✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 20/02/2020 वार - गुरूवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *जागतिक सामाजिक न्याय दिन* 💥 ठळक घडामोडी :-  ● २०१४-आंध्रप्रदेश चे विभाजन होऊन तेलंगणा हे भारताचे २९ वे राज्य अस्तित्वात आले. ● १९८७-मिझोरम हे भारताचे २३वे राज्य बनले. ● १८३५ - तीव्र भूकंपात चिलीतील कन्सेप्शन हे गाव नेस्तनाबूद. 💥 जन्म :- ● १९५१-गार्डन ब्राउन, इंग्लंडचे माजी प्रधानमंत्री 💥 मृत्यू :- ● २००१-इंद्रजित गुप्ता ,माजी केंद्रीय गृहमंत्री व कंम्युनिस्ट पक्षाचे नेते ● १९८५ - क्लॅरेन्स नॅश, अमेरिकन अभिनेता, डोनाल्ड डकचा आवाज. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी केंद्र सरकारकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (ट्रस्ट)ची स्थापना करण्यात आली असून दिल्लीत पार पडलेल्या ट्रस्टच्या पहिल्या बैठकीत महंत नृत्य गोपाल दास यांची ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांची सरचिटणीस पदी निवड करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना मोफत चष्मे, दहा लाख विद्यार्थ्यांना चष्मा वाटण्याचा निर्णय, सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दृष्टीदोष असलेल्या मुलांना निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी अथवा शाळेत मोफत चष्मा पोहचविण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीनमध्ये कोरोना विषाणू बळींची संख्या १८०० वर, एखाद्या रुग्णालयाचे संचालक कोरोना विषाणूचे बळी ठरल्याची ही पहिलीच घटना आहे.* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक घेतला निर्णय. पंतप्रधान पीक विमा योजनेत दुरुस्ती करण्यास सरकारने मान्यता देत, पीक विमा करायचा की नाही हे आता शेतकऱ्यांनाच ठरवता येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन प्रमुख निर्णय घेण्यात आले* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *अवघ्या दहा रुपयात उपलब्ध होणाऱ्या शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, या थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *मुंबई :  जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यासह देशभरात साजरी करण्यात आली* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *पाकिस्तानचं एक पाऊल मागे, आशिया चषकाचं यजमानपद सोडण्याचे दिले संकेत, पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांचं सूचक वक्तव्य* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *ठेविले अनंते तैसेचि राहावे* http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/07.html    लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घर वाळूचं - डॉ. दिलीप अर्जुने, नागपूर* आम्ही सगळी मंडळी रविवारची वाट पाहतो सुट्टीचा दिवस येताच मित्रांसोबत नदीवर जातो नदीच्या त्या किनारी वाळूत हात टाकून आनंदी होती आम्ही वाळूचं घर बांधून वाळूत खेळता खेळता दुपारी जातो आम्ही घरी शाळेचा अभ्यास करून सोमवारची प्रतीक्षा करी कसा निघून गेला रविवार कळत नाही येणाऱ्या रविवारची वाट पाहत राही *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• _*एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात. पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो.*_ *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1) *पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?* तामिळनाडू 2) *भारताच्या पूर्व दिशेला कोणता देश आहे ?* बांगलादेश 3) *महाराष्ट्रात राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा कोठे आहे ?* पुणे 4) *वानखेडे स्टेडियम कोठे आहे ?* मुंबई 5) *काळे सोने कशास म्हटले जाते ?* खनिज तेल *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.    प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड. 👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड 👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर 👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद 👤 नागेश पांडे शेवाळकर 👤 उत्तम कानिंदे 👤 संजय रुईकर, नांदेड 👤 सुनील साखरे 👤 शिरीष गिरी 👤 व्यंकटेश रोंटे 👤 शिवाजी पाटील 👤 साहेबराव कदम 👤 संतोष कामगोंडे 👤 विठठल डोनगिरे 👤 बालाजी उगले 👤 नागेश काळे 👤 विशाल खांडरे *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरंतर मरण्यासाठी शंभर बहाणे असले तरी जगण्यासाठी एक 'वजह' पुरेशी आहे. ही वजह सापडली की मनातील मळभ दूर होत जातं. इथेच संपतो माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास. ही वजह उराशी कवटाळून जगणारी माणसं ख-या अर्थानं आनंदयात्रेमधील 'पाथेय' ठरतात. बाबा आमटे, प्रकाश आमटे, अनाथांची माई सिंधूताई सपकाळ हे एक वजह घेऊन जगले. काळाच्या ओघात हे संदर्भ बदलतात नि पुन्हा सुरू होतो शोध नवीन कारणांचा नि जगण्याच्या नवीन वजहचा.* *ब-याचदा ती वजह सापडतही नाही हातात..... पण माणूस वाट पाहतो विवशतेतही एक नवा आशावाद साठवून आणि उभा राहतो या अक्षयी नि निरंतर फिरणा-या चक्राच्या मध्यभागी....जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत !* *एक कवी लिहून जातो...* *...सदियाॅ बित गयी टूटी* *हुई डोर को थामे* *शायद कोई वजह मिल* *जाए जिने की....!* *॥ रामकृष्णहरी ॥* 💚💚💚💚💚💚💚💚💚 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुप्रभात* *तुम्हाला जर वाटले की तुम्ही एखाद्या* *घटनेत बरोबर आहात, तर* *समोरून कसलाही वर्षाव* *होऊदया, रागवण्याची गरजच नाही,* *आणि समजा तुम्ही चुकले असे मन* *सांगते तर समोरचे* *स्वीकारण्याची ताकद ठेवा,कारण* *तुम्हाला या ठिकाणी* *रागावण्याचा हक्कच* *नाही.* *प्रयोग करून बघा पुढे जाल.* *अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला  नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या  अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत. कारण आपणही  कधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत. मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे. - व्यंकटेश काटकर,नांदेड.   संवाद. 9421839590. 🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारत्मकता* एक दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे .त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते .बैल आणखीनच हांब्रू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली . बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला . तात्पर्यः तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचारकरा सकारात्मक जगा. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment