✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 22 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/16AvUagYLb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🧿 *_आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस_* 🧿•••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_ या वर्षातील ५३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🧿 *_महत्त्वाच्या घटना:_* 🧿••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: पुण्याच्या काका पवार यांनी इन्फाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीतील सुवर्णपदक मिळविले* *१९७९: ’सेंट लुशिया’ ला (ब्रिटनपासून) स्वातंत्र्य मिळाले**१९७८:श्री.यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे १६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. या पदावर सर्वात प्रर्दीघ काळ (२६९६ दिवस) त्यांनी काम केले**१९४८: झेकोस्लोव्हाकियामध्ये कम्युनिस्ट क्रांती**१९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ. डी. रूझवेल्ट यांनी जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला**१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला.* 🧿 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: केतकी माटेगांवकर --- मराठी अभिनेत्री व गायिका**१९८४: भावेश दत्ताराम लोंढे -- कवी**१९८३: अजिनाथ रावसाहेब सासवडे -- लेखक**१९८१: इंद्रजित गणपत घुले -- कवी, लेखक, संपादक, अनुवादक**१९७८: साईप्रसाद गुंडेवार -- भारतीय अभिनेता आणि मॉडेल (मृत्यू: १० मे २०२० )**१९७७: नामदेव भोसले -- आदिवासी समाजसेवक तथा साहित्यिक* *१९७४: प्रदीप शंकर सुतार -- लेखक* *१९६७: प्रा. डॉ. सोमनाथ महादेव दडस -- लेखक**१९६५: प्रा. डॉ. तीर्थराज कापगते --- कवी, लेखक**१९६५: सूरज आर. बडजात्या -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते* *१९६२: प्रा. प्रकाश जनार्दन कस्तुरे -- लेखक, वक्ते**१९६०: जयंत पवार --- पत्रकार,मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक (मृत्यू: २९ ऑगस्ट २०२१ )**१९५६: सुभाष शांताराम जैन -- कवी, लेखक पत्रकार, छायाचित्रकार**१९५५: सुरेन्द्र पाथरकर -- लेखक* *१९५२: परशुराम खुणे -- झाडीपट्टीतील रंगभूमीचे कलाकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित* *१९५०: नयना आपटे -- मराठी नाटक आणि चित्रपटांतील सुप्रसिद्ध अभिनेत्री**१९४९: विशाखा अनंत गुप्ते -- लेखक* *१९३६: रघुनाथ कृष्ण जोशी -- सुलेखनकार, डिझायनर, कवी आणि शिक्षक (मृत्यू: २० एप्रिल २००८ )**१९३५: प्रा.चंद्रकुमार नलगे -- जेष्ठ साहित्यिक, विविध पुरस्काराने सन्मानित**१९२२: व्ही. जी. जोग – व्हायोलिनवादक (मृत्यू: ३१ जानेवारी २००४ )**१९२२: सुलोचना भीमराव खेडगीकर -- लेखिका (मृत्यू: १८ मार्च २००४ )* *१९२०: इफ्तिखार – चरित्र अभिनेता (मृत्यू: ४ मार्च १९९५ )**१९२०: कमल कपूर -- भारतीय अभिनेता आणि निर्माता(मृत्यू: २ ऑगस्ट २०१० )**१९१०: रामचंद्र अनंत काळेले -- कवी, काव्य समीक्षक (मृत्यू: १२ जून १९८१ )**१९०८: न्या.राम केशव रानडे -- लेखक, विचारवंत,प्रवचनकार( मृत्यू: ३० ऑगस्ट १९८५)**१९०६: पहारी सन्याल -- भारतीय अभिनेता आणि गायक (मृत्यू: १० फेब्रुवारी १९७४ )**१९०२:फ्रिट्झ स्ट्रासमान – जर्मन भौतिकशात्रज्ञ (मृत्यू:२२ एप्रिल १९८०)**१८९८: कमला गोपाळ देशपांडे -- संस्थापक (मृत्यू: ८ जुलै १९६५ )**१८९०: नारायण केशव भागवत -- बौद्ध वाड्:मयाचे संशोधक, लेखक (मृत्यू: २० एप्रिल १९६२ह)**१८५७: हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ जानेवारी १८९४ )**१८५७: लॉर्ड बेडन पॉवेल – बालवीर (Scout) चळवळीचे प्रणेते (मृत्यू: ८ जानेवारी १९४१ )**१८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र ’न्यायरत्‍न’ भट्टाचार्य (मृत्यू: १२ एप्रिल १९०६ )**१७३२: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९ )* 🧿 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🧿 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००९: लक्ष्मण देशपांडे –’वर्‍हाड निघालंय लंडनला’साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (जन्म: ५ डिसेंबर १९४३ )**२०००: विनायक सदाशिव तथा वि. स. वाळिंबे – लेखक व पत्रकार (जन्म: ११ ऑगस्ट १९२८ )**२०००: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: २३ ऑक्टोबर १९२३ )**१९८२: जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी (जन्म: ५ डिसेंबर १८९४ )**१९५८: मौलाना अबूल कलाम आझाद – स्वातंत्र्यचळवळीतील विद्वान नेते,भारताचे पहिले शिक्षणमंत्री,भारतरत्‍न (जन्म: ११ नोव्हेंबर १८८८ )**१९४४: कस्तुरबा गांधी यांचे पुण्यातील आगाखान पॅलेसमधे निधन (जन्म: ११ एप्रिल १८६९ )**१९२५: सर थॉमस क्लिफोर्ड ऑलबट – ज्वरमापीचा (Clinical thermometer) शोध लावणारे इंग्लिश डॉक्टर (जन्म: २० जुलै १८३६ )**१८२७: चार्ल्स विल्सन पील अमेरिकन – चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक (जन्म: १५ एप्रिल १७४१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*नांदेड जिल्ह्याची महती सांगणारी कविता*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, फुरोगामी लोकं काहीही म्हणू देत, दिल्ली मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवळकरांच्या भाषणाला मोदी-पवारांची दाद, तर मराठीला अभिजात दर्जा दिल्याबद्दल पवारांकडून मोदींचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *समास, जोड्या जुळवा ते निबंध, जालन्यातील परीक्षा केंद्रावर दहावीचा पेपर फुटला, थेट झेरॉक्स सेंटरवर प्रिंट; महाराष्ट्राच्या शिक्षण वर्तुळात खळबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छाया कदमची आणखी एक गगनझेप! पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गृहमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते आज ग्रामीण भागातील 10 लाख लाभार्थ्यांना मंजूर निधीचे पहिल्या हप्त्याचे वाटप होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मोदी सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत लवकरच ९ कोटी ८० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शेख शाहरुख👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 03*उंचच उंच बर्फाच्या राशी**देशाचे करतो सदैव रक्षण**वनौषधींचे आगर आहे**पर्यावरणाचे करतो संरक्षण*उत्तर - उद्याच्या पोस्टमध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालच्या कोड्याचे उत्तर - नदी••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात धोकादायक पक्षी म्हणून कोणता पक्षी ओळखला जातो ?२) लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट कोणाच्या आयुष्यावर आधारित आहे ?३) दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री कोण ?४) 'हताश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात कमी भ्रष्टाचारी देश कोणता ? *उत्तरे :-* १) कॅसोवरी पक्षी ( Cassowary bird ) २) छत्रपती संभाजी महाराज ३) रेखा गुप्ता ४) निराश ५) डेन्मार्क*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🔍 *बोटांचे ठसे कसे मिळवतात ?* 🔍 आपल्या तळहातांनी आणि बोटांनी आपण अनेक वस्तू पकडतो. ती पकड सुलभ व्हावी यासाठी निसर्गानं या ठिकाणची कातडी वेगळ्या प्रकारची  बनवलेली आहे. या कातडीवर केस उगवत नाहीत. शिवाय ही कातडी जर गुळगुळीत राहिली तर हातात धरलेल्या वस्तूंवर तिची पकड व्यवस्थित बसणार नाही. यासाठी या कातडीचं त्या वस्तूबरोबर घर्षण होईल आणि तसे होताना कातडीला इजा होणार नाही अशीही व्यवस्था केली आहे. त्यासाठी या कातडीवर निरनिराळ्या वळ्या पडतात. या वळ्यांच्या आत सतत घामाचा स्राव करणाऱ्या छिद्रांच्या रांगा असतात. त्या घामामुळं तळहाताला एक प्रकारचं वंगण मिळत राहतं. तसंच त्या छिद्रांना जोडलेल्या काही ग्रंथींमधून स्निग्ध पदार्थांचाही पाझर होत राहतो. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपली बोटं टेकतात, तेव्हा हे घाम आणि स्निग्ध पदार्थ यांचं मिश्रण त्या वळ्यांमधून त्या वस्तूवर चिकटतं. तिथं त्या वळ्यांचा ठसा उमटतो. यालाच बोटांचा ठसा म्हणतात.बोटांवरच्या या घर्षणवळ्यांचा रचनाबंध प्रत्येक व्यक्ती जन्मतःच घेऊन येते. कोणाही दोन व्यक्तींचे अगदी एकसारख्या एक जुळ्यांचेही बोटांचे ठसे सारखे नसतात. त्यामुळे या बोटांच्या ठशावरून कोणाचीही निर्विवाद ओळख पटवणे सहज शक्य होतं. याच गुणधर्माचा उपयोग गुन्हेगारांची अशी ओळख पटवण्यासाठी केला जातो. त्याला न्यायालयाचीही मान्यता आहे. ज्या वस्तूला बोटांचा स्पर्श झालेला असेल त्या वस्तूवर बोटांच्या घर्षणवळ्यातील घाम आणि स्निग्ध पदार्थांचं मिश्रण चिकटतं; पण त्यापायी उमटलेला ठसा सुप्त स्वरूपातच असतो. तो डोळ्यांना सहजासहजी दिसत नाही. त्यासाठी खास प्रकाशलहरींचा वापर करावा लागतो. त्या प्रकाशझोतात तो दिसतो; पण तो डोळ्यांना सहज दिसावा यासाठी एका खास पावडरचा, भुकटीचा वापर केला जातो.बहुतेक भुजटींमध्ये रोझिन, काळ्या रंगाचं फेरीक ऑक्साइड आणि दिव्याची काजळी असते. इतर काही भुकटींमध्ये शिसं, पारा, कॅडमियम, तांबं, टायटॅनियम, बिस्मथ या सारखी रसायनंही असतात. ही भुकटी त्या वस्तूंवर शिंपडली की जिथे ठसा उमटला आहे तिथल्या घाम आणि स्निग्ध पदार्थांच्या मिश्रणाला ती चिकटून बसते. ब्रशनं हलक्या हातानं उरलेली भुकटी काढून टाकली की मग चिकटलेली पावडर म्हणजेच तो ठसा स्पष्ट दिसू लागतो. एक खास पॉलिएस्टरची पट्टी त्या ठिकाणी चिटकवली की तो ठसा त्या पट्टीवर उमटतो. त्याचं छायाचित्र घेता येतं, तसाच तो संगणकातही साठविता येतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून* 👆*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥ श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥ ऐसें भाग्य मज देसी कवणें काळीं । होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥ वदनीं तुझें नाम वसे निरंतर । राखीन त्यांचे द्वार थोर आशा ॥४॥ येतां जातां मज करिती सावधान । वदनीं कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥  ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या प्रकारे आपण, आपल्या घराची मन लावून दैनंदिन साफसफाई करतो त्याच प्रकारे आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता त्याच प्रकारे केली तर कोणत्याही विकारांना मुळात स्थान मिळणार नाही. मनाची स्वच्छता अशीच निर्मळ, नि:स्वार्थी व प्रामाणिकपणाची असायला पाहिजे. जेथे स्वछता चांगली असते तेथे प्रसन्नता आणि शांतता मिळते तसेच ज्याचे मन स्वच्छ असते त्या माणसाकडे बघून मन प्रसन्न होते व गहिवरून येते आणि त्या माणसाविषयी सदैव आपुलकी वाटत असते. आज अशाच सकारात्मक विचाराची व माणसांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सोनेरी शिंगे* " एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://m.facebook.com/story.php?story_fbid=1431600076966762&id=100003503492582&mibextid=Nif5oz••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••☸️ *_जागतिक मातृभाषा दिन_* ☸️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_ या वर्षातील ५२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☸️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७५: जयश्री गडकर व बाळ धुरी यांचा विवाह झाला**१९५१: नेपाळ बंडखोराविरुध्द भारत व नेपाळची संयुक्त लढाई सुरू झाली**१९२५: ’द न्यूयॉर्कर’ या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.**१९१५: लाहोर कट – लाहोर, बनारस व मीरत या ठिकाणी सशस्त्र क्रांतिकारी उठाव झाला.**१८७८: न्यू हेवन, कनेक्टिकट येथे पहिली टेलिफोन डिरेक्टरी प्रकाशित करण्यात आली.**१८४८: कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंजल्स यांनी साम्यवादाचा जाहीरनामा ’द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’ प्रकाशित केला.**१८४२: जॉर्ज ग्रीनॉ याला शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.*☸️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☸️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: अमितराज सावंत -- मुंबईतील मराठी संगीतकार आणि गायक**१९७८: मुरलीधर ईश्वरदासजी खोटेले -- झाडी बोलीचे कवी, लेखक* *१९७७: स्मिता बन्सल -- चित्रपट व दूरदर्शन अभिनेत्री**१९६७: डॉ. मनोज केशवराव फडणीस -- लेखक* *१९६४: प्रा. डॉ. तनुजा नाफडे -- संगीततज्ज्ञ, लेखिका* *१९५९: हर्षा हरिष वाघमारे -- कवयित्री* *१९५१: प्रा. डॉ. शशिकांत लोखंडे -- लेखक, समीक्षक**१९५०: विजयराव दामोदर रुम --- लेखक, सामाजिक कार्यकर्ते* *१९५०: मीना वांगीकर -- मराठी-कन्‍नड अनुवाद करणाऱ्या एक लेखिका (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०१५ )**१९४५: अनिरुद्ध अनंत कुलकर्णी -- लेखक* *१९४५: डॉ.मधुकर केशव वर्तक -- लेखक, संपादक* *१९४२: डॉ.भगवान रंगनाथ कोठेकर -- लेखक* *१९४२: जयश्री गडकर – प्रसिद्ध अभिनेत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००८ )**१९३७: सुलभा अरविंद देशपांडे --- हिंदी-मराठी नाटक-चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करणाऱ्या अभिनेत्री (मृत्यू: ४ जून २०१६ )**१९३३: रा. रा. जांभेकर -- लेखक**१९३१: वसंत दामोदर कुलकर्णी -- मराठी वाङ्मयाचे अभ्यासक व संशोधक, संपादक* *१९२१: विद्याधर भास्कर उजगरे -- लेखक* *१९११: भबतोष दत्ता – अर्थतज्ञ (मृत्यू: ११ जानेवारी १९९७ )**१८९९: सूर्यकांत त्रिपाठी "निराला" -- प्रसिद्ध भारतीय कवी, कादंबरीकार, निबंधकार आणि कथा-लेखक (मृत्यू: १५ ऑक्टोबर १९६१ )**१८९८: बाळकृष्ण रामचंद्र मोडक -- लेखक, 'मुलांचे मासिक'कार (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९० )**१८९४: डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (मृत्यू: १ जानेवारी १९५५ )**१८७५: जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: ४ ऑगस्ट १९९७ )**१७९९: परशुराम बल्लाळ गोडबोले -- संस्कृत पंडित व मराठी लेखक (मृत्यू: ३ सप्टेंबर १८७४)* ☸️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☸️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१९: राजकुमार बडजात्या --चित्रपट निर्माते, राजश्री प्रोडक्शन चे प्रमुख( जन्म: १४ मे १९४१)**२०१९: श्रीधर माडगूळकर -- ग.दि. माडगूळकर यांचे पूत्र आणि ज्येष्ठ लेखक (जन्म: ६ फेब्रुवारी १९४७ )**१९९८: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (जन्म: १९ डिसेंबर १९१९ )**१९९४: त्र्यंबक कृष्णराव टोपे -- भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक शिक्षण तज्ञ मुंबई विद्यापीठाची माजी कुलगुरू (जन्म: २८ फेब्रुवारी १९१४)**१९९१: नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (जन्म: ४ जून १९३६ )**१९८४: मिखाईल अलेकसांद्रोविच शोलोखोव -- श्रेष्ठ रशियन लेखक, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २४ मे १९०५ )**१९७०: विनायक हरी ऊर्फ हरिभाऊ पाटसकर -- मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (जन्म: १५ मे १८९२)**१९७७: रामचंद्र श्रीपाद जोग – विख्यात साहित्य समीक्षक, कवी व विचारवंत (जन्म: १५ मे १९०३ )**१९७५: गजानन हरी तथा राजा नेने – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते व दिग्दर्शक(जन्म: १८ सप्टेंबर १९१२ )**१९६५: ’माल्कम एक्स’ – कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे अमेरिकन नेते (जन्म: १९ मे १९२५ )**१८२९: चन्नम्मा – कित्तूरची राणी (जन्म: २३ ऑक्टोबर १७७८ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीम कडून हार्दीक शुभेच्छा .........!.... Motivational Article .....*आयुष्यातील महत्वपूर्ण वळण...!*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या शालांत परीक्षेला आजपासून प्रारंभ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एसओयुएल (सोल) लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *रेखा गुप्ता यांनी स्वीकारला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलनास आजपासून होणार प्रारंभ, हे संमेलन 23 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट पाणी ने झी चित्र गौरव पुरस्कारात जिंकले तब्बल 7 पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, शिमलामध्ये तापमान 3 अंशांपर्यंत घसरले, दिल्लीत पाऊस, 23 राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा; मध्य प्रदेशात ढगाळ हवामान, राजस्थानच्या 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत भारताचा विजय, मोहंमद शमी वनडेमध्ये सर्वात जलद 200 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि शुभमन गिलचे आठवे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सचिन मानधनी, धर्माबाद👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक, धर्माबाद👤 संजय कासलोड👤 पियूष मुजळगे, धर्माबाद👤 एकनाथ पांचाळ👤 डॅनियल ग्राहम्बल, शिक्षक, देगलूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 02*स्वच्छ ठेवा हो तुम्ही मला**तहान तुमची मी भागवते**थांबत नाही कोठेच कधी**सतत मी वाहत असते*मी कोण .........?उत्तर उद्याच्या पोस्ट मध्येसंकलन व लेखन - नंदा परदेशीजि. प. शाळा बळसाणे जि. धुळेकालचे उत्तर - वृक्ष / वनस्पती / झाड••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) जगातील सर्वात सुंदर देश कोणता ?२) ट्रान्सपरंसी इंटरनॅशनलकडून करप्शन परसेप्शन इंडेक्स २०२४ नुसार जगातील सर्वात भ्रष्टाचारी देश कोणता ?३) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीबाबत आदेश जारी करणारे पहिले राज्य कोणते ?४) 'स्त्री' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ? *उत्तरे :-* १) न्युझीलंड २) सुदान ३) कर्नाटक ४) महिला, वनिता, नारी, ललना, कामिनी ५) ज्ञानेश कुमार*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*अंक / DIGIT* संख्यादर्शक चिन्हांना किंवा अक्षरांना ‘अंक’ म्हणतात. मोजण्याची. आवश्यकता मानवाला त्याच्या प्रारंभापासून स्वाभाविकपणेच भासली असावी. मानवजातीच्या बाल्यावस्थेत प्रत्येक मानवाला मी एक व हा दुसरा एवढे साधे ज्ञान असणार यात वाद नाही. म्हणजे दोन अंक मोजण्याइतपत त्याची प्रगती उपजतच असणार. त्याच्या पुढची पायरी म्हणजे त्याच्याजवळ असलेल्या वस्तूंची मोजदाद करावयास तो हळूहळू शिकला असेल. प्राथमिक अवस्थेमध्ये हाताची बोटे, गारगोट्या, झाडाची पाने, काठ्या यांचा उपयोग मोजण्यासाठी मानव करीत असे. जगातील बहुतेक जमाती प्राथमिक अवस्थेमध्ये सामान्यपणे अशाच तऱ्हेने अंकनिर्देश करीत असत. मानवास लेखनकला अवगत झाल्यावर तो एकेक अक्षराचा अंकासाठी उपयोग करू लागला. अशा तऱ्हेची पद्धती अ‍ॅरेमाइक, हिब्रू, खरोष्ठी, ब्राह्मी आणि ग्रीक लिपींत दिसून येते.मानवाने अंकाचा शोध लावला त्या वेळेस तो अंकांचे उच्चार कसे करीत असणार याविषयी गूढ वाटणे साहजिक आहे. वेदकालापासून सर्व ज्ञान एका पिढीपासून दुसऱ्या पिढीस मौखिक पद्धतीने शतकानुशतके दिले गेल्यामुळे भारतात अंकांचे उच्चार कोणते होते हे स्पष्ट होते; ते म्हणजे एक, द्वि, त्रि, चतुर्, पंचन्, षष्, सप्तन्, अष्टन्, नवन् आणि दशन् हे होत. या संस्कृत उच्चारांवरून पुढे मराठीत एक, दोन, तीन वगैरे संज्ञा अपभ्रष्ट स्वरूपात रूढ झाल्या.ईजिप्त : लेखनकलेचे सर्वांत प्रचीन नमुने ईजिप्तमध्ये सापडतात; तसेच अंकलेखनाचे नमुनेही (इ.स.पू.सु. ३४००) तेथेच सापडतात. तेथे एक ते नऊ ह्या अंकांसाठी उभ्या दंडांची योजना केलेली आढळते. ही रीत ⇨हायरोग्लिफिक लिपि-पद्धतीचा एक भाग आहे. दहा, शंभर, हजार ह्या संख्यांसाठी मात्र तेथे वेगळी चिन्हे वापरलेली आढळतात. लाखाकरिता बेडकाचे व दहा लाखाकरिता आश्चर्याचे बाहू पसरलेल्या मानवाचे चित्र काढले जाई. यानंतरच्या काळात ईजिप्तमध्ये हिअरेटिक अंक (इ.स.पू.सु. १२ वे शतक) आणि त्यापासून पुढे डेमॉटिक अंक (इ.स.पू.सु. ७ वे ते ३ रे शतक) उपयोगात आणले गेले. हिअरेटिक आणि डेमॉटिक अंकांतील फरक काटेकोरपणे दाखविणे कठिण असले, तरी हिअरेटिक अंकांपासून डेमॉटिक अंक विकसित झाले असावेत असे दिसते. जलद लेखनासाठी वरील दोन्ही पद्धती मूळ हायरोग्लिफिक पद्धतीपासून निघाल्या असाव्यात. हायरोग्लिफिक पध्दतीपेक्षा हिअरेटिक पद्धतीत अधिक चिन्हे असल्याने तीत लहानमोठ्या संख्या अधिक संक्षिप्तपणे दर्शविणे सोयीचे होते. हिअरेटिक अंकपद्धतीत आधी मोठ्या मूल्यांची चिन्हे आणि त्यानंतरत्यापुढे (उजवीकडे) कमी मूल्यांची चिन्हे लिहिली जात*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥ संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥ दुरोनियां देखें गरुडाचें वारिकें । गोपाळा सारिखें चतुर्भुज ॥३॥ नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरीं । ऋणि करुनि करीं घेई मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जो पर्यंत माणूस  जिवंत असतो तो पर्यंत एकमेकांना  आनंदाने , मिठी मारणे, हाताला , हात मिळवणे, सोबत मिळून, मिसळून खाणे, पिणे होत असते.पण, एकदा का त्या माणसाचा मृत्यू झाला की, लगेच   त्यापासून पाच हात दूर रहाताना दिसतात. एवढेच नाही तर...त्या मृत शरिराला स्पर्श केल्यावर विटाळ मानून आंघोळ करून घेतात. तर कोणी साधं स्पर्श सुद्धा करत नाही.  भलेही माणसाचे जीवन कितीही सुंदर असले तरी ते क्षणभंगुर आहे. म्हणून अति माजू नये व गर्वाच्या भोवऱ्यात अडकू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *लेकीची माया*एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला  ,तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा घेऊन स्मशानभूमीकडे जाऊ लागले तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्या पैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे 15 लाख रुप्ये देणे आहे , जोपर्यंत माझे क़र्ज़ मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नाही देणार....जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघु लागलेतेवढ्यात मृत व्यक्तीची मूले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाच्या बाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार.तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही.आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेतयात्रा अडवलेली...जेव्हा खूप वेळ झाली तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली,ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या मुलीला कळाली तेव्हा तात्काळ तिने आपले दागिने व घरातील ठेवलेले किमती वस्तू,पैसे इ. त्या माणसाकडे पाठविल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा ,,, पण माझ्या वडिलांची प्रेतयात्रा थांबवू नका..मी सर्व कर्ज फेडून टाकेन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन .....आता तो  माणूस उभा राहिला व सर्व उपस्थित लोकांना बोलू लागला ..की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून 15 लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे,परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणुन मी हा खेळ खेळला...आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही, असे सांगून ती व्यक्ती निघून गेली,आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हताशपणे उभे होते. .*आशय* ......मुली आपल्या आईवडिलांनाच आपली खरी दौलत समजतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 20 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार ~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌏 *_जागतिक सामाजिक न्याय दिवस_* 🌏•••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_ या वर्षातील ५१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌏 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१४: बर्‍याच गदारोळानंतर राज्यसभेतही आंध्र प्रदेशच्या विभाजनाचे विधेयक संमत झाल्याने ’तेलंगण’ हे भारताचे २९ वे राज्य बनले.**१९९९: भारत पाक दरम्यान दिल्ली ते लाहोर बस सेवेस प्रारंभ* *१९८८: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री कासू ब्रह्मानंद रेड्डी यांनी सूत्रे हाती घेतली* *१९८७: अरुणाचल प्रदेश स्थापना दिवस भारताच्या ईशान्य भागातील एक प्रमुख राज्य**१९८७: मिझोराम भारताचे २३ वे राज्य बनले**१९७८: शेवटचा ’ऑर्डर ऑफ व्हिक्टरी’ सन्मान लिओनिद ब्रेझनेव्ह यांना देण्यात आला.**१९७१ :पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या अर्ध पुतळ्यांचे अनावरण उपराष्ट्रपती डॉ.गोपाळ स्वरूप पाठक यांच्या शुभहस्ते झाले.**१७९२: जॉर्ज वॉशिंग्टनने टपाल सेवा कायद्यावर सही केल्यामुळे अमेरिकेत टपाल खात्याची सुरूवात झाली.* 🌏 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_*🌏 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८५: प्रणाली शैलेश चव्हाटे -- कवयित्री, लेखिका* *१९७८: रचना -- लेखिका, कवयित्री* *१९७६: रोहन सुनील गावस्कर -- भारतीय क्रिकेटपटू**१९६९: विजय अर्जुन सावंत -- कवी, लेखक**१९६६: प्रदीप निवृत्तीनाथ कुलकर्णी -- लेखक**१९६३: नागेश सूर्यकांतराव शेवाळकर-- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९६२: मीना शेट्टे-संभू -- लेखिका, संपादिका* *१९५७: प्रा. बसवराज कोरे -- ज्येष्ठ लेखक**१९५६: अन्नू कपूर -- भारतीय चित्रपट अभिनेता* *१९५५: लखनसिंह कटरे -- प्रसिद्ध कवी, कथाकार, झाडीबोली साहित्य संमेलनाचे पूर्व अध्यक्ष* *१९५२: डॉ. रा. गो. चवरे -- प्रसिद्ध कादंबरीकार, कथाकार**१९५१: गॉर्डन ब्राऊन – इंग्लंडचे पंतप्रधान**१९४१: प्रा. माधव थोरात -- कवी* *१९३७: सुसंगति महादेव गोखले -- बालसाहितिक* *१९२८: आबाजी नारायण पेडणेकर -- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कथाकार,कवी, समीक्षक आणि भाषांतरकार.(मृत्यू: ११ ऑगस्ट २००४ )**१९०४: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (मृत्यू: १८ डिसेंबर १९८० )**१८४४: लुडविग बोल्टझमन – ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ सप्टेंबर १९०६ )* 🌏 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌏••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: बेला बोस - भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री (जन्म: १८ एप्रिल १९४१ )**२०१५: गोविंद पानसरे -- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते (जन्म: २४ नोव्हेंबर १९३३ )**२०१२: डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३ )**२००७: डॉ. किशोर शांताबाई काळे --- डॉक्टर व प्रसिद्ध लेखक.काळे यांचा वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.(जन्म: १ जून १९६८ )**२००१: इंद्रजित गुप्ता – माजी केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते (जन्म: १८ मार्च १९१९ )**१९९७: श्री. ग. माजगावकर – पत्रकार, लेखक ’माणूस’ साप्ताहिकाचे संपादक (जन्म: १ ऑगस्ट १९२९ )**१९९४: त्र्यं. कृ. टोपे – घटनातज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू* *१९७४: केशव नारायण काळे --- मराठीतील एक कवी, नाटककार, समीक्षक, चित्रपट निर्माते आणि नियतकालिकांचे संपादक(जन्म: २४ एप्रिल १९०४ )**१९५८: हरिश्चंद्र सखाराम भातावडेकर -- भारतात चित्रपट बनवणारे भारतीय (जन्म: १५ मार्च, १८६८ )**१९५०: बॅ. शरदचंद्र बोस – स्वांत्र्यसेनानी, झुंजार पत्रकार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू (जन्म: ६ सप्टेंबर १८८९ )**१९१०: ब्युट्रोस घाली– इजिप्तचे पंतप्रधान (जन्म: १८४६ )**१९०५: विष्णुपंत छत्रे – भारतातील सर्कस उद्योगाचे जनक (जन्म: १८४६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन च्या समुहात join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.*~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजनेतील 10 लाख लाभार्थी बँकेच्या खात्याशी आधार लिंक नसल्याने वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांनी स्वीकारला पदभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी, येत्या आठ दिवसात फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता बँकेत जमा होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी, विविध ठिकाणी रक्तदान व अन्नदान करण्यात आले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदतवाढ; पुण्यात 25 लाख वाहनांना बदलावी लागणार नंबर प्लेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगे यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन, ते मुंबई निवड संघाचे सदस्य ही होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 60 धावाने केला पराभव, आज भारत विरुद्ध बांगलादेशचा होणार सामना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नागेश शेवाळकर, जेष्ठ साहित्यिक, पुणे👤 नागेश काळे, लातूर👤 उत्तम कानिंदे, शिक्षक तथा निवेदक, किनवट👤 विठ्ठल डोनगिरे👤 बालाजी विठ्ठल उगले👤 विशाल खांडरे👤 व्यंकटेश रोंटे👤 साहेबराव पाटील कदम👤 संतोष कामगोंडे👤 दिलीप लिंगमपल्ले👤 शिरीष गिरी, शिक्षक, बीड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *विज्ञान कोडे* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••क्रमांक 01*मी आहे प्राणवायूचा साठा**अन्नधान्याची देतो रास**तोडू नका हो मला कोणी**उपयोगी पडतो मी हमखास*मी कोण ..........?संकलन व लेखन - नंदा परदेशीजि.प. शाळा बळसाणे जि. धुळेउत्तर - Whatsapp Status वर••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायची इच्छा असेल, तर तो गाठेपर्यंत अनेक खाचखळगे व वळणे घ्यावी लागतात.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) गांडूळ श्वसन कोणत्या अवयवामार्फत करते ?२) गांडूळाला शेतकऱ्याचा काय म्हणतात ?३) गांडूळपासून तयार होणाऱ्या खताला काय म्हणतात ?४) गांडूळाला इंग्रजीत काय म्हणतात ?५) गांडूळाच्या शरीरातून स्रवणाऱ्या स्त्रवास स्वच्छ करून एकत्र साठवलेल्या पाण्याला काय म्हणतात ? *उत्तरे :-* १) त्वचा २) मित्र ३) गांडूळ खत ४) Earthworm ५) गांडूळपाणी*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🕷 *कोळी जाळं कसं विणतात ?* 🕷🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸🕸कोळ्यांच्या पोटात काही ग्रंथी असतात. त्यातून एक दाट स्राव सतत पाझरत असतो. या स्रावापासून ते रेशमासारखे धागे बनवतात. त्यासाठी त्यांच्या पोटाच्या वरच्या भागात दुसरा एक अवयव असतो. तो त्या स्त्रावाचा धागा तयार करण्याचं काम करतो. या अवयवाला अनेक छिद्रं असतात. या छिद्रांचा व्यास अतिशय लहान असल्यामुळे त्यातून जेव्हा हा स्राव बाहेर पाझरतो तेव्हा त्याचं रूपांतर अतिशय बारीक एखाद्या धाग्याच्या जाडीइतकाच प्रवाह तयार होतो. जोपर्यंत हा प्रवाह कोळ्याच्या शरीरात असतो तोपर्यंत तो द्रवरूप असतो; पण शरीराबाहेर पडून त्याला हवेचा स्पर्श होताच तो घनरूप धारण करतो. त्यामुळे शरीरातून बाहेर पडता पडता त्या स्रावाचा धागा बनतो आणि त्याची लांबी सतत वाढत जाते. हा धागा अशा रितीनं शरीरातून बाहेर पडत असतानाच कोळी वर्तुळाकार रिंगणातून फिरत राहतो, त्यामुळे तो धागाही त्याच्या पाठोपाठ त्या परिघात फिरतो व त्याचं एक वर्तुळ तयार होतं. हा धागा चिकट असल्यामुळे ज्या पृष्ठभागावर तो पडतो तिथं चिकटून बसतो. तसंच जेव्हा ती वर्तुळातली फेरी पूर्ण होते तेव्हा ती टोकं एकमेकांना चिकटून त्या धाग्यांचं रिंगण तयार होतं. त्यानंतर त्याबाहेरचं वर्तुळ विणलं जातं. ही दोन वर्तुळं मग आडव्या धाग्यांनी एक एकमेकांना जोडली जातात. हळूहळू त्याचं जाळं आकार घेऊ लागतं.कोळी तयार करत असलेले हे रेशीम धागेही तीन वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्यातला चिकट धागा तो जाळ्यातली रिंगणं विणण्यासाठी तसंच माशी वैगेरे कीटकांना पकडण्यासाठी आणि त्यांचा चट्टामट्टा करेपर्यंत त्यांना जखडून ठेवण्यासाठी वापरतो. या रिंगणांना जोडणारे छत्रीच्या किंवा सायकलीच्या चाकांमधल्या काड्यांसारखे जे आडवे धागे असतात ते दुसऱ्या प्रकारच्या चिकट नसलेल्या धाग्यांपासून बनलेले असतात. आणखीही एका प्रकारचं रेशीम कोळी आपल्या कोषासाठी वापरतात. या जाळ्यांचेही विविध प्रकार आहेत. आपल्याला नेहमी दिसणारं षटकोनी प्रकारचं जाळं हा जास्तीत जास्त विणला जाणारा प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारचं जाळं एखाद्या नरसाळ्यासारखं असतं. त्याच्या रुंद तोंडात शिरलेली कीटक त्याच्या नळीकडून ओढला जातो आणि खाली टपून बसलेल्या कोळ्याच्या 'ताटात' अलगद पडतो. तिसऱ्या प्रकारचं जाळं पाण्याखाली राहणारे कोळी विणतात. त्याचं वरचं तोंडच तेवढं आपल्याला पाण्याच्या पृष्ठभागावर दिसतं. बाकीचा भाग पाण्याखालीच असतो.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाचें तुटतां अनुसंधान । जाती माझे प्राण तत्क्षणीं ॥१॥ मग हें ब्रह्मज्ञान कोणापें सांगसी । विचारीं मानसीं केशिराजा ॥२॥ वदनीं तुझें नाम होतांचि खंडणा । शतखंडरसना होइल माझी ॥३॥ सांवळें सुंदर रूप तुझें दृष्टी । न देख्तां उन्मळती नेत्र माझे ॥४॥ तुज परतें साध्य आणिक साधन । साधक माझें मन होईल भ्रान्त ॥५॥ नामा म्हणे केशवा अनाथाचा नाथ । झणीं माझा अंत पाहसी देवा ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चांगल्या विषयावर चिंतन व मनन करावे.चिंतन व मनन केल्याने विचारशक्तीला चालना मिळते.यामुळे आपले काहीच नुकसान होत नाही उलट चांगले विचार करण्याची आपल्याला सवय लागत असते आणि त्याच सवयीमुळे आपल्यात परिवर्तन सुद्धा तेवढेच होत असते. आणि नवीन दिशा सुद्धा सापडत असते. त्यामुळे आपलाच विकास होत नाही तर त्यामुळे इतरांना ही त्यातून प्रेरणा मिळत असते.म्हणून ह्या प्रकारची सवय लावावी जेणेकरून आपली लक्ष इकडे, तिकडे जाणार नाही आणि आपला अनमोल वेळ ही वाया जाणार नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शिकवण*एका बागेच्या दारात बरीच वर्षे एक भिकारी बसत असे. वयोमानानुसार तो आता वृद्ध झाला होता. शरीराला कुष्ठरोगाने ग्रासले होते. अनेक रोग-व्याधींनी त्याचे शरीर पोखरले होते. तरीही तो तेथेच बसत होता. नित्यनियमाने भीक मागत होता. त्या गावच्या राजपुत्राने त्याला कित्येक वर्षे तिथे बसलेले पाहिलेले होते. पण, आता या अवस्थेत त्याला पाहून राजपुत्राला प्रश्न पडे की, 'हा या अवस्थेत का जगतो आहे ? जगण्याची इतकी लालसा का असावी याला ? अखेर एके दिवशी त्याने हा प्रश्न त्या वृद्ध भिकाऱ्याला विचारला. तो भिकारी म्हणाला, "अरे, हाच प्रश्न मी वारंवार परमेश्वराला करतो आहे की, का जगवतोस मला या अवस्थेत ? लवकर नेत का नाहीस ? कदाचित मला वाटतं, त्याने मला मुद्दाम या अवस्थेतही जगवलं असावं. मला पाहून इतरांना कळावं की, आज जरी ते सुखरूप, धडधाकट असले तरी, त्यांची वृद्धापकाळी अशी अवस्था होऊ शकेल. मला पाहून साऱ्यांनी बोध घ्यावा. असा कदाचित परमेश्वराचा हेतू असेल."* तात्पर्य : आयते खाल्याने मोक्षप्राप्ती नाही.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 18 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18chfeVSDb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🫧 *_ या वर्षातील ४९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🫧 *_महत्त्वाच्या घटना:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांना मध्यप्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' प्रदान**१९९८: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यन यांना 'भारतरत्‍न' हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर**१९७९: सहारा वाळवंटाच्या दक्षिण अल्जीरियातील भागात बर्फ पडले. सहारा वाळवंटात बर्फ पडण्याची ही एकमेव नोंद आहे.* *१९६५: ’गांबिया’ला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना* 🫧 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९६: अनुपमा ईश्वरन -- भारतीय अभिनेत्री**१९७०: राणी गुणाजी -- भारतीय मराठी अभिनेत्री* *१९६६: साजिद नाडियादवाला -- भारतीय चित्रपट निर्माता**१९६५: मुग्धा चिटणीस -- मराठी चित्रपट अभिनेत्री व कथाकथनकार(मृत्यू: १० एप्रिल १९९६)**१९६६: पुष्पा साळवे -- कवयित्री, लेखिका**१९६२: तुळशीराम दयाराम मापारी -- कवी**१९६०: स्वाती कर्वे -- लेखिका**१९५१: सूर्यकांत व्यंकप्पा धिवारे -- कवी**१९५०: ज्योती मोहन पुजारी --- ज्येष्ठ लेखिका**१९४९: अरुणकुमार निवृत्ती यादव -- कवी, लेखक**१९४८: डॉ. प्रतिभा जयंत काणेकर -- प्रसिद्ध लेखिका, अनुवादिका* *१९३९: सीताराम रामचंद्र रायकर -- लेखक* *१९३८: अशोक सीताराम चिटणीस -- ज्येष्ठ साहित्यिक, संपादक* *१९३१: रामदास शांताराम कामत -- संगीत नाटकांत काम करणारे मराठी गायक नाट्य‍अभिनेते आणि संगीततज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी २०२२ )**१९२७: मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी ऊर्फ ’खय्याम’ – भारतीय चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक (मृत्यू: १९ ऑगस्ट २०१९ )**१९२६: नलिनी जयवंत – अभिनेत्री (मृत्यू: २० डिसेंबर २०१० )**१९२२: डॉ. शकुंतला रघुनाथ लिमये -- लेखिका* *१९१९: हरिश्चंद्र लचके -- मराठी नियतकालिकांमधून व्यंगचित्रे रेखाटणारे चित्रकार (मृत्यू: २४ जुलै २००७ )* *१९११: कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर – ऐतिहासिक कादंबरीकार (मृत्यू: २९ जून २००० )**१८९८: एन्झो फेरारी – रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८८ )**१८९४: रफी अहमद किडवाई -- भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९५४ )**१८८३: क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा (मृत्यू: १७ ऑगस्ट १९०९ )**१८८२: यादव माधव काळे उपाख्य अण्णासाहेब काळे --- विदर्भाचे महान इतिहासकार (मृत्यू: ११ मार्च१९४० )**१८७९: किसन फागुजी बनसोडे -- स्वातंत्र्यपूर्व भारतातील दलित चळवळीचे नेते (मृत्यू: १० ऑक्टोबर १९४६ )**१८७१: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (मृत्यू: २२ ऑक्टोबर  १९३३ )**१८६०: नारायण लक्ष्मण फडके -- मिल्स,व स्पेन्सर यांच्या ग्रंथाचे अनुवादक (मृत्यू: सप्टेंबर १९२० )**१८३६: रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्याय – स्वामी विवेकानंदांचे गुरू (मृत्यू: १६ ऑगस्ट १८८६ )**१८२३: रावबहादूर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ ’लोकहितवादी’ – पत्रकार,समाजसुधारक व इतिहासकार.त्यांनी ४३ मराठी ग्रंथ लिहिले. (मृत्यू: ९ ऑक्टोबर  १८९२ )**१७४५: अलासांड्रो व्होल्टा – इटालियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ५ मार्च १८२७ )**१४८६: योगी चैतन्य महाप्रभू (मृत्यू: १५ जून १५३४ )* 🫧 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🫧••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१६: उस्ताद अब्दुल रशीद खान -- हिंदुस्थानी संगीताचे एक भारतीय गायक (जन्म: १९ ऑगस्ट १९०८ )**२०१४: अशोक चंदनमल जैन -- मराठी पत्रकार व लेखक (जन्म: ११ एप्रिल १९४४ )**१९९४: पंडित गोपीकृष्ण – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते.(जन्म: २२ ऑगस्ट १९३५ )**१९९२: नारायण श्रीधर बेन्द्रे – आदिम कलेपासून चिनी चित्रकलेपर्यंत अनेक शैलीविशेष आत्मसात केलेले चित्रकार (जन्म: २१ ऑगस्ट १९१० )**१९६७: जे.रॉबर्ट ओपेनहायमर – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ,अणूबॉम्बचे जनक (जन्म: २२ एप्रिल १९०४ )**१५६४: मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार (जन्म: ६ मार्च १४७५ )**१४०५: तैमूरलंग – मंगोल सरदार (जन्म: ९ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*चला परिक्षेवर काही बोलू .....*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त, रात्री उशिरा निर्णय, नव्या कायद्यानुसार सरन्यायाधीशांना वगळून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री चा 20 फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानावर होणार शपथविधी *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भांडवली खर्च वाढवून वित्तीय तूट कमी करत करदात्यांची क्रयशक्ती आणि गुंतवणूकीत वाढ करण्यावर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सीमाशुल्क विभागाची उत्तम कामगिरी - वित्तमंत्री निर्मला सीतारामन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त तयार करण्यात आलेल्या संमेलन गीताचं प्रकाशन.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पीएम-आशा या योजनेच्या अंमलबजावणीला केंद्र सरकारची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 उमाकांत ओमनवार, नांदेड👤 सुवर्णा पाटील👤 निशांत कसबे👤 लक्ष्मीकांत डेबेकर👤 गणेश पाटील👤 सोमेश्वर तांबोळी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बी रघुनाथ - भगवान रघुनाथ कुलकर्णी*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••हातावरील रेषात दडलेलं भाग्य शोधत बसण्यापेक्षा मनगटातील कर्तुत्वाचा उपयोग केल्याने भाग्य निश्चित लाभेल.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'* मध्ये नोंद झालेली *जगातली सर्वात महाग गायीचे नाव* काय आहे ?२) आंध्रप्रदेशमधील ओंगोल जातीची गाय ब्राझीलमध्ये किती रुपयांना विकली गेली ?३) 'केसरी टूर्स'चे संस्थापक अध्यक्ष कोण होते ?४) 'गाय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) "एक प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रकाशमान करू शकतो", असे कोण म्हणाले होते ? *उत्तरे :-* १) वियातिना - १९ २) ४१ कोटी ३) केसरी पाटील ४) धेनू, गो, गोमाता ५) रविंद्रनाथ टागोर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 रोपांची मुळं खालच्या दिशेनं, तर खोडं वरच्या दिशेनं का वाढतात? 📒आयझॅक न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसला असताना त्याच्या डोक्यावर एक पिकलेलं फळ पडलं, अशी आख्यायिका आहे. डोक्याला आलेल्या झिणझिण्या थांबवता थांबवता न्यूटननं विचार करायला सुरुवात केली होती. त्यातूनच या विश्वात सर्वत्र गुरुत्वाकर्षणाचं बल कार्यरत असल्याची जाणीव झाली, त्या बलामुळंच मग, वर हवेत फेकलेली कोणतीही वस्तू परत जमिनीकडे ओढली जाते, हेही समजून आलं. याला अर्थात अपवाद आहेत. हलकी असलेली पाण्याची वाफ वरच्या दिशेनं उडून जाते. हेलियम किंवा हायड्रोजनसारख्या वायूनं भरलेला फुगाही वर वर उडत जातो; पण केवळ हलक्या असलेल्या वस्तूच अशा वर वर गुरुत्वाकर्षणाच्या बलावर मात करत वरच्या दिशेनं उडत जाताना दिसतात, खरोखरीच त्या वस्तू त्या बलावर मात करतात, की त्यांचं हे वरच्या दिशेनं उडणंही गुरुत्वाकर्षणाच्या बलाचीच किमया आहे?पक्षी मात्र सहजगत्या आकाशात विहरताना दिसतात. त्यांना हे गुरुत्वाकर्षणाचं बल खालच्या दिशेनं ओढत नाही का? की आपले पंख फडफडवत त्या बलावर मात करण्याची किमया त्यांनी साध्य केली आहे? जेव्हा आपण विमानं तयार करायला लागलो आणि त्याच्यात बसून आकाशात झेप घ्यायला लागलो तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाच्याच मदतीनं आकाशात उड्डाण कसं करायचं, हेही समजून आलं. तर मग जेव्हा जमिनीत पेरलेल्या बीजाला प्रथम मुळं आणि नंतर अंकुर फुटतात तेव्हा त्यांची वाढ एकमेकांच्या विरुद्ध दिशेनं कशी होते, याचाही विचार याच अनुषंगानं करायला हवा. मुळं जमिनीत खोलवर जाऊ पाहतात, तर अंकुर आणि त्यातून पुढं तयार होणारी खोडं मात्र वरच्या दिशेनंच वाटचाल करताना दिसतात. बीज पेरल्यानंतर त्याला पुरेसं पाणी मिळालं, त्याची वाढ होऊ लागली, की त्याला प्रथम मुळं फुटतात. त्या मुळांमध्ये असलेल्या संप्रेरकांच्या प्रभावापोटी ती गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा वेध घेऊ लागतात. या गुणधर्माला जिओट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळं मग ज्या दिशेनं गुरुत्वाकर्षणाची ओढ जाणवते त्या दिशेनं मुळं वाटचाल करू लागतात.दुसऱ्या बाजूला असलेल्या अंकुरांमध्ये वेगळी संप्रेरकं कार्यरत असतात. ती प्रकाशाला प्रतिसाद देतात. साहजिकच ती इवलीशी रोपं ज्या दिशेला प्रकाश असतो त्या दिशेकडे झेपावतात. या गुणधर्माला फोटोट्रॉपिझम असं म्हणतात. त्यामुळे मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीकडे दुर्लक्ष करत वरच्या दिशेनं वाटचाल करणं त्या अंकुरांना आणि त्यांचीच वाढ होत उदयाला येणाऱ्या खोडांना शक्य होतं.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥ हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥ कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥ नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण, आपले दु:ख इतरांना,आपली माणसं समजून सांगत असतो. पण, आपल्या आजूबाजूलाही समाजात अनेक लोक दु:खी आहेत. म्हणून आपले दु:ख इतरांना सांगण्यापेक्षा समाजात दु:खी असलेल्यांच्या विषयी थोडी विचारपुस करून त्यांना आपलेसे करून घ्यावे या कार्याने संपत्ती मिळत नसली तरी मात्र माणुसकीच्या नात्याने त्यांच्यात सहभागी झाल्याने विशेष समाधान मिळत असते.असे प्रयत्न करून बघायला हरकत नाही.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वृक्षसेवेतून समृद्धी*एका गावात एक विधवा महिला आणि तिचा जगत नावाचा मुलगा राहत होते. त्यांच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड होते. जगत आईच्या सांगण्यावरून त्या झाडाला रोज पाणी देत असे. त्याच्याजवळचा परिसर स्वच्छ ठेवत असे. एकदा जगत आजारी पडला तरी त्याने झाडाला पाणी देण्याचे व स्वच्छतेचे काम चालूच ठेवले.आजारपणातही हा मुलगा आपली सेवा करत आहे हे पाहून पिंपळवृक्षात निवास करणा-या एका देवतेला खूप समाधान वाटले. जगत जवळ येताच देवता त्याच्याशी बोलू लागली," हे मुला मी तुझ्या या सेवेवर प्रसन्न झालो आहे. तुला जो काही वर पाहिजे आहे तो मागून घे." जगत म्हणाला," हे वृक्षदेवते, मी तुमची सेवा काही मिळवायची अपेक्षा ठेवून करत नाही. तुमच्यामुळे आम्हाला स्वच्छ हवा, सावली आणि लाकूड मिळते. आमच्या जीवनाचा तूच एकमेव आधार आहेस. मला काहीही नको." यावर वृक्षदेवतेने त्याला काहीतरी मागण्याचा हट्टच धरला. तेव्हा जगतने झाडाखाली पडलेली पाने नेण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपळदेवतेने त्याला अनुमती दिली. जगतने पाने गोळा केली व घरी आणून एका कोप-यात ठेवली. दुस-या दिवशी सकाळी जेव्हा तो व त्याची आई उठून पाहतात तर काय पिंपळाची सगळी पाने सोन्याच्या पानात बदलली होती. जगतने वृक्षदेवतेचे आभार मानले.तात्पर्य – निरपेक्षबुद्धीने सेवा केल्यास आपल्याला फळ निश्चितच मिळते.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 17 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🔲 *_ या वर्षातील ४८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🔲 *_महत्त्वाच्या घटना:_* 🔲•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००८: कोसोव्होने स्वातंत्र्य जाहीर केले.**१९६४: अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.**१९५२: नाना जोग लिखित 'भारती' या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर नाट्य मंडळाने नागपूर येथे केला**१९४४: दुसऱ्या महायुद्धात जपानी जिंकलेली अंदमान निकोबार बेटे आजाद हिंद फौजेच्या स्वाधीन करण्यात आली**१९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होतॊ.**१९२७: ’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.**१९१२: राम गणेश गडकरी यांचे पहिले नाटक "प्रेम संन्यास" रंगभूमीवर आहे.**१८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.*🔲 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🔲 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७८: प्रफुल्ल अंदुरकर -- कवी* *१९७५: प्रसाद ओक -- प्रसिद्ध अभिनेता, लेखक, कवी* *१९६८: विनायक नारायण अनिखिंडी -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९६५: सदानंद कदम -- प्रसिद्ध लेखक, संग्राहक* *१९६३: सुजाता मिलिंद बाबर -- लेखिका, संपादिका, अनुवादक**१९६१: संजीव वसंत वेलणकर -- लेखक, सोशल मीडियावर दैनंदिन लेखन* *१९६०: डॉ. सुनील सावंत -- कवी, लेखक**१९५७: हेमंत श्रीराम देशपांडे -- लेखक**१९५७: प्रफुल्ल मनोहरभाई पटेल -- माजी केंद्रीय मंत्री**१९५४: कल्‍वकुंतल चंद्रशेखर राव -- तेलंगणा राज्याचे पहिले मुख्यमंत्री* *१९५०: प्रा. जयंतकुमार गणपतराव बंड -- लेखक, संपादक* *१९५०: प्रा. उद्धव निंबा महाजन -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९४६: अशोक सिंह परदेशी -- कवी**१९४३: डॉ.रूपचंद निखाडे -- लेखक**१९४२: अनुराधा कृष्णराव गुरव -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री, शैक्षणिक विचारवंत (मृत्यू: ३० मे २०२० )**१९४०: गजानन जानोजी बागडे -- कवी (मृत्यू: १ सप्टेंबर २०१२ )**१९३६: फातिमा झकेरिया -- मुंबई टाईम्सच्या संपादिका (मृत्यू: ६ एप्रिल २०२१)**१९३५: रवी टंडन -- भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता(मृत्यू: ११ फेब्रुवारी २०२२ )* *१९३२: सुहासिनी इर्लेकर --- मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध कवयित्री आणि समीक्षक(मृत्यू: २८ऑगस्ट २०१० )**१९१८: कृष्ण भालचंद्र फडके -- लेखक* *१९०२: सीताराम गणपतराव मनाठकर -- कवी ( मृत्यू: मे १९४९ )**१९०२: प्रभाकर वासुदेव बापट -- समीक्षक (मृत्यू: २६ जुलै १९४४ )**१८७४: थॉमस वॉटसन – अमेरिकन उद्योगपती,आय.बी.एम.(IBM) चे अध्यक्ष (मृत्यू: १९ जून १९५६ )**१८५४: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२ )* 🔲 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🔲••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: चंद्रकांत मांडरे --- प्रसिद्ध मराठी अभिनेते(जन्म: १३ ऑगस्ट १९१३ )**१९९५: प्रा. पां. कृ. सावळापूरकर -- जुन्या पिढितील संशोधक, विचारवंत (जन्म: १ जुलै १९०७ )* *१९९४: चिमणभाई पटेल -- गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री (जन्म: ३ जून १९२९ )**१९९१: कृष्णाबाई हरी मोटे -- कथाकार, कादंबरीकार(जन्म:२८ जुलै १९०३)**१९८८:कर्पूरी ठाकुर -- बिहारचे माजी मुख्यमंत्री (जन्म: २४ जानेवारी १९२४ )**१९८६: जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ (जन्म: १२ मे १८९५ )**१९७८: पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक (जन्म: २ ऑगस्ट १९१० )**१८८३: वासुदेव बळवंत फडके -- राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी,काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन (जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ )**१८८१: लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ’लहुजी वस्ताद’ – क्रांतीवीर,समाजसेवक (जन्म: १८११)*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* join होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नवी दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होणार ? आजच्या बैठकीत ठरणार ! उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12 वाजता होणार शपथविधी सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नवी दिल्लीत NCR सह उत्तर भागात पहाटेच्या वेळी भूकंपाचे धक्के*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई जाहीर; मृतांच्या कुटुंबियांना सरकार देणार 10 लाख रुपये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत कोळसा तंदूर भट्टींवर बंदी, नियम न पाळणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *यंदा फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेचा तडाखा, महाराष्ट्रात उन्हाचा पारा चढणार, IMD ने दिला इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लाडकी बहीण योजनेत बदल होणार ? दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई-केवायसी आणि लाभार्थींच्या हयातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार, उत्पन्नाबाबत प्राप्तीकर विभागाकडून घेणार माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर, 22 मार्चला पहिला सामना केकेआर विरुद्ध आरसीबी; कोलकातामधील ईडन गार्डनवर 25 मे रोजी अंतिम सामना, 2 महिने रंगणार थरार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील सामंत, ई साहित्य प्रकाशन, पुणे👤 अगस्ती भाऊसाहेब चासकर 👤 साईनाथ अवधूतवार, धर्माबाद👤 रविकिरण ए. एडके👤 विकास गायकवाड 👤 लक्ष्मण गंगाराम होरके👤 अशोक इंदापुरे, विशेष मागास प्रवर्ग अभ्यासक सोलापूर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*दया पवार - दगडू मारुती पवार*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या श्रमाचे फळ, हीच जगातील सर्वोत्तम संपत्ती आहे.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) पक्षी म्हणजे काय ?२) पक्ष्यांच्या शरीराचं तापमान साधारणपणे किती सेंटिग्रेड असते ?३) "पक्षी म्हणजे परिस्थितीकीचा ( Ecology ) लिटमस कागद आहेत", असे कोण म्हणाले होते ?४) जगात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ?५) नैसर्गिक विविधतेमुळे भारतात पक्ष्यांच्या जाती किती आहेत ? *उत्तरे :-* १) पिसं असलेला द्विपाद होय. २) ३८° ते ४४° ३) रॉजर टोरी पीटरसन ४) ८,६०० जाती ५) १,२५० जाती*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*उन्हाळ्यात का होते गारपीट, माहिती आहे का ?*गारपीट होणं हे आपल्या महाराष्ट्रात नवं नाही. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा अगदी ऐन उन्हाळ्यात अनेकदा गारपीट होते आणि आपण ती अनुभवतोसुद्धा    विदर्भ असो, नाहीतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सगळीकडंच गारपीट होतेच. कधी ती जास्त प्रमाणात होते, तर कधी चुकून-माकून. यामुळे शेतीचं नुकसान होतं, हाताशी आलेली पिकं आडवी होतात. पण आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांमध्ये हे घडणं म्हणजे डोक्यालाच हात लावायची पाळी! त्यामुळेच या घटनेकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावं लागेल.हवामानशास्त्राच्या परिभाषेत सांगायचं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक- हवा जास्त उंचीपर्यंत जायला हवी आणि दुसरी- या हवेत बाष्पाचं प्रमाण जास्त हवं. अशी परिस्थिती अवतरली की गारपीट होण्याची शक्यता वाढते.बाष्पाचं प्रमाण वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात ते पूर्वेकडून म्हणजे बंगालच्या उपसागरावरून येणारे किंवा कधीकधी अरबी समुद्रावरून येणारे वारे. ते येताना सोबत भरपूर बाष्प घेऊन येतात. तर हवा जास्त उंचीवर जाण्यासाठी कारणीभूत ठरतात - वाऱ्याचे जेट प्रवाह. ते अतिउंचावर असतात. साधारणपणे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर. ते फेब्रुवारी-मार्च महिन्यात हिमालयाच्या आसपास असतात. काही कारणांमुळे ते दक्षिणेकडं सरकतात. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. हे प्रवाह कोरडे असतात. त्यामुळे आता हे कोरडे प्रवाह वरच्या थरात आणि बाष्प असलेली आर्द्र हवा खालच्या थरात अशी स्थिती निर्माण होते. ही स्थिती हवामानात अस्थिरता निर्माण करते. या स्थितीत बाष्पयुक्त वारे भरपूर उंचापर्यंत पोहोचतात. ही स्थिती गारांच्या निर्मितीसाठी पूरक आहे. ही स्थिती अशीच दीर्घकाळ कायम राहिल्यास गारपीट तितक्या काळासाठी सुरू राहते.गारा घडताना    या गारांचं विश्व भयंकर रंजक आहे. त्यांची निर्मिती, रचना, ढगात असणं, खाली पडणं सारं काही भन्नाट आहे. गारा म्हणजे नुसता बर्फाचा गोळा नव्हे. तिला कांद्यासारखे पापुद्रे असतात.हे पापुद्रे तिचा आकार वाढवतात. तिला मोठं, अधिक मोठं करतात. जितके पापुद्रे जास्त आणि जाड, तितकी गार मोठ्या आकाराची. गार कधी फोडली तर तिचे पापुद्रे पाहायला मिळतात.हे पापुद्रे का तयार होतात हे समजून घेण्यासाठी गारेची निर्मिती कशी होते ते माहीत करून घ्यावं लागेल. गार म्हणजे पावसाचाच एक प्रकार. फक्त पाण्याऐवजी गोठलेल्या स्वरूपात पडणारा. तसं होण्यासाठी बरंच रामायण घडावं लागतं. पाण्याचे थेंब गोठावे लागतात. त्यासाठी ढग इतक्या उंचीवर जायला हवेत की, जिथं त्यांच्यातून पडणारे पावसाचे थेंब गोठू शकतील. नाहीतर ढगातील पाणी गोठण्याची पातळी काही कारणामुळे खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.गारेच्या अंतरंगात डोकावताना      प्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात.    एक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष्पाचे थर तयार जमा होतात. हे थर म्हणजेच तिचे पापुद्रे. गार ढगात जितकी जास्त वेळ फिरेल, तितके जास्त थर तिच्याभोवती तयार होतात. तितका आकारही मोठा होतो.    गारेचा हा वर-खाली होण्याचा खेळ अवलंबून असतो, दोन गोष्टींवर- गारेचं वजन आणि वरच्या दिशेने वाहणारा वारा. गारेचं वजन वाढलं की ती खाली पडायला लागते. पण वरच्या दिशेने वाहणारा वारा तिला परत वर भिरकावतो. तिचं वजन आणि या वाऱ्याची ताकत यांच्या चढाओढीत ती हेलकावे खात राहते.      आकाराने मोठी होत जाते. या खेळात तिचं वजन वाऱ्यावर मात करतं, तेव्हा तिची ढगातून सुटका होते. ती खाली पडते. तिने ढगात कसे-किती हेलकावे खाल्ले आहेत, यावर तिचा आकार आणि तिची ओळख बनते.      एवढ्यावरच हे संपत नाही. खाली येतानाही तिला अडथळे असतात. या जमिनीकडं येण्याच्या प्रवासात तिला तापमानाचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळे ती वितळण्याची शक्यता असते. अनेकदा होतंही तसंच. ती ढगातून गार म्हणून पडायला लागते, पण पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडते. उन्हाळी पावसात आपण पावसाचे टपोरे थेंब पाहतो. ते थेंब टपोरे का असतात, त्यामागचं हेच रहस्य असतं.      ही सगळी दिव्यं पार केली तरच गार जमिनीवर पडते. पडल्यावरही कुतुहलाचा विषय बनते. एक मोठं कुतूहल असं की, गारा तासन् तास जमिनीवर पडून राहतात, लवकर विरघळत नाहीत. काही वेळा तर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्या तशाच दिसतात. याची अनेक कारणं असतील, पण त्यापैकी मुख्य दोन.      एकतर त्या पडल्यामुळे वातावरण थंडगार झालेलं असतं. दुसरं म्हणजे गारांचे पापुद्रे. गारेच्या या थरांमुळंसुद्धा त्या वितळण्याचा वेग कमी असतो.        हवामान अभ्यासकांनी केलेली ही कारणमीमांसा. असं हे इवल्याशा गारेचं अनोखं विश्व. हवामान काय किंवा निसर्ग काय, त्याच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!बी.बी.सी मराठी*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा विष्णुदास म्हणतात जगीं । नाहीं माझें अंगीं प्रेमभाव ॥१॥ तेणें थोर लाज वाटे पंढरिराया । ये माझ्य ह्रदया एक वेळां ॥२॥ द्वैताद्वैत भाव आहे माझे ठायीं । अनुभव नाहीं स्वरूपाचा ॥३॥ देखावेखीं बैसें संतांचे संगतीं । नाहीं माझे चित्तीं ध्यान तुझें ॥४॥ साकारलें रूप तैं दिसे चर्मचक्षु । परी नाहीं वोळखी केवळ मनें ॥५॥ नामा म्हणे माझा उजळ करींज माथा । भेटी देउनी संतां निरवीं मज ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••पुस्तके नेहमीच वाचून काढावे त्यातून ज्ञान मिळत असते. सोबतच त्यातून मार्गदर्शन सुध्दा मिळत असते.तसेच आपल्या जीवनात जे काही प्रसंग, अडीअडचणी आले असतील त्या परिस्थितीला सुद्धा कधीही विसरू नये. जसं की पुस्तके आपल्याला घडवत असतात तसेच ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो असतो ती परिस्थिती सुद्धा आपल्याला अनुभवाने परिपूर्ण बनवत असते.तो अनुभव पैशाने विकत घेता येत नाही. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *बढाईखोर माणूस*एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.’ ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, ‘अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या काकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.’ हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य – आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 15 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/15cDHcX5yz/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛑 *_ या वर्षातील ४६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛑 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून श्री सुब्रहण्यम यांनी सूत्रे हाती घेतली* *१९६०: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी येथील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते उद्घाटन* *१९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती.८०,००० भारतीय,ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.**१९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.**१९३२: पुण्यात मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नौरोसजी वाडिया महाविद्यालय सुरू झाले**१८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.* 🛑 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: श्रावण सखुबाई रंगनाथराव भवर -- कवी**१९८२: सुरेश निंबाजी येरमुरे -- कवी**१९८२: सचिन आत्माराम पाटील-होळकर -- कृषितज्ज्ञ, लेखक* *१९७२: किशोर ज्ञानेश्वर कुळकर्णी -- पत्रकार, लेखक* *१९६७: रमेश परसराम बोपचे -- कवी**१९६७: संजीव शंकरराव अहिरे -- मराठी व हिंदी भाषेमध्ये लेखन करणारे लेखक, कवी* *१९६४: आशुतोष गोवारीकर -- प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता* *१९५९: मानसी मोहन जोशी -- प्रसिद्ध कवयित्री, लेखिका**१९५९: कलानंद जाधव (पुंजाराव दताराव जाधव) -- कवी, बालगीतकार, लेखक* *१९५६: हरीश भिमाणी -- भारतीय व्हॉइसओव्हर कलाकार, लेखक आणि निवेदक**१९५६: विनायक महादेव गोविलकर -- जेष्ठ अर्थशास्त्रज्ञ, व्याख्याते, लेखक* *१९५६: डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू**१९५६: रामराव अनिरुद्ध झुंजारे -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक**१९५४: राजेंद्र गजानन साळोखे -- लेखक* *१९५४: प्रा.गणपत अंबादास उगले -- विचारवंत तथा साहित्यिक(मृत्यू: १९ जुलै २०२४)**१९५३: दत्तात्रय कडू लोहार -- कवी**१९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ – ज्येष्ठ साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४ )**१९४७: श्रीधर शंकरराव खंडापूरकर -- कवी, लेखक**१९४७: रणधीर राज कपूर -- भारतीय अभिनेता, चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक* *१९४६: महादेवराव नथुजी घाटुर्ले -- विदर्भातील कवी, लेखक**१९२८: शांता हरी निसळ -- ज्येष्ठ संगितसमिक्षक, कथाकार, कादंबरीकार (मृत्यू: ७ मे २०१३ )**१९१८: वसंत कृष्ण जोशी -- संस्थापक संपादक-‘दक्षता’मासिक, लोकप्रिय पोलीस तपास कथाकार(मृत्यू: २० डिसेंबर २००४ )**१९१७: गोविंद रामचंद्र आफळे -- मराठीतून कीर्तने करणारे परंपरागत कीर्तनकार(मृत्यू: १ नोव्हेंबर १९८८ )**१८९६: रामचंद्र नारायण वेलिंगकर -- ज्ञानेश्वरी शब्दकोशाचे कर्ते**१८७५: जनार्दन सखाराम करंदीकर -- केसरी या वृत्तपत्राचे संपादक, लेखक (मृत्यू: १२ मार्च १९५९ )**१८२४: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५),भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू: २६ जुलै १८९१ )**१७१०: लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० मे १७७४ )**_१७३९: थोर मानवतावादी संत श्री.सेवालाल महाराज -- जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये सुवर्णकूप्पा येथे,आजीवन ब्रह्मचारी राहुन दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.(मृत्यू: ४ डिसेंबर १८०६ )_**१५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी १६४२ )* 🛑 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛑••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: कविता चौधरी -- भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती आणि लेखिका(जन्म : १९५६ )**२०२०: राजा मयेकर -- मराठी अभिनेते (जन्म: १९३०)**२०२०: विनायक जोशी -- मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम करणारे गायक (जन्म: ११ मे १९६१ )**२०१८: मनोहर मारोतीराव तल्हार -- प्रसिद्ध मराठी लेखक (जन्म: १४ ऑक्टोबर १९३२ )**२०१०: श्रीराम पांडुरंग कामत -- ज्येष्ठ विश्व चरित्रकोशकार (मृत्यू: १७ मे १९३४ )**२००८: मनोरमा -- बॉलीवूडमधील भारतीय अभिनेत्री (जन्म: १६ ऑगस्ट १९२६ )**१९८८: रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८ )* *१९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष* *१९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म: १९०२ )**१९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४ )**१८६९: मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भूक म्हणजे .......?*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्रयागराज येथील महाकुंभात सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत 50 कोटी भाविकांचे गंगेत स्नान*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *RTE अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी 1 लाख 1 हजार 916 जणांची निवड, 85 हजार बालकांचे अर्ज प्रतिक्षेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ * महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदमार्फत 10 नोव्हेंबर2024 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल प्रसिद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर RBI ची कारवाई, संचालक मंडळ बरखास्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांना पीफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार, सिनेमा कालानुरूप बदलतो, त्यासोबत चालावे लागते, शुभा खोटे यांचे मत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने 54 सुवर्ण पदकासह एकूण सर्वाधिक 201 पदकांची कमाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक नेते, बिलोली 👤 जना निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबुराव बोधनकर , सहशिक्षक, बिलोली👤 किरण गौड , धर्माबाद 👤 घनश्याम नानम, डाक घर, धर्माबाद 👤 रमेश सोनकांबळे 👤 गुलाब जाधव👤 रमेश पाटील कदम 👤 अविनाश सातपुते 👤 गोविंद टेकूलवार, करखेली👤 प्रल्हाद घोरबांड, कवी व गो सेवक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मामा वरेरकर - भार्गव विट्ठल वरेरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अभ्यासात येणारे यश हे दैवी देणगीचे किंवा चमत्कारांचे नसून कष्टाने साध्य होणारे यश असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?२) प्रदूषणावर नियंत्रण व कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्देशाने जगात क्लीन एनर्जीचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो ?३) कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही ?४) 'सिंह' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकतेच भारतातील कोणत्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले आहे ? *उत्तरे :-* १) लोणार २) फ्रान्स ३) इंग्लंड ४) वनराज, केसरी, मृगेंद्र ५) मणिपूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙 घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.‘सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुझा दास मी तों राहिलों होवोनि । बोल चक्रपाणि पुरे आतां ॥१॥ जावो प्राण आतां न सोडीन संग । नव्हति वाउगे बोल माझे ॥२॥ श्रुति स्मृति वेद काव्यें ही पुराणें । तीं तुज भूषणें सुखें मानूं ॥३॥ काय हानि जाली सांगा मजपाशीं । उद्धारा जगासी नामा म्हणे ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात सुख, समृद्धी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नसते तसेच प्रत्येकाला दु:ख नसेलच असेही नाही. सुख आणि दु:ख हे, मानवी जीवनाशी कायम जुळून राहतात.तेव्हाच कुठेतरी कोणाचे दु:ख बघून डोळे भरून येतात.आणि सुख असते तेव्हा क्षणभर आराम सुद्धा मिळत नाही हेही सत्य आहे. म्हणून सुखात असताना कोणाचे मन दुखेल अशा कोणत्याही शब्दात बोलू नये व दु:ख असेल तर रडत बसू नये.कारण, पुढची वाटचाल स्वतःलाच करावी लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *शासन* महाभारताच्या शांतीपर्वातील ही गोष्ट. शंख व लिखित नावंचे दोघे भाऊ यज्ञोपवित संस्कार झाल्यावर गुरूगृही विद्याध्यानासाठी गेले. संपूर्ण वेद वेदांगाचा अभ्यास करून गुरूची परवानगी घेऊन हे दोघे घरी परत आले. दोघांनीही दोन वेगवेगळया ठिकाणी आपले आश्रम बांधले. तिथे त्यांचे अध्यापनाचे काम सुरू झाले. बरेच दिवस झाले दोन्ही भावांची भेट नव्हती. लिखिताने शंखाकडे भेटीला जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो गेला पण शंख कामानिमित्त बाहेर गेला होता. निराश झालेला लिखित परत निघाला. दुपारी बाराची वेळ भूक लागली होती. समोर शंखाच्या आश्रमातील आंब्याच्या झाडाला खूप आंबे लागले होते. एक छानसा पिकलेला आंबा लिखिताने तोडला व पुढे चालू लागला. तेवढयात समोरून येणार्‍या शंखाने ते पाहिले व विचारले. 'आंबा कुठे मिळाला ?' शंख सहज म्हणाला 'अरे ! तुझ्याच झाडाचा छान पिवळा धम्मक दिसला तोडला'. शंख शांतपणे म्हणाला 'म्हणजे लिखिता तू चोरी केलीस झाडाच्या मालकाला न विचारता आंबा तोडलास' लिखिताला आपली चूक कळली. शरमेने त्याची मान खाली झुकली. 'शंखा माझ्या गुन्ह्याबद्दल मला हवी ती शिक्षा कर' 'काहीं गरज नाहीं त्याची जा आता पुन्हा असे घडणार नाही ह्याची खबरदारी घे' शंख एवढे बोलून निघून गेला. लिखित राजाकडे गेला. घडलेली सर्व हकीगत सांगितली. 'राजा मला शिक्षा कर' लिखित म्हणाला. ह्या विचित्र मागणीचे राजाला आश्‍चर्य वाटले. राजा म्हणाला 'लिखिता तू म्हणतोस ते खरंही असेल पण चोरीची फिर्याद कुणीच केलेली नाही. गुन्हा शाबीत झाला तर शिक्षा'. 'राजे पण गुन्हा शाबीत झाला तर ह्या गुन्ह्याला शिक्षा कोणती ?' लिखिताने विचारले, 'चोरी करणार्‍याचा हातच आम्ही कापतो' राजा म्हणाला. राजाच्या समोरच लिखिताने राजा शासन करत नाहीं म्हणून आपणच आपला हात कापून टाकला'. स्वत:च स्वत:ला शिक्षा करून घेणारी प्रजा उत्कृष्ट राज्य शासनाचे प्रतीक आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 14 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌟 *_ या वर्षातील ४५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🌟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🌟•••••••••••••••••••••••••••••••••••• *२००३: सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के. बिर्लाफांउंडेशनतर्फे दिल्या जाणार्‍या सरस्वती सन्मानासाठी निवड**२०००: अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रॅंडमास्टर बनला.**१९८९: भोपाळ दुर्घटनेबद्दल भारत सरकारला ४७,००,००,००० अमेरिकन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे यूनियन कार्बाईडने कबूल केले**१८८१: भारतातील पहिल्या होमिओपाथिक कॉलेजची कोलकाता येथे स्थापना**१९६३: अणुक्रमांक १०३ असलेले लॉरेन्सिअम हे मूलद्रव्य प्रथमच तयार करण्यात आले.**१९४६: पहिला संगणक 'एनियाक' युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियात प्रदर्शित करण्यात आला.**१९४६: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले**१९४५: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्स च्या विमानांनी तुफानी बॉम्बफेक करुन जर्मनीतील ड्रेस्डेन शहर बेचिराख केले.**१९४५: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे व पेरू या देशांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश**१८९९: अमेरिकेत निवडणुकांसाठी मतदान यंत्रे वापरण्यास सुरूवात झाली.**१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल व एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला.* 🌟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🌟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९७९: रेखा वाल्मिक पाटील -- कवयित्री* *१९६८: भाग्यश्री देसाई -- कवयित्री, अभिनेत्री, निर्माती**१९६५: सय्यद अल्लाउद्दीन अमिनुद्दीन -- प्रसिद्ध लेखक**१९६२: विजय कोपरकर -- हिंदुस्थानी शास्त्रीय गायक* *१९६१: डॉ. माधुरी हेमंत वाघ -- कवयित्री, लेखिका**१९६१: मोहनीश बहल -- हिंदी चित्रपटातील अभिनेता**१९६०: कल्पना दिलीप मापूसकर -- कवयित्री**१९५९: प्रा. डॉ. सुनील विभुते -- प्रसिद्ध विज्ञान कथाकार* *१९५८: संजीव खांडेकर -- मराठी लेखक, कवी**१९५३: अलका सुरेशराव कुलकर्णी -- कथा लेखिका**१९५२: सुषमा स्वराज -- माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ६ ऑगस्ट २०१९ )**१९५१: ज्योती प्रमोद गोडबोले -- कथा लेखिका**१९५०: कपिल सिबल – सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री**१९३७: वसंतराव धोत्रे -- माजी सहकार राज्य मंत्री, सहकार नेते,शिवाजी शिक्षण संस्थेचे पूर्व अध्यक्ष (मृत्यू: १० ऑगस्ट २०१८ )**१९३३: मधुकर रामदास सोनार -- कवी, कथाकार (मृत्यू: १५ सप्टेंबर २००४ )**१९३३: मुमताज जहाँ बेगम देहलवी ऊर्फ मधुबाला – अभिनेत्री (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९६९ )**१९३०: वृंदा रघुनाथ लिमये -- कवयित्री, लेखिका* *१९२६: डॉ.वसंत विठ्ठल पारखे -- लेखक संपादक**१९२५: मोहन धारिया –माजी केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: १४  ऑक्टोबर२०१३ )**१९२२: प्रभाकर श्रीधर नेरूरकर -- ललित लेखक (मृत्यू: २९ जून १९९८ )**१९१८: डॉ. मधुकर अनंत मेहेंदळे -- संस्कृत भाषा, ऋग्वेद, निरुक्त, महाभारत आणि अवेस्ता (पारशी धर्मग्रंथ) या विषयांचा सखोल अभ्यास असलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकांडपंडित (मृत्यू: १९ ऑगस्ट २०२० )**१९१६: संजीवनी मराठे – प्रसिद्ध कवयित्री (मृत्यू: १ एप्रिल २००० )**१९१४: जान निसार अख्तर – ऊर्दू शायर व गीतकार (मृत्यू: ९ ऑगस्ट १९७६ )**१४८३: बाबर – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक (मृत्यू: २६ डिसेंबर १५३० )* 🌟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🌟••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१२: शमीम अहमद खान -- सतारवादक आणि संगीतकार (जन्म:१० सप्टेंबर १९३८)**१९९४: यशवंत नरसिंह केळकर -- कवी, कोशकार, इतिहास संशोधक व इतिहासलेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७५: पी. जी. वूडहाऊस – इंग्लिश लेखक (जन्म: १५ ऑक्टोबर१८८१ )**१९७५: ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (जन्म: २२ जून १८८७ )**१९७४: श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (जन्म: १ जानेवारी १९०० )**१७५५: रघुजी भोसले -- नागपूर भोसले घरातील एक शूर सेनापती (जन्म: १६९५)**१४०५: तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (जन्म: ८ एप्रिल १३३६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *व्हॅलेंटाईन दिनानिमित्त प्रासंगिक लेख* *शतदा प्रेम करावे .....!*प्रेम म्हणजे काय असते? एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा, माया, ममता आणि लळा म्हणजे प्रेम. आपल्या आवडत्या व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून जे काळजी घेतली जाते तिथे प्रेम अनुभवयास मिळते. जीवनात प्रत्येक जण कुणावर नाही तर कुणावर प्रेम करतच असतो. आईचे मुलांवरील प्रेम असो किंवा बहिणीचे भावावरील प्रेम. काही जण आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावर तर प्रेम करतातच त्याशिवाय घरातील पाळीव प्राण्यांवर देखील जीवापाड प्रेम करतात. या प्रेमापायी ते जनावर देखील त्यांच्यावर तेवढेच प्रेम करते. आमच्या बाजूला एकाच्या घरी कुत्रा होता. तो खूपच प्रामाणिक होता. त्याचे मालकांवर खूप प्रेम होते. मालकांचे देखील त्याच्यावर खूप प्रेम होते .................. पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शालेय शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम बसवण्याची पडताळणी केली सुरू, माध्यमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाकडे पाठविला अहवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुलढण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी केली नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - कवयित्री अनिता माने यांना रंगत-संगत प्रतिष्ठानचा प्रेमकवी पुरस्कार, डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते सन्मान; काव्यातून अभिव्यक्तीची उर्मी जपण्याचे कार्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *65 वर्षांवरील रिक्षा चालकांना 10 हजार मिळणार, आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोला - राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचे अपघाती निधन, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन परतत असताना दुचाकीला धडक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत दुकान बंद करण्याचा ग्रामस्थांकडून कठोर आचारसंहिता लागू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 प्रा.डॉ. अभयकुमार दांडगे, उपसंपादक, दै. प्रजावाणी👤 सतीश कुरमे, सहशिक्षक, माहुर👤 धनराज जाधव, सहशिक्षक, वाशिम👤 विकास बडवे, सहशिक्षक👤 अभिनव भूमाजी मामीडवार👤 योगेश वाघ👤 रुचिता जाधव👤 शिवम चिलकेवार👤 ऋषिकेश उटलवार👤 चंद्रकांत गाडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पी. सावळाराम - निवृत्ती रावजी पाटील*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जेव्हा क्रोध नम्रतेचे रूप धारण करतो, तेव्हा अभिमानही त्याच्यापुढे नतमस्तक होतो. - सुदर्शन*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) *'वाळवंटाचा जहाज'* असे कोणत्या प्राण्याला म्हणतात ?२) ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती सभा होतात ?३) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ?४) 'संग्राम' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कमळ हे फूल कशाचे प्रतीक आहे ? *उत्तरे :-* १) उंट २) बारा ३) ३ - ० ने ४) युद्ध, समर, संगर, लढाई ५) पवित्रता*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बहुपयोगी खजूर*खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते.खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो.दिवसाची उत्तम सुरूवात करूया ...*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजविण आम्हां कोण हो पोषिता । अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥ न करीं विठ्ठला आतां लाजिरवाणें । मी तुझें पोसणें पांडुरंगा ॥२॥ काकुळती कोणा येऊं हो मी आतां । अनाथाचे नाथा विठ्ठला तूं ॥३॥ एक वेळ आतां पाहे मजकडे । नामा म्हणे वेडें रंक तुझें ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *चांगल्या कर्माचे फलीत*एका जंगलामध्ये *एक म्हतारी* आणि तिची नात राहत होती. आणि त्याच जंगलामध्ये *चार दरोडेखोर* लुटमार करण्यासाठी येत असंत. एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .ते चार दरोडेखोर जंगलामध्ये *आश्रयासाठी* सैरभैर पळु लागले .अचानक त्यांना म्हतारीची *झोपडी* दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला. म्हतारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता *पाप पुण्याचा विषय* निघाला. प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता.शेवटी म्हतारीने *पैज लावली*. बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  *ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.*प्रथम १ ला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला. असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत, विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले. त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.तात्पर्य :- एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात. पण त्याने जर साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात. म्हणून पुण्याचा वाटा नेहमी घेत रहा. ते कधी संकटाच्या वेळी आडवे येइल हे आपल्याला ही नाही समजणार.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 13 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18JCv8Nyhf/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 📻 *_जागतिक रेडिओ दिन_* 📻••••••••••••••••••••••••••••• 📻 *_ या वर्षातील ४४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 📻 *_महत्त्वाच्या घटना:_* 📻•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार,६० जखमी**२००३: चित्रपट निर्माते,दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान**१९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.**१९८२: भारत आणि फ्रान्स यांच्या संरक्षण करा मिराज विमानाचा समावेश**१७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.* *१६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.**१६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.*📻 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 📻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२९८६: रश्मी (शिवानी) देसाई -- टेलिव्हिजन अभिनेत्री* *१९७६: शरद कपूर -- भारतीय अभिनेता* *१९७४: योगिनी वसंत पैठणकर -- कवयित्री**१९६४: रामदास ग. खरे -- कवी, लेखक* *१९६०: स्वाती विनय गाणू -- लेखिका**१९५९: डॉ. गिरीश प्रभाकर पिंगळे -- खगोलशास्त्रचे अभ्यासक, लेखक* *१९४९: चंद्रशेखर ठाकूर. -- ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ* *१९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३०  ऑक्टोबर१९९० )**१९४१: प्रा. शिवाजी बाजीराव पाटील -- प्रसिद्ध कवी, लेखक**१९३८: रमेश सहस्रबुद्धे -- मराठी विज्ञानकथा लेखक ( मृत्यू: २८ डिसेंबर २०१६ )**१९३७: प्रतिभा द्वारकानाथ लेले -- ज्येष्ठ लेखिका**१९२८: श्रीकृष्ण दामोदर पानवलकर -- कथाकार (मृत्यू: १९ ऑगस्ट १९८५ )**१९२७: मृणालिनी मधुसूदन जोशी -- ज्येष्ठ लेखिका (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०२२ )* *१९२१: निर्मला भालचंद बापट -- कवयित्री* *१९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४ )**१९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९ )**१८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६ )**१८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९ )**१८७०: पार्वतीबाई महादेव आठवले -- हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या, लेखिका (मृत्यू: १० ऑक्टोबर १९५५ )**१८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८ )**१८३१: लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे -- मराठीतील आद्य कादंबरीकार (मृत्यू: १२ मे १९०४ )**१७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४ )* 📻 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 📻••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३: ललिता लाजमी -- भारतीय ज्येष्ठ चित्रकार ( जन्म: १७ मार्च १९३२ )**२०२२: नरेंद्र लांजेवार --ज्येष्ठ साहित्यिक (जन्म: ११ मे १९६८ )**२०१४: बालनाथन बेंजामीन महेंद्र उर्फ बालु महेंद्र -- प्रसिद्ध तमिळ चित्रपट पटकथालेखक व छायादिग्दर्शक (जन्म: १ जानेवारी १९४६ )**२०१४: दिनकर त्रिंबक धारणकर -- मराठी नाट्यकर्मीं, साहित्यिक व ‘सत्य प्रकाश’ या साप्ताहिका’चे माजी संपादक (जन्म: १९३६ )**२०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६ )**२००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: १९३१ )**२००७: वामन केशव लेले -- भाषा अभ्यासक, समीक्षक (जन्म: २९ मे १९३३ )**१९९४: यशवंत नरसिंह केळकर उर्फ य.न. केळकर -- इतिहासविषयक लेखन करणारे मराठी लेखक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२ )**१९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ६ ऑगस्ट १९२० )* *१९५६: धुंडिराज गणेश बापट-- वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार (जन्म: १५ नोव्हेंबर १८८२ )**१९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३ )**१८८३: रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी, नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••दैनिक सकाळ मध्ये व्हॅलेंटाईन दिनानिमित्त मैफल या पानावर प्रकाशित कविता *" ती काय करते ? "*..... पूर्ण कविता वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुंबईत होणार तिसरं विमानतळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुगलचे कार्यकारी प्रमुख सुंदर पिचाई यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुणे - स्वारगेट बसस्थानक, मेट्रो स्टेशनचा कायापालट होणार, शिवाजीनगर बस स्थानकाप्रमाणे आधुनिक सुविधा; आठ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - जल जीवन मिशन योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरावती - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा टप्पा महत्वपूर्ण, अमरावतीत 13,665 शिक्षकांना 8 मार्चपर्यंत मिळणार प्रशिक्षण; तज्ज्ञ शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सातारा - कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची उपस्थिती, सर्वोत्कृष्ट गुण मिळविलेल्या 31 स्नातकांना पदवी प्रदान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवत सामन्यासह मालिकाही जिंकली, उपकर्णधार शुभमन गिलचे शतक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 देवीसिंग ठाकूर, हास्य कलाकार, धर्माबाद👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद👤 अशोक पाटील, धर्माबाद👤 संगीता ठलाल, लेखिका, गडचिरोली*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बालगंधर्व - नारायण श्रीपाद राजहंस*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••यशाचा, कीर्तीचा मार्ग स्वर्गाच्या मार्गाइतकाच कष्टदायक आहे. -- स्टर्न*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारत, इजिप्त व व्हिएतनाम या देशांचा राष्ट्रीय फूल कोणता ?२) कमळ या फुलाला 'भारताचे राष्ट्रीय फूल' म्हणून केव्हा घोषित करण्यात आले ?३) कमळाच्या बियांना काय म्हणतात ?४) 'कमळ' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) 'वॉटर लिली' असे कोणत्या फुलाला म्हटले जाते ? *उत्तरे :-* १) कमळ २) २६ जानेवारी १९५० ३) कमळगठ्ठा/कमळ गठ्ठ्याचे मणी ४) पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पद्म, सरोज, कुमुदिनी ५) कमळ*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राष्ट्रीय महिला दिन National Women's Day in India*भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. सरोजिनी नायडू यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी बंगाली कुटुंबात हैदराबाद येथे झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि केंब्रिज येथे शिक्षण घेतले. 12 व्या वर्षापासूनच त्या कविता लिहायच्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर महिलांच्या हक्कासाठी त्यांनी खूप संघर्ष केला. भारताच्या महिला राज्यपाल म्हणून काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. सरोजिनी नायडू यांनी साहित्य क्षेत्रात देखील योगदान दिले आहे.     *संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥ लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥ तुझे पाय दिव्य तुझे पाय दिव्य । तुझे पाय दिव्य रे दातारा ॥३॥ नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । तुझे पाय केशवा दिव्य मज ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण जे, काही कार्य करत आहोत त्या कार्याविषयी आपल्याच माणसांना सहसा कळत नसेल किंवा त्याविषयी  त्यांना  पुरेपूर  अनुभव नसेल  तर त्यांच्याकडून विरोध होतच असते किंवा पाहिजे तेवढी  त्यांच्याकडून आपल्याला  साथ  मिळत नाही. त्यावेळी आपण दु:खी होऊ नये. भलेही ते साथ देत नसतील  तरी उशीरा का होईना हळूहळू  सर्वकाही  त्यांनाही कळायला  लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *❃  एकाग्रता  ❃*   एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.*_🌀 तात्पर्य_ :~*ध्येय प्राप्तीसाठी एकाग्रता फार महत्वाची आहे.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 12 फेब्रुवारी 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/151jWoj4tb/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☣️ *_ या वर्षातील ४३ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☣️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☣️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००६: कोयना धरणाच्या डाव्या बाजूस नवीन पाॅवर हाऊस उभारुन ८० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्पात सरकारची मंजुरी**१९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.**१९७९: वसंत गोपाळ आपटे यांनी किर्लोस्करवाडी येथून "आपले जग" नावाचे साप्ताहिक सुरू केले**१९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.**१५०२ :लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.* ☣️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८९: महाबली बलभीम मिसाळ -- कवी* *१९८७: परी तेलंग -- भारतीय अभिनेत्री* *१९८३:नवनाथ रणखांबे-- कवी,लेखक* *१९८३: राजीव मासरूळकर -- कवी* *१९८१: पांडुरंग महादेव जाधव -- लेखक, कवी**१९८०: भाऊसाहेब मिस्तरी (भाऊसाहेब वाल्मीक गवळे) -- कादंबरीकार, स्तंभ लेखन करणारे लेखक**१९७६: विजय ढाले -- कवी**१९७०: अंजली आशुतोष मराठे -- कवयित्री,अनुवादिका**१९६४: कमलाकर रामराव सावंत -- लेखक**१९६०: सुरेखा गावंडे -- प्रसिद्ध बालसाहित्यिक, कवयित्री* *१९५७: डॉ. तात्याराव पुंडलिकराव लहाने -- प्रसिद्ध नेत्रचिकित्सक* *१९५६: गिरीश चौक -- लेखक**१९५२: ई. झेड. खोब्रागडे -- निवृत्त सनदी अधिकारी तथा लेखक**१९५०: भास्कर चिंधूजी नंदनवार -- प्रसिद्ध लेखक**१९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज**१९४८: डॉ. सुधाकर सोमेश्वर मोगलेवार -- कवी, लेखक**१९४३: सतीश काळसेकर -- मराठी साहित्यातील कवी, संपादक, अनुवादक, लघुनियतकालिकांच्या चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते (मृत्यू: २४ जुलै २०२१ )**१९३९: अजितसिंग चौधरी -- भारतीय शेतकरी नेते,राष्ट्रीय लोक दलाचे संस्थापक (मृत्यू: ६ मे २०२१ )**१९३४: प्रा. डॉ. शरद काशिनाथ कळणावत -- प्रसिद्ध लेखक, कवी, वक्ते(मृत्यू: २४ सप्टेंबर २०२४ )**१९२९: दत्तात्रेय धोंडोपंत रत्नपारखी -- लेखक* *१९२९: प्राचार्य डॉ.गोपाळ श्रीनिवास बनहट्टी -- लेखक, नाटककार* *१९२८: ललित मोहन शर्मा -- भारताचे २४ वे सरन्यायाधीश (मृत्यू:३ नोव्हेंबर २००८)**१९२०: कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३ )**१९१४:दत्तात्रय कृष्ण पेठे-- कवी* *१८८१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू: २३ जानेवारी १९३१ )**१८७६: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३ )**१८७१: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र,समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू: ५ एप्रिल १९४० )**१८२४: करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ )**१८०९: चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १८८२ )**१८०९: अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ एप्रिल १८६५ )**१८०४: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५ )**१७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ 'नाना फडणवीस' – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी, पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक (मृत्यू: १३ मार्च १८०० )*☣️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☣️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: राहुल बजाज -- बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेरमन, माजी राज्यसभा सदस्य, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित (जन्म: १० जून १९३८ )**२०१६: वसंतराव राजूरकर -- ग्वाल्हेर घराण्याचे भारतीय शास्त्रीय संगीत गाणारे मराठी गायक (जन्म: २४ एप्रिल १९३२ )**२०१२: प्रा. डॉ. रत्‍नाकर बापूराव मंचरकर तथा र.बा.मंचरकर -- मराठी साहित्याचे समीक्षक व संत साहित्याचे अभ्यासक (जन्म: ६ ऑक्टोबर १९४३ )**२००१: भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८ )**२०००: विष्णु अण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते* *१९९८: पद्मा गोळे – सुप्रसिद्ध कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३ )**१९५०: नारायण दाजीबा वाडेगावकर -- संस्कृत व्याकरण शास्त्राचे भाष्यकार ( जन्म: १० मार्च १८७१)**१८०४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४ )**१७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म: १७३० )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आराम हराम है ।*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *गेल्या 48 तासात पुणे शहरात तापमानात मोठे बदल झाले असून शहराचा सरासरी पारा 35 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई महापालिकेनं गणेशभक्तांचं ऐकलं, माघी गणेशोत्सावातील 19 फूट उंच मूर्तीचंदेखील होणार विसर्जन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *CEO गौरव द्विवेदी यांनी घेतला मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या कार्यक्रमाचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लाडकी बहीण योजने नंतर आता लखपती दीदी योजना, महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2025 कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार जाहीर, कवी अमिताभ गुप्ता, नीलिमकुमार यांचा गौरव; आज नाशिकमध्ये सन्मान सोहळ्याचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक पाचोळाकार रा. रं. बोराडे यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद - आज भारत वि. इंग्लंड यांच्यात तिसरा व अंतिम एकदिवसीय सामना, भारत 2-0 ने मालिका जिंकली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 भाग्यश्री देशमुख👤 नवनाथ रणखांबे, साहित्यिक👤 निलेश पाटील 👤 नागनाथ चांडे👤 रवींद्र डूबिले, छ. संभाजीनगर 👤 हणमंत गुरूपवार, बिलोली👤 विनोदकुमार भोंग👤 विजयकुमार पवारे, कुंडलवाडी 👤 अशोक शिलेवाड, पो. पा. येवती👤 सुनील कवडे, कुपटी, माहूर👤 जलील अब्दुल👤 सौ. मनिषा जोशी, विषय शिक्षिका, कन्या शाळा धर्माबाद*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रा. रं. बोराडे - रावसाहेब रंगनाथ बोराडे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••चिंता निर्माण होण्याचे मूळ कारण म्हणजे आपली दुर्बलता, हताशता. -- जाबर्ट*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने साकारली आहे ?२) २७ फेब्रुवारीला नाशिक येथील कुसुमाग्रज यांच्या कोणत्या गावाचे 'कवितांचे गाव' म्हणून उद्घाटन होणार आहे ?३) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लाकडी खेळणी निर्मिती उद्योग आहे ?४) 'संशय' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) बांगलादेशचे संस्थापक अध्यक्ष कोण आहेत ? *उत्तरे :-* १) विकी कौशल २) शिरवाड ३) सावंतवाडी ४) शंका ५) शेख मुजीबुर रेहमान*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🍖 *तुटलेली हाडं परत पूर्वीसारखी कशी होतात ?* 🍖 ***********************'उजव्या हाताच्या करंगळीचं फ्रॅक्चर झाल्यामुळे अनिल कुंबळेची कसोटीतून माघार' किंवा 'मनगटाचं फ्रॅक्चर झाल्यामुळे बोरिस बेकर विम्बल्डन खेळू शकणार नाही', अश्या बातम्या आपण वर्तमानपत्रांमधून वाचतो, त्यावेळी वाटतं की संपलं त्या खेळाडूंची कारकीर्द संपली. एवढंच नाही तर आता आयुष्यभर त्या तुटलेल्या अवयवानिशीच त्याला वावरावे लागणार आहे. पण नाही. दोन कसोटीनंतर अनिल कुंबळे आपल्या फिरकीची जादू घेऊन परत अवतरतो आणि बोरिस बेकर आपल्या झंझावाती सर्व्हिसेसने प्रतिस्पर्धी खेळाडूंना सळो की पळो करून सोडतो. मग साहजिकच प्रश्न पडतो की खरी जादू अनिल कुंबळेंनं नव्हे तर त्याच्या त्या मोडलेल्या हाडावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केली तर केली नाही ?पण नाही जादू कोणी केलीच असेल तर ती निसर्गानं केली आहे. निसर्गानेच तुटलेली हाडं परत सांधण्याची व्यवस्था मुळातच करून ठेवली आहे. हाड टणक असते. त्यामुळे ते नखांसारखे निर्जीव आहे की काय असं वाटतं. पण तसं नाही. इतर कोणत्याही अवयवासारखा हाही चैतन्यानं सळसळणारा अवयव आहे. जेव्हा एखादं हाड तुटतं त्यावेळी त्याच्यातून जाणाऱ्या रक्तवाहिन्याही तुटतात. त्यांच्यामधून रक्त बाहेर सांडू लागतं. पण इतर जखमांप्रमाणेच तेही गोठतं आणि त्या ठिकाणी फ्रॅक्चर हॅमेटोमा तयार होतो. तो हाडाला स्थिर करून त्यांची तुटलेली टोकं परत सांधतील अशा जुळणीच्या स्थितीत आणून ठेवतो. गुठळी झाल्यामुळे त्या टोकांच्या वेड्यावाकड्या झालेल्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ती झिजून जातात आणि परत सांधण्यासाठी गुळगुळीत पृष्ठभाग तयार होतो. त्या भागात नवीन रक्तवाहिन्या प्रस्थापित केल्या जातात. काही दिवसांनंतर तिथल्या पेशी नवीन स्नायूंचे धागे तसंच कुर्चा तयार करतो. त्यामुळे ती तुटलेली टोकं एकमेकांना बांधली जाऊ शकतात. त्या टोकांमध्ये तयार झालेली फट भरून काढण्याच्या दिशेने नवीन पेशी व उती तयार होऊ लागतात. आता आॅस्टीअोब्लास्ट या पेशी कामाला लागतात आणि त्या तिथं तयार झालेल्या उतीचं हाडांच्या पेशींमध्ये रूपांतर करू लागतात. थोडक्यात नवीन हाड तयार व्हायला लागतं. आता आजूबाजूच्या मांसल भागात आपलं स्थान पक्कं करण्याच्या दिशेने हाड कार्यरत होतं. मृत पेशीच आतल्या आत शोषल्या जातात आणि नवीन पेशी टणक होऊन दोन टोकांमधली फट भरून काढतात. हाड नव्यानं सांधलं जातं. कॅल्शियम आणि फॉस्फरसचा नव्यांनं पाझर होऊन त्या नवीन हाडाला पूर्वीचीच ताकद दिली जाते. बोरीस बेकरचे मनगट परत त्याच जोमाने चेंडू टोलवायला तयार होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज विकोनी घातली वोर । मज बोलतोसी ॥१॥ उच्छिष्ठ शिदोरी घेऊनिया करीं । भक्तांचा भिकारी तूंचि एक ॥२॥ चोर आणि शिंदळू चाळविलें गोविळें । अनंत मर्दिले दुष्टकाळ ॥३॥ नामा म्हणे केशवा सांगेन वर्म । ऐकतां न राहे संतांचें कर्म ॥४॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••निसर्गाने प्रत्येकालाच तोंड नावाची अनमोल संपत्ती दिली आहे. त्या संपत्तीचा योग्य रितीने वापर केला तर ती संपत्ती अजरामर होऊन जाते. अन् चुकूनही एक शब्द जरी तिच्यातून बाहेर पडल्यावर एखाद्याचे मन तर दुखतोच पण, त्याचे परिणाम सुद्धा स्वतःला ही तेवढेच भोगावे लागतात. म्हणून म्हणतात की, तोंड सांभाळून बोलावे.कदाचित हे खरे असावे म्हणून कोणासोबत किंवा कोणाच्या बाबतीत बोलताना जरा विचार करून बोलावा.कारण चांगले बोलण्याने आपलेही वाईट होणार नाही. अन् नको त्या शब्दात बोलल्याने आपलाही पाहिजे तेवढ्या प्रमाणात सन्मान होणार नाही. कारण ऐकणारे प्रत्येक माणसं बुध्दीहीन नसतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सिंह आणि उंदीर* " उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.*तात्पर्य:-* जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 11 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ⭕ *_ या वर्षातील ४२ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ⭕ *_महत्त्वाच्या घटना:_* ⭕•••••••••••••••••••••••••••••••••••• *२०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.**१९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.**१९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका**१९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.**१९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.**१८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.**१८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.**१७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.**१६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.* ⭕ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८७: शर्लिन चोप्रा -- भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल**१९८५: डॉ. कैलास देवराम सलामे -- ग्रामीण कवी**१९८४: अनुष्का मनचंदा -- भारतीय गायिका, संगीतकार**१९८१: आमीन मुजफ्फर सय्यद -- कवी* *१९६९: भीमराव भगवान ठवरे -- लेखक, कवी**१९६६: प्रज्ञा दया पवार(प्रज्ञा लोखंडे) -- प्रसिद्ध,मराठी कवयित्री आणि गद्य लेखिका**१९६५: प्रा. डॉ. विलास भवरे -- लेखक* *१९५७: टीना अंबानी -- भारतीय अभिनेत्री**१९५०: पास्कल (पास्को) लोबो -- कवी, संपादक* *१९४६: काशिनाथ सेवकराम भारंबे -- प्रसिद्ध लेखक,कवी,प्रकाशक* *१९४६: वसुधा पवार -- लेखिका* *१९४६: वसंत बंडोबा काळे -- प्रसिद्ध विज्ञान लेखक**१९४५: कृष्णकांत गणपत लोणे -- कवी, लेखक तथा निवृत्त बँक शाखा व्यवस्थापक**१९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथा लेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३ )**१९४१: श्रीनिवास दादासाहेब पाटील -- माजी राज्यपाल, माजी खासदार तथा निवृत्त सनदी अधिकारी**१९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर**१९३५: ललिता नरहर बापट -- प्रसिद्ध लेखिका* *१९३१: लीला चंद्रशेखर धर्मपुरी -- लेखिका**१९२७: प्रा. दत्तात्रेय पांडुरंग आपटे -- अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक व लेखक*/*१९२६: त्यागराज बाबूराव पेंढारकर -- ज्येष्ठ छायाचित्रकार (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१८ )**१९१७: सिडनी शेल्डन -- अमेरिकन लेखक (मृत्यू: ३० जानेवारी २००७ )**१९१२: त्रिलोक कपूर -- भारतीय अभिनेता (मृत्यू :२३ सप्टेंबर १९८८)**१८५०: शंकर रामचंद्र हातवळणे -- लेखक (मृत्यू:२७ फेब्रुवारी १९०५)**१८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१ )**१८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२ )**१८००: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७ )*⭕ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ⭕••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: रवी टंडन -- चित्रपट दिग्दर्शक निर्माता कथा लेखक (जन्म:१७ फेब्रुवारी १९३५)**१९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक,पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८ )**१९८९: पंडित नरेंद्र शर्मा -- हिंदी भाषेतील भारतीय लेखक,कवी आणि गीतकार(जन्म: २८ फेब्रुवारी १९१३ )**१९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती.१९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले.२५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली.(जन्म: १३ मे १९०५ )**१९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ,अर्थतज्ञ,समाजशास्त्री,इतिहासकार, पत्रकार,राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (जन्म: २५ सप्टेंबर १९१६ )**१९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते,स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४ )**१६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन समुहात add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आजपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ. 15 लाखाच्या वर विद्यार्थी देणार आज इंग्रजी विषयाचा पेपर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दहा किंवा त्यापेक्षा कमी पटाच्या जिल्हा परिषदांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने केला रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या प्रयत्नात सहाय्यक असलेल्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास आजपासून सुरुवात होत आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात लवकर जनगणना करा, सोनिया गांधीनी राज्यसभेत उठवला आवाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्राकडून महाराष्ट्राला सोयाबीन खरेदीसाठी 24 दिवसाची मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणातच रचला इतिहास, पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात दीड शतकी खेळी करणारा जगातील बनला पहिला फलंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 माधवराव हिमगिरे, उपक्रमशील शिक्षक, धर्माबाद👤 रविशंकर बोडके, पंचायत समिती, हदगाव👤 राणी पद्मावार👤 प्रभाकर भेरजे👤 कृष्णकांत लोणे👤 प्रमोद शिंदे👤 आदित्य पलीकोंडलवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*देशबंधू - चित्तरंजन दास*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सत्य हाच वाणीतील मध, सत्य हाच धर्मातील प्राण होय. त्यातूनच विश्वप्रेमाचा उगम होतो.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) चीन या देशाचे राष्ट्रीय फूल कोणते ?२) महात्मा फुलेंनी शिक्षित केलेली पहिली महिला कोण ?३) जगातली पहिली रेल्वे सेवा कोणत्या देशात सुरू करण्यात आली ?४) 'स्वेद' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'कुस्तीगीरांचा जिल्हा' म्हणून ओळखले जाते ? *उत्तरे :-* १) ब्लॉसम २) सावित्रीबाई ३) इंग्लंड ( सन १८२५ ) ४) घाम, घर्म ५) कोल्हापूर*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📒 तोंडाला पाणी का सुटतं ? 📒आपल्या तोंडात लाळग्रंथी असतात. त्यांचे काम तोंडात लाळेचा स्राव करण्याचं असतं. लाळेमध्ये असलेले काही पाचक पदार्थ व विकरं अन्नाच्या पचनात मोलाची भुमिका बजावत असतात. त्यामुळे जेव्हा आपण अन्नाचा घास तोंडात घेतो तेव्हा या ग्रंथींमधुन आपोआप लाळेचा पाझर व्हायला सुरुवात होते. त्या घासाचे दातांकडुन तुकडे पडत असताना त्यात लाळ मिसळुन त्यातल्या विकरांमुळे म्हणजेच रासायनिक कातर्‍यांमुळे त्यातील रसायनांच्या रेणुंचे तुकडे व्हायला सुरुवात होते. पचन व्हायला तिथुनच सुरुवात होते. या ग्रंथी काहीवेळा अधिकच उत्साह दाखवतात. त्यामुळे घास प्रत्यक्षात तोंडात पडण्यापुर्वी त्याच्या येण्याची वाट न पाहताच त्या कामाला लागतात. आपण अन्नाची चव जशी जिभेनं घेत असतो तशीच ती नाकानेही घेत असतो. खरं तर अन्नाचा स्वाद आणि सुगंध या दोन्हींचा एकत्र वापर करुन आपण अन्नाची चव चाखत असतो. त्यामुळे आवडत्या किंवा मसालेदार पदार्थांचा सुगंध वातावरणात दरवळु लागला की त्या वासानंच आपली भुक चाळवली जाते. सहाजिकच तो पदार्थ आपल्या तोंडात कधी पडतो, याचीच वाट आपण पाहु लागतो. त्या भावनेपोटी मग आपल्या मेंदुतील विवक्षित मज्जापेशी उत्तेजित होतात. त्या आपलं काम करायला सुरुवात करतात आणि लाळग्रंथींना संदेश पाठवु लागतात. त्यांना प्रतिसाद देत मग त्या ग्रंथी कार्यान्वित होतात. त्यांच्यामधुन लाळेचा पाझर होऊ लागतो. यालाच आपण पाणी सुटणं असं म्हणतो. काही वेळा अन्नाला तसा सुवास नसतो. पण तो पदार्थ पाहुनही मज्जापेशी चाळवल्या जातात आणि लाळग्रंथींना आदेश मिळतो. तोंडाला पाणी सुटतं ते यामुळेच. अशारितीनं ती एक प्रतिक्षिप्त म्हणजेच आपोआप होणारी घटना आहे.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज नेणों ग महेशा । म्हणुनि आलों गर्भवासा । अंध कूपीं पडिला जैसा । रात्रिदिवसा तो नेणों ॥१॥ तुझिया नामाची सांगडी । देई ते न खंडी । पावेन मी पैलथडी । त्या सांगडी आधारें ॥२॥ कामक्रोधादि जलचरीं । कासाविस जालों भारी । व्याकुळ होय चिंतालहरी । दुःखें भारी दाटलों ॥३॥ कल्पना वेली गुंडाळली पायीं । तेणें बुडें विषडोहीं । भंवतें पाहे तंव कोण्हे नाहीं । मग तुज ध्यायीं विश्वेशा ॥४॥ मज बांधुनी कर्मदोरी । घातलें संसारा दुर्धरीं । मायानदीचां महापुरीम । वाहावलों गा दातारा ॥५॥ ऐसा खेदखिन जालों बहुवस । न देखें विश्रांतीची वास । विनवी नामा विष्णुदास । गर्भवास पुरे आतां ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्या व्यक्तीविषयी नको त्या शब्दात बोलून त्याच्या विषयी इतरांना सांगत फिरणे म्हणजे स्वतःच्या मनाचे समाधान करणे होय.पण,हे सर्व सहजपणे आपल्याला जमत असते. पण,त्याच व्यक्तीमधील चांगल्या गुणांविषयी सांगणे का बरं जमत नाही. ? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून कोणाविषयी चांगले बोलणे होत नसेल तर वाईट ही बोलू नये.कारण जेवढे आपण इतरांविषयी वाईट बोलत असतो त्या क्षणापासून आपलेही नाव एका वेगळ्या यादीत समाविष्ट होत असते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *समाधान*एकदा काही कोळिणींना बाजारातून गावी परतण्यास वेळ झाला. अंधार पडला म्हणून वाटेत एका फुलबागेच्या शेजारी झोपडीजवळ त्या विश्रांतीसाठी थांबल्या. माळी म्हणाला, "बायांनो ! रात्र खूप झाली आहे, या गरीबाच्या झोपडीत रात्र काढा आणि पहाटेस निघा."कोळिणींना ते पटले, त्या सार्याजणी त्या वृद्ध माळीबाबांच्या झोपडीत मुक्कामास राहिल्या. पण त्यांना त्या झोपडीत जराही झोप लागली नाही. त्या रात्रभर इकडून तिकडे, या कुशीवरून त्या कुशीवर वळत राहिल्या. त्या खोलीतील एका कोपऱ्यात चमेलीच्या फुलांनी भरलेली करंडी होती. त्या फुलांचा सुगंध असह्य झाल्यानेच कोळिणींना झोप येत नव्हती. काही वेळाने एक कोळीण उठली. म्हणाली, "हा दुर्गंध काही जात नाही. वाढतोच आहे." असे म्हणून तिने आपल्या मासळीच्या टोपलीवर थोडे पाणी टाकले. ती टोपली उशाशी घेताच तिला गाढ झोप लागली.* तात्पर्य : कोणाला कशाने समाधान लाभेल, हे ज्याच्या त्याच्या सवयीवर अवलंबून असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 10 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://www.facebook.com/share/p/18Un67MG6B/••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🪩 *_जागतिक कडधान्य दिन_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_ या वर्षातील ४१ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🪩 *_महत्त्वाच्या घटना:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••*२००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.* *१९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.**१९४९: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना* *१९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला.या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.**१९२९: जे. आर. डी. टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.* 🪩 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: प्रा. डॉ. गजानन कोर्तलवार -- लेखक* *१९७८: अल्पना देशमुख-नायक -- लेखिका* *१९७७: उत्पल वनिता बाबुराव -- कवी, लेखक, संपादक* *१९७६: मारूती शामराव जाधव-- लेखक, कवी**१९७६: सुरेश प्रभाकरराव फुलारी -- कवी* *१९७५: अ‍ॅड. सोमदत वसंतराव मुंजवाडकर -- कवी, गीतकार, लेखक* *१९७३: प्रमोद बबनराव खराडे -- गझलकार**१९७२: अर्चना हरबुडे-धानोरकर -- कवयित्री**१९५९: डॉ. जिवबा रामचंद्र केळुस्कर -- कवी, लेखक* *१९५२: डॉ. राधिका टिपरे -- प्रसिद्ध लेखिका**१९४९: मोहन शिवराम सोनवणे -- ज्येष्ठ कवी, लेखक* *१९४६: ओंकारलाल चैत्रराम पटले -- कवी, लेखक* *१९४५: डॉ. सोमनाथ कोमरपंत -- समीक्षक तथा साहित्यिक**१९४५: राजेश पायलट –माजी केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २००० )**१९३४: चंद्रकांत महामिने -- ज्येष्ठ विनोदी साहित्यिक (मृत्यू: २२ ऑगस्ट २०२१)* *१९३१: नंद रामदास बैरागी (बालकवी बैरागी) -- भारतातील हिंदी कवी, चित्रपट गीतकार (मृत्यू: १३ मे २०१८ )**१९२९: प्रा. डॉ. ग. का. रावते -- प्रसिद्ध लेखक* *१९२४: श्रीकांत नारायण आगाशे -- कवी, कुमारसाहित्यकार (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९८६ )**१९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२ )**१८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६ )**१८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५ )*🪩 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🪩••••••••••••••••••••••••••••••••••••••*२००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४ )**१९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान,टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२ )**१९७८: वालचंद रामचंद कोठारी---संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय नेते, प्रतिभाशाली विचारवंत,प्रसिद्ध साहित्यिक आणि समाजहितैषी पत्रकार(जन्म: १३ सप्टेंबर १८९२ )**१९७८: पंडित बाळाचार्य माधवाचार्य खुपेरकरशास्त्री --राष्ट्रीय पंडित,तत्त्वचिंतक, संस्कृत तज्ज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८८२ )**१९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५ )**१९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म:५ एप्रिल १८२७)**१८६५: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आज जागतिक कडधान्य दिन त्यानिमित्ताने विशेष माहिती.......... ...... पूर्ण माहिती वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *आज नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांना संबोधित करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांचा राजीनामा, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिल्लीत आप पक्षाच्या पराभवानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी दिला राजीनामा, उपराज्यपालांनी विधानसभा केली बरखास्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आनंदवन या प्रकल्पाला 10 कोटी रु. शाश्वत निधी देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुदतवाढ न दिल्यास कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतणार, सरकारने पुन्हा खरेदी सुरू करावी, किसान सभा आक्रमक*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे - लोकमान्य फेस्टिवलमध्ये 27 लाख सूर्यनमस्कारांचा विक्रम, 375 योग साधकांचा सहभाग, 12 गटांत स्पर्धा; सांगलीच्या डॉ. पटवर्धन यांना 'सूर्यदूत' पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कर्णधार रोहित शर्माच्या शतकामुळे कटकमध्ये भारताने इंग्लंडचा 4 विकेटने पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 म. जावेदोद्दीन, अध्यक्ष, उर्दू हायस्कुल, धर्माबाद👤 प्रशांत येमेवार, पोलीस निरीक्षक 👤 जगन्नाथ पांडुरंग दिंडे, सहशिक्षक, नांदेड👤 आमीन जी. चौहान, पुरस्कार प्राप्त शिक्षक यवतमाळ👤 विजय रच्चेवार, नांदेड👤 बाबुराव बनसोडे, सहशिक्षक, नायगाव👤 शंकर जाधव, नांदेड👤 प्रशांत बेडसे पाटील👤 राहूल कतूरवार, धर्माबाद👤 सुधाकर अपुलवाड👤 राजू गोडगुलवार👤 डॉ. प्रकाश बोटलावार👤 अशोक श्रीमनवार, नांदेड👤 कांतराव ( राजू ) लोखंडे, उमरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वामी विवेकानंद - नरेंद्र विश्वनाथ दत्त*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••केळीच्या पानात पान असते, तसेच ज्ञानी माणसाच्या शब्दाशब्दात ज्ञान असते.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) मानवी हृदयाचे वजन साधारणपणे किती असते ?२) कोणत्या राज्याने स्वतःचे 'इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी' नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले ?३) 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे ?४) 'स्वामी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण नाव काय ? *उत्तरे :-* १) ३६० ग्रॅम २) गुजरात ३) अंधश्रद्धा व ज्योतिषाच्या नादी न लागणे ४) धनी, मालक ५) नरेंद्र विश्वनाथ दत्त *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वातावरणातील वायूंचे उपयोग* 📙 **************************हवेतील वायू माहिती असतातच. त्यांचे प्रमाण, टक्केवारी, गुणधर्म यांबद्दलची माहिती प्रयोगशाळेत व शैक्षणिक वर्गात नेहमीच घेतली जात असते. पण अनेकदा दैनंदिन वापरात या वायूंची माहिती आपण उपयोगात आणत आहोत, हे मात्र लक्षात येत नाही. हवा बंद बाटलीतील एरिएटेड कोल्ड्रिंक पिताना चुरचुरणारी चव व फसफसणारे पेय हवेहवेसे वाटते. आत विरघळवलेला, दाबाखाली असलेला कार्बन डाय ऑक्साइड हे काम करत असतो. हेच पेय उघडे ठेवले, तर दहा मिनिटांनी त्यातील हा वायू निघून गेल्यावरची चव चांगली असेल; पण जिभेला चुरचुरणारी, गार लागणारी गम्मत निघून गेलेली असेल. सिनेमाचे शूटिंग चालू आहे किंवा स्टेजवर डिस्को रंगात आला आहे, त्याच वेळी धुराचे लोट व धुक्याचा थर सर्वांना वेढून टाकण्याचा अभ्यास निर्माण करायचा आहे, याही वेळा कार्बन डाय ऑक्साइडच उपयोगी पडतो. कोरडा बर्फ या प्रकारातील घन कार्बन डायॉक्साईड जेव्हा वायुरूप होतो, तेव्हा हा आभास निर्माण होतो. टॉन्सिल्सचे ऑपरेशन करायचे झाले, तर याच कोरड्या बर्फाचा वापर करून क्रायोसर्जरी पद्धतीने रक्तहीन ऑपरेशन करण्याची पद्धत जपानी सर्जन वापरतात. आग विझवण्याच्या उपकरणात कार्बन डाय ऑक्साइड वापरला जातोच. त्याचा थर आगीवर पसरवून प्राणवायूचा पुरवठा तोडणे हा त्यातील मुख्य हेतू असतो. नायट्रोजनचा व्यवहारात वापर अनेक ठिकाणी केला जातो. फक्त त्याची जाणीव आपल्याला फार क्वचित होते. ज्वालाग्राही पदार्थ, ज्वालाग्राही तेले, जीवनोपयोगी औषधे, साठवणीची धान्य प्लास्टिकच्या बंद पिशव्यांत भरली जातात वा बंद डब्यात भरतात, तेव्हा मोकळी जागा नायट्रोजनने भरण्याची प्रथा आहे. एवढेच काय निर्वात केलेल्या विजेच्या दिव्यातही नायट्रोजन भरला, तर त्यांचे आयुष्य वाढते, अशी विजेच्या दिव्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाची पद्धत होती. त्यानंतर मात्र अन्य वायूंचा वापर विविध रंग मिळवण्यासाठी सुरू झाला. प्रत्यक्ष नायट्रोजनचा वापर औद्योगिक निर्मितीत फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ खते, रंग, स्फोटके, इतकेच काय पण भूल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांतील एक म्हणजे नायट्रस ऑक्साइड हे नायट्रोजन व प्राणवायूचेच संयुग आहे. वातावरणातील मुख्य घटक नायट्रोजन असल्याने त्याची औद्योगिक निर्मिती वा साठवणही सहज शक्य होते. प्रयोगशाळेत व औद्योगिक वापरात याचा एक महत्त्वाचा वापर म्हणजे द्रव स्वरूपातील नायट्रोजन. एखादी गोष्ट अनंत काळपर्यंत टिकवायची असेल, तर याच्या तापमानाला ठेवायची व्यवस्था केल्यास ती नक्की टिकेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. उदाहरणार्थ जिवंत पेशी या तापमानाला गोठवून पुन्हा पाहिजे त्या वेळी त्यांना नेहमीच्या तापमानात आणता येईल, या दिशेने सतत प्रयोग चालू असून त्यांना यश येत आहे. प्राणवायूशिवाय सजीव जगू शकत नाही. पण याच प्राणवायूचा अशुद्ध पदार्थ शुद्ध करायला गमतीदार वापर केला जातो. लोखंडापासून पोलाद बनवताना त्याची शुद्धता वाढवायला उकळत्या लोखंडाच्या रसात प्राणवायू सोडला जातो. त्याच्या सान्निध्याने अशुद्ध कण चक्क जळून नष्ट होतात, राहते ते शुद्ध लोखंड. हा सोपा उपाय अन्यही काही धातूंच्या शुद्धीकरणात वापरला जातो. शोभेची दारू व स्फोटके यांना हवेतील प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. त्यासाठी त्यातच ऑक्सिडायझर मिसळून त्यातून मोठ्या प्रमाणावर प्राणवायू पुरवण्याची व्यवस्था केली जाते. आजार्‍याला दिला जाणारा प्राणवायू तर सर्वांना माहिती आहेच. त्याचेच सुटसुटीत भावंड पाणबुडे व गिर्यारोहक वापरतात. हायड्रोजनचा वापर तेलापासून वनस्पती तूप व मार्गारीन बनवण्यासाठी केला जातो. तूप म्हणून वापरात असलेले डालडा हे वनस्पतिज तेलावरील हायड्रोजनेशन प्रक्रियेतून तयार होत. बलुन्समध्ये हेलियमचा वापर केला जातो. जखमा धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधासाठी म्हणजे हायड्रोजन पॅराॅक्साइडसाठी हायड्रोजनची गरज असतेच. हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही करता येतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तुज दिलें आतां यत्न करी याचा । जीवभाव वाचा काया मनें ॥