✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 05/02/2020 वार - बुधवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    💥 ठळक घडामोडी :-  ● १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले. ● २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा. ● २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला. 💥 जन्म :- ● १९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी. ● १९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता. 💥 मृत्यू :- ● १९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे. ● २००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष. ● २००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर ! ठाकरेंच्या राज्यात येणार पाच दिवसांचा आठवडा, केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *मातृवंदना सप्ताहाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात दुसरा, पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोल मजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी, यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्यात येते.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वाळूज महानगर :  ग्रामीण भागात रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरुद्ध वाळूज महानगर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आता गावात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधित गावातील सरपंच व ग्रामसेवकाला जबाबदार धरले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *अलिबाग, एलिफंटा बेटापर्यंतचा प्रवास सुखकर होणार; कुलाब्यातील जेट्टी, प्रवासी वाहतूक टर्मिनलला सरकारची मान्यता, बंदरविकास मंत्री अस्लम शेख यांची माहिती* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *औरंगाबादच्या रफिक झकेरीया महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय कॅम्पस मोबाईल मुक्त करण्याचा घेतला निर्णय* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातची सुनावणी आज होणार असल्याची माहिती न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले आहे* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबईकर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी खेळाच्या जोरावर भारताने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघावर 10 गडी राखून केली मात* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *जीवन सुंदर आहे.*  लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *छकुला* © डॉ. पवन कोरडे, नागपूर शोभे गोड गोंडस बाळ रांगता वाजे छुमछुम वाळ मनगटी कडा चांदीचा गाली बाळाच्या काजळतिळ छकुल्याची छकुली नजर भिरभिरते बाहुलीवर बाहुलीही साद देते छकुल्यासवे खेळण्या तत्पर कोण कसे सांगावे काय बाळाच्या मनात 'खाऊ' समजूनी छकुला धरे काहीही मुखात कुणाचा स्वर ऐकूनी दुडदुड धावतो घरी छकुला आधार घेऊनी ऊभा राहतो दारी पाहता हे कुकुलं बाळ लोपते मनातली मरगळ पात्यासम लवते कात निष्प्राण देही संचारते बळ *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" तुमच्या जीवनाला वळण देण्याचा एक छोटा प्रयत्न म्हणजे ध्येयवेडा प्रवास "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो ?* फिलिपाईन्स 2) *जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी वनस्पती कोणती ?* बांबू 3) *कस्तुरबा गांधी यांचे टोपण नाव काय होते ?* बा 4) *कुष्ठरोग्यांसाठी वसाहत स्थापन करणारी भारतातील पहिली विभूती कोण ?* बाबा आमटे 5) *भारतात मोघल सत्तेची स्थापना कोणी केली ?* बाबर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अभिषेक बच्चन, सुपरस्टार 👤 सौ. रंजना जोशी, सहशिक्षिका, धर्माबाद 👤 सदाशिव मोकमवार, येताळा 👤 निलेश गोधने, सहशिक्षक, नांदेड 👤 भीमराव वाघमारे 👤 संदीप मुंगले, धर्माबाद 👤 श्याम राजफोडे 👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड 👤 बाळासाहेब कदम, सहशिक्षक, धर्माबाद 👤 अच्युत पाटील खानसोळे,  सहशिक्षक, नांदेड 👤 उमाकांत म्याकलवार 👤 वैजनाथ जाधव साहेब 👤 डॉ. जितेंद्र डोलारे, पुणे 👤 दत्ता हेलगंड, धर्माबाद *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन कधी कधी अडथळ्यांची शर्यत बनते. पराभव, अपयश, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा दुरावा किंवा मृत्यू, अपमान अशी संकटे एकापाठोपाठ येतात. कधी कधी एकापेक्षा आधिक संकटे एकत्र येऊन डोक्यावर धाडकन् आदळतात. आपण कोलमडून पडतो. निराशेच्या गर्तेत कोसळतो. सुखाचा किरणही कोठे दिसत नाही. भयाण काळोखात चाचपडताना बाहेर पडण्याची वाट सापडत नाही. खरंच, कधी कधी असं होतं पण; ही 'कधी कधी' घडणारी अवस्था तात्पुरती आणि आल्पकाल टिकणारी असते. ती संपून पुन्हा सुखाचा शिडकावा होणार असतो.* *सुखप्राप्ती ही माणसाची मुलभुत प्रेरणा आहे. त्या प्रेरणेच्या समाधानासाठी संकटाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी धीर धरावा लागतो. ओढवलेल्या परिस्थितीचा स्विकार करून, त्याच्यावर मात करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आपल्याला माणूस म्हणून लाभले आहे, हे स्वत:ला पटवून दिले की दु:खाचा भयंकरपणा निम्म्याने कमी होतो. पुढची वाट दिसू लागते. आपल्याला हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी दुस-या कशावर किंवा कोणावर अवलंबून राहायचे नाही असे धोरण ठेवले तर दु:ख वेगाने दूर पळते आणि सुख चोरपावलांनी आत येते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मित्रांनो* *हिरवा निसर्ग हा भवतीने* *मन सरगम छेडा रे,* *जीवनाचे गीत गा रे,* *धुंद व्हा रे।* *खरय ही देणं स्वर्गाचं दर्शनच घडविते.* *भारताला लागलेला निसर्ग तर जगाला मोहिनी घालतो.* *आणि आपण त्यावर वेगवेगळे पाशवी अत्याचार करतो.* *निसर्गाच्या सानिध्यात घालविलेले क्षण मनाला प्रसन्न करतात.* *उमललेल्या नाजूक फुलांचा बहर, हिरव्यागार रानातून मंद* *शिळ घालणारा प्रसन्न वारा या सर्वांमध्ये निसर्गाचं एक दैवी रूप* *दडलेलं आहे. ही सुंदर कलाकृती पाहून अचंबित व्हायला* *होतं. निसर्गाचं निरीक्षण केल्यावर जाणवतं की, या नाजूक* *फुलांवर सुंदर रंगाची उधळण कोणी* *केली असेल ?* *हिरव्या रंगाने नटलेल्या धरणीवर निळं आकाश पसरलेलं आहे. या अथांग आकाशावर सर्व दिशांना उजळून टाकणारा अलौकिक रंगाचा मनमोहक चित्रण करणारा चित्रकार कोण आहे ? आपल्या आजूबाजूला पसरलेल्या निसर्गाचा चमत्कार व सुंदरता बघायला मानवाकडे फक्त एक नजर आहे. पण तो अनामिक चित्रकार असंख्य नजरेने क्षितिजा पलिकडे पाहात आहे. निसर्गाचे हे सगुण व प्रेरणेने भरलेलं भव्य सृष्टी चित्र सुंदरतेने चित्रित करणा-या चित्रकाराला माझा सलाम !!!* *निसर्गाला प्रणाम* *अशोक कुमावत* ( *राष्ट्रपती पुरस्कार विजेते)* 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक सौंदर्य अधिक मौल्यवान आहे.कारण बाह्यसौंदर्य अधिक दिसण्यासाठी नानाप्रकारचे सौंदर्य प्रसाधने व मूल्य देऊन निर्माण केले तरी ते जास्त काळ टिकत नाही किंवा टिकवता येत नाही.ते अल्पकालीन आहे. आंतरिक सौंदर्य असे आहे की,त्याची किंमतही मोजून आणता येत नाही आणि अन्य माध्यमांतून प्राप्तही करता येत नाही.असे सौंदर्य आपल्या अंतःकरणात उपजतच असते फक्त त्याला योग्यप्रकारे हाताळता आले पाहिजे.ह्या आंतरिक सौंदर्यामुळे अनेक नाती जोडून जीवनातला आनंद उपभोगता येतो न इतरांनाही आपल्या आनंदात व इतरांच्या आनंदात भर पाडता येते तसेच कोणत्याही प्रकारचे मूल्य न देता शेवटपर्यंत टिकवता येते.फक्त त्याच्यासाठी आंतरिक तळमळ असायला हवी. © व्यंकटेश काटकर, नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑📝🎑 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आत्मपरीक्षण* एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो. *तरुण*(अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ? तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला) *** *तरुण* : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो. *महिला* : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे. *तरुण*: बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !! *महिला* : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ? *तरुण* : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !! *महिला* : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !! *तरुण*: हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही ना ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस" यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय." *दुकानदार* : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ? *तरुण* : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो" असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे *चकित होऊन* पाहत राहतो.  *तात्पर्य* : अधूनमधून आपण स्वतःच स्वतःचे *आत्मपरीक्षण* करणे गरजेचे आहे. *तुम्ही नोकर असा की मालक*. ते महत्वाचे नाही तर तुम्ही करत असलेले काम चांगले होतेय का हे महत्वाचे आहे. आणि ते सर्वात जास्त कोण ओळखू शकतो तर *आपण स्वतः* !! *जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment