*उपक्रम - प्रश्नमंजुषा- विषय- मराठी (व्याकरण)* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://bpegm.in/wazirx.php?id=365&user=133 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 ---------------------------------- *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
कविता - हेळसांड तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, हेळसांड मह्या जीवाची होत होती हेच तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, मनामंदी मह्या जे होतं ते आज तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, मनातलं प्रेम मह्या डोयामधी आटलं हेच तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बरं वाटलं, आजुबाजू देखता पोटातलं सार काही मह्या हेच तुले सांगावसं वाटलं तुले पाहून आज मले लय बर वाटलं......... 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*महाराष्ट्र शिक्षक पॅनल* *शिक्षक परिचय* ••••••••★★★•••••••• *MSP प्रमुख - शिक्षक परिचय* 🔹नाव - श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे 🔹शाळा व पत्ता - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोजेगाव. तालुका हदगाव जिल्हा नांदेड. 🔹शैक्षणिक पात्रता - बी.ए. डी.एड. 🔹नेमणूक दिनांक - 19 _ 11_ 2001 🔹वाढदिवस दिनांक - 29 मे 🔹लेखन - काव्यलेखन, चारोळी लेखन, कथालेखन, विविध विषयावरील तसेच प्रासंगिक लेखाचे लेखन. (वृत्तपत्रे, मासिके, विशेषांक) इत्यादीमध्ये लेखनप्रसार. तसेच एक काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. आणि आणखी एक काव्यसंग्रह (पद्य), तसेच (गद्य) या भागावरील लेखनाचे दोन पुस्तके प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. 🔹तंत्रज्ञान - ब्लॉगस्पॉटच्या, युट्युब, च्या माध्यमातून विविध शैक्षणिक उपक्रम प्रसारित करणे. 🔹शिक्षक संघटना पद - 1) म. रा. प्राथमिक शिक्षक महिला आघाडी संघ जिल्हासरचिटणीस नांदेड. 2) काव्यप्रेमी शिक्षकमंच जिल्हाअध्यक्षा नांदेड. 3) जिजाऊ ब्रिगेड कार्याध्यक्षा ता.हदगाव जि.नांदेड. 🔹पुरस्कार - गुरुगौरव आदर्श शिक्षिका पुरस्कार यासह अन्य (25) पुरस्कार प्राप्त. 🔹सामाजिक कार्य - दरवर्षी आईची पुण्यतिथी एका गरज असलेल्या शाळेस डिजिटल करण्यासाठी 10,000 (दहा हजार)रुपये आर्थिक योगदान देऊन साजरी करणे. तसेच दरवर्षी भव्य शालेय लेझीम स्पर्धेसाठी 10, 000 (दहा हजार) रुपये देणे. तसेच अनाथाश्रमास मदत करणे,शाळा रंगरंगोटीसाठी मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना व अन्य गरजूंना मदत करणे. 🔹विशेष प्राविण्य - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (शिक्षणाची वारी) , मातृभाषा सुलभक. 🔹MSP कार्य - शैक्षणिक विविध उपक्रम 🔹मोबाईल नंबर - 9403046894 ••••••••★★★•••••••• *दीपक चामे* *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* मो. 8149488888 ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*शब्द चारोळी स्पर्धेसाठी* *शब्द - हिरवळ दाटे चोहीकडे* १) रिमझिम पावसाच्या सरीचे होते आगमन वरुण राजाचे बहरती मग राने सारी हिरवळ दाटे चोहीकडे. 2 ) आषाढघन आषाढघन येतीगडे मृग जलधारेने मग बरसतीलगडे रानास गारपण येईल गडे मग हिरवळ दाटे चोहीकडे 3) नद्या, नाले, धरणे भरतील हिरवे पर्वत ,डोंगर चोहिकडे पक्षी आनंदाने गातील सुस्वर हिरवळ दाटे चोहीकडे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.* *ता.हदगाव जि. नांदेड.*
नैराश्य नैराश्य घेऊन जीवनात कधीच न जगाव माणसानं होऊन व्यक्त दिलखुलास, बोलून मनमोकळे जगून घ्याव माणसानं प्रश्न आपल्या जीवनातले असले जरी सोपे अवघड तरी, देऊनी उत्तर, करुनी संघर्ष जगून घ्याव माणसानं अश्रू डोळ्यातुन ओघळणारे पुसून जगाव माणसानं धुमसणारे दुःख मनातलं सांगून जगाव माणसानं जेव्हा हार होते तेव्हा यशाचं महत्व जाणून घ्याव माणसानं जिंकण्यासाठी कधीकधी मग हारुन जगाव माणसानं वाट्यास आलेल्या दुःखासही थोडस हसून घ्यावं माणसानं मृत्यू जरी अटळ सत्य तरी मागे चांगले काहीतरी उरून जगाव माणसांन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे.
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *दिनांक - 27 जून 2020 वार - शनिवार* *आजची प्रश्नमंजुषा विषय - गणित पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4067778 --------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *✍वाचा. व वहीत लिहा📚* *🔹आलंकारिक शब्द🔹* *🔸ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा* *🔹दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे* *🔸पाताळयंत्री - कारस्थान करणारा* *🔹खुशालचेंडू - चैनीखोर माणूस* *🔸वाहती गंगा - आलेली संधी* ---------------------------------- *✍संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे.
*आकर्षण* किती मौज दिसे पहा तरी जेव्हा विमान उडते आकाशी आकर्षण हे त्याचे बघण्याचे मनास देती हर्ष लहरी जाऊन विमानातून कधीतरी डोंगर,राने, ओहळ, तटिनी आणि खोल खोल दरी पहावे कुठे सागर लहरी आकाशातील ग्रह नक्षत्रांच्या घ्याव्या भेटी मग, अपूर्व शोभा ही गगनीची जाऊन पहावी विमानात बसुनी सर्वांनी. किती मौज दिसे पहा तरी जेव्हा विमान उडते आकाशी 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
लेख.... *समाज क्रांतिकारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज* *" सामाजिक कार्याची अखंड* *अहोरात्र घेतली पणती हाती* *अस्पृश्योद्धार कार्य करुनी,* *स्त्रीशिक्षणास दिली गती.”* सर्व सद्गुणांचा उपासक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे त्यांचे वडील. यशवंतराव जयसिंगराव घाटगे हे त्यांचे मूळ नाव होते. पुढे यशवंतराव हे योगायोगाने छत्रपती झाले. कोल्हापूरच्या महाराणीसाहेबांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले आणि त्यांचे नामकरण शाहू छत्रपती असे केले. छत्रपती शाहू महाराज हे गोरगरिबांचे, दीनदलितांचे राजा होते, विद्वानांचे चाहते होते, कलावंतांचे ञाते होते, समाजसुधारकांचे दाता होते, शिक्षणाचे भोक्ते होते, स्थिर चित्ताने धोरण आखणारे होते. शाहू महाराज हे केवळ सामाजिक सुधारक नसून ते राजकीय सुधारकही होते. धोरणी आणि मुत्सद्दी होते. दूरदर्शी व खऱ्या लोकशाहीचे ते जनक होते. उच्चवर्णीय समाजाच्या गुलामगिरीतून गरीबांना मुक्त करणारे सत्ताधीश होते. शाहू महाराजांचे धैर्य , उत्साह व शक्ती अमर्याद होती. समाजातील प्रस्थापितांशी समरस होण्यापेक्षा समाजातील अपंगांशी, दलितांशी आणि पददलितांशी ते समरस होत. दलित व पददलित समाज यांची अनेक बंधनातून मुक्तता करणे हेच त्यांच्या जीवनातील एकमेव ध्येय होते.' मानवी जीवनाविषयी अत्यंत सहानुभूती' हे शाहू महाराजांचे ब्रीदवाक्य होते. खरोखर ते एक महान सामाजिक पुरुष होते. छत्रपती शाहू महाराजांचे मन हे संवेदनशील होते. त्यांच्या न्यायाच्या जाणिवा प्रगल्भ होत्या. अन्यायाला, शोषणाला बळी पडलेल्या लोकांविषयी त्यांना सहानुभूती होती. शाहू महाराजांचे अंतःकरण त्यांच्या विकासासाठी तिळतिळ तुटत होते. छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे भावनिक पातळीवरचे वेगळेपण तर होतेच, पण दीनदुबळ्यांना माणसात आणण्याचे मार्गही त्यांना दिसत होते.2 एप्रिल 1894 साली त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली होती. आणि आपल्या सत्तेचा उपयोग गोरगरिबांना व्हावा यासाठी त्यांनी आयुष्यभर जिवाचे रान केले. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन दिले, शिवाय स्त्रियांच्या नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करणारे अनेक कायदेही अमलात आणून स्त्रियांची समाजाकडून आणि कुटुंबाकडून होणारी पिळवणूक थांबविण्याचा मोठा प्रयत्न केला.स्त्री जातीच्या संरक्षणाचे कायदे करून त्यांनी स्त्रीमुक्ती चळवळीस हातभार लावला.बहुजन समाजाचा विकास केला. तळागळातील लोकांना मायेचा स्पर्श दिला. बहुजन समाजासाठी न्यायावर आधारलेला सृष्टीची निर्मिती करून त्यांनी एक नवीन समाज उभा केला. थोडक्यात सांगायचे म्हणजे शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे बहुजन उद्धाराचे कार्यपरंपरा समर्थपणे पुढे नेली. शिक्षण हीच त्यांनी सर्व सामाजिक सुधारणांची व प्रगतीची जननी मानली. देशाची प्रगती करावयाची असेल तर शिक्षण म्हणजेच विद्या घेणे महत्त्वाचे आहे. " शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे". असे त्यांचे ठाम मत होते. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे त्यांचे मत होते. समाजातील मागासलेल्या वर्गाची बौद्धिक गुलामगिरी नष्ट होण्यास त्यास किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या सुधारणेचा त्यांनी जोरकस पुरस्कार केला.छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील मागासलेल्या वर्गांना प्राथमिक शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. समाज समृद्ध व बलवान करण्यासाठी बहुजन समाजातून उत्तम शेतकरी, उत्तम व्यापारी, उत्तम उद्योगपती, उत्तम सैनिक निर्माण झाले पाहिजेत आणि त्यासाठी शिक्षणगंगेचे पाट खेड्यापाड्यातील गोरगरीब जनतेच्या दारापर्यंत नेले पाहिजे असे शाहू महाराजांना वाटत होते. सामान्य माणसांना प्राथमिक शिक्षणाच्या बळावर गरुड झेप घेता यावी म्हणून ते धडपडत होते. ग्रामीण भागातील मुलांना प्राथमिक शिक्षणानंतरचे माध्यमिक व उच्च शिक्षणाचे फायदे मिळावेत म्हणून त्यांनी ठीकठिकाणी वसतिगृह स्थापन केले. शिक्षणाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच त्यामागील त्यांचा मुख्य हेतू होता. प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारास महाराजांनी जे कार्य केले याला तोड नाही. *'ज्योतीबासवे रचिला पाया l शाहू झालासे कळस'll* असेच गौरवाने म्हणावे लागेल. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराजांनी प्रजेच्या उत्कर्षासाठी अनेक नवनवीन कायदे केले. दळणवळणात सुधारणा व्हावी यासाठी महाराजांनी अनेक रस्ते बांधले, पूल बांधले, छत्रपती शाहू महाराजांना कुस्त्यांची, नाटकाचीही फार आवड होती. म्हणून त्यांनी कुस्त्यांचे आखाडे निर्माण केले. महाराजांचा उदारपणा सर्वश्रुत असल्याने अनेक नाटक कंपन्या महाराजांच्या आश्रयाला गेल्या. महाराज अनेक ठिकाणी या कंपन्यांच्या प्रयोगाची व्यवस्थाही स्वखर्चातून करत. महाराजांनी 'राधानगरी' धरणाची निर्मिती केली., वेठबिगारी पद्धत बंद केली. आपले राज्य आदर्श असावे, तळागाळातील लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराज नेहमीच दक्ष असत .रयतेचा राजा म्हणजे काय हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवणारा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज.अशा या महान लोकोत्तर व्यक्तीमत्वास त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 👏👏🙏🙏💐💐 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे (सहशिक्षिका) ता.हदगाव जि.नांदेड.
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *दिनांक - 26 जून 2020 वार -शुक्रवार* *आजची प्रश्नमंजुषा विषयः मराठी (व्याकरण) पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4056180 ---------------------------------- *ही पोस्ट आपण आपल्या पाल्यापर्यंत व* *विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *✍वाचा. व वहीत लिहा.*📚 *आलंकारिक शब्द* *अक्षरशत्रू - निरक्षर ,अडाणी* *कळसुत्री बाहुले - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा* *चर्पटपंजरी - निरर्थक बडबड* *भाकडकथा - बाष्कळ गोष्टी* *सांबाचा अवतार-अत्यंत भोळा माणूस* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ---------------------------------- *संकलन :- प्रमिलाताई सेनकुडे
*उपक्रम - सामान्यज्ञान* *प्रश्नमंजुषा* *दिनांक - 25 जून 2020 गुरूवार* *आजची सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.* ---------------------------------- http://testmoz.com/4053486 ---------------------------------- *ही पोस्ट आपल्या पाल्यापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे.* ---------------------------------- *टीप :- submit केल्यानंतर सर्व प्रश्न-उत्तर आपल्या वहीत लिहून ठेवावे.* 📚📚📚📚📚📚 *✍वाचा. व वहीत लिहा.📚* *🔸आलंकारिक शब्द🔸* *मेषपात्र - बावळट* *गाजरपारखी - कसलीही पारख नसलेला, मूर्ख* *अरण्यरुदन - ज्याचा उपयोग नाही असे कृत्य* *कर्णाचा अवतार - उदार मनुष्य* *कूपमंडूक - संकुचित वृत्तीचा* *〰️〰️〰️〰️〰️〰️〰️* *✍संकलन* *प्रमिलाताई सेनकुडे.* *जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.*
वेसण जीवापाड जपून आई बांधते मुलास वेसण उच्चशिक्षित व्हावी त्याने हीच प्रार्थना करते मनोमन स्वतः राहून ती उपाशी घास मुलास भरविते लहानपणीपासूनच ती त्यावर चांगले संस्कार करिते बाळासाठीची तिची तगमग वेड जीवास लावते जीवापल्याड जपुनी त्यास सुजान नागरिक बनविते वेसण ठेवून मनास इच्छा ती सावरते पोराबाळासाठी मात्र आयुष्य ती झिजविते. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
वेसण सांग ताई ? सांग दादा ? वेसण कुठवर घालू मी अंधश्रद्धेत गुरफटलेल्यांना आवर कुठवर घालू मी सांग ताई ? सांग दादा? वेसण कुठवर घालू मी अज्ञानाचा कळस चढविणाऱ्याना ज्ञानाचा प्रवाहात कुठंवर आणू मी सांग ताई ? सांग दादा ? वेसण कुठवर घालू मी रुढी परंपरेने चाललेल्या प्रथेला सावर कुठंवर घालू मी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*आषाढघन* आषाढघन आषाढघन येती मनालाही आनंद मिळून रानीवनी जाती बरसून तापलेल्या धरतीस सुख देती आषाढघन आषाढघन येती मृगाच्या जलधारेने बरसुनी रानास गारपण देऊनी इंद्रधनुष्यासही खुणावती आषाढघन आषाढघन येती सारेजण शेतकामाची मग भराभर सुरुवात करती बळीराजा अंतःकरणी सुखावती आषाढघन आषाढघन येती प्रेमपाखरेही बेधुंद होऊन तुझ्यासमवेत गाणी गाती मोर पिसारा फुलवूनी नाचती आषाढघन आषाढघन येती आषाढघन आषाढघन येती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
चित्र चारोळ्या..... 1) लहानपणीची मैत्री, मोठेपणीही जपू जातीभेद विसरून सारे एकतेन राहू २) हातात हात घेउन आईचा निघाल्या दोघी मैत्रिणी घराकडे निरागस चेहरे त्यांचे नजरा मात्र एकमेकीकडे 3) तुझ्या माझ्या मैत्रीचे प्रतीक आहे एकतेचे शिकवण सर्वधर्मसमभावची जोपासुया एकात्मतेची 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
ग्रहण कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडुनी, बळीराजाची होते हानी ग्रहण हे त्याच्या मागचे सुटणार का कधी ?कोण जाणी? मेहनत इतकी करुनी जगण्यास नसते त्यास अन्नपाणी जगाच्या या पोशिंद्याची किती? केविलवाणी ही कहानी घाम गाळूनी ,कष्ट करूनी शेतात राबराब राबतो डोंगर कर्जाचा घेऊन मरण यातनेत तो जगतो कधी येईल पीक पाणी मिळेल या पोटास भाकर चटणी हाती पडेल का पैका नानी का? होईल व्यापाऱ्यांची मनमानी झोपडीपाशी बसुनी, विचार तो करतो, प्रश्न मनाला भेडसावणारे डोळ्यात अश्रू आणून , दुःखाने वर पाहत आकाशास सांगतो 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*बा तू होतास तेव्हा !* बा तू होतास तेव्हा ! सुरू झाली माझी शाळा बा तुझ्यामुळेच मला लागला शाळेचा लळा बा तू गेला अन् संपलं सारं काही आता कुणापुढे हट्ट करू मज उरले ना काही ना राहिली मायची सावली ना राहिले बा तुझे छत्र स्पदंनातील वेदनांनी मग भरून येतात माझे नेत्र 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*दिव्यता* देशाच्या सन्मानासाठी समाजाच्या कल्याणासाठी ज्ञानाचा मंत्र आपण जपू शिक्षणाची दिव्यता जाणून घेऊ अज्ञान हाच ओळखून दुर्गुण नको त्याची पुन्हा गुणगुण ज्ञान हाच श्रेष्ठ सद्गुण त्यातच आहे मानवी कल्याण ज्ञान मिळवून साधूया प्रगती मिळेल विकासास गती धरावी कास शिक्षणाची हाती होईल मग मानवाची उन्नती 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे.*
वास्तवता अंतरंगातील भावना ओठापर्यंत येतात,परंतु वास्तवताचं भान ठेवून हळूच त्या निघून जातात.... भावनांचे हिंदोळे, मनी झुलतात नाद माझ्या अंतरीचा कानी तुझ्या ते सांगतात ..... व्यक्त करेन भावना, परंतु साद तुझी असावी, मुकेपणाच्या भावनांची ओंजळ मग सावरता यावी..... नात्यातील जिव्हाळा असाच कायम राहावा, नयनातील अश्रुंना आधार तुझा असावा.... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
झुळूक मी मनी आज भाव माझ्या आले झुळूक मी व्हावे वाऱ्यासंगे गडद धुक्यातून जावे अन् राहावे तृणपात्याचा दवबिंदूसंगे मनी आज भाव माझ्या आले रात्रीच्या अंतरंगी डोलावे स्वप्नरंग मनीचे मनी पहावे अंधारातही हर्षुन जावे मनी आज भाव माझ्या आले हिरव्यागच्च तरुवर जावे गाणं कोकिळेचे गावे अन् स्वरास्वरात भावचकोर व्हावे मनी आज भाव माझ्या आले मनी आज भाव माझ्या आले 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
स्पर्धेसाठी चारोळी विषय: वाऱ्यावर हलते रान 1) सुगंध मातीचा घेऊनी वाऱ्यावर हलते रान आकाशातील टपोरे थेंब सृष्टीचे सुरेल गायील गाणं 2) चिंब पावसाच्या सरीने मन माझे भिजून जाते वाऱ्यावर हलते रान भान माझे हरपून जाते 3) रखरखत्या उन्हातही वाऱ्यावर हलते रान गूज मनीचे सांगून व्यथा अंतरीची जाण 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*येती पावसाच्या सरी* येती पावसाच्या सरीवर सरी आनंदून जाईल धरती सारी येती पावसाच्या सरीवर सरी वाहती नद्या-नाल्या दूथरी बोलू लागती पशु-पक्षी सारी चोही बाजू हिरवळ पसरी येती पावसाच्या सरीवर सरी रान दिसती हिरवी हिरवी ओल्या मातीतल्या गंधातुनी सुगंध पसरी मंद-मंद वाऱ्यातूनी येती पावसाच्या सरीवर सरी पोरं खेळती बागडती पाण्यातही भिजती, नाचती अंगणात आनंदाने सारी येती पावसाच्या सरीवर सरी मोर नाचती पिसारे फुलवुनी झाडी,वेली रानमाळातुनी फुल बहरती रंगारंगातुनी येती पावसाच्या सरीवर सरी पेरणी करती मग शेतकरी पिके डोलारती रान सारी नांदेल मग लक्ष्मी घरीदारी येती पावसाच्या सरीवर सरी आनंदून जाईल धरती सारी 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
मेघ दाटले जगण्या स्वस्थ आणि शांत जीवन करावे पर्यावरणाचे रक्षण घ्यावी शुद्ध आणि स्वच्छ हवा सुखी जीवनाचा हाच मंत्र असावा नका तोडू वृक्ष आणि जंगले मग दाटतील मेघ नभातले पृथ्वीचे संतुलन राखता येईल तरच मानवी जीवन जपता येईल मेघ दाटले उंच नभातले बरसल्या मग पाऊस सरी हिरव्या शालूने धरती सजली न्हाऊन निघाल्या झाडी वेली पानाफुलांच्या भरजरीचा दिसतो कसा हिरवा साज पाहुनी मज मला कळेना सृष्टीचा हा नवा साज 〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
*बेधुंद क्षण* घाव वेदनेचे सोसून घे आता...... उदासलेल्या वाटेवर चालून घे आता..... बेधुंद क्षण ते, जपुन ठेव आता...... नाते अपुलेच आपुल्या मनाशी जोडून घे आता.......... उजाडलेल्या दिसाचा संदेश ऐक आता...... तळपत्या सूर्याचे दाह सोस आता...... संवेदना मनीची जपून ठेव आता...... जगणे ते चकोराचे सोडून दे आता..... खोल सागराच्या अंतरीस जाण आता..... निःशब्द किनाऱ्याशी बोलून घे आता...... स्तब्ध तुझ्या मनातील भाव ओळखून जगत रहा, तू आता..... 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
नीरव शांतता गडद अंधार्या रात्री चमकतो काजवा लखलखणारा नीरव शांतता भासे चोहीकडे उजेड पडे त्याचा न्यारा रात्र संपता जाईल कुठे? प्रश्न हा मजला पडे देह त्याचा चिमुकला नजरेस माझ्या न पडे चढुनी डोंगर घ्यावा शोध अफाट त्या रानीवनी...... रात्र संपता चमकेल का?तो गडद अंधारातूनी........ लखलखणारे रूप त्याचे अंधारातही भारी शोभणारे टिपून घ्यावे प्रसंग सारे निसर्गसौंदर्य हे रेखाटणारे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
नीरव शांतता गडद अंधार्या रात्री चमकतो काजवा लखलखणारा नीरव शांतता भासे चोहीकडे उजेड पडे त्याचा न्यारा रात्र संपता जाईल कुठे? प्रश्न हा मजला पडे देह त्याचा चिमुकला नजरेस माझ्या न पडे चढुनी डोंगर घ्यावा शोध अफाट त्या रानीवनी...... रात्र संपता चमकेल का?तो गडद अंधारातूनी........ लखलखणारे रूप त्याचे अंधारातही भारी शोभणारे टिपून घ्यावे प्रसंग सारे निसर्गसौंदर्य हे रेखाटणारे 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
हुरहुर पशु,पक्षी,प्राणी, माणसही जीवन हे सगळेच जगत असतात मेल्यावरही पुरतात आणि जळतात पण मरूनही काही कायम उरतात निस्वार्थीपणाचा संकल्प मनात ठेवून जनसेवे जीवन आपुले झिजवितात मानवी कल्याण जे साधतात तेची जगी स्मरणात राहतात चांगली वागणूक, चांगला विचार सोडून खऱ्या अर्थाने जे जातात आपण मागे काहीतरी केल्याची हुरहुर जनास देऊन जातात. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
चित्र चारोळी - स्पर्धेकरिता (दि.१४-०६-२०२०) 1) कसे फेडू उपकार तुझे सागरा मुक्तपणे मी जगण्यास शिकले दुःखास देऊन हुलकावणी मी सागर किनारी हसण्यास शिकले 2) सागराच्या उसळती लाटा नभी पावसाच्या बरसतील धारा हसत खेळत चालत पायवाटा छत्री होईल मग सहारा 3) सागर किनारी जाऊनी मनाला भिजावंसं वाटतं मग भावनांना शब्दरूपी छत्रीत बसवावसं वाटतं. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*ऐनेमहाल* मुलगी आहे म्हणून कोणी दूर नका सारू तिला ऐनेमहाल नका बांधू तिच्यासाठी, पण जन्मास येऊ द्या तिला मोठेपणी होईन ती मोठी हुशार आणि शिक्षणही घेईल फार बनेन हो तुमचा सर्वांचा आधार प्रेमाने सांभाळेल सर्व घरदार जबाबदारी पूर्णत्वास ती नेईन दिलेले कार्य जिद्दीने सांभाळेन स्वकर्तृत्वाची ठेवून ती जाणं स्वीकारेल सर्व ती आव्हान झेप उंच उंच घेऊन ती कष्टाने यशाची शिखरं गाठेन आई- वडीलास ठेवून सुखाने ऐनेमहाल ती त्यांच्यासाठी बांधेन 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
*नामशेष* हरवली होती नीज डोळ्यांची नामशेष उरले स्वप्न ते फक्त अंतरीतून साचून शल्य सारी नीनादूनी होतं होते मी मुक्त नयनांचे गुपित हे सारे काळजातले कंपन असते आसुसलेल्या दोन जीवांच्या हृदयातले ते स्पंदन असते तिळतिळ सारखं तुटत असत मन गाभारा बोलत असते जग हे सारे विसरून स्वप्न नेत्रीचे फुलत असते 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
*लक्षवेधी* रूप धरतीचे पाहुनी झुरतो दूर गगनीचा चंद्र बिचारा लक्षवेधी चांदण्या पाहतात सृष्टीचा सुंदर साज सारा रजनी विखुरले टिपूर चांदणे आकाशी प्रकाशला मंडप जसा वसुंधरेचा फुले पिसारा गगनी दुमदुमला नाद जसा दूर हिरवळ त्या डोंगरकपारी वाहत जाते सरिता वळणावरी जलगंगेचा हा शांत किनारा सुगंध पसरवितो धुंदीत वारा जोडूनी कर अधीरतेने मन हर्षाने फुलत असतं निसर्गाचे हे सौंदर्य पाहुनी क्षणोक्षणी सुखावत असत. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
संस्कारमूर्ती परमपुज्य साने गुरुजी ( जन्म - २४- १२- १८९९) ( मृत्यू - ११-०६- १९५०) 'खरा तो एकची धर्म l जगाला प्रेम अर्पावे'l हे गोड गाणे पूज्य साने गुरुजींनी लिहिलेले आहे. या गीतातून गुरुजींनी जगाला संदेश दिला आहे तो किती अर्थपूर्ण आहे! हे आचरणात आणल्यावरच जाणवेल. आपण साऱ्यांनी गुरुजींच्या संस्कार पथावरून वाटचाल केली तर आपले आयुष्य उजळून जाईल. 'मेणबत्तीप्रमाणे जळावे आणि दुसर्याला प्रकाश देत स्वतः जळून जावे;' जीवनाचे असे वेगळे ध्येय मानून प्रत्यक्षात असेच जीवन जगलेले परमपुज्य साने गुरुजी म्हणजे माणुसकीचा धर्म जोपासणारा एक थोर संतपुरुष होय. पूज्य सानेगुरुजी उर्फ पांडुरंग सदाशिव साने यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पालगड येथे २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. त्यांची आई यशोदाबाई यांनी त्यांच्यावर उच्च जीवन मूल्यांचे संस्कार केले. आपल्या आई विषयी कृतज्ञता व्यक्त करताना श्याम म्हणतो ' आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारी तीच'. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु ,आई कल्पतरु . तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघायला, प्रेमळपणे बोलायला, तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे तर गाई गुरांवर, फुलपाखरांवर ,झाडा झाडांवर, प्रेम करायला तिने ते मला शिकवले. आईचे प्रेम जेथे असेल, ती झोपडी राजराजेश्वरचा ऐश्वर्याला ही लाजवील, हे प्रेम जेथे नाही ,ते महाल व दीवानाखाने म्हणजे स्मशाने होत. एवढं उत्कट प्रेम गुरुजींच्या हृदयात आईविषयी होते. आईच्या बोलण्यातून श्यामच्या मनाला संस्काररुपी शिकवण मिळत होती. समाजाची कामे करणारी माणसे देवाला प्रिय असतात. कोणी हीन - दिन,कोणी श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो, सगळेच समान असतात, अशा संस्कारांनी गुरुजी घडले होते. खादीचा कुर्ता व धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी अशी त्यांची साधी वेशभूषा असे. साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले व सर्वांवर भरभरून प्रेम करणारे साने गुरुजी म्हणजे मातृप्रेमाचा मंगलमय साक्षात्कारच. आईच्या प्रेमाची किंमत गुरुजीच्या मनाला समजलेली होती म्हणूनच आई आणि आई स्वरूप माऊलीच्या प्रेमावर अपार भक्ती करणार्या साने गुरुजीची तीन दैवत फार प्रिय होती. जन्म देणारी जन्मदाती आई, आपले पालन पोषण करणारी धरणीमाता आणि जन्मभूमी म्हणजे राष्ट्रमाता. या दैवतावर गुरुजींचे आतोनात प्रेम व भक्ती होती. पूज्य साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वात किती व्यक्तिरेखा दडलेल्या होत्या ते ईश्वरालाच ठाऊक. गुरुजी लेखक होते, कवी, शिक्षक आणि सेवाभावी कार्यकर्ते होते. लोकसाहित्याचे संग्राहक होते. किसान मजुरांच्या चळवळीचे संघटक, प्रभावी वक्ते, दीन -दलितांचे अश्रू पुसणारे जिवलग, आंतर भारतीय प्रवक्ते या रूपात गुरुजी सर्वत्र समाजात वावरले. “ एक परार्धांश गांधी, एक परार्धांश रवींद्रनाथ, एक परार्धांश रामकृष्ण ही गुरुजींची आदर्शवत आहेत. गांधीजींची सेवावृत्ती, रवींद्रनाथ टागोरांची कवी वृत्ती आणि रामकृष्णांची भक्ती असे मिश्रण माझ्यात आहे. हात सेवेत राबवावेत, ओठ एखादे गोड गाणे गुणगुणत असावे, आणि भक्तीने सर्वांविषयीच्या प्रेमाने हृदय भरलेले असावे. ह्या तीन माझ्या क्षुधा आहेत.ह्या तीन वृत्ती समाधान पावल्या की मी समाधानी राहीन असे गुरूजी म्हनत असे. गुरुजींनी जे कार्य स्वीकारले त्या कार्याला उदात्ततेचे स्वरूप होते. दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहण्यासाठी सदैव तत्पर असायचे. त्यासाठी ते तन -मनाने अपार कष्ट करायचे. आपल्याजवळ जे जे आहे ते सर्वस्वी दुसऱ्याला देऊन टाकण्याची वृत्ती गुरुजींच्या ठायी होती. *'उक्ती आणि कृती'* यात कधीच फरक पडू द्यायचा नसतो. ही शिकवण गुरुजींनी आपल्या वागणुकीतून दिली आहे.दीन दुबळ्यांनविषयी अपार करुणा बाळगणारे मन सर्वांनाच लाभावे म्हणजे जगातील दुःखे आपण कमी करू,शकतो, असा विश्वास साने गुरुजींनी दाखविलेल्या 'खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे' या ओळीवरून यावा आणि आपल्याही मनाला निश्चितपणाने वाटत राहील की, गुरुजी चा सात्विक प्रेमाचा धर्म आपणही अंगीकारला पाहिजे. अशा या महान मायेच्या करुणासागर आत्म्यास व क्रांतिकारी गुरुजीस कोटी कोटी वंदन. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
कोनाडा पोटाच्या भुकेपायी व्याकूळ पिले पाहती मायची वाट घरट्यात पंखात कधी आणिन दाना मग होईल कधी चिवचिवाट सांजसकाळ चिव चिव होती घरट्यात गजबज दिसती उन्ह,पाणी, गारव्यात दिसे माय पिलास कवेत घेऊन बसे झाडावरचा हा कोनाडा असे काडी काडी बांधून घरटा दिसे येता-जाता न्याहळत ती पिलांसाठी जीव ओतीत असे 〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
प्रज्ञाशोध परीक्षा पुणे जिल्हा 1) पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा कोणत्या वर्षी पासून सुरू झाली आहे? 1) 1995 2) 1996 3) 1997 ✅ 4) 1998 2 ) पुणे नागरी संकुल हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे नागरी संकुल आहे? 1) पहिल्या 2) दुसऱ्या ✅ 3) चौथ्या 4) आठव्या 3) ' विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोणत्या गावी आहे? 1) भीमाशंकर 2) सासवड 3) आर्वी ✅ 4) राजगुरुनगर 4) राष्ट्रकूट, राजवटीत पुणे या गावाचा कोणत्या नावाने उल्लेख केला जाई? 1) पुण्य 2) पुणेरी 3) पुणे 4) पुनवडी ✅ 5) पुणे जिल्ह्यात पौंड येथे कोणते धरण आहे? 1) जायकवाडी धरण 2) भाक्रानांगल धरण 3) मुळशी धरण ✅ 4) राधानगरी धरण 〰️〰️〰️〰️〰️〰️ संकलन प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
आतुरता दोन नात्यातील संगम असा मनामनातील साधलेला संवाद जसा सहवासात झालेली आत्मीयता तुझ्या येण्याने लागलेली ती आतुरता हृदयात आहे फुललेली एकता प्रीतीची अशीच असते सांगता काही क्षणात जोडलेले प्रेमाचे बंधन माळेतील फुलात फुल जसे ठेवले गुंफून सुखदुःखात एकमेका दिलेली ती साथ अनेक संकटे आली असता करुनी मात असाच असतो प्रीतीचा या मिलाप बांधलेल्या दोन जीवांचा संसाररूप 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
शब्द चारोळी स्पर्धा चारोळ्या 1) मनात दाटलेल्या आठवणीचा भाव कसा मी व्यक्त करू जगणे कठीण झाले आता सांग कसा मी तुला विसरू 2) या जगात स्वतःच स्वतःला सावरायचं असतं, जगणे झाले कठीण तरीही, सोबत कोणी नाही म्हणून रडत बसायचं नसतं. 3) तडकलेच जर ह्रुदय कधी असंख्य यातना होतील मनी जगणे कठीण झाले तरी मज उमजतील भाव आंतरमनी 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
