कोणाचाही सल्ला न घेता मेहनतीने सर्व काही मिळविलेले असते. हे सर्व बघून, स्वतःहून कोणी आपल्याला तू असं कर, तसं कर मी म्हणतो त्या प्रमाणे वाग असे जर कोणी लाडीगोडी लावून म्हणत असतील तर आधी त्या माणसाला वाचायला शिकले पाहिजे. या प्रकारचे बोलणे तेव्हाच येते जेव्हा, आपला मार्ग सत्याच्या वाटेवर असतो. एकदा माणूस या प्रकारच्या बोलण्यात आला की, एवढ्या वर्षांची केलेली तपस्या, प्रामाणिकपणा, मेहनत, संघर्ष आणि स्वाभिमान नष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून कोणावर विश्वास ठेवण्याआधी स्वतः वर विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकावे.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*घुबड आणि टोळ*एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.तात्पर्य - आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 जुलै 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1EJbRMpxqa/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••वर्षातील 184 वा दिवस 🗓️ महत्त्वाच्या घटना :• १९०८ – युनायटेड स्टेट्समध्ये सॉफ्ट ड्रिंक "फ्रूट फ्लेवर पेय कोका कोला" प्रथम विक्रीस आले.• १९७९ – भारताने INS Viraat हे विमानवाहू युद्धनौकेचे बांधकाम सुरू केले.• १९८७ – कनिष्ठ वयाच्या वायूसेनेच्या पायलटचा पहिला उड्डाण दिवस.👤 जन्म :• १८८३ – फ्रांझ काफ्का, झेक लेखक, ‘द ट्रायल’, ‘द मेटामॉर्फोसिस’ या विख्यात कादंबऱ्यांचे लेखक.• १९०४ – सदानंद बखरे, प्रसिद्ध मराठी लेखक व नाटककार.• १९३८ – गुलजारीलाल नंदा, भारताचे हंगामी पंतप्रधान.⚰️ मृत्यू : • १९६९ – ब्रायन जोन्स, प्रसिद्ध ब्रिटिश गिटारिस्ट आणि The Rolling Stones बँडचे संस्थापक सदस्य.• २०२० – सर्वानंद सिंह, माजी भारतीय नेमबाज व राष्ट्रकुल पदक विजेता.📌 जागतिक विशेष दिन :• जागतिक प्लास्टिक बॅग मुक्त दिन••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बदललेल्या सरकारी शाळा*..... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *राज्यात पावसाचा जोर वाढणार, 24 तासांत कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात आदिवासी साहित्य संमेलन, डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली 7 जुलैला होणार आठवे उलगुलान वेध साहित्य संमेलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय मागे, सुधीर मुनगंटीवार आणि गणेश नाईकांमध्ये सभागृहात जुंपली, माजी वनमंत्री सरकारवर भडकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास, ICMR चा दावा- लसीशी याचा संबंध नाही, 18-45 वर्षे वयोगटातील लोकांवर संशोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गडचिरोलीत स्टील हब होणार, जिल्हा खनिकर्म प्राधिकरण विधेयक विधानसभेत मंजूर; 1000 कोटींची गुंतवणूक येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरात शालेय वारकरी दिंडी, १५०० विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत होणार सहभागी, शनिवारी सकाळी ९ वाजता प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवस अखेर भारत 310/5, कर्णधार शुभमन गिलचे शतक तर यशस्वी जैस्वाल 87 धावावर बाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विजय लक्ष्मण लंके 👤 संतोष नलबलवार, शिक्षक, परभणी 👤 लक्ष्मीकांत गिरोड 👤 साहेबराव कांबळे 👤 सविता सावंत👤 दिगंबर माने 👤 बालाजी मुंडलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 16*मी वेडा नाही तरीही कागद फाडतो, मी पोलिस नाही तरीही खाकी घालतो, मंदिरात नाही तरीही घंटा वाजवतो, सांगा पाहू मी कोण ?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - कांदा ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जे कार्य तडीस न्यायचे असते ते चिकाटीने केले तर त्यात नक्कीच यश मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) देशातील पहिले डिजिटल शहर कोणते बनले आहे ?२) आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार कोण ?३) यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?४) 'पूर्वी कधी घडले नाही असे' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) 'डेंग्यू' या रोगाचे वाहक कोण आहे ? *उत्तरे :-* १) इंदूर, मध्यप्रदेश २) महेंद्रसिंग धोनी, भारत ३) आयुष शेट्टी, भारत ४) अभूतपूर्व ५) डास*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌧 *पाऊस केव्हा पडतो ?* 🌧 ************************पाऊस आपल्याला हवाहवासाही वाटतो आणि नकोनकोसाही वाटतो. वैशाख वणव्यापायी धरती सुकून गेलेली असली, पावसाविना डोळ्यांना पाणी येऊ लागलं की आपण 'येरे येरे पावसा' अशी त्याची आळवणी करतो. आणि तोच पाऊस रुद्रावतार धारण करत आला की नको नको रे पावसा, असा धिंगाणा म्हणून त्याला दटावतोही. जगाच्या पाठीवर आपल्या उपखंडांसारखे इतरही काही प्रदेश आहेत की जिथलं सारं जीवनचक्र, सारं अर्थकारण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलं तरी तो वर्षभरातून तीन चार महिनेच आपली हजेरी लावून जातो. उलट काही प्रदेशांत वर्षभर त्याची उपस्थिती असते. त्यामुळं पाऊस केव्हा पडणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं.धरतीवर असलेलं एकूण पाणी कायम असतं. त्यात वाढही होत नाही की घटही होत नाही. पण त्याचं सतत अवस्थांतर सुरू असतं. समुद्र तसंच नद्या नाले यांच्यामधलं पाणी प्रदूषित झालेलं असतं. सूर्याच्या उष्णतेनं त्याची वाफ होते. तापलेल्या पाण्याच्या जवळ असलेली हवाही तापते. तापलेली हवा आणि वाफ हलकी असल्यामुळे ती आकाशात वरवर जाते. वर गेल्यावर तिथलं तापमान थंड असतं. त्यामुळे त्या वाफेचं पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबामध्ये अवस्थांतर होतं. हे थेंब हवेत तरंगत राहतात. वाफ आणि हे जलबिंदू मिळून ढग तयार होतात. वाऱ्याने हे ढग इकडेतिकडे फिरत राहतात. त्यांना थंड हवा लागली की त्यातल्या आणखी वाफेचे जलबिंदूंमध्ये अवस्थांतर होते. हे जलबिंदूही वेडेवाकडे फिरत असतात. एकमेकांवर आपटतात. त्यातले काही एकत्र येऊन त्यांचं आकारमान वाढतं. असे ते मोठे आणि जड झाले की तरंगू शकत नाहीत. जमिनीच्या दिशेने झेपावतात. वारे त्यातल्या काही बिंदूंना परत वरच्या दिशेने ढगांमध्ये ढकलतात. ही चढाओढ चालू राहत ते जलबिंदू आणखी मोठे होतात. आता ते हवेत तरंगू शकत नाहीत. जमिनीकडे खेचले जातात. पाऊस पडतो. हे पावसाचं पाणी शुद्ध झालेलं असतं. त्यातले प्रदूषण नाहीसे झालेले असतात. परत एकदा शुद्ध आणि गोड्या पाण्याचे साठे पूर्ववत होतात. असं हे जलचक्र अव्याहत चालूच असतं.उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या जवळपास असणारा प्रदेश जास्त तापमानाचा असतो. जसजसं अधिकाधिक उत्तरेला जावं तसतसं तापमान घसरत जातं. त्यामुळे दक्षिणेकडून उबदार हवेचे झोत उत्तरेकडे आणि उत्तरेकडून थंड हवेचे झोत दक्षिणेकडे प्रवास करत असतात. त्यांच्या तापमानांमध्ये लक्षणीय फरक असल्यामुळे जिथं ते दोन एकमेकांना भिडतात तिथं ते एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत. त्यांच्या सीमेवर फ्रंटल सिस्टम तयार होते. पुढे पुढे सरकत राहते. गरम हवा हलकी असल्यामुळे तिला पुढे पुढे येऊ पाहणाऱ्या थंड हवेच्या झोतावर चढावं लागतं. तसं झालं की ती थंड होते. तिच्यातल्या वाफेचं पाण्यात अवस्थांतर होऊन पाऊस पडतो.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?" या पुस्तकातून*👆🏼*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••उस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || १ ||कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || २ ||नदी डोंगी परी जल नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ३ ||चोख डोंगी परी भाव नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा || ४ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जी व्यक्ती दुसऱ्यांच्या विषयी नको त्या शब्दात बोलत असेल किंवा सांगत असेल तर त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास करू नये. आज ती व्यक्ती दुसऱ्या बद्दल बोलते कदाचित परवा आपल्या विषयी सुद्धा बिनधास्तपणे बोलू शकते.ज्याच्या डोक्यात चौफेर धावणारे नकारात्मकपणाचे किडे असतात ते दुसऱ्यांचे कधीच चांगले करू शकत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *" सत्याचा विजय "*एकदा एका गावात अर्जुन नावाचा एक छोटा मुलगा राहत होता. तो खूप हुशार, पण थोडा खोडकर होता. एक दिवस शाळेत खेळताना त्याच्या हातून शाळेच्या खिडकीची काच तुटली. सारे मुले घाबरली. शिक्षकांनी विचारले, "काच कोणी फोडली ?"सर्व मुले शांत होती, पण अर्जुनचे मन चुळबुळ करत होते. त्याला वाटत होते, "सांगितले तर शिक्षा मिळेल, पण खोटं बोलणं चुकीचं आहे." शेवटी त्याने धीर करून शिक्षकांसमोर उभा राहून म्हणाला, "सर, ती काच माझ्या हातून चुकून फुटली."शिक्षकांनी थोडा वेळ त्याच्याकडे बघितलं, आणि म्हणाले, "अर्जुन, तू चूक केलीस, पण सत्य बोलून तू मोठं धाडस केलंस. आम्ही तुझ्या प्रामाणिकपणाचं कौतुक करतो." शिक्षकांनी त्याला शिक्षा न देता सर्वांसमोर शाबासकी दिली. तेव्हापासून अर्जुन इतर मुलांसाठी आदर्श ठरला. त्याला एक मोठा धडा मिळाला, सत्य बोलणं हेच खरं धैर्य आहे.तात्पर्य :सत्य आणि प्रामाणिकपणा हेच खरे संस्कार आहेत. चूक झाली तरी तिची कबुली देणं हेच मोठेपणाचं लक्षण आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 02 जुलै 2025💠 वार - बुधवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/1Z2YQw5YVx/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष* . 🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📜 महत्वाच्या घटना -• १८९७ – गुघर फोर्टच्या लढाईत रणगडावर वीर बाजीप्रभु देशपांडे यांनी घातकी वाट अडवून शौर्य गाजवले.• इ.स. १९०० - जर्मनीच्या फ्रीडरिक्सहाफेन गावाजवळ झेपलिनचे पहिले उड्डाण• १९३७ – अमेरिकन वैमानिक अमेलिया एअरहार्ट विमानासह बेपत्ता.• १९७२ – भारत सरकारने बँका राष्ट्रीयीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६ बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.• इ.स. १९७६ - व्हियेतनाम युद्धाच्या १ वर्षानंतर उत्तर व्हियेतनाम व दक्षिण व्हियेतनामचे पुन्हा एकत्रीकरण.🌹 जन्म :• १८८० - गणपतराव बोडस, मराठी संगीत नाटकांतील गायक-अभिनेता.• १९०८ – थोर बंगाली वैज्ञानिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस (Bose-Einstein statistics प्रसिद्ध).• १९५२ – विष्णुवर्धन, प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता.• १९८६ – लिंडसे लोहान, अमेरिकन अभिनेत्री व गायक.🌹 मृत्यू :• १९२८ - नंदकिशोर बल, उडिया कवी, कादंबरीकार.• १९९६ - राज कुमार, हिंदी अभिनेता.• १९९७ – जेम्स स्टुवर्ट, प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता.• २०१५ – मनोज कुमार पांडे, कारगिल युद्धातील परमवीर चक्र विजेते शहीद.••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्यध्यापकास पत्र*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय जनता पार्टीने रवींद्र चव्हाण यांना दिली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *उत्तराखंडमध्ये पावसाचा धुमाकूळ, यमुनोत्री धाममध्ये रस्ते खचले, महाराष्ट्राच्या 200 भाविकांसह 600 जण अडकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाळी अधिवेशन - विधानसभा अध्यक्षांचा राजदंड उचलण्याचा प्रयत्न केल्याने, काँग्रेस नेते नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अहिल्यानगर : शिक्षकांनी आता अधिक समृद्ध होण्याची गरज, शिक्षणाधिकारी पाटील यांचे मत, नवोदय परीक्षा पूर्वतयारीबाबत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत; शासनाचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून सुरु होणार दुसरा कसोटी सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंडित दगडगावे, शिक्षक, धर्माबाद 👤 शिवानंद चौगुले, पुणे 👤 वसंत घोगरे पाटील 👤 जेजेराव सोनकांबळे👤 मारोती जाधव 👤 गोपाल पामसकर 👤 श्रीनिवास पुल्लावार 👤 शैलेश तरले👤 सतिश अवधूतवार 👤 विक्रांत दलाल, नांदेड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⚧🍃 *गमतीदार कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 15*नेहमीच असतो मी तुमच्या घरी, तरी काहींनाच मी आवडतो, एकावर एक कपडे मी घालतो, तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते, सांगा पाहू मी आहे तरी कोण …?*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येकालच्या कोड्याचे उत्तर - मेणबत्ती / पेन्सिल ••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या विद्येमध्ये स्वतंत्रपणे वस्तुनिष्ठ विचार करण्याची दृष्टी आहे कर्तव्यशक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतीय हवामान विभाग हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी कोणत्या चार रंगाच्या कोडचा वापर करतात ?२) समाजवादी अर्थव्यवस्थेचा मुख्य हेतू कोणता ?३) मलेरिया तपासणीसाठी कोणती रक्त चाचणी केली जाते ?४) 'पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक' या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ?५) देशातील पहिली महिला तबलजी कोण आहे ? *उत्तरे :-* १) रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन २) सामाजिक कल्याण साधणे ( चीन, रशिया ) ३) R.D.T. ४) पूरग्रस्त ५) अनुराधा पाल*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया 📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *लोकसंख्या* 📙साऱ्या जगाच्या पाठीवर लोकसंख्यावाढीचे भूत आरूढ झालेले आहे. अनेक भेडसावणारे प्रश्न त्यातून उभे राहिले आहेत व ते वाढतच जाणार आहेत. भल्याभल्यांची मती यामुळे कुंठित झाली आहे. भारताची प्रगती खूप झाली, अन्नधान्य उत्पादन वाढले, कारखानदारी वाढली; पण हे सर्व आज महाप्रचंड लोकसंख्येने कुठेतरी पार गिळुन टाकले आहे.पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या तिप्पट वाढली. दर हजारी मृत्यूचे प्रमाण घटत गेले, साथीचे आजार आटोक्यात आले, बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले व बाळंतपणात मृत्यू ओढवून अकाली निधनाचे प्रमाण स्त्रियांत अल्प राहिले. याउलट जन्मप्रमाण मात्र तेवढेच राहिल्याने अत्यंत झपाट्याने लोकसंख्या वाढत गेली आहे. लोकसंख्यावाढीमध्ये आणखी एक घटक महत्त्वाचा ठरतो. प्रजननक्षम जोडप्यांची संख्या वाढते, तसे वाढीचे प्रमाण वाढत जाते.लोकसंख्यावाढीचा प्रमुख सिद्धांत माल्थस यांनी मांडला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढत असते. यामुळेच अनेक शतके स्थायी असलेली लोकसंख्या १७५० साली जगभर वाढू लागली. या वाढीवर आरोग्यादायी सेवांचा अनुकूल परिणाम झाल्याने आज ७०० कोटींचा आकडा जगाने पार केला आहेच. लोकसंख्येच्या बाबतीत जगाचे उत्तर व दक्षिण असे उघडउघड मतभेद झालेले आढळतात. उत्तरेकडचे सर्व देश हे सध्या स्थिर लोकसंख्या असलेले बरेचसे प्रगत व प्रजननक्षम जोडप्यांना 'शिक्षित' करण्यात यशस्वी झालेले आढळतात. अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय असल्याशिवाय घरात मूल जन्माला येऊ न देणे हे त्यांनी पटवून घेतले आहे.याउलट जन्माला येणारे मूल जगेल, मोठे होईल याची दक्षिणेकडील अप्रगत, आर्थिकद्रुष्ट्या मागास देशांना खात्री नसते. श्रमाची किंमतच त्यांना माहित असल्याने अधिक मुले म्हणजे श्रम करण्यासाठी अधिक हात, याच समीकरणाचा गोंधळ त्यांच्या डोक्यातून निघत नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, दक्षिण आशिया व मध्य आशिया हा साराच भाग दक्षिणेचा म्हणून मोडतो.लोकसंख्या मोजणे हा एक शास्त्रीय भाग आहे. जनगणना वा सेन्सस दर दहा वर्षांनी केली जाण्याची गेल्या शतकातील पद्धत आहे. शक्यतोवर एकाच दिवशी साऱ्या देशातली पाहणी व मोजणी करून मग त्याची आकडेवारी एकत्र केले जाते. जनगणनेची पद्धत अमेरिकेत प्रथम १७९० साली वापरली गेली; पण जनगणनेचा वापर व उपयोग शास्त्रोक्तदृष्ट्या होतो, अशा नोंदी प्राचीन चिनी उल्लेखातसुद्धा आढळतात.२०१८ च्या जनगणनेनुसार भारताची सध्याची लोकसंख्या अंदाजे १.३५ अब्ज इतकी आहे. दर हजारी पुरुषसंख्येमागे स्त्रियांचे प्रमाण फक्त ९३३ आहे. प्रजननक्षम जोडप्यांचा जननदर म्हणजेच फर्टिलिटी रेट २.७ इतका आहे. तो २.१ पर्यंत खाली आणण्याचे आपल्याला प्रयत्न करायचे आहेत म्हणजे लोकसंख्यावाढीवर आपण नियंत्रण आणू शकू. एक वर्षाच्या आत होणारे बालमृत्यू इन्फंट मॉरटॅलिटी या नावाने ओळखले जातात. त्यांचा आकडा दर हजारी ३०.१५ इतका मोठा आहे. गरोदरपणातून व बाळंतपणाच्या संदर्भातील आजारातून होणाऱ्या मातांच्या मृत्यूचे प्रमाणही एक लाखामागे ४४० आहे. तसेच स्त्रियांमधील साक्षरता आजही बहुतांश राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी आढळते. या साऱ्या आकड्यांना अपवाद फक्त केरळ या राज्याचा. भारतातील वृद्धांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७ टक्के भरते. २० वर्षांखालील व्यक्तींची सध्या संख्या सुमारे ४८ टक्के आहे. यामुळेच सर्वात जास्त तरुण असलेले मोठे राष्ट्र म्हणून आपण २०३० साली मिरवू शकू.लोकसंख्या स्थिर असणे व कमी होणे हा प्रकार जगातील सर्व प्रगत देशात गेली २५ वर्षे घडत आहे. याचे विश्लेषण मात्र अनेक पद्धतीने केले जाते. युरोपमधून अमेरिकेत व जगभर युरोपियन सतत जात राहिले, अन्यथा युरोपमध्ये संख्याविस्फोट झाला असता, असेही काही तज्ज्ञ म्हणतात. यासाठी ते अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व भारतातील ब्रिटिश वसाहती यांची एकत्रित आकडेवारी मांडतात. नॉर्वे, स्वीडन, जर्मनी, स्वित्झर्लंड यांची लोकसंख्या कमी होत आहे. एक गोष्ट निश्चित आहे की, भारतातच काय पण जगातही लोकसंख्या सतत वाढत गेली, तर तिला पुरेसे अन्न पुरवणे व गरजा भागवणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कठीणच आहे.'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• 💡 ‼ *संतवाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नमन माझे गुरुराया |महाराजा दत्तात्रया || धृ ||तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवीची विश्रांती || १ ||माझ्या जीवीचे साकडेकोण निवारील कोडे कोडे || २ ||माझ्या अनुसूया सुतातुका म्हणे पाव आता || ३ ||••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तीनही ऋतूमध्ये थंडी, पाऊस आणि उन्ह जर सारखेच पडत राहिले तर पाहिजे तसं शेतात पीक निघणार नाही. एवढेच नाही तर मानवी जीवनाला व पशुपक्ष्यांना देखील धोका होऊ शकतो म्हणून ते तीनही ऋतू आपापल्या योग्य वेळेत बदलत असतात आणि ते सर्वांना फायदेशीर ठरत असतात. तसंच माणसानी सुद्धा परिस्थिती बघून आपल्यात थोडाफार बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हे सर्व काही करताना मात्र आपले सकारात्मक विचार व आपला स्वाभिमान कधीच सोडू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*समाधान हेच सुख*एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Posts (Atom)