✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट ~~~~~~~~~~~~~~~~~~  4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣             ( फ्रेश शालेय परिपाठ ) 🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00          ( रविवार आणि सुट्टी वगळून ) ~~~~~~~~~~~~~~~~~~~ 📅 दि. 07/02/2020 वार - शुक्रवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *स्वातंत्र्य दिन - ग्रेनेडा* 💥 ठळक घडामोडी :-  ● २००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर. 💥 जन्म :- ●१९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता. 💥 मृत्यू :- ● २००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया* 📱  9604481084 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 1⃣ *नवी दिल्ली : महाराष्ट्रासहपाणीटंचाईचा सहा राज्यांतील प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने जागतिक बँकेसोबत ‘अटल भूजल योजना’ सुरू केली आहे. सहा हजार कोटी रुपयांच्या या योजनेत महाराष्ट्रातील जालना, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यासह१३ जिल्ह्यांचा समावेश* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 2⃣ *कलाकारांसाठी 'सांस्कृतिक केंद्र' तयार करण्यासाठी नियोजन करावे- अमित देशमुख* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पेट्रोल खुल्या बाटलीत विकणाऱ्या पेट्रोलपंप मालकांवर कारवाई करा : आमदार प्रतिभाताई धानोरकर* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 4⃣ *ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न; विविध नागरी कामांचा ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 5⃣ *हिरे उद्योगाला 'कोरोना'चा फटका, 8000 कोटींचे नुकसान होण्याची शक्यता, 'दरवर्षी सूरतवरुन 50,000 कोटी रुपयांचे पॉलिश्ड हीरे हाँगकाँगला एक्सपोर्ट होतात'* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 6⃣ *बांगलादेशने उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, आता युवा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत थरार रंगणार आहे तो भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये* ••••••••••••••••••••••••••••••••••••• 7⃣ *मुंबई : भारताचा सायकलपटू रोजित सिंग याने ऐतिहासिक कामगिरी करताना पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. या शानदार कामगिरीमुळे आता जगातील अव्वल १८ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा समावेश होईल* ••••••••••••••••••••••••••••••••••••• *📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹* 📱 9960358300 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *हसा आणि हसवा* जीवनात हसण्याचे महत्व ....! वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा. http://nasayeotikar.blogspot.com/2015/11/blog-post_29.html     लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात ~~~~~~~~~~~~~~~~~~~ ✍ स्तंभलेखक  *नासा येवतीकर, धर्माबाद* 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃  *काव्यांगण - रोज एक बालकविता* 🌷🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक होता सावळा* - सौ. कुंदा विकास झोपे. उल्हासनगर ४.जि ठाणे. एक होता सावळा, भलताच बावळा. झाडावर दिसला, त्याला हो आवळा. उचलूनी दगड, आवळ्याला मारला, दगड सावळ्याच्या, डोक्यात पडला. झाडाने का मला, दगड मारला. सावळ्याला मोठा प्रश्न हा पडला. आईची शिकवण , आठवली त्याला. पेराल ते उगवेल, मनात बोलला. क्षमा मागितली, झाडाची त्याने. पुन्हा नाही मारणार, सांगतो मी खरे . झाड मग लागले, सावळ्याशी हसू. पान पान लागले, त्याच्या मनात ठसू. अलगद आली , वाऱ्याची झुळूक. पडता आवळे, खाल्ले चुटुक चुटुक. *सौजन्य :- जि. प. प्रा. कन्या शाळा धर्माबाद* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *" धैर्य हे प्रेमासारखे आहे. नुसत्या आशेच्या बळावर ते वाटेल तितके वाढते. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड* 📱 9403593764 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आजची प्रश्नमंजुषा* 1) *राम गणेश गडकरी यांचे रंगभूमीवर आलेले पहिले नाटक कोणते ?* प्रेमसंन्यास 2) *महाराष्ट्रातील कृष्णा व कोयना या नद्यांच्या संगमाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?* प्रीतीसंगम 3) *आयफेल टॉवर कोणत्या शहरात आहे ?* पॅरिस ( फ्रान्स ) 4) *भारतातील पहिली अणुस्फोट चाचणी कोठे झाली ?* पोखरण 5) *सर्वाधिक खोली असणारा महासागर कोणता ?* पॅसिफिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर* जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया 📱9765943144 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पंढरीनाथ बोकारे, पत्रकार, नांदेड 👤 भारत भाऊ राखेवार, नांदेड 👤 खंडु यरकलवाड बेळकोणीकर 👤 पवन गट्टूवार, सहशिक्षक, कुंडलवाडी 👤 विजय कुंडलीकर 👤 संतोष कोयलकोंडे, सहशिक्षक, देगलूर 👤 विनायक गोविंदराव पारवे 👤 साईनाथ येनगंटीवार 👤 कवी बी. एल. खान 👤 प्रसन्न करमरकर 👤 पोतन्ना चिंचलोड *ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*       [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ] •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••• •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥* *असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.* *खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        🌟! !  *प्रेरणादायी विचार* ! !🌟 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• मित्रांनो, संकटे रडणाऱ्याला भीक घालत नाहीत, तर ती लढणाऱ्याला भिऊन दूर पळून जातात. जीवनाच्या संघर्षात लढणे विसरू नका.प्रत्येक लढा एक नवीन धडा देऊन जातो. जिंकलात तर जग डोक्यावर घेईल,हारलात तर नवा अनुभव देईल.दोघांपासून सुखच ,मग स्वतःवर भरवसा ठेवा.आणि उतारा लढ्यात अगदी महाकाल बनून. जीवन कधी कधी अडथळ्यांची शर्यत बनते. पराभव, अपयश, जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा दुरावा किंवा मृत्यू, अपमान अशी संकटे एकापाठोपाठ येतात. कधी कधी एकापेक्षा आधिक संकटे एकत्र येऊन डोक्यावर धाडकन् आदळतात. आपण कोलमडून पडतो. निराशेच्या गर्तेत कोसळतो. सुखाचा किरणही कोठे दिसत नाही. भयाण काळोखात चाचपडताना बाहेर पडण्याची वाट सापडत नाही. खरंच, कधी कधी असं होतं पण; ही 'कधी कधी' घडणारी अवस्था तात्पुरती आणि आल्पकाल टिकणारी असते. ती संपून पुन्हा सुखाचा शिडकावा होणार असतो. सुखप्राप्ती ही माणसाची मुलभुत प्रेरणा आहे. त्या प्रेरणेच्या समाधानासाठी संकटाच्या किंवा दु:खाच्या प्रसंगी धीर धरावा लागतो. ओढवलेल्या परिस्थितीचा स्विकार करून, त्याच्यावर मात करण्याचे सामर्थ्य आणि स्वातंत्र्य आपल्याला माणूस म्हणून लाभले आहे, हे स्वत:ला पटवून दिले की दु:खाचा भयंकरपणा निम्म्याने कमी होतो. पुढची वाट दिसू लागते. आपल्याला हवा असलेला बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. त्यासाठी दुस-या कशावर किंवा कोणावर अवलंबून राहायचे नाही असे धोरण ठेवले तर दु:ख वेगाने दूर पळते आणि सुख चोरपावलांनी आत येते. जिंदगी हर कदम एक नई जंग है। जीत जायेंगें हम ,तू अगर संग है। अशोक कुमावत (राष्ट्रपती पुरस्कार विजेते) 📱 9881856327 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *🎯 आजचे विचारवेध......✍🏻* •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• सुख आणि दुःख हे प्रत्येक मानवी जीवनातले दोन वेगवेगळे रंग आहेत.सुखाच्या रंगात सारेच मिसळून जातात.त्यात एवढे रंगून जातात की,दुस-याची आठवणसुद्धा येत नाही.इतरांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या प्रयत्नातही नसतात.एवढा अपार आनंद होतो.पण दु:खाचे तसे नाही.दु:खात मात्र त्याला सगळ्यांचीच आठवण येते.आपल्याला अशावेळी आपल्याजवळ कुणीतरी यावं आणि दिलासा द्यावा असं वाटतं.दु:ख पचविण्याची ताकत त्याच्यामध्ये कमी असते.म्हणून अशावेळी आपल्या मदतीला कुणीतरी यावं यासाठी धावा करतो.अशावेळी मात्र आपल्यापासून आपले आणि इतरही लोक दूर जातात.परंतू एक लक्षात ठेवायला हवे,सुखाच्यावेळी आपण कुणाला विचारले नाही मग दु:खाच्यावेळी कसे बरे विचारतील ? म्हणून माणसाने सुख असो वा दु:ख असो दोन्ही समान मानून सदैव पाठीशी रहावे.एकमेकांच्या मदतीला धावून जावे.हाच सुखदु:खाचा मानवी जीवनव्यवहार आहे.हा व्यवहार आपल्या व इतरांच्या जीवनात समानतेने व्हावा एवढेच ज्ञात असावे. © व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. 🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.* अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?” बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले.  थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला.! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड* जि.प.प्रा.शा. गोजेगाव ता.हदगाव, जि. नांदेड http://www.pramilasenkude.blogspot.in 📱 9403046894 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे.  •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢* 📱 9423625769 ~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार  ~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments:

Post a Comment