मोत्याचं दान नभा नभा कधी बरसशील तू कडक उन्हाच्या लाहीलाहीने तप्त झालेल्या या धरतीला कधी विसावा देशील तू मनालाही आनंद मिळतो तुझ्या त्या थेंबथेंब येण्याने कासावीस झालेला जीव थंडगार होतो पावसाने लवकर पेरणी कराया रानी बळीराजा वाट बघतोया नभांगणी शेतातील कामाची सुरुवात होते तुझ्या प्रत्येक सरींनी बी - बियाणांची करून पेरणी भरतील मग कणसात दाणी मोत्याचं दान तू देवूनी बळीस पोटासाठी घास मिळेल प्रत्येकास 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
*रोज एक लेख लिहिण्याचा अनुभव* *"साहित्याच्या भूमिवर मी* *पेरली शब्दांची बिजं,* *रोज एक लेख लिहूनी* *फुलवली शब्दांची बाग”* लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की, त्याचं सोनं होतं असं म्हणतात. तसंच आपल्या जीवनाला शब्दांचा स्पर्श झाला की त्याचेही शब्दरूपी सोन होईल. आणि असा परीस मला साहित्य रूपातून आदरणीय येवतीकर सरांच्या रूपाने मिळाला आहे. साहित्य सेवक असलेले येवतीकर सर त्यांचे अनेक लेख, इ बुक, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. दुसऱ्यांच्या भल्यासाठी झिजाव कसं? दुसऱ्यांना मोठे कसे करावे ? प्रामाणिकपणे आपण आपले काम कसे करावं. हे सर्व त्यांच्या मध्ये असलेले आदर्श गुण पाहायला मिळतात.असे साहित्याची आवड असणारे नासा सरांचे खूप खूप अभिनंदन. *'नादर साहित्य' लिहीत* असलेले नासा सर. साहित्य सेवक समूह तयार करून नासा सरांनी आमच्यासारख्या नवशिक्यांना लेखनाची संधी उपलब्ध करून दिली. रोज एक नवा लेखाचा विषय देऊन सर्व साहित्यिकांना प्रेरित करून प्रोत्साहन देऊन लिहिण्यास प्रवृत्त करत होते. ते पण दहा ते पाच या वेळेतच. म्हणजे बघा वेळेचेसुद्धा पालन करून वक्तशीरपणा सुट्टीच्या काळातही ठेवला. खरं तर लाॕकडाऊन सुरू होता. आपला वेळ कसा जाईल घरातल्या घरातच राहून किती कंटाळवाणे होऊ ही कल्पनाच न केलेली बरी. परंतु अशा या परिस्थितीत नासा सरांनी लेखणीचे कार्य सुरू ठेवले माझ्यासारख्या सर्वांना प्रवृत्त केले. मी हा समूह जॉईन केला तेव्हा पाच लेख पूर्ण झाले होते. त्यानंतर मी समूहात आले. पहिल्याच आठवड्यात माझा फक्त एकच लेख लिहिला गेला. परंतु त्यानंतरच्या आठवड्यापासून मी सतत आज पर्यंत *(41)* लेख लिहिले. माझ्या लेखनिस बहर मिळाली ते सरां मुळेच.माणसाला आवड असली की सवड मिळते आणि सवड काढून मी रोज (प्रत्येक आठवड्यात) सात लेख लिहायचे आणि आठवड्याचे मानकरी व्हायचे ही पर्वणी माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली. उद्या कोणता विषय मिळेल हे ही मी स्वतःच्या मनाला विचारत असे. मी शब्दांच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचले. माझ्या जीवनाचा हा शब्दकमळांचा मळा फुललेला पाहून माझ्या मनाच्या गाभार्यात शब्दांच्या अंतरंगातील अर्थ सौंदर्याचा सुगंध सुटला आहे. माझं मन त्या शब्द सुगंधाने धुंद झालेलं आहे. आता त्या शब्दांशी माझी मैत्री जमली आहे. ही शब्दांची मैत्री कधीच न तुटावी आणि हा साहित्याचा समूह कधीच न बंद व्हावा .असे मला मनोमन वाटते. शब्दाचे हे दालन कधीच न संपावे, व बहरलेल्या लेखणीचे सामर्थ्य त्यातून फुलावे.व मला साहित्य सेवेची सदैव पुजा करण्यात यावी.हीच आशा मनी ठेवून ह्या फुलवलेल्या शब्दमळ्याचे दालन सर्व वाचकप्रेमींना वाचण्यासाठी मिळावे हीच सदिच्छा. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
अश्रू नजर जरी तु लपवलीस तरीही मज दिसतात नेत्रातील तुझ्या ते अश्रू अबोल प्रित तुझीही सांग कसा मी विसरू वेदना झाकतेस तू मनातल्या तरीही त्या समजतात मला दुःख तुझ्या त्या काळजातले घाव तुझ्या त्या हृदयातले सोसुनी सांगतात मला अबोल तुझ्या ह्या प्रीतीचे भाव मज मनी उमलतात विरहाचे तू देऊनी दान सतत वाहे अश्रू नयनातून हाच संदर्भ मिळे प्रीतीतून 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*बेरोजगारी एक भीषण समस्या* आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात बहुसंख्य लोकांचे पोट शेतीवर अवलंबून आहे. पण आजही बहुतांशी लोक अजूनही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. ती पूर्णता बेभरवशाची आहे. अपुरे उत्पन्न तेही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेले. त्यामुळे शेती वरील माणसे ही बेकारीच्या झुंडीत सामील होताना आज आपल्याला पाहायला मिळते. आज यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. एक यंत्र अनेक माणसाचे काम करते. त्यामुळेही बेकारीत भर पडलेली पाहायला मिळते. बेरोजगारीचा प्रश्न उभा राहतो त्याला आणखी एक कारण आहे.लोकसंख्यावाढ. या लोकसंख्येच्या वाढीमुळे आपल्यासमोर बेकारीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात हरितक्रांती झाली, औद्योगिक क्रांती झाली तरीसुद्धा आपल्या देशातील सामान्य माणूस हा सामान्यच राहिलेला आहे. जनसामान्यांच्या अन्न,वस्त्र ,निवारा, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक गरजा सुद्धा भागत नाही,आणि त्यातून दारिद्र्याला आमंत्रण मिळते. व बेरोजगारीचे प्रमाण वाढतच जाते. हाताला काम नाही पोटाला भाकर नाही. अशा परिस्थितीत माणूस आपले जीवन असहाय्यपणे जगतो. अशा बेकारीमुळे कितीजण आत्महत्या करतात. तर काहीजण बायकामुलांना स्वतःला जाळून घेताना दिसतात. चोऱ्या, दरोडे यांच्यात वाढ झालेली आज दिसत आहे. बेरोजगार तरुण आपसुकच गुन्हेगारीकडे वळत आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आज रोजगार पुरवणे अशक्य झाले आहे. उद्योग जगतात नवीन बदलांचे वारे वाहतात. जुने उद्योग मोडून पडतात. त्यामुळे आणखी माणसे बेकार बनतात. काळ बदलतो लोकांच्या आवडीनिवडी बदलतात जीवनशैली बदलते. राहणीमानात फरक पडतो. त्यामुळे आधीच्या जीवनशैलीच्या अनुरूप असलेले उद्योगधंदे बंद पडतात. जुनी उद्योग बंद पडत असल्यामुळे येथील कामगार बेकार होतात. त्यांच्या रोजगारीच्या वाटा बंद होतात. पण अशा बेकार, बेरोजगार झालेल्या लोकांनी हताश न होता, आपले धैर्य खचू न देता स्वतःचे मनोबल वाढून नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजे. काळानुसार बदललेल्या जीवनशैलीच्या गरजांचा वेध घेतला पाहिजे म्हणजे की शक्ति तिथे कामाला येईल. बेरोजगारीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. एक यंत्र अनेक माणसाचे जरी काम करीत असले तरी यंत्रांनी उद्योगाची नवीन दालने उघडून दिली आहेत. हेही मानवाने लक्षात घ्यायला हवे. या यंत्राची निर्मिती, सुट्या भागांची निर्मिती दुरुस्ती ,देखभाल यासाठी माणसाची गरज लागणारच. म्हणून या यंत्रांना आपत्ती न मानता आपल्यासाठी रोजगाराची वाट निर्माण करून देणारे मार्गदर्शकच मानली पाहिजे. बेरोजगारी कमी करायचे असेल तर आपण शेतीची पारंपारिक पद्धत सोडून दिली पाहिजे. तसेच शेतीला पूरक व शेतीवर आधारित असे उद्योग अंगीकारले पाहिजेत. आणि आपल्यामध्ये आळस असता कामा नये.आपल्यात असणारा आळस हा एक बेकारी उत्पन्न करण्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. आपण मुंगी सारखे उद्योगी असणे आवश्यक आहे. 'देगा हरी पलंगावरी' असे तर कधी होणार नाही. माणसाने स्वतः श्रम केले पाहिजेत. बेरोजगारी कमी करण्यासाठी आळसाला दूर लोटले पाहिजे. संतांनीही श्रमाचे महत्व वेळोवेळी सांगितलेले आहे. 'आराम हराम आहे, तर कामात राम आहे'. हे ध्यानात घेऊन श्रम केले पाहिजेत. बेकारी ,बेरोजगार नाहीशी करण्यासाठी आणखी एक उपाय म्हणजे शिक्षण. परंतु असे शिक्षण जे व्यक्तीला जीवनाभिमुख करणारे स्वावलंबी बनवणारे केवळ पुस्तकी , परीक्षार्थी न राहता उद्योगशील, यांत्रिकीकरणाची माहिती, असे व्यावसायिक शिक्षण घेणे आवश्यक आहे. “व्यवसाय शिक्षण घ्यावे l बेकारीला दूर करावे ll श्रमप्रतिष्ठालाही जपावे l स्वावलंबनाचा मार्ग खरा ll या उक्तीप्रमाणे युवा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःला एका विशिष्ट व्यवसाय करता येईल का, करायला हवा. व त्या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण घ्यावे. कारण यात स्वतःच्या बुद्धीला वाव आहे. कर्तुत्वाला महत्व आहे. व्यवस्थितपणे व्यवसाय केल्यास आर्थिक प्राप्ती भरपूर प्रमाणात होते. व अल्पावधीतच आपल्या व्यवसायात अनेक बेरोजगारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देता येतो. व अशाप्रकारे व्यवसायिक शिक्षणाला महत्त्व देऊन बेरोजगारी कमी करता येईल. बेरोजगारीच्या समस्येवर अशा वेगवेगळ्याप्रकारे उपायोजना करून या योजना तातडीने अमलात आणले पाहिजे. जर बेकारीच्या समस्येवर सर्वंकष योजना तातडीने अमलात आणली नाही तर, भविष्यकालीन तरुण पिढी व्यसनाधीन व गुन्हेगारी प्रवृत्तीची निर्माण होईल. व देशात अराजक परिस्थिती निर्माण होईल. म्हणूनच बेकारीची समस्या समाजाला गर्तेत नेणारी आहे, बेरोजगारीचे हे थैमान थांबविण्यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. बेकारीच्या समस्याची जाणीव शासनाला व पर्यायाने समाजाला होणे अत्यावश्यक आहे. बेरोजगारीचे प्रमाण अधिकाधिक वाढले तर देशाची प्रगती होणे केवळ अशक्य होईल. बेरोजगारीचे हे थैमान कमी करण्यासाठी आळस दूर लोटून श्रम केले पाहिजे, शिक्षणाला महत्व दिले पाहिजे, व्यवसायिक शिक्षण घेतले पाहिजे, उद्योगशील राहून छोटे मोठे उद्योगधंदे केले पाहिजे. व बेरोजगारीची ही भीषण समस्या कमी केली पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
रेशिमगाठी डोळ्यातल्या पाण्याला स्वतः पुसून घ्यावे हृदयातल्या वेदनेला स्वतः साठवून ठेवावे स्वतः चा स्वतःवर मात्र विश्वास ठेवावा रेशीमगाठी बांधल्या जरी सुटू न द्यावे एकटेपणातच मन रमवावे आणि जगावे सावलीच्या सोबतीने एकट्यानेच चालावे कुणाच्या मदतीची अपेक्षा का करावी कुणाच्या आधाराची अपेक्षा का धरावी जीवन जगताना स्वतःच स्वतः सावरावे स्वतःचा तोल मात्र ढळू न द्यावे प्रयत्न आणि आत्मविश्वासाने जगावे बांधलेल्या रेशीमगाठी सुटू न द्यावे 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे
*अवयवदान हे सर्वश्रेष्ठदान* एका व्यक्तीची संपत्ती विनामोबदला दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीची होण्याच्या प्रक्रियेस दान म्हणतात. जे जे आपल्याजवळ आहे , ते,ते दुसऱ्यास देऊन टाकन हे पुण्यप्रद कार्य असतं. महारथी कर्णाची दानशूरता हे सर्वांना ठाऊकच आहे. खरंतर दानास धार्मिक आणि सामाजिक महत्त्व असतं. भूदान, अन्नदान ,नेत्रदान, रक्तदान, ज्ञानदान, अवयवदान आणि देहदान हे असे दानाचे अनेक प्रकार आहेत. परोपकाराच्या निर्मळ भावनेतून जे दान दिले जाते त्यास सत्पात्री दान असे म्हणतात. या सर्व दानाच्या पाठीमागे धार्मिक आणि सामाजिक विचारांची बैठक असते. जेव्हा जीवनाचा अंश म्हणजे नेत्रदान, त्वचादान, किडनी दान असे आपले अवयव दान आपण दुसऱ्यांना देतो तेव्हाच आपले खरेखुरे दान होते. असे दान देणे म्हणजे खरोखर स्वतःसाठी काही प्राप्त करणे होय. वास्तविक परमेश्वर प्रत्येकाचा अंतकरणात आहे. तो प्रत्येक मानवाच्या हृदयात वास करतो. म्हणून माणसाने आपले स्वरूप ओळखावे व या जगावर प्रेम करावे, भेदाभेद करू नये, निर्मळ मनाने जनसेवा करावी. सत्कृत्य करीत रहावे. कारण प्रत्येक सकृत्य हे दानधर्म होय. अवयव दान जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवाचे शरीर क्षणभंगूर आहे. मृत्यू हा अटळ आहे. माणसाच्या जीवनाचं सार दोनच शब्दात सांगता येईल 'आला आणि गेला' मानवाच्या या उंबरठ्यावर यमराज येऊन केव्हा बोलवेल हे सांगता येत नाही. कारण मरण अटळ आहे. मृत्युनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयव रुपी जिवंत राहायचे असेल तर अवयव दान करणे फार महत्त्वाचे आहे. अवयव दान ही काळाची गरज आहे.आपल्या समाजात अवयव दानाविषयी म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. अवयवदान काय असते? हे सुद्धा काही लोकांना माहीत नाही.अवयवदानाचे ज्ञान हे केवळ नेत्र, किंवा किडनी पुरत मर्यादित नसून शरीराचे सुमारे दहा विविध अवयव आपण दान करू शकतो. त्यासाठी त्याची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. अवयवदानाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. माणसाच्या अंगी प्रबळ इच्छाशक्ती असेल तरच अवयवदान शक्य आहे. मानवाने आपल्या मृत्युनंतर जर अवयव दान केले तर कुणालातरी जीवनदान मिळू शकते. म्हणून अवयवदान हे सर्वश्रेष्ठ आहे. जागतिक स्तरावर १३ ऑगस्ट जागतिक 'अवयवदान' दिन साजरा केला जातो. आपल्या मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन आपण फुलवायचे असा विचार केला तर आपण नक्कीच एक चांगले कार्य केले म्हणून समाधानी राहू. व अशा चांगल्या कार्याचे समाजात प्रबोधन व जनजागृती होईल. अवयव दान करायचे झाले असल्यास आपल्याला आरोग्य विभागमध्ये जाऊन एक फॉर्म भरून द्यावा लागतो. असा अर्ज केल्यानंतर आपल्या मृत्यूनंतर ज्या अवयवाचे दान करायचे आहे त्याचा स्पष्ट उल्लेख करून आपले संमती पत्र द्यावे लागते. त्यानंतरच अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण होते. २६ऑगस्ट ते १ सप्टेंबर हा 'आय डोनेशन' आठवडा म्हणून साजरा केला जातो. नेत्रदान म्हणजे डोळे डोनेट करणे. त्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे फार गरजेचे आहे. नेत्रदान करतानी पूर्ण डोळ्याचे दान केले जात नाही तर डोळ्याचे कॉर्निया चे डोनेट होते ते ट्रान्सपरंट असते. नेत्रदान विषयी काही अंधविश्वास दूर करायला पाहिजे. नेत्रदान ही एक समाजसेवा आहे. ते स्वेच्छेने केलेले कार्य आहे. जर एखादी व्यक्ती आपले 'नेत्रदान' करण्यास इच्छुक असेल तर मृत्यूनंतर त्याचे डोळे काढले जातात. परंतु जर ती व्यक्ती वयस्क असेल किंवा एखाद्या व्यक्तीचे डोळे कमजोर असेल, मोतीबिंदू सारखा आजार असेल तर अशा व्यक्तीचे डोळे उपयोगात पडत नाही. नेत्रदान करताना त्या व्यक्तीचे डोळे आरोग्याच्या दृष्टीने योग्य असावेत. जर अशा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर चार ते सहा तासाच्या आतच डोळे काढून घ्यायला हवे. आणि नेत्रदान केलेले डोळे तीन ते चार दिवसाच्या आत उपयोगात आणायला हवे. नेत्रदान हे ऐच्छिक स्वरूपाचे असते त्यासाठी कुठलीही जबरदस्ती नसते. आणि हे नेत्रदान करण्यासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही. तसेच कायद्याचे बंधन नाही. योग्य नियमाचे पालन करून रीतसर अर्ज भरून आपण हे नेत्रदान करू शकतो. आणि एका नेत्रहीन व्यक्तीस नेत्रदान देऊन हे जग दाखवू शकतो. ह्या नटलेल्या सृष्टीचे सौंदर्य दाखवू शकतो. म्हणून प्रत्येकाने एकच संकल्प करावा आपल्या मृत्यूनंतर आपले अवयवदान , नेत्रदान करावे. ही परोपकाराची वृत्ती व मानवतेची प्रतिष्ठा जोपासावी.माणसाने मरावे परी किर्तीरुपी उरावे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे.
*शाश्वती* दिलखुलास व्यक्त होऊन बोलून जगावं माणसानं जगण्याची शाश्वती नसतानाही मनमुराद जगावं माणसांन धुमसणारे दुःख मनातलं सांगून जगावं माणसानं अश्रु डोळ्यातले ओघळणारे पुसून जगाव माणसानं यश मिळाले नाही तरी जीत मानुनी जगाव माणसानं हरुनही जिंकता येतं जीवनाच हे गमक जाणाव माणसांन वाट्यास आलेले सुख-दुःख जाणुनी हसून जगावं माणसांन शेवटी मृत्यू हे अटळ आहे हे सत्य जाणून जगावं माणसांन ✍प्रमिलाताई सेनकुडे.
*नेमीची येतो पावसाळा* धो-धो पाऊस बरसला मुसळधार काळ्या नभातुनी कधी बरसतो डोंगरमाथ्यावरी तर कधी स्पर्शतो गुलाब पाकळ्यातुनी *'नेमीची येतो मग पावसाळा'* असे आपण म्हणत असलो तरी, नित्यनेमाने आपण पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहत असतोच. पाऊस येण्यापूर्वी सारी धरती अगदी तापून निघालेली असते. दरवर्षी पावसाचे आगमन होत असते. प्रत्येक वेळी तो नवीन नव्या रंगरूपात येतो. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगाची सूर छेडीत येतो तो पाऊसच. प्रत्येकाला आपल्या तारूण्यातला पाऊस ओलाचिंब करतोच असे नाही. कोणाला हा पाऊस कसा वाटेल हे सांगता येत नाही. ' एकदाचा घृणा देऊन जाते शतदा शतदा तुझे पाऊसरुपी प्रतिबिंब आघात करून जाते.' असा हा पाऊस प्रत्येक वेळी नुतन संदर्भ नव्या रंगरूपात घेऊन येतो. या पावसाला सुद्धा भेदाभेद असतोच कधी कोणाला पाऊस आवडणारा असतो, तर कधी नाचणारा, साजिरा गोजिरा, धरणीला ओल देणारा हा पाऊस, तर कधी तन आणि मन भिजवणारा ओलाचिंब पाऊस, असतो तर सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्यांना सुखविनारा हा पाऊस असतो... पाऊस हा सर्वांना हवाहवासा वाटतो. दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले जाते. हा पाऊस जसा माणसाचे मन प्रफुल्लित करतो, तसेच माणसाचे जीवननही फुलवितो. खरंतर माणसाच जीवनच खऱ्या अर्थाने या पावसावर अवलंबून असते. पाऊस हा खरोखरच आपला जीवनदाता आहे. पण केव्हा केव्हा त्याचा रोषही तापदायक असतो. कधी हा पाऊस ओल्या दुष्काळ घेऊन येतो, तर कधी कोरड्या दुष्काळाने येतो. कधी हा पाऊस धो - धो पडत असतो तर कधी हा रिमझिम रिमझिम बरसत असतो. कोणास हा पाऊस म्हणजे मरगळ वाटेल तर काहींना हा पाऊस हिरवी शाल पांघरून जीवन फुलविणारा, शेत पिकवणारा, जीवन गाणे गाणारा वाटेल. असा हा पाऊस म्हणजे निसर्गाचे भावपूर्ण मुद्राच जणू! अवघ्या सृष्टीला हिरवेगार सुख अंगभर लपेटून घ्यायला लावणारा हा पाऊस आपल्या जिवाभावाचा सखा सोबतीच आहे. हा पाऊस अनेक रुपात भेटतो आहे. पाऊस हा माणसाचा पोशिंदा आहे, सुखदाता आणि कठोर शास्ताही ! तो कसाही असला तरी पाऊस हा सर्वांना प्रिय असतो. “आला पाऊस, गेला पाऊस, राने ओली झाली रे l मुरली वाजे ,महिमा गाजे , मनमोहन वनमाली रे l " असा हा पाऊस सुखदायी,आनंददायी सृष्टीचे सौभाग्य आहे, चैतन्यरुपी जीवन फुलविणारा हा पाऊस खरोखरच आपला जीवनदाता आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे
चित्र चारोळी स्पर्धेकरिता 1) माई तू वात्सल्याचा वाहणारा अखंड झरा माई तू जीवन फुलवणारा सुंदर पिसारा माई तू सुखदुःखतला एकमेव सहारा माई तू नवजात शिशुचा संस्काररुपी मनोरा. 2) डोईवर ओझे तोंडाला मास्क बाळास घेऊन निघाली कामास लगबगीने पायी चालत जाती संसार सुखाचा हीच आस 3) मायेच्या कुशीत निजले निवांत प्रेमाचा निर्झर आहेस तू झरा कधी न भासली कशाचीच भ्रांत तुझ्याच कुशीतला वात्सल्य खरा.
धोंड्या धोंड्या तू बोलतोयस खूप काही पण ते मला समजेलच असे नाही जरी मी समजलो तरी दुसरच काही धोंड्या जे तू कधी सांगितलंच नाही धोंड्या माझ्याकडे ज्याचं उत्तर आहे असा प्रश्न तुझ्याकडे पडलेला नाही धोंड्या मला हवे असलेल्या प्रश्नांची कैफियत तुझ्याकडे असेलच असे नाही धोंड्या मला तुला काही खूपसं सांगावसं वाटतं, पण मनातील भाव मनातच राहून जातं . धोंड्या मी बोलावं म्हणून तुलाही ते कान लावून ऐकावसं वाटतं... धोंड्या असं वागणं मला तुझ उमजलं नाही, तुला काय हवं ते मला तरी समजलं नाही. पण माझ्या आवडीनिवडीच तुला काहीच पडलेलं नाही. 〰️〰️〰️〰️〰️〰️ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
*जतन करूया पर्यावरणाचे* *“झाडे तोडून करू नका,* *निसर्गाचे प्रदूषण* *झाडे लावा, झाडे जगवा* *जतन करा पर्यावरण”* आज धकाधकीच्या जीवनात माणूस कसा त्रस्त होऊन गेलाय. घड्याळ्याच्या काट्यात माणसाने आपले जीवन बंदिस्त केले. माणसाचा स्वभाव काही विचित्र आहे. आजचा माणुस हा यंत्रयुगाच्या आणि विज्ञानयुगाच्या जाळ्यात अडकला आहे. आपले घर आणि आपला परिसर यांचा किती परस्परसंबंध असतो ही जाणीव ठेवून माणसाने पर्यावरणाचे हित जोपासले पाहिजे. मुंगीपासून गरुडापर्यंत सर्वजण धरतीची प्रकृती सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतात; पण माणूस मात्र आपल्या बुद्धिमत्तेने आणि कार्यशक्तीने पर्यावरणाचा तोल बिघडवून टाकत आहे. मानवाचे हे बेजबाबदार वागणे एक दिवस खूप धोकादायक ठरेल. पर्यावरणाचा ह्रास करणाऱ्या या अविचारी माणसाला जागे करण्याकरता 'वसुंधरा दिन' व 'पर्यावरण दिन' पाळायला सुरुवात केली आहे. आजकाल पर्यावरण जपण्याची जाणीव निर्माण झाली आहे. त्यासाठी कायदे नियम केले गेले आहेत. पण ते सर्वचजण आचरणात आणीत नाही. निसर्ग हा मानवाचे प्रेरणास्थान राहिलेला आहेे. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे, निसर्गाने माणसाला मुबलक दिलेली हवा आणि पाणी यांचा योग्य उपयोग माणसाने योग्य चांगल्या प्रकारे केला पाहिजे. उपलब्ध साधनसंपत्तीचा उपयोग करून पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. कारखान्यातील दूषित पाण्याबद्दल ची जबाबदारी पार पाडणे; ओला कचरा कोरडा कचरा यांची विल्हेवाट लावून विभागणी करणे. सौरऊर्जेचा जास्तीत जास्त उपयोग करणे. या लहानसहान पण फार महत्वाच्या गोष्टी करून ' विशुद्ध पर्यावरण' टिकवणे हे मानवाच्या हातात आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे जतन केले पाहिजे. पर्यावरण जतनाची निष्ठा प्रत्येकात रुजली गेली पाहिजे. तेव्हाच प्रगतीपथाची वाटचाल सुरू होईल. निसर्गाचे सौंदर्य वर्णन करताना कवी भा. रा. तांबे यांनी अतिशय सुंदर सौंदर्य निसर्ग कवितेतून मांडले आहे. "हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळीचे झोके घेते कसे , चहुकडे हिरवे गालीचे l सोनेरी ,मखमली ,रुपेरी पंख कितीकांचे रंग कितीवर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे l" आकाशातील बदलणारे नित्य रूप रंग पाहून कवीने सौंदर्य रेखाटले आहे. कवी, लेखक यांच्या वाणीला निसर्ग सौंदर्यामुळे भरती येते. या निसर्गाचे मानवावर केवढे उपकार आहे. निसर्ग माणसाची भूक भागवतो, तहान शमवीतो, सुगंधी फुलांनी त्याचे जीवन सुगंधित करतो, थकल्या भागलेल्यांना सावली देतो, मंद मधुर वायूलहरीचा परिहार करतो. निसर्ग मानवाला फळे,फुले ,सावली देतो. या निसर्गाचे आणि मानवाचे अतूट नाते आहे. माणूस पर्यावरणाशिवाय राहू शकत नाही. निसर्ग माणसाचा सखा सोबती आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.प्रत्येक माणसाने पर्यावरणाचा दृष्टिकोन ठेवून पर्यावरणाचे महत्त्व जाणून, पर्यावरण जागरूक नागरिक आता तरी व्हायला हवे. मानवाने सृष्टीचे सौंदर्य जोपासून पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍ लेखन प्रमिलाताई सेनकुडे
जगास या प्रेमाने जिंकुया ध्येय,चिकाटी,ह्दयी रुजवुया मायेच्या शांतीने मनास सजवूया दरवळेल सुगंध जीवनी तुमच्या जगास या प्रेमाने जिंकुया एकीची, शांतीची बाग फुलवूया नेकीची, प्रीतीची भाषा बोलूया जाळूया अहंकार मनातला जागवूया माणूस माणसातला जगास या प्रेमाने जिंकुया.. जीवन जगूया सन्मानाचे टाळुनी आचरण दहशतीचे ज्योत समतेची पेटवुया जगास या प्रेमाने जिंकूया तुटली इथे नाती जणू कोसळल्यात वाती जणू बोल प्रीतीचे बोलूया जगास या प्रेमाने जिंकू या ज्योत पेटवुया मानवतेची समानता आणि बंधूतेची आनंदाचे जीवन जगूया जगास या प्रेमाने जिंकू या देह आपला झिजऊनी कल्याण मानवाचे साधुया उच्चनीचतेच्या पाडूनी भिंती जगास या प्रेमाने जिंकूया.. 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
आत्मनिर्भर बनू या 'स्वतः स्वतःची चांगल्या प्रकारे जबाबदारी घेऊन योग्य वर्तन करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय.'प्रत्येक व्यक्तीने स्वहितासाठी व समाजहितासाठी विधायक कार्य करणे म्हणजे आत्मनिर्भरता होय. 'आत्मनिर्भरता म्हणजे स्वावलंबन होय', सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य हाच एक प्राणी आहे कि ज्याला हात दिलेले आहेत तेही श्रम करण्यासाठी विश्राम करण्यासाठी नव्हे.इतर प्राण्यांना पाय तेवढे आहेत. हाताचा विश्राम, आळस हा आपल्याला परमेश्वराने दिलेल्या हाताचा अवमान आहे. हा अवमान होता कामा नये. म्हणून प्रत्येक व्यक्तीने श्रमाचा विश्राम, विसर, अवमान होउ देता कामा नये. त्यासाठी प्रत्येकांना स्वावलंबी असणे आवश्यक आहे. या स्वावलंबनातूनच आत्मनिर्भरता निर्माण होते. मानव हा समाजशील प्राणी आहे. विचारशील प्राणी आहे. आपल्या जीवनोपयोगीचे ज्ञान दुसऱ्याच्या मदतीशिवाय स्वतः मिळण्याची शक्ती तो स्वावलंबनातून प्राप्त करू शकतो. आणि आत्मनिर्भरतेने आपले जीवन जगण्यात समर्थ ठरतो. माणूस सहृदयी आहे असे आपण म्हणतो. दुसऱ्याचे सुखदुःख जाणता येणारे संवेदनशील हृदय माणसाला लाभले आहे. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणे आणि त्याच्या दुःखाने दुःखी होणे हे मनुष्याची लक्षण आहे. आणि सुखदुःखाच्या पलीकडे जाणे, हे महापुरुषाचे किंवा संतांचे लक्षण आहे. जोपर्यंत आपल्याच सुखाची चिंता असते, तोपर्यंत पशुता असते, जेथे दुसऱ्याच्या सुखाची चिंता सुरु होते, तेथे मानवतेची सुरुवात होते. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही मानवतेची शिकवण अंगी ठेवून प्रत्येकाने मानवताधर्म बाळगावा. प्रत्येक मनुष्याने सामाजिक उत्तरदायित्व ओळखून निस्वार्थीपणे आपले जीवन जगावे. थोडक्यात सांगायचे म्हणजे सर्वार्थाने मीच माझ्या रक्षक आहे. व म्हणून मी माझे स्वहित व समाजहित जोपासून आत्मनिर्भर बनणार आहे. 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
भ्रष्टाचाराचा भस्मासुर आजच्या काळात भ्रष्टाचार हा मोठा चिंतेचा विषय झाला आहे. माणूस भ्रष्टाचारी का होतो? त्याच्या साऱ्या श्रद्धा निष्ठा का हरवतात? स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अमानवी कृत्य का करतो? मंदिराचा सुवर्णकळस घडवणारा कळसातील सोने चोरतो, तेव्हा त्याच्या आचरणाला काय म्हणावे? माणसाच्या या सार्या वृत्तीला एकच कारण आहे आणि ते म्हणजे 'माणसाची उपभोगवादी वृत्ती'! ही उपभोगवादी वृत्ती माणसाच्या अंगात जोपर्यंत आहे तोपर्यंत तो भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेला असेल. आजकाल भ्रष्टाचार हा गरीब-श्रीमंत सगळेच करताना दिसतात. सुव्यवस्था व सुविद्य माणसे आपली विद्वत्ता वापरून भ्रष्टाचार करतात. फार प्राचीन काळी भ्रष्टाचार नावाचा हा शब्द अस्तित्वात नव्हता. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचारी माणसाला अतिशय कमी लेखले जाई. भ्रष्ट आचरण करणाऱ्याला वाव नव्हता. पण आज सार्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे. आज एकही असे क्षेत्र नाही तेथे भ्रष्टाचार होत नाही.आज भ्रष्टाचार या शब्दाचा समाजजीवनात सर्रास प्रयोग करण्यात येत आहे.भ्रष्टाचाराचा भस्मासुर सर्वत्र बोकाळला आहे. भ्रष्टाचाराची वाळवी आज समाज मनाला पोखरू लागली आहे. समाजातून मानवीय नीतिमूल्यांचा नाश होत असून आज समाजामध्ये लाच घेणे, खोटे बोलणे, फसगत करणे, चोरटा व्यापार करणे, आयकर चुकवणे, अफरातफर करणे, बळजोरी करणे इत्यादी अनैतिक मार्गाचा अवलंब होऊन या अनेकविधी भ्रष्टाचार भ्रष्टाचाररुपी प्राण्यांने संपूर्ण समाज डोंगर पोखरून काढलेला आहे. आज भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात माणूस अडकत चालला आहे. आता या भ्रष्टाचारातून माणसाची सुटका होणार तरी कधी? हा प्रश्न पुन्हा पुन्हा मनाला भेडसावत आहे. हा भ्रष्टाचाराचा भस्मासुर आपले उघड उघड आकांत तांडव करून समाजाला काळीमा फासण्याचे काम करत आहे. भ्रष्टाचाराचा ओघ अव्याहतपणे सुरूच आहे. या अव्याहतपणे चालणाऱ्या भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला कधी पायमल्ली बसते? कधी आळा बसतो? असा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतो? 〰️〰️〰️〰️〰️〰️ ✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
Subscribe to:
Posts (Atom)