अभंग

⛳अभंग⛳
*आधी बीज एकले*
*बीज अंकुरले,रोप वाढले*
*आधी बीज एकले*
*एका बीजापोटी तरू कोटी*
*कोटी जन्म घेती सुमनेफळे*
*आधी बीज एकल*े.....

⛳⛳⛳⛳⛳⛳
       नुसता विचार करून यश मिळत नाही तर ध्येय निश्चित करून प्रयत्न करावे लागतात. आपल्या कडे काहीही नाही किंवा अत्यल्प सुविधा आहेत म्हणून प्रयत्न करून काहीच फायदा नाही असा विचार बरेच जण करतात आणि साधारण आयुष्य काढतात.
       स्वतःकडे जे आहे त्यापासून सुरुवात करुन सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. एका बीजापोटी कोटीकोटी सुमनेफळे जन्म घेतात त्याप्रमाणेच प्रयत्नरुपी बीज पेरले तर यशाची फळे नक्कीच मिळतील.फक्त प्रयत्नरुपी बीज शुद्ध असले पाहिजे.

⛳जय संत तूकाराम महाराज

No comments:

Post a Comment