*लुगड्याची गोष्ट*
रात्रीची वेळ ...........निरव शांतता ...........तेलाच्या दिव्याचा मीन -मीनता प्रकाश.
सावित्रीबाई पांघरून अंगावर घेऊन झोपण्याच्या तयारीत.... ज्योतीराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळावर हात ठेवतात.",सावित्री.....!" ज्योतीराव उद्गारले,"अगं, तुझं अंग गरम आहे. ताप येतोय का तुला?"
"आहो, एवढ काही नाही .थोडी कण-कण आहे, झालं." ,सावित्रीबाई.
"अग पण हि कण-कण वाढली तर आपल्या शाळेच कसं होईल? ,मुलींच्या शिक्षणाच काय होईल?........ते काही नाही,उद्याच वैद्यना बोलावतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील."',--ज्योतीराव.
"अहो, हा ताप औषधाने नाही जायचा." सावित्रीबाई.
"मग.?" ज्योतीरावांचा आश्चर्यचकित प्रश्न,.
" तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकलात तर हा ताप आपोआप जाईल." सावित्रीबाई.....
ज्योतीराव काहीश्या नाराजीने दुसऱ्या कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करू लागले.
त्यांचे विचारचक्र सुरु झाले.
लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही...........मग सावित्री असे का बर बोलली?..........तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते?...........आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्या करता आहेत ....बायकोच्या लुगड्या करिता नव्हे ............पण सावित्री शाळेत जाण्याकरिता लुगडं मागतेय म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार...........
विचार करीत-करीत ज्योतीराव झोपून गेले.
दुसऱ्याच दिवशी ज्योतीरावांनी सावित्रीबींच्या हातावर नवे लुगडे ठेवलं.
बाईंच्या डोळ्यात पाणी आलं...........लुगड्यासाठी खर्च लारायला ज्योतीरावांना खूप त्रास झाला असणार, कारण त्यांच्या जवळ जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरिता......सावित्रीबाई पक्क जाणून होत्या.
त्या नंतर बाईंना कधी ताप नाही आला.
ज्योतीरावांना आश्चर्य वाटले, "हे कस काय.".........लुगड्या साठी ताप घेणारी सावित्री नाहीच............
ज्योतीरावांनी सावित्रीबींचे शाळेतील सहाय्यक होते,त्यांची भेट घेतली.आणि त्यांना सविस्तर प्रसंग सांगितला.
*त्यांनी उलगडा केला,"सावित्रीबाई शाळेत येतांना लोक अंगावर शेण चिखलाचा मारा करतात.बाई शाळेत आल्यावर अंगावरील* *लुगड्यावरचे शेण चिखलाचे डाग धुऊन ओल्या लुगाड्याने दिवसभर शाळेत शिकवितात.त्या मुळे रात्री त्यांना ताप येत असेल.*
*परंतु आता तुम्ही त्यांना दुसरं लुगडं दिल्या पासून शाळेत आल्यावर लुगडं बदलून माखलेलं लुगडं धुऊन ठेऊन कोरड्या लुगड्याने शाळेत शिकवितात. त्या मुळे आत्ता त्यांना ताप येत नसेल."*
*आत्ता ज्योतीरावांच्या डोळ्यात पाणी आलं...........सावित्रीबींच्या महानतेस ज्योतीरावांनी मनोमन प्रणाम केला.................*
*महान दाम्पत्यांस प्रणाम करू या....*🙏🏻

No comments:
Post a Comment