१॥ भागलों दातारा शीण जाला भारी । आतां मज तारी अनाथासी ॥२॥ नेणताम सोसिली तयांची आटणी । नव्ह्तीं हीं कोणी कांहीं माझीं ॥३॥ वर्स नेणें दिशा हिंडती मोकाट । इंद्रिय सुसाट सर्व पृथ्वी ॥४॥ येरझार फेरा शिणलों सायासीं । आतां ह्रषिकेशी अंगिकारीं ॥५॥ नामा म्हणे मन इंद्रियाचें सोयी । धांव यासी कायी करुं आतां ॥६॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांच्या जीवनात सुख, समृद्धी पाहिजे तेवढ्या प्रमाणात नसते तसेच प्रत्येकाला दु:ख नसेलच असेही नाही. सुख आणि दु:ख हे, मानवी जीवनाशी कायम जुळून राहतात.तेव्हाच कुठेतरी कोणाचे दु:ख बघून डोळे भरून येतात.आणि सुख असते तेव्हा क्षणभर आराम सुद्धा मिळत नाही हेही सत्य आहे. म्हणून सुखात असताना कोणाचे मन दुखेल अशा कोणत्याही शब्दात बोलू नये व दु:ख असेल तर रडत बसू नये.कारण, पुढची वाटचाल स्वतःलाच करावी लागते. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *विश्वासघात*करढोक नावाचा एक पक्षी नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले. त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला. तो ऐकताच आपल्यावर येणार्‍या संकटाची सूचना देणार्‍या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्‍या माशावर सोपविले. त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.तात्पर्य - शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 08 फेब्रुवारी 2025💠 वार - शनिवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛟 *_ या वर्षातील ३९ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛟 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛟••••••••••••••••••••••••••••••••••••*२०००:छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.**१९८४: वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना**१९७१:NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.**१९६०:पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.**१९४२:दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.**१९३६:१६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.**१९३१:महादेव विठ्ठल काळे यांनी 'आत्मोद्धार' नावाचे पाक्षिक सुरू केले.**१८९९:रँडचा खून करण्यार्‍या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्‍या गणेश  शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडल्या* 🛟 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: अ‍ॅड.संदीप सुधीर लोखंडे -- लेखक**१९९८: ऋषिकेश मठपती -- कवी* *१९८८: रुचा हसबनीस-जगदाळे -- भारतीय अभिनेत्री* *१९८८: प्रा. गणेश विठ्ठलराव मोताळे -- लेखक* *१९८८: सविता देविदास बांबर्डे -- लेखिका**१९६८: डॉ. ज्योती प्रदीप तुंडूलवार --लेखिका* *१९६४: डॉ. अर्चना जगदीश गोडबोले -- लेखिका तथा जंगल पर्यावरण अभ्यासक**१९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू**१९५८: राजीव शांताराम थत्ते -- लेखक**१९५८: प्रदीप शांताराम पटवर्धन -- भारतीय अभिनेते आणि विनोदी कलाकार (मृत्यू: ९ ऑगस्ट २०२२ )**१९५४: रेणू वामन देशपांडे -- कवयित्री, लेखिका* *१९४९: ज्योती सुभाष म्हापसेकर -- मराठी साहित्यिक, स्त्री मुक्ती संघटना या संस्थेच्या अध्यक्षा**१९४९: मोहन सीताराम द्रविड -- मराठी भाषेतील लेखक**१९४८: प्रा. न. मा. जोशी -- ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत**१९४१: जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० ऑक्टोबर २०११)**१९३९: सुधीर मोघे -- मराठी कवी, गीतकार व संगीतकार (मृत्यू: १५ मार्च २०१४ )**१९३७: प्रा. यशवंत नारायण जोशी -- लेखक**१९३१: यशवंत गोविंद जोशी -- लेखक**१९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४ )**१९२१: कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे -- मराठी कीर्तनकार आणि लेखिका (मृत्यू: ११ सप्टेंबर २०१० )**१९११: प्रा. दया पटवर्धन -- लेखिका* *१९०९: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (मृत्यू: ३ जानेवारी १९९८ )**१८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न (मृत्यू: ३ मे १९६९ )**१८४४: गोविंद शंकरशास्त्री  बापट – भाषांतरकार (मृत्यू: ६ मार्च १९०५ )**१८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७ )**१८२८: ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५ )**१७००: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२ )**१६७७: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६ )* 🛟 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛟 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२०: दत्तात्रय भास्कर उर्फ काकासाहेब चितळे -- चितळे उद्योगसमुहाचे ज्येष्ठ संचालक**२०१९: विष्णू सूर्या वाघ -- गोव्यातील कवी, नाटककार (जन्म: २४ जुलै १९५४ )**१९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६ )**१९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल. १९६५ च्या भारत - पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९१३ )**१९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ११ सप्टेंबर १९११ )**१९९४: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशाकार, इतिहास संशोधक,इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२ )**१९८९: रामचंद्र शंकर वाळिंबे -- टीकाकार, समीक्षक (जन्म: ९ नोव्हेंबर १९११ )**१९७५: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६ )**१९७१: डॉ.कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, नामवंत साहित्यिक (जन्म:३० डिसेंबर १८८७)**१९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९ )**१७२५: पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *जगाला प्रेम अर्पावे .....!*प्रेम या अडीच अक्षरी शब्दात जादुई शक्ती आहे. प्रेमाशिवाय जीवन जगणे अशक्यच नाही तर असंभव आहे. प्रत्येक व्यक्ती जीवनात कुणावर नाहीतर कुणावर जीवापाड प्रेम करतो. जन्म देणाऱ्या आई-वडिलावर सर्वांचेच प्रेम असते कारण ते जन्मदाते असतात. भाऊ-बहिणींचा एकमेकींवर अतूट प्रेम असते, हे आपण सर्वचजण जाणतो. संसारातल्या विविध नातेसंबंधात आपणाला पदोपदी प्रेम दिसून येते. ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उद्या रविवारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कृषी व्यापाराला चालना देण्यासाठी ई-नाम प्लॅटफॉर्मचा विस्तार; ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्या पोहोचली 231 वर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबई ते सावंतवाडी दरम्यान ४ विशेष गाड्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात 14वी भारतीय छात्र संसद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; पुढील तीन दिवसांत चार महत्त्वपूर्ण सत्रे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लाडकी बहीण योजनेतून 5 लाख लाभार्थी वगळले, आदिती तटकरे यांची महत्त्वपूर्ण माहिती; इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सावधान ! मुंबईत आढळला GBS चा पहिला रुग्ण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ **•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुनील ठमके, नांदेड👤 शर्मिष्ठा शिवाजीराव देव्हामुख, वसमत👤 राजेश मनुरे, पत्रकार धर्माबाद👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती👤 रवींद्र भापकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक अहमदनगर👤 राजेश्वर ऐनवाड, सहशिक्षक, धर्माबाद👤 दिलीप खोब्रागडे👤 मारोती पिकलेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*राजा मंगळवेढेकर- वसंत नारायण मंगळवेढेकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" मोती बनवून सोन्याच्या साखळीत राहण्यापेक्षा दवाचा थेंब बनून चातकाची तहान भागविणे हे उत्तम. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) डोळ्याने किती टक्के ज्ञान ग्रहण करता येते ?२) आपली ज्ञानेंद्रिये किती व कोणते ?३) 'गुगली' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?४) 'संदेश' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) चीनने अलीकडेच कोणते AI चॅटबॉट बाजारात आणले आहे ? *उत्तरे :-* १) ८० टक्के २) पाच - डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा ३) क्रिकेट ४) निरोप ५) Deepseek ( डीपसीक )*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगाला पुढे घेऊन जाऊ शकते. --------------------------------------- पियाँटिक ह्या जनरल मोटर्सच्या शाखेला एके दिवशी एक तक्रार आली. 'माझ्या गाडीला व्हॅनिला आईसक्रीम आवडत नाही' जनरल मोटर्सने साहजिकच ह्यातक्रारीकडे दुर्लक्ष केले. काही दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीने हीच तक्रार केली. ह्यवेळीजनरल मोटर्सने त्याची चौकशी करायची ठरवले. त्यांनी त्या व्यक्तिला त्याची तक्रार व्यवस्थित सांगण्यास सांगितले. व्यक्तीने उत्तरदिले की तो, त्याची पत्नी आणि मुले रोज जेवण केल्यावर आईसक्रीम खायला जातात. रोज वेगवेगळे फ्लेवर घेतात. पण ज्या दिवशी ते व्हॅनिला फ्लेवर घेतात त्या दिवशी त्यांची गाडी सुरु होत नाही. जनरल मोटर्सने असे होउच शकत नाही असा दावा केला आणि दुर्लक्ष केले. इतर लोकांनी आणि कंपन्यांनीसुद्धा त्या व्यक्तीची चेष्टा केली. काही दिवसांनी त्या व्यक्तीने परत हीच तक्रार केली. आता मात्र जनरल मोटर्सपुढे त्याची चौकशी करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी आपला एक इंजीनिअर त्या व्यक्तिकडे पाठवला. इंजीनिअरने गाडी चेक केली. सगळे व्यवस्थित असल्यामुळे नाईलाजाने त्याला त्या व्यक्ती सोबत रहावे लागले. रात्री आईसक्रीम खायला जाताना इंजीनिअरपण सोबत गेला. आईसक्रीम खाऊन सगळे घरी आले. दुसऱ्या दिवशी परत आईसक्रीम खायला गेले. व्यक्तीने व्हॅनिला आईसक्रीम आणले आणि काय आश्चर्य त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे गाडी सुरुच झाली नाही. इंजीनिअरने परत गाडी चेक केली, पण सगळे नीट होते. शेवटी त्याने कंपनीला कळवले की व्यक्तीने सांगितलेली तक्रार खरी आहे. कंपनीने इंजीनियरला तिथेच राहून नीट लक्ष देण्यास सांगितले. त्याप्रमाणे इंजीनिअरने प्रत्येक गोष्टीची पाहणी करायला सुरवात केली. रोज त्या व्यक्तीबरोबर आईसक्रीम खायला गेल्यावरकाही दिवसानंतर इंजीनिअरच्या लक्षात आले की ती व्यक्ती जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला गर्दीमुळे वेळ लागतो. पण व्हॅनिला फ्लेवरला जास्त मागणी असल्यामुळे त्याच्यासाठी वेगळे काउंटर होते आणि सर्विस पण तत्पर होती त्यामुळे तो ते घेऊन लवकर येतो आणि नेमकी हीच गोष्ट इंजीनिअरला पाहिजे होती. त्याने त्या गोष्टीवर खूप अभ्यास केला. तेव्हा लक्षात आले की ती व्यक्ति जेव्हा बाकीचे फ्लेवर घेते तेव्हा त्याला यायला वेळ लागतो. तोपर्यंत गाडीचे इंजिन थोडे गार होते आणि गाडी पुन्हा लगेच चालू होते. पण ती व्यक्ति जेव्हा व्हॅनिला फ्लेवर घेते तेव्हा तो लगेच परत येतो. त्यामुळे गाडीच्या इंजिनला गार होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे इंजिन मधील पेट्रोलचे इव्हॅपरेशन होतेआणि ते ब्लॉक होते व परत चालू होत नाही. आणि मग गाडीच्या इंजिनला गार करण्यासाठी लागणारे संशोधन सुरु झाले. जगातील अग्रमानांकित कंपनी मर्सिडीजने कार्ल बेंझ व विलिअम मेयबैकच्या मदतीने १९०१ साली आपल्या मर्सिडीज ३५' साठी पहिला रेडिएटर बसवला जो आजही इंजिनचा अविभाज्य भाग आहे. एखादी फालतू वाटणारी गोष्टसुद्धा जगालाकिती पुढे घेऊन जाते हेच यातून सिद्ध होते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तापत्रयअग्निची जळतसे सगडी । आहाळोनि कोरडी जाली काया ॥१॥ केव्हां करुणाघना वोळसी अंबरीं । निवविसी नरहरी कृपादृष्टी ॥२॥ शोकमोहाचिया झळंबलों जाळीं । क्रोधाचे काजळीं पोळतसें ॥३॥ चिंतेचा वोणवा लागला चहूंकडां । प्राण होय व्याकुळा धांव देवा ॥४॥ धांवधांव करुनाघना तुजविण । नामा म्हणे प्राण जातो माझा ॥५॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••प्रत्येकांचे विचार वेगवेगळे असतात. प्रत्येकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो,प्रत्येकांची राहणीमान वेगळी असते सोबतच प्रत्येकांचा स्वभाव सुद्धा वेगळा असतो. कारण सर्वजण एक सारखे राहिले असते तर कोणी, कोणाला मान दिले नसते किंवा गोड बोलून फसवणूक केले नसते.म्हणून जीवन जगत असताना प्रत्येक माणसांकडून काहीतरी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा. कारण प्रत्येकांकडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आणि मार्गदर्शन असतात.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्वतःचे अस्तित्व जाणणे*एका बागेतील एका  काजव्याने रात्रीच्या वेळी बागेतल्या वाड्यात दिवे पेटले असता त्याचा लखलखीत प्रकाश पाहून, स्वतःचा प्रकाश मिणमिणता आहे अशी कुरकुर चालविली. परंतु त्याच्या बरोबर असलेला काजवा शहाणा होता. तो म्हणाला, 'अरे, थोडा वेळ थांब, आणि काय मजा होते ते पहा.' काही वेळाने त्या वाड्यातील सर्व दिवे विझले व वाडा व काळोखाने भरून गेला. हे पाहून तो शहाणा काजवा आपल्या मत्सरी सोबत्याला म्हणाला, ' मित्रा, हे दिवे थोडा वेळ प्रकाश पाडतात, नि विझून जातात, पण आपली स्थिती तशी नाही. आपला प्रकाश थोडा असला तरी तो कधी नाहीसा होत नाही.'तात्पर्य :- एकदम श्रीमंती येऊन ती पुन्हा लवकर नाहीशी होण्यापेक्षा कायम टिकणारी मध्यम स्थिती फार चांगली. दुसऱ्याच्या दिखाऊ तात्पुरत्या असलेल्या बाबींवर दुर्लक्ष करून आपल्याकडे असलेल्या कायम बाबींवर लक्ष केंद्रित केलेले कधीही उत्तमच.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 07 फेब्रुवारी 2025💠 वार - शुक्रवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_15.html?m=1••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🛞 *_ या वर्षातील ३८ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🛞 *_महत्त्वाच्या घटना:_* 🛞••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.**१९९९: युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी**१९७४: ग्रेनाडा हा देश (युनायटेड किंग्डमपासुन) स्वतंत्र झाला.**१९७१: स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.* *१९६५: मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर सुरू झाला.**१९४८: कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.**१९२०: बाबूराव पेंटर यांच्या ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ने तयार केलेला ’सैरंध्री’ हा चित्रपट पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.**१९१५: गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी**१८५६: ब्रिटिशांनी अवध साम्राज्य ताब्यात घेतले.सम्राट वाजिद अली शहा याला तुरुंगात टाकण्यात आले.**१८४८:पुणे नगर वाचन मंदिराची स्थापना या ग्रंथालयाचे आधीचे नाव दि पूना नेटिव्ह जनरल लायब्ररी असे होते. न्यायमूर्ती रानडे हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते* 🛞 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८०: प्राची शाह-पांडया -- भारतीय चित्रपट अभिनेत्री**१९७९: सरला लोटन पाटील -- कवयित्री**१९६५: बी. एल. खान-- कवी* *१९६४: नितीन आखवे -- मराठी गीतकार (मृत्यू: ८ एप्रिल २०१२ )**१९६३: डॉ. दिलीप नारायण पांढरपट्टे -- सुप्रसिद्ध गझलकार, सनदी अधिकारी* *१९५८: सुकुमार जयकुमार कोठारी -- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये काव्य करणारे कवी* *१९५५: माधव रा.पवार -- प्रसिद्ध गीतकार, कवी* *१९५३: बाळासाहेब थोरात (विजय भाऊसाहेब)-- माजी मंत्री म.रा.**१९५३: माधव जगन्नाथ जोशी -- लेखक**१९५१: रवींद्र साठे -- मराठी चित्रपटांमध्ये व दूरचित्रवाणी मालिकांमध्ये पार्श्वगायन करीत असलेले पार्श्वगायक**१९४१: निळकंठ तुळशीराम रणदिवे -- लेखक, कवी**१९४०: विद्या मधुकर जोशी -- लेखिका**१९३८: एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते**१९३५: उषा वामन भट -- लेखिका* *१९३५: अशोक पुरुषोत्तम शहाणे -- लेखक, भाषातज्ज्ञ, संपादक,व प्रकाशक**१९३४: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: ५ फेब्रुवारी २०१० )**१९३२: माधव भीमराव थोरात -- लेखक* *१९२८: अनंत महादेव मेहंदळे -- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार(मृत्यू: २४ एप्रिल १९९२ )**१९२३: प्रा. डॉ. बापूसाहेब देवेंद्र खोत -- लेखक* *१८९८: रमाबाई भीमराव आंबेडकर ( मृत्यू: २७ मे १९३५ )**१८८४: लक्ष्मीबाई गणेश अभ्यंकर -- मराठी कवयित्री, कथालेखिका, कीर्तनकार, समाज कार्यकर्त्या आणि प्रभावी वक्त्या( मृत्यू: २० सप्टेंबर १९६९)**१८१२: चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (मृत्यू: ९ जून १८७० )* 🛞 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🛞 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०१५: आत्माराम भेंडे-- मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक(जन्म: ७ मे १९२३)* *२०१४: डॉ. शरद कोलारकर-- विदर्भातील एक ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, लेखक, विदर्भ संशोधन मंडळाचे माजी कार्याध्यक्ष (जन्म: १७ ऑक्टोबर १९३७ )**१९९९: हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे (जन्म: १४ नोव्हेंबर १९३५ )**१९९०: वामनराव हरी देशपांडे -- महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतज्ञ, संगीतसमीक्षक व लेखक (जन्म: २७ जुलै १९०७ )**१९४७: वासुदेव दामोदर मुंडले -- चरीत्रकार (जन्म: १८८० )**१९३८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (जन्म: २० डिसेंबर १८६८ )**१२७४:श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक (जन्म: ४ सप्टेंबर १२२१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लिहिते व्हा .........!*कोणत्याही भाषा विकासातील सर्वात शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे लेखन क्रिया. भाषा विकासात श्रवण, भाषण आणि वाचन या तीन मूलभूत क्रियेनंतर येणाऱ्या लेखन क्रियेकडे सर्वाचेच लक्ष असते. कारण लेखन प्रक्रियेतून आपली माहिती दीर्घकाळ जतन करू शकतो. अभ्यासासाठी देखील त्या लेखी साहित्याचा वापर करता येतो. म्हणून त्यास खुप महत्त्व दिल्या जाते ............ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *निबे कंपनीचा वर्धापनदिन आणि मिसाईल कॉम्प्लेक्सचा शुभारंभ, आत्मनिर्भर भारतात संरक्षण क्षेत्रात मोठी क्रांती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशावाद*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नंदुरबार जिल्ह्यातील 11 लाख लोकांची होणार सिकलसेल तपासणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिक शहरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आठ बांगलादेशी घुसखोरांना अटक !*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी तीन कोटींच्या खर्चाला मान्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई : क्रिकेट समीक्षक, लेखक, मुक्त पत्रकार द्वारकानाथ संझगिरी यांचे ७४ व्या वर्षी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात निधन, शिवाजी पार्क मध्ये होणार अंतीमसंस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा चार विकेटनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 पंढरीनाथ बोकारे, अध्यक्ष, नानक-साई फाउंडेशन, नांदेड  👤 पवनकुमार गटूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर👤 पोतन्ना चिंचलोड, येवती👤 विनायक गोविंदराव पारवे👤 खंडू येरकलवाड, बेळकोणी👤 साईनाथ येनगंटीवार👤 कवी बी. एल. खान*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*जेपी - जयप्रकाश नारायण*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) विदर्भात भारद्वाज पक्ष्याला काय म्हणतात ?२) प्राणी व वनस्पतींना शास्त्रीय नावं देण्याची पद्धत कोणी सुरू केली ?३) प्राणी व वनस्पतींना दिलेला शास्त्रीय नाव किती शब्दांनी बनलेला असतो ?४) 'संशोधक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) कोणतंही शास्त्रीय नाव कोणत्या शैलीत लिहिलं जातं ? *उत्तरे :-* १) नपिता ( दारू न पिता ज्यांचे डोळे लाल दिसतात तो नपिता ) २) कॅरोलस लिनियस, स्वीडिश वनस्पती शास्त्रज्ञ ३) दोन ( genus कुल / गोत्र व species जात ) ४) शास्त्रज्ञ ५) तिरकस अक्षरांच्या इटालीक शैलीत*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *वसाहती अंतराळातील* 📙 ***********************विज्ञानकथाकारांना आकर्षक वाटणारी अंतराळ वसाहतींची कल्पना आता मुर्त ठरू पाहत आहे. १९५७ साली स्पुटनिकने अंतराळ तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. १९६९ मध्ये मानव चंद्रावर गेला. तर १९८०-९० सालच्या दशकात अंतराळवीरांनी पृथ्वीभोवती चक्कर मारणार्‍या स्पेस शटलसदृश यानात जास्त वेळ राहण्याचे विक्रम सुरू केले. अंतराळ वसाहत म्हणजे अशाच पद्धतीने पृथ्वीभोवताली फिरणारी वसाहतच, जी अंतराळात मानवी जीवनासाठी लागणार्‍या सर्व सुविधा पुरवू शकेल. अंतराळातील वसाहतीत पृथ्वीपेक्षा सर्वात मोठा जाणवणारा फरक म्हणजे तेथील अतिसूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा. पृथ्वीच्या आकर्षणामुळे प्रत्येक वस्तूला वजन असते. आपल्या शरीराला, मेंदूला, मनाला ह्या वजनाची सवय झालेली असते. अमुक वजन पेलता यावे म्हणून स्नायूंचे गठन झाले असते. अंतराळात गुरुत्वाकर्षण जवळजवळ नसल्याने आपण वसाहतीत तरंगू, तसेच वर खालीचा फरक नाही ! पेल्यातला द्रव पेला उघडा केला तर खाली पडत नाही. तो झटकून काढला की, गोळ्याच्या स्वरूपात तरंगतो. अर्थात हे विचित्र अनुभव आपल्याला खातापिताना आणि देहधर्मांसाठी येणार ! अाणि अशा स्थितीत सतत राहिल्याने मानसिक परिणाम काय होतील, ते सतत अभ्यासले जात आहेत. अंतराळात वसाहत उभी करणे वाटते तितके अवघडही नाही; कारण 'वजन' हा गुण नसल्याने सिमेंट काँक्रीटचे भव्य प्रासाद बांधायची सूर नाही, हलके साहित्य चालेल. अशा घरबांधणीचे अर्थातच नवे शास्त्र असेल. शिवाय गुरुत्वाकर्षणाचा अभाव असल्याने द्रव ठेवायला पेला नको, तसेच दोन द्रवांचे मिश्रण अधांतरी करता येईल. अशा स्थितीचा फायदा घेऊन काही अतिशुद्ध औषधे बनवता येतील, ज्यांना भांड्याचा संसर्ग नाही. धातूंची मिश्रणे (नव्या प्रकारची) करणेसुद्धा अंतराळात शक्य होईल. गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेतील वैज्ञानिक प्रयोग इथे करता येतील. एकूण अंतर वसाहत हे आता स्वप्न राहिले नसून विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासातील एक संभाव्य टप्पा आहे. केवळ पृथ्वीवर जागा नाही म्हणून अंतराळात राहावे, असे कोणी म्हणणार नाही. उलट तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन लोकसंख्या काबूत आणणे अधिक व्यवहार्य आहे. परंतु जे औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रकल्प गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर राबवणे शक्य नाही, ते अशा वसाहतीत करता येतील, हे त्यांचे वैशिष्ट्यच. शिवाय अंतराळात जवळजवळ पोकळी असल्याने वसाहतीबाहेरच्या पोकळीतदेखील वेगळे प्रयोग करता येतील. त्यांच्यासाठी पृथ्वीवर कृत्रिम पोकळी निर्माण करणे खर्चाचे असेल.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तान्हेलों भुकेलों । तुझेनि नामें निवालों ॥१॥ तहान नेणें भूक नेणें । अखंड पारणें नामीं तुझ्या ॥२॥ अमुतलिंग केशव हा चित्तीं । तेणें नामया तृप्ति अखंडित ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला हवे ते स्थान किंवा पाहिजे ती प्रसिद्धी आजकाल पैशाने सर्वच काही विकत घेता येऊ शकते. पण, जो पर्यंत आपले अवयव साथ देतात आणि हातात पैसे असतात तोपर्यंत विकत घेतलेल्या वस्तूंना महत्व असते.जेव्हा हेच ,आपल्या हातातून हळूहळू दूर व्हायला लागतात तेव्हा, मात्र जवळचे जिवलग मित्र सुद्धा अनोळखी होतात.म्हणून पैसे अशा ठिकाणी खर्च करावा जेथे आपण नसताना सुद्धा त्या पैशाची किंमत झाली पाहिजे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अंतःकरणातील दुःख*एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही. आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला. त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'*तात्पर्य :- बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 06 फेब्रुवारी 2025💠 वार - गुरुवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🏵️ *_ या वर्षातील ३७ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🏵️ *_महत्त्वाच्या घटना:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००३: संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.* *१९५२: इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली.* *१९४२: दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.**१९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.**१९३२: ’प्रभात’चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ या चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.**१९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.**१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.*🏵️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🏵️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९८३: श्रीशांत – क्रिकेटपटू,**१९८३: अंगद सिंग बेदी -- भारतीय अभिनेता* *१९८१: देवदत्त नागे -- भारतीय मराठी अभिनेता**१९८०: डॉ. वीरा राठोड (विनोद रामराव राठोड)-- प्रसिद्ध कवी,संपादक,लेखक साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार विजेते**१९७२: जयश्री रामचंद्र थोरवे-(गव्हाणे) -- कवयित्री, लेखिका**१९६६: महेंद्र भास्करराव पाटील -- कवी* *१९५५: अनिल यशवंत अभ्यंकर प्रसिद्ध नाटककार, लेखक**१९५२: डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक,क्रिकेटपटू आणि राजकारणी**१९५२: नंदू पोळ -- मराठी नाट्य-चित्र अभिनेते, लेखक (मृत्यू: २८ जुलै २०१६)**१९४९: प्रा. सुमती पवार -- प्रसिद्ध लेखिका, कवयित्री* *१९४७: श्रीधर माडगूळकर -- ज्येष्ठ लेखक, गदिमा यांचे सुपूत्र (मृत्यू: २१ फेब्रुवारी २०१९ )**१९४५: मारुती पाटील -- लेखक**१९४०: डॉ.पंडित कमलाकरराव परळीकर -- ख्यातनाम जेष्ठ कलावंत, प्रसिद्ध गायक, रचनाकार* *१९४०: भूपिंदर सिंग -- भारतीय संगीतकार,गझल गायक आणि बॉलीवूड पार्श्वगायक (मृत्यू: १८ जुलै २०२२ )**१९३१: ओंकार भास्कर धुंडिराज -- चित्रकार, लेखक व कलाप्रसार (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९९९ )**१९३०: डॉ. भास्कर वामन आठवले(भा.वा.) -- प्रसिद्ध मराठी साहित्यिक, संगीतकार (मृत्यू:१९ डिसेंबर २०२४)**१९२७: विनायक श्रीपाद राजगुरु -- लेखक (मृत्यू: १० मे १९९० )**१९२५: सुभा करंदीकर -- लेखिका (मृत्यू: ३ फेब्रुवारी २००९)**१९२५: मुरलीधर गोपाळ गुळवणी -- महाराष्ट्रातील अभ्यासू इतिहाससंशोधक, कुशल इतिहासकथनकार, वस्तुसंग्राहक (मृत्यू: १८ डिसेंबर २००० )**१९१६: प्रभाकर विष्णू पाटणकर -- प्रवासवर्णनकार तथा निवृत्त विक्रीकर उपायुक्त* *१९१५: रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (मृत्यू: ११ डिसेंबर १९९८ )**१९११: रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४ )**१९०६: आदिनाथ नेमिनाथ उपाध्ये -- प्राचीन भाषा तज्ज्ञ, संशोधक(मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७५ )*🏵️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🏵️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२२: भारतरत्न लता मंगेशकर -- सुप्रसिद्ध भारतीय गायिका आणि संगीतकार (जन्म: २८ सप्टेंबर,१९२९ )**२००६: ईश्‍वर बगाजी देशमुख -- क्रीडाशिक्षक, संस्थापक श्री शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित (जन्म: २० मार्च १९२४ )**२००१: बॅ. विठ्ठलराव गाडगीळ –माजी केन्द्रीय नभोवाणी मंत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९२८ )* *१९९३: आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू (जन्म: १० जुलै १९४३ )**१९८६: लक्ष्मण नीळकंठ (अण्णासाहेब) छापेकर -- लेखक, कवी, संपादक (जन्म: १३ सप्टेंबर १९०७ )* *१९७६: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (जन्म: ४ नोव्हेंबर १९२५ )**१९५२: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (जन्म: १४ डिसेंबर १८९५ )**१९३९: सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, विधवा विवाहाला संमती दिली.(जन्म: १० मार्च १८६३ )**१९३१: मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (जन्म: ६ मे १८६१ )**१८०४: जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ (जन्म: १३ मार्च १७३३ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*पालकांचे मुख्याध्यापकास पत्र*प्रिय मुख्याध्यापक, सर्व प्रकारच्या शाळा.बऱ्याच दिवसापासून आपल्याशी बोलावे म्हणून मनाशी ठरवलं होतं पण बोलायला वेळ मिळाला नाही किंवा बोलणे टाळलो. पण आज राहवलं नाही कारण माझे पाल्य शाळेतून येताना खूप।अस्वस्थ झाल्यासारखे वाटत होते. भरपूर काम करून एखादा व्यक्ती जेंव्हा थकून भागून घराकडे येतो, तेंव्हा त्यांची स्थिती जशी असते अगदी त्याच अवस्थेत दिसलं. त्याला पाहून माझे मलाच कसं तरी वाटलं ? घरात प्रवेश केल्याबरोबर खांद्यावर असलेलं प्रचंड जड दप्तर बाजूला सारत हाश हुश्श केलं आणि पलंगावर आडवं झालं. आज खरोखर मला माझ्या पाल्याची काळजी वाटायला लागली की ................ पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुणे - पिंपरी चिंचवडमध्ये अत्याधुनिक पोलीस आयुक्तालय, 180 कोटींच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत केजरीवालांना मोठा धक्का बसण्याची शक्यता, भाजपला 39 ते 44 जागा, चाणक्यचा सर्व्हे समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नागपूर शिक्षण विभागाचा घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिर्डी संस्थानच्या जेवणासाठी आता कूपन आवश्यक, वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिंगोली, वाशीम अकोला रेल्वेस्थानकांची पाहणी, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा घेतला आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नांदेड - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज नांदेड दौरा, नांदेडमध्ये भव्य आभार सभेचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर : आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामना दुपारी होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 सुहास सदावर्ते , दै. सकाळ, जालना👤 प्रा.पंजाबराव येडे , बीड👤 वैभव गायकवाड👤 सादिक मोहंमद👤 माधव गणेशराव नारसनवाड👤 लक्ष्मण एडके👤 चंपती सावळे👤 सचिन गिराम👤 कोंडेवार साईनाथ, भैसा*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गानकोकिळा - लता मंगेशकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" आंधळ्या श्रद्धेपेक्षा डोळस बुद्धीने विचार करणे केव्हाही श्रेष्ठ होय. "**संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) अमेरिकेचे पहिले कृष्णवर्गीय राष्ट्राध्यक्ष कोण होते ?२) नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात ?३) 'गोफण क्लब' ही संस्था कोणी स्थापन केली ?४) 'सैन्य' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठविला ? *उत्तरे :-* १) बराक ओबामा २) तपकिरी रंग ३) दामोदर चाफेकर ४) फौज, दल ५) सामाजिक गुलामगिरी *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लता मंगेशकर*( हेमा मंगेशकर म्हणून जन्म; २८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२) या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना मोठ्या प्रमाणावर गणले जाते. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा (Nightingale of India) आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. देशासाठी त्यांच्या योगदानाबद्दल २००१ मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळविणाऱ्या  एम.एस. सुब्बुलक्ष्मी नंतर त्या दुसऱ्या गायिका आहेत. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना  फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, "द लीजन ऑफ ऑनर"ने सन्मानित केले.  त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार  फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये  लंडनच्या  रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.त्यांना चार भावंडे होती, मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर, ज्यात त्या सगळ्यात मोठ्या होत्या.लता मंगेशकर यांना  कोविड-१९ ची लागण झाल्यामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी झाले. २८ दिवस उपचार घेतल्यानंतर  मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटल येथे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांची तृतीय पुण्यस्मरण दिवस त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन !*संकलन*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तान्हेलिया जाय उदका लागोनी । पारधी देखोनी मुरडे वेगीं ॥१॥ तैसे तुझे चरण विसरलों देवा । संसार केशवा देखोनियां ॥२॥ तैसी परि मज जहाली जाण देवा । नामा उभा केशवा विनवितो ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••समाजात राहणारा एखादा माणूस जर काहीच करत नसेल तर त्याला रिकामटेकडा म्हणून नाव ठेवले जाते. त्यातच एखादा माणूस काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्याच्या वाटेत अडथळे निर्माण करून व टिंगल, टवाळी करून आनंद घेणारे देखील समाजात बघायला मिळतात. ही आजची वास्तविकता आहे.जी व्यक्ती नित्य नेमाने आपले कार्य करत असते अशा व्यक्तींनी कोणाकडे लक्ष देऊ नये.आपले कार्य निरंतर चालू ठेवावे. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• एक बोकड एका डोंगराच्या माथ्यावर चरत असता एकाएकी मोठे वादळ झाले. त्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तो बोकड जवळच्या दाट झाडीत जाऊन बसला. ती जागा शांत व निवार्‍याची असल्याने त्याला तेथेच झोप लागली. काही वेळाने वादळ शांत झाल्यावर तो जागा झाला व घरी जाण्यास निघाला, तेव्हा त्याला असे आढळून आले की, त्याच्या लोकरीत काटेरी झाडाची एक फांदी अडकली आहे. थोडा वेळ हिसकाहिसकी केल्यावर बरीचशी लोकर गेल्यावर ती फांदी बाजूला झाली व तो आपल्या घरी गेला.तात्पर्य - काहीही अपेक्षा न ठेवता आश्रय देणारे किंवा दुसर्‍याचे रक्षण करणारे लोक थोडेच असतात.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 05 डिसेंबर 2025💠 वार - बुधवार~~~~~~~~~~~~~~~~~~~Link - http://nasayeotikar.blogspot.com/2025/02/nila-satyanarayan.html••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ♦️ *_ या वर्षातील ३६ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ♦️ *_महत्त्वाच्या घटना:_* ♦️••••••••••••••••••••••••••••••••••••*२००४: ’पुण्याची’ स्वाती घाटे बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.**२००३: भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.**१९६२: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांनी अल्जेरियाला स्वातंत्र्य द्यावे असे आवाहन केले.**१९५८: ७,६०० पौंडाचा एक हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने टायबी बेटांजवळ हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.**१९५२: स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.**१९४५: दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थर मनिला येथे परतले.**१९२२: रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.**१९१९: चार्ली चॅप्लिनने इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली.**१७६६: माधवराव पेशवे आणि हैदराबदचा निजाम यांची कुरुमखेड येथे भेट* *१६७०: सिंहगड ताब्यात मिळवण्यासाठी नरवीर तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली.**१२९४: अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.* ♦️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ♦️ ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९९: अर्शदीप सिंग -- भारतीय क्रिकेटपटू**१९८३: आकाश पांडुरंग फुंडकर --कामगार मंत्री म.रा.**१९८१: प्रमोद कमलाकर माने -- ग्रामीण जीवनावर लेखन करणारे मराठी लेखक**१९८०: प्रतिक पाटील -- लेखक**१९७६: अभिषेक बच्‍चन – प्रसिद्ध अभिनेते**१९७५: दिनेश वासुदेवराव गावंडे -- लेखक, कवी**१९७५: डॉ.संजयकुमार परशराम निंबेकर -- लेखक**१९७३: प्रशांत शहादू वाघ -- कवी* *१९७२: प्रा. डॉ. दिनेश सेवा राठोड -- इंग्रजी व मराठी मध्ये लेखन करणारे लेखक, समीक्षक**१९६७: प्राचार्या डॉ. शरयू बबनराव तायवाडे -- लेखिका* *१९६६: पंडित उदय भवाळकर -- भारतीय शास्त्रीय गायक**१९६५: सुरेंद्र ऋषी मसराम -- कवी**१९६३: डॉ. केशव सखाराम देशमुख -- प्रसिद्ध लेखक आणि कवी**१९६२: वर्षा रमेश दौंड -- कवयित्री**१९५५: सुभाष मधुकरराव कुलकर्णी- तोंडोळकर -- लेखक**१९५५: बलभीम तात्याराव तरकसे -- कवी, लेखक**१९५२: अजित देशमुख -- लेखक**१९४९: प्रा. डॉ. विमल कीर्ती -- पाली भाषा व बौद्ध साहित्याचे अभ्यासक (मृत्यू: १४ डिसेंबर २०२० )**१९४९: नीला सत्यनारायण -- महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त,तथा मराठी साहित्यिक (मृत्यू: १६ जुलै २०२० )**१९४७: सदाशिव सोनु सुतार - लेखक* *१९४६: शशिकला नामदेवराव गावतुरे-- कवयित्री* *१९४३: श्याम सदाशिव किरमोरे -- लेखक* *१९३६: बाबा महाराज सातारकर – ज्येष्ठ कीर्तनकार (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०२३ )**१९३३: गिरीजा कीर – लेखिका आणि कथाकथनकार (३१: ऑक्टोबर २०१९ )**१९२८: श्रीनिवास दिगंबर इनामदार -- कवी (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१३ )**१९२२: राजाराम मारोती हुमणे -- चरित्र लेखक, नाटककार* *१९१४: शंकर गोपाळ तथा शं. गो. तुळपुळे – प्राचीन मराठी भाषेचे गाढे व्यासंगी,संत वाङ्‌मयाचे अभ्यासक व संशोधक (मृत्यू: ३० ऑगस्ट १९९४ )**१९०५: अच्युतराव पटवर्धन – स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते,भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक,विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते (मृत्यू: ५ ऑगस्ट १९९२ )**१८४०: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९२१ )* ♦️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_*♦️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: मनोहर मुरलीधर शहाणे -- प्रसिद्ध मराठी कथाकार व कादंबरीकार (जन्म: १ मे १९३० )**२०१८: सुधा करमरकर -- नाटयलेखिका (जन्म : १८ मे १९३४ )**२०१५: डॉ.किशोर रामचंद्र महाबळ -- अभ्यासू,अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण करणारे लेखक (जन्म: ९ जानेवारी १९६० )**२०१०: सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता (जन्म: ७ फेब्रुवारी १९३४ )**२००८: महर्षी महेश योगी – योग गुरू (जन्म: १२ जानेवारी १९१७ )**२००३: गणेश गद्रे – ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधींच्या 'हरिजन' या मराठी अंकाचे संपादक* *१९८६: लक्ष्मणराव सरदेसाई -- कोंकणी व मराठी भाषेतील लेखक(जन्म: १८ मार्च १९०४ )**१९२७: हजरत इनायत खाँ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक (जन्म: ५ जुलै १८८२ )**१९२०: विष्णू नरसिंह जोग -- आळंदी येथील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक(जन्म: १४ सप्टेंबर १८६७ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जयंतीनिमित्त विशेष संकलित माहिती ....*महाराष्ट्र राज्याची पहिली महिला राज्य निवडणूक आयुक्त - डॉ. निला सत्यनारायण*..... पूर्ण लेख वाचण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची बदली, राहुल करडीले नांदेडचे नवे जिल्हाधिकारी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बोगस पीक विमा भरणाऱ्यांना दणका, राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक, उत्तर प्रदेश, हरियाणातील सेंटर्सचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार लाडकी बहीण योजनेची पडताळणी; घरात 'चारचाकी' दिसली तर थेट लाभ होणार रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई महापालिकेचे 74 हजार कोटींचं बजेट सादर, भांडवली उत्पन्न वाढलं, 10 टक्के खर्च आरोग्यावर, आयुक्त भूषण गगराणींनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात पीकविमा योजनेत भ्रष्टाचार, सुप्रिया सुळेंनी लोकसभेत उपस्थित केला प्रश्न, केंद्रीय कृषीमंत्र्यांचे चौकशी करून कारवाईचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मागेल त्याला सौर कृषी पंप, शंभर दिवसांचे उद्दीष्ट 60 दिवसात पूर्ण, 52 हजार 705 पंप बसवले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत वि. इंग्लंड एकदिवसीय सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीचा समावेश, BCCI ची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बाळासाहेब कदम , शिक्षक, धर्माबाद👤 विठ्ठल पेंडपवार , नांदेड👤 अच्युत पाटील खानसोळे 👤 निलेश गोधने, शिक्षक, नांदेड👤 श्याम राजफोडे👤 संदीप मुंगले👤 सदाशिव मोकमवार, येताळा👤 भीमराव वाघमारे👤 अक्षय शिंदे👤 बालाजी पाटील👤 सुभाष नाटकर👤 कामन्ना भेंडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*स्वरूपानंद- रामचंद्र विष्णू गोडबोले*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय इतर सर्वांवर प्रभुत्व गाजविणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते. - महात्मा गांधी .*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) उडतांना सर्वाधिक पंखविस्तार करणारा पक्षी कोणता ?२) महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?३) १९ वर्षाखालील महिला टी - २० विश्वचषक २०२५ कोणत्या संघाने पटकावले ?४) 'सेवक' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच टी - २० सामन्यात भारताने किती फरकाने मालिका जिंकली ? *उत्तरे :-* १) भटक्या अलबेट्रॉस २) महाबळेश्वर ( १४३८ मी. ) ३) भारत ( दक्षिण आफ्रिका - उपविजेता ) ४) दास, नोकर ५) ४ - १ ने *संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तळियाचे पाळीं वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाइतो रे । ताहाना फुटे परी उद्क नेघे । मेघाची वाट पाही रे ॥१॥ तैसा येईं बा कान्हया येईं बा कान्हया । जीवींच्या जीवना केशीराजा रे ॥धृ०॥ टाळघोळ कल्लोळ नानापरीचीं वाद्यें । वाजती वोजा रे । रानींच्या मयुरा नृत्या पैं नये । तुजविण मेघराजा रे ॥२॥ जळाविण जळचर पक्षीविण पिलियासी । तैसे जालें नामयासी रे । शंखचक्र गदा पद्म पितांबरधारी । अझुनि कां न पावशी रे ॥३॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्याला होत असलेला त्रास फक्त आपल्यालाच चांगल्याप्रकारे   माहीत असते आणि त्यातून  आलेला अनुभव सुद्धा आपणच, आतून जाणत असतो. म्हणून चुकूनही दुसऱ्याला त्रास देऊ नये व त्रास द्यायला लावू नये कारण, प्रत्येकातच त्या प्रकारचा त्रास सहन करण्याची ताकद नसते.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *करावे तसे भरावे*" एक उंट जंगलात चरण्‍यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्‍ट कोल्‍हा त्‍याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्‍याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्‍हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्‍हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्‍हा कोल्‍हा म्‍हणाला,'' मी तर रोज जवळच्‍याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्‍या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्‍ह्याला त्‍याने तेथे नेण्‍यासाठी विनंती केली.उंट कोल्‍ह्यासोबत शेतात गेला. कोल्‍ह्याने आधी जाऊन स्‍वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्‍ह्याने मग जोराने कोल्‍हेकुई सुरु केली. कोल्‍ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्‍याचे चार गडी शेतात घुसले. त्‍यांना पाहताच कोल्‍ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्‍यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.त्‍याला मार खाताना पाहून कोल्‍ह्याला खूप आनंद झाला. या गोष्‍टीला काही दिवस गेले. कोल्‍ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्‍हा शेतात नेले व पुन्‍हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्‍यालाच मार पडतो ही गोष्‍ट आता उंटाच्‍या लक्षात आली व त्‍याने कोल्‍ह्याची खोड मोडण्‍याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्‍ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्‍यांना बाहेर काढण्‍याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्‍हा कोल्‍ह्याची वेळ आली तेव्‍हा उंटाने मुद्दामच जास्‍त खोल पाण्‍यात नेऊन डुबकी मारली. कोल्‍हा पाण्‍यात पाण्‍यात बुडून मरण पावला.*तात्‍पर्य :- करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्‍याला मिळते*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 04 फेब्रुवारी 2025💠 वार - मंगळवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ☀️ *_जागतिक कर्करोग दिन_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_ या वर्षातील ३५ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• ☀️ *_महत्त्वाच्या घटना:_* ☀️•••••••••••••••••••••••••••••••••*२००४: मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.**२००३: युगोस्लाव्हियाचे सर्बिया अँड मोंटेनिग्रो असे नामकरण करण्यात आले आणि नवी राज्यघटना अस्तित्त्वात आली.**१९६१: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान प्रदान**१९४८: श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.**१९४४: ’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे**१९३६: कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेले रेडिअम हे पहिले किरणोत्सारी मूलद्रव्य बनले.**१९२२: चौरी चौरा येथे झालेल्या हिंसक आंदोलनानंतर महात्मा गांधींनी ३ दिवस उपोषण करुन असहकार आंदोलन मागे घेतले.**१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.**१६७०: ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले,त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.* ☀️ *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९०: वरुण शर्मा -- भारतीय अभिनेता* *१९८९: पवन सुरेशराव नालट -- कवी**१९८८: श्रीपाद अरुण जोशी -- कवी**१९८७: डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे -- लोकसभेचे खासदार* *१९८२: प्रा. डॉ. पद्माकर तामगाडगे -- कवी, लेखक, संपादक* *१९८२: ईश्वरदास देविदास मते -- कवी, लेखक**१९७४: उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री**१९६७: संदीप सुरेश शहा -- कवी, लेखक* *१९५७: श्रीराम दुर्गे -- जेष्ठ लेखक (मृत्यू: ३० जुलै २०२१ )**१९५०: डॉ अलीमिया दाऊद परकार -- लेखक**१९५०: हेमंत साने -- लेखक, इतिहास संशोधक* *१९४१: विठ्ठल महादेव बोते -- कवी, लेखक* *१९३९: रमण रामचंद्र माळवदे -- लघुकथा, एकांकिका लेखक* *१९३८: पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू(मृत्यू: १७ जानेवारी, २०२२ )**१९३६: डाॅ. वासंती फडके -- मराठी लेखिका,अनुवादिका**१९३५: डॉ. लीला गणेश दीक्षित -- बालसाहित्यकार (मृत्यू: १३ ऑक्टोबर २०१७ )**१९३४: आनंद बालाजी देशपांडे (आकाशानंद) -- प्रसिद्ध लेखक, संपादक* *१९३३: श्रीधर चंद्रशेखर गुप्ते पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू (मृत्यू: ११ मार्च २०१५)**१९२२: स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: २४ जानेवारी २०११ )**१९०४: त्रिंबक निळकंठ आंभोरकर -- लेखक (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९९२ )**१९०३: शांताबाई नाशिककर -- कथा लेखिका, कादंबरीकार, नाटककार* *१९०२: चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग – धाडसी अमेरिकन वैमानिक. १९२७ मध्ये त्यांनी पॅरिस ते न्यूयॉर्क या ५,८०० किलोमीटरच्या विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धेत भाग घेऊन साडे तेहतीस तासांत ती स्पर्धा जिंकली.वैमानिकी जीवनाच्या अनुभवांवरील त्यांच्या ’द स्पिरीट ऑफ सेंट लुईस’ या पुस्तकास पुलित्झर पुरस्कार मिळाला.(मृत्यू: २६ ऑगस्ट १९७४ )**१८९३: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (मृत्यू: १६ डिसेंबर १९६० )*☀️ *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* ☀️••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२३:वाणी जयराम -- हिंदुस्तानी गायिका आणि पार्श्वगायिका (जन्म: ३० नोव्हेंबर १९४५)**२०२०: राघवेंद्र कडकोळ -- जेष्ठ अभिनेते, लेखक (जन्म:१९४३)**२००२: भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक (जन्म: १ ऑगस्ट १९१३ )**२००१: पंकज रॉय – क्रिकेटपटू,पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: ३१ मे १९२८ )**१९७४: सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १ जानेवारी १८९४ )**१८९४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (जन्म: ६ नोव्हेंबर १८१४ )**१६७०: नरवीर तानाजी मालुसरे (जन्म: १६२६ जावळी,सातारा )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य, विरोध केल्यास होणार कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर ए आय चा वापर विचाराधीन - उपमुख्यमंत्री अजित पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *निवडणुकांपूर्वीच स्थानिक कार्यकर्त्यांना संधी; राज्यात 1 लाख 94 हजार SEO ची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अफजलखानाचा कोथळा काढलेली वाघनखे नागपूरला रवाना, साताऱ्यात चार लाख शिवप्रेमींनी घेतले दर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हिवाळी आशियाई स्पर्धेत भारताची पहिली महिला खेळाडू, पुण्याच्या श्रुती कोतवालकडे स्पीड स्केटिंग संघाचे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 कृष्णा तिम्मापुरे, पुण्यनगरी धर्माबाद तालुका प्रतिनिधी👤 जी. राजरेड्डी रामरेड्डी, धर्माबाद👤 संजीवकुमार गायकवाड, पत्रकार, धर्माबाद👤 शंकर कुऱ्हाडे👤 अहमद शेख👤 राजू माळगे👤 विलास थोरमोठे👤 सुमेध पावडे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*लोहपुरुष - वल्लभभाई पटेल*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••मनुष्य स्वभावत: कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याच्या बुद्धीचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होत नाही. - लो. टिळक.*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) कान्हा राष्ट्रीय उद्यान/व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?२) कान्हा राष्ट्रीय उद्यान म्हणून कोणत्या वर्षी घोषित झाला ?३) बालकाला शिक्षणाचा हक्क सर्वप्रथम कोणत्या परिषदेने दिला ?४) 'सीमा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) ३८ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात सुरू आहे ? *उत्तरे :-* १) मध्यप्रदेश २) १ जून १९५५ ३) जागतिक बालहक्क परिषद ४) वेस, मर्यादा, शीव ५) उत्तराखंड*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🦟 डास चावल्यानं एड्स का होत नाही?🦟डास जेव्हा आपल्याला चावतात तेव्हा ते आपलं रक्त शोषून घेतात. त्यामुळे ज्याला मलेरिया झाला आहे अशा व्यक्तीला डासानं चावा घेतला असल्यास मलेरियास कारणीभूत असणारे रोगजंतू त्या रक्तातून डासांच्या शरीरात शिरतात. असे डास इतरांना चावले तर त्या चाव्यातून मलेरियाचे रोगजंतू त्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. त्या व्यक्तीला मलेरियाची बाधा होते.आपण याचा अनुभव घेतलेला असतो. तर मग असा प्रश्न पडतो, की ज्या व्यक्तीला एड्स झाला आहे अशा व्यक्तीला चावलेला डास इतर कोणाला चावला तर त्या चाव्यातून एड्सची लागण होणार नाही का? एड्स झालेल्या व्यक्तीच्या रक्तात एड्सला कारणीभूत असणारे एचआयव्ही जातीचे विषाणू वावरत असतात हे खरं आहे. म्हणून तर अशा व्यक्तीला इंजेक्शन देताना वापरलेली सिरिंज दुसऱ्या कोणाला तरी इंजेक्शन देण्यासाठी वापरली तर त्या व्यक्तीलाही एड्सची बाधा होऊ शकते. एवढंच काय, पण एड्स झालेल्या व्यक्तीची दाढी किंवा मुंडण करण्यासाठी वापरलेला वस्तरा निर्जंतुक न करता दुसऱ्यासाठी वापरला तरीही त्या वस्तऱ्याला चिकटलेल्या रक्ताच्या थेंबांमधून एचआयव्हीचा शिरकाव दुसऱ्याच्या शरीरात होऊ शकतो, तर मग तो डासांच्या चाव्यामधून का नाही होणार, हा प्रश्न म्हणूनच संयुक्तिक वाटतो. कोणतेही विषाणू परोपजीवी असतात. त्यांना जगण्यासाठी आणि आपल्या वाढीसाठी विशिष्ट यजमान पेशींची गरज भासते. एचआयव्हीचे विषाणू मानवी शरीरातल्या टी-लिम्फ पेशींना आपले यजमान बनवतात. त्यांच्या जिवावर आपली गुजराण करत ते रक्तात वाढत राहतात. अशा रक्ताचा घास जेव्हा एखादा डास घेतो तेव्हा त्यातले काही विषाणू डासाच्या शरीरात निश्चितच प्रवेश करतात; पण तिथं त्या विषाणूंना आपल्या यजमान पेशी सापडत नाहीत. डासाच्या शरीरातल्या पेशींवर ते विषाणू जगू शकत नाहीत. मलेरियाच्या रोगजंतूंच्या वाढीतला काही भाग डासाच्या शरीरातच होत असतो. त्यामुळे ते तगून राहतात. तशी परिस्थिती एड्सच्या रोग्याच्या रक्ताचा घास घेणाऱ्या डासाबाबतीत नसते. त्यामुळे डासाच्या शरीरात शिरलेल्या एचआयव्हीच्या विषाणूंची वाढ तर होतच नाही; पण डासाच्या पचनसंस्थेकडून त्या विषाणूंचं विघटन होऊन त्यांचा नायनाट होतो. त्यामुळे असा डास जेव्हा दुसऱ्या निरोगीव्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात टोचण्यासाठी एचआयव्ही विषाणू हजरच नसतात. अर्थात, अशा डासांच्या चाव्यामुळं त्या निरोगी व्यक्तीला एड्सची बाधा होण्याची शक्यताच उरत नाही.डॉ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••विषयीं ठेवुनि मन सांगति ब्रह्मज्ञान । तेणें समाधान नुपजे कदा ॥७॥ हरिदासासी पुसूं भक्तीच उपाव । तंव तयापाशीं भाव नाहीं कोठें ॥८॥ वाचेंनें सांगती नामाचा बडिवार । विषयीं पडीभर सदाकाळीं ॥९॥ ऐसें विचारितां बहुत भागलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१०॥ भयभीत जालों संसार येरझारीं । शिणलों असें भारी तारीं मज ॥११॥ नामा म्हणे आतां हिंडतां कष्टलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१२॥ ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण करत असलेले कार्य पाहून बाहेरच्या लोकांकडून होणारा विरोध तेवढा भयानक नसतो. कधी शिकायला सुद्धा भाग पाडत असते पण जेव्हा त्याच कार्याला आपल्या जवळचेच माणसं आपुलकीचा ढोंग करून विरोध करतात तेव्हा मात्र त्या विरोधाचे मानसिक तणावात रूपांतर  होत असते. म्हणून कोणाला साथ देता येत नसेल तर  विरोधही करू नये.🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *माणुसकी *संस्कृतचे महाकवी माघ निर्धन असले तरी मदत करण्यास कधीच कमी पडत नसत. त्यांच्याकडून जितकी मदत गरजूला होत असे तितकी मदत करण्यास सदैव तयार असत. एकदा कवीराज माघ आपल्या घरी शिशुपाल वध या महाकाव्याचा नववा अध्याय लिहीत असताना दरवाजावर कोणाची तरी हाक ऐकू आली. कोणी हाक मारली हे पाहण्यासाठी ते गेले असता त्यांना दारावर त्यांच्याच गावातील एक गरीब व्यक्ती उभारलेली दिसली. त्यांनी त्या माणसाला आदराने घरात बोलावले. त्याचे योग्य ते आदरातिथ्य केले व येण्याचे प्रयोजन विचारले असता तो गरीब माणूस म्हणाला," कविराज मी मोठी आशा ठेवून आपल्याकडे आलो आहे. माझ्या मुलीचा विवाह ठरला असून त्यासाठी मला धनाची गरज आहे. माझी परिस्थिती तर आपण जाणून आहातच. तरी आपल्याकडून मला जी मदत होईल ती माझ्यादृष्टीने खूप मोठी असणार आहे." महाकवींकडेही आर्थिक चणचण होती. परंतु दारी मदत मागायला आलेल्या माणसाला परत पाठविणे त्यांना योग्य वाटेना. घरात सगळीकडे शोध घेतला पण त्यांना त्या माणसाला देण्याजोगे काहीच मिळेना. शिवाय दानवीर माणसाच्या घरात मौल्यवान असे काय शिल्लक राहणार. जे होते ते त्यांनी लोकांना देऊन टाकले होते. शेवटी महाकवींचे लक्ष पत्नीच्या हाताकडे गेले. पत्नीच्या हातात सोन्यांचे कंकण होते. त्यांनी एका हातातील कंकण काढून घेतले व त्या गरीब माणसाला देऊन टाकले. गरीब माणसाने महाकवींचे आभार मानून तो बाहेर पडणार इतक्यात कविराजांच्या पत्नीने त्या माणसाला परत बोलावले व आपल्या हातातील दुसरे कंकणही त्याला दिले व म्हणाली, "मुलीच्या लग्नात एकच कंकण कसे तिला देणार तिला रिकाम्या हाताने पाठवू नकोस." या दांपत्याच्या दानी वृत्तीला गरीबाने साष्टांग नमस्कार केला.तात्पर्य – आपली परिस्थिती नसतानाही दुस-याला मदत करणे हीच खरी माणुसकी.•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🔟 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 🔟            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 03 फेब्रुवारी 2025💠 वार - सोमवार~~~~~~~~~~~~~~~~~~~समुहात add होण्यासाठी Link - https://chat.whatsapp.com/EgXNT8RopqQ82O3UfAlMy9••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष* .  🌐🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*_ या वर्षातील ३४ वा दिवस आहे_* ••••••••••••••••••••••••••••••••••••••• 🟣 *_महत्त्वाच्या घटना:_* 🟣•••••••••••••••••••••••••••••••••*१९९४: 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी* *१९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.**१९२८: 'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.**१९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.**१९१६: बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना**१८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.**१७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.* 🟣 *_जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:_* 🟣 ••••••••••••••••••••••••••••••••••••••*१९९५: गणेश बाळासाहेब निकम -- लेखक* *१९७८: धिरज पाटील (धनराज) -- कवी**१९७५: हंसिनी अरविंद उचित -- कवयित्री, सामाजिक कार्यकर्त्या,विविध पुरस्कारांनी सन्मानित**१९७५: प्रा. वर्षा एकनाथराव गायकवाड -- माजी मंत्री म.रा. तथा खासदार* *१९७३: प्रा. डॉ. गिरीश खारकर -- प्रसिद्ध मराठी गजलकार, प्रतिभावंत लेखक, प्रकाशक(मृत्यू: १७ ऑक्टोबर २०१९ )**१९६९: महेश रघुनाथ पानसे -- कवी**१९६७: गजानन निमकर्डे -- कवी* *१९६३: गंगाधर त्र्यंबक अहिरे -- कवी, लेखक, संपादक* *१९६३: अंजली चितळे -- कवयित्री* *१९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ**१९६२: प्रा. भाऊ काशिनाथ(भाऊसाहेब) गोसावी -- प्रसिद्ध कवी, लेखक* *१९६२: डॉ. जयराम काळे -- कवी, लेखक* *१९५७: दीप्ती नवल -- अभिनेत्री, दिग्दर्शक आणि लेखिका* *१९५२: नारायण गणपतराव निखाते -- लेखक* *१९५०: प्रा. डॉ. सुदाम जाधव -- आदिवासी साहित्याचे अभ्यासक तथा लेखक* *१९४५: प्रा. डॉ. रामचंद्र कामाजी क्षीरसागर -- लेखक* *१९४२: अरुण कृष्णराव हेबळेकर -- प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार**१९३८: वहिदा रहमान -- प्रसिद्ध अभिनेत्री**१९३५: नारायण बाळकृष्ण ठेंगडी -- पत्रकार, कवी आणि कथाकार (मृत्यू: २५ मार्च १९८८ )**१९३१: प्रा. चंद्रकांत भालेराव -- प्रसिद्ध कथाकार* *१९२९: मोहना -- भारतीय, गायिका,दूरदर्शन निर्माता आणि नृत्यांगना(मृत्यू :११ सप्टेंबर १९९०)**१९२७: अच्युत महादेव बर्वे -- कथाकार, कादंबरीकार(मृत्यू: १६ एप्रिल १९८२ )**१९२७: वसंत शंकर सरवटे -- ख्यातनाम महाराष्ट्रीय व्यंगचित्रकार तसेच लेखक(मृत्यू: २३ डिसेंबर २०१६ )**१९०६: अवधूत महादेव जोशी -- कथाकार, चरित्रलेखक, टीकाकार**१९००: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५ )**१८२१: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१० )* 🟣 *_मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:_* 🟣••••••••••••••••••••••••••••••••••••••*२०२४: माधवरव खाडिलकर -- ज्येष्ठ नाटककार लेखक* *२००७: मधुसूदन शंकर कानेटकर -- संगीत तज्ञ (जन्म: २६ जुलै १९१६)**२००७: हरी अनंत फडके -- संशोधक, अभ्यासक (जन्म: १३ ऑक्टोबर १९३२ )**१९९१: प्रा. कुसुमताई साठे -- लेखिका, कवयित्री, संपादिका (जन्म: १६ डिसेंबर १९२१ )**१९७९: मोरेश्वर दिनकर जोशी-- संस्थापक, व्यवस्थापक, संपादक(जन्म: २८ फेब्रुवारी १९०० )**१९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ )**१९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २८ डिसेंबर १८५६ )**१८३२: उमाजी नाईक --पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.(जन्म: ७ सप्टेंबर १७९१ )*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*_दिनविशेष या सदरातील सर्व मुद्दे हे संग्रहात्मक आहेत तेव्हा त्यात चूका नसतीलच असे सांगता येणार नाही_* *संकलन:- श्रीराम चव्हाण माजी शिक्षणाधिकारी,नागपूर🙏**मोबाईल: 9822695372* *ईमेल: chavhansk65@gmail.com*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन - शालेय परिपाठ.... समुहात add होण्यासाठी वरील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील श्रीकृष्ण देवउखलाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहन संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यभरातील शासकीय ठेकेदार येत्या 14 फेब्रुवारीपासून जाणार संपावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाही विरोध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अर्थसंकल्प 2025 मधील ठळक बाब - 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न असणारे नोकरदार वर्ग होणार करमुक्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुणे मेट्रोला अर्थसंकल्पात 837 कोटी रुपयांची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाचव्या T20 सामन्यात इंग्लंडचा 150 धावानी पराभव, अभिषेक शर्माची धुवांधार फलंदाजी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *U-19 महिला विश्वकपावर भारताने कोरले नाव, दक्षिण आफ्रिकेला हरवून भारतानं सलग दुसऱ्यांदा कोरलं महिला अंडर-19 वर्ल्ड कपवर नाव !*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक -  कुणाल पवारे 📹*📱9960358300•••••••••••••••••••••••••••••••••••••ही पोस्ट नियमित मिळविण्यासाठी आणि या समुहात add होण्यासाठी 9423625769 येथे संपर्क करावे.••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 विजयकुमार वडेपल्ली, नांदेड  👤 हंसिनी उचित, साहित्यिक👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद👤 ऍड. मल्हार मोरे, भोकर👤 अर्शनपल्ली अजय👤 सुशील कुलकर्णी👤 राजेश पिकले👤 शिवकुमार देवकत्ते👤 विश्वास मापारी👤 ओमकार पाटील चोळाखेकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  ⚧🍃  *प्रसिद्ध व्यक्तीचे पूर्ण नाव* ⚧🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*बाबाराव - गणेश दामोदर सावरकर*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••सहानुभूती गोड शब्द, ममतेची दृष्टी यांनी जे काम होते ते पैशाने कधी होत नाही. - महात्मा गांधी .*संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे**ता. हदगाव जि. नांदेड*📱9403046894••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) भारतातील सर्वात उंच पक्षी कोणता ?२) 'जागतिक पाणथळ दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) गावाचा ग्रामनिधी कोण सांभाळतो ?४) 'सुंदर' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ?५) १५० वर्षे पूर्ण झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) सारस २) २ फेब्रुवारी ३) ग्रामसेवक ४) सुरेख, छान, देखणे ५) शतकोत्तर सुवर्ण महोत्सव*संकलन :- जैपाल भै. ठाकूर*जि. प. व प्राथ. शाळा सुपलीपार, ता. आमगाव, जि. गोंदिया  📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••⭐ *ताऱ्यांचं अंतर कसं मोजतात ?* ⭐ **************************तारे आपल्यापासून कितीतरी दूर असतात. आपल्याला सर्वात जवळचा असलेला तारा म्हणजे आपला सूर्य. तोच मुळी पंधरा कोटी किलोमीटर दूर आहे. इतर तारे तर त्याच्या कितीतरी पटींनी दूर आहेत. तेव्हा त्यांच्या पर्यंतचं अंतर मोजण्यासाठी तशीच काहीतरी खास युक्ती योजायला हवी. आपण जेव्हा एखाद्या वस्तूकडे पाहातो तेव्हा आपले दोन डोळे जरा वेगवेगळ्या कोनांमधुन त्या वस्तूकडे पाहतात. त्यामुळे तिच्या दोन प्रतिमा आपल्या डोळ्यांमध्ये उमटतात आणि त्यांच्यामध्ये काही अंतर असतं. समजा आपण आपला एक डोळा मिटला आणि समोरच्या दाराच्या चौकटीच्या बरोबर समोर येईल अशा तर्‍हेनं एक बोट समोर धरलं. आता तो डोळा उघडून दुसरा मिटला आणि परत पाहिलं तर ते बोट हल्ल्याचं दिसून येईल. कारण त्या दोन डोळ्यांतल्या प्रतिमांमध्ये अंतर असतं. यालाच पॅरॅलॅक्स असं वैज्ञानिक भाषेत म्हणतात. जितकं त्या बोटाचं आपल्या डोळ्यांपासूनचं अंतर कमी तितका पॅरलॅक्स जास्त. उलटपक्षी जितकं बोटाचं अंतर जास्त तितका पॅरलॅक्स कमी. म्हणजेच कोणत्याही वस्तूचं आपल्यापासून असलेलं अंतर आणि तिच्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स यांचं एक नातं असतं. जर पॅरॅलॅक्स मोजला तर गणित करून ते अंतर शोधता येतं. जमिनीचा सर्व्हे करणारे तज्ज्ञ याचाच उपयोग करतात. पण आपल्या दोन डोळ्यांमधलं अंतरच इतकं कमी आहे की दूरवरच्या तार्‍याचा पॅरॅलॅक्स शून्यवतच असतो. दोन डोळ्यांमधलं अंतर तर वाढवता येत नाही. पण दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून जर पाहिलं तर त्या दोन प्रतिमांमध्ये काही पॅरॅलॅक्स तयार होतो. तरीही दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी पृथ्वीवरची दोन टोकंही जरी गाठली तरी ते अंतर अपुरंच पडतं. यासाठी मग पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमणाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या अलीकडून आणि पलीकडून जर आपण पाहू शकलो तर त्या कक्षेच्या व्यासाइतकं अंतर दोन 'डोळ्यांमध्ये' आपण पाडू शकतो. त्यासाठी मग वर्षातल्या दोन वेगवेगळ्या वेळी एकाच ताऱ्याच्या घेतलेल्या प्रतिमांमधला पॅरॅलॅक्स मोजून त्या ताऱ्याचं आपल्यापासून असलेलं अंतर मोजता येतं. अर्थात अशा दूरवरच्या ताऱ्यांकडे पाहण्यासाठी तसेच तेजस्वी 'डोळे' ही असणे गरजेचं असतं. ही गरज अतिशय शक्तिशाली दुर्बिण वापरून पूर्ण केली जाते.*बाळ फोंडके यांच्या 'कसं ?' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   ••• 💡 ‼ *नामावाणी*‼ 💡•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••तत्त्व पुसावया गेलों वेदज्ञासी । तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ॥१॥ तया समाधान नुपजे कदा काळीं । अहंकार बळि जाला तेथेम ॥२॥ म्हणोनि तुझें नाम धरिलें शुद्धभावें । उचित करावें पांडुरंगा ॥३॥ स्वरूप पुसावया गेलों शास्त्रज्ञासी । तंव भरले तयापाशीं भेदाभेदा ॥४॥ एकएकाचिया न मिळती मतासी । भ्रांत गर्वराशि भुलले सदा ॥५॥ पुराणिकासी पुसूं स्वरूपाची स्थिति । तंव त्यासी विश्रांति नाहीं कोठें ॥६॥  ।। संत नामदेव ।।••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🌷 आजची विचारधारा......🌷*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एकाला आपुलकी देण्यासाठी दुसऱ्याला नको त्या शब्दात विनाकारण बोलून त्याचा अपमान करणे हा माणुसकी धर्म नाही. कारण ज्याला आपुलकी देणाराही माणूसच असतो , ज्याचा अपमान होतो तोही माणूसच असतो आणि हे दोन्ही कर्म घडवून आणणाराही बोलता, चालता माणूसच असतो. म्हणून असे कोणतेही काम करू नये. ज्याच्यामुळे एखाद्या माणसाचे मन दुखावेल आणि उगाचच त्याच्या मनातून उतरण्याची आपल्यावर वेळ येईल. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷सौ. संगीता संतोष ठलाल मु. कुरखेडा जि. गडचिरोली••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मुंग्याची शिकवण*उन्हाळ्याच्या दिवसात काही मुंग्या आपल्या वारुळाजवळ बसून मिळवून आणलेले दाणे उन्हात वाळवीत होत्या. इतक्यात भुकेने व्याकुळ झालेला एक टोळ त्या ठिकाणी येऊन व दीनवाणे तोंड करून त्यांना म्हणाला, 'बायांनो, यातला एखादा तरी दाणा मला देऊन जर माझा प्राण वाचवाल तर तुम्हाला मोठं पुण्य लागेल.' हे ऐकून त्यातल्या एका मुंगीने त्याला विचारले, 'अरे, सुगीच्या दिवसात आम्ही जसं धान्य जमवून ठेवलं, तसं तू का ठेवलं नाहीस ?' टोळ त्यावर उत्तरला, 'माझा सगळा वेळ खाण्यापिण्यात आणि मौजा मारण्यात गेला. पुढे आपला चरितार्थ कसा चालेल ही कल्पनाही माझ्या मनात त्यावेळी आली नाही.' हे ऐकून मुंगी म्हणते, 'अरे, अशा रीतीने मौजा मारण्यात ज्यांनी आपले दिवस घालविले, ते पुढे उपाशी मरणार हे ठरलेलं आहे. मग आता तुझ्या चरितार्थाची तजवीज आम्ही काय म्हणून करावी बरं ?'तात्पर्य : ज्यांनी आपले तारुण्य केवळ चैनबाजीत घालविले त्यांना बहुतेक वेळा म्हातारपणी दुःख भोगावे लागल्याशिवाय राहात नाही.'आयुष्य ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी आहे.'•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏*पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~