✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 24/02/2020 वार - सोमवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९३६- क्षयरोग निवारण दिन ● २००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली. 💥 जन्म :- ● १४८३- बाबर यांचा जन्म ● १९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक. 💥 मृत्यू :- ● १९२५ - ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान. ● १९७५ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष. ● १९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार, येत्या तीन महिन्यात ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *लोअर परळमधील बीडीडी चाळीतील रहिवाशांना म्हाडाकडून घरे मिळणार, मुख्यमंत्र्यांच्या सूचना* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकासआघाडीची बैठक, तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *धोबी, परीट समाजाचा अनुसूचित जातींमध्ये सहभाग होऊ नये यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकारी अन् काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट * ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक, 26 फेब्रुवारीला मुंबईत सुंबराण आंदोलनाची हाक, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडण्याचा इशारा* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी सहकुटुंब रवाना, डोनाल्ड ट्रम्प हे 36 तासांसाठी भारत दौऱ्यावर येत आहेत.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या राज्यातील 63 क्रीडारत्नांचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं गौरव, पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती, पंढरीनाथ पठारे, रिशांक देवाडिगाला शिवछत्रपती पुरस्कार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *कागदाची बचत* वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2018/02/03.html  लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चला जावूया शाळेत* अंकुश शिंगाडे नागपूर ९९२३७४७४९२ चला जावूया शाळेत मिळवूया ज्ञानज्योत शाळा आपुली चांगली ज्ञानछंद मला लावली शाळा चांगली दुपारची नसेल घाई उठण्याची चार भिंतीत मिळे ज्ञान तिथे कळतो सर्व विज्ञान लक्ष देवूनी ऐकण्याचा ठेवा आहे हा ज्ञानियेचा करु अभ्यासाचा चंग वाटेल प्रयागाचा संगम तेंव्हा नका राहू घरात चला जावूया शाळेत *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पुर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती."* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?* ज्वरमापी 2) *डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते ?* झिप 3) *जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?* जिनिव्हा 4) *कोणत्या प्राण्यांच्या पिलांना जन्मतः च शिंग असतात ?* जिराफ 5) *पंचायतराज व्यवस्थेतील सर्वात वरचा स्तर कोणता ?* जिल्हा परिषद *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 नरेश जे. वाघ, सहशिक्षक, वर्धा *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.* *परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?*  *"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."*       🌴🌱 *॥ रामकृष्णहरी ॥*🌱🌴              🍂🍂🍂🍂🍂🍂     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, मन पाखरू पाखरू त्याला किती मी आवरू, बहिणाबाई म्हणतात ,मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. तहानलेल्या जन्मदात्यांना पाणी देण्यासाठी तळ्यावर आलेला श्रावण, दशरथाच्या बाणाला बळी पडला आणि पुत्रविरहाचा शाप मिळण्यास कारण ठरला. सिकंदर आणि नेपोलियन यांची जग जिंकण्याची 'तहान' अनेक युद्धांना सामोरी गेली आणि कित्येक राजे शरण जाऊन कफल्लक झाले. तहानलेले 'हरिण' वा 'पाडस' ही व्याघ्राची पोटापाण्याची सोय आहे. सत्तेची 'तहान'ही अशीच, त्यात महत्वकांक्षा मिसळली की व्याकूळ होते आणि सत्तापिपासू बनते. म्हणजे तहानेने विकृत रूप धारण केले की ती केवळ तहान न राहता 'जीवो जीवस्य जीवनम्' या तत्वाने तहानलेल्याला समोर दिसेल ते ग्रहण करण्याचे व्यसन लागते. अशावेळी चित्तवृत्ती बेभान होतात, ताळतंत्र सुटतो व विवेक संपून दुष्कृत्य घडते. तृष्णा' म्हणजे 'तहान'च आणि 'तहान' पाण्याशिवाय पूर्ण होत नाही. ही साधी तहान जेव्हा 'तृष्णा' होते तेव्हा तिच्यातले विविध पैलू दिसू लागतात. तहानेत असलेले आसुसलेपण मात्र स्वतंत्र असते, केव्हा एकदाचे 'पाणी' मिळते, अशी अवस्था होते. ही अवस्था 'तृष्णे'मधून येते. तेव्हाही आसुसलेपण येऊन इच्छापूर्ती न झाल्यास बुद्धी किंवा मनाचा आधार घेतला जातो. मनाच्या आहारी गेल्यास महत्वाकांक्षा भरकटते व तृष्णा भीषण रूप धारण करते .म्हणूनच मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मुळात निसर्गतः आपल्याला  शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकतेचे बळ* एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’  पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.  ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’  जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.  ‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’  सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.  हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.  एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’  ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.  शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.  *तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment