जीवन विचार

🔰🌸🔰🌸🔰🌸🔰🌸
*🌷🌷 जीवन विचार*🌷🌷

*〰〰〰〰〰〰〰🙏ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले🙏यांच्या जयंती निमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐💐💐*

 *📚 " विद्देविना गेले , वाया गेले पशू*
*स्वस्थ नका बसू विद्या घेणे."*📚

*शिकलेला समाजच देशाची सुधारणा करु शकतो.देशातील  शिकलेली सुसंस्कृत , स्वच्छ , सदाचारी, प्रामाणिक , शिष्टाचारी आणि शिस्तप्रिय लोक आपल्या भारत देशाच भवितव्य ठरवू शकतात.*
*माणसाला 'माणूस' बनवण्याच माध्यम आहे शिक्षण.शिक्षण म्हणजे जीवन आणि जीवन म्हणजे शिक्षण होय.*

*एक आदर्श स्त्री , एक आदर्श पत्नी आणि एक आदर्श माता म्हणून कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्री ही पुरुषाची खरीखुरी कर्मसंगिनी आहे.स्त्रीच्या शब्दाला प्रेम सेवा आणि समर्पण वृत्तीचं तेज लाभलेल असतं आणि म्हणूनच सहकार्य आणि सुधारणा या शब्दांना जो अर्थ प्राप्त झाला आहे त्याचे श्रेय प्रथम स्त्रीकडेच जाते.*
☘☘☘
*"दूर फेकूनी रूढी वारे*
*परंपरेची मोडूनी दारे"*
                    ☘☘☘
*आजच्या स्त्रीने अधिकाधिक धीट बनले पाहिजे.आपली दृष्टी विशाल केली पाहिजे.मनातील भ्रम टाकून निर्भय बनलं पाहिजे तरच खर्या अर्थाने स्त्रीने आपले  स्थान समाजात निर्माण केले असे म्हणणे योग्य ठरेल.*

〰〰〰〰〰〰〰〰
🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌸
*✍शब्दांकन /संकलन*
*श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

No comments:

Post a Comment