✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 13/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● २०१० - पुणे येथे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. १७ ठार, ६० जखमी. 💥 जन्म :; ● १८७९ - सरोजिनी नायडू, बंगाली कवियत्री. १९६९ - सुब्रोतो बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ● २०१२ - अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते उर्दू कवी, गीतकार. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा, राज्य सरकारचा मोठा निर्णय पण रोज 45 मिनिटं अधिक काम करावं लागणार, 29 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मराठवाड्यातील वॉटरग्रीड प्रकल्प रद्द होणार नाही, मंत्री अमित देशमुख यांची माहिती, टप्प्या-टप्प्यानं योजना राबवणार* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मंत्र्यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधींची उधळपट्टी, 31 बंगल्यांसाठी तब्बल 15 कोटी खर्च, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 145 रुपयांची वाढ, दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, महिला कार्यकर्त्यांचं आज देशभरात आंदोलन* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *बीडमध्ये पहिल्या वृक्ष संमेलनाची सुरुवात, अभिनेते सयाजी शिंदेंच्या सह्याद्री देवराईचा उपक्रम, झाडे जगवण्यासाठी मोहीम* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *पुणे: राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये येत्या १९ फेब्रुवारीपासून राष्ट्रगीत सक्तीचे, महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय बंधनकारक करण्यात येणार आहे. यासंबंधीचं विधेयक येत्या विधीमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *अति क्रोध करू नये* http://nasayeotikar.blogspot.com/2018/03/14.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाऊस* ... 🍁 *अलका कुलकर्णी* 🍁 पाऊस पाऊस नुसता पाऊस झरझर धारा रे... घमघमते अत्तर मातीचे दरवळ न्यारा रे... पहिला पाऊस आहे ढोंगी दराराच येण्याचा जंगी आई यंदा नवा हवा गं रेनकोट रंगीबेरंगी चिंब भिजूया तू आणिक मी वेचू गारा रे... सोडू कागद होडी या रे कपडे ओले करू नका रे वेचून घेऊ थेंब ओंजकी तळे साचले या ना सारे धूळ वादळे विजा कडाडे पिसाट वारा रे.. सरीसरींचा नाच अंगणी थपथप थपाक पाऊस गाणी न्हाऊ घाला मला ढगांनो शॉवर चालू केला कोणी स्वैर नाचू दे मोर मनाचा फुलव पिसारा रे.. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"यश" हे "सोपे," कारण ते कशाच्यातरी* "तुलनेत" असते, पण "समाधान" हे "महाकठीण", कारण त्याला "मनाचीच परवानगी" लागते..* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार कोणता ?* नोबेल पुरस्कार 2) *अरुणाचल प्रदेशचे जुने नाव काय होते ?* नेफा 3) *जगातील सर्वाधिक कर असलेला देश कोणता ?* नार्वे 4) *मध्यप्रदेशची उन्हाळी राजधानी कोणती ?* पचमढी 5) *भारतातील सर्वात संपन्न राज्य कोणते ?* पंजाब *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद 👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद 👤 अशोक पाटील, धर्माबाद 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 👤 *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्याच्या मुखात भगवंताचे नाम आहे तो विनम्रतेने जगात संचार करतो. अहंकाराचा वारा त्याला स्पर्श करू शकत नाही आणि विरोधी लोकही त्याबद्दल आवाज उठवू शकत नाहीत. असे सर्वश्रेष्ठ नाम सर्वांनी घेतले पाहिजे. त्यात असणारे सामर्थ्य अमाप आहे. आत्मशांती, आत्मशक्ती, आत्मसुख, आणि आत्मानंद या शब्दांच्या अर्थ शोधार्थ कितीही ग्रंथ धुंडाळले तरी हाती काही लागणार नाही. उलट या शब्दांचा अर्थ अनुभूतीतून कळतो. म्हणून संत म्हणतात की, नाम घ्यावे आणि हा भवसिंधू तरूण जावा.* *ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे सहज पेलता न येणारे विषय आहेत; तसे नाममार्गाचे नाही. नाम हाच धर्म व कर्म हे ज्याला कळले तो सहज नामसाधना करू शकतो. येता-जाता, बसता-उठता जर नामजप घडला, तर मन आणि प्राण एक होतील आणि चैतन्यस्वरूपाचा आविष्कार दिसेल. अविद्येचा म्हणजे आज्ञानाचा भेद नामोच्चाराने दूर होतो. एखादा माणूस झोपेत असताना त्याला जर आपण त्याच्या नावाने आवाज दिला, तर तो खडबडून जागा होतो. तशी जाग आणण्याचे काम नाम करते. ह्रदयस्थित भगवंताला आपलेसे करण्याकरिता नामजपाशिवाय दुसरा सुलभ मार्ग नाही.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 💥💥💥💥💥💥💥💥💥 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो रोजच्या वर्तमानपत्रात सध्या हिंगणघाट येथील प्राध्यापिका स्व.अंकिता पिसुड्डे यांच्या वेदनांचा हुंकार प्रत्येक जण आपापल्या परीने मांडतोय,निषेध, मोर्चा,शोकसभा,अशा अनेक प्रकारे समाजातील हे विकृत स्वरूप मांडतोय. पण एव्हढ्याने या रोज घडणाऱ्या घटना संपणार आहेत का? या विषारी विचारांवर जालीम उपाय शोधायचा असेल तर फक्त आणि फक्त संस्कार व पुरुषी मानसिकता बदलणे हेच होय. आज झी टी. व्ही.वरील चला हवा येऊद्या मधील श्रेया बुगडे अनेक वर्षांपासून पुरुषांबरोबरीने एकटी काम करतेय, तिच्यातील प्रगल्भता वाखाणण्याजोगी आहे.तिचा हेवा वाटावा असे काम ती करतेय. दोन फेब्रुवारी १९८८ रोजी श्रेया बुगडेचा जन्म झाला. श्रेया बुगडे हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा. श्रेया मूळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. आठवीत असताना बाललैंगिक शोषणावर ‘वाटेवरच्या काचा गं’ हे छोटेसे प्रबोधनपर नाटक तिने केले होते. या नाटकाचे प्रयोग करण्याकरिता श्रेया इतरांबरोबर सगळीकडे फिरली.  शाळेचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत श्रेयाने अनेक बालनाट्यात काम केलं होतं. कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजसाठी काही तरी करायचं अशा विचारातून तिनं कॉलेजच्या अनेक एकांकिका, नाट्यस्पर्धांत भाग घ्यायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मराठीतच नाही, तर गुजराती नाटकांमध्येही तिने काम केले आहे. त्यानंतर तिला मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तू तिथे मी, अस्मिता, माझे मन तुझे झाले, फु बाई फू अशा अनेक मालिकांमध्ये श्रेयाने व्हिलन, सेकंड लीड रोल साकारले आहेत; मात्र खलनायिका रंगवणारी श्रेया विनोदी अभिनयसुद्धा तितक्याच ताकदीने साकारू शकते हे ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून लोकांना कळले. अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आनंद हा आनंदच असतो. आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो. त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही. जेथे सुख, समाधान, शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो. पण जेथे वाद, नैराश्य, दुःख, अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही. आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे. इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो. त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद.9421839590. 🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समाधानकारक वृत्तीने जगावे....* एक श्रीमंत सावकार होते , अलोट संपत्ती होती , पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील . श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही. साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो , श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल ? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची ! साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो . साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो . तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती, श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो . ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का ? नाही ना ? मग का आणलेस तांदूळ ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत . श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्‍या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला. साधुने त्याला हाक मारली अरे ! विवंचना घेऊन आला होतास ना ? मी तुला त्यातुन सोडवणार आहे. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे. तात्पर्यःसुख कशात आहे हे ओळखले पाहिजे,व उद्याची चिंता करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने कसा जाईल हेच पाहीले पाहिजे. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment