✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 15/02/2020 वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *ध्वज दिन - कॅनडा* *राष्ट्र दिन - सर्बिया* 💥 ठळक घडामोडी :-  ● १९४२ - दुसरे महायुद्ध - सिंगापुरमध्ये ब्रिटीश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटीश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी. ● १९६१ - सबिना एर फ्लाइट ५४८ हे विमान बेल्जियममध्ये कोसळले. ७३ ठार. मृतांत अमेरिकेचा संपूर्ण फिगर स्केटिंग संघ व त्यांचे मार्गदर्शक. ● १९६५ - कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला. 💥 जन्म :- ● १९३० - वसंत दिवाणजी, कन्नड साहित्यात मौल्यवान योगदान देणारे प्रतिभावंत लेखक. 💥 मृत्यू :- ● १८६९ - मिर्झा गालिब, उर्दू कवी. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *यवतमाळ : वेगवेगळ्या बंगल्यावर आणि निवासस्थानावर केलेला वारेमाप खर्च सध्या चर्चेचा विषय आहे.परंतु यवतमाळ चे एक शासकीय निवासस्थान हे सर्व गोष्टीला अपवाद ठरत आहे. या शासकीय निवासस्थानी संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून येथे स्वतः जिल्हाधिकारी अजय गुल्हाने शेतात राबून आपल्या 'शाल्मली' या निवासस्थानी हिरवागार मळा फुलवला आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मुख्यमंत्री लवकरच सरप्राईज देतील, औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरासंदर्भात खैरेंचं मोठं विधान, मनसेकडून मुद्दा हायजॅक होत असल्याचं समजताच सेना सरसावली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अकोला : गजानन महाराज प्रगटदिनासाठी शेगावला जाणाऱ्या पायदळ वारीतील दोन भक्तांना टिप्परने चिरडले, बाळापूर तालूक्यातील लोहारा गावातील मदरशाजवळची घटना, चार जण जखमी, विशाल पाटेकर, श्याम निवाणे अशी मृतांची नावं* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *एल्गारचा तपास एनआयएकडे सोपवण्यावरुन ठाकरे आणि पवारांमधले मतभेद चव्हाट्यावर, केंद्राला तपास सोपवल्यानं पवारांची नाराजी, सीएएलाही दर्शवला विरोध* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *मुंबई, ठाण्यातल्या बांग्लादेशी आणि अफगाणी घुसखोरांचा पर्दाफाश, दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 9 जण ताब्यात, अवघ्या 2 हजारात आधार कार्ड बनवल्याची कबुली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *अलिबाग रो-रो सेवेसाठी जहाज मुंबई बंदरावर, एक मार्चपासून सेवा होणार सुरू, तर मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इलेक्ट्रिकल बसचा शुभारंभ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : गर्भलिंग निदान चाचणीची निवड आणि पीसीपीएनडीटी कायद्याच्या उल्लंघनावरून सध्या चर्चेत असलेले कीर्तनकार इंदुरीकर महाराज आता शिक्षकांच्या बाबातीत उडवलेल्या खिल्लीमुळे पुन्हा एकदा वादात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *कमवा आणि शिका हेच उपयोगी* स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना......... वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"थंडी "* सौ. सरोज सुरेश गाजरे, भाईंदर मोबा. नं ९८६७३९४००१ अंग अंग कुडकुडतंय, बघ ना गं आई ! पडली आहे माघातली खूपच"थंडी" लवकर लवकर घाल गं मला ऊबदार असं स्वेटर अन बंडी //१// सकाळी सकाळी मला शाळेत जावेसे ना वाटे मस्त पांघरूणात पहुडावेसे वाटे //२// बघ ना गं अंगणात पेटल्यात शेकोट्या आम्हाला मात्र शाळेच्या खेळाव्या लागती आट्यापाट्या //३// गंधितसा गारवा मोह पडे नीजेला चिंचा, बोरं, गाजरं हुरडा मिळे खायला //४// *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?* कृष्णा नदी,आंध्रप्रदेश 2) *भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता ?* देवदार 3) *रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक कोण होते ?* धीरुभाई अंबानी 4) *सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते ?* धुपगड 5) *राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या कोणी केली ?* नथुराम गोडसे *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अशोक गायकवाड, सहशिक्षक, बिलोली 👤 दत्ता एम. भोसले, शिक्षक, बिलोली 👤 जनाबाई निलपत्रेवार, शिक्षिका, धर्माबाद 👤 बाबूराव बोधनकर, सहशिक्षक, करखेली 👤 किरण गौड, धर्माबाद 👤 घनश्याम नानम, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बहुतेक लोक त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी संतुष्ट नसतात. आपल्यात कशाची तरी उणीव असल्याची भावना त्यांना बोचत असते. आणि मग आजच्या ह्या स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी ते सेल्फ-हेल्प प्रकारातील पुस्तके वाचतात. वयक्तिक समुपदेशन करून घेतात, धार्मिक प्रवचने ऐकतात, योगसाधना करतात, फिट रहावे म्हणून जिमखान्यात जातात, आकर्षक दिसण्यासाठी मेक-ओव्हर करून घेतात.*  *जीवनात यशस्वी होण्यासाठी सगळ्यांची सारखी धडपड सुरू असलेली आपण पाहतो. पण जीवनात यशाबरोबर अपेक्षित सुख प्राप्त होतेच असे नाही आणि वाढती समृद्धी हीदेखील असमाधानाचे एक कारण बनू शकते. म्हणून व्यक्तिमत्वाचा विकास शारीरीक गरजा भागवणे आणि मनाच्या आकांक्षा पूर्ण करणे एवढ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. शरीर आणि मनाबरोबर त्यात आत्माही आला पाहिजे. आपल्या आत्म्याचे पोषण आवश्यक आहे. आपली आत्मिक वाढ महत्वाची आहे. शरीर, मन आणि आत्मा ह्यांचे संतुलन राखणे गरजेचे आहे.*           ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••     💥💥💥💥💥💥💥💥💥      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*          📱 9167937040 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, होगा मसीहा सामने तेरे, फिर भी न तू बच पाएगा  तेरा अपना खूनही आखिर तुझ को आग लगाएगा  आसमान में उडनेवाला मिट्टी में मिल जाएगा  कबिरा गर्व न कीजिए, काल गहे कर केस। ना जानौ कित मारिहै, क्या घर क्या परदेस।। जीवन कसे क्षणभंगुर आहे याची वारंवार आठवण करून देतांना कबीर नेहमी सांगतात की बाबांनो हे नश्वर आहे. पुढच्या क्षणी काय होईल हे कुणाला माहीत नाही. यासाठी माणसाने मिळालेल्या जीवनात कुठल्याही गोष्टींचा गर्व करू नये. संत कबीर म्हणतात मृत्यूच्या तावडीतून तुमची सुटका नाही, तुमची शेंडी नेहमी त्याच्या ताब्यात असते.या मृत्यूने किती लोकांना गिळले याची गणती करता येणार नाही. माणूस कुठेही असो हा त्याचा पाठलाग करत असतो.आणि जेव्हा पाहिजे तेव्हा अलगत कवेत घेतो.तो घरात असो वा परदेशात तो शोधूनच काढतो.माणसाला ज्या ज्या गोष्टींची घमेंड आहे त्या सर्व क्षणार्धात नाहीशा करण्याची ताकद मृत्यूत आहे.सगळं येथेच सोडून जावे लागते. माणसाने आपले यौवन,संपत्ती किंवा सौंदर्य यांचा तर अभिमान बिल्कुल बाळगू नये. कारण हे पंचतत्वापासून बनलेले शरीर नश्वर आहे.शेवटी काय तर तुलसीदासाच्या म्हणण्यानुसार, हम हम करि धन धाम सवॉरे,अंत चले उठि रीते। खाली हाथ आया है, खाली हाथ जायेगा। अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अज्ञानाला दूर घालवायचे असेल,दु:खाला दूर करायचे असेल,आपल्या मनातील रागावर नियंत्रण ठेवावे वाटत असेल,इतरांना आपलेसे करावे वाटत असेल,अवघड समस्येतून मार्ग काढायचा असेल आणि जीवन सुखी व समृद्ध व्हावे असे वाटत असेल तर त्यावर एक आणि एकच सर्वोत्तम मार्ग आहे तो म्हणजे ज्ञानाचा. ज्यांनी ज्ञानाचा मार्ग स्वीकारला आहे त्यांनी ह्या सा-या गोष्टीतून ज्ञानाच्या सहाय्याने सहज मारली काढून जीवन सुखी व समृद्ध केले आहे.ज्यांनी स्वीकारला नाही त्यांना त्यांच्या जीवनात कधीही सुखी होता आले नाही.ते जवळ असलेल्या सुखालाही मुकले आहेत कारण त्यांच्याजवळ ज्ञानाची जोड नव्हती म्हणून.या जगात सर्वश्रेष्ठ जर काय असेल तर ते ज्ञान. जीवनातील अज्ञानाला दूर करण्याचे सामर्थ्य केवळ ज्ञानातच आहे हे कधीही विसरुन चालणार नाही. ©व्यंकटेश काटकर,नांदेड संवाद...९४२१८३९५९०. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बळी तो कान पिळी* एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले. ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं. त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता. पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. बकर्‍या खाणं हा काही मोठा अपराध नाही.’ या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, ‘एका शेतकर्‍याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले. ‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचार्‍या गाढवाला ठार मारले. *तात्पर्य: बळी तो कान पिळी.समाजात सत्याने वागत असलेल्यांची हेच गत आहे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment