✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक 31/12/2022 💠 वार - शनिवार•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *वर्षातील शेवटचा दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● १६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.💥 जन्म :-● १८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव● १९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर● १९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला● १९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान● १९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स 💥 मृत्यू :- ● १९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे● १९९७: स्वरराज छोटा गंधर्व*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक संकेतस्थळावर केलं जाहीर बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नव वर्षाच्या स्वागतासाठी देश-विदेशातील हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *हिवाळी अधिवेशनाचा समारोप, पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारी 2023 पासून मुंबईत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्राकडून नव वर्षाचं गिफ्ट, NSC, KVC सह पोस्टातील ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनाच्या व्याजात वाढ, सुकन्या समृद्धी योजना आणि PPF मात्र जैसे थे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सीबीएसई परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं निधन, वयाच्या 100 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिला मुखाग्नी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महान फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, फुटबॉल जगतावर शोककळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-शोध चार मूर्खांचा👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/KKsc86pLWPU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू .........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html      लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       📙 *मुरमान्स्कचे बंदर* 📙जगातील सर्वात उत्तरेकडचे बंदर म्हणजे मुरमान्स्कचे बंदर. रशियाच्या उत्तरेकडच्या भागातील बव्हंशी भाग कायमचा गोठलेला असतो. विशेषत: हिवाळ्यात तर विचारायलाच नको. बॅरेंट्स समुद्रातील कोला खाडीजवळील एक भाग मात्र तेथील समुद्रप्रवाहामुळे बाराही महिने गोठतच नाही. संपूर्ण उत्तरेकडील समुद्राचे निरीक्षण करताना हा न गोठणारा बिंदू शोधून काढला तो दुसर्‍या निकोलस झारने. १९१६ साली बंदराची जागा नक्की केली जाऊन बंदर उभारणीसाठी तंत्रज्ञ तेथे पाठवले गेले. या शेवटच्या झारला भूगोल व विज्ञान दोन्हींची विलक्षण जाण होती. देशाला बारमाही बंदर हवेच, या कल्पनेने त्याला पूर्ण झपाटले होते. त्यातूनच या बंदराची उभारणी त्याने सुरू केली. मात्र बंदर पूर्ण होण्यापूर्वीच त्याची सत्ता जाऊन क्रूर हत्या झाली.१९१६ साली बंदरबांधणी झाली. त्या वेळी जेमतेम लाकडी घरातून उभारले गेलेले छोटेसे गाव आज आता मोठे शहर झाले आहे. सहा लाख वस्तीचे परिपूर्ण नांदते, रसरसते शहर ही सुद्धा या टोकाच्या हवामानातील एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणावी लागेल.झारची सत्ता गेली, तरी बंदर मोठ्या चिकाटीने उभे राहिले. ६९ अंश उत्तर अक्षांश व ३३ अंश पुर्व रेखांशांवर हे बंदर उभे आहे. आसपासचे वातावरण बहुधा वर्षभर शून्याच्या आसपास असते. रात्रीच्या वेळी उणे पंधरा ते उणे तीस सेंटिग्रेड यादरम्यान ते खाली जाते. आर्क्टिक प्रदेशातील झोंबरे वारे सतत वाहत असतातच.नोव्हेंबर महिन्यात इथला सूर्य शेवटचा मावळतो, तो एकदम संक्रांतीनंतरच उगवतो. प्रत्यक्ष बंदराच्या आसपास समुद्र जरी गोठत नसला तरी थोडा लांबचा टप्पा क्वचित गोठू लागतो. बंदरातील हिमफोड्या नौका ताबडतोब त्या दिशेने जाऊन रस्ते मोकळे करून देतात.अन्नधान्य, इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बाहेरून आणावा लागतो. पण मुरमान्स्क येथे दोन गोष्टींची उणीव नाही. खनिज तेल व मासे यांची प्रचंड साठवण व निर्यात या बंदरातून जगभर होते. सैबेरियन भागातून तेलाच्या विहिरीतून काढलेले तेल पाइपातून येथे आणून मग ते ठिकठिकाणी पाठवले जाते. या बंदराची भरभराट याच कारणामुळे होत गेली आहे.दोन्ही महायुद्धांमध्ये रशियाची रसद व नाविक हालचालींची ताकद मुरमान्स्क बंदरातच एकवटली होती. तिथपर्यंत पोहचायची सवय व या हवामानाला तोंड देण्याची ताकद फक्त रशियन नौदलातील नावीकांना होती. रशियाची पश्चिम बाजू जर्मनांनी व्यापली असल्याने या बंदरातून सर्व आवश्यक तो पुरवठा केला गेला व रशिया महायुद्धातून सुखरूप बाहेर येऊ शकला.आज भौगलिक उपयुक्ततेनुसार मुरमान्स्कचे स्थान अढळ बनले आहे, ते युरोपकडून जपानकडे वा जपानकडून युरोपकडे होणाऱ्या मोठ्या जलवाहतुकीमुळे. या वाहतुकीला मार्ग दोन. दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून. मध्यंतरी अनेक वर्षे सुवेझचा कालवा बंद होता, तेव्हा ही वाहतूक उत्तरेकडून वळवली गेली होती. आजही जेव्हा जेव्हा मध्य आशियात अस्वस्थपणा येतो, तेव्हा हाच रस्ता वापरला जातो. त्या प्रत्येक वेळी रसदीसाठी, मधल्या मुक्कामासाठी, दुरुस्तीसाठी मुरमान्स्कचा थांबा अटळ राहतो.दोन्ही ध्रुवांवर मानवाने पाय रोवला असला तरी जवळपास तितक्याच दुर्गम हवामानात पाय रोवून बारमाही व्यावहारिक जीवन जगायचे म्हणजे मुरुमान्स्कमध्ये काम करायचे असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••अडचणी येतात आणि जातात. फक्त जाताना आपलं वय घेऊन जातात.~ वपु काळे | पार्टनर*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'नगर जिल्ह्याची पर्यटन पंढरी' म्हणून कोणत्या परिसराला ओळखले जाते ?२) आयपीएल २०२३ साठी पंजाब किंग्सने सॅम करनला किती बोली लावून खरेदी केले ?३) द्रव आणि स्थायु यांचे मिश्रण कोणत्या नावाने ओळखले जाते ?४) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे ?५) वाळवंटामधील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) भंडारदरा परिसर २) १८.५० कोटी ३) जेली ४) नार्वे भुयार / सुरूंग ५) ओॲसिस *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 अनिल पावसकर, लेखक👤 रामचंद्ररेड्डी सामोड, येताळा👤 ताहेर पठाण, धर्माबाद👤 किरण अबुलकोड, समराळा👤 अमोल बुरुंगुले👤 शशांक पुलकंठवार👤 सचिन चव्हाण👤 करण यादव👤 मारोती बोलेवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्याला कोणी विचारले, कसे आहात, की आपले उत्तर असते "ठिक आहे, बरं चालले आहे" पण, झकास चालले आहे, मजेत आहोत." असे म्हणणारे कमीच असतात. परंतु शेजा-याचे, परिचिताचे कसे काय  चालले आहे, असे विचारले तर मात्र आपले उत्तर बदलते. अर्थात तेही शेजारी किती सख्खे आहेत, परिचित किती जवळचे आहेत वगैरेवर अवलंबून असते. "ते एकदम मजेत आहेत. त्यांना काय धाड भरली आहे." वगैरे उत्तरे आपण देतो. आपल्याबद्दल बोलताना असणारी सावधगिरी इतरांच्या बाबतीत फारशी नसते.**अर्थात हेही सारे सगळ्यांच्याच बाबतीत खरे असते असे नाही. स्वत:बद्दल गैरसमज असणारी मंडळीही असतात. आपण खूप विद्वान आहोत, खूप यशस्वी आहोत, खूप सुखी आहोत, असे मानणारे लोकही असतात. 'सुख' म्हणजे काय ? एक कल्पना? मनुष्य हा बुद्धिमान प्राणी आहे, असे म्हटले जाते. पण सुखाच्या कल्पनेमागे धावणा-या माणसाला पाहून ते खरे वाटत नाही. समर्थ रामदास म्हणतात--*  *"जगी सर्व सुखी असा कोण आहे.*   *विचारी मना तूचि शोधूनी पाहे."*            *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀       *संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••     ज्याप्रमाणे प्रत्येक वस्त्रामध्ये आडवा आणि उभा तागा एकमेकांच्या साथीने मिळून घेतलेला असतो तेव्हा ते वस्त्र किंवा कापड तयार होते.त्याचप्रमाणे संसारातही पती-पत्नी आपल्या संसाररुपी वस्त्राला नेहमी जपत असतात.कुठे जरी फाटले तरी त्या संसाररुपी वस्त्राला आपल्या विचाररुपी सुईने आणि समजदारीच्या दो-याने सतत त्या संसाररुपी वस्त्राला शिवत राहतात.कितीही त्याला ठिगळ लागले तरी चालेल पण त्या ठिगळरुपी,वस्त्ररुपी संसारुपी गोधडी जीवनाच्या शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी ही दोन धागे कार्यरत असतात.जर का त्यापैकी एकजरी धागा कमकुवत झाला तर ते संसारुपी वस्त्र वस्त्र म्हणून राहत नाही किंवा त्याला वस्त्रही म्हणत नाही.मग त्याला वापरुन वापरुन राहिलेली चिंधी म्हणून बाजूला फेकून दिली जाते.मग संसाररुपी वस्त्र एकसंघ राहत नाही.संसारात दोघांनाही तेवढाच अधिकार आहे तेवढा वस्त्रामध्ये आडवा आणि उभा धागा एकमेकांत गुंतून आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🏠🌷🏠🌷🏠🌷🏠🌷🏠•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••                     *परीस*एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.... त्यासाठी रस्त्यात जो दगडयेईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा असा त्याचादिनक्रम सुरू झाला दिवस गेले... महिने लोटले... वर्षे सरली.... पणत्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही ....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि मगतो फेकून द्यायचा....शेवटी तो माणूस म्हातारा झाला.... आणि ज्या क्षणि तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्यागळ्यातील साखळीकडे गेले...ती साखळी सोन्याची झाली होती.....दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा या नादात त्याचे साखळीकडेलक्षच गेले नाही....तात्पर्य:प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरीपरीस येत असतो...कधी आई- वडिलांच्या रूपाने, तर कधी भाऊ-बहीनीच्यानात्याने...तर कधी मित्राच्या मैत्रिणीच्या नात्याने .....तर कधी मार्गदर्शकाच्या नात्याने..... कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काहीअसतो किंवा बनतो त्यात त्यांचा बराच हातभार असतो ....... पण फार कमीलोक या परीसाला ओळखू शकतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 30/12/2022💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*रिझाल दिन - फिलिपाईन्स*💥 ठळक घडामोडी :- ● १८०३ - अंजनगाव सूर्जी येथे शिंदे व इंग्रज यांच्यात तह.● १९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोसनी अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेर येथे पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज फडकाविला.● १९५३ - जगात पहिल्यांदा रंगीत दूरचित्रवाणी संच अमेरिकेत विक्रीला. किंमत - १,१७५ डॉलर.● १९९६ - आसाममध्ये बोडो अतिरेक्यांनी रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. २६ ठार.● २००४ - भारत व एशियन गटाच्या देशांदरम्यान व्यापारी सहकार्य व शांततेचा करार.💥 जन्म :-● १८६५ - रुड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. मोगलीच्या कथा, कुमाऊंचे मानवभक्षक,जंगल बुक इ. लिहीले.मुंबईत जन्म.● १८७९ - रमण महर्षी, भारतीय तत्त्वज्ञानी.● १८८७ - कनैयालाल माणेकलाल मुन्शी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ, कायदेतज्ञ, गुजराती साहित्यिक.'भारतीय विद्याभवन' चे संस्थापक.💥 मृत्यू :-● १९७१ - विक्रम साराभाई, भारतीय अंतराळतज्ञ.● १९७४ - शंकरराव देव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा नेता व महात्मा गांधींचे सहकारी.● १९९२ - शाहीरतिलक पिराजी रामजी सरनाईक, मराठी शाहीर.● २००१ - हर्षद महेता, भारतीय शेअर दलाल.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात मविआकडून अविश्वास प्रस्ताव*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15 हजारांचा बोनस; विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या किंवा इतर शहर आणि राज्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना निवडणूक आयोगाचा दिलासा, रिमोट वोटिंग सुविधेची चाचपणी सुरु, तर १६ जानेवारीला सर्वपक्षीय नेत्यांची बैठकी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड ' या सहा देशांतून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाड्यात आचारसंहिता लागू ! शिक्षक मतदारसंघासाठी मतदान 30 जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बांगलादेशमध्ये पहिली मेट्रो रेल्वे सुरू, पंतप्रधान शेख हसीना यांनी दाखवला हिरवा झेंडा!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवे वर्ष २०२३मधील फेब्रुवारी महिन्यात टी-२० विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-8वा/ The vet कविता👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/CM2Hp0ZcRrE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *गरज तेथे मदत करा*     http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_8.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••📙 *किरणोपचार म्हणजे काय ?* 📙***************************अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असतात. यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थांचा समावेश होतो. क्ष-किरण, गॅमा किरण, अल्फा, बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसक अस्त्रामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सर्गाच्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्गांपैकी क्ष-किरण व गॅमा किरण हे शरीरात खोलवर जाऊ शकतात.क्ष-किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष-किरण फोटो काढण्यासाठी करतात. हाडे, स्नायू, हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष-किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात. याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष-किरण फोटो होय. किरणोत्सर्गी आयोडीनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे वा नाही हे बघण्यासाठी होतो.गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात. या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या सहाय्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियावर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो. किरणोत्सर्गामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात. सामान्यत: शस्त्रक्रियेने अथवा औषधी चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे किरणोपचाराने हजारो कर्करोगग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एका ओघळणाऱ्या थेंबामागे, न गाळलेले हजारो अश्रू असतात.~ वपु काळे | काही खरं काही खोटं*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) एकाच स्पर्धेत सर्वाधिक १७२ गोल करण्याचा नवा विक्रम कोणत्या विश्वचषकात झाला ?२) भारतातील पहिली सर्कस कोणी व केव्हा सुरू केली ?३) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे ?४) मराठी भाषेतून कोणत्या साहित्यकृतीला २०२२ चा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे ?५) चंद्रपूर शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?उत्तरे :- १) कतार फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ २) विष्णुपंत छत्रे, १८७८ ३) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ४) उजव्या सोंडेच्या बाहुल्या ( कादंबरी ) ५) ईरई नदी*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 किरण रणवीरकर, साधनव्यक्ती      गटसाधन केंद्र, धर्माबाद👤 मारोती छपरे, माध्यमिक शिक्षक, जिपहा धर्माबाद👤 निवृत्ती लोखंडे👤 राजेश्वर रामपुरे👤 साहेबराव कांबळे👤 आनंद यडपलवार, शिक्षक👤 संजय भोसीकर👤 भारत पाटील सावळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.**आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अहंकार आणि गर्व असू नये.*रामकृष्ण परमहंस आपल भक्तांसमोर प्रवचन देत होते. ते म्हणत होते, हे पहा, तुमच्यासमोर मी बसलेलो आहे, हे तुम्ही पाहता. पण मी एखादे वस्त्र माझसमोर धरले, तर मी तुम्हाला दिसणार नाही. तथापि, पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याजवळ आहे. कपडय़ाआड असल्याने तुमच्या   दृष्टीस मात्र पडू शकणार नाही. म्हणजे तुमच्या दृष्टीने अदृश्य होईन. तसाच परमेश्वरसुद्धा तुमच्या-माझ्या सर्वांच्या जवळ असतो. परंतु अहंकाराच्या पडद्यामुळे आपण त्याला पाहू शकत नाही. तुम्ही आपल्या डोळ्यांसमोर लहानसा कापडाचा तुकडा जरी धरला, तरी समोरचा मोठा पर्वत दृष्टीला अगोचर होईल.तात्पर्यं - अहंकार आणि गर्व यांचा पडदा जोपर्यंत आपण बाजूला करीत नाही, तोपर्यंत ईश्वराचा साक्षात्कार, ज्ञानप्राप्ती आपणाला होणार नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~4⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29/12/2022💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.● २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी💥जन्म● १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.● १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.● १९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी● १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.● १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.● १९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.💥मृत्यू● १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित● १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.● २०१२ - टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या तब्बल 50 विद्यार्थ्यांना घडवली दिल्लीवारी; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा अनोखा उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे उमेदवार अपात्र, अट शिथिल करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वर्षभरानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत भरला नाही तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल, तुरुंगवासही होऊ शकतो*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रणजी ट्रॉफीत रियान परागचा कहर! 28 बॉलमध्ये कुटल्या 78 धावा, 4 विकेट्सही घेतल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*वर्ग-6वा/ The man who never lied 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rTmgulFPx4Q~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखाधिकारी संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माहितीपर लेखhttps://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_26.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रामानंद सागर*चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.सौजन्य :- विकिपीडिया••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे नाव काय आहे ?२) भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील ?३) आयपीएल २०२३ साठी सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?४) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धला असेही म्हणतात ?५) संगणकातील RAM चे फुल फॉर्म काय आहे ?*उत्तरे :-* १) प्रवीण बांदेकर २) केशरी, पांढरा, हिरवा ३) सम करन, इंग्लंड ४) भूगोलार्ध ५) Random Access Memory *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 संतोष ह. कंदेवार, लेखाधिकारी, नांदेड👤 किशोर प्रभाकर पेंटे👤 सुरेश सुतार👤 विजय रणभीडकर, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.**अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्यांच्या पाठीवर अपेक्षांचे ओझे आहे तो माणूस जीवनात कधीही सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही.म्हणून माणसाने जीवनात निरपेक्ष वृत्तीने जीवन जगायला शिकले पाहिजे.*© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 28/12/2022 💠 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-●१६१२ - गॅलेलियोने नेपच्यून ग्रहाची नोंद केली परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.●१८३६ - स्पेनने मेक्सिकोचे स्वातंत्र्य मान्य केले.● १८४६ - आयोवा अमेरिकेचे २९वे राज्य झाले.● १८७९ - डंडी, स्कॉटलंड येथे टे रेल्वे पूलावरून गाडी जात असताना गाडीसह कोसळला. ७५ ठार.💥 जन्म :-● १८९९ - गजानन त्र्यंबक माडखोलकर, मराठी साहित्यिक व पत्रकार.● १९३२ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.● १९३७ - रतन टाटा, भारतीय उद्योगपती.💥 मृत्यू :-● १९६७ - द.गो.कर्वे, अर्थशास्त्रज्ञ; कुलगुरू, पुणे विद्यापीठ; प्राचार्य, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय.● १९७१ - नानकसिंग, पंजाबी साहित्यिक.● १९७७ - सुमित्रानंदन पंत, हिंदी कवी.● २००० - मेघश्याम पुंडलिक रेगे, भारतीय विचारवंत.● २००० - उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर, ध्रुपदगायक, डागरबंधूंपैकी एक.● २००३ - चिंतामणी गणेश काशीकर, कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ.● २००३ - कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाउ ठाकरे.● २००६ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राजधानी गारठली! तापमान 5 अंशांवर, दिल्ली धुक्यात हरवली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *तब्बल दोन वर्षांनंतर मुंबईत रंगणार माणदेशी महोत्सव; 5 जानेवारीपासून होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *2 जानेवारीपासून दहावी, बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा, CBSE बोर्डाकडून गाईडलाईन्स जारी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अनिल देशमुखांची आज सुटका होणार, आर्थर रोड जेल ते सिद्धिविनायक मंदिर बाईक रॅली काढण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शेतकऱ्यांची चिंता वाढली, 10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई - अहमदाबाद महामार्गावर केमिकल टँकरला भीषण आग, एकाच मार्गाने वाहतूक सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेण्याचा विराट कोहलीने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*वर्ग-7वा/Two Fables गोष्ट The town mouse and country mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/SvsWxV6eiuM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                  *गुरुदक्षिणा*मोटे सरांना मोबाईलवर बोलल्यापासून डॉ.गिरीश अस्वस्थ वाटत होता. त्यांच्या चेहर्‍यावर काळजीची लकेर स्पष्ट दिसत होती. पहिल्यांदाच मोटे सरांनी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त केली होती. ती अपेक्षा पूर्ण करणे डॉ.गिरीशच्या डाव्या हाताचा मळ होता. परंतु त्यासाठी मोटे सरांना डॉ.गिरीश ज्या दाते मेमोरियल ............वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/04/blog-post_53.html     लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🔬 *सूक्ष्मदर्शक यंत्र कसे कार्य करते ?* 🔬जीवशास्त्राचे प्रयोग दाखवताना तुम्हाला सरांनी सूक्ष्मदर्शक यंत्र दाखवले असेलच. सूक्ष्मदर्शक यंत्रातून पहिल्यावर पेशी किंवा इतर सूक्ष्म जीव कित्येक पटीने मोठे असलेले आपल्याला दिसतात. हे कसे होते ते आता पाहू. साधे काचेचे भिंग घ्या. त्या भिंगातून वर्तमानपत्रातील अक्षरांकडे पाहा. अक्षरे मोठी झालेली दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्र याच तत्त्वावर काम करते. सूक्ष्मदर्शक यंत्रांमध्ये भिंगे अशा प्रकारे बसवलेली असतात की त्यांच्या एकत्रित परिणामांमुळे आपल्याला वस्तू हजारो पट मोठ्या दिसतात.पेशी, सूक्ष्म जीवजंतू आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. कारण त्यांचे मोजमाप १ मी.मी. च्या हजाराव्या भागाच्या प्रमाणात केले जाते. विषाणू तर याहूनही लहान असतात. त्यामुळे हजारो पट मोठे केल्यानंतरच हे जीव वा पेशी आपल्याला दिसू शकतात. पेशी व सूक्ष्म जीवजंतुच्या परीक्षणामुळे रोगाची अवस्था समजते आणि व्यक्ती रोगी आहे का ते कळते. रोग बरा होतो आहे काय तेही समजते. क्षयरोग, हिवताप, कुष्ठरोग, कॉलरा, हगवण आदी रोगांमध्ये तसेच रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, इतर कर्करोग यातदेखील सूक्ष्मदर्शकद्वारे केलेल्या तपासणीमुळे रोगाचे निदान होते व उपचार करण्यास मदत होते.*असे हे सूक्ष्मदर्शक यंत्र म्हणजे सूक्ष्म जीवांच्या अजब गुहेत प्रवेश करण्यासाठी मानवाला लाभलेला जादूचा दिवाच बनले आहे.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी कोण असतो ?२) वनस्पतींना संवेदना असतात हा शोध कोणी लावला ?३) फोर्ब्सने जारी केलेल्या २०२२ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांमध्ये प्रथम स्थान कोणी पटकावले ?४) मराठी अभिजात भाषा समितीच्या अहवालानुसार कोणता ग्रंथ आद्यग्रंथ ठरतो ?५) बुद्धिबळाच्या पटावर एकूण किती घरे किंवा चौकोन असतात ?*उत्तरे :-* १) जिल्हाधिकारी ( कलेक्टर ) २) जगदीशचंद्र बोस ३) नाओमी ओसाका ( टेनिसपटू ), जपान ४) गाथा सप्तशती ५) चौसष्ट *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साई पाटील, धर्माबाद      श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस👤 वृषाली वानखडे, अमरावती      सामाजिक कार्यकर्ती & साहित्यिक👤 श्रीधर सुंकरवार, नांदेड👤 व्यंकटेश माडेवार, धर्माबाद👤 अजय तुम्मे👤 योगेश शंकर ईबीतवार, येवती👤 नंदकिशोर सोवनी, पुणे👤 ओमसाई सितावार, येवती👤 ओमकार ईबीतवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*रंग, शब्द, स्वरास एकाग्रचित्ताची समाधी लागली की, अवीट सौंदर्याचा आविष्कार घडतो. राष्ट्रे मोठी होतात ती एकाग्रचित्तानं, प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या बळावर; आळशी माणसांवर नव्हे. जीवन सुखाने जगण्यासाठी, आनंदासाठी, हसण्यासाठी, गाण्यासाठी, खेळण्यासाठी आहे; रडण्यासाठी नव्हे. आळशी माणसांवर रडण्याची वेळ येते. आळसाची सवय झाली की, माणूस आळशीपणाचा गुलाम बनतो. खरंतर आळशी माणूस बंद पडलेल्या घड्याळासारखाच असतो. परमेश्वराने माणसाला दोन हात आणि एक तोंड दिले आहे. याचाच अर्थ, दोन हातांनी काम करा आणि तोंडाची भूक भागवा.**माणसाच्या हाताची पाच बोटे म्हणजे एक सुंदर महाकाव्यच ! बोटांचा जिथं स्पर्श होईल तिथं स्वर्ग निर्माण होईल. यासाठी आळसाला कायमची सुट्टी द्या. आळशीपणा हेच अनेक दुर्गुणांचं उगमस्थान असतं. प्रेमाने प्रेम वाढते, द्वेशाने द्वेष, यशाने यश, विश्वासाने विश्वास वाढतो; तसे आळसाने आळस वाढतो. आपल्यासाठी कोणीतरी काम करावे आणि आपल्याला आरामात जगता यावे, ही आळशी माणसाची वृत्ती. आळशीपणाने सतत आराम करण्यात वेळ घालवणे म्हणजे जिवंतपणी आत्महत्या करण्यासारखे आहे. आळस माणसाच्या मनाला जडलेला कर्करोग आहे, असे हेडवूड नावाच्या विचारवंताने म्हटले आहे. 'दैव देईल ते मी घेईल' असे म्हणणारे लोक आळशीच. कष्ट करून मला मिळेल ते घेईन असे म्हणणारे लोक उद्योगी असतात.*         *'हे ईश्वरा माझे हाती काम दे*         *परी ते करण्याची शक्ती दे.'*       ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••   ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡           *--संजय नलावडे, मुंबई*         *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी किंवा त्या संकटाला तोंड देण्यासाठी जी व्यक्ती सदैव तयार असते तीच व्यक्ती जीवनात यशस्वी होते. संकटं ही प्रत्येकाच्या जीवनात कमी-जास्त तर असणारच.... पण संकटाला पाहून दूर पळून जाणारी फार असतात.कारण एकीकडे  त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नसते,ते हतबल होतात,त्यांची मानसिकता नसते,दूरचा विचार करत नाहीत त्यामुळे त्यांचा जगण्याचा त्यांच्यावरच विश्वास नसतो.त्यामुळे संकटासमोर शरण जातात.तर दुसरीकडे काही व्यक्ती कोणत्याही संकटाला तोंड द्यायला तयार असतात.काही असो आपण त्या संकटाला तोंड दिलेच पाहिजे जर नाही दिले तर आपण जगणार कसे ? आपल्यासमोर उभे आयुष्य आहे ते कसे जगणार ?आज आपण सामोरे नाही गेलो तर जगण्याला अर्थच काय राहणार ? नाही आपल्याला जगायचे तर मग पुढे कसे जीवन जगणार ? जगायचेच असेल तर पहिल्यांदा आपला आपल्यावर आत्मविश्वास ठेवायला हवा आणि त्या आत्मविश्वासावरच पुढे पुढे पाऊल टाकायला हवे आणि त्याप्रमाणे जगायला हवे अशी सकारात्मक विचार घेऊन जगणारी व्यक्तीच जीवन चांगल्याप्रकारे जगू शकते. अशा आशादायी, ध्येयवादी असणा-या व्यक्तींचे अनुकरण करायला हवे  आणि  कोणत्याही संकटाला तोंड देणा-या अशा व्यक्तीकडे पाहिले तर अनुकरण करणा-या व्यक्तीला अधिक बळ मिळते आणि पुढील संकटाला सामोरे जाण्यासाठी तयार होते.म्हणून कोणत्याही संकटाला न घाबरता सामोरे जाऊन जीवन जगायला शिकले पाहिजे.तरच जीवन जगण्याला अर्थ आहे.अन्यथा जीवन व्यर्थच आहे असे समजावे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *समाधान*मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली. पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, 'क्या बात है देवा! तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली.' पण एकावेळी दोन्ही दाणे उचलणे मु़ंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली.तेव्हा कबीर म्हणाले, 'वेडाबाई! तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल, तर वरणाचा त्याग करावा लागणार आणि वरण हवे असेल, तर भाताचा त्याग करावा लागणार.'तांदळाचा दाणा गवसल्यावर अतिशय आनंदाने, समाधानाने व लगबगीने आपल्या वारुळाच्या दिशेने निघालेल्या मुंगीचा आनंद व समाधान, डाळीने हिरावून घेतला.माणसाचंही तसंच आहे. जोवर समोर विकल्प उपलब्ध नसतो, तोवर माणूस आहे त्या गोष्टीत समाधानी असतो. पण विकल्प निर्माण झाले, की ते त्याचा आनंद आणि समाधन क्षणात हिरावून घेतात..!तात्पर्यः शक्य तेवढया मिळालेल्यात समाधानी राहणे हेच योग्य.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/12/2022💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉ पंजाबराव देशमुख जयंती*💥 ठळक घडामोडी :-●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.● १९४५ - कोरियाची फाळणी.●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.💥 जन्म :-● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पोटदुखीच्या त्रासामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, एम्समध्ये उपचार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कर्नाटकात शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती, नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ, फुल क्रीम दूध आता 66 रुपये लिटर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची आई मीनल गावस्कर यांचे मुंबईत निधन, ते 95 वर्षाच्या होत्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे*जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ?गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  🦈🐟 *मासे* 🐟🦈       ********************मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ख्रिसमसचा शब्दश: अर्थ काय आहे ?२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बुट'चा पुरस्कार कोणी पटकावला ?३) एका झाडाच्या अन्नरसावर जगणाऱ्या दुसऱ्या झाडास काय म्हणतात ? ४) मांजर नराला बोका तर मांजर मादीला काय म्हणतात ?५) इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे ?उत्तरे :- १) क्राइस्टस मास अर्थात येशूच्या जन्मनिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना २) किलियन मबापे ३) परजीवी ४) भाटी ५) ऑक्सफर्ड विद्यापीठ *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 पूजा बागूल, साहित्यिक, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी   कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *यशाचे बिजगणित*आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी  टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्‍या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्‍या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 26/12/2022💠 वार - सोमवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ● २००४ - हिंदी महासागरात इंडोनेशियाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.३ तीव्रतेचा भूकंप. यानंतर आलेल्या त्सुनामीत भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव, इ. देशात ३,००,०००हून अधिक मृत्युमुखी.● १९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.● १९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.💥 जन्म :-● १८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग ● १९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर ● १९१७ - प्रभाकर माचवे मराठी व हिंदी साहित्यिक.● १९३५ - डॉ. मेबल आरोळे मॅगसेसे पारितोषिक विजेत्या.(रजनीकांत आरोळे यांच्या पत्नी)● १९४८: डॉ. प्रकाश आमटे💥 मृत्यू :- ● १९७२ - हॅरी ट्रुमन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.● १९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा● २०११ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *2022मध्ये देशाला मिळाली गती, लोकांनी रचला इतिहास ; भारताची अर्थव्यवस्था 2022 मध्ये पाचव्या क्रमांकावर 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींकडून देशवासियांच्या पाठीवर शाबासकीची थाप*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईत हुडहुडी वाढली, पारा 15 अंशावर ; यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, उत्तर भारत गारठला, महाराष्ट्रातही पारा घसरला*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *औरंगाबादेतील कचनेरच्या जैन मंदिरातील दोन किलो सोन्याची मूर्ती बदलली; रंग फिकट पडल्याने घटना उघडकीस, पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी पाहणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक, मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारतरत्न पं.भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीकरांना दोन दिवसीय शास्त्रीय संगीताची मेजवानी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *देशभरात नाताळचा उत्साह, मध्यरात्री साजरा करण्यात आला प्रभु येशु ख्रिस्ताचा जन्मदिवस.. राज्यभरातील चर्च आकर्षक रोषणाईने सजल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बांग्लादेशला क्लिन स्वीप देत टीम इंडियानं रचला इतिहास, आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय, सामनावीर आर. अश्विनची ऐतिहासिक कामगिरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-7वा/Two Fables गोष्ट Two Friends and bear👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/MR09Z6mlqx0~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे*( जन्म २६ डिसेंबर १९१४ - मृत्यू ९ फेब्रुवारी ९ २००८ ) हे एक मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपू, महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचे आश्रम सुरू केले. ते कुष्ठरोग्यांसाठी आणि समाजातील इतर उपेक्षितांसाठी खूप झटत होते. याशिवाय 'वन्य जीवन संरक्षण', 'नर्मदा बचाओ आंदोलन' अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे 'संत' या नावाने गौरवले आहे.अधिक माहिती मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संकलन :- *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      💉 *लस म्हणजे काय ?* 💉*अनेकदा लस लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते.**बर्‍याचदा आपण बघतो की उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर मात्र उन्हाचा तेवढा त्रास होत नाही. नेहमी घरचेच वॉटरबॅगचे पाणी पिणारा मुलगा बाहेरचे पाणी प्यायला तर त्याच्या पोटात दुखते, संडास लागते. शरीराला एखाद्या गोष्टीची सवय झाली तर नंतर त्रास होत नाही, असे साध्या भाषेत म्हणता येईल. पण शरीराला जीवजंतूंची सवय होते का ? सवय म्हणण्यापेक्षा जीवजंतूंचा अनुभव येतो असे म्हणता येईल. एकदा अनुभव पाठीशी असला म्हणजे शरीर दुसऱ्यांदा त्या जीवजंतूंशी चांगला लढा देऊ शकते. एकदा गोवर झाल्यावर सहसा परत होत नाही, ते याचमुळे. हे का होते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.**शरीरात रोगप्रतिकार शक्ती दोन प्रकारे निर्माण होते. जंतू शरीरात शिरल्यानंतर त्यांच्यातील प्रथिन वा कर्बोदक घटकांसाठी शरीरात प्रतिकार करणारी द्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात किंवा जंतूंना मारण्यासाठी पेशींचे प्रशिक्षण होते. या दोन्ही मार्गांनी जीवजंतू पुढच्यावेळी आले तर त्यांना मारून टाकता येते. पण प्रत्येक वेळी आधी जीवजंतूंचा शरीरात प्रवेश करून घेऊन रोगाला सामोरे जाणे परवडण्याजोगे नसते. यासाठी शास्त्रज्ञ जंतूंना अर्धमृत (Attenuate) करतात वा पूर्णपणे मारतात. असे अर्धमृत वा मृत जंतू शरीरात गेल्यावर रोग निर्माण करू शकत नाहीत. पण त्यांच्याविरुद्ध प्रतिकार करणारी द्रव्ये आणि प्रशिक्षित पेशी तयार होतात. लसी अशाच अर्धमृत वा मृत जंतू किंवा त्यांच्यातील घटकांपासून बनवलेल्या असतात. लस देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. ५००० वर्षांपूर्वी चिनी लोक देवी रोग होऊ नये म्हणून लसीकरण करत. अशी वैद्यक इतिहासात नोंद आहे. पहिले शास्त्रोक्त लसीकरण करण्याचा मान एडवर्ड जेन्नरकडे जातो. त्याने १७९६ मध्ये देवी रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण केले.**आज आपल्याकडे क्षयरोग, गोवर, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, कॉलरा, रेबीज, विषमज्वर, कावीळ तसेच गालफुगी अत्याधिक रोगांवरील प्रतिबंधक लसी उपलब्ध आहेत. लसीकरणामुळे बऱ्याच गंभीर रोगांचा प्रतिबंध आपण करू शकलो आहोत.**डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते, तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) बाबा आमटे यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?३) 'आधुनिक भारताचे संत' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रुषेसाठी कोणत्या आश्रमाची स्थापना केली ?५) बाबा आमटे यांना समाजसेवेसाठी कोणकोणत्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?*उत्तरे :-* १) हिंगणघाट, वर्धा ( २६ डिसेंबर १९१४ ) २) मुरलीधर देवीदास आमटे ३) बाबा आमटे ४) आनंदवन ५) डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 नरसिंग जिड्डेवार, भोकर👤 नागराज राजेश्वर डोमशेर👤 आकाश सरकलवाड, धर्माबाद👤 कपिल जोंधळे👤 अशोक लंघे👤 शाडूल शेख*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••*मानवाचं मन... अनेक प्रकारचे सुखदु:खात्म प्रसंग, विवंचना, काळजा, आसूया, स्पर्धा, द्वेष, मत्सर, उत्सुकता आणि कुतूहल...यांनी सदैव त्याचे मन 'पिसाट' झालेले. अप्राप्याचा ध्यास म्हणजे आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याचा अथक प्रयत्न आपण सारे करीत असतो; पण 'मन:शांती' चा शोध घ्यायला नेमके विसरतो. 'मन:शांती' हे महत्वाचे जीवनसूत्र आहे, हेच आपण या सा-या धबडक्यात हरवून जातो. 'निरंजनी आम्ही बांधियेले घर' असे संतवचन आहे. ही निरांजनावस्था महत्वाची. जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काही करावे लागते. यातून त्याची सुटका नाही. मनाची सर्वार्थाने मुक्तता तशी कठीणच. कारण वैयक्तिक भावभावना, विकार-विचार आणि अहंकार यापासून स्वत:ला अलग करणे जवळजवळ अशक्यप्राय.* *पाण्यात पडले म्हटले की कोणीही ओलाचिंब होणारच. मात्र एखादा खडक त्या जलाशयात असेल तर तो पाण्यात राहून अलिप्तच की ! अशी अलगता संसारात राहून साधायची, म्हणजे शरीरक्रिया चालू आहे पण मन मात्र अलिप्त आहे. त्याच्या पृष्ठभागावर कोणत्याच लहरी नाहीत, तरंग नाहीत. मनाच्या समधात अवस्थेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी 'नुरोनिया ठेला' असे केले आहे. म्हणजे बाह्यस्वरूपी तो इतका निश्चल की जिवंत आहे का, हा इतरांना प्रश्न पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणूकाही जिवंत नाही, असे वाटावे असा... त्याच्या मनाच्या या अवस्थेला 'सहजस्थिती किंवा 'निजस्थिती' असेही त्यांनी म्हटले आहे. हे क्षण प्राप्त व्हावे, असे वाटत असल्यास संतानी सांगितलेला उपाय म्हणजे नामस्मरण...' नामापरते सुख नाही रे सर्वथा !' हाच तो सद्रगुरूपदेश...*        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••नशिब आणि परिश्रम हे जीवनाचे वेगवेगळे दोन भाग आहेत.पण जीवनात नशिबापेक्षा परिश्रमालाच अधिक महत्त्व द्यायला हवे.नशिब हे माणसाला परिश्रम करु देत नसल्याने तो फक्त आणि फक्त न्यूनगंडपणा निर्माण करतो त्यामुळे त्याच्या जीवनाची काहीच प्रगती होत नाही.तर परिश्रमाचे तसे नाही.परिश्रमाने माणूस काही ना काहीतरी करुन जीवन घडवण्याचा प्रयत्न करतो.त्यामुळे त्याच्या जीवनात आपण काहीतरी करत असल्याची जाणीव निर्माण होते आणि चांगले जीवन जगण्याची आणि जीवनात परिश्रमाशिवाय प्रगती होत नाही असे कळायला लागते.म्हणून जीवनात नशिबापेक्षा परिश्रमालाच महत्वाचे स्थान द्यायला हवे तरच मग आपल्या नशिबाचे दार आपोआपच खुलते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *वडिलांना मदत*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 डिसेंबर 2022💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भारतीय ग्राहक दिन.*💥 ठळक घडामोडी :- १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.१७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.१८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.१८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.१९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.💥 जन्म :-१८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.१९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.१९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :- १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.१९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.१८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तर सिक्कीम मध्ये भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू; आर्मी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोनामुळे चिंता वाढली! आजपासून मुंबई विमानतळावर प्रवाशांची कोविड चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोदी सरकारचा मोठा निर्णय,  वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, 25 लाख जणांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा, घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरल सॅम करन, 18.50 कोटींना पंजाबमध्ये सामिल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-रोज व रॉकी बनवतात निसर्गमित्र👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/I-kl1IrukTM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख*मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजीपांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *मोहम्मद रफी*मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन ,  धर्मेंद्र ,  जितेंद्र  आणि  ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बॉल' विजेता कोण ? २) अर्जेंटिना या देशाची राजधानी कोणती ?३) भारतातील सर्कसीचे उगमस्थान कोणते ?४) 'गुळाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?५) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?*उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना २) ब्यूनस आयर्स ३) सांगली, महाराष्ट्र ४) कोल्हापूर ५) सिकंदर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, धर्माबाद 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार,👤 शिवकुमार शिंदे, धर्माबाद👤 नितेश पांचाळ, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..**तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...**"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."*        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुई आणि वाघ*एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?'सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ?विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते.'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का?सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल.सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात.थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो.शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 23/12/2022💠 वार - शुक्रवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आज वेळ अमावस्या आहे. याला येळावस असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.*💥घडामोडी● १९२१ - शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.● १९२२- बीबीसी रेडिओचे दैनिक बातम्यांचे प्रसारण सुरू● १९७० - वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला● २००० - कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी💥जन्म● १८४५ -- रासबिहारी घोष, प्रसिद्ध कायदेपंडित, देशभक्त. काँग्रेस पक्षाचे नेते आणि अध्यक्ष● १९०२ - चौधरी चरण सिंग, भारताचे पाचवे पंतप्रधान💥मृत्यू● २००४ - पी. व्ही. नरसिंहराव, भारतीय पंतप्रधान.● २००८ - गंगाधर महांबरे, मराठी साहित्यिक.● २०१० - ज्ञानेश्वर नाडकर्णी, मराठी कला समीक्षक व लेखक.● २०१० - के. करुणाकरन, केंद्रीय उद्योगमंत्री, केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *कोल्हापूरमध्ये आजपासून अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क, सॅनिटायजर वापरा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलंय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जेईई अडव्हान्स 2023 चे वेळापत्रक IIT गुवाहाटीने जाहीर केले आहे. यंदा ही परीक्षा 4 जून रोजी होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *लहान मुले व वृद्ध नागरिकांनी शक्यतो मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीसाठी प्रवीण बांदेकर यांना ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुण्यातील कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन, त्या आजारी असल्यानं त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाच्या आर. अश्विन आणि उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेश संघाचा पहिला डाव 227 धावावर संपुष्टात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-1ला/Let's know new words👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/irTKkYVGU6U~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *राष्ट्रीय किसान दिनानिमित्त**शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर .....!*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.https://nasayeotikar.blogspot.com/2016/02/blog-post_20.html?m=1लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *राष्ट्रीय किसान दिन*किसान दिन हा दरवर्षी भारतात २३ डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा हा जन्मदिवस संपूर्ण भारतात किसान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी किसान घाटावर त्यांना सलामी दिली जाते. शासनाकडून वेगवेगळी प्रदर्शने आणि शेती संबंधित कार्यशाळा आयोजित केल्या जातात.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे राज्यस्तरीय महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे यजमानपद कोणत्या संस्थेला देण्यात आले आहे ?२) 'सम्राट अलेक्झांडरचे वंशज आम्हीच' असे हिमाचल प्रदेशमधील कोणत्या गावाने दावा केला आहे ?३) 'हळदीचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?४) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता ?५) सर्वाधिक घनदाट जंगलाच्या बाबतीत पहिले तीन देश कोणते ?*उत्तरे :-* १) इको - प्रो संस्था, चंद्रपूर २) मलाणा, शिमला ३) सांगली ४) चीन ५) रशिया, ब्राझील, कॅनडा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 मोहन बारदवार, धर्माबाद👤 सार्थक सुगंधे, धर्माबाद👤 चिं. श्रीपाद हणमंलू शंकरोड, येवती👤 गंगा देवके👤 प्रवीण गुंटोड👤 ज्ञानेश्वर ताटीकुंडलवार👤 राजू पाटील कुरुंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आपल्या मुखावाटे आपल्या शरीरात जे अन्न जाते, त्यावर आपण खूप नियंत्रण ठेवतो. आपण आपला आहार सदोदित संतुलित ठेवायचा प्रयत्न करतो. वैद्दकिय सल्ल्यानुसार आवश्यक ते पथ्य पाळतो. जेवायच्या आधी आपण दररोज स्वच्छ हात धुतो. शुद्ध पाणी पितो. वेळोवेळी आपण उपवास करतो. आपल्या तोंडातून जे काही आत जाते ते पोटात जाते आणि शेवटी ते शरीराबाहेर टाकले जाते. हे आपल्याला माहित असूनसुद्धा ही सगळी काळजी आपण घेतोच.**पण आपल्या मुखावाटे बाहेर पडणा-या शब्दांची तशाच प्रकारची काळजी आपण घेत नाही. ज्या मुखातून आपण परमेश्वराचे गुणगान करतो, त्याच मुखातून आपण खुशाल अपशब्द उच्चारतो. ज्या झ-यातून केवळ निर्मळ पाणी झरले पाहिचे, तो झरा आपणच प्रदूषित करतो. आपल्या अमंगल वाणीने तो झरा आपणच विटाळून टाकतो.*        ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••एखाद्याच्या जीवनाचा जीवनसंघर्ष म्हणजे एक चित्रपटच असतो. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग सुखदु:खाच्या खाचखळग्यांनी ओतप्रोत भरलेले असते. तरीही ते डगमगत नाहीत. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊन जीवन जगण्याचे खरे ध्येय ते गाठतातच. परिस्थिती कशीही असो त्याला हाताळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी ठायी वसलेले असते. म्हणूनच त्यांच्या आदर्शाचा परिपाठ आपण आपल्या जीवनात अनुसरायला हवा. तरच आपल्याला जीवन जगण्याची चांगली प्रेरणा मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••    *सिंहाचा जावई*एकदा एक सिंह जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे सिंह उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' सिंहाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर सिंह म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' सिंहाने ते मान्य केले. त्याप्रमाणे सिंहाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.तात्पर्यः*आपल्या कुवती बाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरलीतर स्वत:चाच नाश ओढवतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 डिसेंबर 2022💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 .  *दिनविशेष .  🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आज उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते*💥घडामोडी●१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.● १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.● १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.● १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.● १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.💥 जन्म :-● १९६३- गोविंदा, हिंदी चित्रपट अभिनेता● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत, भारतीय क्रिकेटपटू● १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश💥 मृत्यू :-● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; बाबा आढावांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती असल्याचा दावा, तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बृहन्मुंबई महापालिकेतील  प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; राज्य सरकारचं कोर्टात स्पष्टीकरण..  सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रजासत्ताकदिनी परेडसाठी  महाराष्ट्राचा चित्ररथ  नसण्याची शक्यता, अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण,  त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीच्या रामलीला मैदानात जमले 50 हजार शेतकरी, केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची करून दिली आठवण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून दुखापतीमुळे रोहित शर्मा व नवदीप सैनी अनफिट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-6वा/Ecofriendly celebration👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/SKXBbzS1ZNM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपक्रम :- वाचू आनंदे*इयत्ता पहिली ते आठवीसाठी उतारा खालील लिंकवर उपलब्ध आहे.http://projectforchild.blogspot.com/2019/12/21-2019.htmlउपक्रम वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📙 सस्तन प्राणी 📙*आईच्या पोटातुन जन्म घेणारे आईच्या दुधावर लहानपणी पोषण होणारे सर्व प्राणी म्हणजे सस्तन प्राणी होत. यांनाच 'मॅमल' असेही इंग्रजीत म्हणतात. मानव, मांजरे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडे, माकडे, जिराफ, हत्ती, डॉल्फिन व देवमासे हे सगळे सस्तन प्राणिगटात मोडतात. पृथ्वीवर एकूण चार हजार प्रकारचे सस्तन प्राणी सापडतात.इतर सर्व प्राणी अंडी घालतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या पोटातच अंड्याची वाढ गर्भाशयात होते. पूर्ण वाढीचा काळ संपल्यावरच मग नवजात प्राणी आईच्या शरीरातुन वेगळा होतो. पण या पद्धतीतही तीन प्रकारचे बदल निसर्गात आढळले आहेत.गर्भाशयातील पोषण हे बाळाला जोडलेल्या नाळेद्वारे होते. हा एक प्रकार. त्याला इंग्रजीत (Placental) असे म्हणतात. हा बहुतेक सर्व जातींत दिसतो. दुसरा म्हणजे कांगारूचा. या प्रकारात (Marsupial) अगदी छोटा जीव आईच्या पोटाला असलेल्या एका पोतडीत जन्माला येतो. तेथेच राहतो, वाढतो. आईच्या दुधावर त्याचे पोषण होते. मोठा झाल्यावर मग आईपासुन तो सुटा होतो. तिसरा (Monoreme) प्रकार म्हणजे सशाचा आकार, पण बदकाचे पाय असा लांबुडका, शेपटी असलेला 'डक बिल्ड प्लॅटिपस' या जातीचा प्राणी. तो फक्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. खरे म्हणजे हा प्राणी अंडी घालतो. पण त्याची पिल्ले मात्र आईच्या दुधावरच वाढतात. म्हणुन त्याला सस्तन गटात घेतले आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे देवमासा किंवा निळा व्हेल. सर्वात उंच जिराफ, सर्वात दांडगा हत्ती. स्वत:ला सर्वात हुशार समजणारा माणूस.'सृष्टीविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कोठे पार पडणार आहे ?२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा विजेता देश कोणता ?३) सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहतो या बिंदूला काय म्हणतात ?४) 'डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?५) २१ डिसेंबर २०२२ रोजी दिवस किती तासांचा आहे ?*उत्तरे :-* १) चंद्रपूर २) अर्जेंटिना ३) विंटर सोल्सटाईल ( हिवाळा आयन दिवस ) ४) रायगड ५) १० तास ४७ मिनिटे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया👤 मन्मथ खंकरे👤 श्रीमती माणिक नागावे, साहित्यिक, कोल्हापूर👤 गजानन गायकवाड👤 संभाजी तोटेवाड👤 जयश्री फुले👤 माधव मुंडकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?**कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"*             ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपल्या दैनंदिन  जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती  आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने व त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 20/12/2022 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस*💥घडामोडी● १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.● १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.● १९४५-मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.💥जन्म● १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.● १९४२-राणा भगवान दास,पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश💥मृत्यू● २१७ - पोप झेफिरिनस.● १९५६-डेबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा ● १९९६: बलुतंकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शैक्षणिक सत्र 2023-24 साठी जेईई मेन 2023 जानेवारीतील परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *न्यायाधीश, पत्रकार डगमगले तर लोकशाही कोसळणार; न्या. बी.एन. श्रीकृष्णा यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी,शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूरमध्ये विमानतळही हवे आणि सिद्धेश्वर साखर कारखानाही! शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आर्थिक मदतीसोबतच लम्पी बाधित जनावरांवर मोफत उपचार करा; सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा वर्ल्डकप २०२२च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-6वा/News Flash👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/QLqM1Dx4aCY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••            प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धागत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा          *लहानपण देगा देवा*वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे.https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpanलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••            *अश्फाकउल्ला खान*अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार."दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा ,"फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ !वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥(अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.)अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले -I wish the downfall of the British Empire.(ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे)अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी...महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंधरामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर)देशाच्या स्वातंञ्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्‍या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा अंतिम सामना कोणत्या दोन देशात झाला ?२) 'मिसेस वर्ल्ड २०२२' या स्पर्धेची मानकरी कोण ठरली आहे ?३) दृष्टिहीन टी - २० विश्वचषक स्पर्धा २०२२ कोणत्या देशाने जिंकली ?४) 'भवानी मातेचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?५) बुलेटच्या एका चाकावर अडीच किमीचा प्रवास करण्याचा विक्रम करून गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या स्टंटमॅनचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) अर्जेंटिना व फ्रान्स २) सरगम कौशल, भारत ३) भारत ४) उस्मानाबाद ५) मनीष राठी, मु. जिंदरान, हरियाणा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गजानन मुडेले, देगलूर👤 सोपान हेळंबे, उमरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••.    *"गेले द्यायचे राहून,*      *तुझे नक्षत्रांचे देणे !*      *माझ्यापास आता कळ्या,*      *थोडी  ओली पाने !!"**पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.**बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.*               ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••     तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील.पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••                 *पारंगत*खूप वर्षापूर्वी रामपूर  गावात एक  आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला,  प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे  ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!'*तात्पर्य :- सुंदर जरी  गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 17/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           💥 ठळक घडामोडी :- ● १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.● १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला.● १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली.● १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.● १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.● १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब.● १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.● १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.● २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.💥 जन्म :-● १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी● १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.● १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह ● १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम ● १९७८: हिंदी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख💥 मृत्यू :- ● १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.● १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.● १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.● १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर ● २०००: अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला● २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी..*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई होणार चकाचक! लवकरच नियुक्त होणार 5 हजार स्वच्छतादूत; दंडात्मक कारवाई नाही तर, जागरुकतेवर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारत जोडो यात्रेचे 100 दिवस आणि 2800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण ; पाच राज्यांच्या यात्रेनंतर राहुल गांधी आता राजस्थानमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाविकास आघाडीच्या मुंबईतील मोर्चासाठी अटीसह परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य, तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशला 471 धावांची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*गोष्टींचा शनिवार- कथा-रंगेबिरंगी खेळणी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rjpFGoRXVBA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतीय गणितज्ञ व शास्त्रज्ञ* http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙  **************************प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते.अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'.ते चार टप्पे असे,१. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस*२. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस*३. *होमो इरेक्ट्स*४. *होमो सेपियन्स*अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्‍याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते.माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी.आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो.मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते.*"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'एक जिल्हा एक खेळ' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?२) नुकताच भारताचा ७७ वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?३) काळ्या सोन्याचा जिल्हा ( दगडी कोळसा ) असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?४) अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरीत्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे ?५) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारे भारतीय क्रिकेटपटूंची नावे सांगा.*उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) आदित्य मित्तल ३) चंद्रपूर ४) नागपूर मेट्रो ५) सचिन तेंडुलकर - २०० धावा, वीरेंद्र सेहवाग - २१९ धावा, रोहीत शर्मा - २०९, २६४, २०८ धावा, ईशान किशन - २१० धावा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 डॉ. उषा रामवानी गायकवाड, ठाणे👤 विक्रम पतंगे, नांदेड👤 रामचंद्र पाटील बन्नाळीकर, धर्माबाद👤 डॉ. सुधीर येलमे, संपादक👤 विजय होकर्ने, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 डॉ. प्रदीप आवटे👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद👤 केशव कदम👤 नारायण मुळे, धर्माबाद👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी👤 दिगंबर बेतीवार, नांदेड👤 जितेंद्र वल्लाकटी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण नेहमी खरं बोलावं, असं म्हणतो. मग माणसं खोटं का बोलतात? स्वार्थासाठी! स्वत:ला लपविण्यासाठी! खरं ते झाकण्यासाठी! जितकं आपण स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करू तितकं आपण केव्हा ना केव्हा तरी समाजापुढं चक्क उघडं पडु शकतो. अनेक माणसं बोलताना 'मी म्हणतो तेच खरं' असं ठासून म्हणतात; परंतु 'खरं तेच माझं' म्हणणारी माणसं फारच कमी असतात. दहा वेळा खोटं बोललं की, लोकांना ते खरं वाटतं; पण खरं तेच केव्हातरी उघडकीस येतं. आपण स्वत: जसे असाल तसे समाजपुढे दिसावे हे चांगले असते. परंतु आपण स्वत: जसे नसतो तसं समाजापुढं दिसावं हे काही चांगलं नाही.**आपण नेहमीच खोटं बोलावं आणि समाजापुढं आपण नेहमीच खरं बोलतो असं भासवावं हे काही भल्या माणसाचं लक्षण नाही. आपण नेहमीच स्वार्थीपणानं जगावं आणि आपण नेहमी नि:स्वार्थीपणानं जगतो असं समाजापुढं भासवावं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. आपण एकदा का खोटं बोललो की, ते लपविण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. खोट्याला अनेक वाटा असतात. ख-याला मात्र पर्याय नसतो. खोटं बोलणं खोट्या पैशासारखं असतं. खरं बोलणं बंध्या रूपयासारखं असतं. खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं, हे काळच उघडकीस आणतो. म्हणून 'सत्य' हाच आपल्या जीवन यशाचा खरा सोबती समजला पाहिजे. 'सत्य' हेच आपल्या जीवनवैभवाचं खरं रहस्य समजलं पाहिजे.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹       *श्री. संजय नलावडे, मुंबई*     *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे एक ध्येय निश्चित केलेले असते.ते ध्येय म्हणजे " जिंकू किंवा मरु..."समोर असलेल्या शत्रूला तोंड दिले तर आपण विजयी होऊ नाहीतर ठरवलेल्या ध्येयापासून थोडेजरी मन डळमळीत झाले तर निश्चित केलेले ध्येय पूर्ण करु शकत नाही.याचा अर्थ असा होतो की,आपण आपल्या ध्येयापासून दूर जात आहोत म्हणजे आपला पराभव निश्चित तर आहेच त्याचबरोबर आपला जीवही गमवावा लागत आहे.आपण आपल्या जीवनात अयशस्वी होत आहोत.त्यामुळे कोणताही जवान ध्येयापासून परावृत होत नाही.त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात जर चांगले ध्येय निश्चित केले तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागा तरच ते ध्येय पूर्ण करु शकाल. नाही तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून दूर राहाल.नाहीतर आपणच आपले गुन्हेगार ठरु शकू.त्यामुळे आपल्या जीवनात नैराश्य तर येईलच आणि आपल्या जीवनात जगण्याला काही अर्थ राहणार नाही असे वाटायला लागेल.आपणच आपले अपराधी आहोत असे वाटायला लागेल.त्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने पुढे आगेकूच करायला लागा.तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.मनाची सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे चालायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच यशस्वी होऊ शकाल यात वादच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣☀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्‍या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.तात्पर्यःकोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते..*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/12/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            बहरैन - राष्ट्रीय दिन.        बांगलादेश - विजय दिन.       कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.💥 ठळक घडामोडी :- ● १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली.● १९७१-भारत-पाक युद्ध,पाक सैन्याची शरणागती,बांगलादेश ची निर्मिती.● १९०३- मुंबईतील ताजमहाल हॉटेल पॅलेस ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.💥 जन्म :-● १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.● १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● २००४- लक्ष्मीकांत बेर्डे,मराठी चित्रपट अभिनेता● १९६०-चिंतामण गणेश कर्वे,मराठी कोशकार व लेखक● १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.● १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ, महसूल व वन विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसीसी आणि अंबुजा सिमेंट यांनी त्यांचे कारखाने बंद केल्याने सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जवळील वैजापूर येथे कारला भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात, अवकाळी पावसाने नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर येथील डॉ. आंबेडकर रुग्णालय कंत्राटीवरच; श्रेणीवर्धनचा प्रस्ताव रखडला, 1165 कोटींचा प्रकल्प थंडबस्त्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *FIFA World Cup 2022 : मोरक्कोला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Story-Alyonushka👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FmvW7rOOdaU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           एक देश, एक ओळखपत्रhttp://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            🐝 *मधमाशा* 🐝           ******************नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या शहरादरम्यान धावली ?२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचे नाव काय आहे ?३) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकूण किती द्विशतके झाली आहेत ?४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनास काय म्हणतात ? ५) भारतातील राष्ट्रीय पक्षांची नावे सांगा.उत्तरे :- १) नवी दिल्ली ते वाराणसी २) वडनगर, गुजरात ३) सहा ४) महापरिनिर्वाण दिन ५) भाजप, काँग्रेस, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, तृणमूल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*   👤 मा. खा. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा खासदार👤 डॉ. वसंत काळपांडे, मुंबई👤 डॉ. गजानन चौधरी, नांदेड👤 डॉ. शिवशक्ती पवार, नांदेड👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम👤 नरेश पांचाळ, धर्माबाद👤 श्याम पेरेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.**नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.*             *॥ रामकृष्णहरी ॥*💥💥💥💥💥💥💥💥💥       *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••हल्ली कुटुंबाची व्याख्याच सिमित झाली आहे.याचे कारणही तसेच आहे.आपापल्या स्वार्थापुरतं क्षेत्र निर्माण करुन तेवढ्यापुरतंच मर्यादित करुन जीवन जगताना दिसत आहे.आई-बाबा,भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि इतरही नाते नात्याची असलेली आणि विणलेली घट्ट वीण कुठल्यातरी कमी संस्कारामुळे ,स्वार्थामुळे सैल झाली आहे त्यामुळे आता ही नाती एकमेकांपासून दूर गेली आहेत हे पहायला मिळते.आपल्याच पिढीला नाते काय असते आणि कसे असते कुणाला काय म्हणावे हे सांगताना एखाद्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे होत आहे.अशा सर्व गोष्टींमुळे येणा-या पिढीच्या मानसिकतेवर फार मोठा आघात होत आहे.त्यासाठी कुटुंब आणि कुटुंबातील सारे सदस्य आपुलकीने,प्रेमाने, थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिकवण्याची गरज आहे,प्रत्येकातील असणारा स्वार्थरुपी नाते संपुष्टात आणायला हवे,घरामध्ये कमावणा-या व्यक्तींचा सन्मान आणि न कमावणा-या व्यक्तींचा अपमान आणि तिरस्कार करणे टाळायला हवे.हे जर आपण आपल्यामध्ये प्रथम सुधारणा करून येणा-या पिढीला आदर्श संस्कारांची मात्रा त्यांना अधिक प्रमाणात दिली तर नात्यांची घट्ट वीण तयार होऊन एकमेकांबद्दल प्रेम,आदर,नाती, संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.कुटुंब म्हणजे काय आणि नाते कसे असते हे निश्चितपणे पिढीला समजेल.मग ते कधीही कुणाच्या नात्यापासून दुरावणार नाहीत की,कुणाची मने दुखावणार नाहीत.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *राणीने घेतलेली परीक्षा*एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध  आणि चतुर  राजाचा चातुर्याची  परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार  घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे."दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार  खऱ्या फुलांचा आहे हे  त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती.  राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली.  सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्‍या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या.राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस."*तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆ १९९१ - चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर💥 जन्म :-◆ १९३२ - टी.एन. शेषन, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त.◆ १९३५ - उषा मंगेशकर, भारतीय पार्श्वगायिका व संगीतकार.◆ १९७६ - बैचुंग भुतिया, भारतीय फुटबॉलपटू.💥 मृत्यू :- ◆ १७४९ : छत्रपती शाहू महाराज◆ १९५० : सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर - १९९१)*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सरपंचपदाच्या महिला उमेदवाराचा चक्क 100 रुपयाच्या स्टॅम्पवर जाहीरनामा, अनोख्या जाहीरनाम्याची भंडारा जिल्ह्यात चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कर्नाटकचा FRP पॅटर्न, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इथेनॉल विक्रीचाही मिळणार लाभ, प्रतिटन पन्नास रुपयांचा वाढीव भाव, देशात पहिलाच प्रयोग*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात X-Ray फिल्मचा तुटवडा, रुग्णांच्या मोबाईलमध्येच ट्रान्सफर करुन द्यावा लागतो एक्स-रेचा फोटो*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *दहावी-बारावी परीक्षेत सवलतीच्या गुणांसाठी 50 रुपयांऐवजी आता 25 रुपये शुल्क; विद्यार्थी, पालकांच्या विरोधानंतर बोर्डाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जानेवारी महिन्यात शासकीय लिपीक आणि टंकलेखक पदाची भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*P V Sindhu-An Icon of success👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LV2ug9x3P04~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *एक कप चहा*जगभरातील काही देशात 15 डिसेंबर हा दिवस जागतिक चहा ( World Tea Day ) दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र, चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस ( International Tea Day ) साजरा केला जातो. जागतिक चहा दिनाच्या निमित्ताने काही आठवणी .......http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/world-tea-day.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      📙 *मरूउद्यान (Oasis)* 📙अफाट पसरलेल्या वाळवंटात अचानक एखादा हिरवागार टापू आढळतो. खजुराची झाडे, खुरटी हिरवी झुडपे, थोडीफार शेती व त्याला धरुन असलेली वस्ती माणसे आणि पाळीव प्राणी यांनी तेथे सुखाने वस्ती केलेली आढळते. या सगळ्याचे मोठे आश्चर्य येथे प्रथमच आलेल्याला वाटत राहते. पण तेथे राहत असलेल्यांना हे सारे नैसर्गिकच वाटत असते. त्यांच्या दृष्टीने या जागी त्यांना पाणीपुरवठ्याची कधीच अडचण वाटत आलेली नसते. या जागांना मरूउद्याने किंवा ओअॅसिस असे म्हणतात. वाळवंटातील हिरवळीचा भाग असेही याचे वर्णन करता येईल.येथील पाणीपुरवठा हा पावसावर अजिबात अवलंबून नसतो. दूरवरून येणारे पाण्याचे खोलवरचे प्रवाह येथे एक तर तळ्याच्या स्वरूपात वर येतात किंवा विहिरीच्या स्वरूपात पारंपरिकरित्या ज्ञात असतात. त्यामुळे या आसमंतात अजिबात पाऊस न पडला, तरीही येथील पाण्याचा साठा कायम राहतो. अर्थात याला मर्यादा आहेच. पण ही मर्यादा आपोआपच पाळली जाते. कारण येथील वस्तीत वाढ फारच क्वचित होते. शेती हे येथील उत्पन्नाचे व जीविताचे साधन सहसा नसल्याने पाण्याचा वापर त्याही कारणाकरता फार केला जात नाही. कापूस, फळभाज्या, बाजारी यांचे थोडेफार उत्पन्न या भागात घेतले जाते.मरूउद्यानांचे महत्त्व आजकालच्या यांत्रिक युगात तितकेसे जाणवणार नाही. कारण संपूर्ण वाळवंट काही तासांमध्ये यांत्रिक पद्धतीने पार करता येते. पण जेमतेम गेल्या शतकापर्यंत हा भाग पार करणे म्हणजे एक जीवावरचीच कसरत असे. महिनोनमहिने प्रवास करत वाळूची वादळे, विषम हवामान याला तोंड देत जाताना बव्हंशी रस्ते मरूउद्यानांना जोडत पार केले जात. भारतातील कच्छच्या रणात वा थरच्या वाळवंटात अशी अनेक छोटी छोटी मरूउद्याने सापडतात. जैसलमेर, जोधपूर, बिकानेर ही शहरेही अशा पाण्याच्या आधारानेच वसत गेली आहेत. सहारा वाळवंटातही अशी मरूउद्याने आहेतच. काही ठिकाणी तर विश्वास बसू नये, अशी विस्तीर्ण तळी पाण्याचा साठा राखून आहेत.मरूउद्याने आटण्याचे प्रकार घडतात, ते यांत्रिक पद्धतीने पाणी उपसा केल्याने. एकाच वेळी ठिकाणी अनेक विंधनविहिरी घेऊन यांत्रिक पाणी उपसा केल्याने हा प्रकार गेल्या पाच पंचवीस वर्षांत घडत आहे. दुसरे कारण म्हणजे झाडांची वाढती संख्या. यावर नियंत्रण न ठेवल्यामुळे खोलवर जाऊन पाणी तेथेच शोषू लागतात. वाळूची वादळे फार मोठ्या प्रमाणावर झाल्यास येथील पाणवठ्याच्या जागेत त्याचे थर जमू शकतात. या थरांची वेळीच देखभाल होऊ शकली नाही, तरीही मरुउद्याने धोक्यात येतात.जीवनातही खडतर प्रवासात ज्यावेळी एखादा आनंदाचा, विसाव्याचा क्षण मिळतो, तेव्हा त्याला आपण ओअॅसीसची उपमा सहजपणे देतो. दूरवरून उन्हातून आलेला, तहानलेला प्रवासी गरम बाजारीची भाकरी, ताजी भाजी, खजूर व दूध यांचा आस्वाद सावलीला बसून घेतो, तेव्हा त्यालाही अगदी अशीच अंतीव आनंदाची भावना होते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस केव्हा धावली ?२) कोणत्या क्रिकेटपटूला 'पॉकेट डायनामाइट' असे संबोधल्या जाते ?३) भारतात राष्ट्रीय पक्ष किती आहेत ?४) वजनमापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली ?५) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गावाचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) १५ फेब्रुवारी २०१९ २) ईशान किशन, भारत ३) सात ४) नंद राजा ५) मानसा, गुजरात *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 बालाजी सुंकेवार, कलाशिक्षक, देगलूर👤 साईनाथ सायबलू, मुख्याध्यापक, धर्माबाद👤 रामकृष्ण लोखंडे👤 शिवाजी रामदिनवार, सहशिक्षक👤 ऋषिकेश गरड, उस्मानाबाद👤 दीपक चावरे, सहशिक्षक👤 श्रीधर काटेगर, आरमुर, तेलंगणा👤 अनिल जाधव शिरपूरकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्या महापुरूषांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केले आहे, ज्यांनी समाजासमोर आपले आदर्श उभे केले आहेत, ज्यांच्या विचारांनी समाजाला दिशा आणि गती मिळाली. अशा महापुरूषांचे पुतळे आपण उभे करतो किंवा केले आहेत. त्यांच्या विचारांची एक रेष पुसण्यासाठी ताकद न काळात असते न व्यवस्थेत. अर्थात, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याची पुरेपूर किमंत मोजलेली असते. शाळा-महाविद्यालय तथा विद्यापीठीय पदव्यांची भेंडोळी त्यांनी मिळवलेली नसते. त्यांनी ज्या परिक्षा दिलेल्या असतात; जे पेपर सोडवलेले असतात; ते सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असतात.**त्यांचा व्यासंग, त्यांची साधना, त्यांचा त्याग, त्यांची सेवा, त्याचं कर्तृत्व यामुळे त्यांनी गगनाएवढी उंची गाठलेली असते. मात्र, त्यांना एका झटक्यात आपण दगडाचा पुतळा करून खुजं करून टाकतो. याचं भान जसं आपल्याला नसतं, तसंच त्यांनी उभ्या केलेल्या मूल्यांचा न आपला अभ्यास असतो न तपास केलेला असतो. जयंती-पुण्यतिथीत मिरवणूक काढून डीजेच्या तालावर नाचून घेणे. ही त्यांच्या कार्याप्रती आपण परत केलेली पावती आपल्या स्वत:लाच वाटत असते. हाच मोठा विनोद आहे. ज्यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली, अशा महापुरूषांचे विचार आपल्या मनात रूजविण्याऐवजी आपण अतिशय उथळ कृतीत रममाण झालो आहोत. त्यांनी त्यांचे जे विचार इथल्या मातीत पेरलेले असतात, त्यांचे दरसाल उगवून येणे महत्वाचे असते. आपण थेट कोंभानाच खुरपं लावतो.*      ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••   🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱          *संजय नलावडे, मुंबई*        *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    जीवनात सुंदरतेला अधिक महत्व आहे.सुंदरता ही दोन प्रकारची आहे. एक म्हणजे बाह्यस्वरुपाची आणि दुसरी आंतरिक स्वरुपाची. तुम्ही कसेही असा तुम्हाला जे काही नैसर्गिक जन्माबरोबर शारीरिक सुंदरता मिळाली आहे ते आपल्याला जसे आहे तसे स्वीकारणे आवश्यक आहे. त्यात आपल्याला बदल करता येत नाही. काहीजण बदलण्यासाठी खूप प्रयत्न करायला पाहतात. त्यासाठी विविध प्रकारची सुंदरतेची सौंदर्य प्रसाधने, पेहराव वापरतात. परंतू त्यात काही बदल घडून येत नाही. फक्त त्यात बाह्यस्वरुपात राहणीमान बदलल्याचा फरक दिसून येतो. यामुळे आपण कसे आहोत हे जगासमोर बाह्यस्वरुपात काही काळ दिसू शकतो पण जास्त काळ त्यांच्या मनावर राज्य करु शकत नाही. त्यावर कितीही पैसा खर्च करुनही वाया जाणारच..! त्यापेक्षा आंतरिक सुंदरतेचा जर अधिक विचार केला तर आपलेही स्वत:चे कल्याण तर होईलच त्याचबरोबर इतरांचेही. कारण तुमच्या आंतरिक सुंदरतेला अधिकाधिक सुंदर बनविण्यासाठी जास्त काही धन अर्थात पैसा खर्च करायची गरज नाही. गरज आहे ती चांगल्या लोकांच्या सहवासात राहण्याची. चांगल्या लोकांच्या सहवासाने आपल्या मधील असणारे दोष काय आहेत ते स्वत:ला ओळखता येतात आणि त्यात बदल घडवून आणता येतात. चांगल्याच्या संगतीत सदैव राहिले तर आपले संकुचित असलेल्या विचारांना पायबंद घालून चांगल्या विचारांची वाढ करता येईल. अशासाठी धन किंवा पैसा खर्च करण्याची काही गरज नाही. यासाठी हवी आहे फक्त तुमच्या मनाची तयारी. तुम्ही जर आंतरिक सौंदर्याने समृद्ध झालात तर जग तुमच्या सोबत नक्कीच राहील आणि एक दिवस तुमचे नक्कीच अनुयायी बनतील. हे केवळ तुमच्या आंतरिक सुंदरतेच्या झालेल्या बदलामुळे. तुमच्या बाह्य सुंदरतेपेक्षा आंतरिक सुंदरता तुम्ही व तुमचे सुंदर जग बनवण्यासाठी अधिक मोलाचे किंवा महत्वाचे ठरु शकते. हे मात्र विश्वासाने सांगता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *लालसेपायी प्राण गेले*जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी पडला.त्याच्या लालसेने त्याचा जीव घेतला.तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.आणि त्यामध्ये आपले प्राणही जाते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 13/12/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.● २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.💥 जन्म :-● १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.● १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.● १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक● १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका💥 मृत्यू :- ● १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री● १९९४ - विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.● १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.● २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला, नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गेमिंग कंपन्यांकडून 23,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अर्थ राज्यमंत्र्यांकडून माहिती सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खाद्यपदार्थ आणि भाजीपाला झाला स्वस्त, किरकोळ महागाई नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्क्यांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयटीए अवॉर्डमध्ये एबीपीचा डंका, जिंकला सर्वाधिक लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीसाठी पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचीही उपस्थिती होती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये तब्बल बावीस वर्षांनी साहित्य जत्रा, जानेवारीत मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *FIFA World Cup : इंग्लंडवर मात करून फ्रान्स सेमीफायनल्समध्ये, पुढची लढत मोरोक्कोशी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Story-Who is better?👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/5iYAdB8uFlQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्‍याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्‍या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) HIV चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांत पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक केलेल्या खेळाडूचे नाव काय ?४) सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ? ५) राज्यातील 'धान उत्पादकांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?*उत्तरे :-* १) सुखविंदर सिंह सुक्खू २) दक्षिण आफ्रिका ३) ईशान किशन, भारत ( १२६ चेंडूत २०० धावा ) ४) आयोडीन ५) गोंदिया *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड👤 राजेश वाघ, बुलढाणा👤 विनोद राऊलवार👤 श्रीनिवास भोसले, नांदेड👤 राजेश जी गडाख, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.**थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांती यश*एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला.राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/12/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १९८५ - ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.● १९९० - पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.● २००१ - भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.● २००० - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.💥 जन्म :-● १८७२ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.● १९४० - शरद पवार, माजी मुख्यमंत्री● १९४९ - स्व. गोपीनाथ मुंडे, माजी उपमुख्यमंत्री● १९५० - रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, तामिळ अभिनेता.● १९८१ - युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ● १९३० - बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.● १९९२ - पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.● १९९२ - जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.● २००४ - निरंजन उजगरे, मराठी कवी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, 75 हजार कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतांचे सरकारविरोधात आमरण उपोषण, एसटीच्या विलिनीकरणासाठी हिवाळी अधिवेशनात उतरणार मैदानात*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *जळगाव जिल्हा दूध संघावर सात वर्षानंतर सत्तांतर, खडसेंच्या गडाला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाची एकहाती सत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी केंद्राची लवकरच मंजुरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हिमाचलमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली, सुखविंदर सिंह सुक्खू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयआयटी मुंबईच्या ७१ विद्यार्थ्यांना मिळाली परदेशातील नोकरीची ऑफर त्यापैकी ६३ विद्यार्थ्यांनी ऑफर स्वीकारली त्यातील २५ विद्यार्थ्यांना यंदा वार्षिक १ कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या पॅकेजच्या नोकरीची ऑफर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा पराभव करत फ्रान्सचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, रोनाल्डो आणि पोर्तुगालचं आव्हानं संपुष्टात*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Poem-How creatures move👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/KrZpeN3ucRc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साहस कथा*सातव्‍या वर्गात शिकत असतानाच सुधाचे लग्‍न मोठ्या थाटामाटात झालं. अजून तिला खूप काही शिकायच होत, तसं आईला तिने बोलूनही दाखवलं, परंतु बाबांच्‍या रागासमोर दोघांचेही चालले नाही पाच सात एकर जमीन, मोठा वाडा, गोठ्यात दहा-पंधरा जनावरं, एकुलता ......वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/12/blog-post.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भौतिकशास्त्र* 📙 **********************विश्व हे पदार्थांनी (Matter) बनले आहे. या पदार्थाचे स्वरूप, उत्पत्ती, बदल, स्थित्यंतरे, त्यांतून निर्माण होणारी ऊर्जा किंवा ऊर्जेचा त्यांच्यावर होणारा परिणाम याबद्दल अभ्यास करावयाचे शास्त्र म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्र वा भौतिकशास्त्र.यातील शास्त्रज्ञ (Physisist) नेमके काय करतो, त्याच्या कामाचा जगाला काही उपयोग आहे वा नाही याबद्दलच अनेक शास्त्रज्ञ साशंक असत. ही शास्त्रशाखा दुर्लक्षित होती, त्या परिस्थितीत अल्बर्ट आइन्स्टाइनपासून खूपच बदल घडत गेले. या बदलांना चक्क या शाखेबद्दलच्या आकर्षणाचे स्वरूप निर्माण झाले, ते अणुविभाजन व अणुस्फोटानंतर. यानंतर मात्र या शाखेत काम करतो आहे, हे सांगणेही मानाचे समजले जाऊ लागले.आज घटकेस भौतिकशास्त्र जवळपास आपल्या जीवनाशी संबंधित प्रत्येक बाबीस व्यापुन आहे. पण एक महत्त्वाचा घटक म्हणजे या शास्त्रातील प्राथमिक बाबी या तांत्रिक अभ्यासात (Engineering) जास्त शिकवल्या जातात. व्यवहारात: तो अभ्यास पुरेसा असल्याने केवळ या शास्त्रात रस घेऊन संशोधन करणारे आजही मोजकेच निघतात.उदाहरणार्थ, तेल विहीर खणायची आहे, भूकंपप्रवण भागाचा अभ्यास करावयाचा आहे, अंतराळयान सोडायचे आहे वा रेल्वेमार्ग घालावयचा आहे; तर यांपैकी प्रत्येक प्रकल्पासाठी कित्तेक इंजिनिअर व अन्य तंत्रज्ञ लागतील. पण प्राथमिक पाण्यासाठी जेमतेम एखाद्या भौतिकशास्त्रज्ञास बोलावून त्याचे मत आजमावले की, त्याचे काम कदाचित संपून तो अडगळीत पडेल. नंतरचे सारे काम फक्त तंत्रज्ञ व त्यांची प्रगत यंत्रे यांकरवीच केले जाईल. या स्वरूपाच्या कामाच्या पद्धतीमुळे या जमातीबद्दल सामान्यांच्या मनात खूपच कमी माहिती आढळते.उष्णता, विद्युत, आवाज, प्रकाश, चुंबकीय क्षेत्र, अणुरचना या मुलभुत बाबींचा अभ्यास आजही पुरेसा झाला आहे, असे अनेक शास्त्रज्ञांना वाटत नाही. त्यामुळे याबाबतीत सतत संशोधन चालू असते. पण या संशोधनाचे स्वरूप अत्यंत क्लिष्ट असल्याने व निष्कर्ष लगेच प्रसिद्ध होत नसल्याने सामान्यांना त्याची फारशी कल्पना येत नाही. काही प्रकल्प तर एवढे महाग व अशक्यप्राय खर्चाचे असतात की, अनेक देशांनी मिळून ते हातात घेतलेले असतात. जिनिव्हा येथील 'युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लियर रिसर्च' ही प्रयोगशाळा असेच एक उद्या उदाहरण सांगता येईल. प्रचंड लांबीच्या निर्वात पोकळीमध्ये भुयारात अणुरचनेवर संशोधन येथे चालू असते. हा खर्च कोणत्याच एका देशाला न परवडणारा असल्याने अनेक देशांनी हा खर्च करून तेथे एकत्रित प्रयोग केले जातात.रसायनशास्त्राचे मुलभूत नियम आता भौतिकशास्त्रातून समजू शकतात. रेणूजीवशास्त्र (Molecular Biology) हे जीवशास्राच्या मुळाशी असलेले शास्त्रादेखील भौतिकशास्त्रातच मोडते. 'जगाच्या उत्पत्तीपासून विनाशापर्यंत प्रत्येक बाबतीतच डोके खुपसून त्याबद्दल छडा लावण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र,' असेही विनोदाने या शास्त्राचे वर्णन करता येईल.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) वर्ल्डवाईड कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वे अहवालानुसार जगातील सर्वात महागडी शहरे कोणती ?२) भारतात पहिले गोल्ड ATM केव्हा व कोठे सुरू करण्यात आले आहे ?३) नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले ?४) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे ?५) सजीव व निर्जीव यातील दुवा कोणास संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) न्यूयॉर्क ( अमेरिका ), सिंगापूर, तेल अविव ( इस्त्रायल ) २) डिसेंबर २०२२, हैदराबाद ३) भाजपा ( १५६ सीटे ) ४) आर्क्टिक समुद्र ५) जीवाणू *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 कृष्णजीत केरबा उमाटे, मुखेड👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, करखेली👤 नागनाथ परसुरे, सहशिक्षक, माचनूर👤 शुभानन गांगल, पुणे👤 अशोक पाटील कदम👤 समीर मुल्ला👤 वतनदार पवनकुमार नारायण👤 गजानन हुस्सेकर, सहशिक्षक, धर्माबाद👤 महेश शिवशेट्टी👤 माधव पाटील शिंदे👤 राजकुमार इंगळे👤 कु. योगेश्वरी बालाजी पेटेकर👤 विपीन कासलीवाल👤 डॉ. सुभाष नामदेव पाटील👤 शुद्धधोन पवार, डोणगावकर👤*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.**एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच..**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 10/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अल्फ्रेड नोबेल दिन* *मानवी हक्क दिन*💥 ठळक घडामोडी :- २०१४-भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्थानची युसूफझाई यांना संयुक्तपणे नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००८-प्रा अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.१९०१-नोबेल पारितोषिक चे प्रथमच वितरण करण्यात आले.💥 जन्म :- १८७० - सर जदुनाथ सरकार, इतिहासकार. १८७८ - चक्रवर्ती राजगोपालाचारी, स्वतंत्र पक्षाचे संस्थापक. १८८० - श्रीपाद कृष्ण बेलवलकर, प्राच्यविद्यापंडित. १८९२ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक. १९०८ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.💥 मृत्यू :- १९४२ - डॉ. द्वारकानाथ कोटणीस. २००१ - अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी, हिंदी चित्रपट अभिनेता. १८९६-अल्फ्रेड नोबेल, स्वीडिश संशोधक आणि नोबेल पुरस्काराचे प्रणेते*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठवाड्यातील पहिली ते दहावीच्या शिक्षकांची दरवर्षी परीक्षा होणार. शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांचा निर्णय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, मुख्यमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *'आभा'मध्ये आधार कार्ड प्रमाणेच रुग्णाला 14 अंकी युनिक क्रमांक मिळेल. हा नंबरच संबंधित व्यक्तीची ओळख असेल. पूर्वीच्या आजारांसह उपचारासंदर्भातील संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात नोंदवलेली जाईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सवाचे उद्घाटन, वाचन चळवळीला गती देणार; पालकमंत्री दीपक केसरकरांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूर :- सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसेस सुरु. कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक सरकारच्या बसेसही सुरु.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबई :- बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 22 हजार खारफुटीची झाडं तोडण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी, पण...त्याबदल्यात 2.5 लाख रोपांची लागवड करण्याची अट घालण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्टइंडीजच्या अल्झारी जोसेफचा मोठा पराक्रम; 2022 मध्ये घेतल्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवी हक्क दिन*लहानपणी मला सर्वात जवळची आणि चांगली गोष्ट वाटायची ते म्हणजे माझा हक्क. मला माझी हवी असलेली वस्तू मिळायलाच हवे असे वाटायचे. बालपणीच्या वयात प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी रडणे हा एक चांगला पर्याय असायचा. रडून ती वस्तू मिळविताना...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_9.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *भूगर्भशास्त्र* 📙 ********************* पृथ्वीच्या अंतरंगाचा, पृथ्वीच्या अंतर्बाह्य घटकांचा अभ्यास भूगर्भशास्त्रात (जिआॅलाॅजी) येतो. पृथ्वीच्या उगमापासून आजपर्यंत झालेल्या निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास त्यात केला जातो. हे शास्त्र वरवर पाहता निरुपयोगी वाटते. कारण पृथ्वीचे थर, दगडगोटे व त्यांचा अभ्यास यात गुंतलेल्या शास्त्रज्ञाचा व्यवहाराशी काय संबंध, असे अनेकांना वाटते. पण तहान लागली, तर त्याच शास्त्रज्ञाला गाठायची वेळ येते. विहीर कुठे खोंदावी, पाणी किती खोलीवर लागेल, वेळ किती लागेल, याचा सल्ला हाच शास्त्रज्ञ देणार असतो. हीच गोष्ट कोळसा, खनिज तेल, खनिज वायूच्या साठ्यांच्या बाबतीत आहे. पण सध्याच्या जगात यांचे काम याहीपुढे गेले आहे. धरणाची जागा, इमारतीचा पाया, पुलाची रचना, मनोऱ्याची उंची व व वजन आणि त्याखालील जमीन या प्रत्येक बाबतीत यांचा सल्ला मोलाचा असतो.भूगर्भशास्त्राच्या प्रगतीनुसार सध्या अनेक शाखा कार्यरत आहेत. पेट्रोलॉजिस्ट हा भूगर्भशास्त्रज्ञ जमिनीचा कस, थर, बांधणी यांचा विशेष अभ्यास करतो. स्ट्रॅटीग्राफर जमिनीखालचे थर, त्यांची रचना, त्यांचे आयुष्य, त्यांचा परिसर यांबद्दल मोजक्या ठिकाणी उत्खननानंतर निष्कर्षावर येऊ शकतो. पॅलिअँटालाॅजिस्टला जिवाश्म, त्यांचा काळ, पृथ्वीच्या उत्पत्तीपासूनच्या घडामोडी यात रस असतो. जिओफिजिसिस्ट पृथ्वीचे विद्युतचुंबकीय वातावरण, चुंबकीय क्षेत्र, त्यांचे आजच्या जीवनावर होणारे परिणाम यांवर जास्त लक्ष केंद्रित करतो. जिआॅमाॅरफाॅलाॅजी ही त्यातल्या त्यात नवीन शाखा उदयाला येत आहे. दऱ्याखोऱ्यांतील जीवन, त्यांचा एकमेकांशी संबंध व नैसर्गिक स्रोत म्हणजे झरे, खनिज, झाडे यांवर ही शाखा अधिक अभ्यास करते. वर लिहिलेल्या स्वतंत्र शाखा म्हणून जरी अस्तित्वात असल्या, तरी मूलतः भूगर्भशास्त्राचा सुसंगत अभ्यास करताना प्रत्येक शाखेतील माहिती असावी लागते. फक्त पूर्ण शिक्षणोत्तर आवडीचा, संशोधनाचा वा कामाचा विषय या दृष्टीने त्या शाखेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या शाखेतील ज्ञानात व माहितीत भर घालायचा प्रयत्न होतो. सध्याच्या भूगर्भशास्त्रज्ञांचा सखोल अभ्यासाचा विषय अगदी वेगळ्याच दिशेने चालू आहे. अंटार्क्टिकावर सतत चाललेले संशोधन व सागराच्या तळाशी असलेल्या खनिज द्रव्यांबद्दल चाललेले संशोधन यांत अनेक मोठे व महत्त्वाचे भूगर्भशास्त्रज्ञ गुंतलेले आहेत. यासाठी अद्ययावत प्रयोगशाळा असलेली प्रचंड अवाढव्य बोट कायम समुद्री वास्तव्याला असून ती जगातील अनेक समुद्र सतत हिंदीतच आहे. गरम पाणी भूगर्भात आहे. ज्वालामुखीमुळे तर भूगर्भातील अंतर्भाग गरमच असतो, हेही माहीत आहे. जसजसे खोल जावे, तसतसे तापमान एकेक डिग्री सेंटीग्रेडने वाढत जाते, याचीही नोंद गेली अनेक वर्षे खाणशास्त्रज्ञांनी घेतलेली आहे. या सर्व माहितीचा वापर करून मग भूगर्भातील उष्णतेचा वीजनिर्मितीला का उपयोग करू नये, या दिशेने अनेकांचे प्रयत्न सुरू झाले. जमिनीला खोलवर भोके पाडून तप्त दगडांवर पाणी सोडावयाचे. या पाण्याची वाफ दुसऱ्या पाईपमधून वर घ्यावयाची व तिच्या शक्तीवर जनित्रे चालवून वीज निर्माण करायची, असे या विद्युतनिर्मितीचे स्वरूप आहे. आजमितीला सुमारे वीस देश या पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. अमेरिका, इटली, न्यूझीलंड येथे तर एकापेक्षा जास्त 'जिओथर्मल पॉवर स्टेशन्स' उभारली गेली आहेत. यापुढील प्रगतीची दिशा म्हणजे खोलवरचे बोअरिंगचे पाणी अधिक खोल असलेल्या गरम खडकापर्यंत पोहोचवायची व्यवस्था करायची. जमिनीखाली उभारलेल्या वीजनिर्मिती केंद्रातच वीज निर्माण करावयाची व वर फक्त विजेच्या ताराच आणून विजेचे वाटप करायचे, अशी कल्पना शास्रज्ञ मनात खेळवत आहेत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक !**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मानवी हक्क दिन केव्हा साजरा केला जातो ?२) रोबोटने काम करणारी जगातील पहिली इमारत कोणती ?३) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे ?४) तंबाखूचा वापर कशासाठी करतात ?५) स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI ) राष्ट्रीयीकरणापूर्वी कोणत्या नावाने ओळखली जात असे ?*उत्तरे :-* १) १० डिसेंबर २) रोबोट फ्रेंडली इमारत ( सेऊल, दक्षिण कोरिया ) ३) इनलंड ताईपान ४) उत्तेजक ५) इंपिरियल बँक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संदीप मस्के, सहशिक्षक👤 दशरथ एम. शिंदे👤 अनिल यादव, धर्माबाद👤 शिवानंद हिंदोले👤 श्रीकांत म्याकेवार👤 अमोल पाटील सलगरे👤 मच्छीन्द्र सपाटे👤 मिलिंद गायकवाड👤 स्वप्नील मसाने👤 दशरथ शिंदे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.**स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--**तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।**तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात. त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही. त्यांना वाटते की, आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो. अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत. इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन प्रवास*एक महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्याच स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्याआणि तिच्याजवळ बसल्या.जास्तित जास्त जागा तिने व्यापली आणि तिच्या सोबत तिने मोठमोठ्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्वस्थ झाला. तो तिला म्हणाला की "तू काहीच का बोलत नाहीस?"तरुणीने स्मित करून प्रतिसाद दिला"अनावश्यक किंवा वायफळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूपच छोटा आहे. मी पुढच्याच स्टॉपवर उतरणार आहे."ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे."इतक्या नगण्य गोष्टींवर भांडण करणे आवश्यक नाही, *आपला प्रवास खूपच छोटा आहे"*आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणले पाहिजे की, आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे; की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि उर्जेचा अपव्यय आहे.कोणी आपले मन दुखावलंय का? शांत रहा,कारण जीवन प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वास घात केला आहे का? तुम्हाला फसवलय का?सोडून द्या, शांत रहा, कारण*जीवन प्रवास खूप छोटा आहे.*कुणीही तुम्हाला त्रास दिला असल्यास, लक्षात ठेवा की, हा प्रवास किती मोठा किंवा छोटा आहे हे कुणालाच माहीत नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाही माहीत नाही.आपला प्रवास खूप छोटा आहे.आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू, एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने वागूया. एकमेकांच्या आनंदात आपण पण आनंदी होऊया.कारण एकच की,*आपला प्रवास खूप छोटा आहे ..!**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/12/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन💥 ठळक घडामोडी :- १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू.१९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.💥 जन्म :-१६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.१९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.१९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.💥 मृत्यू :- १५६५ - पोप पायस चौथा.१६६९ - पोप क्लेमेंट नववा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुंबई: गुजरातमध्ये तब्बल सातव्यांदा भाजपने (BJP) बाजी मारली असून जवळपास 157 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँगेसचा 39 जागांवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी होणार मतदान, अर्ज माघार घेण्याची मुदत काल 7 डिसेंबरला संपली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सज्ज, 15 दिवसात कार्यादेश जारी करणार; आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी नोकरीसाठी तृतीयपंथीयांना अर्जासाठी पर्याय देण्यास दिरंगाई होत असल्याची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे :- मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराने निधन; भाजपामध्ये मोठी पोकळी निर्माण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापुरात पहिल्यांदाच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन देशभरातून येणार स्पर्धक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*At the Science fair👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Gq_A5KR_H8w~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा..............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••१) विदर्भात पहिला रेशीम कोश खरेदी बाजार कोठे भरला ?२) ग्लोबल एअरलाईन सेफ्टी रँकिंगमध्ये प्रथम तीन देश कोणते ?३) जगातील सर्वात गरीब देश कोणता ?४) नागपूर ते शिर्डी या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची लांबी किती किमी आहे ?५) जगातील पहिले गोल्ड ATM केव्हा व कोठे सुरू करण्यात आले ?*उत्तरे :-* १) बडनेरा, अमरावती २) सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण कोरिया ३) कांगो ४) ५२० किमी ५) २०१०, अबुधाबी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील👤 प्रतीक यम्मलवार👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 जय सिंग चौहान👤 आदित्य नलावडे, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.* *" बुरा जो देखन मैं चला,* *बुरा न मिलिया कोय,* *जो दिल खोजा आपना,* *मुझसे बुरा न कोय !"**आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......**"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."* ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भली खोड मोडली*एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 08/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ◆१९६६ - समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.◆१९६९ - ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले. ९३ ठार.◆१९७६ - ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.◆१९९१ - रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.💥 जन्म :-◆६५ - होरेस, रोमन कवि.◆१५४२ - मेरी स्टुअर्ट, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडची राणी.◆१९१४ - अर्नी टोशॅक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.◆१९१७ - इयान जॉन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.◆१९३६ - पीटर पार्फिट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.◆ १९४२ - हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆ १९४६ - वॉरेन स्टॉट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ १६२६ - जॉन डेव्हीस, ब्रिटीश कवी.◆ १६३२ - फेलिपे व्हान लान्सबर्ग, फ्लेमिश अंतराळतज्ञ.◆ १९६३ - सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.◆ १९७८ - गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवालच्या आप पार्टीला स्पष्ट बहुमत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईचे सुशोभीकरण, खड्डेमुक्त करण्यासाठी जोरदार तयारी सुरु असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कालपासून संसदीय अधिवेशनाला सुरुवात, 29 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रेपो दरात 35 टक्यांची वाढ केल्याचे रिझर्व्ह बँकेने केले जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नांदेड जिल्ह्यात आरोग्य विभागात नोकर भरतीचा महाघोटाळा उघड, बोगस नियुक्तीपत्र 50 ते 60 जणांची फसवणूक, किनवट पोलिसात गुन्हा दाखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यात कृषी विभागाकडून अकराशे वनराई बंधारे बांधण्यात आले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय लढतीत बांगलादेश ने भारताचा 5 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••The two-gentleman story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/tpqp505esfc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कळी उमलण्या आधी .....!*लघुकथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावेhttps://storymirror.com/read/story/marathi/9fu28ady/klii-umlnnyaa-aadhii/detailकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *भूतलावरची येती पन्नास वर्षे* 📙५० वर्षांनी काय घडेल, असा प्रश्न विचारला असता अनेकांचे अनेक उत्तरे येतील. सत्ताधारी स्वतःच्या सत्तेवरच्या पुढच्या पिढीबद्दल बोलेल, ज्योतिषी ग्रहांच्या युत्यांची गणिते मांडेल, शेतकरी कमी पडणाऱ्या पाण्याची चिंता करेल, तर सामान्य वाचक नातवाच्या अडमिशनची चिंता व्यक्त करेल !कोणताही शास्त्रज्ञ मात्र या प्रश्नाकडे अत्यंत गंभीरपणे बघून नक्कीच विचारात गढून जाईल. त्याची कारणे तशीच आहेत. औद्योगिक प्रगतीचा वेग, त्यातून निर्माण होणारे रासायनिक प्रदूषणाचे प्रश्न, शहरातील बदलती राहणीची पद्धती, शेती, पाणीपुरवठा या विविध बाबींनी या प्रश्नाला इतके गंभीर स्वरूप आले आहे की कोणीही शास्त्रज्ञ या प्रश्नाला लगेच काहीच उत्तर देऊ शकणार नाही. एकमेकांत विचित्रपणे गुंतलेले असंख्य प्रश्न या पन्नास वर्षात काय काय घडणार आहे, याचे ठोक स्वरूप समोर येऊ देत नाहीत.प्रथम सध्याचे भीषण स्वरूपाचे प्रश्न कोणते, याची केवळ यादी बघू या -१. पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण.१८५० साली हे प्रमाण २६५ पार्टस पर मिलियन किंवा पीपीएम होते, तर १९८८ साली नासाने केलेल्या मोजणीत ते ३५० पीपीएम इतके वाढले आहे. यामुळे पृथ्वीवरील तापमान १ अंश फॅरनहाइटने वाढ झाली आहे. असेच प्रमाण वाढत गेले, तर ५० वर्षांनी ४ अंश फॅरनहाइटने तापमान वाढेल, असा प्राथमिक अंदाज आहे.२. सीएफसी किंवा क्लोरोफ्लोरोकार्बनमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. सूर्याच्या अतिनील किरणांना पृथ्वीवर प्रवेश करायला त्यामुळे जास्त संधी मिळणार आहे. ओझोनच्या थराने या किरणांपासून आपल्याला संरक्षण मिळत असते. याखेरीज पृथ्वीवरील तापमान वाढण्यास कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाच्या जोडीला ही बाब मदतच करेल, असे वाटते.३. एकूण तापमान वाढ झाल्यास ध्रुवीय बर्फसाठा वितळून समुद्र पातळी किमान पाच फुटांनी वाढण्याची शक्यता उद्भवते. मुळात जगातील सर्व बंदरे समुद्रपातळीलाच असल्याने पाच फुटांनी वाढलेली पातळी अनेक मोठ्या औद्योगिक शहरात हलकल्लोळ माजवेल. तसेच जगातील अनेक बेटे व बेटसदृश देश नष्टच होण्याची शक्यता आहे. उदारणार्थ आपल्या जवळची मालदीव बेटे.४. लोकसंख्यावाढीने सध्याच जगाला हैराण केले आहे. पण हा प्रश्न ५० वर्षांनी वेगळ्या पद्धतीने सुटेल, असा विश्वास शास्त्रज्ञांना वाटतो. एका ठरावीक काळाने म्हणजे अजून चाळीसएक वर्षांनी जगाची लोकसंख्या स्थिरावेल.५. अन्नधान्य, रोगराई प्रश्न दुय्यम राहून एड्सचा प्रसार हा प्रश्न मात्र भयानकरित्या समोर उभा ठाकणार आहे. अॅक्वायर्ड इम्यूनो डेफिशियन्सी सिंड्रोम हा प्रकार नवनवीन विषाणूंच्या स्वरुपात पृथ्वीवर ठाण मांडून राहणार आहे, असे दिसते.या प्रश्नांच्या अनुषंगाने व सध्याची आपली संशोधनातील गती बघता काय घडेल, याचा एक ओझरता आराखडा समोर येतो. त्यानुसार ५० वर्षांनी :जेनेटिक्समधील संशोधन खूपच प्रगत होत जाईल. सर्व प्रकारची बियाणे ही रोगराईला तोंड देण्यास समर्थ असतील, त्यामुळे रासायनिक औषधे फवारे मारणे बंद होईल. धान्योत्पादन दरवर्षी गरजेप्रमाणे केले जाऊ शकेल. पेट्रोलऐवजी अनेक ठिकाणी अल्कोहोलचा वापर सुरू झालेला असेल. आफ्रिका खंडात दुष्काळ जरी वाढला असला, तरी लोकसंख्यानियंत्रणाने व तेथील पाळीव जनावरांच्या मांसामुळे खाण्याची व अन्नाची टंचाई भासणार नाही. दुष्काळाने मृत्यू बंद झालेले असतील. पाण्याची पातळी वाढल्याने बांगलादेश, गंगेच्या तोंडाजवळील त्रिभुज प्रदेश, कच्छचे रण, केरळ व ओरिसाचा बराच भाग हा कायमचा पाण्याखाली गेलेला असेल. उन्हाळ्यामध्ये गंगेचा पूर हा स्थायी स्वरूपाची गोष्ट होऊ लागेल. वयाची नव्वदी गाठणे ही नित्याची बाब असल्याने हा मजकूर वाचलेले अनेकजण सत्तरी ओलांडलेली असूनही कामामध्ये व्यग्र असतील व त्यांच्या ताब्येतीही अगदी उत्तम असतील. निवृत्तीचे वय त्या वेळी बहुधा पंचाहत्तर असेल. विविध शहरांमध्ये शंभरमजली इमारतीवजा छोटी गावेच उभी असून तेथे राहणाऱ्यांचा 'दुसऱ्या अशाच गावांशी', क्वचित प्रत्यक्ष संबंध येत असेल; तर घर, शाळा, दुकान, पार्क, थिएटर, ऑफिस सर्व काही एकाच 'गावा'त असल्याने फक्त मजले बदलण्याचाच प्रश्न दिवसाकाठी वरचेवर येत राहील. या बहुउद्देशीय प्रचंड इमारतींचा विजेचा पुरवठा सर्वस्वी सूर्यऊर्जेपासून होत असल्याने भल्यामोठय़ा तारांचे जाळे सार्‍या शहरभर पसरवण्याची गरजच राहणार नाही. त्याचप्रमाणे दळणवळणासाठी थेट उपग्रहाद्वारेच दळणवळण साधने जात असल्याने टेलिफोन, टीव्ही केबल टीव्ही इत्यादींच्याही तारांचे जंजाळ कुठे आढळणार नाही. कागदी वृत्तपत्र हा प्रकार बंद झालेला असून आवडीचे वृत्तपत्र आयपॅडच्या पडद्यावरच वाचले जाईल.५० वर्षांचा काळ मानवी जीवनात फार मोठा आहे. पण शास्त्राच्या प्रगतीच्या दृष्टीने तो अगदीच थोडा कालावधी आहे. त्यातूनही विसाव्या शतकातील प्रगतीचा वेग सर्वांनाच भोवंड आणणारा आहे. ५० वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळी आजच्या घडणाऱ्या अनेक गोष्टींची शक्यता तर सोडाच, पण स्वप्नेही कोणी पाहिली नव्हती. मग अजून ५० वर्षांनी होणारी प्रगती कशी असेल, याचा अंदाज बांधायला तर काहीच हरकत नसावी, नाही काय ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशातील पहिली व्हेनम बँक ( सर्प विषपेढी ) कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली आहे ?२) महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?३) ग्लोबल एअरलाईन सेफ्टी रँकिंगमध्ये भारताला कितवे स्थान मिळाले आहे ?४) दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे ?५) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग ३) ४८ वे ( चीनला ४९ वे ) ४) सेऊल ५) अंटार्क्टिक ब्ल्यू व्हेल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 राजेश जळकोटे👤 आनंद गजभारे👤 फारुख अली👤 अनिल सूत्रावे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.**देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी फक्त अंत:करण शुद्ध अथवा पवित्र असावे लागते. त्याचबरोबर आपले दोन्ही कर जोडून विनम्रतेने त्याचे नामस्मरण करावे म्हणजे ते परमेश्वरास मान्य होईल.अशी प्रार्थना कोणीही करू शकतो. त्यासाठी कोणतीही जात, कोणताही धर्म , कोणताही राव किंवा रंक हा भेद लागत नाही. परमेश्वर जसा निर्गूण निराकार आहे तसाच तो आपणा सा-यांच्या निस्वार्थपणे करणा-या भक्तीचा भुकेला आहे.तो नक्कीच आपल्याकडे धावून येईल.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहरात किती कावळे आहेत?*अकबर बादशाह आपल्या दरबारातील सरदारांना नेहमी निरनिराळे प्रश्न विचारायचा. निराळी कोडी घालायचा. ज्ञान, हुशारी आणि चातुर्य यांची परीक्षा घ्यायचा. एकदा त्याने आपल्या सरदारांना एक चमत्कारिक प्रश्न विचारला, " आपल्या शहरात किती कावळे आहेत?"बादशहा उत्तराच्या अपेक्षेन एकएका सदाराकडे पाहत होता. सरदार एकामागून एक उभे राहत होते आणि निमूटपणे आपली मान खाली घालत होते. एकही सरदार बादशाच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नव्हता. इतक्यात बिरबलाने दरबारात प्रवेश केला. तो दरबारातील सर्वात हुशार सरदार होता. पाहिले की, इतर सरदार माना खाली घालून उभे आहेत. बादशहाने घातलेल्या कोड्याचे उत्तर ते देऊ शकले नाहीत, हे बिरबलाने ताबडतोब ओळखले. वाकुन सलाम केला आणि तो आपल्या जागेवर जाऊन बसला. बादशहाने त्याला विचारले, " बिरबल, शहरात किती कावळे आहेत?" बिरबल लगेच उभा राहिला आणि म्हणाला," महाराज, आपल्या शहरात 50 हजार 378 कावळे आहेत."" बिरबल, तू हे एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस?" बादशहाने आश्चर्यचकित होऊन विचारले. बिरबल म्हणाला "महाराज, आपण कृपया कावळे मोजून पहा. जर ते 50 हजार 378 पेक्षा जास्त असले, परगावाहून काही कावळे आपल्या मित्रांना , नातेवाईकांना भेटायला आले आहेत, असे खुशाल समजा. जर ते त्यापेक्षा कमी असतील, तर आपल्या शहरातील कावळे त्यांच्या मित्रांना, नातेवाईकांना भेटायला बाहेरगावी गेले आहेत उघडच आहे."बादशहा बिरबलाच्या चतुराईवर खुश झाला व आनंदून म्हणाला, " शाब्बास बीरबल, शाब्बास."तुझे चातुर्य आणि बुद्धिमत्ता खूप उत्कृष्ट आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/12/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भारतीय लष्कर ध्वज दिन*💥 ठळक घडामोडी :- ◆ १९८३ - स्पेनची राजधानी माद्रिदच्या बराहास आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमाने एकमेकांवर आदळली. ९३ ठार.◆ १९८७ - पॅसिफिक साउथवेस्ट एरलाइन्स फ्लाइट १७७१ कॅलिफोर्नियात पासो रोब्लेसजवळ कोसळली. ४३ ठार. विमानातील एका प्रवाश्याने स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास गोळ्या घातल्या व वैमानिकांना मारून स्वतःवरही गोळ्या झाडल्या.◆ १९८८ - आर्मेनियात स्पिताक प्रांतात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप. २५,००० ठार, १५,००० जखमी, ४,००,००० बेघर.💥 जन्म :- ◆ १९०२ - जनार्दन नवले, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆ १९५७ - रोहन जयसेकरा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.◆ १९५९ - सलीम युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू. 💥 मृत्यू :- ◆ १२५४ - पोप इनोसंट चौथा. ◆ १२७९ - बॉलेस्लॉ पाचवा, पोलंडचा राजा. ◆ १६३२ - सिसिनॉस, इथियोपियाचा सम्राट. ◆ २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आता शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत, राज्य शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *डिसेंबर 2022 नंतर महागाई कमी होत जाईल, एसबीआयच्या संशोधन अहवालातून भाकीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर भीमसागर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्राचील जनावरांना लम्पीचा विळखा, 15 दिवसांत 7 हजार जनावरं दगावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कुर्ल्यातील जमीन विक्रीच्या व्यवहारातून मनी लॉंड्रिंग, नवाब मलिकांचा यामध्ये सहभाग; न्यायालयाचं निरीक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरला. काल गुणवत्ता निर्देशांक 300 पार.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी इंग्लंडच्या दोन खेळाडूंसह पाकिस्तानचा एक खेळाडू नॉमिनेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Teeny-tiny-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/ODbmp0DahzQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मार्ट बॉय : काळाची गरज*मुलीने स्वतः ला तयार केले पाहिजे. कराटे शिकले पाहिजे, मुलांना प्रतिकार करता येईल असे काही केले पाहिजे, अर्थात स्मार्ट गर्ल व्हायला पाहिजे असा एक सुर सध्या सर्वत्र ऐकायला आणि पाहायला मिळत आहे. त्याऐवजी आपल्या घरातील मुलांना स्मार्ट बॉय करायला पाहिजे यावर कुठे ही चर्चा होतांना दिसत नाही. मुलांना नैतिकतेचे धडे शिकविले तर ........... पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.http://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_35.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌳 *बोन्साय* 🌳 *****************जपानी माणूस निसर्गप्रिय आहे. साराच निसर्ग घराच्या भिंतीत, आपल्या बागेत साठवता आला, तर या हट्टाने बोन्सायची निर्मिती जपानी कल्पकतेने केली गेली आहे. अनेक जातींची झाडे, वृक्ष, फळझाडे ही छोट्याशा कुंडीत लहान आकार कायम राखत विशिष्ट पद्धतीने जोपासायची, त्यांचे सर्व गुणधर्म मात्र कायम राखायचे अशा तंत्रातून निर्माण झालेल्या झाडाला 'बोन्साय' म्हणतात.वडाचे झाड जेमतेम फूटभर उंचीचे, पण त्याच्या फांद्यांना पारंब्या फुटलेल्या, संत्र्याचे झाड वीतभर उंचीचे, पण त्याला लिंबासारख्या आकाराची संत्री लागलेली, तीही संत्र्याच्या चवीची... असा प्रकार बोन्साय पद्धतीत घडवला जातो.अशा पद्धतीत विविध झाडे तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे, चिकाटीचे व वनस्पतीशास्त्राची परिपूर्ण जाण असणारे काम आहे. झाडांना पुरेशी पोषण द्रव्ये देताना त्यांची वाढ मात्र कुंठीत ठेवायची, याचे तंत्र म्हणजे बोन्साय. केवळ वाढणार्‍या फांद्या छाटून बोन्साय कधीही तयार होत नाही. विशेषत: झाडाला आलेली फळे परिपूर्ण चवीची असणे हा त्यातील एक क्लिष्ट भाग ठरतो. बोन्साय तयार करण्याची पद्धत दिसायला साधीशीच आहे. प्रत्येक झाडाला दोन प्रकारची मुळे असतात. लांबवर जाणारी, खोल अन्नाच्या शोधात जमिनीत रोवणारी सोटमुळे व केशसंभासारखी तंतूमुळे. तंतूमुळे ही पाणी शोषून घेणे, जमिनीच्या आसपासची पृष्ठभागातील विविध रसायने गोळा करणे या कामात गुंतलेली असतात. त्यांचा झाडाला आधार देणे, वाढीला भक्कम पाठबळ देणे यात सहभाग नसतो. बोन्साय करताना मुख्य मुळे तारांनी बांधणे, वेळच्या वेळी त्यांना छाटणे, त्यांची वाढ न होऊ देणे यावर लक्ष्य केंद्रित केले जाते. ठराविक दिवसांनी ही प्रक्रिया करत राहिल्यास झाडाची वाढ खुंटते, पण झाडाचे मूळ स्वरूप कायम राहते. अर्थातच बोन्साय झाडांच्या कुंडय़ा यासाठी ठरावीक महिन्यांनी बदलत गेल्यावरच हे शक्य होते. बोन्सायचे कौतुक करणारी जशी मंडळी आहेत तशीच त्याला नावे ठेवणारी विरोधक मंडळीही आहेत. निसर्गाला स्वतःच्या मुठीत पकडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे विरोधकांचे मत पडते. याउलट साराच निसर्ग माझ्या दिवाणखान्यात मी कसा मांडला आहे, असे बोन्सायचे कौतुक करणारी मंडळी म्हणतात.एखाद्या प्रसिद्ध नावाजलेल्या व्यक्तीच्या छायेत कायम दुय्यम भूमिकेत वावरणाऱ्या मंडळींना आपण बोलीभाषेत 'बोन्साय' म्हणूनच संबोधतो, ते का, हे आता कळले ना ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वच्छ वायू सर्वेक्षणात देश स्तरावर तिसरा, तर राज्यस्तरावर पहिला क्रमांक कोणत्या शहराने पटकावला ?२) दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय विभाग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?३) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक धावांचा ( ५०६ धावा ) डोंगर कोणत्या देशाने केला ?४) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?५) उस्ताद झाकीर हुसेन कोण आहेत ?*उत्तरे :-* १) अमरावती २) महाराष्ट्र ३) इंग्लंड ( पाकिस्तान विरुद्ध ) ४) व्हाईट हाऊस ५) प्रसिद्ध तबलावादक, पद्मभूषण *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 धनंजय शंकर पाटील, सोलापूर👤 साईनाथ जायेवाड, येवती👤 भीमाशंकर बच्चेवार👤 मनोज मनूरकर👤 बाळासाहेब तांबे👤 आश्विन जैस्वाल👤 संतोष अनालदास*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपल्या भोवती पसरलेला अथांग निसर्ग शत-शत पावलावर आपणांस आनंदाचे झोके देत असतो. डोंगराळ, खडकाळ प्रदेशातून खळखळ वाहणारा शांत निर्झर काय, सप्तरंगाने आकाशाला गवसणी घालणारा इंद्रधनुष्य काय, आकाशाचे चुंबन घेऊ पाहणारे उंचच उंच वृक्ष काय किंवा काळ्याकुट्ट ढगाला लागलेली रुपेरी किनार काय, हे सर्व पाहून कोणाला वेड लागणार नाही? नव्या तेजाने, नव्या ज्ञानाने , नव्या सौंदर्याने आंणि नव्या चैतन्याने निसर्ग सतत बदलत असतो. तो सतत आम्हांस काही तरी नवीन सांगत असतो. ते आपण नीट समजून घेतले पाहिजे.**आपण विनाकारण निराश, दु:खी, अशांत, बेचैन, त्रस्त होण्यात काय अर्थ आहे? त्यासाठी निसर्ग हाच आपला गुरू आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे. अहंकाराचा मोती होऊन कोणा राजाच्या मुकुटात चमकत राहण्यापेक्षा कमल पत्रावरील अस्मितापूर्ण दवबिंदू होऊन एखाद्या तहानलेल्या चिमणीच्या तोंडात पडण्यात केवढा मोठा आनंद आहे ! म्हणून निसर्गातील चैतन्याचा स्फुल्लिंग मनी बाळगावा आणि आपल्या ध्येयपूर्तीची स्फूर्ती मस्तकी धारण करावी. मगच जगण्यात आनंद आहे असे वाटेल. जीवन ही चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमिका आहे हे समजले तरच जीवनातील 'आनंदाचे डोही आनंद तरंग' निर्माण करण्याची इच्छा बळावेल. स्वत: चंदनासारखे झिजत झिजत इतरांना सुगंधित करून सोडण्यात आपल्या जीवनाचे सार्थक आहे.* ‼ *रामकृष्णहरी* ‼🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• दगडाने कधीच कुणाजवळ हट्ट केला नाही.जिथे आहे मी तिथे चांगलाच आहे.कुठेही ठेवा पायरीवर ठेवा,उंबरठ्यावर ठेवा,घराच्या मुळव्यामध्ये ठेवा, ओट्यावर ठेवा, देवाच्या पायाखाली ठेवा, मूर्तीरुपात ठेवा किंवा स्मारकात ठेवा,पण मला कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.माझा सा-यांनीच कुठे ना कुठे उपयोग केला आहे.त्यामुळे माझं अस्तित्व कुठे ना कुठे असल्यामुळे मला सा-यांनीच मान सन्मान केला असल्यामुळे मी दगड जरी असलो तरी माणसांच्या हृदयात माझं कुठं ना कुठं तरी स्थान आहे.माझी किंमत सा-यांनीच केली आहे.जर मी दगड नसलो असतो तर मला देवत्वही प्राप्त झाले नसते.मानवाच्या प्रत्येक गोष्टीसाठी हजर राहून सगळ्यांना आपलेसे झालो आहे.ज्याप्रमाणे एखादा दगडासारखा माणूस जरी असला तरी तो कुठे ना कुठे इतरांच्या मदतीला धावून जातोच.शेवटी माणूसही आपापल्या भावना ओळखून इतरांच्या मदतीला जातच असतो.दगडासारखा दगड भावनाशून्य असतानाही आपण त्याला उपयोगात आणतो तर माणूस म्हणून इतरांच्या मदतीला प्रसंगानुरूप मदतीला धावून जाणे आणि आपले जीवन कारणी लावणे हे देखील दगडाइतकेच कामाला आल्यासारखेच आहे.हा परोपकारी विचार प्रत्येकाने करायला हवा मग कुठे ना कुठे कुणाच्यातरी हृदयात आदराचे निश्चितच स्थान मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/12/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिन*💥 ठळक घडामोडी :- ● २०००-थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीयपुरस्कार' प्रदान करण्यात आला.● १९९२ - अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.त्यामध्ये उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० लोक ठार झाले● १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.💥 जन्म :-● १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.● १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९७६- क्रांतिसिंह नाना पाटील● *१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ*● २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अपमान,17 तारखेला भव्य मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शक्ती दाखवू: उद्धव ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील गोवर रुग्णांची संख्या 836 वर; टास्क फोर्सच्या बैठकीत अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं, 93 जागांसाठी 59 टक्के मतदानाची नोंद, 8 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील बाह्मणी परिसरात सोन्याचे साठे..  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचाही दुजोरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलिस हवालदाराची हकालपट्टी, गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही रॅकेटमध्ये सामील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोरोनानंतर महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्येत 42 टक्क्यांची वाढ, मात्र दहा वर्षात मराठी माध्यमातील संख्या 51 टक्क्यांनी घसरली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Astronomy Club अस्ट्रोनॉमी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/mTm6aAGdHHE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रज्ञासूर्य विशेषांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••••डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत.......खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा व विशेषांक download करून घ्यावे.https://drive.google.com/file/d/1kosTls7MJZs-ZqpbQIfouieMOvY65wbl/view?usp=drivesdk प्रज्ञासूर्य विशेषांक वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 ******************************तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कोणत्या राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे ?२) पुरुष विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ स्पर्धेच्या सामन्यात रेफरिंग करणारी पहिली महिला रेफ्री कोण ठरली ?३) विजय हजारे ट्रॉफित सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणी केला ?४) नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेते कोणाला ओळखले जाते ?५) कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) स्टेफनी फ्रापार्ट, फ्रान्स ३) ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्र ४) मेधा पाटकर ५) बसवराज बोम्मई *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे👤 डी. आर. भोसके, येवती👤 अशोक हिंगणे👤 शंकर बोंबले👤 कैलास सोनकांबळे👤 बालाजी गैनवार, चिकना👤 नवनाथ राजीवाडे👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर👤 माधव हालकुडे👤 प्रा. मंगल सांगळे👤 दत्ता काशेवार👤 विवेक क्षीरसागर👤 देवानंद मुरमुरे👤 नरेश पांचाळ👤 राजेश आंपलवाड👤 कैलास सोनकांबळे👤 बाबासाहेब घागले👤 लवकुमार मुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणसाच्या स्वभावातील 'मी' पणा हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे 'मी' पणाच्या मगरमिठीतून त्याची सुटका होणे अशक्यप्राय असते. 'मी' पणा म्हणजेच अहंकार. हा अहंकार दगडी भिंतीसारखा असतो. सहज जरी दगडी भिंतीवर आपले डोके आपटले तरी ते रक्तबंबाळ होऊ शकते; परंतु अस्मिता ही खुल्या खिडकीसारखी असते. अशा खिडकीतून स्वच्छ आणि शुद्ध हवा आतून बाहेर खेळत असते. अहंकारी माणसे उगाचच सतत म्हणत असतात की, 'मी हे केले आणि मी ते केले'. 'मी' पणाची अशी वल्गना करण्यापेक्षा अस्मिता बाळगणारी माणसे म्हणत असतात की,'मी देखील हे करू शकतो, मी देखील ते करू शकतो.'**अस्मितापूर्ण भाषेत सौजन्य असते, नम्रता असते, शहाणपण असते. अहंकार हा एखाद्या महावृक्षासारखा असतो. घोर संकटाच्या वादळात तो मुळासकट जमीनदोस्त होऊ शकतो; परंतु अस्मिता लव्हाळ्यासारखी असते. ती वा-याच्या तालावर आनंदाने डोलत असते. अहंकाराच्या महापुरात मोठ मोठे वृक्ष वाहत जाऊन नाहीसे होतात ; परंतु अस्मितेच्या वाटेवर स्वार होऊन छोटीशी मुंगी पैलतीरावर जाऊन हसत असते. आपले जगणे हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. आपल्या जगण्यात आनंद आहे. तो अनुभवायाचा असतो. आपले जगणे आनंदाचे गाणे व्हावे असे वाटत असेल तर अहंकारमुक्त प्रांगणात स्वछंदपणे विहार करायला शिकले पाहिजे. अस्मितापूर्ण आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकले पाहिजे. आपले जगणे मलयगिरी पर्वतावरील सुगंधित वा-यासारखे व्हावे असे वाटत असेल तर प्रथम आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात..."जीवन त्यांना कळले हो । मीपण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो ॥* ‼ *रामकृष्णहरी*‼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...!अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख,शांती,समाधान,संस्कार,योग्य दिशा,जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत.त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे.पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.📚📕📚📕📚📕📚📕📚•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता*पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/12/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.१९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.💥 जन्म :-१३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट.१४४३ - पोप ज्युलियस दुसरा.💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.१७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.१९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.२०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या वर्ष 2021 व 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचे झाले वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अमरावतीची हवा सर्वात स्वच्छ, तर चंद्रपूरची हवा देशात सर्वाधिक प्रदूषित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा, फडणवीसांच्या हातात स्टेअरिंग, शिंदे-फडणवीसांचा एकाच कारनं प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंढरपुरात माऊली कॉरिडॉरमुळे खुद्द विठुरायालाही व्हावं लागणार विस्थापित, पुरातन ताकपीठे, विठ्ठल मंदिराचे अस्तित्व धोक्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे,   तात्पुरता निवारा, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पाणी, शौचालये, स्नानगृह उभारण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत, एक गडी राखून बांगलादेशचा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे**06 डिसेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन*••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/dr-b-r-ambedkar.html••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••।। विनम्र अभिवादन ।।~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो.पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते.पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्‍या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गुजरातमध्ये मतदारांत जागृती व्हावी यासाठी केवळ एका मतासाठी कोणत्या ठिकाणी मतदान केंद्र बनविण्यात आले होते ?२) जगात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी मॅडरिन भाषा कोणत्या देशाची आहे ?३) २०२२ च्या IPL अंतिम सामन्यादरम्यान सर्वाधिक प्रेक्षकांच्या ( १,०१,५६६ प्रेक्षक ) उपस्थितीसाठी कोणत्या स्टेडियमचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने गौरव झाला ?४) केरळमधील कोणत्या ठिकाणाला 'दक्षिण काश्मीर' म्हणून ओळखले जाते ?५) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) ने कोणत्या प्राण्याला खाद्य प्राणी ( food animal ) म्हणून मान्यता दिली आहे ?*उत्तरे :-* १) बाणेज, उना विधानसभा क्षेत्र २) चीन ३) नरेंद्र मोदी स्टेडियम, गुजरात ४) मुन्नार हिल स्टेशन ५) याक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास गणवीर, नागपूर👤 साईनाथ कल्याणकर, येवती👤 सूर्यकांत स्वामी👤 राज डाकोरे👤 संतोष रामराव शिंदे👤 अशोक चिंचलोड, येवती,👤 राजेश गटलावार👤 राजू अलमोड👤 योगेश पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....**माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...**काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!**"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"* ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पडलेल्या घराच्या भिंतीआत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उभ्या करतायेतात नि घर उभे करता येते,परंतु चार माणसांची मने जर तुटली तर ती माणसं पुन्हा जोडणेआणि त्यांचे हृदयात घर करणे अतिशय अवघड आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनातील तणाव दूर करणे.*एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहेकी रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडमने प्रश्न केला, " या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?"कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडमने पुन्हा एकदा स्मितहास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. एकतास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर . ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ...आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा ,काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसालतर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा व कायम आनंदी रहा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाददायक जीवन जगायला शिका ... आयुष्यखुप सुंदर आहे .....!आयुष्य जगण्याच्या दोन पध्दती :१) जे आवडते ते मिळवायला शिका.२) जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *जागतिक विकलांग दिवस*💥 ठळक घडामोडी :- १९७१ - पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.२००९ - सोमालियाची राजधानी मोगादिशूमधील आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात तीन मंत्र्यांसह २५ ठार.💥 जन्म :-१८८४ - डॉ. राजेंद्र प्रसाद, स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती.१९५८ - रिचर्ड रीड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.१९६३ - ऍशली डिसिल्व्हा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.१९७४ - चार्ल विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ११५४ - पोप अनास्तासियस चौथा.१७६५ - लॉर्ड जॉन फिलिप सॅकव्हिल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.१९१२ - प्रुदेन्ते होजे दि मोरे बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ४ डिसेंबरला समृद्धी  महामार्गाची पाहणी करणार. ११ डिसेंबरला मोदींच्या दौऱ्याआधी शिंदे-फडणवीस महामार्गाचा आढावा घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लालपरीच्या ताफ्यात आणखी 8 हजार बस येणार, डिझेलवर चालणाऱ्या 2 हजार बस येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नंबी नारायणन-इस्रो हेरगिरी प्रकरण; सुप्रीम कोर्टाकडून आरोपींना जामीन देण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती, केरळ हायकोर्टाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *CISCE बोर्डाकडून दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जारी, एसएससी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा, नवी मुंबईत 10 हजार विद्यार्थी देणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सुवर्णनगरी जळगावमध्ये सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ ; जीएसटीसह सोन्याचा दर 55 हजारांच्या पुढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्राचे विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं; सौराष्ट्राने दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *MPSCचं सुपरफास्ट काम ! PSI पदांच्या शारीरिक चाचणीनंतर चारच तासात निवड यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक विकलांग दिनानिमित्त लघुकथा .......    *पंगूम लंघयते गिरीम*वरील लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2021/03/blog-post_31.html        लघुकथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रस्त्यांवर फेकलेल्या लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होते ?* 📙शाळेत जाताना सकाळच्या वेळी रस्त्यांवर अनेक दुकानांच्या समोर लिंबू मिरच्यांच्या माळा फेकलेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आई व वडिलांनी या लिंबू मिरच्यांवर पाय देऊ नकोस त्यांना ओलांडून जाऊ नकोस असही तुम्हाला बजावून सांगितले असेल. त्यामुळे तुम्ही त्यापासून दूर राहण्याचा नक्कीच प्रयत्न करत असाल. पण जर लिंबू मिरच्यांवर पाय पडला तर काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.कोणाची वाईट नजर लागू नये आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण व्हावे या समजापायी दुकानदार दुकानांवर लिंबू मिरच्या, काळ्या बाहुल्या टांगून ठेवत असतात. दुसऱ्या दिवशी ते लिंबू मिरची रस्त्यावर फेकून देतात. दिवसभरात त्या लिंबू मिरच्यांमध्ये अनेक दुष्ट शक्तींचा प्रभाव जमा झाल्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांना खात्री वाटत असते !खरे तर जगात भूते खेते नसतात. दुकानदारांना खरी भीती चोरांची, आगीची वैगरे असते. नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा रक्षक वा आग प्रतिबंधक यंत्रणा या कामाला येतील का टांगलेल्या लिंबू मिरच्यांच्या माळा ? याचे उत्तर अगदी शेंबडा मुलगाही सांगू शकेल. पण तरीही चांगले शिकले सवरलेले लोक अशा अंधश्रद्धांना बळी पडून लिंबू मिरच्यांवर नाहक खर्च करत असतात. देशातील लाखो दुकानांवर दररोज लाखो लिंबे व करोडो मिरच्या टांगल्या जातात व दुसऱ्या दिवशी त्या फेकून दिल्या जातात. यात केवढे मोठे राष्ट्रीय नुकसान आहे याचा विचार सर्वांनी करायला हवा.लिंबू मिरच्यांचे वास्तव तुम्हाला कळले. आता निदान तुमच्या व तुमच्या नातेवाईकांच्या दुकानांवर लिंबू मिरच्यांच्या माळा दिसणार नाहीत आणि त्यावर पाय पडला तरी तुम्ही घाबरणार नाही याची मला खात्री वाटते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" शब्द खोटं बोलू शकतात, मात्र कृती नेहमीच सत्य बोलते "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) पाकिस्तान कडून आलेला ड्रोन मारून पाडणाऱ्या पहिल्या BSF महिला जवान कोण ?२) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने रद्द कोणत्या देशाचे झाले आहेत ?३) भारतातली पहिली बोट रेस व जगातील सर्वात मोठी जलक्रीडा स्पर्धा २०२२ कोणी जिंकली ?४) टिपू सुलतान कोण होता ?५) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केव्हा केली ?*उत्तरे :-* १) भाग्यश्री नाईक, सालेकसा, जि. गोंदिया ( महाराष्ट्र ) २) भारत ( ४२ सामने रद्द ) ३) ट्रॉपिकल टायटन्स ४) योद्धा, विद्वान, म्हैसूर राज्याचे शासक ५) १३ ऑक्टोबर १९३५ ( येवला, नाशिक )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆*     👤 साईप्रसाद पुलकंठवार, धर्माबाद👤 रघुनाथ टेकुलवार, करखेली👤 शिवाजी कल्याणकर👤 सौ. अनुराधा श्यामसुंदर माडेवार👤 विरेश रोंटे👤 श्रेयस दिलीप धामणे👤 पांडुरंग तम्मलवाड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर?  ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना  माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.**जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.*   ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥        *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    प्रत्येकजण आपल्या जीवनाच्या चित्रशाळेत स्वत:चे एक सुंदर जीवनाचे चित्र काढून रंगवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो.जीवनाच्या चित्राचा आकार कसाही असला तरी त्यात रंग मात्र आपल्या कल्पक बुध्दीने भरण्याचा प्रयत्न करतो.त्यात असणारे रंग जरी वेगवेगळे असले तरी भरण्याचे कौशल्य ज्याला आहे तो आपल्या वेगळ्या पद्धतीने,कलेने भरुन जीवनाला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो.ज्याला ही कला अवगत झाली नाही त्याच्या जीवनचित्रात रंगही भरता येत नसल्यामुळे जीवनचित्र रंगहिन व आकारहिन बनते.म्हणून जीवनाच्या जीवनचित्रशाळेत यशस्वी व्हायचे असेल,जीवनाला रंगरुप आकार द्यायचा असेल तर आपल्यातील कल्पकतेला,कौशल्याला आणि नवनिर्माण शिलतेला जागृत ठेवून जीवन सुंदर आणि आनंददायी निर्माण करायला शिकले पाहिजे.त्यातून स्वत:ला आणि इतरांना जगण्यासाठी एक नाविण्यपूर्ण कला अवगत होईल आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🎨🌱🎨🌱🎨🌱🎨🌱•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *लाख मोलाचा देह*एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे''छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक एड्स दिन💥 ठळक घडामोडी :- ◆१९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले◆ १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना💥 जन्म :-◆ १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.◆ १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.◆ १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ◆ ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.◆ १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अ‍ॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोराना काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 597 परिचारिकांना कायमस्वरुपी करणार, शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सध्या देशात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'टोयोटा'ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द, त्यामुळे भारताला वनडे मालिका गमवावी लागली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         *कथा -  सुंदर*त्‍याचं नाव सुंदर, तसं त्‍याचं कामही सुंदर त्‍याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं.  परंतु सारेच जण त्‍याला बंदर म्‍हणायचे.  कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html    कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧    कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त .       दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी .    पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...!   चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून .   कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार .    मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'जागतिक एड्स दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) एड्स होण्याची मुख्य कारणे कोणती ?३) जगात सर्वात प्रथम एड्सचा रुग्ण कोठे सापडला ?४) एड्सची लक्षणे कोणती ?५) भारतात एड्सचा पहिला रुग्ण कोठे सापडला ?*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) HIV रुग्णाचे रक्त दिल्याने, दुषित रक्त असलेल्या इंजेक्शनमधून, HIV बाधित आईकडून स्तनपान झाल्यावर, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे इत्यादी ३) अमेरिका ( १९८१ ) ४) कित्येक आठवड्यापासून ताप येणे, खोकला येणे, वजन कमी होणे, तोंड येणे, सतत जुलाब, झोपतांना घाम येणे, भूक न लागणे इत्यादी ५) मुंबई ( १९८६ )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक◆ हेमंत भेंडे, शिक्षक◆ राजकुमार दाचावार, शिक्षक◆ श्याम नरवाडे◆ मारुती गिरगावकर, शिक्षक◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक◆ मारोती दिंडे◆ श्रीकांत लाडे◆ सुभाष सोनटक्के◆ शिवाजी पुरी◆ श्याम पाटील◆ विश्वनाथ पांचाळ◆ बालाजी कलकोटे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.**भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.*              *॥ रामकृष्णहरी ॥*🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲          *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                     *जीवन**समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि**"समुद्र चोर आहे".**त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि**"समुद्र पालनकर्ता आहे".**एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते**"समुद्र खुनी आहे".**एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो**"समुद्र दाता है".**अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते**लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*      *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...**भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता**जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय  वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 30/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           💥 ठळक घडामोडी :- १८७२ - पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना स्कॉटलंड वि. इंग्लंड हा हॅमिल्टन क्रेसेंट, ग्लासगो येथे खेळला गेला.💥 जन्म :-१८१७ - थियोडोर मोम्सेन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन लेखक.१८५८ - जगदीशचंद्र बोस, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.१८६९ - गुस्ताफ डालेन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ.१९१५ - हेन्री टॉब, नोबेल पारितोषिक विजेता कॅनडाचा रसायनशास्त्रज्ञ.१९३५ - आनंद यादव, मराठी लेखक.💥 मृत्यू :- २०१२ - विजय देवधर, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शिवनेरी, अश्वमेधमधूनही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मुंबई-पुणे दरम्यान मोफत प्रवास. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत एसटीच्या या बससेवांचा समावेश करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बीसीसीआयच्या निवड समितीच्या सदस्यपदासाठी विनोद कांबळी, मनिंदर सिंग आणि सलिल अंकोला शर्यतीत. बीसीसीआयच्या सदस्य पदासाठी ५० पेक्षा जास्त खेळाडू इच्छुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *न्यायाधीशांची संख्या दुप्पट करण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग, जीवितहानी नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवाब मलिकांच्या जामीनावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी, दिलासा मिळणार की अडचणी वाढणार?*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज क्राइस्टचर्च येथील हॅग्ले ओव्हल येथे तिसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Opposite words विरुद्धार्थी शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/HUnNmxyrG7A~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रतिलिपी डॉट कॉम वरील गत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा             *सोन्याचे बिस्कीट*माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी. चा रस्ता कधी........https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/sonyachi-biscuit         लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *मद्यपानामुळे काय दुष्परिणाम होतात ?* 📙'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' हे खरे असले तरी बोलताना व चालताना सारखेच अडखळणाऱ्या दारुड्याच्या बाबतीत मात्र हे सपशेल खोटे ठरते. मद्यपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातच या दारूचे व्यसन लागते. पिक्चरमधील हिरोचे अनुकरण, मित्रांचा प्रभाव, कुतूहल, नाविन्याची आवड, साहसी वृत्ती, मानसिक अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे लोक मद्यपानाला सुरुवात करतात. एकदा सुरुवात केली कि मग त्याला मर्यादा राहत नाही.आरोग्यावर मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम होतात. यात यकृताचा कर्करोग, मधुमेहासारखा रोग लवकर होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयाला रक्त पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होणे व हृदयविकाराचा झटका येणे हे रोग दिसून येतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीचे स्वत:वर नियंत्रण नसते. त्यामुळे असे लोक अपघातात सापडतात व मृत्युमुखीही पडतात.मद्यपानाचे आरोग्याखेरीच सामाजिक व आर्थिक परिणामही फार होतात. घरे उद्ध्वस्त होतात. नातीगोती तुटतात. आर्थिक विपन्नावस्था येते. दारू पिऊन व्यक्ती पत्नीला मुलांना मारहाण करते. घराकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाल्याने मुलांचे शिक्षण नीट होत नाही. साहजिकच मुले अशिक्षित राहतात. समाजात बेरोजगारी वाढते व गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते.दारूमुळे यकृत खराब होते आता पायांवर सूज येते पोटात पाणी होते. मेंदूवर परिणाम होऊन मानसिक रोग होतात. अशी ही सर्वनाशक दारू. आधी माणूस दारू पितो व नंतर हळूहळू ती त्याला त्याच्या घरादाराला पिऊन टाकते (संपवते); हे म्हणतात, ते खरेच आहे. त्यामुळे मद्यपानाच्या सवयीपासून दूर राहिलेले चांगले.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'अ' श्रेणी क्रिकेटमध्ये सलग पाच शतक झळकवण्याचा विश्वविक्रम कोणी केला ?२) 'तारक मेहता का उलटा चष्मा' मध्ये जेठालालच्या वडीलाची भूमिका करणारे चंपकचाचा अर्थात कोण ?३) भारतातील जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे ?४) महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रमाची स्थापना केव्हा केली ?५) टिपू सुलतानचे पूर्ण नाव काय होते ?*उत्तरे :-* १) जगदीशन नारायण, तामिळनाडू २) अमित भट्ट ३) ६४० जिल्हे ४) १९३६ ५) सुल्तान फतेह अली खान शाहाब *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 राजेश दरेकर, सहशिक्षक, गडचिरोली👤 राजेश्वर येवतीकर, येवती👤 विलास वाघमारे, भैसा, तेलंगणा👤 रवी बुगावार, धर्माबाद👤 देविराज पिंगलवार, भोकर👤 उमेश खोकले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.**दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.*             *॥ रामकृष्णहरी ॥*🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰        *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      संकल्प करा अथवा करु नका शेवटी निर्णय तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज रहा.कारण ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टीसाठी सातत्याने प्रयत्न करा म्हणजे तुमचे तुम्हाला निश्चितच मिळेल.मी असे करणार आहे मी तसे करणार आहे असे जगाला सांगत सुटू नका.जग काही म्हणतील त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही किती दिवस चालणार ?चार दिवस तुम्ही त्यांच्यासमोर करणार आणि काही दिवस निघून गेले की, पुन्हा तेच करणार.म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाही असेच होईल ना ! संकल्प असे करा की,ते आयुष्यभर आपल्या जीवनासाठीच आहेत.मग तुम्हाला वर्षाची किंवा वर्ष संपल्यानंतर नवीन वर्षाच्या प्रारंभी करायची काही गरजच नाही.दिवस,महिने,वर्ष येतात जातात याकडे लक्ष देऊ नका,पण आयुष्य हे एकदाच येते आणि ते अमर्यादित म्हणजेच आयुष्याच्या शेवटपर्यंत असेल.आपण केलेले संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या मनाचा ठाम निर्धार असला की,काही दर वर्षी शेवटी सोडायचे आणि नवीन धरायचे किंवा करायचे असेही करायचे नाही.काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नाही तर आपण काळाची पावले ओळखून आपण आपले जीवन आनंदमय आणि सुखमय कसे जाईल याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.तुम्ही निर्माण केलेले आणि प्रत्यक्ष जीवनात अनुसरलेले संकल्प हे इतर लोक आपोआपच अनुकरण करतील आणि करायलाही लागतील.हा तुमचा तुम्ही सुरवातीपासून केलेला आदर्श संकल्प नवीन वर्षासाठी इतरांना अनुकरणीय ठरेल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *सिंह  व बेडूक*  एका जंगलात एक सिंह राहायचा.त्याला त्या जंगलात कंटाळा आला तो दुसऱ्या  जंगलात राहायला गेला .एकदा सिंह मोठया ने गरजला.त्या जंगलात अनेक पशु-पक्षी तसेच काही बेडूक ही राहत होते .त्यांनी यापुर्वी सिंह पाहिले नव्हते .त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला ,"कोणीतरी मोठा आवाज काढत आहे .आता मीही मोठा आवाज काढतो ."बेडकानी मोठा आवाज काढला . सिंहासाठी हा आवाज नवीन होता. सिंहाला वाटले , कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे, आपण सावध राहिले पाहिजे.' सिंहाने आपली गर्जना थांबवली. तो शांत उभा राहिला. बेडूक मोठ्या मोठ्याने ओरडत पुढे पुढे सरकू लागला. सिंहाने त्याला पहिले व त्याचा आवाज ऐकला. सिंह वेगाने पुढे सरकला. सिंहाने बेडकाचे डोक्यावर पाय दिला. बेडूक गयावया करू लागला. सिंहाने त्याला सोडून दिल. बेडूक आनंदाने पाण्यात गेला.बोध: आव्हान पेलण्याची ताकद असावी मग कोणी कितीही सामर्थ्यशाली असले तरी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 29/11/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••           💥 ठळक घडामोडी :- १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.💥 जन्म :-१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.१९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.१९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चिती करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता वैद्यकीय मदतीसाठी हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड द्या! याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाची केंद्रासह राज्यांना नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांचा सरकारला 4 डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम, अन्यथा कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात 'जलसमाधी' घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता गोवरसाठीही क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या.. प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत एका षटकामध्ये 7 सिक्सर साग झंझावाती द्विशतकासह केला वर्ल्ड रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Story-The Nightingale and the nobleman👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EgGfP7iJmFc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *शिक्षकांना शिकवू द्या ...*शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 साईनाथ बोईनवाड👤 योगेश खवसे👤 पोतन्ना गुंटोड👤 प्रमोद पाटील बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.**असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.*              *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼       *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *कासवाची चतुराई*एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच  म्हणाला अरे! शिकार हातची गेली..*बोध: चतुराईने केलेले  काम चांगलेच व   उपयोगी असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 28/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     💥 ठळक घडामोडी :- ● १०९५ - क्लेमोंटच्या सभेच्या शेवटच्या दिवशी पोप अर्बन दुसरा याने ले पो चा बिशप अधेमर व तुलुचा काउन्ट रेमंड चौथा यांना पहिल्या क्रुसेडचे नेता केले.● १५२० - फर्डिनांड मॅगेलनने दक्षिण अमेरिकेची सामुद्रधुनी पार केली व अटलांटिक महासागरातून पॅसिफिक महासागरात जहाज नेणारा पहिला युरोपियन ठरला● २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.💥 जन्म :-● १८५३ - हेलेन मॅगिल व्हाइट, पी.एच.डी.ची पदवी मिळवणारी पहिली अमेरिकन स्त्री.● १९११ - वाक्लाव रेंच, चेक कवी.● १९५० - एड हॅरिस, अमेरिकन अभिनेता.● १९५० - रसेल ऍलन हल्स, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.💥 मृत्यू :- ● १८९० - महात्मा जोतीराव फुले, भारतीय समाजसुधारक.● १९६७ - सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *विठुरायाचं मंदिर दिसणार 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात; 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोवरचा विळखा वाढला, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण, अतिरिक्त लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून हॉटस्पॉटमधील 1 लाख 40 हजार मुलांची यादी तयार*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर! पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या; धनंजय मुंडेंची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतासाठी मोठी संधी, 2023 च्या G20 परिषदेत तरुणांनी सामील व्हा; पंतप्रधानांचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा. आदित्य ठाकरेंचा 217 कोटींचा प्रस्ताव मुंबई पालिकेकडून मंजूर.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोला 2-0 नं हरवलं; मेस्सी, एन्झो फर्नांडीझ ठरले विजयाचे हिरो*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 2022 मध्ये झालेल्या आयपीएल फायनल सामन्याने केला विश्वविक्रम, प्रेक्षकांच्या संख्येनं या मैदानाची नोंद गिनिज बुकमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Story-Kind Kondiba👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/fs5JTsw7RVw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *गोरगरीबांचे कैवारी : महात्मा फुले*भारतीय समाजसुधारणेत व स्वातंत्र्य चळवळीत ज्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते ती व्यक्ती म्हणजे जोतीराव गोविंदराव फुले. जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने सर्वत्र ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव..........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_26.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                  *चिखलदरा*चिखलदरा हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील एक हिल स्टेशन व एक नगर परिषद आहे.महाभारतच्या महाकाव्यात वैशिष्ट्यपूर्ण, या ठिकाणी अशी भीती होती की भीमा यांनी एका भयंकर चढाओवातील खलनायक किचकचा वध केला आणि नंतर त्याला खोऱ्यात फेकून दिले. अशा प्रकारे कोच्चरदा-चिखलदरा हे त्याचे भ्रष्टाचार आहे म्हणून ओळखले जाऊ लागले.परंतु चिखलदराला अजून बरेच काही आहे. विदर्भातील एकमात्र हिल रिसॉर्ट, हे 1118 मीटरच्या उंचावर सर्वोच्च व्हॅरेट पॉईंट 1188 मीटर असून हे महाराष्ट्रातील एकमात्र कॉफ़ी-वाढविणारे क्षेत्र असण्याचे जोडलेले आहे. चिखलदराचे वार्षिक पाऊस 154 सेंमी आहे. उन्हाळ्यात तापमान 39 से हिवाळ्यात 5 से बदलते. भेट सर्वोत्तम महिने ऑक्टोबर ते जून पर्यंत आहेतहे वन्यजीवन-व्याघ्र, पेंटर, आळशीपणा अस्वल, सांबर, जंगली डुक्कर आणि अगदी क्वचितच पाहिलेले जंगली कुत्री आहे. जवळील प्रसिद्ध मेळघाट टायगर प्रकल्प आहे ज्यामध्ये 82 वाघ आहेत.चिखलदराचे निसर्गरम्य सौंदर्य चक्रीवादळ, प्रॉस्पेक्ट पॉईंट, आणि देवी पॉईंट मधून आनंद घेऊ शकतात. इतर मनोरंजक मोहिमा गव्हिल्गड आणि नारनला किल्ला, पंडित नेहरू बोटॅनिकल गार्डन्स, आदिवासी संग्रहालय आणि सेमादोह लेक यांचा समावेश आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्रातील किती व कोणत्या शाळांना २०२२ चा केंद्राचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार' प्राप्त झाला आहे ?२) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?३) सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच संधी मिळालेल्या महिलेचे नाव काय ?४) 'पाणी पंचायत' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?५) शिवसेनेचे 'सामना' हे मुखपत्र केव्हा सुरू झाले ?*उत्तरे :-* १) तीन - सातारा ( २ शाळा ) , रायगड ( १ शाळा ) २) नागपूर ३) आशा बोथरा ४) विलासराव साळुंखे ५) २३ जानेवारी १९८९*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 राम चव्हाण, नांदेड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••    *हसत दु:खाचा केला मी स्विकार,*    *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..*    *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,*    *आनंदयात्री, मी आनंदयात्री !**दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?**दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?*             *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀      *श्री. संजय नलावडे, मुंबई*     *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       जेव्हा रोज सकाळ ही नवीन सकाळ होऊन या जगात प्रवेश करते तेव्हा प्रत्येक सजीवांसाठी नवीन आशा पल्लवित करण्यासाठी.ती म्हणते काल जे काही चांगले-वाईट झाले त्यातील चांगले लक्षात ठेऊन त्याला सोबत घेऊन पुढे अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही तुमच्या जीवनात वाईट घडून गेले त्याला विसरुन जा.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंदाने जीवन जगा.ती म्हणते मी कधीच भूतकाळाला धरुन वर्तमानात जगत नाही आणि वर्तमानात जे काही जगते ते भविष्यकाळातही त्याचा  विचार करत नाही.त्यामुळेच मी रोजच्यारोज टवटवीत, प्रसन्न आणि प्रफुल्लीत असते.असा जर मी तुमच्यासारखा विचार करायला लागले असते तर  सगळ्या जीवसृष्टीला आवडले असते का ? नाही. म्हणून झाले गेले विसरा नि रोज तेवढ्याच प्रसन्न मनाने,प्रसन्न मुद्रेने माझ्यासारखं आनंदी रहायला शिका मग माझ्याप्रमाणेच रोज तुमचंही स्वागत करतील, तुमच्याबद्दल इतरांना आवड निर्माण होऊन तुमच्यावर प्रेम करायला लागतील.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞🌄🏞•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                    *मित्रता*राम ,माझा (सिमा) व सुमनचा मित्र आहे. तो आजारी पडला. म्हणून त्याला भेटायला आम्ही निघालो. आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आणि त्याला फळे दिली. “काळजी घे. वेळेवर जेवण कर, औषध घे लवकर बरा हो ”अशी तिकडे सुमन म्हणाली. तू लवकर बरा हो मग आपण  खूप खूप खेळू, मजा करू” असे सिमा म्हणालीराम म्हणाला “सीमा ,सुमन तुम्हाला भेटून मला आनंद झाला. आता मला बरं वाटतंय.” रामने आमचे आभार मानले. निघताना रामचा चेहरा हसरा दिसत होता. हे पाहून आम्हालाही आनंद झाला.*तात्पर्य : कधी पण मित्राच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. हीच खरी मिञता असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 26/11/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *भारतीय संविधान दिन*💥 ठळक घडामोडी :- ● १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.● १९४९: भारताची घटना मंजूर झाली.● १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.● १९८२: दिल्ली येथे ९वी आशियाई क्रीडा स्पर्धा संपन्न झाली.● १९९७: शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर.💥 जन्म :-● १९२१: भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूलचे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष व्हर्गिस कुरियन यांचा जन्म. 💥 मृत्यू :- ● १९८५: कवी यशवंत तथा दिनकर पेंढारकर यांचे निधन.● १९९४: चित्रपट महर्षी भालजी पेंढारकर यांचे निधन. ● २००८ - विजय साळसकर, मुंबईचे पोलिस अधिकारी● २००८ - हेमंत करकरे, मुंबईचे पोलिस अधिकारी● २००८ - अशोक कामटे, मुंबईचे पोलिस अधिकारी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *एमपीएससीत निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३० नोव्हेंबरला शिंदे-फडणवीसांच्या हस्ते नियुक्तीपत्र मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना दिलेला जामीन योग्यच आहे, असं स्पष्ट करत या जामीनाविरोधात एनआयएनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, आम्ही कामावरून काढले नाही; कर्मचारी कपातीवर अॅमेझॉनचे स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर, 466 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोरखपूरमध्ये कृषी संशोधन केंद्र उभारणार, गव्हासह मका उत्पादक शेतकऱ्यांना होणार फायदा, विद्यार्थ्यांना करता येणार संशोधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *जातपडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो कर्णधार असलेल्या पोर्तुगालने घानाला 3-2 ने मात देत विश्वचषकात दिली विजयी सलामी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*गोष्टींचा शनिवार-चिनू,मिनू व गोगो,Fun in Metro👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/DjS_bheqK64~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *भारतीय संविधान दिवस*देशाचा राज्य कारभार सुरळीत चालण्यासाठी तयार करण्यात आलेले कायदे ज्या ग्रंथात एकत्रित करण्यात आले त्यास भारताचे संविधान असे म्हणतात. संविधानास राज्यघटना असे सुध्दा म्हटले जाते. संविधानातील तरतुदी लेखी स्वरूपात आहेत. याच आधारावर देशांतील लोकप्रतिनिधी नियमांच्या चौकटीत राहून आपला कारभार करीत असतात. नागरिकांचे हक्क, शासन संस्थेची............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_24.html            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतात नोटा कश्या तयार होतात ? खराब नोटांचं काय करतात ?*रुपया शब्दाचा प्रयोग सर्वप्रथम शेर शाह सुरीने भारतावर राज्य करीत असताना १५४०-१५४५ च्या कालखंडातकेला होता. सध्या भारतासमवेत इतर ८ देशांमधील चलनाला रुपया म्हटले जाते. भारतात नोटा आणि नाणी बनवण्याचे काम भारतीय रिजर्व बँकच्या अखत्यारीत येते. भारतात सर्वात पहिली वॉटरमार्क असलेली नोट १८६१ मध्ये छापण्यात आली होती. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त भारतीय नोटांमध्ये इतर १५ भाषांचा वापर केला जातो.*.भारतात नोटा कुठे छापल्या जातात?.*देशात चार नोट प्रेस आणि एक पेपरमिल आहे.देवास (मध्य प्रदेश),नाशिक (महाराष्ट्र), सालबोनी (पश्चिम बंगाल) आणिम्हैसूर (कर्नाटक)या चार ठिकाणी नोटा छापल्या जातात.देवास येथील नोट प्रेस मध्ये एका वर्षात २६५ कोटी नोटा छापले जातात. इथे २०, ५०, १००, ५०० किंमतीच्या च्या नोटा छापल्या जातात नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारी शाईसुद्धा इथेच बनते.नाशिक नोट प्रेस मध्ये १९९१ सालापासून इथे १, २, ५, १०, ५०,१०० किंमतीच्या नोटा छापल्या जातात. सुरवातीला इथे ५० आणि १०० च्या नोटा छापल्या जात नव्हत्या.*.भारतात नाणी कुठे बनवली जातात?.*१. मुंबई२. कोलकत्ता३. हैदराबाद४.नोएडा*.नाण्यांच्या चिन्हावरून समजते की ते कुठे बनवले आहेत :.*प्रत्येक नाण्यावर असलेल्या चिन्हावरून समजते की ते नाणं कुठे बनवलं गेलं आहे. नाण्यावर छापलेल्या वर्षाच्या खाली जर स्टारचे चिन्ह असल्यास ते हैदराबादला बनवलं गेलं आहे. जर वर्षाच्या खाली टिंब असेल तर ते नाणं नोएडाला बनवण्यात आलं आहे. वर्षाच्या खाली डायमंड असल्यास ते नाणं मुंबईत बनवलं आहे. कोलकत्ता मध्ये बनवलेल्या नाण्यावर कोणतेच चिन्ह नसते.*.नोटा कोणत्या वस्तूने बनले जातात?.*रिजर्व बँक ऑफ इंडिया नोट बनवण्यासाठी कापसाच्या कागदाचा आणि विशिष्ट प्रकारच्या शाईचा वापर करते. या प्रकारच्या कागदाचे उत्पादन काही प्रमाणात महाराष्ट्रात (सीएनपी) होते, तर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश मधील होशंगाबाद मध्ये होते. काही पेपर आयत सुद्धा केले जातात.*.भारतात प्रत्येक वर्षी किती नोटा छापल्या जातात?.*रिजर्व बँकेच्या एका अहवालानुसार भारत प्रत्येकवर्षी २००० कोटी नोटा छापतो .यामधील ४० टक्के खर्च कागद आणि शाई आयात करण्यामध्ये जातो. हा कागद जपान, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशांमधून आयात केला जातो. नोटा किती छापल्या पाहिजेत, याविषयीचा निर्णय घेण्याचा अधिकार भारतीय रिजर्व बँकेला आहे. नाणी किती तयार केली जावीत याचा निर्णय पूर्णतः सरकार घेते.*.नोटा कशा छापल्या जातात?.*विदेशातून आयात होणाऱ्या आणि होशंगाबाद मधून येणाऱ्या पेपरशीटला एका खास मशिन सायमंटन मध्ये टाकले जाते आणि नंतर इंटाब्यू नावाच्या मशीनने त्यावर कलर केले जाते. याप्रकारे नोट तयार होतात. त्यानंतर चांगल्या आणि खराब नोटा वेगळ्या केल्या जातात. एका वेळेस एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटा छापण्यात येतात.*.खराब झालेल्या नोटांना कुठे जमा केले जाते?.*नोटा तयार करतानाच त्यांची ‘सेल्फ लाइफ’ (नोटा योग्य प्रकारे बनण्याचा अवधी) ठरवण्यात येते. हा अवधी संपल्यानंतर किंवा सारख्या वापरणे खराब झालेल्या नोटांना रिजर्व बँक परत घेते.*.फाटलेल्या जुना नोटांचे काय केले जाते?.*खराब झालेल्या आणि फाटलेल्या नोटा रिजर्व बँक परत चलनात आणत नाही, कारण तसे करणे योग्य नसते. रिजर्व बँक सर्व व्यावसायिक बँकांकडून फाटलेल्या आणि खराब नोटा मागवून एकत्र जमा करते. सुरवातीला या नोटा जाळल्या जात असतं, परंतु आता RBI ने पर्यावरणासंवर्धनाच्या दृष्टीने ह्या नोटा जाळणे बंद केले आहे. RBI ने एक ९ कोटींची मशीन आयत केली आहे, ही मशीन जुन्या नोटांचे छोटे तुकडे करते. त्यातून मजबूत अशी विट बनवली जाते .ह्या विटा खूप कामांमध्ये उपयोगी येतात.*भारतात प्रत्येक वर्षी ५ दशलक्ष नोटा चलनातून बाद होतात, ज्यांचे एकूण वजन ४५००० टन एवढे असते.—.**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हे अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 संतोष लक्ष्मणराव सज्जन👤 अर्जुन यनगंटीवार👤 मुरलीधर हंबर्डे पाटील👤 संजय बोंटावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.**नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.*             *॥ रामकृष्णहरी ॥*  💥💥💥💥💥💥💥💥        *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही केलेला संकल्प आणि संकल्पाच्या दिशेने जाणारी वाट ही नक्कीच तुमच्या यशाकडे जाणारी असली पाहिजे.कारण तुमचे संकल्प हे तुमच्या ध्येयपूर्तीसाठीच असतात.तुमच्या इच्छा, आकांक्षा,तुमचे कार्य आणि तुमचा विश्वास त्यात दडलेला असतो.तुमच्या संकल्पामुळे तुमच्या जीवनाचे तर कल्याण होईलच त्याचबरोबर इतरांना संकल्प करण्याची प्रेरणा सुध्दा मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *धाडसी  गीता*गीता नऊ दहा वर्षाची मुलगी होती. ती आणि तिचे आई बाबा शेतातील झोपडीत रहायचे. तिची आई बाबा शेतात काम करत होते. संध्याकाळ  झाली. गीता अभ्यास करत होती. एक  कोकरू बांधली होते. झोपडीत येऊन आईने चुलीवर भात शिजायला ठेवला. आणि गीताला भाताकडे लक्ष ठेवायला सांगितले. आणि विहिरीजवळ पाणी भरायला गेली. देवळात कोकराचा बँsबँs  ओरडण्याचा आवाज आला. तशी गीता धावतच झोपडीबाहेर आली, एक लांडगा दिसला. तो कोकरा कडे येत होता. गीता घाबरली. क्षणभर विचार केला आला आला. ते झटकन झोपडीत गेली. चुलीतील जळते लाकूड घेऊन बाहेर आली. लांडगा कोकरा वर धडक घालणार होता इतक्या गीता ने जळते लाकूड लांडग्याच्या दिशेने फेकले. आगीला  पाहून लांडगा घाबरला. तो पळाला. कोकराचा जीव वाचला. “पळापळा लांडगा आला, ” गीता जोरात जोरात ओरडू लागली. तिच्या आवाजाने शेतात काम करणारे आई बाबा धावत आले. गीताने त्यांना घडलेला प्रसंग सांगितला. आईने तिला जवळ घेतले. बाबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गीताच्या धाडसी पणाची बातमी गावात पसरली. गावच्या सरपंचानी तिची पाठ थोपटली. शाळेतील शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी तिच्या धाडसा चे कौतुक केले.बोध: आपण कधीही  धाडसी राहिले पाहिजे. तरच आपण कोणाला भिणार नाही.समयसूचकता व धाडसीपणा हे दोन महत्त्वाचे गूण आहेत.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 24/11/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६६ - टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार💥 जन्म :-◆ १९६१ - अरुंधती रॉय, भारतीय लेखक.💥 मृत्यू :-◆ १९६३ - मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *निवडणूक आयोगात योग्य लोकांचीच निवड होतेय; केंद्र सरकारचं सर्वोच्च न्यायालयाला उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2022 साठी संगणकीय सोडत सिडको भवन येथे काढण्यात आली. यावेळी हक्काचे घर लागल्याने लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केलाय.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाणार नाही, लोकांना मदत करू, देवेंद्र फडणवीसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्य उत्पादन शुल्क विभागाची पुण्यात मोठी कारवाई, विदेशी मद्यासह 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *औरंगाबादच्या वैजापूर शहरातील मारुती सुझुकी चारचाकी शोरूमला भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अमेरिकेत व्हर्जिनियातील चेसापीक येथील वॉलमार्ट स्टोअरमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफामधील धक्कादायक निकालांचं सूत्र कायम, जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Magic herb-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/cG1cAIgbz-I~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        *सैनिक  :  देशाचा संरक्षक*भारतीय सैनिकाविषयी लिहिलेला लेख https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *निशाचर प्राणी कसे जगतात ?* 📙दिवसा दडुन विश्रांती घेणारे व रात्रीच्या वेळीच क्षुधाशमनाला बाहेर पडणारे प्राणी म्हणजे निशाचर प्राणी. यांची रात्रिचर्या हा एक जीवनाचा भागच असतो. त्यांची शरीररचनाही त्याला सोयीची असते. प्रकाशाशिवाय वावरता यायला मुख्यत: अन्य इंद्रियांचा सुलभ वापर आवश्यक असतो. नाकाने अगदी सूक्ष्मा गंधही ओळखणे, कानाला अतिदूरवरचे व जमिनीतून मिळणाऱ्या हादर्‍यातुन संदेश मिळणे किंवा तीक्ष्ण स्पर्शज्ञान असणे हे या प्राण्यांच्या बाबतीत विशेष आवश्यक ठरते.स्वतःचा जीव अन्य आक्रमकांपासून वाचवणे व निसर्गाचा समतोल राखणे या दृष्टीने ही रचना निसर्गानेच केली असावी. एखाद्या परिसरात सारे काही बारा तास चिडीचूप असावे, यापेक्षा रोज दिवसा काही प्राणी, तर रात्री निशाचर निसर्गात राबता ठेवतात. यामुळे पाणी, अन्न, वावरायला जागा या उपलब्धी आपोआपच दुभागल्या जाऊन सोयीच्या होतात.अनेक प्राण्यांना दिवसाचे चौदा तास झोप लागते; पण ही झोप फार सावध असते. जराशीही चाहूल लागली तरी कुत्रा व मांजर जसे कान टवकारते, तसाच हा प्रकार असतो. त्यामुळे ही झोपेची वेळ कधीची हा प्रश्न निशाचर प्राणी सहज सोडवतात. रात्रीचे आठ ते दहा तास त्यांचे उद्योग सलग चालतात.अनेक कीटक, सरपटणारे प्राणी, छोटे सस्तन प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी यांचा निशाचरांत समावेश होतो. पक्षी मात्र सहसा रात्री उडत नाहीत. खोल पाण्यातील मासे त्यांच्या हालचाली सोयीने करतच राहतात; पण सर्वसाधारण जलचर मात्र विश्रांती घेतात.घुबडे, वटवाघळे त्यांच्या चित्कारातुन मिळणाऱ्या परतीच्या संदेशातून सहजगत्या माहिती मिळवुन वावरतात. बिळात वास्तव्य करणारे प्राणी जमिनीतील ध्वनीच्या कंपनांद्वारे हालचाली करतात. काही प्राण्यांना असलेल्या लांबलचक मिशाही त्यांना उपयोगी पडतात. एखाद्या जागी आपला डोक्याचा शिरकाव होईल वा नाही, याचा नेमका अंदाज मिशांवरून त्यांना सहज येतो.निशाचर प्राण्यांमुळे जंगल कधी झोपले आहे, असे होतच नाही. भक्त ही हालचाल खजबज, खुसपूस, चित्कार या स्वरूपातच जाणवते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*          *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करून घ्या - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) अलीकडे नुकताच अचंता शरथ कमल यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?२) सुभाषचंद्र बोस यांना 'देशनायक' म्हणून कोणी संबोधले ?३) बाळासाहेब ठाकरे यांचे टोपणनाव काय ?४) पाकिस्तानचे जनक कोण ?५) हिमाचल प्रदेशमध्ये नुकतेच बांधलेले जगातील सर्वात उंच मतदान केंद्र कोणते आहे ?*उत्तरे :-* १) टेबल टेनिस २) रविंद्रनाथ टागोर ३) हिंदुहृदयसम्राट ४) बॅरिस्टर जिना ५) ताशिगंग*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागेश बबिलगेवार, किनवट● खंडू मोरे, नाशिक● नागेश सब्बनवार, कुंडलवाडी● चरण इंदूर● व्ही के पाटील● दत्तराम गडोड, धर्माबाद● अखिलेश जल्लोड● बालाजी दिवटे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'रियाज' म्हणजे आपल्यातील आपलाच शोध. या शोधातूनच कलावंताला आपल्या निर्मीतीचे कंद प्रतीत होतात. नव्या पायवाटांचे मागमूस कळतात. नव्या स्विकार-नकारांचे ध्वनी ऐकू येतात. नव्या प्रकाशाची किरणं मनाच्या आकाशात फाकू लागतात. सहस्त्ररश्मींचा मोरपिसारा मनामध्ये फुलून येतो. माणसाचं कवित्व रियाजानं अधिक प्रगल्भ आणि सहज सुलभ होतं. गाणं आधिक सकस आणि लयतत्व साकारत जातं.*         *'रियाज' आपल्यातील शक्यतांचा विस्तार नजरेत आणणारा विधी होय. आपल्या निर्मितीची किती क्षितीजं आपल्यासमोर उभा करतो तो. तो आनंदसोहळा होतो. हा आनंद हिंदोळ्यावर झोके घेतो. रसिकांच्या रसिकत्वाला आवाहन करीत राहतो. त्यांच्या चित्तवृत्ती पुलकित करीत राहतो. रियाजामुळे मनावर चढलेली पुटं नाहीशी होतात. ज्ञानेंद्रियांना अनेकविध चेतना मिळतात. त्या चेतनेने सारा भवताल 'चैतन्यपूर्ण' होतो.*                    🌹 *॥ रामकृष्णहरी  ॥* 🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀      *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••     *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••लेखक म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारा कलाकारच आहे.तो आपल्या बुध्दीने आणि लेखणीने सर्व कलाकारांना कला सादर करण्यासाठी प्रेरणा देतो.वाचक,नट, दिग्दर्शक,संगीतकार अशा कितीतरी लोकांना आपल्या लेखणीतून जसे पाहिजे तसे आविष्कार सादरीकरण करण्यासाठी त्यांना संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करुन देतो.एवढेच नाही तर सर्व नवरसांचे केंद्र जर कुणाकडे असेल तर ते देखील लेखकाकडेच असते.म्हणून लेखक असणे आणि होणे म्हणजे ईश्वराच्या नंतरची जी भूमिका साकारणारी व्यक्ती असेल तर ती लेखन करणारी लेखक मंडळीच आहे.अशा चतुरस्त्र आणि अष्टपैलू  लेखकांना समाजामध्ये एक आगळेवेगळे स्थान आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻📚✍🏻 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••             *एक छानशी कथा.....*एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक बोटीपाशी येतात.  त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक आहे. पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो. पत्नी बुडत्या बोटी वर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते.शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, पत्नी पतीला काय म्हणाली असेल?बहुतेक विद्यार्थी म्हणतात, 'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही..!'एक मुलगा मात्र गप्पच असतो.शिक्षक त्याला विचारतात, "अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, "नाही गुरुजी, पण माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!""तुझे उत्तर बरोबर आहे!"शिक्षक हलकेच म्हणाले.बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो. त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.जे मित्र आपली होटेलची बिलं भरतात, ते त्यांच्यापाशी खुप पैसा आहे म्हणून नव्हे, तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक प्रिय असतात म्हणून. जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन...!*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.💥 जन्म :-१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार💥 मृत्यू :- १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस१९५९ : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर२०१९ : दैनिक नवाकाळचे संपादक,'अग्रलेखांचे बादशाह' नीलकंठ खाडिलकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *खालावलेला शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये केरळ पॅटर्न राबवण्याची तयारी, सरकारकडून नवा प्रयोग करण्यात येणार. *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन 'रोजगार मेळाव्यात' 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार मिशन मोडवर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सरकारने आदेश दिल्यानंतर कारवाई केली जाईल असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवदी यांनी म्हटलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहारा प्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *17 हजार मुलांचं गोवर लसीकरण पूर्ण,आरोग्य विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टीम इंडिया आणि न्युझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना पावसामुळे बरोबरीत, टीम इंडियाने 1-0 ने जिंकली मालिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून 2-1 ने पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The sky is falling-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wMNG3jvIugw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       📙 *नागीण का होते ?* 📙तुमच्या घरात किंवा शेजारीपाजारी कोणालाही 'नागीण' झाल्याचे तुम्हाला समजले असेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण नंतर नागिन म्हणजे त्वचेवर येणारे विशिष्ट प्रकारचे पुरळ हे पाहिल्यावरच कळले असेल. कांजण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. या विषाणूंसारख्या दुसर्या विषाणूंमुळे नागिन हा रोग होतो. कांजण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व कित्येक वर्षांनी मज्जारज्जुतून एखाद्या नसेमार्फत त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिनीची तीव्रता वयाबरोबर वाढते. मोठ्या वयात जास्त त्रास होतो. हे विषाणू मज्जापेशी व त्यांच्यामधून मज्जातंतुतुच्या रेषेवर वाढतात. आजाराची सुरुवात त्या मज्जातंतूंच्या मार्गावर खूप दुखणे सुरू होऊन होते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो व पाठोपाठ पाण्याने भरलेले दुखरे फोड येतात. पाच सहा दिवस हे फोड वाळायला लागतात व खपली धरते. फोड गेले की दुखणे थांबते. काही वेळा सहा महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो. सामान्यतः बरगड्यांमधील नसांच्या रेषेवर फोड येतात. नागिन हा रोग त्रासदायक असला तरी सहसा फारसे गंभीर परिणाम होत नाहीत; पण डोळ्यात जर फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते. असायक्लोव्हीर या महागड्या औषधाने पुरळ लवकर बरे होते. पण आग होणे मात्र कमी होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे ती म्हणजे इतर विषाणूजन्य रागांप्रमाणेच हाही रोग काही दिवसांत आपोआप बरा होतो. वेदना कमी होण्यासाठी ऍस्पिरिन, पॅरासिटेमॉल या औषधांचा वापर करता येतो. वेदना खूप दिवस होऊनही बंद न झाल्यास संबंधित नस मारून टाकतात. अर्थात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घ्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जेव्हा कठीण परिश्रम केले जातात तेव्हा ते विजयाचे क्षण घेऊन येतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जी - २० शिखर परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारत केव्हापासून औपचारिकपणे अध्यक्षपद स्वीकारणार आहे ?२) टी - २० विश्वचषक २०२२ चा मालिकावीर किताब कोणी पटकावला ?३) बाळासाहेब ठाकरे कोण होते ?४) वनमहोत्सवाचे जनक कोण ?५) सूर्यप्रकाश पृथ्वीच्या किती भागावर पडतो ?*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २०२२ २) सम कुरेन, इंग्लंड ३) व्यंगचित्रकार, शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदसम्राट ४) के. एम. मुंशी ५) निम्म्या *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 जुगलकिशोर बोरकर👤 सुनील बंडेवार, धर्माबाद👤 जगन्नाथ भगत👤 आदित्य खांडरे👤 कपिल दगडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म!  कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.**स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.*             *॥ रामकृष्णहरी ॥*☀☀☀☀☀☀☀☀☀         *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्याकडे एक श्रद्धा अशी आहे की,घरात एखादा पाहुणा किंवा एखादी पाहुणी आली की,तुमच्या पायगुणाने आमचे खूप चांगले झाले आहे असे म्हणतो.हे कितपत योग्य आहे ? मला तरी ते मान्य नाही.जर असे काही होत असेल तर आपण रोजच पाहुण्यांना येण्याबद्दल आग्रहाचे निमंत्रण दिले असते.काहीच न करता असे जर होत असेल तर खुप काही आपण झालो असतो.विचार करायची गरज नाही,काम करायची गरज नाही किंवा प्रयत्नही करायची गरजही नाही.आपण चांगले विचार मनात आणले आणि मन लावून काम केले तर घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.अशा परिस्थितीत बाहेरच्यांचे येणे हा निव्वळ योगायोग आहे असेच समजायचे.आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारुन पाहिले तर ते आपल्याला खरेही वाटणार नाही.अशी श्रद्धा ठेवणे म्हणजे एक कल्पनाच आहे असे समजावे.ही डोळस श्रद्धा नसून एक अंधश्रद्धा समजावी.अशा प्रकारच्या कितीतरी श्रद्धा आहेत त्या आपण ज्ञानाच्या माध्यमातून,कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातून सिध्द करता येते.त्यासाठी ' केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.' ह्याप्रमाणे जीवन जगायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *आमचे चुकले*एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा ,संत्री खात होते .टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. साली गोळा केल्या कागदात बांधून ठेवल्या. प्रवाशाला खंत वाटली नाही.आणखी  टरफले साली  गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणारा प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पहातात त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारी ची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करतात सानेगुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले गुरुजी आमचे चुकले क्षमा करा” गुरूजी  नम्रपणे म्हणाले “, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो. प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी गुरुजींची वृत्ती! आपल्या जीवनात कोणतीही काम कधीच हलके मानले नाही.*बोध: आपण कोठेही कचरा करु नये. आणि जर का झाला असेल तर  तर त्याला व्यवस्थितपणे टाकावे.  स्वच्छता ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ,कर्तव्य आहे.आपली चूक आपण मान्य करावी आणि नंतर अशी चूक होणार नाही ही दक्षता घ्यावी.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 21/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन**जागतिक टेलिव्हिजन दिन*           💥 ठळक घडामोडी :- ● १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.💥 जन्म :-● १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.● १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.● १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.● १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.● १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म.💥 मृत्यू :- ● १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.● १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो एअरपोर्ट, इटानगर’ चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रा राज्यातील 14 दिवसांचा प्रवास पूर्ण करत पोहोचला मध्य प्रदेशात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईत सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी, 15 नोव्हेंबरपासून कारवाई सुरु. दोन वेळा मुदतवाढ, आता कारवाईला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात ;  आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आधी सूर्यकुमारचं शतक, मग दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*शिक्षण पर्व2022 ज्ञानरचनावादी अध्यापन👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BzJxJ9peKwk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *प्रसिध्दीचे वलय*      माणसांच्या जीवनात प्रसिद्धी खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांना वाटतं की आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी नाना प्रकारचे कार्य केल्या जाते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरावे, यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण काही लोकं समाजात असे ही आढळून येतात की, ते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. तरी देखील ते एक ना एक दिवस प्रसिद्धीस येतात. कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिभा असते. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावेhttp://tiny.cc/xnukgzलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  📙 *पोटात उठणे म्हणजे काय ?* 📙पोट फुगणे, दम लागणे वा पोट जास्त वेळा वर खाली होणे, या सर्वांनाच खेड्यात 'पोटात उठणे' असे म्हणतात. मग गंडेदोरे, मंत्रतंत्र, पोटावर डागणे असे अनेक उपाय केले जातात. अर्थात यांचा काहीही उपयोग होत नाही. पोटात का उठते याची अनेक कारणे आहेत. 'ड' जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस नावाचा रोग होतो. यात हातापायाच्या काड्या व पोटाचा नगारा होतो. पोटात जंत असले व यकृताचा आकार मलेरिया सारख्या रोगाने वाढलेला असल्यास पोट फुगते. दमा झाल्यास श्वासाची गती वाढते व पोट जास्त वेळा वर खाली होते. न्युमोनियामध्येही श्वासाचा दर खूप वाढून पोट जास्त प्रमाणात व वर खाली होते. पोटातील मूत्रपिंड, आतडे यांचा कर्करोग झाल्यास आतड्यांमध्ये अडथळा येऊन अन्न पाणी अडकून पडल्यास किंवा अांत्रपुच्छाचा दाह होऊन सूज आल्यास पोट फुगते. मुत्रपिंडाच्या रोगांमध्ये व पोटाच्या आतील आवरणात पाणी साठल्याने ही पोट फुगते. पोट फुगण्याची अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने असे होत आहे हे ओळखून त्यावर उपचार करणे अगत्याचे ठरते. तरच पोटात उठणे कमी होऊ शकते. अन्यथा नाही.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" अंधाराची कारस्थाने रोज घडतात, तरीही रोज सकाळी प्रकाशाचा विजय होतो. "*   *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?२) टी - २० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा कोणी पटकावल्या ?३) भारतात बनविलेल्या पहिल्या क्रुझचे नाव काय ?४) भारतीय सनदी सेवेचे जनक कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणतात ?५) बिरसा मुंडा यांच्या आई - वडिलाचे नाव काय होते ?*उत्तरे :-* १) कतार २) विराट कोहली, भारत ( २९६ धावा ) ३) गंगा विलास क्रुझ ४) लॉर्ड कॉर्नवॉलिस ५) सुगना व करी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 प्रशांत शास्त्री, सेवानिवृत्त बँक अधिकारी👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर👤 विठ्ठल शिंदे👤 शुभम सुर्या पाटील👤 गंगाधर धुळेकर👤 माधव हर्ष👤 संगीताताई देशमुख, नांदेड👤 सोनू कुलकर्णी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.**थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.*            *॥  रामकृष्णहरी ॥*🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿         *श्री संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *ज्वारीचे तीन पोते.*ही तीन भावाची  कथा आहे. तिघेही भाऊ प्रेमाने राहायचे. तिघेही चतुर ,हुशार व इमानदार होते. मोठा  भाऊ किराणा दुकान मध्ये काम करायचा. सगळ्यात छोटा भावाने आता फक्त शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि तिसरा भाऊ पुजारी होता. त्यांच्या बाबाचा मृत्यू झाला होता . एक दिवस त्यांच्या बाबाचे मित्र त्यांच्या घरी आले. ते त्या तिघांचाही आईला म्हणाले, “माझ्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. मला एक छान मुलगा हवा जो माझ्या  मुलीला चांगले ठेवण व माझ्या कामाला मदत चांगली करेन.मला तुमचे तिन्ही मुलं चांगले वाटते. म्हणून मी तुमच्या तिनही  मुलाची परीक्षा घेणार आहे.” त्यांनी पूर्णपणे परीक्षा चा विचार करून निर्णय  घेतला. नंतर च्या दिवशी, त्यांनी सगळ्यांना एक एक ज्वारी चे पोते दिले. आणी म्हणाले, “मी काही  कामासाठी बाहेरगावी  चाललो. मी दोन-तीन महिन्यांनी येणार. आणि मी बघणार तुम्ही या त्याचे काय केले. नंतर दोन-तीन महिने झाले तरीपण मित्र वापस नाही आला. कमीत कमी एक दीड वर्ष गेले. मग ते परत आले. ते सगळ्यात पहिले पहिल्या भावाजवळ गेले. पहिला  भाऊ म्हणाला , “या मी तुमचे स्वागत करत आहे. तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचे पोते दिले होते मी त्या पोत्याला माझ्या दुकान मध्ये विकून टाकले. हे घ्या त्याचे पैसे”. त्याच्यानंतर मित्र दुसऱ्या भावाजवळ गेले. तो म्हणाला “, मी एक पुजारी आहे. माझ्या मंदिरामध्ये खूप सारे गरीब आले होते मी त्यांना ती ज्वारी त्यांच्यात वाटली . आणि मला हे खात्री आहे की त्याचा आशीर्वाद तुम्हालाच भेटेन.” मित्र सगळ्यात शेवटी तिसऱ्या भाऊ कडे गेले. तो भाऊ म्हणाला “, तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचं पोत दिलं होतं. माझ्या शेजारच्या येथे शेत आहे. मी त्याच्या घरी गेलो. त्याला विनंती केली की मी तुमचं अर्ध शेत वाहू  शकतो का? तो म्हणाला, “हो”. मि त्या अर्ध्या शेतात एका पोत्याच्या ज्वारीचे 25 पोते बनवले. त्याच्यातले 25 पैकी 5 पोते मी त्यांना विकले.” “हे घ्या पैसे आणि ही 20 पोते”.आता तुम्हाला तर माहीतच असेल की मित्राने आपला कोणता  जावई निवडला असेन? अर्थातच  तिसरा भाऊ.बोध: मेहनतीचे फळ कधी पण गोडच असते.विचार करून केलेल्या कार्याचे सुयोग्य सुयश नक्कीच  दडलेले असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/11/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक शौचालय दिन**आंतरराष्ट्रीय पुरूष दिन**महिला उद्योजकता दिन**राष्ट्रीय एकात्मता दिन*💥 ठळक घडामोडी :- ● १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.● १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.💥 जन्म :-● १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.● १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.● १९७५-सुष्मीता सेन ,अभिनेत्री● १९२८- दारा सिंग ,मुष्टियोद्धदा व अभिनेता💥 मृत्यू :-● १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, गौतम नवलखा यांना 24 तासांत घरात नजरकैदेत पाठवण्याचे दिले आदेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम एस'चे यशस्वी उड्डाण, या रॉकेटचे विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा मसुदा जारी, 500 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला 2028-29 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर त्यासाठी पुढील पाच वर्षे सतत 9 टक्के दराने GDP वाढवावा लागेल, असं रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रांचा एका वर्षाने कार्यकाल वाढवला, 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोना काळातील निर्बंध हटवल्यानंतर शिर्डीच्या साईचरणी भरभरुन दान, वर्षभरात 398 कोटी रुपये अर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड वि. भारताचा पहिला टी-२० सामना पावसामुळे झाला रद्द*••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख*मोबाईल महत्वाचे की शौचालय*जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत.........पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावेhttps://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html?m=1            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙   *****************************एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) डॉ. सलीम अली यांचे पूर्ण नाव काय ?२) जगाची एकूण लोकसंख्या किती आहे ?३) बिरसा मुंडा यांची समाधी कोठे आहे ?४) भारतीय उद्योगाचे जनक कोण ?५) हत्तीरोग ( हत्तीपाय रोग ) कोणता डास चावल्याने होतो ?*उत्तरे :-* १) सलीम मोईझुद्दीन अली २) ८ अब्ज ३) डिस्टिलरी पुल, रांची ४) जमशेदजी टाटा ५) क्युलेक्स *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 सिध्देश घोले, माणगाव जि. रायगड👤 डॉ. विनायक माराले👤 संजय येरणे👤 श्वेता नरसुडे👤 कैलास पाटील खरबाळे👤 वैभव धुप्पे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       *सारा अंधारच प्यावा*       *अशी लागावी तहान ॥*        *एका साध्या सत्यासाठी*       *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.*             *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆          *श्री. संजय नलावडे, मुंबई*       *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या  गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *अपमान आणि उपकार*एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *जागतिक सहनशीलता दिवस*     *राष्ट्रीय पत्रकार दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● २०१३- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट मधून निवृत्ती .💥 जन्म :-● १९६३-मिनाक्षी शेषाद्री,अभिनेत्री● १९७३-पुलेंल्ला गोपीचंद,बॅडमिंटनपटू● १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.● १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.● २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जी -20 संमलेनच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी, जगभरातील 10 नेत्यांची भेट घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अशोक चव्हाणांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून ही पदभरती जिल्हा निवड मंडळ तसेच जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे निकटवर्तीय गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गुप्ता यांच्या संबंधित जवळपास 30 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोवर संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतात राबणाऱ्या मराठमोळ्या अविनाश साबळेच्या कष्टांना यश, राष्ट्रीय अर्जुन पुरस्कराने होणार सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, निवडणूक आयोगाविरुद्धची याचिका फेटाळली, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*चांगला माणूस ....*पूर्ण लेख खलील लिंक वर वाचता येईलhttp://nasayeotikar.blogspot.com/2021/05/good-man.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *'निऑन साइन्स' म्हणजे काय ?* 📙निआॅन म्हणजे नवीन. हा मूळ ग्रीक शब्द आहे. निआॅन, अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे अगदी विरळ अवस्थेत असलेले वायु सुमारे १८९४ ते १९०० सालांदरम्यान ज्ञात होत गेले. यातील निआॅनचा वापर सर्वप्रथम केला जाऊन लाल रंगाची चमकदार निऑन चिन्हे वा निऑनसाइन्स बनवली गेली. निर्वात काचेच्या पोकळीत निऑन वायू कमी दाबाने भरला जाऊन त्यातुन विद्युतभार पाठवला असता हा वायू चमकदार लाल प्रकाश बाहेर टाकतो. या प्रकाराचा वापर केला जाऊन अत्यंत आकर्षक निआॅन चिन्हांचा वापर जगभर सुरू झाला. नंतर हे अन्य वायू वापरले असता इतर काही रंगांचा प्रकाश मिळू शकतो. हेही लक्षात आले. पण या प्रकारच्या चिन्हांचे नाव मात्र तेच कायम राहिले. या सर्व प्रकारच्या चिन्हांना निआॅन साइन्स म्हणूनच ओळखतात.निअाॅन साइन्सचा प्रकाश हा धुक्यातुनही लक्षात येतो. या गुणामुळे त्याचा फार मोठा व्यावहारिक उपयोग विमानतळावरील दिव्यांसाठी केला जातो. विमानांना मार्गदर्शक म्हणून हे दिवे वापरले जातात. धुक्यामध्ये विमाने हरवण्याचा धोका त्यामुळे टळतो.या विविध वायूंचे मिश्रण अनेक प्रकारे वापरले जाते. क्रिप्टॉन व अरगाॅनचे मिश्रण वापरले असता हिरवट पिवळा प्रकाश मिळतो. प्रकाशमान उजेडासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक फ्लुअोरेसंट दिव्यांत हे मिश्रण वापरतात. मात्र हल्ली डिस्प्लेबोर्डसाठी एलईडीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या सर्व वायूंना ना वास, ना रंग, ना चन. यांना काही जण 'नोबेल गॅसेस' असेही म्हणतात. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वायू रेणूस्वरूपातच वातावरणात आढळतो. मोजक्याच वायूंबरोबर यांची संयुगे बनू शकतात. अन्य अनेक मुलद्रव्यांशी यांचा संयोग होऊ शकत नाही. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्ट्या अस्थिर वस्तूभोवती अन्य कशाचा संबंध टाळण्यासाठी यांचे आच्छादन घालण्याची पद्धत वापरली जाते. या आच्छादनाखाली (ब्लॅंकेट) मूळ पदार्थ पाहिजे तसा जतनही करता येतो.अरगाॅन व नायट्रोजनचे मिश्रण विजेच्या दिव्यांमध्ये वापरले जाते. यामुळे दिव्यांचे आयुष्य वाढते. झेनाॅनचा वापर मुख्यतः फोटो काढायला वापरल्या जाणाऱ्या फ्लॅशबल्बमध्ये केला जातो. दूरवर प्रकाश टाकणाऱ्या झोतांसाठी (सर्चलाईट) झेनाॅनचा वापर केला जातो. काही संशोधनांमध्ये अणुसमुच्चय निरीक्षणातही झेनाॅनचा वापर करतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*         *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी ही वाया घालवू नये "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची एकमताने निवड झाली ? २) 'आदिवासी बिरसा' किंवा 'धरती बाबा' असे कोणाला ओळखले जाते ?३) कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते ?४) २०२२ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?५) टी - २० विश्वचषक २०२२ चा विजेता संघ/देश कोणता ?*उत्तरे :-* १) माजी न्या. नरेंद्र चपळगावकर २) बिरसा मुंडा ३) नारायण मेघाजी लोखंडे ४) अचंता शरथ कमल ५) इंग्लंड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 संतोष पेटेकर, धर्माबाद👤 छोटू पाटील बाभळीकर👤 मोहन कानगुलवार👤 सदानंद बदलवाड👤 महेश देबडवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.**समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.**"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"*    ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼      *श्री. संजय नलावडे, मुंबई*      *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात आपण केलेल्या कर्माला विशेष असे स्थान आहे.आपण आपल्या चांगल्या कर्माने यशाकडे जातो आणि चांगले कर्म केल्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटते तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कार्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात अर्थात तुमचा चाहता वर्ग अधिक वाढतो.त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे निर्माण होते आणि तुमचे अनुकरण करायला लागतील.हे केवळ तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मामुळेच.जर तुमचेच कर्म चांगले नसतील तर तुम्ही तुमच्या जीवनात अपयशी ठरताल.एवढेच नाही तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत अपमानही सहन करावा लागेल.लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील आणि तुम्ही एकाकीपणे नैराश्यमय जीवन जगायला लागाल.मग तुम्ही या मनुष्य जन्माला येऊन कोणतेही ध्येय साध्य होणार नाही.    मग असे जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे असे नकारात्मक जीवन जगणे जणू यम यातनाच नाहीत का ?यापेक्षा चांगले कर्म करुन जीवनाला एक नवा अर्थ निर्माण करावे आणि स्वाभिमानाने जीवन जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂        •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••               *उपयुक्त जीवन*कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.*तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/11/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                 *क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती*💥 ठळक घडामोडी :- ● १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.💥 जन्म :-● १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.● १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.● १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९८२ - आचार्य विनोबा भावे (महाराष्ट्र) भारत*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचं सांगितलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया, विनयभंगाच्या गुन्ह्यापेक्षा राजकारणातून संन्यास बरा, असं म्हणत राजीनामा देत असल्याचं आव्हाडाचं ट्वीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस कडून विभागनिहाय जबाबदारीचे वाटप. बडोदा विभागाचे निरीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची नियुक्ती. तर मुकुल वासनिक यानांही काँग्रेसकडून जबाबदारी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टाटा समूहाची मोठी तयारी, एअर इंडियामध्ये तिन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू -रिपोर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जलसाक्षरता : काळाची गरज*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *निर्मलक (डिटर्जंट - Detergent) कसे काम करते ?* 📙भारतात निर्मलकांचा वापर १९६० च्या दशकात सुरू झाला. त्यांचे मुख्य काम म्हणजे पाण्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा मळ व तेलकटपणा मोकळा करून धुण्याच्या मिश्रणात उतरवणे. थोडक्यात पाण्याची पदार्थ 'विरघळवण्या'ची ताकद निर्मलक वाढवतो. मळलेले कपडे, तेलकट भांडी, तेलाचे मातीचे हात धुण्याची वेळ येते, तेव्हा त्याची हमखास आठवण येते. थोडासा विचार केला, तर निर्मलक आपल्या जीवनात किती व्यापक रीतीने शिरला आहे, हे लक्षात येईल. तो उपलब्ध नाही असे चार दिवस जरी गेले तरी आपले सगळे व्यवहार अडून बसतील. प्रक्षालक व निर्मलक म्हणजे व्यवहारात 'डिटर्जंट' हाच शब्द जास्त सहज वापरला जातो.पहिला डिटर्जंट बनवला गेला, त्याला आता किमान ७५ वर्षे झाली. फ्रिट्झ गुंथर या जर्मन संशोधकाने हा डिटर्जंट क्रूड ऑईलपासून बनवला होता. पण त्यानंतर कित्येक वर्षे त्याचा व्यावहारिक उपयोग केलाच गेला नाही. सुमारे १९५० च्या दशकात याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. सध्या ढोबळमानाने असे म्हणता येईल की, अल्फिलबेंझीन व सल्फ्युरिक अॅसिड यांच्या साह्याने तयार झालेल्या संयुगातील अॅसिडचा भाग सोडा अॅश वापरून काढला जातो. राहतो तो डिटर्जंट.डिटर्जंट तयार झाला तरी त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी आणखी काही खास प्रक्रिया केल्या जातात. फेस आल्याशिवाय 'साबण' वापरला असल्याचे समाधान मिळत नाही म्हणून फेसाळणारे काही घटक त्यात मिसळले जातात. रक्त, घाम, तेल यांचे डाग निघावेत म्हणून खास वितंचके (Enzymes) त्यात घालतात. याखेरीज कपडे अधिक शुभ्र दिसून चकाकी यावी, यासाठी ऑप्टिकल व्हाइट्नर घालण्याची पद्धत आहे. डिटर्जंटची पावडर जितकी हलकी, जितकी तिची लाही मोठी, तितकी ती लवकर काम करते. यासाठी तयार डिटर्जंट मोठाल्या ढवळून काढणाऱ्या मिक्सरमधून काढला जातो. त्यात आकर्षक दिसण्यासाठी हलकासा रंग व छान सुगंधी वास मिसळला जातो.याच वेळी काम करणाऱ्या हातांची कातडी, कपडे, भांडी, धुण्याच्या वापरातील बादल्या यांवर रासायनिक अपायकारक प्रक्रिया होऊ नये, ही पण काळजी डिटर्जंट घेत असतो. डिटर्जंटच्या आधी काम करणारा साबण व कॉस्टिक सोडा हा काम करणाऱ्याला त्रासदायक तर ठरेच, पण त्याची चिकट लगदास्वरूपी लुकणे कपड्याला चिकटून राहत असत. डिटर्जंट वापरायलाही खूपच सोपा असतो. पाण्यात झटकन विरघळवुन त्या मिश्रणात कपडे बुडवतात येतात. त्यामुळे अनेक कपडे एकदम धुवुन निघू शकतात.डिटर्जेंटचा वापर सुरू झाला आणि जवळपास दशकभराने नवीनच समस्या समोर उद्भवताना आढळू लागल्या. आज या समस्यांनी समोर थोडेसे आव्हान व थोडेसे गंभीर स्वरूप धारण केले आहे. सगळ्या वापरातला डिटर्जंट गटारावाटे जेव्हा एकत्र होतो, तेव्हा पाण्यातील जंतू त्याचे विघटन करू शकत नाहीतच; पण या डिटर्जंटमुळे पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावर परिणाम होऊ लागतो. हे पाणी नदीत गेल्यास तेथील जलचरांवर त्याचा दुष्परिणाम दिसून त्यांची संख्या रोडावू लागते.यावर उपाय शोधणे चालू आहे. प्रयोग चालू आहेत; पण अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. डिटर्जंट तयार करणे फारसे अवघड नाही. अगदी घरगुती स्वरूपातही तो तयार करता येतो. कच्चा माल आपल्या देशात सहज उपलब्ध आहे. पावडर स्वरूपातील, वडी स्वरूपातील किंवा द्रव स्वरूपातील डिटर्जंट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे डिटर्जेंट तयार करणारी एक भारतीय कंपनी कसलीही आधुनिक यंत्रणा, वीज यंत्रे न वापरता डिटर्जंट तयार करते, विकते व तिची आज भारतीय डिटर्जंटच्या विक्री मध्ये निम्म्यापेक्षा जास्त टक्केवारी आहे. या उत्पादनासाठी फारसे शिक्षण न झालेल्या गृहिणींचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो आहे. 'निरमा' हे तिचे नाव.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*          *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) 'अबुआ दिशुम अबुआ राज' म्हणजे 'आमचा देश आमचा राज' हा नारा कोणी दिला ?३) 'आदिवासी समाजक्रांतीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बिरसा मुंडा यांचे निधन केव्हा झाले ?५) बिरसा मुंडा कोण होते ?*उत्तरे :-* १) उलिहातू, झारखंड ( १५ नोव्हेंबर १८७५ ) २) बिरसा मुंडा ३) बिरसा मुंडा ४) ९ जून १९०० ( रांची कारागृह ) ५) आदिवासी नेता, स्वातंत्र्य सेनानी व लोकनायक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती👤 सुनील शिंदे, पांगरी👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर👤 भगवान भूमे, देगलुर👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद👤 दिनेश येवतीकर, येवती👤 कमलेश परब👤 मारोती कानगुलवार, येवती👤 गंगाधर मरकंठवाड, येवती👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*झोका काय नि पाळणा काय. स्वप्नात नेणारी ही जादूभरी दुनिया. चंद्र दिसतो आकाशात. हाती येणार नसतो बाळाच्या. पण हात उंच करून धरू पाहणारे हात थांबत नाहीत. आनंद, दु:ख, भीती, ग्लानी, नीज. झोका थांबला की बाळ रडते. झोका दिला की गुंग होते. वास्तवापासून दूर नेतो झोका. विसरायला लावतो जे नको असते. देह आणि मनाचा खेळ सगळा.**जत्रा भरते तेव्हा उंच उंच रहाटपाळणे असतात तिथे. लहानपणी नव्हते एवढे उंच पाहण्यात. चार पाळण्याचे, कमी उंचीचे गावच्या जत्रेत असायचे..त्यात बसण्याची ओढ आणि उतरण्याची घाई असायची. एकेक पाळणा हाताच्या साह्याने फिरवत, पाळणा उंच जाई., खाली येई, गती वाढत जाई. उंच जाताना उचलण्याचा गोळा पोटात आणि खाली येताना भीतीचा खड्डा पोटात. उच्च आनंद आणि प्राणस्पर्श होणारी भीती. आयुष्यात येणा-या अशा अनेक प्रसंगाच्यावेळी हे भान ठेवावंच लागतं. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट व्हायलाच हवी. नाहीतर साधी गोष्टसुद्धा प्राणस्पर्शापर्यंत घेऊन जाते आपल्याला.*             *दोन दोरांच्या हातांनी*             *झोका देहास वेढतो*             *मनालाही वेटाळून*             *झोका प्राणास छेडतो.*  ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••            🌸🌸🌸🌸🌸🌸         *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याकडे कधीच पाहत नाहीत परंतु जगाचे अर्थात इतरांचे सौंदर्य कसे अधिक चांगले दिसेल यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातच त्यांच्या सौंदर्यात अर्थात इतरांच्या सौंदर्यात समाधान मानतात.जेव्हा अशी व्यक्ती समाजात क्वचित पहायला मिळते ते इतरांचे अहोभाग्य समजावे.हे लोक स्वत:कडे आणि स्वत:च्या जीवनाकडे कधीच झुकून पाहत नाहीत.त्यांना स्वत:च्या जीवनात काही रस नसतो.रस असतो तो जगाकडे आणि जगाला सुंदर करण्याकडे.अशी व्यक्ती कधीच स्वार्थी वृत्तीची नसते.म्हणूनचइतरांच्या हृदयात सामावले जातात.उलट ज्या व्यक्ती आपले स्वत:चे सौंदर्य अधिकाधिक कसे खुलेल आणि इतरांपेक्षा आपण कसे खुलून दिसू,लोक आपल्याकडे कसे पाहतील अशी जर भावना असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि मतलबी समजावी.अशा व्यक्तींना कुठेही स्थान मिळत नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸       •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••              *आईचे प्रेम*एकदा एका परीने  जाहीर केले,"ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात जास्त सुंदर असेल, त्याला मी छान बक्षीस देईन."      ते एकूण  सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पिले आणली होती. परीने एकामागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही."    परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी  धरले आणि ती पिलाच्या कानात कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ  नकोस.माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."तात्पर्यः  'आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.' आईची महती जगात महान आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 14/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷   🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••            *बालदिन*💥 ठळक घडामोडी :- १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.१९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.💥 जन्म :-१८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान१९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.१९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.💥 मृत्यू :-१९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार.१९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ई-केवायसी पूर्ण न केल्याने मराठवाड्यातील साडेपाच लाखापेक्षा अधिक शेतकरी 'पंतप्रधान निधीला' मुकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई विमानतळावर वेगवेगळ्या दोन घटनेत 61 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. एकाच दिवशी कारवाई करत कस्टम विभागाने 32  कोटी किंमतीचं सोनं जप्त केलं आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तब्बल २५०हून अधिक लेखक, माजी संमेलन अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी साहित्यिकांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दर्शवलाय पाठिंबा...*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात धान्याचा तुटवडा भासणार नाही, तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी : केंद्र सरकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत 617 गोवर संशयित रुग्ण, पालिकेकडून मुंबईत नऊ लाख घरांचे सर्वेक्षण, गोवंडीत केंद्रीय समितीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापुरात अपघाती निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू*  http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.htmlवरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा._चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रांजणवाडी म्हणजे काय ?* 📙रांजणवाडी होण्याचा अनुभव आपण कधी ना कधी तरी घेतलेला असतोच. 'काहीतरी चोरून खाल्ल्यावर रांजणवाडी होते बरं का !' असंही कोणी आपल्याला गमतीने म्हटलेले असते. रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार आहे. पापण्यांच्या मुळाशी पू साठायला लागून हा रोग होतो. आपल्या पापण्यांच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. त्यांना 'झीज' ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथीचे तोंड बंद होऊन आता ग्रंथीतील स्राव साठून त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या ठिकाणी पूर साठावयास लागतो. पापणी लाल, सोडलेली दिसते. डोळ्यांची उघडझाप करताना दुखते. स्पर्शाने वेदना होतात यालाच रांजणवाडी असे आपण म्हणतो.रांजणवाडी पिकल्यावर आपोआप फुटते व पू निघून गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते.रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास गरम पाण्यात कपडा बुडवून त्याने शिकल्याने रांजणवाडी एक दोन दिवसांत जिरू शकते. जिरली नाही तर तरी पिकण्यासाठी शेकल्याने मदत होते व ती लवकर फुगून फुटते. सुजेच्या सुरुवातीस पू निघण्यासाठी पापणी दाबून प्रयत्न करू नये. त्यामुळे कधी कधी तेथील जंतुसंसर्ग रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये नेला जाऊन मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो. शेकणे या उपायांसोबतच आणखी एक उपाय घरच्या घरी करता येतो. लसणाच्या पाकळीचा रस सकाळ संध्याकाळ दोन दिवस लावला तर रांजणवाडी जिरते. वारंवार रांजणवाडी होणे हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणार्‍या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादे वेळी त्यांना मधुमेहही झालेला असू शकतो.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••" खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?२) पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?३) 'बाल दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'चाचा नेहरू' कोणाला म्हटले जाते ?५) भारतात प्रथम बाल दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) बाल दिवस ३) १४ नोव्हेंबर ४) पं. जवाहरलाल नेहरू ५) १९६५*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 सुहास चटने👤 सुभाष चंदने👤 शीतल चौगुले👤 खंडू सोळंखे👤 योगेश पाटील बादलगावकर👤 विनोद पांचाळ👤 मोहन लंगडापुरे👤 भारत शेळके👤 रितेश जाधव👤 निखिल थोरमोठे👤 विजय सदानंद👤 वसंत यशवंतकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ?  हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,*         *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।*          *बळेविण शक्ती। बोलू नये॥**या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.**संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती  बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!*  ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●••              🌼🌼🌼🌼🌼🌼      *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*              📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या  कामाची पावती आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड.  संवाद.9421839590/          8087917063.🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *कोळ्याने राजाला धडा शिकवला*एकदा दोन राज्यात युद्ध झाल. त्यात एका राजाचा पराभव झाला .पराभुत राजा शोध घेत होता .त्यांनी  त्या राजाला ठार मारायचे होते, म्हणून तो राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला .आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याच्या धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरी सरपटणारा एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. तो सरपटत भिंतीवर चढायचा. असे बऱ्याचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही राजाने विचार केला. हा सरपटणारा छोटा  प्राणीसुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझा प्रयत्न का बरे सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय  केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्यांनी आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रु बरोबर युद्ध केले. अखेरीस त्यांनी लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धङा शिकविले,हेत्याच्या कायम लक्षात राहिला.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते.*             *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 11/11/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६६ - जेमिनी १२ अंतराळयानाचे प्रक्षेपण.◆ १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.💥 जन्म :-◆ १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या, राज्यात भारत जोडो यात्रेत नांदेड येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केलं लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात अन्न, औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरुच; 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होणार आहे. यूपीमधील रामपूरच्या सत्र न्यायालयाने स्थगिती देण्यास दिला नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केवळ 14 महिलांनाच तिकीट, गुजरात निवडणुकीसाठी भाजपची 160 उमेदवारांची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना हायकोर्टाचा दणका, बँकेनं कोचर यांच्याबाबत घेतलेले निर्णय वैध ठरवत त्यात कोणताही हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शून्यातून विश्व साकारणाऱ्या सरकारी शाळा*जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्यात येणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील.............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_15.htmlwww.nasayeotikar.blogspot.com            लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य कसे चालते ?* 📙बर्‍याच जणांना मुत्रपिंड म्हणजेच जननेंद्रिय असे वाटते. हे चुकीचे आहे. मूत्रपिंडाचा संबंध शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आहे. तर जननेंद्रियांचा संबंध पुनरुत्पादनाशी आहे. माणसाच्या शरीरात घेवड्याच्या 'बी'च्या आकाराची दोन मूत्रपिंडे असतात. ३ x २ x १ इंच असा त्यांचा आकार असतो. मूत्रपिंडाचे कार्य गाळणीसारखे असते. शरीरात चयापचयामुळे अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. यात युरिया, युरोबिलीनोजेन, मृत पेशीतील घटक आदींचा समावेश होतो. मूत्रपिंडामध्ये रक्त गाळले जाते. शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी रक्तातच राहतात; पण अतिरिक्त पाणी, क्षार व टाकाऊ किंवा विषारी पदार्थ रक्ताबाहेर काढले जातात. यालाच आपण लघवी म्हणतो. मूत्रपिंडातून मूत्रवहिन्यांद्वारे लघवी मूत्राशयात गोळा होते. मुत्रसंचयानंतर लघवी करण्याची इच्छा निर्माण होते व मूत्रमार्गाद्वारे लगेच शरीराबाहेर पडते.विषारी, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेरील टाकण्याखेरीज शरीरात पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडे करतात. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोगात मूत्रपिंडावर परिणाम होऊन ती अकार्यक्षम बनतात. काही सांसर्गिक रोगांमुळेही त्यांचे कार्य बंद पडू शकते. असे झाल्यास रक्तातील विषारी पदार्थांचे (जसे युरिया, अमोनिया) प्रमाण वाढते व यांचा मेंदू तसेच इतर इंद्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती कोमात जाते व मरण पावते. जिवंत राहण्यासाठी मूत्रपिंडे कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. एक निरोगी मूत्रपिंडदेखील दोन मूत्रपिंडांचे कार्य करू शकते.मूत्रपिंडांच्या कायमस्वरूपी रोगांमध्ये ज्यात त्यांचे कार्य पूर्णपणे बंद पडते. डायलिसिस वा मूत्रपिंडावरोपण हे दोन उपचार करता येतात. या दोन्ही पद्धतीत काही धोके असले तरी त्यामुळे रुग्णाचे आयुष्य आणि काही वर्षांनी वाढण्याची शक्यता असते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांनी पहिले मतदान केव्हा केले ?२) 'जंगलाचं देणं' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?३) काश्मीर हरीण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे ?४) फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी कोणती ?५) कोकण रेल्वेचे जनक कोणाला म्हटले जाते ?*उत्तरे :-* १) फेब्रुवारी १९५२, देशाची पहिली लोकसभा निवडणूक २) मारूती चितमपल्ली ३) दाचीगम ४) samsung कंपनी, दक्षिण कोरिया ५) ई श्रीधरन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 शिवकुमार ईबीतवार👤 ऋषिकेश बेळकोनीकर👤 माधव तनमुदले👤 रणजित लोखंडे👤 ज्ञानेश्वर आंचेवाड👤 बालाजी पांडागळे👤 सूर्यकांत राखोंडे👤 राजेश कुमार👤 शेषराव पाटील👤 संदीप पिकले👤 दिवाकर अष्टेकर👤 मल्लेश कमळे👤 राम वाघमारे👤 ऋषी देसाई*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मनुष्यस्वभाव' अगदी विपरित असतो. तो कायम दुस-याचे अनुकरण करण्यात मग्न असतो. त्याला 'स्वधर्म' पाळण्यापेक्षा परधर्माचे आकर्षण जास्त असते. जसे गुलाबाच्या झाडाने कमळाचे फूल उगवण्याचा अट्टहास करणे. परंतु अशा प्रयत्नात अपयश हे ठरलेले असते. खरं म्हणजे गुलाबाच्या झाडाने उत्तम गुलाबाचे फूल उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तोच त्याचा 'स्वधर्म' असतो. कमळाचे फूल उगवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ परधर्माचे अनुकरण करणे होय. स्वत:ची फूले लहान निपजली तरी चालतील, परंतु दुस-याची मोठी फुले आपली मानणे हा अधर्म होय.**मनुष्याने आपला धर्म ओळखून, सारी क्षमता पणास लावून कार्य केले तर त्याचे 'कल्याणच' होईल. अन्यथा स्वधर्म सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागत राहिले तर वाट्याला केवळ दु:ख येईल. "दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून त्याचा स्वधर्म आहे प्रकाश देणे !"*                          *॥ रामकृष्णहरी ॥*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹       *संजय नलावडे, मुंबई*    *मोबाइल  - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••          *मोहित चा अनुभव*मोहित ची शाळा सुटली. तो घरी निघाला. वाटेत त्याला आई दिसली. तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जाड असाव्यात, असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. “अग आई, काय घेऊन चाललीस एवढं? ” मी आईला विचारले.तिच्या हातातील एक पिशवीघेऊ लागलो. “अरे हळू सामान सांडेल त्यातलं.” ती म्हणाली.“अगं आई, किती जड आहे पिशवी! काय आहे एवढ्यात ? मी म्हणालो. “हे आपल्या महिन्याभरच्या किराणा आहे” आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, तीही किती जाड होते, आणि त्याने आईचे हात लालेलाल झाले होते. “एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई?” किती लागले असावेत? असे आईच मला उलटून प्रश्न विचारून राहिली. मी सांगितले रक्कम एकूण आई हसू लागली आणि म्हणाली “, वा रे वा, तुझं ध्यान! वस्तूचे भाव गगनाला भिडले कुठे आहेस तू? बाजारात फिरत जा, मग तुला समजेल. मग महेश म्हणाला “आई जेव्हा माझ्या शाळेला सुट्टी असते तेव्हा आपण किराणा दुकान मध्ये जाऊ म्हणजे  मला तुला मदत करता येते व माझे व्यवहार ज्ञान ही वाढते.*तात्पर्यः वेळेचा सदउपयोग करून अनुभव मिळवणे व ज्ञान वाढविणे,कामात मदत होणे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣            ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00         ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷  🎇 .  *दिनविशेष .  🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••         💥 ठळक घडामोडी :- ◆ 1997 - साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान◆ 2000- उत्तराखंड उच्च न्यायालयाची स्थापना💥 जन्म :-◆ 1931 - भारतीय कायदे पंडित लक्ष्मी मल सिंघवी यांचा जन्म💥 मृत्यू :-◆ 2005 - भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे निधन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱  9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सरकार रद्द करणार 10 लाख रेशनकार्ड, ‘या’ लोकांना मिळणार नाही मोफत धान्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *अशोक चव्हाणांच्या मुलीचं होणार राजकारणात पदार्पण ? सूचक ट्विटमुळे चर्चांना उधाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला आदित्य ठाकरेंची मिळणार साथ, पदयात्रेत होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *दिल्ली- NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र ; 3 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरन्यायाधीश उदय लळीत यांचा कोर्टाला भावपूर्ण निरोप, पायऱ्यांवर डोकं ठेवून अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिवाळीच्या प्रदीर्घ सुट्टी नंतर आजपासून महाराष्ट्रभर शाळांना सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   *हेडफोनपासून दूर रहा*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••      📙 *प्लॅस्टिक सर्जरी* 📙सर्जरी किंवा शस्त्रक्रिया याचे कितीतरी पोटविभाग गेल्या ३०-४० वर्षात प्रगत होत गेले आहेत. कान नाक घसा यांसाठीचे तज्ज्ञ, पोटाच्या व आतडय़ाच्या विकाराचे तज्ज्ञ, मूत्रशल्यविशारद, मेंदू व मज्जारज्जू शल्यविशारद, अस्थिरोगतज्ञ अशा विविध अवयवांनुसार त्यांची विभागणी होत गेली आहे. मात्र गेली साठएक वर्षे जनरल सर्जरीच्या बरोबरीने, पण स्वतःचे वेगळेपण राखणारी शाखा म्हणजे प्लॅस्टिक सर्जरी होय. भारतीय शल्यकर्म परंपरेतील सुश्रुतसंहितेमध्ये सुद्धा प्लास्टिक सर्जरीच्या आज केल्या जाणाऱ्या चेहऱ्यावरच्या नाकाच्या ठेवणीबद्दलच्या शस्त्रक्रियेसंदर्भात उल्लेख सापडतात. अर्थातच तंत्रांमध्ये खूप बदल होत गेला आहे.प्लॅस्टिक सर्जरी असे विचित्र नाव पडण्याचे कारण म्हणजे विद्रुप झालेला शरीराचा भाग वळूवून लवचिकपणे त्यात बदल करून त्याला आकार देण्याचे अवघड काम या शस्त्रक्रियेत अपेक्षित असते. आजकाल जरी प्लास्टिक सर्जरी ही खूपदा सौंदर्य वाढवण्याकरता केली जात असली तरी तिचा मूळ गाभा विद्रूपता दूर करणे व शरीररक्षणाला उपयुक्त ठरणे हाच आहे.जन्मत: दुभंगलेला वरचा ओठ व टाळू, बसके व अपरे नाक, पुरुषांच्या मूत्रमार्गातील जन्मतः असलेले दोष, हाताची पायाची सहा वा जास्त बोटे यांसारख्या जन्मजात दोषांवर शस्त्रक्रिया करून त्या व्यक्तीला सामान्यपण देऊ करणे हा प्लास्टिक सर्जरीच्या कामाचा मोठा भाग. पण अनेकदा भाजल्यामुळे काही मोठ्या भागातील त्वचा जळून जाते किंवा अाकसून त्या अवयवाची हालचाल कमी होते. (उदारणार्थ मान वळवणे, कोपरामधील त्वचा जळल्याने हात लांब न होणे इत्यादी) त्यावेळी अन्य भागातून त्वचा काढून त्या जागी तिचे रोपण करण्याचे काम प्लॅस्टिक सर्जन करतात. प्लास्टिक सर्जरीचा वापर १९५० नंतरच्या दशकात गुप्त हेरगिरीसाठी चेहरेपट्टी बदलून घेण्यासाठीही केला गेला आहे. असाच उपयोग वृद्धत्वाच्या खुणा झाकून चेहर्यावरील नको त्या सुरकुत्या काढण्यासाठी अनेक व्यक्तींनी, नटनट्यांनी केला आहे. डोक्यावरचे टक्कल कमी करण्यासाठी केशारोपण करून तेथे केस वाढवणे हा सुद्धा या शस्त्रक्रियेचाच एक भाग समजला जातो. सूक्ष्मदर्शक यंत्राचा सरसहा वापर अतिशय नाजूक सुया, अगदी पातळ तंतूवजा रेशमी धागे आणि तासनतास चिकाटीने चालणारे काम हा प्लास्टिक सर्जरीचा अत्यावश्यक भाग. प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करताना शरीराची ठेवण बदलताना, त्वचेची अदलाबदल करताना त्या भागात होणारा रक्तपुरवठा अबाधित राखणे हा नियोजनाचा, आरेखनाचा अत्यंत कौशल्याचा भाग असतो. यामध्ये जरा जरी चूक झाली तरी आरोपण केलेली त्वचा निरुपयोगी ठरते.कॅन्सरसंदर्भातील विविध शस्त्रकर्मे केल्यावर काही भाग काढून टाकणे अत्यावश्यक ठरते. उदारणार्थ, चेहऱ्याच्या जबड्याचा निम्मा भाग, छातीच्या काही फासळ्या. अशा वेळी प्लॅस्टिक सर्जरीने अशा रुग्णाला शक्यतो नेहमीचे रूप देण्यासाठी कित्येक महिने प्रयत्न करावे लागतात. प्लॅस्टिक सर्जनचे कामाचे स्वरूप त्यामुळे सध्याच्या काळात प्लास्टिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह व कॉस्मेटिक असे तिहेरी झाले आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••समता ही आजची हाक आहे. ती आपणास आवडो वा ना आवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे - विनोबा भावे*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून कोणाला ओळखले जाते ?२) २००६ साली सोलापूरमध्ये झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?३) आंतरराष्ट्रीय टी - २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा गोलंदाज कोण ?४) परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला काय म्हणतात ?५) राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे ?*उत्तरे :-* १) श्याम शरण नेगी, से. नि. शिक्षक, हिमाचल प्रदेश २) मारूती चितमपल्ली ३) भुवनेश्वर कुमार, भारत ( १७ वेळा ) ४) जैव रासायनिक चक्र ५) ६ महिने *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 श्रीपाद पटेल राऊतवार👤 बाबुराव जाधव👤 माधव यादव👤 भगवान वाघमारे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*     [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••        ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ग्रंथपारायणात रस नसलेलो आम्ही पुस्तकांची पानं फाडून, होड्या बनवून पावसात सोडायचो. काही दु:ख वाटायचं नाही उलट मौज वाटायची. पुस्तकाची किती पानं फाडलीत हे कुठं कळायचं, आई-बापांना ! अशा पुरात सोडलेल्या होड्या वाहुन समुद्राला गेल्या; पण डोळ्यातील स्वप्नांना मात्र त्यांनी बुडू दिलं नाही. पुस्तकांच्या पानांच्या होड्या, विमानं, पतंग बनवायला मिळतात म्हणून शाळेची वाट गोड. मजबुरीने धरलेल्या वाटेवर याच ग्रंथाच्या होडीने अथांग दर्यावर हुकूमत गाजवणारा नावाडी बघता बघता कधी बनवून टाकले, कळलेच नाही. तेंव्हा वाटले नव्हते, की या कागदी नावेला स्वप्नांची वल्हं आणि स्वप्नांचा अमर्याद धागा जोडला आहे ते.!**आज ग्रंथांविषयी निराशापूर्ण वातावरण दिसते. ग्रंथांकडे समाज दुर्लक्ष करतोय, पण "किताबों पर धूल जम जाने से, कहानी थोडेही खत्म हो जाती है!" कुठल्याही काळात ही धूळ झटका, पुस्तकं पुन्हा भरभरून बोलतील. प्रत्येकाला ही कागदाची नाव आणि शाईचं इंधन पुरेसं आहे ; हा जीवनाचा अथांग दर्या तरून जायला.*  ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●••            🌸🌸🌸🌸🌸🌸         *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*               📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात तुम्हाला चांगले जगायचे तर येणा-या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.कारण कोणतीही परिस्थिती चांगली असतेच असे नाही.कधी कधी वाईट आणि बिकट परिस्थितीतून ही मार्ग काढून सुखी जीवन जगण्यासाठी एखादा आशेचा किरण सापडत असतो.पण आता आपल्याला आपल्या जीवनात दु:खच आहे आणि दुःखच भोगावे लागणार त्याच्याशिवाय आता दुसरा पर्यायच नाही असे जर म्हटले तर मग जीवनात दु:खाशिवाय दुसरे काहीच भोगायला मिळणार नाही.उलट जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असेल आणि सुखाने जीवन जगायचे असेल तर हातपाय तर हलवावेच लागतील.मेहनत करावी लागेल,काहीतरी काम शोधावे लागेल,आपले निराशावादी मन आशेकडे न्यावे लागेल, नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे न्यावे लागेल तर तुम्हाला सुखी जीवन जगण्याचा मार्ग सापडेल.अन्यथा मग आपल्या जीवनाच्या जीवनशैलीला आहे तसेच स्वीकारुन जीवनभर यातना,दु:ख यांना जवळ करावे लागेल.*व्यंकटेश काटकर,नांदेड.*  संवाद...९४२१८३९५९०.🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••                *गरुड व घुबड*एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत. परंतु, एक दिवस, त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरविले, तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले. तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले, ''मित्रा! परंतु, माझी पिल्ले कशी आहेत ते तुला माहीत आहे का? नाहीतर दुसर्‍याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील.'' गरुड म्हणाला, ''माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. त्यांचे डोळे, पिसे, आवाज सगळेच खूप सुंदर आहे. आता येईल ना तुला ओळखता?'' पुढे एके दिवशी, झाडाच्या ढोलीत गरुडाला घुबडाची पिल्ले सापडली. ती पाहून तो म्हणाला, ''किती घाणेरडी आणि कुरूप पिल्ले आहेत ही. घुबडाची पिल्ले तर खूप सुंदर आहेत. म्हणजे ही काही घुबडाची पिल्ले नसणार. यांना मारून टाकावे. असे म्हणून त्याने सगळ्या पिलांचा फडशा उडवला.'' नंतर घुबडाने येऊन पाहिले तो ढोलीत पिल्ले नाहीत. ते गरुडास म्हणाले, ''मित्रा, तूच माझी पिल्ले खाल्लीस.'' गरुड म्हणाला, ''हो, मी खाल्ली; पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्ले तुझी आहेत म्हणून ? तू तर म्हणालास की, माझी पिल्ले खूप सुंदर आहेत. मला वाटले ती दुसर्‍याच पक्ष्याची आहेत. आता यात माझी काय चूक?तात्पर्य: स्वत:ची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~*नोट :- सोमवार दि. 17 ऑक्टोबर ते 08 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी असल्याने दि. 09 नोव्हेंबर पासून पूर्ववत सुरू होईल.*~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/10/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक विद्यार्थी दिन* *वाचन प्रेरणा दिन* *जागतिक हात धुवा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-★ १९३२ - टाटा एअरलाइन्सच्या (नंतरचे एअर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.★१९७० - एरोफ्लोत फ्लाइट २४४ या विमानाचे तुर्कस्तानला अपहरण.★ १९९७ - शनिकडे जाणाऱ्या कॅसिनी अंतराळयानाचे केप केनॅव्हरल येथून प्रक्षेपण.★ १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले.💥 जन्म :-◆१९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक.◆ १९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती.💥 मृत्यू :-◆१९१८ - साई बाबा (शिर्डी).◆ १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार येत्या २० ऑक्टोबरपासून १० ते ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम १२ हजार ५०० एवढी रक्कम अग्रीम मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात दरवाढीसाठी महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाशी केली चर्चा, राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार असल्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत १ नोव्हेंबरपासून सहप्रवाशांना सीटबेल्टची सक्ती, अन्यथा मोठा दंड भरावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखांची केली घोषणा, 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांचे निधन, ते 82 वर्षाचे होते, धार्मिक विधी न करता केलं देहदान!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, पोलिसांची 11 हजार 443 पदं भरतीला देण्यात आली मंजुरी देण्यात आली, लवकरच होणार पोलीस भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🖥️ चरित्रात्मक माहिती 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••वाचन प्रेरणा दिन त्यानिमित्ताने .........*मिसाईल मॅन ते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/6du7dSL9qdI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *एम. डी. भोसले, सहशिक्षक, प्रा. शाळा मंगनाळी ता. धर्माबाद जि. नांदेड*📱9011200230~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 काव्यांगण ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••15 ऑक्टोबर - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने काव्यपुष्पांजली*।। वाचन प्रेरणा दिवस ।।*वाचनाने मिळते आम्हा ज्ञानज्ञानाने होतो आम्ही सज्ञानविचारवंतांची असे एकच भूखवाचनातून मिळते त्यांना सुखरिकामा वेळ वाचनात घालवीविचारांना फुटेल नवी पालवीवाचनाने होते लेखन समृद्धलहान असो वा असो वयोवृद्धवेड लागेल जेंव्हा पुस्तके वाचनाचीविसर पडेल तेंव्हा सर्व जगाचीदिसमाजी काही करावे चिंतनडोक्यात होईल ज्ञानाचे सिंचन~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ *नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक टपाल दिन*‘चिट्ठी आयी है, आयी है…’ या हिंदी सिनेमातील गाजलेल्या गाण्यातून पत्राचे महत्त्व वर्णन केलेले आहे. ही पत्रे वाटप करणार्‍या टपाल खात्याची ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली होती, म्हणून आजचा दिवस ‘विश्‍व टपाल दिन’ म्हणून साजरा होत आहे. हा निर्णय टोकियोत १९६९ साली भरलेल्या युनियनच्या परिषदेत घेण्यात आला होता. जगभरची टपाल व्यवस्था सुरळीत नि तत्परतेने चालू रहावी, हा या युनियनच्या स्थापनेमागचा हेतू होता. गेल्या ३५ वर्षात ‘युनेस्को’च्या सहकार्याने प्रस्तुत संघटना या दिवशी तरुण मंडळींसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करते व विश्‍व टपालदिनी स्पर्धकांना बक्षीस वाटप करते. विविध देशातल्या शाळा-कॉलेजातील मुले स्पर्धेत भाग घेऊन ही बक्षीसे मिळवीत असतात. यंदाचे बक्षीस व्हिएतनामच्या शाळकरी मुलीने पटकाविले आहे. जगभरातील देशात टपालाची मुक्त, मोकळी ये-जा व्हावी हे पोस्टल युनियनचे उद्दिष्ट आहे. पूर्वीच्या काळी प्रवासी दूरदूरचा प्रवास करून टपाल वितरण करीत. १६०० ते १७०० च्या काळात अनेक देशांनी एकत्रित होऊन आपसात करार केले व टपाल वाटपाची योजना आखली. इ.स. १८०० च्या अखेरीस जगभर टपाल वितरणाचे बर्‍यापैकी जाळे निर्माण झाले होते. अर्थात त्यात त्रुटी होत्या, क्लिष्टता होती व भरवसा नव्हता. ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाल्यावर टपाल व्यवस्थेत लक्षणीय फरक पडला. आज टपाल व्यवस्थेला आधुनिकीकरण, नवतंत्रज्ञानाशी स्पर्धा आणि विस्तार या बाबींची दखल घ्यावी लागत आहे. नैरोबीला पोस्टल युनियनची दोन वर्षांपूर्वी एक परिषदेत या विषयी तीव्र पडसाद उमटले. पोस्टखात्याच्या उदासिन वृत्तीबद्दल या परिषदेतील चर्चासत्रात टीका झाली. या परिषदेत ११६ देशातील ५५० हून जास्त प्रतिनिधी हजर होते. इ.स. २००९ चा सोहळा हा पर्यावरणाशी निगडित होता व त्याची घोषणा होती ः ‘हरित प्रगतीसाठी टपालसेवेची बांधिलकी’ व तत्संबंधी परिषद पोर्तुगालमध्ये भरली होती. गतवर्षीची परिषद कातारला आयोजित करण्यात आली होती. पत्र लिखाण ही एक कला आहे. तो जगभरच्या साहित्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनून आहे. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक संपर्क जाळ्यांच्या गराड्यात पत्र लिखाण नामशेष होत चालले आहे, ही खेदाची बाब आहे. पूर्वीच्या गुलाबी प्रेमपत्रांची सर सध्याच्या एस.एम.एस.ना काय येणार? पूर्वी प्रेमीजनांच्या नि नातलगांच्या पत्रांची वाट बघण्यात जी मजा यायची ती या ‘क्विक्’ संक्षिप्त संदेश प्रणालीने हरवून टाकली आहे. बर्‍याच लोकांना पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. जागतिक टपालदिनी त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु सध्याचा पोस्टाचा गोंधळाचा कारभार बघता पूर्वीच्या काळी कबूतरांचा वापर होई, तशी वेळ तर येणार नाही ना, ही भीती उगाचच वाटते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील." - डॉ. एपीजे अब्दुल कलाम**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा झाला ?२) 'वाचन प्रेरणा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) 'जागतिक हात धुवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'जागतिक विद्यार्थी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?५) राष्ट्रीय नवोन्मेष ( नवकल्पना ) दिन केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) १५ ऑक्टोबर १९३१ २) १५ ऑक्टोबर ३) १५ ऑक्टोबर ४) १५ ऑक्टोबर ५) १५ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गोविंद सखाराम पवळे● फारुख शेख, लोहा● मंगेश फड● संतोष मदनुरकर● मोहन भुसेवार● पृथ्वीराज राहेरकर● शिवराज काटेवाडे● सुभाष मेंटेवाड● संजय कदम● रमेश कामाडी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !**भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहंकाररुपी माणूस सुरुवातीला दुसऱ्यावर आपला प्रभाव टाकायला जातो, परंतु सुरुवातीला लोकांना माहित नसते म्हणून त्याच्यातील वर्तनाकडे पाहून थोडे दुर्लक्ष करतात.पुन्हा पुन्हा जर असे वर्तन करत असेल तर त्याची प्रतिमा इतरात किंवा चारचौघात काय आहे हे चांगलेच ओळखायला लागतात आणि नंतर त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत.जर स्वत:चेच तुणतुणे वाजवत असेल तर येणाऱ्या काही काळात त्याच्या अहंकाराचे डफडेच वाजवून टाकतात.त्यामुळे त्याची कोणतीच प्रतिष्ठा समाजामध्ये राहत नाही.मग तो जीवनात एकटा पडतो.इतरही लोक त्याच्यापासून दूर जायला लागतात.त्याच्या अहंकाराने त्याचे सगळे संपलेले असते.म्हणून माणसाने कधीही अहंकाराची भाषा करु नये.एकदा माणसाच्या अंगात अहंकाररुपी राक्षस शिरला की,त्यांचे सर्वस्व संपलेच आहे असे समजावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुबेहूब कला अवगत असणे.*एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्‍यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत.नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे.एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्‍चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला.तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्‍यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्‍या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे.त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला.हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )~~~~~~~~~~~~~~~~~~~🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 13/10/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९२३ - अंकारा (चित्रित) तुर्की देशाची राजधानी बनली.◆ १९८३ - अमेरिटेक मोबाईल कम्युनिकेशन्स (आता एटीअँडटी) यांनी अमरिकेतील शिकागो शहरात मोबाईल नेटवर्क सुरु केले.◆ २०१३ - दतिया, मध्य प्रदेश येथील रतनगढ माता मंदिरात चेंगराचेंगरी झाली ज्यात ११५ ठार आणि ११० हून अधिक जखमी झाले.💥 जन्म :-◆ १९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता◆ १९४८ - नुसरात फतेह आली खान, पाकिस्तानी गायक💥 मृत्यू :-◆ १९११ - भगिनी निवेदिता, आयरिश-भारतीय सामाजिक कार्यकर्ती◆ १९३८ - इ. सी. सिगार, अमेरिकन व्यंगचित्रकार, पॉपाय कार्टून चा निर्माता◆ १९८७ - किशोर कुमार, भारतीय गायक, अभिनेता, दिग्दर्शक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बडतर्फ ST कर्मचारी पुन्हा कामावर रुजू, सदावर्तेंच्या निवासस्थानी सेलिब्रेशन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *चीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या 3000 भारतीय विद्यार्थ्यांना दिलासा, चीनने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *काँग्रेसचे खासदार राहुल गगांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या 'भारत जोडो यात्रे'चा काल 12 ऑक्टोबर रोजी 35 दिवस पूर्ण झाले असून आत्तापर्यंत 900 किमीचा प्रवास पूर्ण झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गेल्या सप्टेंबर महिन्यात महागाई दर 7.41 टक्क्यांवर गेला असून खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सर्वात मोठ्या गहू उत्पादक उत्तरप्रदेश व बिहार राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक T-20 सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ ; 2-0 ने मालिकेवरही केला कब्जा *•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Conversation संभाषण👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Zu6FBgq1BbY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे*मुलांनो, काम केल्यानेच मनुष्य मोठा होत असतो. रिकामा बसून किंवा फक्त बोलल्याने जीवनात काही प्राप्ती होत नाही. पंचतंत्रात असे म्हटले आहे की, मनुष्याच्या रूपामुळे किंवा कुळामुळे त्याचा गौरव वाढत नाही. तर माणसाच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या कार्यामुळे त्याचा गौरव वाढतो. आपण जसे बोलतो त्याप्रमाणे वागले पाहिजे. अन्यथा कुणी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत. शब्दाला कृतीचे तारण नसेल तर शब्द वांझ ठरतात असे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. म्हणूनच दलितांच्या कल्याणासाठी त्यांनी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर नागपूरच्या पावन दीक्षा भूमीत हजारो अनुयायासोबत बौध्द धर्माची दीक्षा घेतली. त्यांच्या प्रत्येक शब्दाला कृतीची जोड होती म्हणून तर ते दलितांसाठी ईश्वरासमान झाले आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे मानवी जीवन आनंदी होते असे म्हणताना राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आयुष्यभर साधेपणाने राहिले. देशातील अनेक लोकांना अंगभर कपडे मिळत नाहीत तेंव्हा मी पूर्ण कपड्यानिशी कसा राहू म्हणून त्यांनी कपड्याचा त्याग करून पंचा स्वीकारला आणि देशातील लोकांसाठी चरख्यावर सुत कातण्यास सुरुवात केली. गरीबातल्या गरीब व्यक्तीचा त्यांनी विचार केला. याचा अर्थ जे लोक फक्त बोलत नाहीत तर त्या नुसार कृती करतात आणि वागतात ते खरोखरच महान होतात. केवळ गडगडाट करणारे मेघ कधी पाऊस देत नाहीत म्हणूनच गर्जेल ते बरसेल काय ? असे म्हटले जाते ते काही चूक नाही. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांनी जसे बोलले तसे वागले आणि चालले म्हणून समाजात आज त्यांचे स्थान सर्वांच्या हृदयात आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे संतानी सांगून ठेवले आहे. अस्पृश्यता पाळू नका असा संदेश देणारे संत एकनाथ महाराजानी तप्त तापलेल्या वाळूवरील हरिजन बालकांस कडेवर उचलून घेतले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्य लोकांसाठी घरातील पाण्याचा हौद मोकळा केला. त्याचा परिणाम त्यांना भोगावे लागले परंतु त्याची त्यांना फिकीर नव्हती, कारण ते क्रियाना महत्त्व देणारे होते. विचाराला आचाराची जोड असली की आपल्या हातून चांगले कार्य होते. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे अर्थात काही ही न करता नुसते बोलणे काही कामाचे नाही.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*🐠9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *नलिकाविरहित ग्रंथी* 📙आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात. बहि:स्रावी ग्रंथीमध्ये तयार झालेला स्राव नलिकेद्वारे बाहेर पाठवला जातो. उदारणार्थ लाळग्रंथीत तयार झालेली लाळ तोंडात येते. याउलट अंत:स्रावी ग्रंथीत तयार झालेला स्राव ग्रंथीमधीलच रक्तवाहिन्यांत शोषला जातो. रक्तामध्ये शरीरात विविध भागांकडे पाठवला जातो. अशा अंतस्रावांस संप्रेरक, 'हार्मोन' असे म्हणतात. अशा नलिकाविरहित ग्रंथींना 'एंडोक्राइन' ग्रंथी असे म्हटले जाते.शरीरात घडणाऱ्या असंख्य चयापचयाच्या क्रिया व महत्त्वाचे जीवनव्यापार यांवरचे नियंत्रण या ग्रंथींद्वारे राखले जाते. प्रत्येक ग्रंथीमधील स्रावाचे कार्य एखाद्या विशिष्ट लक्ष्यावर काम करते. सर्वात जास्त परिणाम त्या लक्ष्यावर घडून येतो. नलिकाविरहित ग्रंथींच्या प्राकृत व विकृत अभ्यासाची अतिविशिष्ट अभ्यासशाखा मानली जाते (एंडोक्रायनाॅलॉजी ही सुपर स्पेशालिटी). डॉक्टर मंडळी त्यात प्रावीण्य मिळवून काम करतात.अशा नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथी. (पिट्युटरी), कंठस्थ (थायरॉइड), उपकंठस्थ (पॅराथायरॉइड), मूत्रपिंडावरील (अॅड्रिनल), स्वादुपिंडातील (लँगरहॅन्स आयलेट) या ग्रंथी स्त्री व पुरुषांत सारख्याच असतात. पुरुषात वृषण (टेस्टीज) व स्त्रीमध्ये राज:पिंडे (ओव्हरीज) या वेगळ्या असतात. यांतील प्रत्येक ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्रावाला बहुदा त्या ग्रंथीच्या नावाने ओळखले जाते. उदाहरणार्थ पिट्युटरी हार्मोन.या ग्रंथीमधील सर्वात महत्त्वाची म्हणजे पिट्युटरी शीर्षस्थ ग्रंथी. अन्य सर्व ग्रंथींवर तर तिचे नियंत्रण असतेच, पण शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी ती नियंत्रित करते. मूत्रपिंडाचे कार्य, हवेच्या तापमानाशी जोडून मुत्रनिर्मिती कमी वा जास्त राखणे व त्यानुसार शरीराला तहानेची जाणीव करून देणे हे काम तिच्याकडे आहे. स्नायूंवरचे नियंत्रण, विशेषत: गर्भाशयाचे स्नायू बाळाच्या जन्मासाठी कधी आकुंचित करायचे व आईचे दूध कधीपासून निर्माण करायला सुरुवात करायची, यांवरचे नियंत्रण ऑक्सिटोसीन व मॅमॅट्रोपिक हार्मोनने केले जाते. या सर्वांची निर्मिती शीर्षस्थ ग्रंथींच्या मागच्या भागातून होते. याशिवाय पुढील भागात अन्य ग्रंथींना उत्तेजक (ट्रोपिक) हार्मोनची निर्मिती केली जाते. थायरॉइडमधील स्रावांचे सतत नियंत्रण या हार्मोनने होत असते. नलिकाविरहित ग्रंथींचे नेतृत्वच शीर्षस्थ ग्रंथी करत असते. जेमतेम मोठ्या शेंगदाण्याएवढ्या असलेली ही ग्रंथी खरोखरीच जीवनाधार समजली जाते.थायरॉइड हार्मोन मुख्यतः आयोडिनयुक्त असते. खाण्यात, आहारात आयोडाइड्स कमी पडली तर हा स्राव कमी निर्माण होतो. शरीरातील चयापचयाची महत्त्वाची कार्ये व शरीराचे तापमान नियंत्रण आणि शक्तीसंपन्नता यांत ह्या हार्मोनचा महत्त्वाचा कार्यभाग असतो. गलगंड, मेंदूची अपूरी वाढ, मतिमंदत्व असे विकार होऊ नयेत, त्यांना प्रतिबंध करता यावा यासाठी मिठावाटे आयोडीनचा आवश्यक पुरवठा करावा, असे तज्ज्ञांना वाटते. रोज दोन चिमटी एवढेच मीठ आपण खात असल्याने नियंत्रित पुरवठा याद्वारे करणे शक्य होते. मिठाशिवाय जेवण, अळणी अन्नपदार्थ हा विचार आपल्या मनात तरी येतो का ? उपकंठस्थ वा पॅराथायरॉइड या कंठस्थ ग्रंथीमागे दोन छोट्या ग्रंथी असतात. कॅल्शिअम व फॉस्फरस या दोन्हींच्या चयापचयावर पॅराथाॅर्मोनचे नियंत्रण असते. हाडे, दात, शरीरातील सर्व स्रावांत या दोन्हींची गरज असते. त्यासाठी या ग्रंथीचे कार्य महत्त्वाचे ठरते.मूत्रपिंडावरील अॅड्रिनल ग्रंथी मूत्रपिंडावर छोट्या टोपीप्रमाणे असतात. त्यांचा गाभा (मेड्युला) व बाह्यभाग (कॉर्टेक्स) हे दोन वेगवेगळ्या हार्मोन्सची निर्मिती करतात. जीवनावश्यक व हृदयासारख्या महत्त्वाच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवणारी अॅड्रीनॅलिन व नाॅर-अॅड्रीनॅलिन ही दोन हार्मोन्स गाभ्यात तयार होतात. 'मारा किंवा मरा', अशा समयी या स्रावांचे कार्य अवघ्या शरीराला जाणवते. स्नायूंचा रक्तपुरवठा वाढवणे, हृदयाची गती वाढवणे, रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे, यकृतातील साखरेची म्हणजे ग्लायकोजेनची ग्लुकोज शर्करा बनवणे व अनिच्छावर्ती स्नायू शिथिल करणे ही मुख्य कामे या दोन स्रावांमुळे होतात. अॅड्रिनल ग्रंथीच्या बाह्य भागातून काॅर्टिकोस्टिराॅईड नावाची हार्मोन्स निर्माण होतात. यांतील अल्डोस्टिराॅन हे द्रव्य शरीरातील सोडियम व पोटॅशियम या घटकांच्या चयापचयावर नियंत्रण ठेवते. मज्जातंतूंचे कार्य, हृदयाचे कार्य, स्नायूंचे कार्य यांसाठी या दोन्हींची गरज असते. स्टिरॉइडमधील अन्य द्रव्ये पिष्टमय पदार्थांच्या चयापचयावर नियंत्रण राखतात. त्यांचे कार्य रक्तातील शर्करा जरुरीप्रमाणे वाढविण्याचे असते. प्रथिने व स्निग्ध यांच्या साठ्यांवरही त्यांचे नियंत्रण राहते. याशिवाय शरीरात कोठेही दाह झाल्यास यांचा दाहशामक म्हणूनही उपयोग होतो. विशेषतः सांध्यांचा दाह असल्यास स्टिरॉइडचा तोंडावाटे वा त्याजागी इंजेक्शन देऊन उपयोग होतो. अॅड्रिनल ग्रंथीचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.स्वादुपिंडातील स्वादुरस पक्वाशयात नलिकेवाटे पोहोचवला जातो. मात्र लँगरहॅन्स आयलेट्स या पेशीसमूहातून इन्सुलिनची निर्मिती होऊन ती थेट रक्तात मिसळते. शक्ती व उष्णता उत्पन्न होण्यासाठी शरीरातील सर्व पेशीजालामध्ये प्राणवायूच्या साहाय्याने ग्लुकोज साखरेचे ज्वलन होते. यासाठी इन्सुलिनची मदत लागते. ती न मिळाल्यास रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते. तसेच इन्शुलिनचे दुसरे कार्य म्हणजे रक्तातील जास्तीच्या साखरेचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करून ती यकृतात साठवणे. या दोन्ही संदर्भात या ग्रंथीचे महत्त्व आहे.लैंगिक ग्रंथी पुरुष व स्त्रीमध्ये प्रत्येकी दोन असून त्यांना वृषण व राज:पिंड असे म्हणतात. वयात आल्यावर पुंबीजे व स्त्रीबीजे यांची यथायोग्य वेळी निर्मिती हे त्यांचे एक कार्य. दुसऱ्या कार्यात स्रावनिर्मितीचा म्हणजे हार्मोनचा सहभाग असतो. पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे जननेंद्रियांची वाढ, दुय्यम लैंगिक लक्षणे म्हणजे दाढी मिशा उगवणे, आवाज फुटणे, स्नायूंचा भरदारपणा यात पूर्णता येते. स्त्रियांच्या राज:पिंडातून इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे दोन स्राव स्रवतात. त्यामुळे मासिक पाळी सुरू होते. स्तनांची व नितंबाची गोलाई वाढते, जननेंद्रियांचा आकार पुरेसा वाढतो. गर्भधारणा, गर्भाची वाढ, दूध पुरेसे येणे व गर्भधारणेच्या काळातील अन्य शारीरिक बदल यांवरही याच हार्मोन्सचे नियंत्रण राहते.वयोमानानुसार लैंगिक ग्रंथींचे कार्य मंदावते. स्त्रियांमध्ये पन्नाशीनंतर, तर पुरुषात सत्तरीनंतर या ग्रंथी थकून जातात. त्याप्रमाणे स्त्रियांत रजोनिवृत्ती व पुरुषांत लैंगिक शैथल्य जाणवू लागते. मात्र जीवनाच्या अंतापर्यंत अन्य नलिकाविरहित ग्रंथी कार्यरत असतात. नलिकाविरहित ग्रंथींच्या कार्यकारणभावावर व त्यातील रोगांच्या उपचारांबद्दल आता खूपच प्रगती झाली असली, तरी प्रतिबंधक उपाय फारसे ज्ञात नाहीत.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चांगले हस्ताक्षर हा चांगल्या शिक्षणाचा आरसा आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म केव्हा झाला ?२) केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या शहराने पटकावला ?३) महाराष्ट्रात शासकीय कार्यालयातील अभिवादन दूरध्वनी संभाषणाच्या सुरुवातीस कोणत्या दोन शब्दांनी व्हावे, या अभियानाचा प्रारंभ केव्हा व कोणाच्या हस्ते झाला ?४) 'भारताचा विंड मॅन' असे कोणाला म्हटले जाते ?५) ५ ऑक्टोबर २०२२ ला कितवा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) १३ ऑक्टोबर १८३३ २) इंदौर, मध्यप्रदेश ३) वंदे मातरम्, २ ऑक्टोबर २०२२, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४) तुलसी तांती ५) ६६ वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागोराव कमलाकर● शिवलिंग बेंडके● अजय त्रिभुवन● योगेश चंबोले● किशोर यमेवार● शैलेश शहा● नरेश पत्राळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मोगरा' साक्षात ईश्वराची निर्मिती. मोगऱ्यासारखं फुल म्हणजे ईश्वराने आपल्यावर केलेलं भरभरून प्रेमच जणू.. या मोगऱ्याचे किती वर्णन करावे... मोगरा म्हणजे प्रेम. त्याचा दरवळ म्हणजे आत्मानुभूती. निसर्गाचं सुगंधी वाण. मोगरा फक्त देणं जाणतो. दुसऱ्या फुलांना लाभलेले नेत्रसुखद रंग याला लाभले नसले म्हणून काय झालं? मनमोहक, स्वर्गीय असं सुगंधाचं लेणं याला लाभलेलं आहे, जे तो स्वतःकडे न ठेवता सगळ्यांना मुक्तहस्ते वाटत असतो. त्याला फक्त सुगंधीत होणं कळतं. त्याचा शुभ्र रंग आपल्याला संमोहित करतो. तरी रंगापेक्षाही गंधाकडेच आपण वळतो. म्हणजे काय रंग महत्वाचा, पण गंध त्याहूनही अधिक महत्वाचा...वरवरचं उथळ असं काहीही फार काळ टिकत नाही.**आपणही होऊ या नं मोगरा. कशाला हवाय बाह्य रंगाढंगाचा हेवा. करू या उधळण आपल्यातील गुणांची, हृदयात असलेल्या मायेची नं प्रेमाची, आपुलकीची अन माणुसकीची. आत्ममग्नता बाजूला सारून वाहू देऊ प्रेमाचा झरा. बरसू दे.. आत्मीयतेच्या धारा, दरवळू दे आसमंत सारा एकमेकांच्या सोबतीने. सुगंध देऊ या अन घेऊ या. आपली मनातील सद्-भावना सतत इतरांना जाणवू दे. आपल्यातील गोडव्याने भवताल चिंब चिंब होऊ दे, तुम्ही आणि मी सारेच होऊयात ना 'मोगरा !'* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे परीसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे सज्जनांच्या सहवासाने दुर्जन माणसांत असणारे वाईट गुण देखील हळूहळू लोप पावायला लागतात आणि चांगले गुण अंगी शिरुन तोदेखील सज्जन व्हायला लागतो.आपणच ठरवायचे की कुणाच्या सहवासात राहायचे आणि कुणाच्या नाही ? कुणाच्या सहवासात राहिल्याने आपले कल्याण होईल आणि जीवन कृतार्थ होईल याचा विचार करायला हवा.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव स्वत्वाची*एका जंगलात एक वाघाचे पिल्लू लहान असतानाच त्याच्या आईपासून व वाघाच्या समुदायातून दुरावते. रस्ता चुकल्यावर ते इकडे तिकडे फिरत असताना त्याला एक बकऱ्यांचा कळप दिसतो. ते त्या कळपामध्ये सामील होते. बकऱ्यांच्या कळपात बराच काळ वाघाचे पिल्लू राहते व त्याचे सर्व आचरण हे बकऱ्यासारखे होते.ते ना गर्जना करते किंवा धाडसी कृत्यही करीत नव्हते. कारण वाघांसोबत न राहिल्याने आपल्या जमातीतील प्राणी कसे वागतात याचे त्याला ज्ञान नव्हते. एके दिवशी बकऱ्या चरत असताना एक वाघ त्यांना पाहतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. सगळ्या बक-या शांतपणे चरत आहेत आणि त्यांच्या बरोबर एक वाघाचे पिल्लू पण हिंडत आहे. बकऱ्याना त्या पिल्लाची भीती वाटत नाही म्हणजेच ते पिल्लू त्यांच्यात वाढलेले आहे हे त्याच्या लक्षात येते. तो वाघ त्या बकऱ्याजवळ जातो आणि गर्जना करतो, त्याबरोबर जीवाच्या भीतीने सगळा कळप पळायला सुरुवात करतो तसे ते वाघाचे पिल्लू पण पळायला सुरुवात करते, पण मोठा वाघ त्याला अडवतो आणि म्हणतो," अरे! मी गर्जना केल्याबरोबर बकऱ्या पळाल्या हे ठीक आहे. पण तू का पळत आहेस? आणि माझ्या गर्जनेला तू प्रत्युत्तर न देता म्याव म्याव का ओरडत आहेस? बकऱ्या पळून जाणे साहजिक आहे पण मी थांब म्हंटल्यावर तू थांबला याचा अर्थ तुझ्यात कुठेतरी वाघ जिवंत आहे. तू बकरी नाही याचा पुरावा मी तुला देतो " असे म्हणून मोठा वाघ पिल्लाला घेवून पाण्याजवळ जातो तेथे त्याचे प्रतिबिंब दाखवून त्याला त्याच्यातील वाघ असण्याची जाणीव करून देतो. पिल्लाला आपल्या स्वत्वाची जाणीव होते व ते आपल्या वाघांच्या समुहात राहायला जाते.*तात्पर्य-स्वत्वाची जाणीव होणे हि मोठी गोष्ट आहे.आपण आपल्यातील आपल्याला जोपर्यंत ओळखत नाहीत तोपर्यंत आपली अवस्था वाघाच्या पिल्लाप्रमाणे राहते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/10/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१८७१ - भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स ॲक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले. हा कायदा १९४९मध्ये रद्द केला गेला.◆१९८८ - जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गिनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.◆१९९९ - परवेझ मुशर्रफने मियाँ नवाझ शरीफचे सरकार उलथवून पाकिस्तानची सत्ता हस्तगत केली.💥 जन्म :-◆१९११ - विजय मर्चंट, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆१९४६ - अशोक मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆१९६७ - राम मनोहर लोहिया, भारतीय नेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उज्जैन मध्ये महाकाल कॉरिडोरचं उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *लोकसंख्या नियंत्रणासाठी सक्ती करावी लागेल, समान नागरी कायद्याची आवश्यकता - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *देशातील आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसचे अध्यक्ष रवी कुमार एस. यांनी दिला आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपुरात लवकरच होणार ड्रोनद्वारे पोस्टाची डाक पार्सल सेवा, यापूर्वी केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार गुजरातमधील भूज तालुक्यात हा प्रयोग करण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *चिपळून तालुक्यातील डेरवण येथे 13 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेला होणार सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *विदर्भ- कोकण कन्या ठरल्या चॅम्पियन : योगासनात महाराष्ट्र महिला संघाला सुवर्ण; आर्टिस्टिक सांघिक गटात महिला संघ अव्वल*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा वर्ल्ड रेकॉर्ड... दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, सामन्यासह मालिका जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *शालेय संस्कार प्रार्थना*🎖️•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Hwc8KjFmFnY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद*📱9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपली कामे आणि आपण*मुलांनो, एखाद्या वेळी घरात आई किंवा बहीण नसेल तर आपली पंचाईत होते. जेवण करायचे असेल किंवा घरातील साफसफाईचा प्रश्न असेल, आपण सर्वस्वी आई किंवा बहिणीवर अवलंबून असतो. त्यामुळे आपणावर तसा प्रसंग ओढावतो. ज्यावेळी घरात वडील किंवा भाऊ नसतो, त्यावेळी तशीच काहीशी पंचाईत मुलींच्या बाबतीत सुध्दा घडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामाची विभागणी करून घेते. त्यामुळे असा प्रसंग निर्माण होऊ शकतो. त्यास्तव कामाची विभागणी न करता प्रत्येक व्यक्तीने सर्वच कामे करायला शिकणे अत्यंत महत्वाचे आहे. घरात झाडू मारणे, भांडे घासणे, कपडे धुणे, भाजी निवडणे, दळण आणणे, स्वयंपाक करणे ही कामे आई किंवा बहिणीनेच करावीत असा काही लिखित नियम नाही. ही कामे मुलांनी स्वतःहुन केलीच पाहिजेत तरच भविष्यात जेंव्हा शिक्षणासाठी घर सोडून बाहेरगावी राहण्याचा प्रसंग येतो त्यावेळी केलेल्या या कामाचा अनुभव कामाला येतो. बाजारातून भाजीपाला खरेदी करणे, किराणा सामान आणणे, कपडे इस्त्री करून आणणे, वृत्तपत्र आणणे इत्यादी घराबाहेर करावयाची कामे वडील किंवा भावंडांची कामे मुलींनी वेळ मिळेल तशी आवर्जून करावीत. ही कामे मुलांची आणि ती मुलींची असे कामाचे वर्गीकरण मुळात करूच नये. सकाळी झोपेतून उठल्यावर आई सांगण्याच्या अगोदर अंथरूण, पांघरूण घडी करून व्यवस्थित ठेवणे, जेवायला बसताना निदान स्वतःपुरते तरी ताट, वाटी आणि पाण्याने भरलेला ग्लास घेणे, जेवण संपल्यावर ताट नियोजित धुण्याच्या ठिकाणी ठेवणे, आपली पुस्तके, वह्या, पेन, दप्तर इत्यादी सर्व व्यवस्थित ठेवून घेणे यासारख्या लहानसहान कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली कामे आपणच करायची सवय लहानपणापासून लावून घेणे अत्यावश्यक आहे. यासाठी उदाहरण म्हणू आपल्या सर्वांचे आवडते परमपूज्य साने गुरुजी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र वाचल्यास आपली कामे आपण का करावीत याचे महत्व कळते. समर्थ रामदास स्वामी यांनी तर जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला असा उपदेश दिला आहे. त्यामुळे आज नाही, आतापासूनच आपण आपली कामे करायला सुरुवात करू या.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कॅलेंडरमध्ये रोज एका नक्षत्राचे नाव का लिहिलेले असते ?* 📙जानेवारी महिन्यामध्ये कॅलेंडरचा म्हणजे दिनदर्शिकांचा हंगाम जोरात सुरू असतो. महालक्ष्मी, दाते, कालनिर्णय अशा असंख्य दिनदर्शिका बाजारामध्ये येतात. प्रत्येकाच्या घरामध्ये या दिनदर्शिका भिंतीवर लटकलेल्या असतात. दिनदर्शिकेमधील सण उत्सवाच्या तारखा सोडल्या तर इतर माहितीबाबत सर्वसामान्य लोक अज्ञानी असतात. अर्थात हे काहीजणांच्या फायद्याचंही असतं म्हणा. अहो एवढंच काय, शाळेमध्ये दिनमान सांगण्यासाठी मुले येतात आणि अश्विन शुद्ध शके १९२४ असे काहीतरी म्हणत जातात. सांगणाऱ्या मुलांना या शब्दांचा यत्किंचितही अर्थ समजत नाही, आणि कोणी समजावून सुद्धा देत नाही. शाळेमध्ये असणाऱया फळ्यावर सुद्धा ही माहिती लिहिलेली असते. अहो एवढंच काय वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा हे दिनमान झळकत असतं. दिनदर्शिकेचे महत्त्वाचे काम तारीख समजणे हे आहे. परंतु हल्लीच्या दिनदर्शिकांमध्ये माहितीचा प्रचंड मारा आहे. त्यातील नक्षत्रांसंबंधी माहितीचा वेध घेत या प्रश्नाची सोडवणूक करूया.दिनदर्शिकेमध्ये रोज एक नाव लिहिलेलं असतं. प्रामुख्याने अश्विनी, भरणी, कृतिका, रोहिणी, मृगशीर्ष. . . . ते रेवतीपर्यंत अशी एकूण सत्तावीस नावं लिहिलेली असतात. रेवतीनंतर परत याच क्रमाने पुन्हा एकदा नावांची जंत्री सुरू होते. त्यात अजिबात खंड नसतो. ही नावं कशाची आहेत हे विचारलं तर अचूक उत्तर येतं, ते म्हणजे नक्षत्र ! पण नक्षत्र म्हणजे काय ? असं विचारलं तर मात्र अजिबात सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. नक्षत्र म्हणजे काय ? आणि ती सत्तावीसच का ? याचा परामर्श आता आपण घेणार आहोत. नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची आहे. भारतीयांच्या दृष्टीने चंद्राला फार महत्त्व आहे. रात्रीच्यावेळी आकाशामध्ये चंद्राबरोबरच असंख्य चांदण्यासुद्धा दिसतात. दिवसा सूर्य प्रकाशामुळे चांदण्या गायब होतात. पण त्या असतात एवढं मात्र नक्की. एक गोष्ट विसरू नका की, या चांदण्या म्हणजे प्रचंड मोठे आणि आपल्यापासून खूप दूर असलेले दुसरे सूर्य आहेत. या चांदण्याच्या पार्श्वभूमीवर चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. या फिरण्यामुळे चंद्र रोज जागा बदलतो. चंद्राला पृथ्वीभोवती तीनशे साठ अंशांतून फिरायला सत्तावीस दिवस लागतात. त्यामुळे एका दिवसात तो अंदाजे बारा अंशाने पूर्वेकडे सरकतो. हे गणित करताना पृथ्वीसुद्धा सूर्याभोवती फिरते हे लक्षात घ्याव लागेल. चंद्र आज कोणत्या ठिकाणी आहे हे सांगण्यासाठी भारतीयांनी चंद्राच्या पाठीमागे असणाऱया चांदण्यांचा उपयोग केला. ज्याप्रमाणे शहरातून जाणाऱ्या बसच्या मार्गात विविध स्टॉप असतात. तसंच आकाशातून जाणाऱ्या चंद्राच्या मार्गात सत्तावीस स्टॉप करण्यात आले. हे स्टॉप म्हणजे आकाशातील सत्तावीस भाग. त्या भागांमध्ये या चांदण्या येतात. त्यांना कल्पनेनं जोडून एक काल्पनिक आकृती तयार केली गेली. या आकृतीला भारतीयांनी नक्षत्र हे नाव दिलं. नक्षत्र म्हणजे आकाशातील चांदण्यांचे समूह. हे समूह उघड्या डोळ्यांनी आकाशात दिसतात, फक्त आपण कधीही पाहण्याची तसदी घेतलेली नाही. मनोरंजनाच्या जमान्यामध्ये या चमचमणार्या ठिपक्यांकडे पाहण्यात अजिबात रस वाटत नाही. हो पण एक मात्र विशेष आहे की यावर आधारित कर्मकांडावर प्रचंड विश्वास ठेवण्यात आपणाला काहीही गैर वाटत नाही. थोडक्यात काय तर भारतीयांनी आकाशाचे सत्तावीस भाग केले. त्या भागातील चांदण्याच्या समूहाला नक्षत्र म्हणून संबोधलं. याचा अर्थ चंद्र रोज एका भागामध्ये अर्थात नक्षत्रात असतो. दिनदर्शिकेमध्ये आजच्या तारखेला अश्विनी लिहलेलं असेल, तर आपण समजायचं की आजचा चंद्र अश्विनी नक्षत्रात आहे. म्हणजे काय तर चंद्राच्या आसपासच्या चांदण्या म्हणजे अश्विनी नक्षत्र. किती सोपं आहे हे गणित. अर्थात पुर्वीच्या काळातील मानवाने हे असंख्य निरीक्षणं करून मांडलेले आहे हे विसरून चालणार नाही. त्याच्या निरीक्षणवृत्तीला सलामच केला पाहिजे. समजा आज कॅलेंडरमध्ये पुष्य लिहिलेलं आहे, तर याचा अर्थ असा होतो की आजचा चंद्र पुष्य नक्षत्रात आहे. आणि आज चुकून गुरुवार असेल तर एक फर्स्टक्लास योग येतो. त्याला गुरूपुष्यामृतयोग म्हणतात. सदर दिवशी पेपरमधून हमखास जाहीर होते 'सोने खरेदीचा भाग्याचा दिवस'. आता मला सांगा, तीस हजार रुपये तोळे सोने खरेदी करून कोणाचं भाग्य उदयाला येणार ? सोनाराचं की घेणाऱ्याचं !जवळपास तीन लाख चौर्‍यांशी हजार किलोमीटर अंतरावरील चंद्र, पाचशे वीस प्रकाशवर्ष अंतरावरील पुष्य नक्षत्र, आठवड्यातील एक दिवस गुरुवार, खाणीतून काढलेलं सोनं, ते विकणारा सोनार, विकत घेणारी व्यक्ती आणि तिचं भाग्य. याचा काही संबंध ? अर्थात विचार केला तरच असली अतार्किक मांडणी समजू शकते. अशा प्रकारची मांडणी व्यक्तीचा आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी, शिक्षण, वैचारिक प्रगल्भता यांना छेद देते एवढं मात्र निश्चित.*डाॅ. नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'सिम्बॉल ऑफ नॉलेज' अशी ओळख कोणत्या महापुरुषांची आहे ?२) केंद्राच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला ?३) *सांची स्तूप कोणत्या राज्यात आहे ?* ४) 'इंडिया मोबाईल काँग्रेस २०२२' मध्ये देशातील ५ जी दूरसंचार सेवेचा प्रारंभ केव्हा व कोणी केला ?५) 'जागतिक पशुदिन' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) डॉ. बाबासाहेब आंबेडकर २) मध्यप्रदेश ३) मध्यप्रदेश ४) १ ऑक्टोबर २०२२, पंतप्रधान नरेंद्र मोदी ५) ४ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संपन्न कुलकर्णी● अमित शिंदे● जगन कुलवंत● जरावाड सायारेड्डी● अशोक हाक्के● बालाजी लक्ष्मणराव सातपुते● संतोष शातलवार● माधवराव धुप्पे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अन्याय्य मार्गाने मिळवलेला पैसा स्वत:च्या आणि परिवाराच्या अध:पतनास कारणीभूत होतो. कितीही प्रयत्न केले तरी असला पैसा व्यक्तीला वाममार्गालाच नेतो. अनैतिक वर्तणूकीने काही काळ यशस्वी होत असल्याचा भास निर्माण झाला तरी पापाचे भूत पिच्छा सोडत नाही. पैसा मिळवू नये असे नाही. पैसा हे मानवाचे सहावे इंद्रिय आहे. त्याच्याशिवाय मूळही पाच इंद्रिय काम करणार नाहीत हे खरे आहे. प्रश्न पैसे मिळविण्याचा नाही, किती मिळवायचा हा आहे. जो पैसा मिळविताना माणुसकीची सारी तत्वे पायदळी तुडविली जातात आणि ज्या पैशाचा विनियोग माणसाच्या खरेदी-विक्रीत होतो, त्या पैशाला काय अर्थ आहे?**ज्याप्रमाणे पैसा औषध विकत घेऊ शकतो; पण आरोग्य विकत घेऊ शकत नाही. पैसा सेवा विकत घेऊ शकला तरी माणूस विकत घेऊ शकत नाही. गैरमार्गाने आलेल्या संपत्तीला गैरमार्गाने जाण्यासाठीच पाय फुटतील ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शेकडो वर्ष उलटली तरी आपण व्यास, वाल्मिकींना विसरलो नाही. राजघराण्यात जन्मल्यामुळे नव्हे, तर राजघराण्याचा त्याग केल्यामुळे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांची नावे घेतली जातात. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, कबीर यांची नावे प्रात:स्मरणीय झाली आहेत ती त्यांनी सांगितलेल्या माणुसकीच्या धर्मामुळे. आपले नाव जनतेच्या जीभेवर असावे असे वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी पैशांबरोबर आत्मियतेची गरज आहे.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥* ●•• 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माणूस देहयष्टीने कसा आहे हे आपणास त्यांच्याकडे पाहिल्यावर लगेच समजते. त्याच्या सानिध्यात राहायची गरजच नाही, परंतु त्याचा स्वभाव कसा आहे हे जर पाहायचे झाले तर त्याच्या सान्निध्यात राहिल्याशिवाय समजत नाही. जेव्हा आपण इतरांशी संबंध ठेवतो तेव्हा काही काळ त्यांच्या संपर्कात राहून ठरवतो. त्याचे आणि आपले जर का संवादातून जमले तर पुढचे पाऊल टाकतो अन्यथा त्याच्याशी संबंध ठेवावे का नाही हा विचार करून ठरवतो.चांगले संबंध ठेवायचे ठेवायचे असतील तर त्यांच्या देहयष्टीकडे न पाहता स्वभावाकडे पाहावे आणि मगच संबंध जोडावे तरच दोघांचेही जीवनव्यवहार चांगल्या प्रकारे पार पडतील.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल*बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारलेपंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 11/10/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-*आंतरराष्ट्रीय मुलगी दिन*💥 जन्म :-◆ १९४२ - अमिताभ बच्चन, भारतीय अभिनेता.💥 मृत्यू :-◆ १९६८ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये, उच्च संस्थांमध्ये हिंदीचा वापर बंधनकारक करा, इंग्रजी भाषा पर्यायी ठेवा; अमित शाह समितीची शिफारस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *स्टॉकहोम: यंदाच्या अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, बेन बर्नानके, डगलस डायमंड आणि फिलिप डायविग या अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना हा पुरस्कार जाहीर.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पिकाचं नुकसान, शेतकरी हवालदिल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आपल्याच विभागाकडे दुर्लक्ष; एक लाख विद्यार्थी 9 महिन्यांपासून विद्यावेतनापासून वंचित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असं नाव वापरण्यास परवानगी दिलेली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळालेलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नवी दिल्ली: समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन, ते ८२ वर्षांचे होते. *•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसी प्लेअर ऑफ दि मंथ पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली हरमनप्रीत कौर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*friut basket👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/y-VbWtmOi5E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति क्रोध करू नये*https://nasayeotikar.blogspot.comमुलांनो, आज आपण ज्याविषयी चर्चा करणार आहोत ते म्हणजे क्रोध. क्रोध म्हणजे राग किंवा संताप. एखादी मागितलेली वस्तू तुम्हाला जर पटकन मिळाली नाही तर लगेच तुम्हाला राग येतो. हवी असलेली वस्तू मिळविण्यासाठी कधीकधी रुसून बसता, तर कधी मौनव्रत धारण करून आई बाबांना भंडावून सोडता. काही मुले तर याहीपुढे जाऊन घरातील वस्तूची आदळआपट करून आपला राग व्यक्त करतात. क्रोध ही दुर्बलतेची निशाणी आहे असे दयानंद सरस्वती म्हणतात. त्यामुळे आपण क्रोधावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. आपणाला लहानसहान गोष्टीवरून सुद्धा राग निर्माण होतो. जसे की टीव्हीवर कार्टूनचा वा इतर तुमच्या आवडीचा चांगला कार्यक्रम चालू असेल आणि आई-बाबा किंवा ताई दादांनी टिव्ही बंद केला की लगेच तुम्हाला राग येतो. खेळ रंगात येत असताना तुमचा खेळ बंद करून अभ्यासाचा तगादा लावला की राग येतो. कारण हे सर्व तुमच्या मनाविरुद्ध होते, म्हणूनच तुम्हाला राग येतो. त्याच प्रकारे आई-बाबांनी सांगितलेली बाब जर तुम्ही पूर्ण केली नाही तर त्यांनासुद्धा राग येतो की नाही ! गुरुजींनी सांगितलेला अभ्यास वा स्वाध्याय पूर्ण केला नाही तर त्यांनासुद्धा राग येतोच ना ! तुमच्यासारखेच आई बाबा व गुरुजी यांच्या मनाविरुद्ध काही घडल्यास त्यांनाही राग येतच असतो. त्यासाठी त्यांनी आपल्यावर रागावू नये आणि आपण त्यांच्याविरुद्ध राग निर्माण करून घेऊ नये असे जर वागलो तर जरूर याचा एकदा विचार केल्यास एकमेकांबद्दल राग ऐवजी प्रेम, लोभ, माया, ममता निर्माण होईल. त्याच्याऐवजी आपण आपली मनाची वेदना, मनातील दुःख स्पष्टपणे त्यांना सांगावे. असे जर केले नाही तर मनात अजून अधिक राग निर्माण होतो असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे. कधीकधी आपला क्रोध एवढ्या टोकाला जातो की त्यापासून काही नुकसान सुद्धा होते जॉन वेबस्टर म्हणतात की निसर्गामध्ये क्रोध हीच एकमेव गोष्ट अशी आहे की जी माणसाला पशु बनविते, विकृत करते. त्यामुळे आपल्या मनात राग निर्माण करायचा नाही, असा ठाम निर्णय करावा. समर्थ रामदास स्वामी यांचे श्लोक नेहमी स्मरणात ठेवावेत. ते श्लोक म्हणजे ' अति क्रोध करू नये । जिवलगास खेदू नये । मनी वीट मानू नये। सिकवणेचा ।।रागाने कधीही कुणाचे भले झाले नाही✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया whatsapp द्वारे वरील क्रमांकावर कळवावे•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*निंदकाचे घर असावे शेजारी - संत तुकाराम*असे तुकोबारायांनी म्हटले आहे. संत तुकारामांचे हे म्हणणे अगदी खरे आहे, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हणतात. मग ही स्त्री आई, पत्नी, बहीण, मैत्रीण, सहचरीण किंवा सेक्रेटरीच्या रूपातसुद्धा असू शकेल. त्या जर "सकारात्मक टीकाकार' असतील तर त्या पुरुषाची चांगली प्रगती होते."लोकांच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही' अशी मराठीमध्ये म्हण आहे. याचा अर्थ आपल्याला आपल्यातील मोठे मोठे दोषसुद्धा दिसत नाहीत, पण इतरांच्यातील बारीक बारीक दोषसुद्धा दिसत असतात. कुसळ म्हणजे बारीक काटा, तो डोळ्यात गेला तर धोकादायकच असतो. तो वेळेवर काढला नाही तर डोळ्याला इजा होऊ शकते किंवा डोळा जाऊ पण शकतो. पण, आपल्या टीकाकारांनी आपल्या डोळ्यातील हे कुसळ शोधून काढले, याबद्दल खरे तर त्यांचे आभारच मानायला हवेत. आपल्यावर होणाऱ्या टीकेकडे व विरोधाकडे अशा प्रकारच्या "सकारात्मक' नजरेने पाहिले तर आपली खूप प्रगती होणे शक्‍य आहे.आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्या आजूबाजूला टीकाकार किंवा विरोधक असणे आवश्‍यक आहे. त्यांच्या टीकेकडे किंवा विरोधाकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्यालाच आपल्यातील अनेक दोष किंवा उणिवा सापडतील व त्यावर योग्य ती उपाययोजना वेळीच करता येईल.म्हणूनच *"निंदकाचे घर असावे शेजारी'!* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" महान कारागीर हा काम सोपे करणारा असतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर होण्याचा मान कोणत्या शहराने पटकावला ?२) भारतात सद्यःस्थितीला वाघांची संख्या किती आहे ?३) भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोणाला मानले जाते ?४) इंग्रजांनी दक्षिण भारतातील आपली पहिली बखार/वखार इ. स. १६११ मध्ये कोठे स्थापन केली होती ?५) 'आंतरराष्ट्रीय संगीत दिवस' केव्हा साजरे केले जाते ?*उत्तरे :-* १) इंदौर शहर, मध्यप्रदेश २) २९६७ वाघ ( महाराष्ट्र - ४०० वाघ ) ३) एटर्नी जनरल / महान्यायवादी ४) मच्छलीपट्टणम ५) १ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● बाबाराव पाटील कदम● चंद्रकांत पाटील पांगरीकर ● रवीकुमार सितावार● प्रवीण वाघमारे● विजय केंद्रे● सुमीत बोधने● दिनेश करपे● अजय वाघमारे● संदीप बोंबले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस निसर्गाच्या हातातील बाहुलं असला तरी माणसाचं शरीर ही निसर्गाची अद्भुत रचना आहे. विज्ञान युगातही अशी अद्भुत रचना तयार करता आलेली नाही. शरीर एक विशाल प्रयोगशाळेसमान असले तरी. निरोगी शरीर हेच पहिलं सुख. त्यातच निरोगी विचार वास्तव्य करतात. ते जीवनभर प्रभाव टाकतात. अशक्य ते शक्य करण्याचा चमत्कार घडवू शकतात. सकारात्मक विचारांच्या उर्जेची ताकद तुमच्या विचारात आणि विश्वासात इतका बदल घडवते की, त्यामुळे जीवनाला वेगळी दिशा मिळते. जीवनात खरे सुख, शांती आणि स्वास्थ्याची गती लाभते. मानसिक अवस्था व आत्मिक स्थिती पवित्र होते, त्यामुळे जीवनही आपोआप उन्नत होत जाते.**शरीर दोन गोष्टींमुळे कमजोर होते. एक आधिक आराम आणि दुसरी पराकोटीची चिंता. 'जान है तो जहाँ है' असे उगीचच म्हणत नाहीत. जीवनात पद, प्रतिष्ठा महत्वाची आहेच; परंतु त्यापेक्षा महत्वाचं शरीर. आपलं महत्व तोपर्यंतच, जोवर शरीर तंदुरुस्त आहे. भगवान गौतम बुद्धांनी म्हटलयं, 'आपलं शरीर आरोग्यपूर्ण ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्याचं पालन केलं नाहीतर बुद्धि सतेज कशी राहील आणि मोक्षाच्या अंतिम ध्येयाप्रत आपण कसे पोहचणार? सर्व अवयवांवर माणसाचे नियंत्रण असते. तेव्हा स्वास्थ्यही त्याच्या हातात असते. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा हवी. ती ठेवून कार्यरत राहिलं तरच शरीर आणि मनस्वास्थ्य राखता येईल.* ••● *॥ रामकृष्णहरी॥*●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमच्या चेहऱ्यावर दिसणारी एक स्मित हास्याची छटा दुःखी आणि उदास असणा-या माणसाला खूप काही विसरून जाण्यासाठी प्रेरणा देऊन जाते. तुमच्या एका आनंदी जीवनाचे रहस्य त्याला उलगडायला लावते.तुमच्या आनंदी जीवनाचे रहस्य नक्कीच विचार करायला लावते. तुमच्याकडे पाहून तो स्वत:शीच म्हणायला लागतो की, हा माणूस अनेक कामांत व्यस्त असूनही कसलाही आणि कुठलाही ताण न घेता आनंदी राहतो आणि नेहमी पहावे तेव्हा यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य कसे दिसते ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी तो स्वत: नक्कीच विचार करायला लागतो.ताणतणाव हे कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येकाला असतातच, पण उदास आणि तोंड खाली पडून राहिल्याने कमी होणार आहेत का ? नाही ना ? उलट जास्त मानसिक तणाव निर्माण होऊन आपल्या जीवनाला अधिक दुःखात टाकल्यासारखेच आहे.मग त्यापेक्षा काम करत करत हसत रहायचे आणि हसत हसत काम करत रहायचे. अशा जीवन शैलीने जगत राहिलो तर आपल्याही चेहऱ्यावर स्मित हास्य फुलल्यावाचून राहणार नाही.तुमच्या चेहऱ्यावरच्या एका स्मित हास्याने तुम्ही ही आनंदीत रहालच आणि इतरांनाही आनंदीत राहण्यासाठी प्रेरणा द्याल हे नक्कीच.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३😟😕🙁😕🙁😟😂🤣😂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण*प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 10/10/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १८७१ - अंदाजे ९ चौरस किमी क्षेत्र व्यापून दोन दिवस चालणारी शिकागोची आग आटोक्यात आली.★ १९१३ - पनामा कालव्यावर (नकाशा चित्रित) मोठे बांधकाम पूर्ण झाले.★ १९७० - युनायटेड किंग्डमपासून फिजीला स्वातंत्र्य मिळाले.💥 जन्म :-★ १८३० - इसाबेला दुसरी, स्पेनची राणी.★ १९०२ - आर.के. नारायण, भारतीय लेखक★ १९५४ - रेखा, भारतीय चित्रपट अभिनेत्री💥 मृत्यू :-★ ८२७ - पोप व्हॅलेन्टाइन★ १९६४ - गुरुदत्त, भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माते★ २००० - सिरिमावो भंडारनायके, श्रीलंकेची पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय घेत शिवसेना पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण गोठवले, तसेच शिवसेना हे नाव शिंदे आणि ठाकरे गटाला वापरता येणार नाही, असा निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोल्हापूर जिल्ह्यातील नोव्‍हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणाऱ्या 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *विदेशी गुंतवणूकदारांकडून ऑक्टोबरमध्ये 2,400 कोटींचा व्यवहार, मार्केट स्थिर राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज *•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारतीय हवाई दलाची नवीन वेपन सिस्टिम ब्रांच, 3400 कोटी रुपयांची होणार बचत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अल्पसंख्यांक समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळायला हवा तेवढा वाटा मिळत नाही: शरद पवार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *त्र्यंबकेश्वरचे आनंद आखाड्याचे प्रमुख सागरानंद सरस्वतींचे निधन, मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *श्रेयसचं दमदार शतक, ईशानची तुफान खेळी, भारताचा आफ्रिकेवर 7 गडी राखून विजय, मालिकेत 1-1 ची बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Occupation व्यवसाय ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9mamp5qoB9o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आराम हराम है*https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/10.htmlमुलांनो खुप काम किंवा अभ्यास केल्यानंतर थकवा येतो आणि थकवा घालविण्यासाठी आपण आपल्या मनाला कोणत्या तरी विरंगुळ्यात टाकतो, लगेच मन प्रसन्न होते. जे काहीच काम करीत नाहीत त्यांना थकवा कसा येईल ? थकवा आलाच नाही तर विरंगुळ्याचा प्रश्नच नसतो. काम न करणाऱ्या माणसाला आळशी म्हटले जाते. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे गौतम बुध्दांनी म्हटले आहे. त्यास्तव नेहमी कामात व्यस्त रहावे व त्यास परममित्र करावे. प्रसिध्द विचारवंत रस्किन म्हणतो की, परिश्रमातून, कष्टातून आनंद निर्माण होत असतो, क्रोधातून किंवा आळसातून नव्हे. सतत कामात राहिल्याने मनुष्या चे जीवन सुखी बनते. कधीकधी आपणास शाळेला जाण्याचा, अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. म्हणजे थोडक्यात आपण त्या बाबतीत आळस करतो आणि तसा आळस केला की त्या दिवशीचा सर्व भार दुसऱ्या दिवसावर येऊन पडतो. मग आपले काम दुप्पटीने वाढते. म्हणूनच संत कबीर म्हणतात की," कल करे सो आज कर और आज करे सो अब " त्यांचे काव्य ध्यानीमनी ठेवल्यास आपल्या मनात कधीच आळस येणार नाही. आळस घालविण्यासाठी आपल्याकडे विरंगुळ्याची भरपूर साधने उपलब्ध आहेत. त्याचा यथायोग्य वापर करता येणे महत्वाचे आहे. गोष्टीचे पुस्तक वाचणे, शब्दकोडी सोडविणे, चित्रे रंगविणे, मित्रांसोबत खेळणे, व गप्पा मारणे, इत्यादी क्रियाद्वारे आपण आपला आळस घालवू शकतो. मात्र मुख्य काम बाजूला ठेवून विरंगुळ्याचेच काम करीत बसलो तर ते डोईजड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केला की, तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा असे कोकिवल यांनी म्हटले आहे.त्यामुळे ' दे रे हरी पलंगावरी ' अशी अवस्था आपली कधीच होणार नाही, याची काळजी घ्यावी. सतत कामात व्यस्त राहिल्यामुळे आपणाला नवनवीन कामे, कल्पना सुचतात. नविन गोष्टी कळत राहतात आणि प्रगती होत राहते. आळस केला तर मात्र जेथे आहोत त्यापेक्षाही अधोगतीला जातो. वाहत्या नदीचे पाणी स्वच्छ, निर्मळ व छान वाटते, तर साचलेले किंवा थांबलेले पाणी अस्वच्छ आणि घाण वाटते तसेच त्या पाण्याची दुर्गंधी देखील येते. नित्य कामात राहणे म्हणजे नदीच्या वाहत्या पाण्यासारखे आहे, तर आळस म्हणजे साचलेले पाणी होय. त्यामुळेच आपण मुलांनी पंडीत जवाहरलाल नेहरू म्हणजेच आपल्या मुलांचे चाचा नेहरू यांचे ' आराम हराम है ' हे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आंधळे लोक कसे परीक्षा देतात ?* 📙अंध व्यक्ती आजकाल उच्च शिक्षण घेताना आपल्याला दिसतात. पूर्वी मात्र ते शक्य नव्हते. कारण बघता येत नसल्याने अंध लोकांना ज्ञानाची सर्वा दालने बंद होती. सहाजिकच त्यांच्या जीवनात खर्या अर्थाने अंधार होता. अंध व्यक्ती दुसऱयांच्या उपकारावर, सहानुभूतीवर अवलंबून होत्या. त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवायला, स्वतःच्या पायावर उभे राहायला संधी मिळत नव्हती. ब्रेलच्या संशोधनामुळे मात्र अंधांच्या जीवनात आशेच्या किरणांनी शिरकाव केला. अंध व्यक्तीचे स्पर्शज्ञान खूपच चांगले असते. या स्पर्श ज्ञानाच्या कौशल्याचा वापरच ब्रेल लिपीत केला जातो. यात प्रत्येक अक्षर हे कागदावर उंचवट्याच्या (सुई टोचून केलेल्या) स्वरूपात लिहिले जाते. या उंचवट्यांची संख्या, रचना स्पर्शाने लक्षात घेऊन अंधांना अक्षर ओळख करून घेता येते. याला ब्रेल लिपी असे म्हणतात. ब्रेल लिपीत लिहिलेल्या पुस्तकांच्या साहाय्याने अंधांना ज्ञानाच्या विविध दालनात प्रवेश करणे शक्य झाले आहे. त्यामुळेच आता आपल्याला पदवी वा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अंध व्यक्ती दिसतात.अंध व्यक्तींना सहानुभूती वा दयेपेक्षा संधी मिळण्याची गरज आहे. त्यांची गुणवत्ता व कौशल्य वाढवण्याचे काम ब्रेल लिपीने केलेले आहे. साहजिकच अंध लोक इतरांच्या बरोबरीने विकास साधू शकत आहेत. ब्रेल लिपीच्या आधारेच अंध व्यक्ती परीक्षा देतात. अशी ही ब्रेल लिपी जणू अंधांसाठी वरदानच ठरली आहे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५० *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विचार न करता वाचन म्हणजे न पचवता खात सुटणे ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कोणत्या पक्ष्यास 'माळरानाचा सम्राट' असे म्हटल्या जाते ?२) भारतातील पहिले टपाल कार्यालय केव्हा सुरू झाले ?३) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटबंधीचा निर्णय केव्हा जाहीर केला ?४) इंग्रजांनी आपली भारतातील पहिली वखार कोठे स्थापन केली होती ?५) 'जागतिक हृदय दिन' कधी साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) माळढोक २) १८३७ ३) ८ नोव्हेंबर २०१६ ४) सुरत ५) २९ सप्टेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ राजेश्वर भुरे◆ संतोष खेडकर◆ राजेंद्र वाघमारे◆ श्याम देसाई◆ विशाल अन्नमवार◆ पोतन्ना चंदेवाड◆ सतीश बोधनकर◆ सतीश बड्डेवाड◆गंगाधर पापुलवार◆ गोविंद पाटील◆ विठ्ठल धुलेवार◆ कैलास सांगवीकर◆ प्रभू पाटील कदम◆ शरद घुबे◆ प्रमोद यादव◆ श्रीकांत पाटील शिंदे◆ तानाजी पाटील◆ शंकर बत्तीनवार◆ तुकाराम डोळे◆ राम गायकवाड◆ विनोद लोने◆ वसंत पाटील कदम◆ अरुण शंखपाळे◆ रोहित हिवरेकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.**माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••●‼ *रामकृष्णहरी*‼●••🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••देह शुद्ध करण्यासाठी स्नान करावे लागते,मन शुद्ध करण्यासाठी देवाचे किंवा आदर्श अशा संतांचे आणि महापुरुषांचे नामस्मरण करावे लागते तर चांगले विचार करण्यासाठी चांगल्या ग्रंथांतील आदर्श नीतीमूल्ये, विचार यांचे अनुकरण आणि जीवनास प्रेरणा देणा-या पुस्तकांच्या सहवासात रहावे लागेल तरच आपल्या जीवनास परिपूर्ण आकार मिळू शकतो.अन्यथा आपल्या मानवीजन्माला अर्थच राहणार नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हारजीत*एका महाविद्यालयात संजय नावाचा एक विद्यार्थी शिक्षण घेत होता. अभ्यासाबरोबरच तो खेळातही प्रवीण होता. तो एक उत्कृष्ट नेमबाज होता. चांगले गुण व विनम्रता यामुळे तो शिक्षकांमधेही प्रिय होता. एकदा महाविद्यालयात वार्षिक महोत्सव होता. यात नेमबाजीचीहि स्पर्धा ठेवण्यात आली होती. इतर ठिकाणाहूनही अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. प्राचार्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी परिचय करून घेताना दुसऱ्या महाविद्यालयातील गणेश नावाचा एक विद्यार्थी प्राचार्यांना मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला,"सर! मी संजयपेक्षाही जास्त अचूकतेने नेम साधू शकतो. संजयला पराजित करणे हे माझे उद्दिष्ट आहे." प्राचार्य मंदसे हसले आणि पुढे गेले, कारण त्यांना माहित होते कि संजयला हरवणे इतके सोपे काम नाही. स्पर्धा सुरु झाली. स्पर्धेचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. एका धाग्याला एक लाकडी फळ बांधले होते, त्याचा वेध नेमबाजांनी घ्यायचा होता. सर्व नेमबाजांनी प्रयत्न करून पाहिले पण त्यांना यश मिळाले नाही. फक्त गणेश आणि संजय हे दोघेच मुख्य प्रतिस्पर्धी उरले. गणेशने यावेळी पुढाकार घेतला. त्याने पहिला नेम साधला तो अचूकपणे, दुसरा नेम त्याचा हुकला आणि तिसराही नेम योग्य पद्धतीने साधला. आता संजयची वेळ होती. संजय नेमबाजीला उभारला कि मुलांनी त्याला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. संजयने पहिला नेम मारला तो चुकला, दुसरा मारला तोही चुकला आणि तिसराही नेम त्याला मारता आला नाही. संजय पराजित झाला. सारी मुले, शिक्षक हिरमुसले झाले. संजय प्रथमच पराजित झाला होता. प्राचार्यांना व शिक्षकांना संजय हरला यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला एकटे बोलावून घेतले. अनेकांनी त्याला विचारले पण तो काही सांगायला तयार होईना. शेवटी प्राचार्यांनी त्याच्यावर दबाव टाकला तेंव्हा त्याने सांगितले,"सर ! गणेशला मी बाहेर त्याच्या मित्रांबरोबर बोलताना ऐकले कि त्याची परिस्थिती खूप गरिबीची आहे या पुरस्काराच्या रकमेतून त्याची फी तो भरणार आहे. मी या गोष्टीची अनेक मित्रांकडून खात्री केली. सर माझ्या हरण्याने जर कुणाचे आयुष्याचे कल्याण होत असेल तर मी कायम हरायला तयार आहे. सर माफ करा यामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला पण त्यातून एका विद्यार्थ्याचे आयुष्य उभारेल याचे मला समाधान आहे." या त्याच्या बोलण्याने सर्वच उपस्थित असणाऱ्यांनी टाळ्या वाजवल्या व प्राचार्यांनी संजयचे एक विशेष गुणवान विद्यार्थी म्हणून अभिनंदन केले.तात्पर्य-आपल्या सदवर्तन करण्याने कुणाचे ना कुणाचे चांगले कसे करता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/10/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★१९१९-महात्मा गांधींनी 'नवजीवन'हे वृत्तपत्र सुरू केले.★१९१२-हेलसिंकी स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.★ ख्रिस्त पूर्व ३७६१-हिब्रू दिनदर्शिकेनुसार जगाचा पहिला दिवस.💥 जन्म :-◆१९०७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक. ◆१९७८ - झहीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९५२-ब्लादिमिर पुतीन ,रशियाचे राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-●१७०८ - गुरू गोबिंद सिंघ, शीख गुरू. ●१९९८-भाऊसाहेब वर्तक,महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *वेल डन इंडिया! कोरोना काळात गरीब देशांना मदतीचा हात, कोरोना महामारीमधील कामामुळे जागतिक स्तरावर भारताचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सणासुदीच्या काळात गव्हाच्या किंमतीत वाढ तर तांदळाच्या किंमती घसरल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *शेवटच्या महिन्यात निधी खर्च करण्याची पद्धत बंद करा, उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला खडसावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई - राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी होणार प्रसिद्ध*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रत्नागिरी जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे याचा परिणाम आता भात शेतीवरती होत आहे. अंतिम टप्प्यात आलेली भात शेती वाया जाण्याची भीती असून काही ठिकाणी पावसाचा तडाख्यामुळे भात शेती जमिनीवर कोसळली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) माजी संचालिका जयश्री पाटील-चुयेकर (वय 78) यांचे निधन झाले. गोकुळचे संस्थापक अध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या त्या पत्नी होत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा नऊ धावानी पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*आकाश कंदील बनवणे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/AkP6No6xxAQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला*प्रसिद्ध विचारवंत टी. एडवर्ड यांच्या मतानुसार, शिक्षण म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत सर्व वातावरणाचा परिणाम, सर्व प्रकारचे शिक्षण, शिस्त आणि संस्कृतीची बेरीज. म्हणूनच आपण आजीवन विद्यार्थी म्हणून जगत असतो. ........... पूर्ण लेख खालील लिंकवर वाचता येईल.https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/32.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संघर्ष*गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात, पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही , चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही, पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत, गरुड भरारी सीमित करतात. अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात. अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे !जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर, गरुड तिसरा पर्याय निवडतो, एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो.एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल? आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची, तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची. नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची !150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो, ताकद आणि अभिमानाने !याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास, सक्रियता आणि कल्पनाशक्ती या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात. आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत !150 दिवस नाही, 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी ! जे शरीराला मनाला चिकटलेले आहे ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ! पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, अनुभवी आणि अनंताकडे झेपावणारी असतील !दररोज काही चिंतन करत रहा, तुम्ही असेएकमेव व्यक्ती आहेत जे स्वतः ला परिपूर्ण ओळखता, आणि तुम्हीच स्वतः मध्ये बदल घडवू शकता, गरज आहे ती लहान लहान गोष्टीतून बदलाची सुरुवात करण्याची.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) २०२२ या वर्षाचा वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ? २) अयोध्येत राम जन्मभूमीकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाजवळील 'नया घाट चौक' आता कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे ?३) 'हायकू' काव्यप्रकार मराठीत कोणी आणला ? ४) तृणधान्यांची नावे सांगा.५) प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक २०२१ नुसार भारताचा कितवा क्रमांक आहे ?*उत्तरे :-* १) स्वांते पाबो, शास्त्रज्ञ, स्वीडन २) लता मंगेशकर चौक ३) शिरीष पै ४) गहू, बाजरी, तांदूळ, ज्वारी इत्यादी ५) ५४ वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जादू पतंगे, वसमत● सुदर्शन कदम● दत्तात्रय देवकते● अभिषेक निगम● रवींद्र शेळके● सायरेड्डी चाकरोड● डॉ. रवी माळी● योगेश गाडे● दिपालीताई सतीश सावंत*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..**सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्र मानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••म्हणतात ना स्वत:ची पाठ स्वत:ला कधीच दिसत नाही त्याचप्रमाणे आपल्यातील काही असलेले दोष आपल्याला लवकर कळत नाही.दुसरे जेव्हा आपल्यातील दोष काढायला लागतात तेव्हा आपल्याना त्यांचा खूप राग येतो आणि अशावेळी वाटायला लागते की,तो कोण आहे आपल्यातले दोष काढणारा ? आपल्यातला हा अहंपणा किंवा माझे तेच खरे आहे असा असणारा स्वभाव किंवा आपली मानसिकता यामुळे लोकांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार होत नाही त्यामुळे आपल्यातल्या दोषांवर आपणच पांघरुण घालतो आणि आपल्यातल्या लागणा-या दोषाला अधिक बळकटी देतो त्यामुळे आपल्या जीवनाचे खूप नुकसान होते,आपली चार माणसांमध्ये किंमत तर राहत नाही उलट आपल्यामध्ये थोडीबहुत जी काही माणुसकी आहे तीही संपून जाते.अशावेळी आपण आपल्यातील दोष दुसऱ्यांनी काढले म्हणून त्यांच्यावर रागावू नका किंवा त्यांच्याशी अबोलाही धरु नका.कारण तेच लोक आपल्यातील दोष जेव्हा दाखवतात यांचा अर्थ आपण समजून असा घ्यायचा की,आपल्याला सुधारणा करण्यासाठी संधी देत आहेत आणि त्याच संधीचा फायदा घेऊन आपल्या जीवनात असलेले दोष दूर करुन जीवन अधिक चांगल्या प्रकारे बनवून समृध्द करायला शिकले पाहिजे.उद्या आपणच त्यांच्यासमोर आदर्श म्हणून उभे राहू आणि आपल्या आदर्श विचारांचा स्वीकार करतील.अशावेळी आपले तेच म्हणण्यापेक्षा इतरांच्या ही विचारांचा विचार करायला हवा की,ज्यामुळे सगळ्यांचेच कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.📚🍃📚🍃📚🍃📚🍃📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *यशाचा घडा* वसिष्ठांची पत्नी अरूंधती ज्ञानी, विद्वान, पतिव्रता होती.एकदा सूर्य अग्नी व वरूणासह वसिष्ठांच्या आश्रमात आले. तेंव्हा अरूंधती पाण्याचा घडा घेऊन नदीवर जायला निघाली होती. तिने तिघांना बसायला आसन दिलं आणि म्हणाली, 'थांबा थोडं, आता नदीवरून एवढा घडा भरून आणते.' त्यावर सूर्यदेव म्हणाले, 'आई नदीवर कशाला? मीच मंत्रसामर्थ्याने देतो घडा भरून' एवढे म्हणून त्यांनी मंत्रसामर्थ्याने घडा भरला, पण तो घडा १/२ रिकामाच राहिला. शेवटी तो पूर्ण भरण्याचे काम अरूंधतीने केले. नंतर ती म्हणाली कोणत्याही यशाचा ३/४ वाटा देवदत्त असला तरी १/४ भाग भरण्यासाठी मानवी प्रयत्नच लागतात. निढळाच्या घामाने उरलेला १/४ घडा भरणे भाग आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/10/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९०८ - ऑस्ट्रिया-हंगेरीच्या दुहेरी राजतंत्राने ओस्मानी साम्राज्यच्या ताब्यातील बॉस्निया आणि हर्झगोव्हेना बळकावले.★ १९८१ - इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष अन्वर अल सादातची हत्या.💥 जन्म :-★ १९१४ - थॉर हायरडाल, नॉर्वेजियन मानववंशशास्त्रज्ञ व शोधक.★ १९३० - हफेझ अल-असाद, सिरीयाचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-★ १६६१ - गुरू हर राय, सातवे शिख गुरू.★ १८९२ - आल्फ्रेड लॉर्ड टेनिसन, इंग्लिश कवी.★ १९७९ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय राजकारणात केला प्रवेश,काल दुपारी केसीआर यांनी भारत राष्ट्र समिती या पक्षाची केली घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद जुबेर यांना सन 2022 नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारतीय लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात पायलटचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फैजाबाद छावणीचं नाव आता अयोध्या छावणी; संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई: शिवसेनेतून गद्दारीं केली, मंत्रीपद काही वेळेपुरतंच आहे, पण गद्दार हा शिक्का कायमस्वरुपी आहे, तो शिक्का पुसता येणार नाही असा घणाघात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नैसर्गिक शेती' संदर्भात आज पुण्यात कार्यशाळेचे आयोजन, या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम निघाले मोडित, मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी दिली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Loin & The Mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LUHDSa-9ZIM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपले नशीब आपल्या हाती*https://nasayeotikar.blogspot.com/2019/10/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आपल्या सूर्यमालिकेतील ग्रहाची माहिती* 📙 ग्रहांबद्दल तशी थोडीफार माहिती प्रत्येकालाच असते. कधी ना कधी तरी त्यांच्याबद्दल कानावर पडत असतेच. डोळ्याने दिसोत वा न दिसोत, ज्योतिषांकडून तर ते सतत कानावर पडतात. सूर्यमालिका पाच अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, असे मानले जाते. सूर्याभोवती भ्रमण करणारे आठ ग्रह सध्या ज्ञात आहेत. त्यातील बुध, शुक्र, पृथ्वी व मंगळ हे घन वस्तूपासून बनले असून गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून हे वायूंचे प्रचंड गोळे आहेत. सूर्यमालिका तयार होताना सूर्याकडे ९९ टक्के घनभाग आकर्षित झाला, तर उरलेला एक टक्का भाग आकाशात विखुरला गेला. यातूनच ग्रह बनत गेले. सूर्याच्या उष्णतेचा प्रभाव या प्रक्रियेत फारच मोठा होता. यामुळे सूर्यापासूनचे जवळचे ग्रह खडक व धातू यांपासून बनले. सूर्याने जड मुलद्रव्ये स्वतःजवळच्या परिभ्रमण कक्षेत खेचून घेतल्याचा हा परिणाम होता. ज्या पदार्थांचा गोठणबिंदू जास्त आहे, ते जवळच्या ग्रहात;९ तर ज्यांचा गोठणबिंदू कमी आहे ते लांबच्या ग्रहात दिसतात. जे ग्रह सूर्यापासून दूर राहिले, तेथवर उष्णता कमी पोहोचत होती. त्यामुळे तेथील वायूंचे बर्फात रूपांतर होत गेले. हलकी मुलद्रव्ये यामध्ये सामावत गेली. सूर्याभोवती भ्रमण करताना हे ग्रह स्वतःभोवतीही भ्रमण करू लागले. मंगळ व गुरू या दरम्यान असलेल्या काही घनांचा ग्रह बनला नाही. अशा दोन गोळ्यांना लघुग्रह अशीही उपाधी मिळाली. लघुग्रह असला, तरी त्यांतील सिरीजचा व्यास ९४० किलोमीटरचा आहे. यांना 'अॅस्टेराॅइड्स' म्हणून ओळखले जाते. सूर्यकक्षेत फिरणाऱ्या ग्रहांना काही उपग्रहही आढळतात. ग्रहमालिकेच्या उत्पत्तीमध्ये हे उपग्रह काही ठराविक अंतरावर घनाकृतीत रूपांतरित झाले व ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत अडकून त्यांच्याभोवती फिरू लागले. बुधावर लोहाचे प्रमाण खूपच जास्त आहे; तर शुक्र, पृथ्वी, मंगळ येथे लोह, निकेल, सिलिकेट व त्यापासून बनलेले खडक व माती यांचे प्रमाण जास्त आहे. नंतरचे ग्रह मात्र नायट्रोजन व मिथेन यांच्या घनरूपाने बनले आहेत. बर्फाळ अवस्थेत हे वायू घनरूप आढळतात. ग्रहांवरून सूर्यकिरण परावर्तित होतात म्हणूनच ते आपल्याला दिसतात. बुध सूर्याच्या खूपच जवळ असल्याने सूर्याच्या तेजापुढे दिसत नाही. शुक्र पृथ्वीला खूपच जवळ येत असल्याने सर्वात ठळक दिसतो. मंगळ रंगामुळे, तर शनि कड्यांमुळे लक्षात येतो. गुरू हा शुक्रानंतर लगेच डोळ्यात भरतो. हर्षल, नेपच्यून हे दुर्बिणीच्या सहाय्यानेच बघावे लागतात. ग्रहांचा प्रकाश हा स्थिरपणे दिसणारा प्रकाश असतो. यामुळेच लुकलुकणाऱ्या ताऱ्यांपासून त्यांचे वेगळेपण सहज जाणवते. ग्रहांबद्दलची काही आकडेवारी थोडक्यात अशी:बुध सूर्यापासून ५.८ कोटी किलोमीटर अंतरावर प्रदक्षिणा करतो. त्याचा व्यास ४,९०० किलोमीटरचा आहे, तर पृष्ठभागावरील तापमान चारशे डिग्री सेंटिग्रेड असते. सूर्याच्या विरुद्ध बाजूला रात्री तापमान उणे १७० डिग्री सेंटीग्रेडपर्यंत उतरते. याचा प्रदक्षिणा काळ ५९ दिवसांचा आहे. शुक्राचा आकार पृथ्वीपेक्षा थोडा लहान असून सूर्यापासून १०.८ कोटी किलोमीटरवर त्याची प्रदक्षिणा चालते. याचे तापमान ५०० अंश सेंटिग्रेड असते. पृथ्वीवर सजीवांची वस्ती आहे, वातावरण आहे, पाणी आहे. पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसांत प्रदक्षिणा करते. तापमान अधिक पन्नास ते उणे पन्नास सेंटिग्रेड आढळते.मंगळ सूर्यापासून २२.८ कोटी किलोमीटरवर आहे, व्यास ६,८०० किलोमीटरचा आहे. गोठलेला कार्बन डायऑक्साइड ध्रुवीय भागात आढळतो.गुरू ७७.८ कोटी किलोमीटरवर आहे. पृथ्वीच्या एक हजारपट मोठा आहे. हा सर्वांत मोठा ग्रह म्हणावा लागेल. शनी १४२.७ कोटी किलोमीटरवर असून त्याला सहा उपग्रह आहेत. याचा व्यास एक लाख वीस हजार किलोमीटरचा आहे. शनीभोवतीची कडी त्याची प्रदक्षिणा ज्या वर्तुळात होते त्या दिशेला कललेली राहतात. त्यामुळे ती आपल्याला वेगवेगळ्या कोनातून आढळतात. हर्षल म्हणजेच युरेनस २८७ कोटी किलोमीटर अंतरावरून भ्रमण करतो व त्याचा व्यास ५२,४०० किलोमीटरचा आहे. नेपच्यून ४४९.७ कोटी किलोमीटरवरून भ्रमण करतो व व्यास ४८,६०० किलोमीटर आहे. प्लुटो हा २४ ऑगस्ट २००६ पर्यंत सूर्यामालेतील एक ग्रह मानला जात होता. त्याचा शोध १९३० साली लागला. हा ग्रह आहे वा नाही, याविषयी ७५ वर्षात अनेक व वेळा चर्चा झाली होती. पण ७० देशातील ४५० उपस्थित खगोलशास्त्रज्ञांनी ग्रहाची व्याख्या तपासून प्लुटो हा ग्रह नाही असे २००६ मध्ये जाहीर केले. ग्रहाची व्याख्या अशी : जी खगोलीय वस्तू सूर्याभोवती भ्रमण करते. जी पुरेशा गुरुत्वाकर्षीय बलामुळे गोलाकृती झाली आहे आणि जिने आपल्या भ्रमणकक्षेच्या परिसरात असलेल्या सर्व लहान मोठ्या वस्तू दूर सारल्या आहेत, अशा वस्तूला ग्रह म्हणावे. या व्याख्येनुसार पहिल्या दोन अटी फक्त प्लूटो पूर्ण करतो. तिसरी अट मात्र पूर्ण होत नाही. प्लुटो काही वेळा नेपच्यूनच्या भ्रमणकक्षेच्या आत जातो. अशी परिस्थिती १९७९ ते १९९९ सालच्या दरम्यान उद्भवली होती. अशा ग्रहांना खुजा ग्रह (Dwarf planet) असे संबोधावे, असा निर्णय खगोलशास्त्रज्ञांनी घेतला आहे.प्लूटोची भ्रमणकक्षा सूर्यापासून फार मोठ्या प्रमाणात कमी जास्त होते. ४४० ते ७७० कोटी किलोमीटर या अंतरावर लंबवर्तुळाकार हे भ्रमण चालते. त्याचा व्यास जेमतेम चंद्राएवढाच आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'भारत माझा देश आहे' ही प्रतिज्ञा कोणी लिहिली ?* पेदेमरी व्यंकट सुब्बाराव,19622) *दूषित हवेमुळे शरीरातील कोणत्या अवयवावर दुष्परिणाम होतो ?* फुफ्फुसे3) *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली ?* डॉ नरेंद्र दाभोलकर4) *बजरंग पुनिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?* कुस्तीपटू5) *जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिवस केव्हा पाळला जातो ?* 21 सप्टेंबर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रामरेड्डी अरकलवार● श्वेता अंबडकर● दशरथ बोईनवाड● माधव हाक्के● संतोष जाधव किल्लारीकर● माधव अटकोरे● मारोती रेड्डी● संभाजी हिवराळे● सूर्यकांत मोळे● प्रकाश चरपिलवार● नागभूषण भालेराव*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*व्यक्तिमत्व फुलून यायचे असेल तर कौटुंबिक भावना जोपासायला हवी. यासाठी नात्यांची ऊब आवश्यक आहे. मग हे नाते कुटुंबातील असो अथवा मित्र-मैत्रिणींचे असो. आम्ही निसर्गरम्य पहाडात गेलो होतो. निर्जन दरीत फुललेली फुले चित्त प्रसन्न करीत होती. तिथे स्थानिक माणूस एकटाच बसला होता. त्याला आम्ही म्हणालो, 'ह्या निर्जनस्थळी ही निसर्गाची रूपे तुला किती संपन्नता देत आहेत. 'तो उत्तरला,'होय, पण त्याहीपेक्षा खूप दिवसांनी इथे कोणी माणूस आला आणि त्याच्याशी बोलता आले ही प्रसन्नता खूप मोठी आहे.' निसर्ग आणि विज्ञान याद्वारे प्राप्त होणारी संपन्नता जशी हवी आहे तशी नाती आणि अध्यात्म याद्वारे प्राप्त होणारी प्रसन्नताही गरजेचे आहे.**माणसांमधील प्रेमाची ऊब त्याच्या वेदना वाचायला शिकवते आणि त्या वेदनेवर फुंकर देते, त्याला आधार देते आणि एकमेकांवर सावली धरते. "मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले, घन गर्द सावल्यांनी आकाश वाकलेले." ना.धो.महानोर यांनी आकाशाने वाकून घनगर्द सावल्या देण्याची कल्पना किती सुंदर केली आहे. पु.ल.देशपांडे यांनी इरावती कर्वे यांच्याबद्दल लिहीलेल्या लेखात 'वृक्षासारखी नकळत सावल्या धरणारी ही माणसे' असे म्हटले आहे. छोटे असताना आपण सावली घ्यावी आणि मोठे झालो की सावली द्यावी. छोटे असताना चुलवणासारखी ऊब घ्यावी आणि मोठे झाल्यावर अशी चुलवणे व्हावे..* • • ● *॥ रामकृष्णहरी ॥*● • • 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या माणसांना तुमच्यावर प्रेम करण्याचा अधिकार आहे त्या माणसांना तुमच्यावर रागावण्याचा,रुसण्याचा किंवा काही काळ अबोला धरण्याचाही अधिकार आहे.ह्या गोष्टी आपल्या मैत्रीत,नात्यात नसतील तर ते प्रेम कसले..?आपल्या माणसांना अधिक आपले नाते घट्ट करावयाचे असतील आणि त्यात काही काळापुरता आपला दुरावा निर्माण करायचा असेल तर आपणही थोडा काळ शांत रहावे त्यात आपल्या माणसांविषयी मनात कोणतेही वाईट विचार आणून नातेसंबंध तोडू नये.एकामेकांबद्दल अविश्वासही निर्माण करु नये. ह्या छोट्या छोट्या जीवनातल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे मन शांत ठेवून द्यायची असतात. मग एकमेकांबद्दल आपोआपच कळायला लागते की,आपले काहीतरी चुकले आहे आणि मग तो पूर्वीसारखे च अधिकचे नाते दृढ करण्यासाठी पुढे येतो.म्हणून आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आपलीच माणसे आहेत हे ओळखून आनंदाने,प्रेमाणे आणि मैत्रीने हसतखेळत जीवन जगायला शिकावे.हीच खरी जीवनशैली आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जाणीव*बादशहाच्या गुलामांनी कधीच समुद्राची यात्रा केली नव्हती. त्यामुळे त्यांना कधीच समुद्र कसा असतो? त्याची खोली काय असते? याची माहिती नव्हती. बादशहा समुद्र यात्रा करत असे, मात्र गुलामांना कधीच समुद्रावर नेत नसे. एकदा बादशाहाने गुलामांना समुद्रयात्रा घडविण्याचे ठरविले, त्याप्रमाणे एका गुलामाला त्याने जहाजावर बरोबर घेतले, चहूदिशेला पाणीच पाणी बघून गुलाम भयभीत झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. जहाजावरील लोकांनी त्याला समजावून सांगितले कि घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण जहाजावर सुरक्षित आहोत. परंतु त्याचा विश्वास बसेना. तो सतत ओरडत राहिला. हे पाहून बादशाहाने नाराज होऊन जहाजाच्या खलाश्यांना सांगितले, कि काहीही करा पण या गुलामाचे ओरडणे बंद करा. खलाश्यांनी पण त्याचे ओरडणे बंद व्हावे म्हणून प्रयत्न केले, समजावून सांगितले, वेगवेगळी आमिषे दाखविली, पण हा गुलाम काही गप्प बसेना. तेंव्हा जहाजावरील एक वृद्ध खलाशी बादशाहाकडे गेला आणि म्हणाला,"हुजूर! मला परवानगी द्या, मी याला गप्प बसवतो." बादशाहाने परवानगी दिली. त्या वृद्धाच्या सांगण्यावरून त्या गुलामाचे दोन्ही हात व पाय बांधण्यात आले व पायाला दोरी बांधून त्याला जहाजावरून पाण्यात लटकाविण्यात आले. काही क्षण पाण्यात घालायचे आणि दोरीने पुन्हा जहाजावर ओढून घ्यायचे असा प्रकार केला. ५-६ वेळेला गटांगळ्या खावून झाल्यावर त्याला जहाजावर घेतले, वर आल्यावर त्याला मुक्त केले पण तो गुलाम एका कोपऱ्यात जाऊन गप्प बसला. हे पाहून सर्वच चकित झाले. बादशाहाने वृद्ध खलाश्याला विचारले कि आता हा गप्प कसा झाला? खलाशी उत्तरला,"हुजूर! आधी तो समुद्रात बुडण्याचे दुःख काय असते हे जाणून घेत नसता नुसता ओरडत होता. पण त्याला आता बुडणे म्हणजे काय असते या प्रकाराची जाणीव झाली आहे म्हणून तो गप्प आहे.त्याच्या शांततेचे कारण त्याला झालेली दुःखाची जाणीव. त्या मानाने इथे त्याला सुख मिळत आहे ते तो अनुभवत आहे."*तात्पर्य-दुःखानंतर येणाऱ्या सुखाला किंमत असते. दुःख मिळाले नाही, सहन केले नाही तर सुख काय असते हे सांगून सुद्धा समजत नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 04/10/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆२००१ - युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव्ह टी.यु. १५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.◆ २००४ - स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.💥 जन्म :-★ १८७७ - रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.★ १९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.★ १९२० - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★१९३१ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.★१९६४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.◆ १९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी.◆१९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.◆२००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *6 राज्यांच्या 7 विधानसभेच्या जागांसाठी 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक; तर 6 नोव्हेंबरला निकाल, निवडणूक आयोगाचे परिपत्रक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय वायुसेनेला आज स्वदेशी बनावटीचे १० लाईट कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर्स मिळणार आहेत... हे मल्टीफंक्शनल हेलिकॉप्टर विविध प्रकारची क्षेपणास्त्रे डागण्यास आणि शस्त्रे वापरण्यास सक्षम आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *दिवाळीच्या दिवसांत खाद्यतेलाचे दर नियंत्रित रहावेत म्हणून केंद्र सरकारनं आयात शुल्कात दिलेली सूट कायम ठेवण्याचा घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुणे नवरात्रौमहोत्सवात दरवर्षी दिला जाणारा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ऐन दिवाळीत पुण्याहून विदर्भात जाणाऱ्या रेल्वे 19 ऑक्टोबर पर्यंत रद्द; रेल्वेने पर्यायही दिला नसल्याने नागरिकांची तारांबळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *औरंगाबादकरांची 10 वर्षांची प्रतीक्षा संपली, रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पीटलाइनचे भूमिपूजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आदिवासी, शेतमजूरांचा आवाज हरपला; ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कुमार शिराळकर यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Have Fun With Animal👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9KASDoo5TWk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ठेविले अनंते तैसेचि राहावे*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/07.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *दूरचित्रवाणी (Television)* 📙दूरचित्रवाणीचे भारतात आगमन खूपच उशिरा झाले. केवळ दिल्लीपुरते 'दूरदर्शन' अनेक वर्षे वापरात होते. पण तेही 'दूरचित्रवाणी'च्या जागतिक वापरानंतर २० वर्षांनी १९५६ साली सुरू झाले. अन्य सर्व शहरात तर दूरदर्शनची सेवा १९७२ पासून मिळू लागली. आज बऱ्याच भागांत हे जाळे पसरले आहे व त्याने आता उपग्रहाद्वारे स्वतःचे हातपाय पक्के रोवायला सुरुवात केली आहे.१९२६ साली जॉन बर्ड याने टेलिव्हिजन हा प्रकार शोधला. १९३६ साली लंडनमध्ये बीबीसीने त्याचे कार्यक्रम सुरू केले, तर पहिले रंगीत प्रक्षेपण १९५१ मध्ये अमेरिकेत झाले. खरे म्हणजे रेडिओ सिग्नल्सद्वारेच प्रकाशचित्रे पण पाठवता येतील, याचा अंदाज शास्त्रज्ञांना १९०० सालीच आला होता. कल्पना वास्तवात यायला हा काळ जावा लागला.नेहमीच्या कॅमेऱ्यासारखा कॅमेरा. पण त्यात फिल्म न घालता प्रतिमा प्रकाशाला संवेदनक्षम अशा एका पृष्ठभागावर पडते. हा पृष्ठभाग वरपासून खालपर्यंत एका इलेक्ट्रॉन्सच्या झोताने न्याहाळला जातो. ही क्रिया होतानाच त्यातून ज्या रेडिओलहरी निर्माण होतात, त्यात जे बदल होतात, त्यासकट त्यांचे प्रक्षेपण केले जाते. याची पद्धत अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी माॅड्युलेशन (UHF) या नावाने ओळखली जाते. या लहरी थेट सरळ प्रवास करतात. म्हणूनच टीव्हीचा अँटेना व प्रक्षेपण मनोरा हे समोरासमोर असून मध्ये अडथळा चालत नाही. अर्थातच मनोऱ्याची उंची खूपच उंच असावी लागते. मुंबईचा वरळीचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे, तर पुण्याचा सिंहगडावरच आहे. जगातील सर्वात उंच मनोरा आहे ६२८ मीटर उंचीचा, फार्गो, नॉर्थ डकोटा येथे अमेरिकेत.हे रेडिओ सिग्नल्स आपल्या घरातील अँटेना गोळा करतात. त्यांचे रूपांतर पिक्चर ट्युबमुळे पुन्हा इलेक्ट्रॉन झोतामध्ये होते. हा झोत फॉस्फरसचा थर दिलेल्या टीव्ही पडद्यावर आतून पडतो. ज्या ठिकाणी झोत पडेल तो भाग प्रकाशाने उजळून निघतो. ही क्रिया सतत झिगझॅग पद्धतीने चालू असते. त्यामुळे पडद्यावरील चित्र पूर्ण होऊन डोळ्यांना दिसते. पडद्यावरील चित्र हे आडव्या बारीकबारीक रेघांद्वारे आपल्यासमोर येते. प्रत्येक केंद्र स्वतःचे चित्र किती रेघांद्वारे प्रक्षेपित करायचे, ते ठरवते. अर्थात हा झाला त्याचा तांत्रिक भाग. तसेच दर सेकंदाला किती चित्रे प्रक्षेपित करायची, हेही प्रमाण एखाद्या चलतचित्राप्रमाणे ठरवले जाते. त्यामुळे समोरची स्थिर चित्रेच आपल्याला हालचाल करताना दिसू लागतात.१९८२ सालच्या एशियाडपासून रंगीत दूरचित्रवाणी 'दूरदर्शन' मार्फत भारतात आली. मूळ रंगा तीन. लाल, निळा, हिरवा यांचा वापर करून सर्व रंग बनतात, हे तत्त्व रंगीत टीव्ही वापरतो. पिक्चर ट्यूबमधून तीन प्रकारचे इलेक्ट्रॉन झोत पडद्यावर टाकले जातात. यांच्या मिश्रणातून आपल्याला परीपूर्ण रंगीत चित्र दिसू लागते. यात सर्व रंगांचे सुखद मिश्रण असते. नको असलेले रंगझोत टाळण्यासाठी पडद्यामागे एका विशिष्ट प्रकारची जाळी (shadow grid) असते. त्यामुळे नेमक्या जागी नेमका रंग हे मिश्रण साधले जाते. रंगीत प्रक्षेपणाच्या कॅमेऱ्यातून केलेले चित्रण कृष्णधवल टीव्हीवरही कृष्णधवल रंगात पाहता येते.दूरचित्रवाणीचा कॅमेरा हा चित्रण करताना त्यामागे बसवलेल्या छोट्या टीव्हीवर प्रत्यक्ष चित्रण कसे दिसेल, याचे स्वरुप जसेच्या तसे दाखवत असतो. त्यामुळे कॅमेरामन झटपट बदल करू शकतात. तसेच एका प्रसंगाचे चित्रण दोन वा अधिकही कॅमेरे करतात. त्यांतील नेमक्या कोणत्या चित्राचे प्रक्षेपण करायचे, ते संकलक ठरवतो. त्याच्यासमोर या सर्वांचे प्रक्षेपण एकाच ओळीत लावलेल्या पडद्यांवर दिसत असते. त्यामुळेच कधी जवळून, कधी वरून, कधी संपूर्ण दृश्याचे असे चित्रण आपण बघू शकतो.टीव्ही पडदा खूप मोठा करून एखाद्या ऑलिम्पिक स्टेडियममध्ये लावणे हे आता नवीन नाही. ऑलिम्पिक स्टेडियममधील प्रत्येक कार्यक्रम तेथील लोक प्रत्यक्ष व मोठ्या पडद्यावर ब्लोअप केलेला असाही बघू शकतात. पिक्चर ट्यूब व तिच्यामधून होणाऱ्या पडद्यावरच्या इलेक्ट्रॉन माऱ्यामुळे टीव्हीची जाडी वाढते. भिंतींवर तसबिरीप्रमाणे टांगता येणारा टीव्ही बनवायला त्यामुळे सतत अडचणी येत होत्या. पण आता जेमतेम तीन इंच जाडीचा तसबिरीसारखा टीव्हीपण वापरात आला आहे. स्टँडवरचा वा टिपाॅयवरचा टीव्ही आता भिंतीवरही जाऊ शकेल. फ्लॅट स्क्रीन, २१ इंच ते ७२ इंच या दरम्यानचे अनेक आकारांतील पडदे असलेले टीव्ही आता उपलब्ध आहेत. थेट एलसीडी प्रोजेक्टरचा वापर करून घरातील भिंतीवरही आपण चित्र पाहू शकतो. टीव्ही सुरू करणे, बंद करणे, कार्यक्रम संपल्यावर आपोआप बंद होणे व जागेवरूनच या गोष्टी घडवणे हेही रिमोट कंट्रोलमुळे शक्य झाले आहे. इन्फ्रारेड किरणांद्वारे टीव्हीच्या नियंत्रकाला दिलेल्या सूचना पाळल्या जाऊन या गोष्टी घडतात.टीव्ही हे करमणुकीचे माध्यम आहेच; पण खरे म्हणजे उत्कृष्ट शैक्षणिक व लोकजागृतीचे माध्यम आहे. सध्या विविध प्रकारच्या वाहिन्यांवरील विशिष्ट प्रकारचे कार्यक्रम देत आहेत. वार्तांकन, क्रीडा, करमणूक, सिनेमा, कार्टून, विनोदी, विज्ञान, प्राणीजगत अशा विविध कार्यक्रमांतून प्रेक्षक निवड करू शकतात. तेही त्यांच्या स्वतःच्या भाषेतून.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संगीता भांडवले● बालाजी इप्तेकर● सुरेंद्र गाडेकर● धनराज शेट्टीगर● लक्ष्मण पंदोरे● ओमप्रकाश येवतीवाड● साईनाथ पोरडवार● विजय पळशीकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अनेक उच्चपदस्थ, उच्चभ्रू म्हणवले जाणारे प्रतिष्टित सुर्यास्ताबरोबर स्वत:ला काचेच्या पेल्यात बुडवतात. तरूण मुला-मुलींपुढे कुठले आदर्श आपण ठेवणार आहोत ? कोवळी, मिसरूड फुटलेली मुलं अलिकडे व्यसनांच्या आहारी जात आहेत. त्यांना कुणीतरी थांबवलं पाहिजे. त्यांची शक्ती विधायक कार्यासाठी संघटित व्हायला हवी. जगाची दारं आज त्यांच्यासाठी खुली आहेत. त्यांनी त्या दारापर्यंत पोहोचायला हवं.**खरं म्हणजे आनंद-दु:ख, यश-अपयश व्यक्त करण्याची अनेक माध्यमं आहेत. मदिराप्राशन, हे माध्यम उचित ठरू शकत नाही. प्रत्येकानं मात्र आवडीचा छंद जोपासण्याची धुंदी चढू द्यावी. श्रमण्यातून मिळालेल्या यशाचा कैफ काही औरच असतो. दुस-याच्या दु:खानं गुंगी जरूर यावी नि, ती सोडविण्याचा अंमलही असावा. प्रेमाचा वर्षाव करत झिंगावं त्यानं आप्त-मित्रांसह, आणि जगण्याची खरी... नशा.. चढू द्यावी...!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *--संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या अंगावरचे वस्त्र भारी नसले तरी चालेल हलके पण अंगभर असावे की, त्यातून अंगप्रदर्शन होऊ नये, वाणी कशीही असली तरी चालेल वाचा स्पष्ट असायला हवी कारण आपले विचार इतरांपर्यंत पोहोचले पाहिजे किंवा आपण काय म्हणतो ते कळले पाहिजे, आपल्या डोळ्यांना कमी जरी दिसायला लागले तरी दुसऱ्याबद्दल चांगल्याच दृष्टीने पहायला हवे परंतु काकदृष्टीने पाहू नये, अंत:करण एवढे शुद्ध ठेवावे की,दुसऱ्याच्या वाईट विचारांने आपल्या अंतःकरणाची चलबिचल अवस्था होऊन वाम मार्गाचा अवलंब करु नये. या आणि इतर गोष्टीच्या बाबतीत सतर्क राहून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर आपण इतर लोकांसमोर आदर्श निर्माण करु शकतो आणि आपले मनापासून अनुकरण करायला शिकतील. जर आपणच चांगले वागलो नाही तर इतरांना चांगले बनवण्याचा आपल्याला अधिकारच नाही.©व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍁🍃🍁🍃🍁🍃🍁🍃🍁 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनाची यशस्वीता*एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार वाद झाला. वादाचा विषय होता ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍ याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’ *तात्पर्यः* *खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे.यशस्वी जीवनाचे हेच रहस्य मानवी मनास उलगडायला हवे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/10/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★१९९०-पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी चे एकत्रीकरण झाले.★ १६७९- शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटले.💥 जन्म :-◆१९०३-स्वामी रामानंद तीर्थ ,हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते,समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ.◆१९११ - सरोबिंदू नाथ बॅनर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू. ◆१९४९-जे पी दत्ता,चित्रपट दिग्दर्शक.💥 मृत्यू :-●२०१२-केदारनाथ सहानी,सिक्कीम चे राज्यपाल,दिल्लीचे महापौर.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पुण्याच्या चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त पूल पडला, रस्त्यावरील ढिगारे हटले, तब्बल 9 तासांनंतर वाहतूक सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर, राज्यांमध्ये मध्य प्रदेशची बाजी , 'सर्वोत्तम नागरिक अभिप्राय’ यामध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात प्रथम, स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये बारामती नगरपरिषद देशात नववी *••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून राजघाटावर महात्मा गांधीजींना अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *हॅलो ऐवजी 'वंदे मातरम्' म्हणा अभियान सुरु ; सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांची अधिकृत घोषणा, जीआरही निघाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्यात पहिल्यांदाच शासनाचा सहभाग, शाहू महाराजांच्या परवानगीने दीपक केसरकरांची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *गुवाहाटी : दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार बॅटींगच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*One & many वाचन👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BGIbX3JzGFc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मी गरीब नाही*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/31.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *दात आणि त्यांचे प्रकार* 📙दात आहेत म्हणूनच चणे खाता येतात. दातांशिवाय जीवन कठीण असते. मानवाने कवळी शोधून काढली आहे किंवा अन्नपदार्थात बदल करून शिजवून तो खाऊ शकतो. पण अन्य प्राणी मात्र दात अधू झाल्यास, पडल्यास जिवालाच मुकतात. कारण एकच उपासमार.दातांची ठेवण व शास्त्रीय माहिती अगदी पहिलीपासूनच दिली जाते. त्यातील काही मोजके उल्लेख म्हणजे दाताचा वरचा पांढरा भाग एनॅमल म्हणजे कवच हा शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. यापेक्षा कठीण शरीरात अन्य काही नाही. त्याच्या आतील भाग म्हणजे हाडासारखाच डेटिंगचा भाग. हाही कठीणच असतो, पण त्यामध्येच रक्तवाहिन्यांचे जाळे व मज्जातंतू येऊन पोहोचतात. डेन्टिन जबडय़ाच्या हाडात खोलवर सिमेंटने पक्के बसलेले असते. दाताचा वर दिसणारा भाग हा जेमतेम असतो. हिरड्यांनी व हाडांनी झाकलेला भाग खाली खोलवर असतो.दातांचा कवचाचा भाग कितीही कठीण असला तरीही त्यावर खाण्यातील पदार्थातून तयार होणाऱ्या अाम्ल पदार्थांचा परिणाम होतोच. साखर, तोंडात अडकून राहिलेले पिष्टमय पदार्थ यांवर लाळेचा परिणाम होऊन हे कवच हळूहळू खराब होते व तेथे दात किडू लागतो. हीच कीड पुढे खोलवर जाऊन डेन्टिनपर्यंत व नंतर दाताच्या मुळापर्यंत पोहचते. दाताला ठणका लागणे, गार गरम गोड पदार्थ न खाता येणे हे याच वेळी सुरू होते. दातांतील कीड काढून त्या जागी चांदी भरणे हे दंतवैद्य करतात व त्यामुळे दात काढून टाकावे लागणे वाचू शकते. दात दुखू लागण्याचा यात हे सर्व करणे योग्य ठरते.माणसाला जन्मतः दात नसतात. पण सहाव्या महिन्यापासून दुधाचे म्हणजे पडणारे दात येऊ लागतात. सहाव्या वर्षांपर्यंत एकूण वीस दात आलेले असतात. प्रत्येक जबड्याचे दोन सारखे भाग केले तर दोन दाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी पाचांची विभागणी होते. हे दात वयाच्या सात ते अकरा यादरम्यान पडून मग प्रत्येक बाजूला आठ दात अशी बत्तीशी पूर्ण होते. यामध्ये दोन दाढा, दोन उपदाढा, एक सुळा व दोन पुढचे दात अशी विभागणी होते. तिसरी दाढ अक्कल दाढ मात्र थोड्या सावकाशीने म्हणजे सोळा ते वीस वर्षादरम्यान उगवते. वेडेवाकडे दात नीट करणे, कृत्रिम दात बसविणे, खराब दात नीट करून पुन्हा बसवणे, दातात चांदी भरणे, कवळी बनवणे यांसारखी अनेक प्रकारची उपचारपद्धती सध्या दंतवैद्य वापरतात. दात व हिरड्या यांच्या रोगामुळे संपूर्ण पचनसंस्थाच बिघडून आरोग्य कायमचे बिघडू शकते. यासाठी आवश्यक तेव्हा दातांवर उपचार करणे रास्त ठरते. दात दुखत असल्यास उपचार सगळेच करतात पण फक्त हे पुरेसे नसते. किडलेल्या दातांवरील उपचार पद्धतीत आता अनेक पद्धती वापरल्या जातात. दातांच्या मुळापर्यंत गेलेली कीड काढून ती पोकळी चांदीने भरली जाते. मोडक्या दातांवर टोपी (कॅप) बसवुन तो नव्यासारखा बनवला जातो. एक वा अनेक दातांच्या जागी हाडामध्ये स्क्रूचा आधार बसवुन त्यावर कृत्रिम दात बसवला जातो. याला 'इम्प्लांट पद्धती' असे म्हणतात. या पद्धतीत कवळीऐवजी कृत्रिम दातांची पक्की व्यवस्थित व्यवस्था केली जाते. दंतोपचारात आता विविध शाखांचा विस्तार झाला आहे.मानवी दातांची ठेवण, जबड्यातून कृत्रिम दात यांचा शोध घेऊन अनेक गूढ गुपितेही उलगडली आहेत. मृतांची ओळख पटवणे, गुन्हेगार ओळखणे यांसाठी याचा उपयोग झाला आहे.दातांचा वापर जितका करावा, तितकी त्यांची ताकद टिकते, ही एक विशेष गोष्ट आहे. दातांवरील कवच, दातांचा रक्तपुरवठा, हिरड्या यांना दातांच्या वापरातूनच पक्केपणा मिळत असतो. यामुळेच केवळ शिजवलेले अन्न व फळांचे रस घेण्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात. कच्ची फळे, भाज्या, कोशिंबिरी व भरपूर चावावे लागणारे, चोथा असलेले पदार्थ खाल्ल्यास दात पक्के राहण्यास मदत होते. अर्थात दातांनी अतिकडक पदार्थ खाण्याचा अट्टाहास करून फायदा होतो, असा मात्र याचा अर्थ नाही.शुभ्र, दाणेदार, सलग दंतपंक्ती असल्या तर ती व्यक्ती चारचौघांत नक्कीच उठून दिसते. केवळ चेहऱ्याचे सौंदर्य यासाठी असावे लागते, असे नव्हे. मुळचे दात कसे आहेत, ही बाब अलहिदा, पण दातांची निगा राखून आरोग्य मिळवणे हे तर सर्वांच्याच हाती आहे. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ वाईट मार्गाने मिळवलेले वाईट मार्गानेच खर्च होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) वाघ, सिंह, चित्ता व बिबट असणारा जगातील एकमेव देश कोणता ?२) काँग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कोणत्या नव्या पक्षाची स्थापना केली ? ३) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?४) काटेरी वनस्पतींची नावे सांगा.५) बॉलिहूडमधील कोणत्या अभिनेत्याला 'किंग खान' असे संबोधले जाते ?*उत्तरे :-* १) भारत २) डेमोक्रॅटिक आझाद पक्ष ( DAP ) ३) गुरू ४) करवंद, बोर, गुलाब, लिंबू इत्यादी ५) शाहरुख खान *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रुपेश बालाजी सुंकेवार● पूर्वा श्यामसुंदर माडेवार● रणजित चंदावले● नागेश क्यातमवार● विश्वनाथ आरगुलवार● संदीप कडलग● साईनाथ राचेवाड● मारोती नरवाडे● पांडुरंग यलमलवाड ● शिवाजी मुटकुले ● दत्तप्रसाद ढगे ● शंकर ढगे ● नागनाथ लाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*नातेसंबंध टिकविण्यासाठी एकमेकांना समजून घेण्याची व प्रेमाची आवश्यकता असते. संत कबीर म्हणतात-"प्रेमाची अडीच अक्षरे ज्याला कळाली तो पंडित झाला." थोडे तारतम्य बाळगले, जीवनात शिस्त व करूणा आणली, तर सर्व आवडीच्या व्यक्तींशी आनंदाने नाते फुलवता येते. हे तारतम्य सुटले, अहंभाव जागवला, एकमेकांकडे दुर्लक्ष करून स्वार्थाचाच विचार केला, तर भरल्या घरात रितेपणा येऊन अशांती येते.**सफल प्रेम हे फळासारखे असते, ते हळूहळू पक्व होत जाते. त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आई-वडील, पत्नी-मुले, भाऊ-बहीण, मित्र ही नाती जपणे व फुलवणे ही एक साधनाच असते. त्यासाठी त्यागाची गरज असते, अहंकाराला तीलांजली देऊन, स्पर्धा न करता, एकमेकांना न डिवचता, स्वातंत्र्य देत, मैत्रीचे दार उघडे ठेवले तर कुठलेही नाते अभंग राहील. म्हणून वडिलधा-यांच्या आठवणीतून घराण्याचे महाभारत ऐकावे, पत्नी नावाच्या श्रमदेवतेचे 'नवरात्रौत्सव' घरात साजरे करावे, समाजात पसायदानाच्या ओव्या कानी पडण्याकरिता प्रयत्नशील राहावे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●•• *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही. जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल. खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल जीवन**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे नॉलेज नव्हते त्यामुळे त्याने त्या झाडांना कापून त्यांचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...**त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.**मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.**बोध :-* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह त्या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/10/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आंतरराष्ट्रीय कॉफी दिन**आंतरराष्ट्रीयवृद्ध व्यक्ती दिन**आंतरराष्ट्रीय संगीत दिन*इ💥 ठळक घडामोडी :-◆१८३७-भारतातील पाहिले टपाल कार्यालय सुरू झाले.◆१९५८ - नासाची स्थापना.💥 जन्म :-◆१९०४ - ए.के. गोपालन, भारतीय कम्युनिस्ट नेता.◆१९१९ - ग.दि. माडगूळकर, मराठी कवी.💥 मृत्यू :-◆१९४२ - अँट्स पीप, एस्टोनियाचा पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्वसामान्यांना महागाईचा झटका, 1 ऑक्टोबरपासून CNG-PNG च्या दरात वाढ, केंद्र सरकारनं नैसर्गिक गॅसची किंमत तब्बल 40 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये 5G सेवेचा शुभारंभ होणार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नाशिक महापालिकेतील गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3 ते 4 दिवस राज्याच्या काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गांधीनगर-मुंबई 'वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन'ला दाखवला हिरवा झेंडा, मुंबईकरांसाठी आजपासून सेवेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'गोष्ट एका पैठणी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अग्निपथ योजनेअंतर्गत 100 पदांसाठी सुमारे अडीच लाख महिलांनी लष्करी पोलिसांच्या (सीएमपी) सैन्य दलात भरतीसाठी नोंदणी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/9mamp5qoB9o~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दृष्टी तशी सृष्टी*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/30.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी ते दहा कोटी वर्षांपूर्वीपर्यंतचा सजीवांचा इतिहास काय ?* 📙मानवी आयुष्याचा काळ जेमतेम ७०-८० वर्षांचा आहे. जास्तीत जास्त १०० वर्षे धरली, तरीही त्याच्या दृष्टीने हजारभर वर्षे म्हणजे फार पुरातन काळ होतो. पण पृथ्वीवरील सजीवांचा इतिहास व त्यांची आजवरची वाटचाल पाहावयाची झाली, तर किमान दहा कोटी वर्षे मागे जावे लागते. दहा कोटी वर्षे मागे जाण्याचे कारण म्हणजे सध्याची आपल्याला ज्ञात असलेली पृथ्वी, तिच्यावरील खंडे, तेथील हवामान हे या सुमाराला रंगरूपाला वा आकाराला येऊ लागले. त्याला आता दहा कोटी वर्षांचा काळ लोटला आहे. या आधीचे प्राणी, वनस्पती हे कसे होते आणि त्यांची सध्याच्या सजीवांशी कितपत जवळीक होती, यांची उत्तरे या अतिप्राचीन कालखंडामध्येच शोधावी लागतात. आपले घर कसे होते, कोणी बांधले, येथे पूर्वी काय होते, गाव वसले कधी, त्याआधी जंगल होते काय - या प्रश्नांची तशी सामान्य माणूस आपल्या वडील, आजोबा, पणजोबांकडे चौकशी करतो, त्यात आस्था दाखवतो, अगदी तशीच आस्था शास्त्रज्ञांना या गोष्टींबद्दल नेहमी वाटत आली आहे.साडेतीन अब्ज वर्षांपूर्वीची अलगी या स्वरूपातील वनस्पती ऑस्ट्रेलियातील शार्कबे या भागातील फॉसिल्समध्ये सापडली आहे. वनस्पतीजीवनाचा हा उपलब्ध झालेला सर्वात जुना पुरावा. पंचेचाळीस कोटी वर्षांपूर्वी गोड्या पाण्यात व त्याच्या काठावर वनस्पती फोफावू लागल्या होत्या. प्रत्यक्ष झाडे या स्वरूपात वनस्पतीजीवन आढळले आहे, त्याला यावरही तीन कोटी वर्षे जावी लागली. एकपेशीय वा बुरशीजन्य वनस्पतींपासून ही प्रगती होण्याला एवढा मोठा काळ गेला आहे. बेचाळीस कोटी वर्षांपूर्वी या वनस्पती सर्वत्र पसरू लागल्या. बहुधा याच सुमाराला या वनस्पतींवर वाढणारे व त्यांच्या कुजण्यातून अन्नपोषण मिळवणारे सजीव प्राणी निर्माण झाले असावेत. सुमारे सदतीस कोटी वर्षांपूर्वी या काळात या प्राण्यांतूनच काही पृष्ठवंशीय किंवा व्हटेंब्रेट्स निर्माण झाले असणार. सरपटणारे रेप्टाईल जातीचे हे पृष्ठवंशीय प्राणी सर्वत्र वावरू लागले, पण उंच डोंगर पार करण्याकरता त्यांना अजून काही कालखंड लागला. अंदाजे सव्वीस कोटी वर्षांपूर्वी या प्राण्यांचा आकार वाढत गेला व त्यांनी सर्व पृथ्वीवर फेरफटका मारायला सुरुवात केली. आता त्यांना जमिनीवरचे विविध अडसर अडवू शकत नव्हते. रेप्टाईल या प्रकारातील पृष्ठवंशीय प्राण्यांचे दोन प्रकारांत याच सुमाराला रूपांतर झालेले आढळते. सस्तन प्राणी व मॅमल जातीकडे एका प्रकारची वाटचाल सुरू झाली, तर दुसरा प्रकार डायनाॅसाॅर या प्रकारात रूपांतरित होत गेला.आज वाचायला आश्चर्य वाटेल, पण संपूर्ण दिवसांवर या महाकाय डायनाॅसाॅरचेच राज्य असे व केवळ अंधारात यांना कमी दिसत असल्याने अन्य सस्तन प्राणी निकाराची भूमिका बजावत. नेमकी कारणे ज्ञात नाहीत; पण दहा कोटी ते सात कोटी वर्षांपूर्वीच्या दरम्यान हे महाकाय प्राणी पृथ्वीवरून अचानक नष्टप्राय झाले. त्यानंतरचा काळ म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय प्राण्यांचा आहे. त्यांपैकीच एक म्हणजे माणूस. यांचे दिवसा व रात्री पृथ्वीवर अबाधित प्राबल्य आहे. निदान तसे आपण तरी समजतो.विविध कालखंडांचा क्रम पुढीलप्रमाणे : डेव्हिनियन (३७ कोटी वर्षांपूर्वी)पर्मियन (२७ कोटी वर्षांपूर्वी) ज्युरासिक (१७ कोटी वर्षांपूर्वी) क्रेटेशन (१० ते ७ कोटी वर्षांपूर्वी)*'सृष्टिविज्ञान गाथा' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) २०२० चा चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ? २) अलीकडेच मशिदीत पाऊल ठेवणारे किंवा मदरशात जाऊन विद्यार्थ्यांशी बोलणारे पहिले संघप्रमुख कोण ठरले आहेत ?३) आंतररष्ट्रीय व्याघ्रदिन केव्हा साजरा केला जातो ?४) कठीण कवचाची फळांची नावे सांगा.५) भारतात पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे ?*उत्तरे :-* १) आशा पारेख ( ७९ ), प्रसिध्द अभिनेत्री २) मोहन भागवत, संघप्रमुख, रा. स्व. संघ ३) २९ जुलै ४) नारळ, अक्रोड, कवठ, बदाम इत्यादी ५) मुंबई ते अहमदाबाद *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. सौ.सारीका शिंदे, संभाजीनगर.(श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे यांची कन्या)● अर्जुन वाकोरे● विशाल मस्के● निलेश पंतमवार● व्यंकट रेड्डी मुडेले● गोविंदराव इपकलवार● आनंद पेंडकर● व्यंकटेश काटकर, विचारवेध ● गजानन काळे ● सुभाष टेकाळे ● श्रीकांत भोसके ● माधव शिंदे ● साईनाथ पलीकोंडावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मानवी' नात्यांमधील ओलावा हा जन्मजात असतो. तो सगळ्यांच्याच मनात झिरपत असतो. पण बरेचदा आम्हीच अनेक आवरणांचे थर लेपून त्यात प्रतिबंध तयार करतो. इथूनच 'मैत्री'च्या नात्यांमधील दुरावे, विसंवाद प्रसवतात. स्वत:कडे दोष घेऊन नाते जपण्याची क्रिया आत्मशुद्धीकडे नेणारी असते. त्यातून ख-याखु-या अस्सल 'मैत्री'ची नाती निर्माण होतात.**बरेचदा आपल्या पुढाकारातून व घडलेल्या संवादातून दुभंगलेली मने सांधली जातात पण त्याकरिता मुखवटे उतरवून माणूस वाचता यायला हवा. मनात क्षमाभाव जागृत ठेवायला हवा. निर्मळ, शुद्ध प्रेमभाव बाळगल्यास वाट्याला येणारी निराशा गळून पडेल, आणि 'मैत्री' अभंग राहिल.. हीच भावना जीवनदर्शी महाकवी 'मिर्झा गालिब' अगदी सहजपणे सांगून जातात.....* *" कुछ इस तरह मैने* *जिंदगी को आसान कर दिया,* *किसी से मांग ली माफी,* *किसी को माफ कर दिया !"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्या चित्रात कोणते आणि कसे रंग द्यायचे हे आपण आपल्या कल्पकतेने ठरवून ते चित्र पूर्ण करतो.पण जीवनाचे सुंदर चित्र बनवण्यासाठी कुठे,कसे रंग भरावे हे लवकर लक्षात येत नाही.जीवनाच्या चित्रात रंग भरण्यासाठी कल्पकतेबरोबर, कठोर परिश्रमाचीही आवश्यकता लागते, परिस्थितीनुसार कोणत्या वेळी कोणता रंग भरावा याचेही ज्ञान असावे लागते.कधीकधी घाई केली तर आपण ठरवलेल्या रंगांमध्ये एखाद्या रंगाचे प्रमाण कमीजास्त झाले तर त्या रंगाचा बेरंगही होऊन जातो.सांगण्याचा तात्पर्य हा की, परिस्थितीनुसार रंग बदलण्याचीही आपली तयारी ठेवायला हवी आणि समयसुचकतेनुसार विचार करुन जीवनाचे सुंदर चित्र काढायलाही आणि रंगवायलाही आले पाहिजे.नाहीतर जीवनच रंगहीन बनून जाईल.खरंच मूळातच जीवन सुंदर आहे आणि त्या सुंदर जीवनाला अधिक सुंदर बनवण्यासाठी वेगवेगळ्या रंगरुपी छटांचेही ज्ञान आणि कल्पकता ज्यांना अवगत आहे आणि ज्यांना साध्य करता येते त्यांना आपल्या जीवनाचे चित्र छान आणि सुंदर बनवता येते. हे मात्र खरे आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका कुणब्याच्या झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 30/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन* 💥 ठळक घडामोडी :-◆ १९९३ - लातूर, किल्लारी भागात तीव्र भूकंप हजारो मृत्युमुखी, लाखो बेघर.💥 जन्म :-◆ १९३३ - प्रभाकर पंडित, मराठी संगीतकार.◆१९६२ - शान, भारतीय संगीतकार.◆१९८०-मार्टिना हिंगीस , लाँनटेनिस खेळाडू💥 मृत्यू :-◆ २००१- माजी रेल्वे मंत्री,नागरी हवाई वाहतूक मंत्री ,कांग्रेसचे नेते माधवराव शिवाजीराव शिंदे (सिंधिया) यांचा विमान अपघातात मृत्यू.◆ १९९२ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राज्य सरकारचं भेट, मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना दिवाळी बोनस जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा! कारमध्ये 6 एअरबॅगची अंमलबजावणी पुढील वर्षापासून*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काश्मीरमध्ये मोठ्या घातपाताचा कट उधळला, सुरक्षा दलांकडून प्रत्येक बसची चौकशी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याला इयान वादळाचा फटका, २५ लाख नागरिकांचं स्थलांतर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर देशातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रीज, प्रवास होणार आणखी जलद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सीमाभागात मराठी बांधवांवर अन्याय होत असताना अंबाबाई मंदिरात कन्नड भाषेत बोर्ड का? मराठी एकीकरण समितीचा संताप*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *धर्माबाद जि. नांदेड येथे वीज पडून एका शाळकरी मुलींचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Opposite Words विरुद्धार्थी शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/HUnNmxyrG7A~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाचे फळ*https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *दमा म्हणजे नेमके काय ?* 📙रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जगात सर्वाधिक स्थलांतरित होणाऱ्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा देश कोणता ?२) दक्षिण आशियातील ब्रेल लिपीतला पहिला शब्दकोष असा मान मिळविलेल्या शब्दकोशाचे नाव काय ?३) राष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२ कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला ?४) सिलिकॉन या मूलद्रव्याची संज्ञा काय आहे ?५) जागतिक गेंडा दिवस केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) भारत २) हेमकोष, आसामी शब्दकोष ३) जम्मू काश्मीर ४) SI ५) २२ सप्टेंबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्रमोद रत्नाळीकर● अनुराग वानरे● निलेश सुंकेवार● सतीश दमकोंडवार● पोतन्ना डेबेवार● देवन भोयर● महेश घुगारे● विशाल जारे पाटील● मन्मथ लिमशेट्टे● संतोष भालके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आज घटस्थापना होऊन नवरात्रौत्सवाला प्रारंभ होईल. नऊ दिवस दुर्गादेवीची पूजा केली जाईल. घटामध्ये माती घालून त्यात बी रूजत घातलं जातं. देवीसमोर अखंड दीप लावला जातो. देवीपुढे क्रमाक्रमाने वाढत जाणा-या फुलांच्या माळा बांधल्या जातात, आरत्या म्हटल्या जातात. दिवसभर देवी भागवत, श्रीदुर्गासप्तशतीची पारायणं केली जातात. 'जय आंबे माता' असा मोठ्या आवाजात पुकारा केला जातो. रात्री रस्त्यावर मंडप घालून जागोजागी दांडिया खेळला जातो. देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते. नवरात्रीचे नऊ दिवस संपून जातील. मंदिरातल्या किंवा देवघरातल्या देवीचा उत्सव वर्षानुवर्षे साजरे केले जातात**पण मनात प्रश्न येतो तो घराघरात वावरणा-या देवीचं काय? माता, भगिनी, कन्या, सून, नात या रूपात वावरणा-या देवीचा प्रश्न कधी सुटणार? मंदिरात पूजा आरती करणारे देवीभक्त घरातील देवीकडे कधी लक्ष देणार? प्रत्यक्ष देवाने स्त्री-पुरूष असा भेदभाव कधीही केला नव्हता. प्राचीन काळी पुरूषांनी प्रथम देवीचीच मंदिरं उभारली, मग मधल्या काळात असं काय घडलं ? मध्यंतरी वाचलेली एक गोष्ट मला आठवते. एकदा प्रत्यक्ष देव आणि पृथ्वीवरचा माणूस यांची अकस्मात भेट झाली. गंमत म्हणजे लगेचच दोघांनीही एकमेकांशी बोलताना पहिलं वाक्य उच्चारलं, 'माझी निर्मिती केल्याबद्दल तुझे मन:पूर्वक आभार !' "खरोखरच प्रथम कोणी कोणाची निर्मिती केली? देवाने माणसाची की माणसाने देवाची ?"* • • ● ‼ *रामकृष्णहरी* ‼● • •🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *काव्यांगण* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शाळा बंद धोरण सरकारचं धोरण काही कळत नाही बुवासरकारी शाळा बंद करून खाजगीकरणाला देती हवागाव तेथे शाळा असायलाच हवीलहान लहान चिमुकली लेकरं कसे जातील दूर गावी ?लोकसंख्याच्या प्रमाणात विद्यार्थी संख्या ही असेल कमीसरकार असे शाळा बंद करूनकसे देईल शिक्षणाची हमी ?गावोगावच्या शाळा बंद झाली तर अनेक शिक्षक अतिरिक्त ठरतीलडी. एड. पदविका धारक नवीन शिक्षकांची पदे कसे भरतील ?शिक्षण हक्क कायदा ठरला फक्त कागदावरस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गरिबांची मुलं वाऱ्यावरमायबाप सरकार नका करू असे गैरसोयगरिबांच्या शिक्षणाची दारावरच करा सोयदारावरच करा सोय ........- नासा येवतीकर, विषय शिक्षक,कन्या शाळा धर्माबाद जि. नांदेड9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सदाचरण*फार वर्षापूर्वी वाराणसी येथे देवमित्र नावाचे राजपुरोहित राहत होते. राजाला राजपुरोहितांच्‍या विद्वत्तेचा व योग्‍यतेचा यथायोग्‍य आदर होता म्‍हणूनच तो त्‍यांची प्रत्‍येक गोष्‍ट ऐकत असे. प्रजेमध्‍येसुद्धा राजपुरोहितांबद्दल सन्‍मानपूर्वक आदर होता. एक दिवस राजपुरोहितांना वाटले की राजा आणि इतर सर्व प्रजा आपल्‍याला इतक्‍या आदरपूर्वक का वागवतात याचे कारण जाणून घ्‍यावे. राजपुरोहितांनी हे जाणून घेण्‍यासाठी एक गुप्‍त योजना बनविली. दुस-या दिवशी त्‍यानी दरबारातून परतताना राजाच्‍या खजिन्‍यातून एक सुवर्णमुद्रा गुपचुप उचलून घेतली. हे खजिनदाराने पाहिले पण ते पाहून त्‍याने न पाहिल्‍यासारखे केले. हा प्रकार परत दुस-या दिवशीही घडला. राजपुरोहितांनी पुन्‍हा दुस-या दिवशी हळूच एक सुवर्णमुद्रा उचलली व स्‍वत:जवळ ठेवली. तिस-या दिवशी त्‍यांनी एक मुठभर सुवर्णमुद्रा उचलल्‍या व खिशात भरल्‍या. यावेळी मात्र खजिनदाराने सैनिकांना बोलावले व राजपुरोहितांना कैद करण्‍यास सांगितले. राजपुरोहितांना कैद झाली ही गोष्‍ट राजाच्‍या कानावर गेली. न्‍यायदान करताना राजाने आपला निर्णय दिला की राजपुरोहितांकडून घडलेल्‍या या चुकीबद्दल त्‍यांना तीन महिने सक्त कारावासाची सजा देण्‍यात यावी. तीनवेळेला त्‍यांनी कोषातून धन चोरले म्‍हणून तीन महिने सजा देण्‍यात आली आहे जेणेकरून ते पुन्‍हा असा अपराध करण्‍यात यशस्‍वी होणार नाही. या न्‍यायावर राजाने राजपुरोहितांची प्रतिक्रिया विचारली. राजपुरोहितांनी राजाला यामागील कारण सांगताना,'' राजन, मी काही अट्टल चोर नाही. मी फक्त जाणून घेण्‍यास इच्‍छुक होतो की लोक कशामुळे मला सन्‍मान देतात, वैयक्तिक माझा सन्‍मान करतात की मी करत असलेल्‍या सदाचरणाचा लोक सन्‍मान करतात. पण आता माझ्या लक्षात आले आले आहे की लोक हे माझ्या विद्वत्तेपेक्षा माझ्या सदाचरणाला महत्‍व देतात. गैरवर्तणूक करताच मी दंडास प्राप्‍त झालो आणि त्‍यावेळेला माझी विद्वत्ता, संपत्ती, मानमरातब हे काहीही मदतीला आले नाही. माझे सद आचरण हेच माझ्या सन्‍मानाचे कारण आहे हे मला समजून चुकले आहे. मी माझ्या गैरवर्तणुकीबद्दल आपली क्षमा मागतो.'' राजाने यावर सांगितले,''राजपुरोहित महाराज, तुम्‍ही कोणत्‍याही भावनेतून जरी हे कार्य केले असले तरी तुम्‍हाला दंड होणे क्रमप्राप्त आहे तरी तुम्‍ही शिक्षेस तयार राहा.'' राजपुरोहितांनी राजाचे म्‍हणणे ऐकले व स्‍वत:ला सैनिकांच्‍या स्‍वाधीन केले.*तात्‍पर्य :-सदाचरण हेच मनुष्‍याचे धन आहे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 29/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १२२७ - क्रुसेडमध्ये भाग न घेतल्याबद्दल पोप ग्रेगोरी नवव्याने पवित्र रोमन सम्राट फ्रेडरिक दुसऱ्याला (चित्रित) वाळीत टाकले.★ १९९२ - ब्राझीलचे अध्यक्ष फर्नांडो कोलोर डी मेलो यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला.★ २०१६ - उरी हल्ल्याच्या अकरा दिवसांनंतर, भारतीय लष्कराने पाकिस्तान-प्रशासित काश्मीरमध्ये संशयित अतिरेक्यांवर "सर्जिकल स्ट्राइक" केले.💥 जन्म :-★ १७८६ - ग्वादालुपे व्हिक्टोरिया, मेक्सिकोचा पहिला राष्ट्राध्यक्ष.★ १९५१ - मिशेल बाशेलेट, चिले देशाची पहिली स्त्री राष्ट्राध्यक्ष.★ १९५६ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू💥 मृत्यू :-★ १९८७ - हेन्री फोर्ड दुसरा, अमेरिकन उद्योगपती.★ २००१ - न्विन व्हान थ्यु, दक्षिण व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.★ २००६ - वॉल्टर हॅडली, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत नरेंद्र मोदी सरकारकडून 78 दिवसांचा बोनस मंजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा जल्लोषात होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आर व्यंकटरमणी यांची देशाच्या अॅटर्नी जनरलपदी पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *नवी दिल्ली: प्रचंड कर्जात बुडालेल्या व्होडाफोन आयडियाच्या २५.५ कोटी ग्राहकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरपासून कंपनीचं नेटवर्क बंद होऊ शकतं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची २५ हजार रुपये बोनसची मागणी, महापालिकेच्या कर्मचारी समन्वय समितीच्या बैठकीत मागणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर दिवाळी बोनसबाबत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यात वाहतुकीसाठी अडथळा ठरणारा चांदणी चौकातील पूल पाडण्याची तयारी सुरु झालीय. 1 ऑक्टोबरला पूल पाडला जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाचा शुभारंभ, 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान राबवलं जाणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नवरात्रीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर गाभाऱ्यात आकर्षक आणि नयनरम्य फुलांची सजावट करण्यात आलीय..*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Antonyms words विरुद्धार्थी शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/capZhRn1maI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधारकार्डचा इतिहास*सध्या भारतात कोणत्याही कामासाठी एक महत्वाचे डाकूमेंट बनलेले आधार कार्ड कसा जन्म घेतला ..........!पूर्ण माहिती खालील लिंकवर वाचता येईल.https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post.htmlलेखक - नासा येवतीकर, धर्माबाद•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *जीपीएस म्हणजे काय ?* 📙हल्ली पर्यटन करण्याची एक चांगली सवय सर्वसामान्यांना लागलेली आहे. पर्यटनाचा फार मोठा फायदा आपणाला होत असतो. त्या ठिकाणचं राहणीमान, भौगोलिक संपन्नता, सामान्यांचे प्रश्न या निमित्ताने समजण्यास मदत होते. अर्थात तसा दृष्टीकोन ठेवून पर्यटन केले तरच बरं का ! असे पर्यटनाला गेलो तर रस्ते सापडणे किंवा ठिकाण मिळणे काहीवेळा अवघड होते. प्रत्येक वेळी कोणाला तरी पत्ता विचारत राहणं सुद्धा नकोसं वाटतं. पण आता एक नवी प्रणाली आपल्या हातात आलेली आहे. जीपीएस त्याचं नाव. मोबाइलमध्ये असलेल्या या सिस्टीममध्ये नुसतं ठिकाण टाइप केलं किंवा आवाजाच्या माध्यमातून जरी सांगितलं तरी आपणाला त्या ठिकाणी सहीसलामत पोहोचवण्याचं काम ही जीपीएस यंत्रणा करते.एखाद्या गावाचं किंवा ठिकाणाचं स्थान आपण त्याच्या अक्षांश आणि रेखांशावरून ठरवू शकतो. पण एव्हरेस्टचं ठिकाण निश्चित करण्यासाठी एवढीच माहिती पुरेशी नाही. कारण लांबी, रुंदी बरोबरच उंचीचीही जोड त्यासाठी आवश्यक आहे. तीन मितीतील म्हणजे थ्री डायमेन्शनमधील माहिती मिळाली तरच आपण कोणत्याही ठिकाणचा पत्ता निश्चित करू शकतो. आता प्रश्न एवढाच उरतो की, या तीन मितींची माहिती मिळवायची कशी ? ती माहिती मिळवायची असेल तर उपग्रहांची मदत घेतली पाहिजे. आणि तेही भूस्थिर उपग्रह. हे उपग्रह जवळपास छत्तीस हजार किलोमीटर अंतरावर असतात. पृथ्वी ज्या वेगाने स्वतःभोवती फिरत आहे त्याच वेगाने ते पृथ्वीबरोबर फिरत असतात. त्यामुळे पृथ्वीच्या दृष्टीने ते स्थिर वाटतात. म्हणूनच त्यांना भूस्थिर उपग्रह म्हणतात. कमीत कमी तीन भूस्थिर उपग्रह एकमेकाला एकशे वीस अंशाचा कोन करतील अशा पद्धतीने अवकाशात ठेवले तर आपणाला जगातील कोणत्याही ठिकाणची माहिती तरंग लहरींच्या माध्यमातून समजते. तीनपेक्षा जास्त उपग्रह ठेवले तर माहितीची अचूकता वाढू शकते.दिशादर्शक प्रणाली म्हणजे ठिकाणांची माहिती देणाऱ्या उपग्रहांचा समूह. सध्या सर्वात लोकप्रिय असणारी दिशादर्शक प्रणाली ही अमेरिकेची आहे. तिला जीपीएस म्हणजे 'ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम' म्हणतात. वापरण्यास अत्यंत सोपी असल्यामुळे ती सध्या सर्वमान्य झालेली आहे. अमेरिकेबरोबरच इतर देशांच्या सुद्धा दिशादर्शक प्रणाली अस्तित्वात आहेत. त्यामध्ये रशियाची ग्लोनास किंवा ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम, युरोपीय समुदायाची गॅलिलिओ, चीनची बेंड्डु, जपानची रक्वासी झेनिथ सॅटेलाईट सिस्टीम कार्यरत आहेत.भारताचीही स्वतःची दिशादर्शक प्रणाली आहे. तीचे नाव आहे आयआरएनएसएस (Indian Regional Navigation Satellite System) ही दिशादर्शक प्रणाली केवळ स्मार्टफोन पुरतीच मर्यादित न राहता तिचे अनेकविध उपयोग आहेत. आपत्ती व्यवस्थापन, वाहनांचा शोध, मोबाइल फोन यंत्रणेशी समन्वय, अचूक नकाशे, पर्यटक आणि गिर्यारोहकांना दिशादर्शनासाठी, वाहक चालकांना दृश्य आणि ध्वनींसह दिशा सांगण्याबरोबरच लष्करासाठी ती उपयुक्त असल्यामुळे काहीवेळा धोकासुद्धा संभवतो. भारताच्या या दिशादर्शक प्रणालीचा एकूण खर्च एक हजार चारशे वीस कोटी रुपये आहे. जीपीएसवर सध्या अवलंबून असणाऱ्यांनी आणि विकासाचे फायदे घेणाऱ्यांनी तरी अंतराळ संशोधनासाठी होणाऱ्या खर्चाच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. ज्या उपेक्षित घटकांना या विकासाचे फायदे मिळत नाहीत त्यांचा विचार करणं आवश्यक आहे.*- नितीन शिंदे**'अंतराळ समजून घेताना' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• १) भारताचे परराष्ट्र मंत्री/विदेश मंत्री ( Foreign minister ) कोण आहेत ?२) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंहाची ( Lion ) जोडी कोणत्या ठिकाणाहून येणार आहे ?३) प्रख्यात कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा जन्म कोठे झाला ?४) जिवंत असेपर्यंत वाढ होणारे सजीव कोणते ?५) अनेक बिया असलेली फळे सांगा.*उत्तरे :-* १) एस. जयशंकर २) सक्करबाग उद्यान, जुनागढ, गुजरात ३) कानपूर, उत्तरप्रदेश ( २५ डिसेंबर १९६३ ) ४) वनस्पती ५) सीताफळ, फणस, टरबूज, पेरू इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्रथमेश नागोराव येवतीकर● राजेश सामला● संदेश जाधव● महेश राखेवार● गणेश पेटेकर● मारोती वाघमारे ● अजय मिसाळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरंच, काही 'उपकार' असे असतात, की त्यांची परतफेड होऊ शकत नाही. काही 'उपकार' सदैव स्मरणात ठेवायचे असतात व कोणतेच 'उपकार' विसरायचे नसतात. अलिकडे कृतज्ञतेची जाणिव तरी कितपत शिल्लक राहिलेली आहे ? ज्याचा आधार घेऊन माणूस पुढे सरकतो, त्या आधारालाच नंतर धक्का देऊन बाजूला केलं जातं. यालाच जगरहाटी म्हणण्याची हिणकसता ब-याचवेळी तुम्ही आम्ही आपण सारे स्विकारतो.**माझ्यावर झालेले माझ्या माता-पित्यांचे, गुरूंचे, व्यक्तिगत वाटचाल करीत असताना सभोवतीच्या असंख्य ज्ञात-अज्ञात लोकांचे 'उपकार' हे माझ्या स्मरणकप्प्यातील एक सुगंधी भाग आहे, ही अगदी सामान्य भावना सातत्याने तेवत ठेवणे, म्हणजेच आपण आपले 'माणूसपण' जिवंत ठेवणे होय. या भावनेचाच जर विसर पडणार असेल, तर आपण पाषाणवत झालो आहोत हे कोणी वेगळे सांगण्याची गरज नाही. 'उपकार' फेडायचे नाहीत, तर ते सदैव स्मरणात ताजे राहतील अशी व्यवस्था करायची, कारण पुढच्या क्षणाचे भविष्य कोण सांगू शकेल ?* ••☆‼ *रामकृष्णहरी* ‼☆•• 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *--संजय नलावडे, चांदिवली मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही माणसे आपल्या जीवनात खूप काही कमवण्याच्या प्रयत्नांमध्ये बरंच काही विसरुन जातात.त्यांना कमवण्याच्या मोह आवरत नाही.त्यांना वाटते की,आपल्यासारखे दुसरे कोणी पुढे जाऊ नये व या जगात आपल्यासारखे वैभवसंपन्न दुसरे राहू नये पण ह्या मोहापायी तो रक्ताच्या नात्याला, मित्राला आणि इतरांनाही विसरायला लागतो.अशा त्याच्या हावरट वृत्तीमुळे सारं सारं विसरुन एकटाच सुसाट धावायला लागतो, परंतु अशा कृतीमुळे आणि लालची कृतीमुळे तो स्वत:चेही जवळ आलेले सुख दूर करुन नको त्या सुखासाठी मागे लागल्यामुळे जीवनात असमाधानाशिवाय काहीच मिळणार नाही हे त्याला समजायला पाहिजे. कितीही कमावले तरी आपल्यासोबत काहीच घेऊन जाता येत नाही. माणसाने गरजा भागविण्यापुरते प्रयत्न करावेत.इतरांना तोडून, इतरांची मने कलुषित करुन जीवन जगणे म्हणजे मनुष्य जीवनाला काहीच अर्थ नाही. कोणताही मोह अति केल्याने जीवनाला घातकच असतो हे लक्षात असू द्यावे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारत्मक दृष्टिकोन*एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावागावातून तो विकत असे. असाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते. आता काय करावे ? पंचाईत झाली. उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते. व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला. ती काही दिसेना. त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "अरे. पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध." "महाराज, पण दोरी नाहीये न"पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर"त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली. आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला.सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली. तो उंट उभा राहिला. दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले. पण तो दुसरा उंट काही उठेना. व्यापारी पुन्हा परेशान. तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, "अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस?""पण महाराज, मी दोरी बांधलीच कुठे होती ? नुसते नाटक केले होते न "पुजारी म्हणाला, "नाटक तुझ्यासाठी होते. पण त्याला तर ते खरेच वाटले होते न. म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव. मग पहा"त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले. आणि काय आश्चर्य ? तो दुसरा उंट तटकन उठला की !! व्यापारी चकित झाला !!पुजारी म्हणाला "जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत. "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण पुढच्या (आनंदाच्या) गावी जाणार कसे ?तुमच्या आनंदाच्या वाटेत तुमच्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही. निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पहा. नक्की आनंदी व्हाल !! आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहे. सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 28/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-जागतिक कर्णबधीर दिनGreen Consumer Day💥 जन्म :-◆१९८२- अभिनव बिंद्रा,ओलीम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय.◆१९२९ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक. ◆१९८२- रणबीर कपूर,अभिनेता.◆१९४७- शेख हसीना ,बांगलादेशच्या १० व्या पंतप्रधान.💥 मृत्यू :-●२०१२-ब्रजेश मिश्रा ,राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार.●१९१४ - रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती. ●१८९५-लुई पाश्चर,फ्रेंच सूक्ष्मशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसंदर्भात कोणतीही प्रक्रिया न करण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 10 टक्के आरक्षणावर सुनावणी पूर्ण, निकाल राखीव ठेवण्याचा घटनापीठाचा निर्णय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पृथ्वीचा विनाश टाळण्यासाठी नासाचं 'डार्ट मिशन', लघुग्रहावर धडकलं अंतराळयान*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मध्ये रेल्वेचा मुख्य अभियंता लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात, एक लाखाची लाच घेताना अटक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात शाळेची बस पलटी झाली. बसमध्ये 44 विद्यार्थी आणि 3 शिक्षक होते. त्यातील सात विद्यार्थी गंभीर जखमी झालेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपुरातील साडेचारशे मराठी शाळांवर संकट, 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा होणार समायोजित*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 मालिका, केरळच्या तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे खेळवला जाणार पहिला सामना.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The Loin and the Mouse👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LUHDSa-9ZIM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लता मंगेशकर* स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांची आज जयंती. लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ साली मंगेशकर कुटुंबात झाला. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. त्यांना भारताची गान कोकिळा असे ही म्हटले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकिर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. 06 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. लता दीदींना विनम्र अभिवादन ....! ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गुगल*माहितीचा महास्फोट घडवणाऱ्या गुगलचा काल वाढदिवस. इंटरनेच्या युगात गुगल म्हणजे सर्व काही. काही शोधायचे असेल तर नेहमीच गुगलला प्राध्यान्य दिले जाते. अभ्यासाच्या काही नोट्स काढायच्या असतील तर काही संदर्भ पाहिजे असेल गुगला सर्च केले जाते. कुठे फिरायला जायचे असेल तर अंतर किती कोठे आहे ठिकाण, तसेच युट्यूबवर काही गाणी ऐकायची असतील किंवा व्हिडिओ पाहायचा असेल अथवा मेल चेक करायचा असेल तर यावरील उपाय म्हणजे गुगल जवळ आहे.आपण काही गुगलला विचारले तर गुगल आपल्या माहितीसाठी सदैव तयार. गुगल म्हणजे इंटनेटवर एक विश्वचं. एवढे सर्व गुगलवर असते. जरी गुगल कंपनीची ७ सप्टेंबर १९९८ रोजी स्थापन झाली. मेन्लो पार्कमधील सुसान वोजसिकी गॅरेजमध्ये लॅरी पेज व सर्जेई ब्रिन यांनी १९९८ मध्ये लावलेल्या छोटय़ाशा गुगलच्या रोपटय़ाचा आता वटवृक्ष झाला आहे. पेज आणि ब्रेन यांनी गूगलचं नाव ‘बॅकरब’ असं ठेवले होते. पण, नंतर ते गुगल असे करण्यात आले. २००५ पासून कंपनीने २७ सप्टेंबर हा दिवस वाढदिवसासाठी जाहीर केला. या पाठीमागचे कारण म्हणजे २७ सप्टेंबर रोजी सर्वात अधिक पेज व्हू मिळाल्याची घोषणा करण्यात आली होती आणि याच दिवशी आपला वाढदिवस साजरा करण्यात यावा असा गुगलचा अट्टाहास होता, तेव्हापासून गुगलचा वाढदिवस सत्तावीस सप्टेंबर रोजी करण्यास सुरुवात झाली. कंपनीच्या स्थापनेपासून २००४ पर्यंत कंपनी ७ सप्टेंबर या दिवशी वाढदिवस साजरा करत होती. 'गुगल' ही गणिती संज्ञा आहे. एकावर शंभर शून्ये दिल्यावर जो आकडा येतो त्याला गुगल म्हटले जाते. मिल्टन सिरोट्टा या गणितज्ज्ञाने ही संकल्पना शोधून काढली व वापरली. जगातील प्रचंड माहितीच्या साठ्याचे व्यवस्थापन करणे व जगातील कोणालाही ही माहिती सहजगत्या उपलब्ध करून देणे हा हेतू असल्याने कंपनीचे नाव 'गुगल' ठेवण्यात आले. आजकाल गुगल सर्च इंजिन इतके प्रचंड लोकप्रिय झालेले आहे की 'to google' असे क्रियापदच इंग्रजीत तयार झालेले आहे. गुगल ही जगातील एक मोठी कंपनी असून, केवळ भूतकाळात समाधान मानणारी नाही. त्यांनी त्यांच्या मुख्य शोधयंत्रात सुधारणा केली असून, इतर अनेक उपकरणांवर त्याचा वापर कसा वाढवता येईल याचा विचार केला आहे. १९९८ मध्ये गुगलने तंत्रज्ञानाचे जग नाटय़मयरीत्या बदलून टाकले व सर्च इंजिन म्हणजे शोधयंत्र कायमचे सुधारून टाकले. गुगलने जग बदलले, अब्जावधी लोक ऑनलाइन आले. इंटरनेटची विक्रमी वाढ झाली. आता तुम्ही तुमच्या खिशातील छोटय़ाशा मोबाइलवर असलेल्या गुगलने कुठल्याही प्रश्नाचे उत्तर शोधू शकता. गुगलला वाढदिवसाच्या शुभेच्छा.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ आनंदाने उड्या मारणारा प्रत्येकजण सुखी असतोच असे नाही. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'अर्धी भाकरी खा पण मुलांना शिकवा' असे नेहमी आपल्या कीर्तनात कोण म्हणत असत ?२) चायना नॅशनल स्पेस एडमिनिस्ट्रेशन ( CNSA ) या चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळ पर्यटनासाठी काय तयार करण्याचे ठरविले आहे ?३) यंदा ऑस्करच्या शर्यतीत बाजी मारणाऱ्या गुजराती चित्रपटाचे नाव काय ?४) एक बी असलेली फळे कोणती ?५) शून्य अंश मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात ?*उत्तरे :-* १) संत गाडगेबाबा २) अवकाशयान ३) छेलो शो ( इंग्रजीत - द लास्ट शो ) ४) आंबा, आवळा, बोर, खजूर इत्यादी ५) अटलांटिक महासागर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● लक्ष्मीकांत श्रीकांत सोरटे● प्रशांत राऊतखेडकर● सचिन बावणे● साईनाथ कानगुलवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'उन्नती आणि यश' ही प्रक्रीया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परिक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगुन असतो त्याचीच परिक्षा घेतली जाते. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परिक्षा पास झालात, की पुढची परिक्षा अशी ही श्रृंखला न संपणारी असते. जो हरला तो संपला. हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्राविण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधने हे त्याच्या अंगवळणी पडते.**हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरूषांच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेह-यावरचे भाव प्ररेणादायी असतात, ते प्रेरणेचे क्षण निर्माण करतात. अशा व्यक्ति अल्पसंख्येत असतात, त्यांचे पीक फारसे येत नाही. एखादा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी..!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाला आपल्या जीवनात आनंद मिळवायचा असेल तर प्रथम एकाकी जीवन व एकांतात राहणे सोडून द्यावे.कारण एकाकी जीवनात नको ते विचार मनात येतात आणि त्रस्त करतात.त्याचा परिणाम स्वत:च्या जीवन जगण्याच्या जीवनशैलीवर होतो आणि त्यामुळे सुखासमाधानाने असलेले जीवन दु:खात जगत असल्याचे वाटते.त्यापेक्षा इतरांच्या सानिध्यात राहून त्यांच्या आनंदी जीवनात आपणही राहावे.असे केल्याने आपल्या मनात आणि मनावर असलेले दडपण थोड्याप्रमाणात कमी होण्यास मदत होते.इतर लोक कसे जगतात याचेही अवलोकन करता येते.आपण दु:खी कशामुळे आहोत याचेही कारण शोधता येईल आणि शेवटी जीवन आनंदी जीवन कसे जगता येईल याचेही आपल्याला कौशल्य प्राप्त करता येईल.खरे जीवन जगण्याचा मंत्र आपल्या एकटेपणात मिळणार नाही तर इतरांच्या सानिध्यात राहिल्याने मिळतो हे आपल्याला नक्कीच मिळेल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे अपयश*एकदा एक रीपोर्टर एका मोठ्या यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेत होता. त्याने विचारले, "सर, तुमच्या यशाचे रहस्य काय आहे?"यावर तो साठीकडे झुकलेला उद्योजक बोलला, "माझ्या यशाचं रहस्य मी वेळोवेळी घेतलेल्या योग्य निर्णयांत आहे"रीपोर्टर ने ते उत्तर लिहून घेतले आणि आणखीन एक प्रश्न विचारला, "मग मला सांगा सर, योग्य निर्णय घ्यायला तुम्ही कसे शिकलात?"यावर एका क्षणाचाही विलंब न करता त्या व्यावसायिकाने उत्तर दिले, "अनुभव *(Experience )* . मला आयुष्यात अनुभवाने बरंच काही शिकवलं !"हे ही उत्तर रीपोर्टर ने लिहून घेतलं आणि लगेचच उस्फुर्तपणे पुढचा विचारला, " तुम्ही हे सर्व अनुभव कसे मिळवले ?"यावर उद्योजक मिष्कील हसला, आणि थोडा पुढे झुकत रीपोर्टरच्या कानाजवळ जाऊन म्हणाला, "माझ्या आयुष्यात मी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे !!"*तात्पर्य**आयुष्यात काही निर्णय चुकतात, काही बरोबर ठरतात. कधी यश येतं तर कधी अपयश, पण जर अपयशातून आपण काहीच शिकलो नाही तर ते खरं अपयश असतं.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 24/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.◆ १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.◆ २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.💥 जन्म :-●१९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.●१९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.💥 मृत्यू :-★ १९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.★१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.★२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात, देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक मनपाचे निवारा केद्रांत 200 हून अधिक बेघरांना 'सहारा', बँक खात्यांसह आधारकार्डही मिळणार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमतीत वाढ होणार, कारण.....अन्न मंत्रालयानं दिली सविस्तर माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा, राज्यभरात जल्लोष, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात वाटले पेढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लेजेंड्सने Road Safety World Series मध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Who I am?ओळखा पाहू मी कोण?👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/7S5TNtg2gos~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतदार जागृती आवश्यक* https://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.*'सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'पक्षी जगतातील अभियंता' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) नुकतेच टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या महान टेनिसपटूचे नाव काय आहे ?३) जगात सध्या गेंड्याची संख्या किती आहे ?४) भारताची सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?५) 'राष्ट्रीय बालिका दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सुगरण/बया २) रॉजर फेडरर, स्वित्झरलंड ३) २९ हजार ४) वंदे भारत ५) २४ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. तोफिख खान पठाण● सारंग दलाल, नांदेड● राजू यादव, हैद्राबाद● ओमसेठ गंजेवार, धर्माबाद● विरेश भगवान भंडारे● सतीश आरेवाड● रोहित शिंदे● अरविंद ठक्करवाड● राजेश गाजुलवाड● दिग्विजय अभिजित राजूरकर● प्रथम सुनील नामेवार● अक्षत मनोज तानुरकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत, याचे कारण त्यांचे कामावर प्रेम असते. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीत कंपनीच्या उपयोगी येतो, हा ही भाव असतो. जिथे फक्त पैशांचा विचार होतो तिथे आयुष्यभर राबले, तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट 'जन्माला आला...' या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसे फक्त थकत जातात.**उत्साहाने भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचे एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त, आणि निवृत्तीनंतर काम करणारे या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो, तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीने ती केली, तर ती नाही म्हणणार नाही; पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत मन नसते ती ढेपाळते, चुकते आणि मग थकवा देते. याकरीता दिवसभरात कमी काम झाले, तरी चालेल; पण ते मन:पुर्वक आणि निष्ठेने व्हावे. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*☘☘☘☘☘☘☘☘☘ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *काव्यांगण* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शाळा कॉलेजमधील मित्र-मैत्रिणीचे *......... गेट-टूगेदर ........*कॉलेज मधील मित्र-मैत्रिणीभेटत आहेत कित्येक वर्षांनीमनात दाटल्या जुन्या आठवणीओठावर तेच जुनेच गाणीआनंदाचे ते दिवस मंतरलेलेएकमेकांत जीव गुंतलेलेएकमेकांपासून विभक्त होतांनानयनात किती अश्रू दाटलेलेसंसाराच्या या रहाटगाड्यातविसरून गेलो मी स्वतःला आज पुन्हा या गाठी भेटीनेअर्थ मिळाला माझ्या जीवनालागेले ते दिवस सरला तो काळपुन्हा असा आनंद मिळणे नाहीआयुष्याचे काय खरे असते ?जीवनात भेट होईल की नाहीशालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींचेगेट टूगेदर व्हावे एकदा तरीकोण सुखात कोण आहे दुःखातयाची माहिती ही मिळेल खरीखुरी- नासा येवतीकर, धर्माबाद- 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याकडे धन, संपत्ती, ऐश्वर्य, नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत, तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही, त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,त्याला कशाचाही गर्व नाही अशी माणसे या जगात फार श्रीमंत आहेत आणि भाग्यवानदेखील आहेत.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोठीच त्याची सावली*सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला,'' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला.''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?''''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.◆१८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.💥 जन्म :-●१९११ - राप्पल संगमेश्‍वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.●१९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.● १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.●१९५० - डॉ. अभय बंग. ●१९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक.💥 मृत्यू :-★१९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.★ १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड ! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काँग्रेसला 19 ऑक्टोबरला नवा अध्यक्ष मिळणार, निवडणुकीचे नोटिफिकेशन जारी, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांचे नाव चर्चेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा अध्यक्षांकडून नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रूपी बँकेला हायकोर्टाचा दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हैदराबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी आलेल्या प्रेक्षकांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल सामन्यांची धुमधाम आता देशभर, सामने पुन्हा Home-Away फॉर्मेटमध्ये, सौरव गांगुलीची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Month of the Year 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gZjoOzwNoTs~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण*https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_95.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचनाची गरज* विद्यार्थ्यांनीशिकवण्याच्या आधी वाचले पाहिजे हे आपण पाहिले. मात्र वाचलेले लक्षात राहण्यासाठी काही क्लृप्त्या आहेत. वाचलेले समजणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच ते लक्षात ठेवणे व पाहिजे तेव्हा आठवणे महत्त्वाचे आहे. खाणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच महत्त्वाचे पचवणे असते. वाचण केलेले समजून लक्षात ठेवण्याची व ती वेळेवर आठवण्याची प्रक्रिया पाहू या. वाचनानंतर झोप महत्त्वाची आहे किंवा झोपेतून जागे झाल्यावर वाचन केल्यास फायद्याचे ठरते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी वाचनाचा सराव केला पाहिजे. ज्यांना झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यांच्यासाठी वाचन हे एक वरदान आहे. वाचन हे निद्रानाशावर रामबाण औषध आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचन केल्यास रात्री झोपेत अर्धचेतन मनाद्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते.सकाळी किंवा पहाटे झोपेतून उठल्याबरोबर वाचन केल्यास स्मरणशक्ती सुधारते, कारण झोप पूर्ण झाल्यावर मेंदू व मन ताजेतवाने झालेले असते. त्यामुळे आपली काम करण्याची क्षमता उत्तम असते. नुसते वाचनच नाही तर इतर कोणतीही गोष्ट झोपेतून उठल्याबरोबर केल्यास फायदेशीर ठरते.सकाळी अथवा पहाटे काम उरकण्याचा वेग कमालीचा उच्च असतो. त्यामुळे पहाटे वाचण्याचे व लिहण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी वाचणे हे उपयुक्त आहेच. मात्र दिवसभरात आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचलेले चांगलेच ठरते. वाचलेले दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी काही उपाय आहेत.** ध्यान – नियमित ध्यान केल्यास वाचनाचा वेग व एकाग्रता वाढते. आकलन क्षमता सुध्दा सुधारते. ध्यान दररोज केल्यास त्याचे इतरही फायदे होतात. मनावरील ताण कमी होण्यास व विचारांवर कंट्रोल मिळवण्यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ध्यानामुळे सजगता वाढते.** त्राटक – त्राटक साधना स्मरणशक्ती साठी खूपच लाभदायी आहे. त्राटक करण्याची पध्दती म्हणजे एक मेणबत्ती पेटवून ठेवा. डोळ्याच्या व नजरेच्या समांतरउंचीवर ठेवा. डोळ्याची पापणी न पाडता एकटक त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पहात रहा. सुरवातीला डोळ्यात जळजळ वाटेल. डोळ्यातून पाणीसुध्दा येईल. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी यायला लागल्यास त्राटक साधना थांबवा. नंतर पुन्हा थोड्या वेळाने प्रयत्न करावेत. टप्प्याटप्प्याने हाकालावधी वाढवत दहा मिनिटांपर्यंत न्यावा.त्राटक करण्याची अजून एक पध्दती आहे. एका मोठ्या कागदावर मध्यभागी एक सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. हे वर्तुळ पूर्ण रंगवून घ्या. हा कागद नजरेच्या समांतर उंचीवर ठेवून वरील प्रमाणेच कृती करा. त्राटक साधनेचा कालावधी हा एका बैठकीत १० मिनिटांपर्यंत होण्याचे आपले लक्ष्य असले पाहिजे.** प्राणायाम – प्राणायाम केल्यास मेंदूला होणारा रक्तातील ऑक्सिजन पुरवठा जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे मेंदू तल्लख होतो. प्राणायामाच्या सोप्या पध्दती आहेत. अनुलोम व विलोमाची पाच आवर्तने दिवसातून दोनदा केली पाहिजेत. अनुलोम व विलोम करण्याची प्रक्रिया पाहू या. उजवी नाकपुडी हाताच्या बोटाने बंद करुन डाव्या नाकपुडीने शक्य तितका श्वास घ्यावा. मग डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यावा. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि डाव्या नाकपुडीने सोडावा. या दोन्ही प्रक्रियेला एकत्रित पणे अनुलोम व विलोम म्हणतात. अशी पाच आवर्तने सकाळी एकदा व सायंकाळी एकदा करावीत किंवा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा सुध्दा केल्यास चालेल.वाचनातून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन आपल्या शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वाचनाचे आकलन होणे सुध्दा महत्त्वाचे आहे. वाचन केल्यावर वाचलेल्या विषयाच्या नोट्स काढाव्यात. नंतर वेळ मिळाल्यास त्या नोट्स वाचाव्यात. नोट्स काढणे शक्य नसल्यास वाचलेल्या विषयावर एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा करावी. त्यामुळे त्या व्यक्तीला त्या वाचनाचा लाभ आपण देऊ शकतो. मात्र त्यापेक्षा आपलाच जास्त फायदा त्यातून होतो. वाचलेला विषय लक्षात राहण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. वाचन वाढवून जीवन समृध्द व यशस्वी बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कर्तव्यपथ आणि इंडिया गेटजवळ उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मूर्तिकार कोण ?२) आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे पहिले तीन क्रिकेटपटू कोण आहेत ?३) जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?४) कोणत्या राज्यसरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?५) ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जगातील किती देशांना भेटी दिल्या ?*उत्तरे :-* १) अरुण योगीराज २) सचिन तेंडूलकर, भारत ( १०० शतके ), विराट कोहली, भारत ( ७१ शतके ), रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया ( ७१ शतके ) ३) बुलेट ट्रेन ४) महाराष्ट्र ५) ११७ देश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ डॉ. सुरेश येवतीकर, वरिष्ठ व्यवस्थापकमहाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद◆ सौ. प्राजक्ता कुलकर्णी-पाठक, पुणे◆ रविंद्र जवादे, साहित्यिक◆ विशाल मनवर◆ प्रदीप माळगे◆ वीणा खानविलकर◆ साई सुरेंद्र गादेकर◆ संगीता क्षीरसागर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.**अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.* *॥ रामकृष्णहरी ॥*🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *काव्यांगण* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जुन्या सावकारी ऋणासारखाकसा जीवना तू उणा सारखाविसरलाच जाणार मीही उद्याशकासारखा वा हुणासारखाजरी सत्य आले पुरासारखेउभा ठाकलो मी तृणासारखाअशी कागदा नाळ तोडू नकोइथे शब्द माझा भ्रुणासारखामला तूच शोधीत ये ना कधीतुझ्या शोधतो मी खुणा सारखा— अभिजीत दातेसौजन्य :- इंटरनेट•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात.अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासारविचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 22/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १५९९ - भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव★ १८२७ - जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी देवदूताने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली. (चित्रित)★ १९५५ - ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनचे व्यावसायिकरण सुरू, सहा मिनीटांची जाहिरात ★ २०१३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले💥 जन्म :-★ १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.★ १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.💥 मृत्यू :-★ १५३९ - गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.★ १९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री★२०११ - मन्सुर अली खान पतौडी यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ; राज्यभर शिक्षकांची बाईक रॅली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना मोठा धक्का, जनआंदोलनातून नक्षली शहरी भागात प्रभाव वाढवण्याच्या तयारीत ? सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याची शक्यता*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *घाटकोपरमध्ये ओला चालकाची रिक्षा, टेम्पो, बाईकला धडक; आठ जण जखमी, तीन विद्यार्थ्यांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फिफाचा नियोजित कार्यक्रम उशिरा, उपमुख्यमंत्री अजित पवार अडीच तास ताटकळत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वेळेवर न पोहोचल्याने मंत्रालयातून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पत्राचाळ संदर्भातील भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या आरोपांनंतर शरद पवारांचं राज्य सरकारला आव्हान, लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवने घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईत चालवली होती रिक्षा; 50 रुपये घेऊन बर्थ-डे पार्टीत स्टँडअप कॉमेडी, राजू श्रीवास्तव यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, कोकणकन्या एक्स्प्रेस आता 'सुपरफास्ट', गाडी क्रमांक आणि वेळापत्रकही बदललं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••Class 1st*My fruit basket👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/y-VbWtmOi5E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पालकांचे मुख्याध्यापकांस पत्र*https://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *डायनॅमो म्हणजे काय ?* 📙डायनॅमो म्हणजे वीजउत्पादनाचे यंत्र. या यंत्राची ताकद व आकारावरून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. डायनॅमो म्हटला की, सायकल वा मोटारसायकलसाठी वापरला जाणारा वीजउत्पादक समोर येतो. जनरेटर म्हटला की, घरासाठी, छोट्या कारखान्यांसाठी वीज निर्माण करणारे यंत्र समोर येते. वीजकेंद्रांसाठी याचीच मोठी भावंडे म्हणजे भलीमोठी विद्युतजनित्रे वापरली जातात.डायनॅमोचे तत्त्व *मायकल फॅरडे* यांनी १८३१ साली शोधले. त्याआधीच्या काळात वीज छोट्या बॅटरीत रासायनिक प्रक्रियेतूनच मिळवली जात असे. सलग वीज वापरणे हे त्यामुळे अर्थातच महागडे व अवघडही होते. डायनॅमोचे तत्त्व वापरून विजेचा वापर सुरू झाला आणि सारे चित्रच बदलून गेले.कोणत्याही डायनॅमोमध्ये मुख्यत: लोहचुंबक तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याभोवती फिरतो व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विजेचा वापर तारेच्या वेटोळ्याच्या दोन टोकांमधून घेऊन केला जातो. याउलट परिस्थिती पण असू शकते. म्हणजेच एखाद्या स्थिर चुंबकाभोवती तारेचे वेटोळे फिरत राहते. चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी तारेच्या वेटोळ्याने छेडले जाते, त्यावेळी वीजनिर्मिती होते. डायनॅमो फिरवण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक ताकद हीच या पद्धतीत विद्युतनिर्मितीमध्ये बदलली जाते. एका ऊर्जेचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केले जाऊन हीच ऊर्जा आपण दिव्याच्या उष्णतेच्या स्वरूपात उजेड पाडण्यासाठी वापरतो.डायनॅमोचा वापर सुरू झाला आणि वीजनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली. १८६७ साली मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारी केंद्रेही कार्यरत झाली होती. पण मुख्यतः डायनॅमोचा फायदा दुचाकी वाहनांसाठी आजही होतो. आडनिडय़ा अंधार्‍या रस्त्याला जाताना विजेरी वापरण्याऐवजी डायनॅमो चाकाला लावून फिरेल, अशी व्यवस्था केली की, सायकलचा पुढचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. एवढी त्यातून निर्माण होणाऱ्या विजेची दिव्याला पुरवली जाणारी शक्ती असते.सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवे, हाॅर्न्स, वाहनांमधील छोटी मोठी यंत्रे, (रेडिओ, पाणी साफ करणारा वायपर, निरनिराळे इंडिकेटर्स) चालवण्यासाठी जास्त ताकदीचा डायनॅमोचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर यातून तयार होणारी जास्तीची वीज रासायनिक विद्युतघटात साठवून ठेवण्याची पण अंगभूत व्यवस्था सर्व चारचाकी वाहनात केलेली असते. वाहन सुरू करत असताना किंवा वाहन बंद असताना हीच विद्युतघटातील ऊर्जा वापरून यंत्राकरवी काम करून घेता येते.सहसा दुचाकी वाहनांसाठी वापर केला असता डायनॅमोमधून दीड ते बारा व्होल्ट या दाबाची वीज निर्माण केली जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*You only lose when you give up.* *(तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) नामिबियातून ८ चित्त्यांना भारतात आणणाऱ्या बी - ७४७ या जेट विमानावर कोणत्या प्राण्याचे चित्र रंगवण्यात आले होते ?२) कॉम्रेड ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी लांब पल्ल्याची मॅरेथॉन ( ९० किमी ) स्पर्धेत सहभागी झालेल्या गोंदियातील धावपटूचे नाव काय ?३) कर्तव्यपथ आणि इंडिया गेटजवळ उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उंची किती आहे ?४) ब्रिटनच्या सम्राटपदी ( राजा ) कोणाची निवड झालेली आहे ?५) इ. स.१४०० मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला ?*उत्तरे :-* १) वाघ ( भारताचा राष्ट्रीय प्राणी ) २) बिंदेशसिंह ढाकरवार, गोंदिया ३) २८ फिट ४) चार्ल्स तिसरे ५) वास्को द गामा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सागर घडमोडे● गंगाधर चिमटलवार● खंडोबा खांडरे● सुनील फाळके● श्याम सुरने● आनंद दुड्डे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.**या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वाईट विचार करणारी माणसे स्वत:चेच काय पण इतरांचेही चांगले व्हावे असे कधीही त्यांना सुचत नाही.नेहमी त्यांच्या मनात इतरांना दु:ख कसे देता येईल,त्यांचे असलेले चांगले मन कसे विचलीत करता येईल आणि त्यांना कसा त्रास देता येईल याचाच नेहमी वाईट विचार करत असतात.त्यामुळे त्यांच्या ह्या असूरी वृत्तीमुळे ते जीवनात कधीही समाधानी आणि यशस्वी होऊ शकत नाहीत.अशा वृत्ती असणा-या माणसांचा सहवासात राहणे म्हणजे विषारी सापांशी मैत्री करुन सर्वनाश करुन घेणे होय.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🐉🍁🐉🍁🐉🍁🐉🍁🐉 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कष्टरूपी राजहंस* एक जमीनदार होता. त्‍याला त्‍याच्‍या वाडवडीलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्‍याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्‍याच्‍या या आळशीपणाचा फायदा त्‍याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. त्‍याचे नातेवाईकही या आळशी स्‍वभावाला ओळखून होते व तेही त्‍याच्‍या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्‍याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्‍यात ते मश्‍गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्‍याला भेटण्‍यासाठी आला होता. त्‍याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्‍याच्‍या लक्षात आले. त्‍याने हे जमिनदाराच्‍या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्‍याने मित्राच्‍या बोलण्‍याकडे लक्षच दिले नाही. शेवटी त्‍याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्‍हणाला,’’ मित्रा, मला असे एक संतमहात्‍मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्‍पट करून देऊ शकतील. फक्त तू त्‍यांच्‍या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्‍यास तयार झाला. संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्‍यास सांगितल्‍यावर ते म्‍हणाले,’’ तुझ्या शेतामध्‍ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्‍याचे दर्शन तू घेतल्‍यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्‍या राजहंसाला पाहण्‍यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे.’’ दुस-याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला. त्‍याला तेथे एक आश्‍चर्यकारक दृश्‍य दिसले. त्‍याचा एक नातेवाईक पाठीवर धान्‍याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला. जमिनदार लवकर उठला असल्‍याने तो दूध पिण्‍यासाठी गोठ्यामध्‍ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्‍य त्‍याला दिसले. त्‍याचे नोकर हे दूधामध्‍ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्‍याचे पैसे मिळविण्‍यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्‍याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्‍यांनी सांगितले. जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्‍यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्‍याने जमिनादाराची तब्‍येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्‍याने दूधदुभते, धान्‍य, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्‍न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्‍मा म्‍हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्‍याला ओळखू शकला नाही. परिश्रम,कष्टरुपी नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्‍यात आला आणि त्‍याने तुझ्यातल्‍या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’*तात्‍पर्य :- कष्टरुपी, परिश्रमरूपी परिस ज्‍यांच्‍या ज्‍यांच्‍या आयुष्‍याला स्‍पर्श करतो त्‍यांच्‍या जीवनाचे सोने बनते.मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 21/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आंतरराष्ट्रीय शांति दिन*💥 ठळक घडामोडी :-◆ १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले.◆ २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले.💥 जन्म :-●१९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.●१९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.💥 मृत्यू :-◆ १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पुणे विद्यापीठात 'ABVP'चं ठिय्या आंदोलन, परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिष्णोई समाजाचा विरोध; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोरोना काळातील राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे, राज्य सरकारची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई-पास सुविधा दिली जाणार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मदर डेअरीने गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काश्मीरमध्ये चित्रपट पाहणं शक्य, 1ऑक्टोबरपासून श्रीनगर इथं राज्यातलं पहिलं मल्टिप्लेक्स सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुण्याच्या सरहद संस्थेकडून कारगिल मॅरेथॉनचं आयोजन, राज्यातील धावपटूंचाही सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Action words कृतीयुक्त शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/v82KSVHetDI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - चोरी*https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_20.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *टिश्यू कल्चर म्हणजे काय ?* 📙टिश्यू कल्चर हा शब्द अलीकडे वरचेवर कानावर पडत असला व त्याचा वापर सरसहा सुरू झाला असला तरीही १९०२ साली म्हणजे शंभरापेक्षा जास्त वर्षांपूर्वी *जी. हाबरलँड* यांनी टिश्यू कल्चरची पद्धत शोधून ती यशस्वी करून दाखवली होती. त्यांनाच या शास्त्राचा प्रणेता मानले जाते. एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते. त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते.टिशू कल्चरमध्ये पेशीसंवर्धन करण्यासाठी विविध पूरक माध्यमांचा वापर केला जातो. या माध्यमांतून वाढीला अावश्यक सर्व घटकांचा पुरवठा होतो. एकपशीयपासून छोट्या रोपापर्यंतचा प्रवास अत्यंत नाजूकपणे जपावा लागतो. त्यानंतर ही रोपे लागवडीयोग्य झाल्यावर प्रयोगशाळेतून बाहेर नेतात. मुराशिगे स्कूग यांनी १९६२ मध्ये वापरलेले माध्यम, गँबर्ग यांचे १९६८ चे माध्यम, शेंक व हिल्डर ब्रॅण्ड यांचे १९७२ चे माध्यम अशा काही माध्यमे या वृद्धीसाठी वापरली जातात. नियंत्रित तापमानात, जंतूविरहित अवस्थेत प्रयोगशाळेतच ही वाढ होत असते.या साऱ्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारी सर्व रोपे पूर्णतः एकसारखी असतात. त्यामुळे एकाच प्रकारची, एकाच रंगाची फुले देणारी, एकाच दिवशी फुलणारी अशी रोपे तयार करणे शक्य झाले आहे. शोभिवंत रोपवाटीकांसाठीची रोपटी, केळीच्या बागांसाठीची छोटी रोपे अशांसाठी टिश्यू कल्चरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही आठवड्यांत काही लाख रोपे तयार करणे, त्यांची निर्यात करणे हे केवळ या पद्धतीमुळेच शक्य होते.टिशू कल्चरमुळे दुर्मिळ वनस्पतींचे जतन व वृद्धी, फलोद्यान व उद्यानवृक्षांसाठीची एकसारखी निर्मिती, संशोधन यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. महत्त्वाची व व्यवहारातील अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे खतांचा कमी वापर करून, किडीला सक्षमपणे तोंड देऊ शकणारी, अल्पकाळात पिके देणारी, भरघोस उत्पन्न देणारी वा दुष्काळी वातावरणातही तग धरणारी अशी वनस्पती निर्माण करणे शक्य झाले आहे.या साऱ्या प्रक्रियेतून दुय्यम उत्पादन म्हणूनही काही गोष्टी संशोधकांच्या हाती लागत गेल्या आहेत. काही प्रतिजैविके, रोगनाशके, अल्कलाॅइड्स, हार्मोन्स यांची निर्मिती शक्य होते. एकंदरीतच फार मोठे भांडवल, तज्ज्ञांची देखरेख व अद्ययावत प्रयोगशाळांची आवश्यकता असलेला हा टिश्यू कल्चरचा पसारा व आवाका आपल्या दैनंदिन जीवनाला वेढत चालला आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मध्यप्रदेशच्या पालपूर - कुनो राष्ट्रीय उद्यानात १७ सप्टेंबर २०२२ ला सोडण्यात आलेले ८ चित्ते कोणत्या देशातून आले ?२) 'मिस्टर आयपीएल' अशी ओळख असलेल्या क्रिकेटपटूचे नाव काय ?३) जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती कोणता देश करतो ?४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या कार्याशी संबंधित आहे ?५) कीटकभक्षी वनस्पतींची नावे सांगा.*उत्तरे :-* १) नामिबिया २) सुरेश रैना ३) भारत ४) सामाजिक कार्य ५) घटपर्णी, व्हिनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जिग्नेश क्रांती बुद्धेवार● कु. आद्या साईनाथ लखमावाड● सौ. वर्षाराणी मारोती होनशेट्टे● सचिन तोटावाड● विष्णू गंभीरे● निशांत जिंदमवार● प्रकाश जाधव● स्मिता मिरजकर वडजे● आकाश कोलपकर● गोविंद पाटील*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*श्रीपूर येथील राजा यांच्‍या निधनानंतर त्‍यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्‍यपदी बसविण्‍यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्‍यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्‍याची माता त्‍याला हिंमत देत असे व योग्‍य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्‍या राज्‍यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्‍ही सैन्‍ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्‍या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्‍याला हार पत्‍करावी लागली हे ऐकले तेव्‍हा राजमातेने मनातल्‍या मनात काही ठरवले.**राजवीर झोपण्‍याआधी राजमातेचे दर्शन घेण्‍यासाठी आला तेव्‍हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्‍या मोठ्या तुकड्याला तोडण्‍याचा प्रयत्‍न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्‍या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्‍हणाली,’’खरं बोललास, संख्‍येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्‍याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्‍हा. शत्रूची कितीही संख्‍या तुम्‍हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्‍यात आहे ती जागृत करा. तुमच्‍या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्‍याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्‍चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शोध घ्यायचा असतो तो चांगल्या विचारांचा,बोध घ्यायचा असतो तो गोष्टींचा,सहवास मिळवायचा असतो तो सर्जनशील व्यक्तींचा ज्यामुळे आपल्या जीवनात महत्वाचे बदल होण्यास अनुकूल ठरेल.जेव्हा केव्हा आपण विचार करायचा तर यावेळी वरील तीन गोष्टींबाबत नक्कीच करावा अन्यथा आपल्या जीवनाचे नक्कीच नुकसान होऊ शकेल की,जे आपल्या जीवनासाठी बाधक ठरेल.आपली आपल्या माणसांत आणि इतर लोकांत कवडीचीही किंमत राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गैरसमज आणि अनुमान**एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले...**प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*...*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 20/09/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१६३३ - पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवर खटला चालवण्यात आला.💥 जन्म :-● १८५४ - नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .●१८९७ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.● १९२१ - पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.●१९२२ - द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.●१९२५ - राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.● १९४४ - रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ १९९६ - दया पवार, मराठी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. २१ फेब्रुवारी २०२३ ते २० मार्च २०२३ दरम्यान बारावीच्या परीक्षा होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा दोन मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात पावसाचा जोर कमी, आज मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा 'यलो' अलर्ट*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, राष्ट्रवादी आणि भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली, पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाईंड संजय राऊतच, आरोपपत्रात ईडीचा दावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत? शिंदे सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना बुडालेल्या कोल्हापूरच्या जवानाचाही मृत्यू, मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्याने करूण अंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *जगभरातल्या 500 प्रतिनिधींच्या उपस्थितीत राणी एलिझाबेथला अखेरचा निरोप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उद्याची काळजी आज कशाला*https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_8.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *जायरोस्कोप म्हणजे काय ?* 📙होकायंत्र ज्यावेळी स्थिर राहू शकत नाही, हेलकावे, वळणे, हिंदकळणे यांमुळे त्याचा लोहचुंबक दिशा नीट दाखवायला जेव्हा असमर्थ ठरू लागतो, त्या वेळी जाइरोस्कोप वापरावा लागतो. जमिनीला समांतर स्वरूपात होकायंत्र स्थिर असेल, तेव्हा त्यावरून नेमकी दिशा ज्ञात करून घेता येते. पण पाण्यावर जेव्हा एखादे जहाज वादळात सापडून सतत हेलकावू लागते, तेव्हा आपण पकडलेली दिशा कोणती, असा प्रश्न उद्भवतो. अशीच काहीशी स्थिती विमानात येते.जायरोस्कोप म्हणजे एक जड, स्वतःभोवती फिरणारे चक्रच असते. एका विशिष्ट अक्षाभोवती हे चक्र अत्यंत वेगाने फिरू शकते. या अक्षाची दिशा त्याभोवती असलेल्या मोजपट्टीवर पाहिजे त्या ठिकाणी स्थिर करून मग हे चक्र फिरवायला सुरुवात करतात. थोडक्यात म्हणजे होकायंत्रावरून प्रवासाचे अक्षांश रेखांश पक्के ठरले की सुकाणूची दिशा पकडण्यासाठी जायरोस्कोप स्थिर करून त्याचे चक्र फिरवायला सुरुवात केली जाते. एकदा का चक्र वेगाने फिरू लागले की, याची दिशा हलवणे व त्याचा फिरणारा चक्राचा पृष्ठभाग अक्ष बदलून फिरणे ही जवळपास न होणारी गोष्ट बनते.चक्राने घेतलेला स्वतः भोवतीचा वेग केंद्रीभूत होऊन अशी काही अक्षाभोवती पकड घेतो की ती पकड हलणे व्यवहारत: अशक्य असते. यालाच जायरोस्कोपिक इनर्शिया' किंवा 'जडत्व' असे म्हणतात. यासाठी एकाच गोष्टीची आवश्यकता असते, ती म्हणजे चक्राचा फिरण्याचा वेग अबाधित राखणे. हा वेग जर काही कारणाने कमी होऊ लागला, तर मात्र ज्या आधारावर जायरोस्कोप उभा केलेला, आधारलेला असतो, त्यालाच तो संथपणे गोलाकार फेरी घालू लागतो.जायरोस्कोपचा वापर होकायंत्राच्या जोडीला सर्व प्रकारच्या लांब पल्ल्याच्या जल व हवेतील प्रवासासाठी केला जातो. होकायंत्र वाचणे व त्याचा वापर करणे हे तल्लख खलाशाचे व अधिकाऱ्याचे काम; पण या ऐवजी जाइरोस्कोप दाखवेल ती दिशा पकडणे ही मात्र कोणाही माणसाला जमणारी गोष्ट असू शकते. हाही महत्त्वाचा उपयोग नाही काय ? अंतराळ प्रवासात होकायंत्र बिनकामी ठरते; पण जाइरोस्कोप वापरता येतो. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्वास ठेवा चुकीतुनही चांगले निष्पन्न होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह कोणते ?* वटवृक्ष2) *भावी पिढीचा शिल्पकार कोणाला म्हटले जाते ?* शिक्षक3) *'खेड्याकडे चला' अशी हाक कोणी दिली ?* महात्मा गांधी4) *ऑलिम्पिक ध्वज सर्वात प्रथम कोणत्या वर्षी फडकविण्यात आले ?* 1920 ( बेल्जियम )5) *1 एकर म्हणजे किती आर ?* 40 आर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जिग्नेश क्रांती बुद्धेवार ( सिम्बॅा )● शीतल प्रभू● पांडुरंग कोकरे● धम्मकीर्ती कांबळे● संगीता देशमुख, वसमत● उमेश वडजे पाटील● गणेश भोसले● सुरेश जमपंनगिरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एखादा रिक्षावाला प्रवाशाची चुकून राहिलेली सोन्या-नाण्यांची थैली घर शोधत त्याच्या घरी पोहचवून देतो, आणि मोबदल्यात बक्षिसी नाकारतो. ही प्रामाणिकता थक्क करते! जगण्यासाठी ज्यांचा संघर्ष असतो...आपल्या पायावर जे धड उभेही नसतात, अशा लोकांचे देणारे हात मागे येत नाहीत. कारण माणुसकीवरील त्यांची निष्ठा कुठल्या अपेक्षांची मोहताज नसते. वाट्याला अंधार असला तरी हे लोक उजेड वाटत राहतात जगाला. लौकिक अर्थाचं यश त्यांच्याकडे नसतं, पण त्यांचं निर्मळ जगणं अंतर्मुख करतं माणसाला. फाटक्या आयुष्याला ठिगळ लावत राहयची आणि मूल्य जपत राहायची, हा त्यांचा जीवनधर्म असतो. चांगुलपणाची व सत्याची प्रेरणा देणा-या अशा घटना अंत:करणाचे डोळे करून बघायच्या असतात.**'सच काम किया जग मे जिसने, उसने प्रभुनाम लिया न लिया' असं राष्ट्रसंत तुकडोजींनी सांगितलं. पण आपण उलट जगतो. 'प्रभुनाम लिया जग मे जिसने, उसने सच काम किया न किया' ही आपली धार्मिकता असते. आपले भक्तीचे, प्रतिष्ठेचे शिक्षक विचित्र असतात. आपल्या पायांवर उभं रहाताना ज्यांचे पाय थरथरतात आणि तरीही समाजाला जे इमान देतात, त्यांच्या दातृत्वाच्या हातांना आपणही कृतज्ञतेची फुलं दिली तर? असं लहान होऊन... हाताला हात देऊन निरपेक्ष जगता आलं तर आपसुकच जगणं सुगंधित होते. किती अनोखा आहे माणूस !* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरी आई कि खोटी आई*एका आठ वर्षाच्‍या मुलाची आई देवाघरी जाते. मुलाच्‍या संगोपनात काही अडचण येऊ नये म्‍हणून वडील दुसरे लग्‍न करून त्‍या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात. एक महिन्‍यानंतर वडील मुलाला विचारतात,''बेटा, तुला ही नवीन आई कशी काय वाटते?तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे?'' यावर मुलगा उत्तर देतो,'' बाबा, ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती.'' हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात. त्‍यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे? म्‍हणून पुन्‍हा त्‍या मुलाला विचारतात,'' अरे तुला असे का वाटते ते मला सांग? जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले, प्रसुतीवेदना सहन करून जन्‍म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते? आणि ही काल आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते?'' मुलगा म्‍हणतो,'' बाबा, मी खूप खोडकर आहे हे तुम्‍हाला माहितीच आहे. देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असे म्‍हणत असे. पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे. पण ती मात्र मला जेवण देण्‍यासाठी उन्‍हातान्‍हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळप्रसंगी रागवून, मारून घरी आणत असे व मला स्‍वत:च्‍या मांडीवर बसवून खाऊपिऊ घालत असे आणि ही नवीन आईही पण '' जर तु खोड्या केल्‍या तर तुला मी खायला देणार नाही'' असेच म्‍हणते आणि खरं सांगू का बाबा तुम्‍हाला? गेल्‍या तीन दिवसात खरेच तिने मला खायला दिलेले नाही. म्‍हणूनच मी तिला खरी आई असे म्‍हणत आहे.''तात्‍पर्य :- आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/09/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆२००७ - ट्‌वेंटी-२० क्रिकेटमध्ये एकाच षटकात सहा षटकार मारण्याची कामगिरी करणारा युवराज सिंग पहिलाच क्रिकेटपटू ठरला. त्याने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक नोंदविताना पन्नास धावा करण्यासाठी फक्त १२ चेंडू घेतले.💥 जन्म :-◆१८६७ - पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर, मराठी चित्रकार, वेदाभ्यासक.💥 मृत्यू :-"●१९३६ - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीतज्ञ.●२००१ - अनंतराव दामले, प्रभात फिल्म कंपनीचे संचालक.●२००२ - प्रिया तेंडुलकर, अभिनेत्री .● २००७ - दत्ता डावजेकर ऊर्फ डीडी, संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आपचे दिल्लीत 'राष्ट्रीय अधिवेशन', भाजपविरोधात करणार शक्तिप्रदर्शन, आमदार खासदारांसह प्रमुख नेते राहणार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी 76 टक्के मतदान, राज्यातील 51 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. इतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात येईल.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईसह राज्यभर पावसाची जोरदार हजेरी, विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट, जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * दोन दिवसीय साखर परिषदेला पुण्यात सुरुवात, शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, साखर कारखान्यांचा होणार सन्मान, जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ * तैवानमध्ये 24 तासांत भूकंपाचे 100 धक्के, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *नागपूर मेट्रोचा ब्रँड अँबेसेडर व्हायला आवडेल, बॅडमिंटनपटू मालविका बनसोड ने व्यक्त केली भावना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *परावलंबी जीवन*https://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_28.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *जाडेपणा म्हणजे नेमके काय ?* 📙शरीरातील चरबीचे प्रमाण नको एवढे वाढत गेले, तर जाडी व वजन वाढते. चरबी प्रत्येकाच्या शरीरात असतेच, पण तिचे सर्व शरीरभर योग्य त्या पद्धतीत विवरण करण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली असते. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त खाऊ लागतो, तेव्हा ही व्यवस्था बिघडायला सुरुवात होते. खाण्यात आलेल्या अन्नातून उष्मांक मिळतात. हे उष्मांक जेव्हा रोजच्या रोज खर्च होत नाहीत, तेव्हा शरीर ते साठवू लागते. ही साठवण्याची शरीराची पद्धत म्हणजे चरबीचा साठा वाढवणे.पोटावर, मांड्यांमधील जागेत, नितंबांवरील व हातांच्या दंडामागील भागात प्रथम चरबी साठू लागते. पुरुषांमध्ये जाड माणसाला सफरचंदाचा, तर स्त्रियांमध्ये पीअर या फळाचा आकार प्राप्त होऊ लागतो. सर्वसाधारण आकडेवारीनुसार उंची, वय व वजन यांचे जेवढे प्रमाण असायला हवे, त्यापेक्षा वजन जास्त असेल, तर माणूस जात आहे, त्याने चरबी साठवायला सुरुवात केली आहे, असे समजावे. याखेरीज कातडीमधील चरबीचा साठा रास्त व जास्त आहे, हे ठरवण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे चिमटेही मिळतात. या बाबतीत सोपा घरगुती अंदाज म्हणजे दंडामागील कातडी छोट्या चिमटीत पकडता आली तर चरबीचा साठा रास्त व न आली तर जास्त, असे समजावे !प्रत्येक प्राण्यामध्ये चरबीचा साठा करणे व वापरणे यांवर निसर्ग नियंत्रण ठेवतो. पण माणूस त्याच्या अति खाण्याने व ऐदी वागणुकीने हे नियंत्रण झुगारू पाहतो. साखर, लोणी व मोटार वाहन वापर यांमुळे मानवाने स्वतःचे संतुलन घालवले आहे, असे डॉक्टर मंडळी म्हणतात. वाहनांमुळे हालचाल संपली, साखरेने नको असलेले उष्मांक पोटात वाढू लागले, तर लोण्यामुळे चक्क चरबीच पोटात वाढू लागली. विसाव्या शतकात जाड माणसांचे प्रमाण व त्यातून उद्भवणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.जाड माणसाला जास्त घाम येतो. घामाला वास येत राहतो. थकवा जाणवतो, धाप लागते, जास्त तहान लागते, सतत खावेसे वाटते, खाऊनही समाधान होत नाही. या साध्या साध्या लक्षणानंतरही लक्ष दिले नाही, तर हळूहळू जाड माणसाच्या शरीरात मधुमेह, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार व त्यांतूनच उद्भवणारा हृदयविकार यांचा शिरकाव होतो. वजन जास्त वाढल्याने सांध्यांची झीज होत जाऊन सांधेदुखी, तर पायांतील रक्तवाहिन्यांना शिथिलपणा आल्याने पायांत रक्त साचून पाय दुखणे, सूज येणे सुरू होते. जाड माणसे अपघाताला जास्त निमंत्रण देतात. रस्ता ओलांडताना अचानक आलेले वाहन धडकणे, जिन्यावर तोल न सावरता येणे यांतून हे अपघात घडतात.पूर्ण उपवासाने जाडी कमी करणे हे सोपे आहे. पण कमी केलेली जाडी तशीच टिकवणे हे मात्र अत्यंत कठीण काम आहे. एका आकडेवारीनुसार जाडी कमी केलेल्यांतील जेमतेम ५ टक्के लोकच ती तशीच टिकवण्यात यशस्वी होतात. एकंदरीत खाण्यापिण्याच्या पद्धतीत व जीवनपद्धतीत अत्यंत नियमितपणा आणून सुयोग्य व्यायाम केला, तरच जाडी आटोक्यात राहू शकते.स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर, विद्यार्थ्यांत बैठे काम सुरू झाल्यावर, मध्यम वयात म्हणजे चाळीस ते पन्नास या दरम्यान वजन वाढू लागते. नियमित व्यायाम केल्यास आणि तेलकट, तळकट व गोड खाणे मोजकेच ठेवल्यास जाड होण्याची भीती बाळगायची गरज नाही. हजारभर जाड माणसात एखाद्याचीच जाडी अनुवांशिक असते. ती आटोक्यात आणणे मात्र डॉक्टरांनाच शक्य असते. पण उरलेले सर्वजण मात्र 'हे कोणालाच शक्य नाही', अशा समजुतीत वावरतात.जगातील सर्वात जाड इसम 'जॉन मुनाॅक' याचे वजन होते सहाशे पस्तीस किलोग्रॅम. १९८३ साली त्याचे जेमतेम बेचाळीसाव्या वर्षी निधन झाले. हा विक्रम आजही अबाधित आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“विचार करा निर्णय घ्या, आणि तुम्हाला जे योग्य वाटत तेच करा.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) प्रथम विश्वकप क्रिकेट स्पर्धा केव्हा आयोजित करण्यात आली होती ?२) फुलपाखरास 'राज्य फुलपाखराचा दर्जा' देणारे पहिले राज्य कोणते ?३) नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून लिज ट्रस ह्या ब्रिटनच्या कितव्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत ?४) एक अमेरिकन माणूस एका वर्षात सरासरी किती जोडे विकत घेतो ?५) मंगोलिया या देशाचा दौरा करणारे पहिले भारतीय सरंक्षणमंत्री कोण ?*उत्तरे :-* १) १९७५ २) महाराष्ट्र ३) तिसऱ्या ४) ८ जोडे ( भारत - २ जोडे ) ५) राजनाथ सिंह *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुरज आर बोम्मावार● ठाकूर रविंदसिंह परिहार● अभय कुळकजाईकर● प्रवीण साधू● आनंद पाटील, नाशिक● मनीष बिरादार● सचिन कौठवाड● तृषा गंगाधर तिपनोड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]~~~~~~~~~~~~~~~~~~~या समुहात join होण्यासाठी खालील लिंकद्वारे join होता येईल. https://chat.whatsapp.com/DaK0QvLfzbe6E1coFTHAsC•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.**भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सुखदु:खाच्या सागरातून जीवनरुपी नौका जो मानव चांगल्या प्रकारे जो चालवतो आणि तरुन जातो त्यालाच जीवन म्हणजे काय हे नक्कीच कळलेले असते.अशा सुंदर जीवनाला अधिक सुंदर कसे बनवता येईल त्यासाठी जो सुखातही आणि दु:खातही निरंतर प्रयत्न करतो आणि सुखदुःखाला समान मानतो तोच जीवनात यशस्वी होतो.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०.🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀🚣🏻🚣🏼‍♀ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अति तेथे माती*एकदा एक राजहंस एका बगळय़ाला म्हणाला, 'काय रे, तू आधाशी! पाण्यातला कोणताही प्राणी खायला तू मागे-पुढे पाहात नाहीस. बरे-वाईट, नासके-चांगले हा फरकसुद्धा तुला समजत नाही. माझे पाहा, मी फक्त पूर्ण उमललेल्या कमळातले तंतू तेवढे खाईन, दुसरा कसलाही पदार्थ माझ्या घशाखाली जाणार नाही.' आणि मला तसे आवडणार नाही.त्यावर बगळा म्हणाला, 'माझ्या दृष्टीने असा चोखंदळपणा बारकावा असणे बरे नव्हे. ज्यावेळी जे मिळेल ते खावे अन् सुखी राहावे. खाण्याचा पदार्थ दिसला की, तो खावा हेच शहाणपणाचे.' असे म्हणून बगळा उडाला व जवळच्या तलावाकाठी गेला. तेथे कडेला त्याला मासा दिसला. तेव्हा विचार न करता त्याने तो एकदम गिळला, पण आत असलेला गळ घशाला लागून तो जिवास मुकला. राजहंस आपले आवडते खाणे खाण्यासाठी दुसर्‍या कमळे असलेल्या तळय़ात गेला, पण तेथे हंस धरण्यासाठी जाळे असल्यामुळे तेथे तो अडकला.*तात्पर्यः कोणतीही गोष्ट अति केल्यावर त्याचे परिणाम भोगावे लागते म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक नको.अति तेथे माती होणारच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक ओझोन संरक्षण दिन*💥 ठळक घडामोडी :-●१९६३ - झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक. ●१९६३- मलायाला स्वातंत्र्य.या देशाने मलेशिया हे नाव स्वीकारले.💥 जन्म :-◆१९१६ - एम.एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटक शैलीतील गायिका.◆ १९४२ - ना. धों. महानोर, निसर्ग कवी, शेतकरी, आमदार.💥 मृत्यू :-●१९८९ - हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.● १९९४ - जयवंत दळवी, मराठी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेटने हिमाचल, यूपीसह पाच राज्यातील गोंड समुदायासह इतर काही समुदायांना अनुसूचित जमातीचा दिला दर्जा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात DRDO चा विस्तार, सहा आयआयटीमध्ये उभारणार समन्वय केंद्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मंजूरी*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर, PCM गटातून 13 तर PCB गटातून 14 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल गुण, या परीक्षेला राज्यभरातून 2,31,264 बसले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आदिवासींना शिक्षण आणि रोजगार एकाच छताखाली मिळणार असल्याची मंत्री विजयकुमार गावित यांची ग्वाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ता दिसणार ! नामिबियातून 8 चित्ते भारतात आणणार, जम्बोजेट सज्ज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट विंडिज संघाची घोषणा, आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण यांना वगळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• * 🎯 🚀 *गौरव - गाथा* 🎯 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग - आठवामराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी श्री नामदेवराव नवले पाटील यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावेVideo खालील लिंकवर उपलब्ध.https://youtu.be/c68juf4PdtI~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢* विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *दूरदर्शन* १५ सप्टेंबर ‘दूरदर्शन’ या केंद्र सरकारने सुरू केलेल्या देशातील पहिल्या दूरचित्रवाणी वाहिनीचा वाढदिवस.१५ सप्टेंबर, १९५९ रोजी एक छोटासा ट्रान्समीटर व स्टुडिओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम चालू झाले. राजधानीत दूरदर्शनची ही मुहूर्तमेढ रोवली जाताना ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचा त्यात मोलाचा वाटा होता. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे! पु. लं. देशपांडेनीच "दुरदर्शन" हे नाव सुचवले.दूरदर्शनवरुन बातमीपत्राची नियमित सेवा १९६५ पासून सुरु झाली. १९७२ मध्ये दूरदर्शन सेवा मुंबईत आली. १९७५ मध्ये चेन्नई, श्रीनगर, अमृतसर व लखनौ या शहरांमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरु झाले. उपग्रहाद्वारे सामाजिक शिक्षण अथवा अत्याधुनिक तंत्रज्ञानातून सामाजिक शिक्षण देण्याचा पहिला प्रयोग भारतात केला गेला. सॅटेलाईट इंस्ट्रक्शनल टेलेव्हिजन एक्सपरीमेंटची चाचणी १९७५-७६ या वर्षी घेण्यात आली. याद्वारेच जगात प्रथमच सामाजिक शिक्षणाचा प्रचार घरोघरी करण्यात आला.१९८२ मध्ये दिल्ली आणि अन्य ट्रान्समिटर्स दरम्यान उपग्रहांमार्फ़त प्रसारण सुरु करण्यात आले. १९८२ मध्ये टीव्ही रंगीत झाला. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावरचे भाषण देश पाहू लागला आणि ‘नॅशनल ब्रॉडकास्टर’ ही दूरदर्शनची ओळख रुजली. ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या सावलीतून दूरदर्शन बाहेर आले. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चाळ नावाची वाचाळ वस्ती, गोट्या, बंदिनी, एक शुन्य शुन्य, सर्जा राजा, प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं या मालिका ज्ञान, माहिती आणि निखळ मनोरंजन देण्याचं काम करीत होत्या. व्यत्यय नावाची पाटीही चांगलीच भाव खावून जायची. हिंदीतल्या बुनियाद, हमलोग, ये जो है जिंदगी, रजनी, तमस, रामायण, महाभारत, द वर्ल्ड धिस वीक, दर्पण या मालिकांनी तर मनोरंजनाच्या विश्वात अफाट प्रेक्षक वर्ग मिळवला. अनंत भावे, प्रदीप भिडे, शम्मी नारंग, अविनाश कौर सरीन यांचे आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेले वृत्तनिवेदन प्रेक्षकांना भारावणारे असेच होते. गेल्या दोन दशकांत झालेल्या संज्ञापन क्रांतीमुळे दूरदर्शनचा भारतातला एकाधिकार संपत गेला. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ उपाशी पोटी साधे अन्न देखील रुचकर लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) दिल्लीतील राजपथचे 'कर्तव्यपथ' असे नामकरण कोणाच्या हस्ते झाले ?२) नकाशातील खालच्या बाजूची दिशा कोणती ?३) नेपाळकडून आयपीएल खेळणारा पहिला खेळाडू कोण ?४) पहिले ई - गव्हनर्स धोरण राबविणारे राज्य कोणते ?५) काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) पंतप्रधान नरेंद्र मोदी २) दक्षिण ३) संदीप लामिछाने,२२ वर्ष, दिल्ली कॅपिटलल्स ४) महाराष्ट्र ५) लघुकोन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्रसाद मुतनवाड● लक्ष्मणराव भवरे● साईराम पिंगळे● मंगेश यादव● संतोषभाई ओझा● विठ्ठल आढाव● कृष्णा डाफने*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *"एका चांगल्या गोष्टीबरोबर दुसरी वाईट गोष्ट सोबतच असते. माणूस विद्वान तर आहे, पण त्याला धन आणि मानाची अपेक्षा असेल तर? ही अपेक्षाच त्याचा नाश करत असते, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे." अपेक्षेसोबत अपेक्षाभंग असतो, हे पटवून देण्यासाठी प्रमाणाची आवश्यकता नाही. "आपण ज्या ज्या इच्छा करतो, जेवढ्या अपेक्षा बाळगतो त्या सर्वच्या सर्वच पूर्ण कशा होऊ शकतील? पण माणूस हे समजून घेत नाही. हे पाहिजे, ते पाहिजे या आणि अशा अनेक वासना माणसाला शेवटी भीक मागायला लावत असतात." हव्यासापोटी भिकेला लागण्याची वेळ आली तरी माणूस शहाणा होत नाही.**जुगारात मिळण्याची अपेक्षा सर्व घालवून बसते. राज्यच काय पण बायकोला सुद्धा 'डावात' हरून बसल्याची साक्ष महाभारतासारखे ग्रंथ देतात. संत तुकाराम आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करत आहेत. इच्छेतून अपमानित होण्याची वेळ येणार नाही ही काळजी घेतलीच पाहिजे. "एखाद्या गाढवाचं 'राजहंस' असं अलंकारीक नाव जरी ठेवलं, तरी त्या नावाचं त्या गाढवाला काय भूषण वाटणार आहे?" गाढवाची राजहंस नाव ठेवण्याइतकीसुद्धा पात्रता नसते आणि त्याला त्याचं भूषणही वाटत नसतं.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कळेना काहीहीवाटेत काट्यांचे पडले सडेएकेक सल...कुणाचे कुणाला कधी का असेपुरते बळ?वाटच नुसती हलली असेवाटत राहीहरेक मनात असेच सदायेते का काही?असते तरी का आपले मन आपले खरे? काहीही, कुठेही खुपले जरा, जातात चिरे ऋतूंचे मातीशी असते नाते तसेच हे का? कळेना काहीही असतो जसा प्राक्तन झोका...वासंती मुझुमदार( साभार : साधना दिवाळी अंक )•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कोणत्याही परिस्थितीची जाणीव असलेली व्यक्ती कितीही आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला घाबरत नाही.कारण त्याला माहित असते की,आपण घाबरलो तर समोर असलेली परिस्थिती आपल्या पाठीमागे भूतासारखी मागेच लागते आणि जर नाही घाबरलो तर ती तशीच माघारी फिरते.अशा व्यक्तीला परिस्थितीच जगण्याची जाणीव करून देते आणि त्यातून मार्गही दाखवते.त्यामुळे जीवन जगण्याची आशा पल्लवित करते.ज्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीची जाणीव नाही किंवा कोणतीही त्यातून मार्ग काढण्याची कल्पना नाही अशा व्यक्तीच्या जीवनात कोणतीही परिस्थिती क्षुल्लक असली तरी ती भित्र्या सशासारखीच असते. अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकत नाही किंवा जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.कोणत्या परिस्थितीला कसे आणि कोणत्या प्रकारे तोंड द्यायचे याचे थोडेही ज्ञान अवगत नाही किंवा जाणीवही नाही अशा व्यक्तीकडून कोणताही गुण इतरांना घेण्यासाठी मिळणार नाही.समोर असलेल्या परिस्थितीला निभावून नेण्यासाठी आपल्या मनामध्ये परिस्थितीनुरुप जाणीव निर्माण व्हायला हवी.अशी जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये उपजतच असते फक्त थोडा विचार करायला शिकले पाहिजे.जाणीव ही एक आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी बळ आणि प्रेरणाच देते.त्यामुळे आपल्यातील जाणीवेला नेहमी जीवंत ठेवायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🥙•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभाची शिक्षा*एक इसम यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्‍काळ पडला. त्‍यामुळे इसमला रोजच्‍या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्‍करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला. तेथे वाघाला पाहिले. इसमाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्‍ले तर तर त्‍याची भूक भागेल व माझीही मृत्‍यूची इच्‍छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला. वाघ मनुष्‍यवाणीत बोलू लागला,''तू असा माझ्यासमोर का उभा आहेस'' इसमाने आपली कर्मकहाणी त्‍याला सांगितली. तेव्‍हा वाघाला त्‍याची दया आली. तो प्रत्‍यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती. वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्‍याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्‍य दिले व भविष्‍यात कधीही आत्‍महत्‍येचा विचार करू नकोस असे बजावून त्‍याला परत पाठविले. इसम अत्‍यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्‍यासाठी गेला तेव्‍हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्‍या असे विचारले असता भाबडेपणाने त्या इसमाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्‍यानेही तसेच वागण्‍याचे ठरविले. दुस-याच दिवशी त्‍याने जंगलात जाऊन त्‍याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्‍याच्‍यासमोर प्रगटला. त्‍याला व्‍यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्‍काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्‍याने त्‍याच्‍यावर हल्‍ला चढवला आणि जखमी व्‍यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्‍यायोगे तू असे धाडस पुन्‍हा करणार नाहीसतात्‍पर्य – लोभाने माणसाच्‍या जीवावरही बेतू शकते, लोभ माणसाचे नुकसान करतो. लोभ टाळणे आवश्‍यक आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९३५ - स्वस्तिकचे चिन्ह असलेला ध्वज (चित्रीत) नाझी जर्मनीने आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.★ १९४७ - जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा ज्यात १,०७७ ठार.★ २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले💥 जन्म :-★ १२५४ - मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.★ १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.★ १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.★ १९०९ - सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.💥 मृत्यू :-★ १९२६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन तत्वज्ञानी आणि नोबेल पारितोषिक विजेते★ १९७३ - गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ, स्वीडनचा राजा.★ २००८ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मॉस्कोतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि तैलचित्राचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कारात, राष्ट्रपती मुर्मू राहणार उपस्थित, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जावा, अशी सूचना यूजीसीने दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट झालीये. त्यामुळे खाद्य तेल लवकरच स्वस्त होणार, ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांना दिलासा मिळणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• * 🎯 🚀 *गौरव - गाथा* 🎯 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग - सातवामराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावेVideo खालील लिंकवर उपलब्ध.https://youtu.be/di-nkoyfGwg~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢* विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Actions speaks louder than words.* *( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) केंद्र सरकारने नुकतेच 'राजपथ' च्या ऐवजी आता कोणते नामकरण केले आहे ?२) जगातील कोणत्या कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) म्हणून नियुक्ती केली आहे ?३) संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते ?४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले ?५) विम्बल्डन किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?*उत्तरे :-* १) कर्तव्यपथ २) चिनी मेटाव्हर्स ३) मुक्ताबाई ४) सिडनेहॅम कॉलेज ५) सानिया मिर्झा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ डॉ. हंसराज वैद्य◆ श्रीनाथ संतोष येवतीकर◆ शीतल वाघमारे◆ विजय धडेकर◆ मनोज साळवे◆ माधव पांगरीकर◆ अभिमन्यू चव्हाण◆ राजेंद्र होले◆ एकनाथ जिंकले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.**त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। विचार ।।*बुध्दीवंत करतात चांगला विचारम्हणूनच असतो चांगला आचारजो चांगले विचार करून बोलतोत्याच्या जीवनात असतो सदाचारजास्त संपत्तीची आस धरूनकमविणारा करतो सदा भ्रष्टाचारमैत्री वाढेल आणि टिकेल हीजर असतील आपले सुविचारवाईट बोलण्याने साथ तुटतेम्हणून करू नये कधी अविचार मोकळेपणाने जो करतो संवादसमाजात त्याचा होई मुक्त संचार - नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा*एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 10/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९६६ - भारतीय संसदेने पंजाब पुनर्रचना कायद्याला संमत केला व पूर्व पंजाबचे (नकाशा चित्रीत) विघटन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये आणि चंदिगढ केंद्र शासित प्रदेश अस्तित्त्वात आले.★ १९७४ - गिनी-बिसाउला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.★ १९७५ - व्हायकिंग-२ हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.💥 जन्म :-★ १४८७ - पोप जुलियस तिसरा★ १८८७ - गोविंद वल्लभ पंत, भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.★ १९३४ - रॉजर मारिस, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.★ १९४८ - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.💥 मृत्यू :-★ १९६४ - पं. श्रीधर पार्सेकर, नामवंत व्हायोलिनवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! राज्यात दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, मुंबईचा राजा, लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ, ढोलताशाचा गजरात बाप्पाची मिरवणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नागपूर जिल्ह्यातील चार हजारांवर मतदान केंद्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डची लिंकिंग रविवारी करण्यात येईल. नागरिकांनी आपल्या बीएलओशी संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *देशातील 15 राज्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव, 75 हजार गायींचा मृत्यू, दूध उत्पादनात घट, लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सांगली जिल्ह्यात मनाई आदेश लागू, जनावर बाजार, बैलगाडी शर्यतींवरही बंदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 3 हजार 501 कोटींची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांची नियुक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सात दशकांचा राजेशाही प्रवास संपला, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भालाफेकपटू नीरज चोप्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, डायमंड लीग जिंकत ऐतिहासिक कामगिरी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून डायमंड ट्रॉफी जिंकणाऱ्या नीरज चोप्राचं कौतुक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गौरव गाथा ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग तिसरा - कर्मयोगी साहेबराव देशमुख बारडकरYou Tube Video link 👇🏼https://youtu.be/Pv-TfA8_H7w~~~~~~~~~~~~~~~~~~~*निवेदन :- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769**Subscribe my Channel*~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Actions speaks louder than words.**( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत ?२) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला ८५ वर्षात पहिल्यांदाच खेळाडू अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली ?३) शिक्षक असलेले राष्ट्रपतिपदी विराजमान झालेले राष्ट्रपती किती व कोणते ?४) इंग्लंडच्या पंतप्रधानपदासाठी होणारी मतदान प्रक्रिया पूर्ण करणारे पहिले भारतवंशीय कोण ठरले आहेत ?५) संसर्गजन्य किंवा संक्रामक रोगांची उदाहरणे सांगा.*उत्तरे :-* १) मनीष सिसोदिया २) कल्याण चौबे ३) दोन - डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् व द्रौपदी मुर्मू ४) ऋषी सुनक ५) क्षय, कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर इत्यादी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ समृद्धी नागनाथ चात्रे◆ संतोष पांडागळे◆ ईश्वर यमूल, नांदेड◆ गणेश कोकुलवार, नांदेड◆ नागनाथ शिंदे, नांदेड◆ ज्ञानेश्वर इरलोड◆ प्रवीण भिसे पाटील◆ आकाश गाडे◆ राजू सूर्यवंशी◆ रोहित मुडेवार◆ संभाजी साळुंके◆ विजय गड्डम◆ प्रसाद पुदेवाड◆ राजेश बाबुराव चिटकूलवार◆ विश्वांभर पपुलवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.**त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बालकविता - सूर्यदादा*-------------------सूर्यदादा ऐक ना रेकिती कोपला तू रेनको रे तापू इतकाहोई जीव हैराण रे ।सूर्यदादा काय सांगूरस्ते घरे हे सिमेंटचे जंगल सारे सिमेंटचेनाव नाही सावलीचे ।सूर्यदादा ऊन प्रखरघरे त्यात तापून जातीलोडशेडिंगचा त्रास अतित्यात आजार बळावती ।पिण्यास नाही रे पाणीगेली झाड झुडपं वाळूनीतूच कर आता तरी काहीजीवाची होते लाहीलाही ।---------------------- अरुण वि. देशपांडे, पुणे9850177342--------------------•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा*एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९९४ - सचिन तेंडुलकरने श्रीलंकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतले पहिले शतक ठोकले💥 जन्म :-◆१९४१ - डेनिस रिची, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.◆ १९६७ - अक्षय कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.◆ १९७४ - विक्रम बात्रा, भारतीय थलसेना अधिकारी.💥 मृत्यू :-◆२०१० - वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.◆ २०१५ - दत्तात्रय हेलसकर, जालना*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गणेश विसर्जनासाठी राज्यभर कडक बंदोबस्त, अनेक ठिकाणी वाहतूक मार्गात बदल, गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, पंधरा हजार पोलीस आणि SRPF च्या तुकड्या तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गोकुळकडून गाय दूध खरेदी दरात 15 दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, 11 सप्टेंबरपासून होणार अंमलबजावणी*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ठाण्यात ढगफुटीसदृश पाऊस; तासाभरात 71 मिमी पावसाची नोंद तर मुसळधार पावसानं मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या देखरेखीखाली, प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *देशात यंदा 3 हजार 157 लाख टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज, डाळींसह तेलबियांचं उत्पादनही वाढणार : कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूरमध्ये सोमवारी 12 सप्टेंबरपासून सकाळी 6.15 ते रात्री 10 पर्यंत चालणार मेट्रो सेवा*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *विराट कोहलीच्या वादळी शतकाच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा 101 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग दुसरा - श्री गोविंदभाई श्रॉफhttps://youtu.be/GQdy7jj7QII*Subscribe Channel**🎤 निवेदक - नासा येवतीकर 📢*विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणत, ' प्रत्येक कामाची सुरुवात स्वच्छतेपासून करावी. ' .........https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *क्लोरीन म्हणजे काय ?* 📙खाण्याचे मीठ व पिण्याच्या पाण्याची शुद्धता या दोन महत्वाच्या गोष्टी क्लोरीनमुळेच शक्य झाल्या आहेत. क्लोरीन हा वायू स्वरूपात मिळवला व साठवला जातो. मात्र नैसर्गिकरित्या क्लोरीन आढळत नाही. सोडियम बरोबर त्याचे संयुग पटकन बनते. त्यालाच आपण मीठ म्हणतो. ‍१७७४ साली शील यांनी त्याचा शोध लावला. फिकट हिरव्या रंगावरून ग्रीक भाषेतील क्लोराॅस या शब्दावरून त्याचे नाव पडले आहे. क्लोरीन हा वायू मुख्यतः पाणी शुद्ध करण्याच्या ब्लिचिंग पावडरमध्ये वापरला जातो. त्याच्यामुळे पाण्यातील जंतू मरतात व मुक्त झालेला क्लोरिन हवेत मिसळतो. अगदी सहज पूर्ण झालेल्या या प्रक्रियेमुळेच आपण मोठ्या प्रमाणावर पाण्याचे शुद्धीकरण करून गावे, शहरे, महानगरे यांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करू शकतो.क्लोरिनचे अनेक औद्योगिक उपयोगही आहेत. क्लोरीनचा गैरवापर करून पहिल्या महायुद्धात शत्रूच्या सैनिकांवर त्या वायूचा मारा केला गेला होता. फुप्फुसदाहाने त्यांचा त्यात मृत्यू ओढवला. कोणत्याही जिवंत प्राण्यांसाठी क्लोरीन हा अतिशय घातक वायू आहे. मात्र संयुग स्वरूपातील त्याची उपयुक्तता वादातीत ठरावी. माणसाच्या खाण्यातील एक अत्यावश्यक घटक म्हणजे मीठ. शरीरातील सोडीयमचा साठा अनेक शरीरातील क्रियांना मदत करतो. असा हा घटक म्हणजे सोडियम व क्लोरीनचे संयुग होय. भूल देण्यासाठी कित्येक दशके वापरले गेलेले क्लोरोफार्म हे द्रव्यही क्लोरीनचेच संयुग. क्लोरिनमुळे अनेक पदार्थांचे ऑक्सिडेशन होते. त्यामुळे अनेक रंग, डाग यांचा रंगीतपणा जातो. कपड्यांना नवीन रंग देण्यापूर्वी, कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लिचिंग पद्धतीच्या प्रक्रियेत याचा वापर केला जातो. हायड्रोक्लोरिक अॅसिड मध्ये क्लोरिन असतो व विद्राव्य म्हणून त्याचा वापर अनेक उद्योगांत केला जातो. कार्बनबरोबरचे त्याचे संयुग कार्बनटेट्राक्लोराईड एक उत्तम विद्राव्य आहे. त्याचा वापर आग विझवण्यासाठी केला जातो.क्लोरीनची निर्मिती इलेक्ट्रोलायसिस पद्धतीने केली जाते. समुद्राचे पाणी किंवा पोटॅशियमबरोबरची त्याची निसर्गात सापडणारी संयुगे यांचा वापर त्यासाठी केला जातो. एका परीने या वायूचा शोध हा मानवी प्रगतीला लागलेला मोठा हातभारच आहे, यात शंका नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?२) ब्लुमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार गौतम अडाणी जगात कितव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत ?३) हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने कोणत्या वर्षी गौरविण्यात आले ?४) टोकियो ऑलिंपिकमध्ये सुवर्ण जिंकून देणारा नीरज चोप्राचा भाल्याला BCCI ने किती रुपयात खरेदी केला ?५) INS विक्रांतचे घोषवाक्य ' जयेम सं युधि स्पृध:' चा अर्थ काय आहे ?*उत्तरे :-* १) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् २) तिसऱ्या, संपत्ती - ११ लाख कोटी रुपये / १३७.४ अब्ज डॉलर ३) १९५६ ४) दीड कोटी ५) माझ्याविरुद्ध लढतील त्या सर्वांना मी पराभूत करीन.*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गणेश कल्याणकर, नांदेड● महेश ठाकरे, सकाळ प्रतिनिधी, अमरावती● पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर● श्रीकांत पाटील, येवती● उमाकांत कोटूरवार● गंगाधर गुरलोड, येवती● मारोती ताकलोर● अर्षद खान● किशन माटकर● रमेश पेंडकर● गोविंदराव ईपकलवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*यज्ञ, विवाह, ई. धार्मिक विधींचे वेळी अग्रपूजेचा-म्हणजे प्रथम -पूजेचा मान कोणत्या देवाला द्यावा, याबद्दल एकदा देवांमध्ये वाद सुरु झाला. प्रत्येकाला हा मान आपल्याला मिळावा असे वाटू लागले.अखेर हा तंटा ब्रम्हदेवांकडे गेला असता, ते म्हणाले, 'आपण कुणाही एका देवाला अग्रपूजेचा मान दिला, तर इतर देव नाराज होतील. तेव्हा हा निर्णय कसा घ्यावा, याचा मी एक मार्ग सुचवतो. जो देव या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून सर्वात अगोदर माझ्याकडे येईल, त्याला हा अग्रपूजेचा मान बहाल केला जावा.'सर्वच देवांना हा तोडगा मान्य करावा लागला. मग प्रत्येकजण आपापल्या वाहनांवर स्वार होऊन, पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला. कुणी वाघावर, कुणी गरुडावर तर कुणी मोरावर.**श्रीगणेशाने विचार केला 'आपलं वाहन उंदीर, एकतर त्यावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा करणं अशक्य आणि दुसरं म्हणजे ते शक्य झालंच, तरी या स्पर्धेत विजयी होणं हे त्याहूनही अशक्य!' हा विचार मनात येताच त्याला एक युक्ती सुचली. त्याबरोबर तो घरी गेला व पार्वतीला म्हणाला, 'आई, तू थोडा वेळ बाबांजवळ जाऊन बसतेस का? 'पार्वती म्हणाली, 'ही रे काय थट्टा आरंभलीस? 'यावर शंकर म्हणाले,'तो सांगतोय तर येऊन बैस ना तू माझ्याजवळ. पार्वती शंकराजवळ जाऊन बसताच, गणेश त्या दोघांना सात प्रदक्षिणा घालून पुन्हा ब्रम्हदेवाकडे आला, हा स्थूलदेही गणपती पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन एवढ्या लवकर कसा परत आला, असा ब्रम्हदेवांना प्रश्न पडला, पण गणेशाने आपण योजलेल्या युक्तीची माहिती देताच ब्रम्हदेवांना त्यांच॔ म्हणणं मान्य करावं लागलं. सर्व देवांपुढे उभे राहून ब्रम्हदेव म्हणाले, 'आई ही पृथ्वीस्वरुप असून, वडील नारायणस्वरुप आहेत. त्यामुळे त्यांना घातलेली प्रदक्षिणा ही पृथ्वीप्रदक्षिणेपेक्षाही श्रेष्ठ आहे. महाबुध्दीवान गणेशाने त्याच्या आई-वडिलांना एकच नव्हे, तर सात प्रदक्षिणा घातल्या व तो सर्वांच्या आधी मजकडे आला; म्हणून अग्रपूजेचा अधिकारी 'श्रीगणेश' असल्याचा निर्णय मी देत आहे.'* ••●‼ *श्रीगणेशाय नम:*‼●•• ☘☘☘☘☘☘☘☘☘ *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भान मैत्रीचे*ठेवुनिच भान या मैत्रीचे जपूया जीवनभर नातीनकोत हेवेदावे मैत्रीमध्येपाळू नकाच जातीपाती असावे भान अशा मैत्रीचेजपुया नाती सगळे छाननको रुसवे-फुगवे नखरेद्यावा परस्परांनाही मानटिकवावी निरंतर नातीराखावाच मानसन्मानठेवूनि भान सुंदर मैत्रीचेफुलावी अशी मैत्री छान देऊया मैत्रीचा हात हातीपीडित दु:खी पामरालादेवाजीची ही कृपा मर्जीवरदहस्त असा लेकराला बांधू रेशमी बंध नात्यांचाजुळवून मैत्रीचे अतूट धागेजीवन हे क्षणभंगुर असतासोडून देऊ रागरुसवे मागेफुलावीच मैत्री कुसुमासमदरवळावा नात्यांचा सुगंधहात साह्याचा देऊनी हातीराहू आनंदाने होऊ बेधूंदसौ.भारती सावंत, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कोणत्याही क्षेत्रात यश आणि प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी ठराविक कालावधी,वेळ, जिद्द,सातत्य,परिश्रम,ज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य हवे असते तर याशिवाय प्रगती होत नाही.याउलट अधोगतीचे आहे.अधोगतीला कोणतीही अट नाही.कोणत्याही क्षणी माणसाच्या डोक्यात कोणतेही विध्वंसक वाईट विचार आले की,अधोगती ही क्रांतीरुपाने होते आणि त्यांचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *घोडा आणि नदी*एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....प्रत्येकजण आपआपल्या अनुभवाने सल्ला देतात. तो सल्ला कितपत योग्य आणि बरोबर आहे ते जाणून घेणे महत्त्वाचे आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 08/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस*💥 ठळक घडामोडी :-★ १८३१ - विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.★ १९०० - अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.★ १९४५ - शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.★ १९६६ - स्टार ट्रेक (चित्रित) मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.💥 जन्म :-★ ११५७ - रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.★ १२०७ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.★ १८३० - फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.★ १९३३ - आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक (चित्रित).💥 मृत्यू :-★ ७०१ - पोप सर्जियस पहिला (चित्रित).★ १९६५ - हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.★ १९८० - विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.★ १९८१ - हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिवाळीनंतर निवडणुकांचा बार? मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये घेण्यासाठी हालचाली, राज्यातील 1166 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 13 ऑक्टोबरला मतदान, सरपंचपदासाठी थेट निवडणूक*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई, ठाणे, पनवेलसह उपनगरात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाराष्ट्र सत्तासंघर्ष: निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत पुढील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी; सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट लावणे असेल बंधनकारक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इंडिया गेटवरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण परिसर म्हणजे 'कर्तव्यपथ'चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार उदघाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने बुधवारी रात्री उशिरा NEET UG 2022 चा निकाल जाहीर केला. महाराष्ट्रातून ऋषि विनय बालसे या विद्यार्थ्याने 710 मार्क पटकावले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमांचक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर विजय, भारताचं आशिया कप स्पर्धेतील आव्हान संपलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा**भाग पहिला - विशेष माहिती*https://youtu.be/rL2dyVMCbY4~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢*विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रत्येक शाळेला संरक्षण भिंत हवे*https://nasayeotikar.blogspot.com/2018/01/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *गरम पाण्याचे झरे* 📙हिमालयात प्रवासाला जाणारे परतल्यावर नेहमीच एक आश्चर्याचा किस्सा सांगतात. गंगोत्रीच्या वाटेवर वाटेत काही कुंडे लागतात. कुडकुडणारी थंडी, दूरवर डोंगरमाथ्यावर सफेद बर्फाचे थर आणि या कुंडातून मात्र पाण्यातून चक्क वाफा निघत असतात. हात बुडवला तर चटका बसतो. एवढेच नवे अनेक जण जवळचे तांदूळ त्या पाण्यात काहीवेळा कापडी पुरचुंडी बांधून धरतात व आयता शिजलेला भात खातात. हे पाणी काढून मनसोक्त आंघोळ करण्याचा मोहही कोणी आवरून धरत नाही. असाच पण जरा वेगळा अनुभव वज्रेश्वरीला महाराष्ट्रात येतो. पण येथील झऱ्यांचे पाणी गंधक मिश्रित उग्र वासाचे आहे. येथील उष्ण पाण्यात अंघोळ करून निसर्गोपचार करून घेणाऱ्यांचीही कायम गर्दी उसळलेली असते. जगात असे गरम पाण्याचे कित्येक झरे आहेत. तसेच फक्त वाफेचेही झरे आहेत. वाफेच्या झर्‍यातून फक्त जोरात वाफ उसळून एखाद्या प्रेशरकुकरप्रमाणे तेथे शिट्टीचा आवाजही येत राहतो. या सगळ्या प्रकाराचे मूळ भूगर्भात खोलवर घडणाऱ्या घडामोडीत आहे. सुमारे तीस एक किलोमीटर खोलीवर तप्त मध्यावरणाचा पाण्याच्या वाहत्या साठ्याशी संबंध येतो. तिथे वाफ कोंडू लागते. या वाफेच्या दाबाने जमिनीतील खडकातील काही भेगांतून मार्ग काढला जाऊ शकतो. त्यातूनच हे झरे निर्माण होतात. काही ठिकाणी ज्वालामुखीच्या मुखापासून काही ठराविक अंतरावर प्रथम वाफेचे व नंतर गरम पाण्याचे झरे सलगपणे आढळतात. पण अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा अलीकडच्या ज्ञात काळात कधीच संबंध आलेला नसतो. हेही लक्षात घ्यायला लागेल. यातही एक मोठा फरक आहे. वाफेचे झरे मधूनमधून नाहीसे होतात, पण गरम पाण्याचे झरे मात्र सलगपणे वर्षानुवर्षे उकळताना दिसतात. काही झर्‍यांत गंधकाचा अंश सापडतो. ते नक्कीच ज्वालामुखीच्या उगमाशी संबंधित असावेत असा संशय घ्यायला जागा आहे.पृथ्वीचा गाभा अत्यंत गरम आहे मध्यावरणही अतितप्त आहे. पण बाह्यावरणाचा काही भाग बऱ्याच ठिकाणी भरपूर गरम आहे असेही लक्षात आले आहे. आईसलँड, न्यूझीलंड येथील काही भागात जेमतेम एक ते तीन किलोमीटर अंतर खोलवर बोअरिंगचे छिद्र पाडले असता भूगर्भातील गरम पाणी व वाफ मिळवता येते असा अनुभव आहे. जरी एवढे खोल छिद्र पाडणे अत्यंत महागडे असले तरी यातून मिळणारी ऊर्जा ही अनेक वर्षे पुरणार असल्याने हा खर्च परवडतो. हे गरम पाणी वा वाफ वापरून घरे उष्ण ठेवण्याचा वा विद्युतनिर्मिती उद्योग यातूनच केला जातो. येथेही गमतीचा भाग कसा आहे बघा. आइसलँड व न्यूझीलंडसारख्या थंड प्रदेशातही निसर्गाने ही सोय करून ठेवली आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ एक चागंली माता शंभर शिक्षकांच्या मोलाची असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'राष्ट्रीय युवक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 12 जानेवारी2) *विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?* 5 वर्ष3) *विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?* आमदार4) *महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते ?* नागपूर5) *राज्याचा प्रमुख कोण असतो ?* राज्यपाल*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ एल. एन. गोडबोले, विस्तार अधिकारी, अर्धापुर◆ नवाब पाशा शेख◆ मिर्झा खालेद बेग◆ शंकर सारगोड◆ कृष्णा हंबर्डे◆ बालाजी वारले◆ योगेश जंगले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक छोटी कथा सांगितली जाते. एका दुष्काळी प्रदेशातील एक दुष्काळी गाव. नद्या, विहिरी आटलेल्या, पाण्यासाठी दशदिशा, आम्हा फिरविशी जगदीशा...अशी अवस्था. पावसाळा सुरू होतो. पाऊस काही येईना. शेवटी सगळा गाव एकत्र येतो. गंभीर परिस्थितीवर गंभीर चर्चा होते. उपाय सुचविले जातात. शेवटचा प्रयत्न म्हणून गावालगतच्या डोंगरावर जाऊन पावसासाठी देवाची प्रार्थना करायचे ठरते. सारा गाव ठरल्याप्रमाणे एकत्र येतो. थकलेली, तहानलेली पावलं नव्या उमेदीनं डोंगराकडे चालायला लागतात.**या सर्व मोठ्या माणसांमध्ये एक मुलगा हातात छत्री घेऊन चालत असतो. या मुलाकडे बघून सर्वांना आश्चर्य वाटते. पावसाचा टिपूस नाही. येण्याची शक्यताही नाही आणि हा चिमुरडा सोबत छत्री घेऊन आलाय. शेवटी एकजण त्या चिमुरड्याला विचारतो..'बाळा, तू ही छत्री सोबत आणलीस?' छोटा मुलगा उत्तरतो. 'पावसासाठी प्रार्थना करायला आपण डोंगरावर जात आहोत आणि मी प्रार्थना केल्यावर पाऊस येणारच आहे. म्हणून मी छत्री सोबत घेतलीय.' हा स्वत:च्या प्रार्थनेवरचा ठाम विश्वास! एकूण दुसरं पाऊल पडणार आहे. या विश्वासावरच पहिलं पाऊल उचलावं लागतं.* 〰 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 〰 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्यांनी आपल्या जीवनात कधीही असत्याला थारा दिला नाही,मनात कुणाचेही वाईट चिंतले नाही, इतरांकडे कधी वक्रदृष्टीने पाहिले नाही,दुस-या चे ते माझे कधी म्हटले नाही,कधीही कशाची मनात लालसा ठेवली नाही,कधीही कुणासोबत स्पर्धा केली नाही,जीवनात जे काही करायचे ते आपल्या प्रयत्नाने करायचे,जे काही शक्य आहे ते आपण मन लावून करायचे,जे काही मिळेल त्यात समाधानाने स्वीकारायचे असे गुण ज्यांच्या जीवनात परिपूर्ण आहेत तीच माणसे आपल्या जीवनात सुखी व समृद्ध होऊ शकतात आणि तीच माणसे इतरांना आपल्या जीवनासारखे जीवन जगण्यासाठी प्रेरीत करतात आणि आपणही त्यांचे गुण आत्मसात करून चांगले जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे तरच आपल्या जीवनाचे खरे कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹🌾🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्‍याला प्रत्‍येकाच्‍या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’**तात्‍पर्य – आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात....**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 07/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेद दिन*💥 ठळक घडामोडी :-●१९५३ - निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.● १९०६- बँक आफ इंडिया ची स्थापना झाली.💥 जन्म :-◆ १९३६ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.◆ १९५५ - अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-●१५५२ - गुरु अनंग देव, दुसरे शीख गुरु.● १९५३ - भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षण वैधतेबाबतची सुनावणी 13 सप्टेंबरपासून सुरु होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शेख हसीना यांनी घेतली मोदींची भेट, भारत-बांगलादेशमध्ये झाले 7 करार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *कोरोनाविरोधातील लढाईला बळ; नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षक दिनी पंतप्रधानांची मोठी घोषणा; PM-SHRI योजनेंतर्गत 14 हजार 500 शाळा अपग्रेड होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पावसाचा जोर वाढणार, करपणाऱ्या पिकांना मिळणार जीवदान तर रब्बीसाठी पहिली सलामी, गणपती विसर्जनाच्या वेळी कोल्हापूर, सांगली, सातारसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पाच वर्षांमध्ये रस्ते अपघातात 41 हजार जणांचा मृत्यू, आरटीआयमधून धक्कादायक माहिती समोर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषकातील सुपर 4 लढतीमध्ये भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. या पराभवासह भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*पाचवी - रोमन संख्यचिन्हांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/IpHmSTqxpio~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागरूक पालकच खरे मालक* वास्तविक पाहता शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यासोबत त्यास शिकविणारे शिक्षक जेवढे जबाबदार आहेत त्याच्याच तुलनेत त्यांचे पालक सुद्धा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कारणीभूत घटक आहेत. शाळेतील शिक्षक मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत जीवाचे रान करतांना, विद्यार्थ्यांच्या घरात मात्र दूषित वातावरण असेल तर पालथ्या घागरीवर पाणी नव्हे का ? ज्या ठिकाणी शिक्षक व पालक यांच्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत संवाद घडून येतो त्याच ठिकाणी आपणाला विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि प्रगती आढळून येते.......https://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_61.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संस्कारक्षम जीवन**जीवनात संस्काराचे खूप महत्त्व आहे.* संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात व उत्तरम आकार देतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. संस्काराशिवाय जीवन म्हणजे ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे असते. आदर्श जीवनाचा पाया म्हणजे संस्कारच आहेत. संस्कारक्षमतेविना जीवन म्हणजे पाण्याविणा मासा. कारण माशाच्या अस्तित्वासाठी पाणी हवेच तसेच मनुष्याच्या या जीवनाला उत्तम आकार हे संस्कारच देऊ शकतात. संस्कार म्हणजे मनुष्याच्या अंगी असणारे सद्विचार, सद्गुण. संस्कारशिल व्यक्‍तीच स्वतःची व समाजाची उन्नती करू शकतो हे आपणाला पाहिला मिळते आणि हेच संस्कार व्यवहारिक जीवनाबरोबर पारमार्थिक उन्नतीदेखील करून देते.त्यामुळेच एक चांगला व्यक्‍ती बनण्याची सुरुवात ही प्रत्येकाची आपल्या घरापासून सुरु होते. त्यामुळे ज्याच्या अंगी संस्कारयुक्‍त आचार विचार असतील त्याच्याद्वारे सर्व व्यवहार नियमबद्ध चाकोरीत चालतात. प्रकृतीही आपल्या नियमाने चालते. जसे कि, दिवस-रात्र, महिने, ऋतु सर्वकाही नियमाने चालतात.हिवाळा आणि उन्हाळा पण निसर्गनियमांप्रमाणे येतात व जातात. यामुळेच जगातील सर्व व्यवहार व्यवस्थितरितीने पार पाडतात. हे सर्व जगाच्या कल्याणासाठी घडत असते. असेच संस्कारित असणाऱ्या व्यक्‍तीकडूनही अशाप्रकार सर्वकाही नियमावलीनेच घडते.म्हणून मानवसमाजाने देखील आपले जीवन सुखी होण्यासाठी चांगले संस्कार स्वतःमध्ये रूजविले पाहिजे. या सर्व गोष्टींची सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे घरातूनच व्हायला पाहिजे. एक चांगला मनुष्य व आदर्श नागरिक बनविण्याची सुरुवात घरातूनच व्हायला हवी. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारतात गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होण्याचे मुख्य कारण काय ? २) सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक स्पर्धा खेळणारा भारतीय क्रिकेटपटू कोण ?३) तांदूळ उत्पादनात जगातील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता ?४) चंद्राचा परिवलन व परिभ्रमण कालावधी कसा असतो ?५) स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू विक्रांत युद्धनौकाची लांबी, रुंदी व उंची किती मीटर आहे ? *उत्तरे :-* १) डायक्लोफेनक औषध - ह्या औषधाने बाधीत मेलेल्या गुरांचे मांस खाल्यास मूत्रपिंड निकामी होते. २) रोहित शर्मा ३) चीन ४) समान ५) लांबी - २६२ मी, रुंदी - ६२ मी, उंची - ५९ मी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● प्र. श्री. जाधव● त्र्यंबक स्वामी● गजानन जाधव● भारत पाटील● सुमीत पेटेकर● हणमंत गायकवाड● गोविंद पटेल● सिद्धू पुरी● भास्कर चटलोड● दशरथ याटलवार● प्रवीण कुमार ● पवन धनडु*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"या जगात अनेक जातीचे प्राणी, अनेक जातीच्या वनस्पती इ. आहेत. (आंब्याची जात गोड चवीची तर कारल्याची जात कडू चवीची.) अशा अनेक जातींचे अनेक वेगवेगळे रंग आहेत. अशा अनेकविध जाती आणि त्यांच्या गुणधर्मानुसार व्यक्त होणारे रंग-ढंग एकत्र येऊन तर 'जग' हे नाव निर्माण झालं आहे." या जगात खूप काही असलं तरी हिताचं जे मोजकंच आहे, त्याला खरी किंमत आहे. 'शब्दज्ञान' किती मर्यादित असतं, याचं बोधक उदाहरण म्हणजे "उजेड काजव्यातूनही निघतो, पण तो फक्त त्याच्या पार्श्वभागापूरताच उजेड देतो, आणि तेही कायम नाही देत; तर चालू-बंद, चालू-बंद असा देतो." शब्दज्ञान हे काजव्याच्या उजेडासारखं आहे. ते देणा-याच्यासुद्धा समोर प्रकाश पाडत नाही. असा उजेड जगाला काय प्रकाश देणार? शब्दज्ञानानं समाजाचं जाऊ द्या, स्वतःचंही भलं होऊ शकत नाही.**स्वतःसहीत समाजाचंही भलं करायचं असेल, तर कॉपी-पेस्ट बंद झालं पाहिजे. ज्ञान आता शब्दांचं नको तर अनुभवाचं असायला हवं.--**तुका म्हणे झरा । आहे मुळचाची खरा ।।**तुकोबा म्हणतात, "माझं ज्ञान हे काही कुठून आयात केलेलं नाही. ते कॉपी केलेलं नाही. माझ्या ज्ञानाचा जो झरा आहे, तो माझ्या अंतःकरणातून प्रकट होतो." याउलट शब्दज्ञानी माणसाचं ज्ञान समुद्राइतकं विशाल दिसत असलं, तरी ते अनेक नद्या, नाले, झरे यांच्यावाटे आलेलं आहे. जरी विशाल असला तरी समुद्राचं पाणी तहानलेल्याची तहान भागू शकत नाही, तसं शब्दज्ञान लोकांचं भलं करू शकत नाही. त्यासाठी आवश्यकता आहे ती अनुभवाच्या झ-याचीच.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*।। फुलपाखरू नि काटे ।।*फुलपाखरू जेंव्हा जेंव्हा जातेरस शोषण्यासाठी फुलांकडेतेंव्हा तेंव्हा तिचे लक्ष असतेफुलांच्या झाडावरील काट्याकडेसंकटाचा सामना करावा लागतोम्हणून ती फुलांकडे जाणे सोडत नाहीअंगाला काटे टोचतात म्हणूनफुलांतील रस घेणे सोडत नाहीमिळेल किती ही कष्ट वायेवो किती ही संकटेआपले कर्म सोडायचे नाहीसांगते फुलपाखरू नि काटे- नासा येवतीकर, 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता*एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्‍यास सुरुवात केली होती. त्‍याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्‍गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्‍पर्ध्‍याचे कच्‍चे दुवे ओळखून त्‍याला सहज पराभूत करण्‍यात त्‍याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्‍याने वृद्ध योद्धा सोडल्‍यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्‍याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्‍याच्‍या मनात अहंकार जागृत झाला. त्‍याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्‍य' हे बिरूद लावून मिरवू. त्‍याने वृद्ध योद्ध्याला आव्‍हान दिले. शिष्‍यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्‍याचे आव्‍हान स्‍वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्‍या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्‍यातील विजयाची कल्‍पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्‍ये त्‍याच्‍यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्‍या प्रत्‍येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्‍याने वृद्धाला अपशब्‍द वापरण्‍यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्‍याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्‍याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्‍याने स्‍वत:हून हार पत्‍करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्‍यावर शिष्‍यांनी व वृद्धाच्‍या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्‍हाला अपशब्‍द वापरत होता तरी तुम्‍ही शांत कसे राहिलात'' तेव्‍हा वृद्ध गुरु म्‍हणाला,'' मुलांनो कोणत्‍याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्‍वाची असते. कोणत्‍याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''*तात्‍पर्य : मनाची एकाग्रता साधल्‍याने बरेचशी कामे साध्‍य होतात. मन एकाग्र करून कोणतेही काम केल्‍यास हमखास यश मिळतेच.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~ *🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/09/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-●१९६५ - भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.●१९६६ - दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.💥 जन्म :-◆ १९२९ - यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.◆ १९७१ - देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-●१९६६ - हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.●१९९० - लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शाळांना पायाभूत सुविधा देण्यासाठी निधींची कमतरता पडू देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिक्षक दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदेच्या आमची शाळा आम्ही चालवू उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळेतून एकाच दिवशी स्वयंशासन दिन साजरा*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशातील 46 शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं गौरव, त्यात महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राजकीय शक्ती आणि गणेशभक्ती! मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर अमित शाह मुंबई दौऱ्यावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई अहमदाबाद हायवेवर 118 किलोमीटरच्या पट्ट्यात 29 धोकादायक ब्लॅक स्पॉट; वर्षभरात चारशेच्या आसपास बळी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *लिझ ट्रस ब्रिटनचे नवीन पंतप्रधान, भारतीय वंशाचे ऋषी सुनक पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिक्षकदिनी यूजीसीचं गिफ्ट; 5 वेगवेगळे अनुदान आणि फेलोशिपची घोषणा; सावित्रीबाईंच्या नावानंही एक फेलोशिप*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Home Things Class 3rd Revision👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EeKe5Pr4Stk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बलात्काराचे वाढते प्रमाण कधी थांबणार ?*https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कुष्ठरोग म्हणजे काय ?* 📙कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. यावर प्रतिबंधक लस तयार झाली आहे, पण ती अद्याप प्रयोगावस्थेत आहे. याखेरीज तिचा वापर कसा करावा, याविषयी शास्त्रज्ञ व डॉक्टर यांच्यामध्येच अजून एकमत नाही. मात्र विविध प्रकारच्या औषधांचा वापर करून कुष्ठरोग निर्मूलन आता आवाक्यात आले आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेला वाटते. दर दहा हजार व्यक्तींमागे एक रुग्ण असे प्रमाण सध्या भारतात आढळते. अगदी प्रारंभिक अवस्थेतील रोगाचे निदान करून त्यावर औषधांचा उपयोग केल्यास कुष्ठरोग पूर्णपणे बरा करता येतो. कुष्ठरोग काटकीसारख्या दिसणाऱ्या सूक्ष्मजंतूंमुळे होतो. त्यांची कृत्रिम वाढ करणे शक्य झालेले नाही. या रोगाचे जंतू मानवी शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा त्यांचा पेशीजालाशी संघर्ष होतो. एका प्रकारात या संघर्षात जंतू व पेशीजाल या दोन्हींचा नाश घडतो. या प्रकाराला 'नॉन लेप्रोमॅटस' किंवा 'असंसर्गिक' समजतात. म्हणजे रोगाचे परिणाम जरी शरीरावर दिसत असले, तरी त्यात जंतू नसल्याने ही व्यक्ती संसर्ग देऊ शकत नाही. दुसऱ्या प्रकारात मात्र जंतूंची अनिर्बंध वाढ होत राहते. तेथे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असते. मात्र जंतुंची संख्या वाढत गेल्यामुळे सर्व शरीरभर रोग पसरत राहतो. प्राथमिक अवस्थेत पेशीजाल फारसे नष्ट होत नाही. विकोपाला गेल्यावर मात्र ढोबळ चिन्हे दिसून येतात. हा प्रकार सांसर्गिक असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुष्ठरोग अत्यंत मंदगतीने वाढणारा आजार आहे. सुरुवातीची लक्षणे व प्रगत अवस्थेतील चिन्हे यात फारच फरक आहे. समाजासमोर प्रगत अवस्थाच येत असल्याने या रुग्णांबद्दल एक प्रचंड भीती व तिरस्कार अनेक शतके समाजात घट्ट गैरसमजुती निर्माण करत आहे. शारीरिक विद्रुपता व त्यापासून होणारे सामाजिक व आर्थिक परिणाम टाळण्यासाठी रोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखून इलाज सुरू करणे महत्त्वाचे ठरते. शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेच्या रंगापेक्षा वेगळ्या रंगाचा लालसर चट्टा व डाग दिसून या रोगाची सुरुवात होते. कोडाप्रमाणे हे डाग पांढरे नसतात. अतिगडद त्वचेवरील डाग लक्षात यायला वेळही लागतो. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जागीच्या त्वचेचे स्पर्श, उष्णता व वेदना या तिन्हींचे ज्ञान गेलेले असते. अशा जागीची त्वचा किंचित खरवडून तिची सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी करतात. त्यात रोगाचे जंतू असतील, तर तो सांसर्गिक प्रकार ठरवला जातो. जंतू नसतील, तो असांसर्गिक असतो. भारतातील सुमारे ८० टक्के रूग्ण असांसर्गिक प्रकारात असतात. जेमतेम २० टक्के रुग्णांचाच इतरांना संसर्ग होऊ शकतो.मुख्य गोष्ट म्हणजे दोन्ही प्रकारच्या रुग्णांना एक ते दोन वर्षे औषधयोजनेची गरज असते. अन्यथा अतिसंथपणे वाढणाऱ्या या रोगाचे चट्टे अनेक ठिकाणी दिसू लागतात. हातापायांची बोटे वाकडी होणे, क्षते पडणे, जखमा चिघळणे हे मुख्यतः संवेदना नष्ट झाल्याने वाढत जाते. रोगाचा उद्भव झाल्याने चेहऱ्यावरच्या गाठी, कानाच्या पाळ्यांवर व नाकावर येणारी विद्रुपता, भुवयांचे केस जाणे यांमुळे प्रगत अवस्थेतील रुग्ण हा समाजातून बाहेर फेकला जायला सुरुवात होते. पण ही अवस्था न आलेली किमान ९० टक्के कुष्ठरोगी समाजातच वावरत असतात. त्यांच्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी त्यांच्यावर निदान व उपचार करणे हाच एकमेव प्रतिबंधाचा उपाय राहतो. कुष्ठरोग हाही एक जंतुजन्य रोग असून तो पूर्ण बरा होऊ शकतो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायलाच हवी.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशातील स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौकेचे नाव काय ?२) गहू उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता ?३) दूषित हवा, पाणी, अन्न व वाहक ( कीटक व प्राणी ) यांच्यामार्फत पसरणाऱ्या रोगांना काय म्हणतात ?४) भारताच्या कोणत्या फलंदाजाला ' शैलीदार फलंदाज ' म्हणून ओळखले जाते ?५) ज्या रेषेच्या दोन्ही बाजूस खंड असतात, त्या रेषेला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) आयएनएस विक्रांत २) चीन ३) संसर्गजन्य रोग ४) व्हीव्हीएस लक्ष्मण ५) रेषाखंड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुनील ठाणेकर, देगलूर● गणेश शिंदे, शहापूर, ठाणे● महेश वडजे● विठ्ठल तुकडेकर● रितेश पोकलवार● प्रशिक कैवारे● विकास डुमणे● अनिल सोनकांबळे● आनंद गायकवाड● सचिन पाटील*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तारूण्य आणि संगत यांचे महत्व विशद करताना जैन मुनीं तरूण सागर महाराज सांगतात, 'आपले मित्र, चित्र आंणि चरित्र नेहमी पवित्र ठेवा; कारण तेच खरे जीवनाचे अस्त्र आहे. तुम्हाला तर हे माहित आहे की., चारित्र्याचे पतन होण्यासाठी बहुधा चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र यांचाच हात असतो. चुकीचे मित्र आणि चुकीचे चित्र हेच चारित्र्य नष्ट करण्याचे शस्त्र आहे किंवा असेही म्हणता येईल की, कधीही न चुकणारे ब्रम्हास्त्र आहे.' तारुण्याच्या सळसळत्या उर्जेवर स्वार्थी व्यवस्थांचा डोळा असतो. त्यामुळेच तारूण्याची ऊर्जा सैरभैर करून तिला आपल्या इच्छेप्रमाणे वापरण्याचे धूर्त राजकारण या स्वार्थी व्यवस्था करत असतात. तारुण्याच्या ऐन उमेदीचा कालखंड निरर्थकपणे या स्वार्थी व्यवस्थेच्या नेतृत्वामागे घालविला जातो.**एखादी पाण्याची बाटली वापरून फेकून द्यावी, त्या पद्धतीने तरुणांच्या ऊर्जेचा वापर करून त्यांना शेवटी फेकून दिले जाते. सर्व बाजूंनी निष्क्रिय केलेल्या तरूणांवर शेवटी पश्चात्तापाची वेळ येते. तारूण्याचे रखरखीत वाळवंट होते. आपले तारूण्य विवेकशून्य व्यवस्थेच्या हाती द्यायचे की, स्वत:वर विश्वास ठेवत स्वकर्तृत्वाच्या बळावर समाज जीवनात उजळवून टाकायचे हे ज्याला समजले, त्याला तारुण्याचा खरा अर्थ कळला. माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे युवकांना देशाची संपत्ती म्हणायचे, ही संपत्ती देशासाठी आपत्ती ठरू नये म्हणून तरूणांनी आपले मित्र विचारपूर्वक निवडावेत.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*।। गावपण ।।*पूर्वी गावातली लोकं वागत होती प्रेमानेदुःखात प्रत्येकांच्याधावून येती वेगानेजरी घरं असली लहानपण मन मात्र होतं मोठंफसवेगिरी करत नसतवागत नव्हते कोणी खोटंगावातल्या गावात होताचालत सारा व्यवहारकामाच्या मोबदल्यातधान्य मिळत होते फारपैसा घुसला घराघरांतसंपली ही बलुतेदारीकोणत्याही कामांसाठीपैसाच लागतो भारीशेजारधर्म अजूनहीटिकून आहे गावातसण उत्सव असेल घरीसर्व उभे राही दारात- नासा येवतीकर, धर्माबाद9423625769 या सदरसाठी आपली कविता 9423625769 वर whatsapp करावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे सुगंधीत असलेल्या फुलांना आम्ही सुगंधीत आहोत म्हणून तुम्ही आमच्याकडे या आणि सुगंध घ्या असं कधीच म्हणावं लागतं नाही.आपोआपच सुगंध असणा-या फुलांकडे लोक आकर्षित होतात. त्याचप्रमाणे सज्जन माणसे कधीच कुणाला म्हणत नाहीत की,तुम्हीआमच्याकडे आमच्या सहवासात या आणि आमचे सद्गुण घ्या. आपोआपच सर्वसामान्य माणसे सज्जनांच्या सहवासात जाऊन आपल्यातील असलेल्या दुर्गुणावर मात करुन सद्गुणी होण्याचा प्रयत्न करतात.तात्पर्य असा की सद्गुणांचा सहवास हाच दुर्गुणावर मात करु शकतो.त्यासाठी आपली मानसिकता असावी लागते.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *त्‍यागाचे महत्‍व*फार वर्षापूर्वी एक स्‍वाभिमानी राजा होऊन गेला. त्‍याचे राज्‍य मोठे होते आणि अपार संपत्तीने खजिना भरलेला होता. त्‍याचे महाल सोन्‍यापासून बनलेले होते. नोकरचाकरांची रेलचेल होती. मात्र त्‍याचे सल्‍लागार त्‍याच्‍या अहंकाराला प्रोत्‍साहन देत होते. एकदा त्‍याच्‍या दरबारात एक तेज:पुंज साधू आला. राजाला पाहूनच त्‍याने ओळखले की राजाला फार गर्व चढला आहे. राजाने मोठ्या तो-यात विचारले,''तुला काय पाहिजे?'' साधू म्‍हणाला,'' राजन, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. उलट मीच तुला काहीतरी देण्‍यास आलो आहे.'' राजाचा अहंकार दुखावला व राजा मोठ्याने ओरडला,''लहान तोंडी मोठा घास घेतोस. लाज वाटते का नाही. तुझ्याजवळ फुटकी कवडी नाही अन तू मला काय देणार?'' साधू मंद स्मित करत म्‍हणाला,''राजन, त्‍यागाशिवाय भोगाला चव येत नाही. वैभवात जेव्‍हा त्‍याग समाविष्‍ट होते तेव्‍हा तो वंदनीय आणि प्रशंसनीय ठरतो. त्‍याग येताच अहंकार दूर होतो. आसक्ती दूर होते आणि मन परमात्‍म्‍याकडे पोहोचण्‍यासाठी तयार होते.'' फकीराच्‍या राजा खजील झाला आणि त्‍याचे डोळे उघडले. त्‍याने गर्वाचा त्‍याग केला.तात्‍पर्य :- त्‍यागाने अहंकाराचा नाश होतो. अहंकार हा मनुष्‍याचे नुकसान करतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/09/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 .🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षक दिन*💥 ठळक घडामोडी :-◆२००५ - मंडाला एरलाइन्स फ्लाइट ०९१ हे बोईंग ७३७-२०० प्रकारचे विमान इंडोनेशियातील सुमात्रा बेटावरील दाट वस्तीच्या भागात कोसळले. विमानातील १०४ व जमीनीवरील ३९ व्यक्ती ठार.💥 जन्म :-◆१८८८ - सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती.◆१९१० - फिरोझ पालिया, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-●१९९७ - मदर तेरेसा, समाजसेविका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशातील सामान्य नागरिक गर्तेत अडकला असून, पंतप्रधान मोदी केवळ दोन उद्योगपतींसाठी काम करत आहेत, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *चायनीज लोन अप्लिकेशन प्रकरणी ED ची मुंबईत छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *जगाला कळणार भारताची ताकद, येत्या काळात भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय, आता वाहतूक पोलिसांवरच होणार कारवाई; ई-चलान मशिन ऐवजी खासगी मोबाईल वापरल्यास दंड*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात दुर्दैवी निधन, उद्योगविश्वावर शोककळा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले अपघाताच्या चौकशीचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिके आडवी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकदिन विशेष लेख**बदलत्या काळात शिक्षकांची भूमिका*https://bit.ly/2kiaD5Gलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *काँक्रिट म्हणजे काय ?* 📙एखादी चर्चा चालू आहे. विविध सूचना केल्या जात आहेत. त्यावर फक्त चर्चाच होते आहे. पुन्हा सूचना येतात. पुन्हा चर्चा. अशा वेळी कोणीतरी वैतागून म्हणते, 'काहीतरी काँक्रीट घडू द्या ना !' म्हणजेच मूर्त किंवा साकार असे त्याला सुचवायचे असते.एखादी अत्यंत पक्की, नीट साधलेली, एकत्र बांधलेली गोष्ट म्हणजे काँक्रीट. व्यवहारात गेली सत्तर एक वर्षे काँक्रिट म्हणजे सिमेंट काँक्रिटच होय. सिमेंटचा शोध लागून वापर सुरू झाल्यावर त्यापासून विविध मिश्रणे वापरली गेली. सिमेंट व वाळूचे मिश्रण कायम पक्के राहत नाही. सिमेंट व खडी एकमेकांना बांधून राहत नाहीत. पण सिमेंट, बारीक वाळू, जाड वाळू, खडी यांचे मिश्रण करून त्यात योग्य प्रमाणात पाणी घालून कालवले, तर ते हवे तेवढे पक्के होते. अगदी दगडच म्हणा ना ! याला काँक्रिट किंवा शास्त्रीय भाषेत प्लेन सिमेंट काँक्रीट (PCC) म्हणतात.खूप मोठा भार सहन करण्याचा या काँक्रेटचा गुण बघून त्याचा वापर सुरू झाला. रस्ते बनवणे, विमानांच्या धावपट्टय़ा तयार करणे यांसाठी सिमेंट वापर वापरतात व धरणे बांधताना भिंतीसाठी काँक्रिटचे प्रचंड ठोकळेच वापरतात. एवढेच काय, पण समुद्र हटवण्यासाठीसुद्धा काँक्रिटचे मोठे आकाराचे विविध ठोकळे वापरून फुटणाऱ्या लाटांचा जोर त्यावर येईल, अशी व्यवस्था केली जाते. रेल्वेसाठी रूळ टाकताना जमिनीत जे स्लिपर्स आडवे घातले जातात, तेही गेली काही वर्षे काँक्रिटचेच वापरले जातात. एखाद्या पुलाचा पाया वा एखाद्या अतिउंच इमारतीचा पाया खोदून झाला की, प्रथम त्या खड्ड्यांमध्ये जवळपास फूटभर जाडीचे पीसीसीच ओतले जाते. ते पक्के झाले की मग त्यावर पुढचे काम सुरू होते.आपल्या देशात जवळपास न वापरला गेलेला पण अनेक देशांत उपयोगात आणलेला पीसीसीचा एक वापर म्हणजे अणुबाँब स्फोटापासून वाचवण्यासाठी तयार केलेली सुरक्षाघरे. या सुरक्षाघरांच्या भिंती दोन ते तीन फूट जाडीच्या पीसीसीने बनवतात. छतासाठी व पिलर्ससाठी सुद्धा खास रिएन्फोर्स्ड काँक्रीट (म्हणजे सळ्या घालून ताकद वाढवलेले, ताण सोसू शकणारे) वापरलेले असते. या काँक्रिटच्या जाडीतून रेडिओ उत्सर्जन आत पोहोचू शकत नाही.यासारखा दुसरा एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे महासत्तांनी तयार केलेली आंतरखंडीय क्षेपणास्त्रे व त्यांवर बसवलेले अण्वस्त्रे सुरक्षित ठेवायला तयार केलेली महाप्रचंड तळघरे. यांना 'सिलो' म्हणतात. यांची बांधणीसुद्धा अशीच तीन तीन फूट जाडीच्या काँक्रिटने केलेली असते. शत्रूच्या क्षेपणास्त्रानेसुद्धा विध्वंस होणार नाही, इतकी पक्की रचना या सिलोंची असते. काँक्रिटच्या पक्केपणाचा महिमा हा असा आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *'शिक्षक दिन' केव्हा साजरा केला जातो ?* 5 सप्टेंबर2) *शिक्षक दिन कोणाच्या जन्म दिवसानिमित्त साजरा केला जातो ?* डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन3) *जगात किती देशात शिक्षक दिवस साजरा केला जातो ?* 1004) *भारतात कोणत्या वर्षी प्रथम शिक्षक दिवस साजरा केला गेला ?* 19625) *डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला ?* 5 सप्टेंबर 1888*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौरभ सुरेश सावंत, नांदेड● नितीन शिंदे● रत्नाकर चिखले● राजकुमार काळे● रत्नजित पाटील पटारे● धोंडोपंत मानवतकर● लक्ष्मीनारायण येरकलवार● नरेश रेड्डी● पांडुरंग बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गरीब माणसाला घरापासून दूर राहून पोटाच्या चार घासासाठी प्रचंड मरमर करावी लागते. पण पैशावाल्याच्या बाबतीत हे होत नाही. "एका बसल्या ठिकाणी त्याचा व्यापार चालतो. त्याला घर सोडून कुठेही जावं लागत नाही." गरीबाला एका वस्तूसाठी पैशाअभावी कुढत मरावं लागतं. शेवटपर्यंत ती वस्तू मिळेलच असं होतं नाही. पण "श्रीमंताला मात्र पाहिजे असणारी कोणतीही वस्तू रानावनातच काय या पृथ्वीतलावर कुठंही असली तरी पैशाच्या जोरावर मिळवणं सोपं असतं आणि वस्तू कोणतीही असू द्या, कितीही अनमोल असू द्या, कितीही महत्वाची असू द्या, शक्यतो जास्तीचे पैसे देऊन मिळवता येणार नाही, इतकी ती अवघड नसतेच." थोडे जास्त पैसे देऊन अति मौल्यवान वस्तुसुद्धा पैश्यावाल्याला सहज मिळवता येते.**म्हणून, पैसा माणसाच्या आयुष्यात यासाठी महत्वाचा आहे. पैसा वाईट मार्गाने कमवायचा तर नाहीच, पण चांगल्या मार्गाने खूप पैसा कमवून तो वाईट मार्गावर खर्च सुद्धा नाही करायचा. चांगल्या मार्गाने कमावलेला खूप पैसा 'आनंदी आणि सुखकर आयुष्य' जगण्यासाठी खर्च करायचा आहे. पैशाचा लोभ नाही आणि तिरस्कारही नाही. त्याची हाव नको आणि त्याच्याविषयी विरक्ती नको. पैसा कमवताना आनंदाने कमवायचा तसाच तो खर्च करतानासुद्धा जीवनात आनंदच असला पाहिजे. एवढा सुंदर असा 'मध्यम मार्ग' संतानी आपल्याला दिला आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गुरू देव*मुलांना देउनी आत्मज्ञानजागरूक त्यांना बनवीशिक्षणाने होतो विकासगुरुजीं सदा हेच शिकवीजगण्याची रीत कळतेशत्रू असो की दानव गुरुच्या संपर्कात येऊन बनतात सर्वच मानवगुरु शेवटी गुरु असतोत्याला जगात नाही तोडत्यांचे बोलणे ऐकलो नाहीजीवनाला मिळते वेगळे मोडप्रत्येकाला असतो गुरुत्याविना मिळत नाही यशआपल्या थोड्या अज्ञानामुळेआपणांस कोणीही करतो वशम्हणून गुरुला देव मानूनीसदा त्यांची सेवा करूशिक्षकदिनाच्या निमित्तानेसदविचाराची कास धरु© नासा येवतीकर, कन्या शाळा धर्माबाद, जि. नांदेड 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवा*द्रोणाचार्य जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी गेले तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोणाचार्य स्वतः परम गुरु होते. मात्र त्यांना एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता. आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काल रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या प्रकाशात भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरही अर्जुन भोजन करत राहिला.अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही."तात्पर्य :- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.ज्ञानारुपी दिवा नेहमी तेवत ठेवत राहणे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९७१-कतारला स्वातंत्र्य मिळाले.◆ १९१६-अँनी बेझंट यांनी 'होमरूल लीग 'ची स्थापना केली.💥 जन्म :-● १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.● १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-● १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.● १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जगाला कळणार 'मेड इन इंडिया'ची ताकद, पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात सामील, भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा; पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित'*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून अखेर मुंबई महापालिकेत परवानगीचा अर्ज, शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांकडून अर्ज दाखल*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पटसंख्येच्या तुलनेत राज्यात शिक्षकांची संख्या अधिक, सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही ? प्रशांत बंब यांचा सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *BMC निवडणुकीत नवीन समीकरण ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यात राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस; IMD ने वर्तवला सुधारीत अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात पुन्हा वादळ उठणार, आता काँग्रेसचा गट फुटणार ? देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण याचं स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने हाँगकाँगला पराभूत करत सुपर 4 मध्ये मिळवली एन्ट्री ज्यामुळे आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना रविवारी पार पडणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कै. सायन्ना गुरुजी येवतीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय*ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022* http://nasayeotikar.blogspot.com/2022/09/active-teachers-award-2022.htmlसर्व विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन .......!________________________•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Telling the time👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Np63m86Rvu4~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते -Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो.वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्‍या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत?२) एका वन-डे सामन्यात सर्वाधिक विकेट कोणी घेतले ?३) पृथ्वीवर पूर्व -पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषाना काय म्हणतात ?४) लष्करावर खर्च करण्यात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?५) ९० अंश मापाच्या कोनाला काय म्हणतात ?उत्तरे :- १) अब्दुल सत्तार २) चामिंडा वास, श्रीलंका ( ८ बळी ) ३) अक्षवृत्ते ४) तिसरा ५) काटकोन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ. शिवकांता बिज्जेवार, नांदेड● महेंद्र सोनेवाने, साहित्यिक, गोंदिया● आशिष हातोडे● राज कुमारे● प्रदीप पंदिलवाड● भिमराव सोनटक्के*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.**याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कविता - स्पंदने*-----------जमाना बदलला म्हणेआता काॅम्पुटर आला.....कामं व्हायला लागलीत पटपटपण जिवंत हाताला कामचउरलं नाही.....बेकारांचे कारखाने मात्र निर्माणहोतायतं क्षणाक्षणाला...दारिद्र्यांचे आक्रोशमाॅनिटरमध्ये साचत नाहीतआणि वात्सल्याची स्पंदनंकि बोर्ड मध्ये नाचत नाहीत..,म्हणे आम्ही ग्लोबल झालो...शेजार्‍यांच्या अंत्ययात्रे दिवशीदार लावून घेणारी संस्कृतीनिर्माण झाली या तंत्रज्ञानामुळं...तुम्ही कितीही पुढे जा,पण..आईच्या दूधानं तृप्त झालेल्यालेकराचा ढेकरातील आनंदमोजण्याचं यंत्र तुम्हीशोधू शकणार नाहीहे मात्र नक्की.....-आबासाहेब निर्मळे.नविन वसाहत पेठ वडगांव,ता.हातकणंगले जि.कोल्हापूर.9028090266.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते.पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ?© व्यंकटेश काटकर, नांदेड९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निर्णय*एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ... पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला..मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला.मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवनपण बदलले,मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल.*तात्पर्य : जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 02/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९४५ - जपानी आत्मसमर्पणाचा करारनामावर स्वाक्षरी करुन (चित्रीत) औपचारिकपणे दुसरे महायुद्ध समाप्त झाले.★ १९४६ - भारताचे अंतरिम सरकार स्थापन झाले.★ २००८ - गूगल ने गूगल क्रोम हे आंतरजाल न्याहाळक सुरु केले.💥 जन्म :-★ १८५३ - विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.★ १९५२ - जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.★ १९६६ - सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.★ १९८८ - इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-★ १९६९ - हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.★ १९७३ - जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.★ २००९ - वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.★ २०११ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार‎*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सर्वसामान्यांना दिलासा! इंडियन ऑईलनं १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांपर्यंत कमी केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गर्भाशयाच्या कर्करोगावर पहिल्या स्वदेशी लसीचं सीरम इन्स्टिट्यूटकडून लाँचिंग, गर्भाशयाच्या कर्करोगावरील लसीची किंमत 200 ते 400 रुपये असण्याची शक्यता : अदर पुनावाला*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *2024 मध्ये सत्तेवर यायचंय, शिवसेनेसोबतच्या युतीनंतर संभाजी ब्रिगेड कामाला, मराठा सेवा संघात मोठे बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आमदार प्रशांत बंब यांचा नवा बॉम्ब; शिक्षक, पदवीधर मतदारसंघ बंद करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस, नाशिकसह वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज ठाकरेंची केवळ सदिच्छा भेट, कोणतीही राजकीय चर्चा नाही, एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडिया आणि अफगाणिस्तान संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये आपलं स्थान केलं पक्कं केलं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Wild animals जंगली प्राण्यांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/LR9yPbGBL2E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• गणेशोत्सव 2022 निमित्ताने पहिल्या चारोळी लेखन स्पर्धेचे परीक्षण श्री अरविंद कुलकर्णी, पुणे यांनी केले आहे आणि विजेती चारोळी आहे आई ज्याची पार्वतीपिता ज्याचा महेशमूषकावर बसून आलाआपला लाडका गणेश !दर्शन जोशी, संगमनेर7972849435अभिनंदन ! अभिनंदन !~~~~~~~~~~~~~~~~~~~*गणेशोत्सव - 2022 निमित्ताने*दुसरी स्पर्धा - मोदक विषयावर चारोळी लिहा आणि बक्षीस जिंकाhttps://www.facebook.com/100003503492582/posts/5131314210328645/चारोळी लिहिण्यासाठी वरील लिंकवर क्लीक करावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संयोजक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कावीळ म्हणजे काय ?* 📙कावीळ किंवा कामला हा एक स्वतंत्र विकार मानण्यापेक्षा ते एक रोगलक्षण मानणे सयुक्तिक आहे. यकृतातून बाहेर जाणाऱ्या पित्तरसापेक्षा अधिक पित्तरस यकृतात तयार होऊ लागला म्हणजे कावीळ होते. जास्तीचा शिल्लक राहिलेला पित्ताचा भाग रक्तात मिसळला जातो व सर्व शरीरभर पसरतो. यातूनच डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. त्वचेचा रंग पिवळसर होऊ लागतो. लघवी पिवळी होते व तीव्र काविळीत लालसर पिवळी दिसते. पित्त यकृतातून बाहेर पडताना पित्तनलिकेत किंवा प्रत्यक्ष यकृतांतर्गत अडथळा निर्माण झाला, तर शौचास पांढरेफिके होऊ लागते.कावीळ हे यकृतविकृतीचे किंवा रक्तातील तांबड्यापेशी जास्त नाश पावत असल्याचे चिन्ह होय. या रोगाचे निदान मुत्रपरीक्षेतून व रक्ताच्या चाचण्यांतून होते. नवजात बालकाला रक्तपेशींचे दान निसर्गाने जरा सढळपणे दिलेले असते. त्यामुळे जन्मानंतर काही दिवसांतच या जास्तीच्या पेशी नाश पावतात व मंद स्वरूपात कावीळ उद्भवते. पण ती आपोआपच थोड्याच दिवसांत नाहीशी होते. क्वचित ती तीव्र स्वरूपात व अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशीच दिसल्यास त्या बालकाला फोटोथेरपी हा अल्ट्राव्हाॅयलेट किरणांचा उपचार दिला जातो. हिमोलायटिक ऍनिमिया या रक्तक्षयाच्या आजारातही रक्तपेशींचा नाश होत असल्याने कावीळ होते. मूळ कारण दूर झाल्यास ती बरी होते.आपण सहसा काविळीचा रुग्ण पाहतो, तो विषाणूजन्य पाण्यातून झालेल्या संसर्गाचा बळी असतो. तोंडावाटे पाण्यातून हे विषाणू शरीरात प्रवेश करतात व त्यामुळे यकृताला सूज येते, कार्यात अडथळा होतो. यकृताचे तांबड्या रक्तपेशी नष्ट करण्याचे काम नीट न झाल्याने कावीळ दिसू लागते. मळमळ, ओकारी, भूक मंदावणे, गुबारा धरणे, शरीराला कंड सुटणे, मलावरोध ही लक्षणे प्राधान्याने सर्वच रुग्णांत दिसतात. डोळ्यांचा, त्वचेचा व मूत्राचा रंग पिवळा होतो, तर शौचास पांढरट चिकणमातीसारखे होऊ लागते. पचनास आवश्यक पित्तरसाचा अभाव झाल्याने ही लक्षणे दिसतात. सामान्यपणे पाच ते दहा दिवसांत हा आजार बरा होतो.दुसऱ्या प्रकारच्या काविळीत म्हणजे रक्ताद्वारे संसर्ग होणाऱ्या काविळीत विषाणू एकाच्या रक्तातून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. इंजेक्शनच्या सुया, शस्त्रक्रियेच्या सुया वा रक्त यांच्याशी सतत संपर्क येणाऱ्या सिस्टर, डॉक्टर यांसारखी व्यक्ती, सर्जन यांना हा संसर्ग होण्याची शक्यता असते. ही कावीळ तीव्र स्वरूपाची असून बरी व्हायला खूप वेळ लागतो. काही वेळा यकृतदाह होऊन यकृताचे काम कायमचेच मंदावत जाते. यालाच 'लिव्हर सिर्‍हाॅसिस' असे म्हणतात. सिर्‍हाॅसिसमध्ये यकृत आक्रसत जाऊन त्याचे काम बंद पडत जाते. हा एक गंभीर रोग आहे. सध्या काविळीची लस (हेपॅटायटिस बी) टोचली जाते, ती या प्रकारच्या काविळीला प्रतिबंध करते. या प्रकारच्या काविळीवर उपचार नसल्याने प्रतिबंध हाच योग्य उपाय तर ठरतो.अंथरुणात पडून पूर्ण विश्रांती, तोंडावाटे भरपूर शर्करायुक्त पेयद्रव्ये, हलका कर्बयुक्त आहार घेतल्यास सर्वसामान्य कावीळ आपोआप नियंत्रणात येते. तीव्र लक्षणांत शिरेवाटे ग्लुकोज सलाईन देऊन रुग्णाच्या पचनसंस्थेला आराम देऊन मदत केली जाते.कावीळ हा विषाणूजन्य आजार असल्याने रुग्णाशी संपर्क आल्यास हात स्वच्छ धुणे, त्याची भांडी, अंथरूण, कपडे यांची वेगळी व्यवस्था करणे व अन्य लोकांनी पाणी उकळून पिणे हा प्रतिबंधाचा महत्त्वाचा मार्ग असतो.शेवटी पण महत्त्वाचे, काविळीची लक्षणे व प्रत्यक्ष संसर्ग होण्याची कारणे जरी दूर झाली, तरी रुग्णाच्या डोळ्यांचा रंग काही आठवडे पिवळसर राहतो व हळूहळू नेहमीसारखा होतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*A positive attitude can overcome a negative situation.** ( सकारात्मक दृष्टीकोनाने नकारात्मक परिस्थितीवर मात करू शकते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● राजाराम राठोड, शिक्षक, नांदेड● प्रवीण इंगळे● शरद शेळकांडे, जुन्नर● विठ्ठल पाटील● किशोर तळोकार साहित्यिक, अमरावती● अनुजा देशमुख, साहित्यिक, नाशिक● रवी भलगे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.**याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शेवटी निसर्गच राजा!!*🙏😊🙏😊🙏😊🙏मुग सोयाबिन फुलतोय,चारा झोकात डूलतोय !मका ही होऊन ताठ,पावसाची पहातोय वाट!!स्वयंघोषित जल तज्ञांची,मिटवली त्याने खाज!यंदा भरपूर पावसाचे,खोटे ठरले सारे अंदाज!!कितीही वापरा यंत्रणा,ठेवा लक्ष अष्टो प्रहरी!वाडवडिलांनी सांगून ठेवलंय,निसर्ग आहे लहरी!!शास्त्रज्ञ समजती बाप स्वत:ला,पण तो तर आहे आजा!आपण पामर असह्य बापुडे,आणि निसर्ग आहे राजा!! *राजेंद्र नारायणे* 9850608131•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सर्वसामान्य माणसाच्या जीवनात मागचे दिवस आठवले की,अंगावर रोमांच उभे राहतात आणि भूतकाळ जसा एखाद्या चित्रपटातील क्रमाक्रमाने प्रसंग आठवायला लागतात.असे प्रसंग पुन्हा आपल्यासमोर उभे राहू नये म्हणून तो मागच्या प्रसंगातून काहीतरी शिकतो आणि म्हणतो पुन्हा असे दिवस माझ्या नशिबाला येऊ नयेत.भूतकाळही आपला एक समर्थ गुरूच असतो.जी झालेली चूक पुन्हा होऊ नये याची वारंवार सूचना करत असतो.विचारी माणूस मागच्या आठवणी जाणून पुढे पाऊल टाकत असतो. जर का असे नाही केले तर पुन्हा येरे मागचे हाल अशी अवस्था होऊन बसते.ती अवस्था ते प्रसंग येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या प्रयत्नाने ते नक्कीच दूर करता येतात.आपल्याच हाताने आणि अथक परिश्रमाने ते काळोखी ढग दूर करता येतात.केवळ विचार करून चालणार नाही तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची आणि प्रयत्नांची सांगड घालावी लागते. त्यामुळे नक्कीच आपले जीवन परिपूर्ण होऊन जाईल. भविष्याचा वेध हा भूतकाळातूनच घेता येतो आणि जीवन समृद्ध करता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोभी माणूस*एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जावून खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, ''अरे मला वाटते की तसे तुझे काहीच गेले नाही. आपला पैसा येथेच आहे, असे समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झाले.''तात्पर्य : लोभी माणसे पैसे असून दारिद्र्यी व अशांना पैश्यांचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ?*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 .🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ इ.स.पू. ५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.★ १९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.★ १९७४ - लॉकहीड एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड (चित्रीत) प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर (~५५७० कि.मी) १ तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.★ १९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाईट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.💥 जन्म :-★ १८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.★ १९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.★ १९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.★ १९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.★ १९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.★ १९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.★ १९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-★ ११५९ - पोप एड्रियान चौथा.★ १२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.★ १५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.★ १५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.★ १७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदा गणेशोत्सवाला वेगळाच रंग चढला. देशभरात गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात तब्बल 31 हजार 472 शिक्षकांची पदे रिक्त! दुसरीकडे आहे त्या शिक्षकांना शाळाबाह्य कामात जुंपले! टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांचं वेतन रोखण्याच्या कारवाईला शिक्षकांकडून उच्च न्यायालयात आव्हान*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणाची घटनात्मक परीक्षा, 13 सप्टेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता घरबसल्या करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाकडून 'महा-ऊस नोंदणी' अँपची निर्मिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचा 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सोव्हिएत युनियनचे माजी नेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांचं निधन. ते 91 वर्षांचे होते. शीतयुद्ध संपवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात टीम इंडियाने हाँगकाँगचा 40 धावांनी केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the domestic animal पाळीव प्राण्यांची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/JcL5UTf7DcM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नजर हटी, दुर्घटना घटी*वाहन चालविताना काळजी घेणे आवश्यक आहे. वाहन चालकांची थोडीशी चूक आपल्यासोबत इतरांना संकटात टाकू शकते. अपघातात गमावलेले जीव कधीही परत येत नाही. ....... पूर्ण लेख वाचा खालील लिंकवर https://nasayeotikar.blogspot.com/2018/07/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सिद्धेश्वर मंदीर - बारामती* बारामती (पुणे) : बारामतीचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिध्देश्वर मंदिरास नुकतीच 840 वर्षे पूर्ण झाली. शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांपासून ते कविवर्य मोरोपंतापर्यंत अनेक युगपुरुषांच्या पावनस्पर्शाने पुनित झालेले हे मंदिर बारामतीच्या वैभवशाली ऐतिहासिक परंपरेचे आजही साक्षीदार बनलेले आहे. इ.स.पूर्व 1137 मध्ये राज रामदेवराव यादव यांनी या मंदिराच्या उभारणीचे काम हाती घेतले, चाळीस वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर महादेवाचे श्री सिध्देश्वर मंदिर साकारले. अखंड लिंग व अखंड दगडातील अत्यंत सुंदर नंदी हे या मंदीराचे वैशिष्टय. नंदीचे सर्व दागिनेही दगडातच कोरलेले आहेत, समोरुन नंदीकडे पाहिले तर त्याचा एक कान तुमच म्हणण ऐकतो आणि दुसरा कान महादेवाकडे आहे, जणू तुमच्या मनातील इच्छा महादेवापर्यंत पोहोचविण्याचे कामच तो करतो असा भास होतो. या मंदिराच्या कळसामध्ये एक गुप्त लिंग होते व एक पाण्याच्या टाकीची सोय आहे. गुप्त लिंग आता तेथून काढून ठेवण्यात आले आहे, मात्र त्या काळातही वास्तूकला किती आधुनिक होती हे मंदीराकडे पाहिल्यावर जाणवते. औरंगजेबाच्या काळात शहाजी महाराजांकडे व त्यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर त्यांच्याकडे हे मंदिर होते. त्या नंतर पहिले बाजीराव पेशवे यांनी पांडुरंग दाते यांच्याकडे या मंदिराची व्यवस्था सुपूर्द केली. तेव्हापासून दाते कुटुंबिय आजतागायत सिध्देश्वर मंदिराची दैनंदिन व्यवस्था पाहतात.सन 1723 मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांनी मोडी भाषेत एक सनद लिहून ठेवली होती, जी आजही उपलब्ध आहे. त्यात मंदिराचा इतिहास नमूद आहे. संत ज्ञानेश्वर या मंदीरात नेहमी येत असत. त्यांनी येथे एका गणपती मूर्तीची स्थापना केली, त्यांच्या हातांचे व बोटांचे ठसे असलेला एकमेव दगड या मंदीरात आजही आहे. संत तुकाराम महाराजांचेही वास्तव्य येथे होते, या शिवाय कविवर्य मोरोपंत व श्रीधरस्वामींनी या मंदीराच्या आवारात बसून विपुल लेखन केलेले आहे. पूर्वी तुकाराम महाराजांच्या पालखीचे वास्तव्य याच मंदीरात असे.मंदिराची वैभवशाली परंपरा...बारामतीचे श्री सिध्देश्वर मंदीर ही वैभवशाली ऐतिहासिक परंपरा आहे, याचे जतन करण्याचा आम्ही प्रयत्न सातत्याने करतो. सर्वांची यात आम्हाला साथ मिळते आहे. .. विश्वस्त, श्री सिध्देश्वर मंदीर, बारामती. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) साहित्य अकादमीच्या वतीने मराठी भाषेसाठी प्रसिध्द बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांच्या कोणत्या साहित्यकृतीला बहुमान प्राप्त झाला आहे ?२) एका कसोटीत दोन्ही डावात मिळून सर्वाधिक धावा कोणत्या फलंदाजाने केल्या आहेत ?३) क्रांतिकारक राजगुरू यांचे मूळ गाव कोणते ?४) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?५) भारतात नुकतीच उध्वस्त करण्यात आलेली सर्वात उंच इमारत कोणती ?*उत्तरे :-* १) पियुची वही २) ग्रॅहम गुच, इंग्लंड ( पहिल्या डावात ३३३ व दुसऱ्या डावात १२३ धावा - ४५६ धावा भारताच्या विरोधात ) ३) खेड, जि. पुणे ४) प्रतल ५) ट्वीन टॉवर, नोएडा, ३२ मजली *संकलन* जैपाल भै. ठाकूर जि.प.व.प्राथ.शाळा भोसा,ता. आमगाव, जि. गोंदिया (९७६५९४३१४४)•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● विजय भगत, वाशीम● प्रल्हाद जाधव● संभाजी कोंडलवाडे● नागनाथ कौडगावे● दिनेश सारंगी● रामेश्वर चिंतलवाड● नवनाथ पिसे● गणेश गिरी, धर्माबाद● सुनिता गायकवाड● आर. के. उन्हाळे● शिवाजी पाटील येडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे whatsapp करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.**माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.**"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."**~~‼॥ रामकृष्णहरी ॥‼~~*🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गणरायाचे आगमन*गणरायाच्या आगमनानेघरात पसरले चैतन्यसुख, समृद्धी जीवनातअजून काय पाहिजे अन्यफक्त दीड दिवसांसाठीगजानन येतो घरीआनंद पसरवून जातोबालगोपालांच्या उरीवर्षातून एकदाच येतोश्री गणेशा हर्षोल्लासातसमाधान देऊन जातोप्रत्येकाच्या तनामनातआबालापासून वृद्धापर्यंतसर्वानाच असते प्रतीक्षासुखदुःखाच्या क्षणीतोच श्री तर करतो रक्षादंगा न करता गणेशोत्सवआनंदात साजरी करू याचला, एका सुरात म्हणू गणपती बाप्पा मोरया .....- नासा येवतीकर, धर्माबाद•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वाहत जाणा-या पाण्याच्या प्रवाहाबरोबर अनेक जीवजंतू,केरकचरा आणि इतर अनावश्यक वस्तूंना पाणी सोबत घेऊन जाते असे पाहणा-यांना वाटते. परंतू पाणी ह्या सा-यांना जेव्हा सोबत घेऊन जाते तेव्हा काही काळापर्यंतच.कारण हे सारे सतत वाहणा-या प्रवाहाबरोबर तग धरु शकत नाहीत.त्यांना माहित असते की,आपण निकामी आहोत आपला काही उपयोग नाही आणि इतरांच्या फायद्याचे आपण नाहीत.त्यामुळे काही अंतरावर गेल्यानंतर तोच प्रवाह आपल्याला बाजूला टाकून पुढे पुढे जाणार आहे.अर्थात पाण्याचा प्रवाह हाच इतरांच्या जीवनासाठी उपयोगी येणार आहे.जे इतरांच्या उपयोगी येणार आहे तेच शेवटपर्यंत टिकून राहू शकते.पाणीजसे सर्वांसाठी संजीवन आहे त्याचप्रमाणे चांगली सज्जन माणसे देखील समाजातील आपल्या चांगल्या विचारांबरोबर इतरांना घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करत असतात.जी कच-याप्रमाणे अर्थात वाईट वर्तन असणारी माणसे सज्जनांच्या सहवासात मिळण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना ते जमत नाही आणि जुळवूनही घेत नाहीत ती माणसे आपोआपच बाहेर पडतात.अशा कचरारुपी वाईट माणसांना आपल्या प्रवाहात घेऊनही जर सुधारत नसतील तर त्यांना बाजूलाच ठेवून पुढे जाणे हे केव्हाही चांगले.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणुसकीचे फळ*एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते. तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले. अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते.त्या माणसाला काही सुचेनासं झालं, पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला. तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता.त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला. प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले,“तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय.” सुरक्षा रक्षक म्हणाला, “या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना राम राम बोलता आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो.”त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल… म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा…*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 30/08/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १५७४ - गुरू रामदास सर्वोच्च शीख गुरू पदी.💥 जन्म :-● १९३० - दशरथ पुजारी, मराठी संगीतकार.● १९३४ - बाळु गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९४७- नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी 'बी'● १४८३ - लुई अकरावा, फ्रांसचा राजा. ● १६१९ - शिमाझु योशिहिरो, जपानी सामुराई.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 *9604481084*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दिवाळीपासून जिओ 5G इंटरनेट सुरू होणार, मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईकरासाठी दूध महागलं; सुट्या दुधाच्या किंमतीत पाच रुपयांची वाढ, दूध उत्पादक महासंघाचा निर्णय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भाजपने लोकांना दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, 'अच्छे दिन' आले नाहीत; आकडेवारीचा संदर्भ देत शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *तब्बल 151 अशैक्षणिक कामे करावी लागणाऱ्या शिक्षकांकडून गुणवत्तेची अपेक्षा कशी करता; एका शिक्षकाचं आमदार प्रशांत बंब यांना खरमरीत पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गणेशोत्सवानिमित्त पाच दिवस पुण्यात दारु विक्रीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *केसीआर घेणार नितीश कुमारांची भेट, पाटण्यात होणार 2024 च्या निवडणुकीवर चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the names of Games खेळांची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/GER_spd2wv0~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आधी वंदू तुज मोरया* ...पूर्ण खालील लिंकवर मिळेल.....!https://nasayeotikar.blogspot.com/2015/10/blog-post_83.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कर्करोग / कॅन्सर म्हणजे काय ?* 📙कर्करोग किंवा कॅन्सर हा शब्द अंगावर शहारे आणतो. कॅन्सरचा आणि मृत्यूचा कोठेतरी संबंध आहे, हे मनात दडलेले असते हे याचे कारण. कर्करोगापेक्षा कॅन्सर हाच शब्द सहजगत्या वापरला जातो, नाही का ?कॅन्सरविरोधी लढाई ही खरे म्हणजे हरणारी लढाई असते, असा प्रचलित समज आहे. रक्ताचे काही कॅन्सर, कातडीचे काही कॅन्सर, स्तनाचे व गर्भाशयमुखाचे काही कॅन्सर लवकर लक्षात आले तर ही लढाई जिंकता येते, हे अलीकडे आकडेवारीने सिद्ध झाले आहे. पण अन्यथा या बाबतीत डॉक्टर शब्द वापरतात 'सर्व्हायवल रेट' हा म्हणजेच ते रोगाच्या राहिलेल्या वर्षांचा हिशोबच उलगडत असतात.आपल्या शरीरातील असंख्य प्रकारच्या पेशी त्यांना दिलेली कामे निमूटपणे करत असतात. पण अचानक त्यांतील काही बंड करतात. त्यांचा आकार वेडावाकडा वाढू लागतो. त्यांना नेमून दिलेली कामे होईनाहीशी होतात. त्यांची शरीराला अडचण होऊ लागते. अन्य अवयवांचे काम करायला त्यांचा अडथळा येऊ लागतो. या अडथळ्यांचाच एक परिणाम म्हणजे वेदना. जसजसे विविध प्रमुख अवयवांचे अडथळे वाढतात, तसतसे शरीर साथ देईनासे होते. यातुनच मृत्यू ओढवतो.आपल्या शरीरात रक्तरस म्हणजे लिम्फ नावाचा रस सर्वत्र रक्तरसवाहिन्यांतून वाहत असतो. कॅन्सरच्या पेशींचा या वाहिन्यांतून फैलाव सगळ्या शरीरभर होऊ शकतो. जेथे फैलाव होईल, तेथे त्यांची पुन्हा वाढ होऊ लागते. ज्यावेळी यकृत, फुप्फुस, प्लीहा, मेंदू या जागा या पेशींनी व्यापल्या जातात, तेव्हा संपूर्ण शरीराचेच कार्य बंद पडू लागते. शरीरातील पेशी अशा का बंड करून उठतात, याचा अजून आपल्याला पत्ता नाही. पण त्यांना बंड करायला प्रवृत्त करणाऱ्या वस्तूंना आपण कार्सिनोजन्स व कॅन्सरकडे प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी म्हणून संबोधतो. उदारणार्थ, डांबर व त्यापासून बनणाऱ्या पदार्थाने कातडीचे कॅन्सर होतात, क्ष-किरणांमुळे कातडीचे व रक्तातील पेशींचे कॅन्सर होतात, तंबाखूमुळे तोंडातील कॅन्सर होतात, तर धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सारख्याच वातावरणात त्याच वस्तूच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला कॅन्सर होतोच, असे नव्हे; तर त्या वातावरणात न येणाऱ्यांपेक्षा या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त असते.आज घटकेला जगातील अनेक प्रमुख संशोधन संस्थांतून कॅन्सरविरोधी औषधांबद्दल संशोधन केले जात आहे. त्यासाठी अक्षरश: पाण्यासारखा पैसाही ओतला जात आहे. पण नेमका प्रतिबंध व नेमका इलाज सापडणे खूपच दूर आहे. सध्या उपलब्ध असलेल्या व वापरात असलेल्या इलाजांमध्ये मुख्यत: बंड करणाऱ्या पेशींवर औषधाचा मारा करून त्यांचा नाश करण्याची उपाययोजना आखली जाते. पण अनेकदा या इलाजामध्ये निरोगी पेशीही नष्ट होतात. त्यामुळे रुग्णाची तब्येत अधिकच त्रास देऊ लागते. कॅन्सरविरोधी इलाज म्हणून एका औषधाकडे आशेने पाहिले जाते. ते म्हणजे इंटरफेराॅन. रक्तातील गॅमाग्लोब्युलिनपासून हे औषध तयार करून वापरले जाते. पण त्याची किंमत व निर्मिती हा त्याच्या वापरातील प्रमुख अडथळा आहे. काही वर्षांपूर्वी फक्त कॅन्सरच्या पेशी टाकू काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करणे एवढाच इलाज होता. त्यानंतरचा इलाज म्हणजे क्ष किरणांचा एकत्रित मारा ठराविक डोसमध्ये करणे. यानंतर कोबाल्ट किरणांचा मारा करण्याची पद्धत सुरू झाली. पण नंतर प्रगत औषधे जशी उपलब्ध झाली आहेत, तसे शरीरभर पसरत गेलेल्या कॅन्सरपेशींवर नियंत्रण घालणे शक्य होऊ लागले. विशेषत: रक्ताचा कॅन्सर, रक्तामार्फत पसरणारे कॅन्सर यांवर ही औषधे वापरणे आता सुरू झाले आहे. कॅन्सरच्या संदर्भात नवनवीन औषधांचा वापर करताना त्याच्या दुष्परिणामांची माहिती रुग्णांना दिली जाते. त्यांची परवानगी घेतली जाते व मगच इलाज केले जातात. यामध्ये अनेकदा औषधांचा वापर प्रथम करण्याची वेळ येते व रुग्णांना प्रथमच वापरले जाणारे औषध त्याचे दुष्परिणाम किंवा मृत्यू यातील एकाची निवड करावयाची असते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ग्रामसभेसाठी बायोमेट्रिकचा वापर करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती ?२) शरीरातील रक्ताचे वजन एकूण शारीरिक वजनाच्या किती प्रमाणात असते ?३) काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात ?४) चंद्र अजिबात दिसत नाही, त्या रात्रीला कोणती रात्र म्हणतात ?५) 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कोणत्या उपनिषदातून घेतले गेले आहे ?*उत्तरे :-* १) मान्याची वाडी, सातारा २) ९ % ३) विशालकोन ४) अमावस्येची रात्र ५) मुंडक उपनिषद*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागभूषण मॅकावाड● नागभूषण दुर्गम, नांदेड● अरुण चव्हाण● गणेश बोळसेकर● दिलीप झरेकर● कृष्णा श्याम दाभडकर● माधुरी हातनुरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"सहजीवन म्हणजे काय? खरंच काय लिहायचं सहजीवनाबद्दल? आणि कोणा-कोणाबद्दल लिहायचं? फक्त पती आणि पत्नीचंच सहजीवन असतं का? आई-वडील, बहीण, भाऊ, काका, मामा, आत्या यांच्याबरोबर घालवलेले लहानपणीचे सोन्यासारखे दिवस हे सहजीवन नाही का ? मला तरी एकाबरोबर घालवलेलं ते सहजीवन असं मर्यादित स्वरूपात नाही मांडता येणार. ज्या ज्या माणसांनी मला भले आणि बुरेही अनुभव देऊ केले त्या सगळ्यांबरोबर जीवन जगलो ते सहजीवनच वाटतं.’’सहजीवन म्हणजे नेमकं काय? बरोबर राहणं की जोडीनं राहणं? एकत्र एका घरात राहणं की कुठेही असलं तरी जवळ असल्याची भावना वारंवार उचंबळून येणं? माणूस कंपू करून, टोळी बनवून किंवा गर्दी करून राहतो त्याला सहजीवन म्हणायचं की प्राणी एकत्र कळपानं किंवा झुंडीनं राहतात त्याला सहजीवन म्हणायचं?**आजकालच्या धकाधकीच्या आणि न संपणाऱ्या प्रवासानंतर घरी जाऊन बोलायला वेळ नाही म्हणून एकमेकांशी दूरध्वनीवरून किंवा संदेश पाठवून सगळ्या भावना व्यक्त करतो त्याला सहजीवन म्हणायचं? काहीच कळत नाही, की काही कळून घ्यायचं नाही आणि जोपर्यंत काही होत नाही, घडत नाही तोपर्यंत आपलं मस्त चाललंय.. म्हणून खोटय़ा निर्धास्त भावनेनं आला दिवस गेल्या दिवसापेक्षा बरा निघेल म्हणून एकाच छपराखाली राहायचं, त्याला कुटुंब असं नाव द्यायचं आणि जगण्याचं एक चोवीस तास चालणारं आणि हमखास बेरंग करणारं नाटक आपण प्रमुख पात्र म्हणून अभिनय करून पुढे चालू ठेवायचं?**"कोणत्याही दोन नात्यांमधील सहजीवन हे व्यवहारीक असू शकते तसेच भावनिक सुध्दा असू शकते परंतु एखाद्या पती-पत्नीचे सहजीवन हे भावनिकच असावयास हवे अन्यथा तेथे राग, द्वेष, तिरस्कार, घृणा, मत्सर हे जरूर असणार जे त्या सहजीवनाला सुरुंग लावल्याशिवाय राहणार नाही ...म्हणूनच पती-पत्नीच्या सहजीवनाला वेगळा अर्थ आहे."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••गणपती बाप्पाबाप्पाला पाहताक्षणीमनाचा लागतो शोधगणपती बाप्पा माझामला देतो किती मोदत्याच्या येण्याची उत्सुकतामला लागते वर्षभरतो आला वाजत गाजत की उत्साह पसरतो घरभरतयारी चाले आगमनाचीमग काम करी दिवसभरत्याच्याकडे पाहून माझासंपतो सगळा क्रोधगणपती बाप्पा माझामला देतो किती मोदअकरा दिवस चाले त्याची पूजा आराधनारोज वेगळा कार्यक्रमरोज आगळा सामनाबाप्पा खुश व्हावा म्हणूनआम्ही सारे करतो साधनाउत्सवातील सेवा करूनकमी होतो सर्वांचा रोधगणपती बाप्पा माझामला देतो किती मोद- ना. सा. येवतीकर, विषय शिक्षककन्या शाळा धर्माबाद 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063.🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेटवस्तू न स्वीकारणे*डाॕ.अब्दुल कलाम यांच्या वडिलांची शिकवणस्वातंत्र्यानंतर डाॕ.अब्दुल कलाम यांच्या वडिलांना ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. त्यांनतर एके दिवशी एक व्यक्ती त्यांना भेटायला आले. त्यावेळी कलामांचे वडील घरी नव्हते आणि कलाम अभ्यास करत होते. कलामांचे वडील घरी नसल्याचे पाहून तो इसम म्हणाला, ‘मी तुझ्या बाबांसाठी भेटवस्तू आणली आहे. ते जेव्हा येतील तेव्हा ही भेटवस्तू त्यांना दे.’काही वेळाने कलामांचे वडील घरी आल्यावर त्यांना ती भेटवस्तू दिसली. चांदीच्या ताटात ठेवलेल्या त्या भेटवस्तू पाहून त्यांनी कलामांना विचारले, ‘बेटा या भेट वस्तू कुठून आल्या.’ तेव्हा कलाम म्हणाले, ‘तुम्ही घरी नसताना एक व्यक्ती घरी आला होता, त्यानेच हे दिले.’ त्यांच्या वडिलांनी त्या भेटवस्तू उघडून पाहिल्या तर त्यात, महागडे कपडे, चांदीचे पेले आणि मिठाई होती. हे पाहिल्यावर ते रागवले.कलाम घरी असूनही त्या व्यक्तीने या भेटवस्तू घरी ठेवल्या आणि कलामांनी त्याला नाकारले नाही, या गोष्टींचा त्यांना राग आला. रागावर अनावर झाल्याने त्यांनी कलामानां जोरात चापट दिली आणि घरात येर-झऱ्या घालू लागले. थोड्यावेळाने कलामांच्या वडिलांना लक्षात आले की आपण रागाच्याभरात कलामवर जास्त ओरडलो आणि उदास झालेल्या कलामांना जवळ बोलवून त्यांच्या डोक्यावर हात फिरवत समजावले.ते म्हणाले, ‘बाळ इथून पुढे माझ्या परवानगीशिवाय कोणतीही भेटवस्तू स्वीकारु नकोस. देव जेव्हा एखाद्याला पद देतो तेव्हा त्यासोबत येणाऱ्या गरजाही पूर्ण करतो. देवाने दिलेल्या गोष्टींपेक्षा जास्त घेणे चुकीचे असते.’अगदी प्रेमाने समजवत कलामांचे वडील त्यांना म्हणाले, भेटवस्तू स्वीकारणे चांगले लक्षण नाही. भेटवस्तू देण्याच्या मागे देणाऱ्याचा काही हेतू नक्कीच असतो. भेटवस्तू स्वीकारताना काळजी घेतली पाहिजे, अन्यथा त्यावरुन विषाची परीक्षा देण्याची वेळ येऊ शकते. वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट कलामांच्या डोक्यात पक्की बसली आणि त्यानंतर ते भेटवस्तूच्या मोहात पडले नाहीत.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 27/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६२ - नासा चे मानव-विरहित यान मरिनर २ चे शुक्राकडे प्रस्थान💥 जन्म :-◆१९२५ - नारायण धारप, मराठी लेखक◆ १९७२ - दिलीप सिंग राणा उर्फ द ग्रेट खली, भारतीय मल्ल.◆ १९७४ - मोहम्मद युसुफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू◆१९८० - नेहा धुपिया, भारतीय अभिनेत्री💥 मृत्यू :-●१९७६ - मुकेश, भारतीय पार्श्वगायक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेमध्ये केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या पाथर्डीत प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने काढला मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शिवसेनेची थेट संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय युती*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई : राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून होणाऱ्या आरोग्य विभागातील गट क च्या भरतीचे वेळापत्रक जाहीर, 15 आणि 16 ऑक्टोबरला गट क या पदांसाठी घेतली जाणार परीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *येत्या 29 ऑगस्ट 2022 रोजी रिलायन्सची होणारी ही 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यामध्ये मुकेश अंबानी 5G सेवा कधीपासून उपलब्ध होईल याची घोषणा करु शकतात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नरेंद्र मोदी हेच 'विश्वगुरू'; 75 टक्के रेटिंग मिळवून लोकप्रियतेत 'जगात भारी'*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा आज निवृत्त होत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*विविध आकाराची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/jgUSyrEp3os~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आईचा श्याम - लघुकथा*श्याम नावाच्या एका संस्कारी मुलाची कथा,जरूर वाचाhttps://m.facebook.com/story.php?story_fbid=4017979838328760&id=100003503492582प्रतिक्रिया जरूर comment करा.~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ लेखन - नासा येवतीकर, धर्माबाद 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ऊर्जा म्हणजे काय ?* 📙ऊर्जा म्हणजे सजीवाच्या प्रत्येक गोष्टीकरता लागणारी मूलभूत गरज आहे. ऊर्जेलाच एनर्जी असे म्हणतात. अचल वा अचेतन वस्तूची कोणतीही हालचाल घडवण्यासाठीसुद्धा उर्जा लागतेच. पृथ्वीवर कोणतीही ऊर्जा तयार होत नाही वा कोणतीही ऊर्जा पूर्णत: नष्ट होऊ शकत नाही. फक्त ऊर्जेचे नेहमीच रूपांतर होत असते.हे झाले ऊर्जेबद्दलचे थोडक्यात ज्ञान. व्यवहारात ऊर्जेबद्दलचे गैरसमज शास्त्रीय प्रगतीला फार मोठी खीळ घालण्याची शक्यता अनेकदा निर्माण झाली आहे. त्यांतील आपल्या देशातील मोजक्या काहींचा येथे उल्लेख करून प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे जाणून घेऊ या.धरणाचे पाणी वीजनिर्मितीकेंद्राने वापरून नदीत सोडले तर ते शेतीला उपयुक्त ठरत नाही, हा गैरसमज; कारण पाण्याची 'पॉवर' गेलेली असते, हे त्यामागच्या प्रचाराचे कारण. पाण्याचा वापर फक्त गुरुत्वाकर्षणाच्या वेगाने मिळणाऱ्या ताकदीचा वापर करून जनित्राचे टर्बाइन फिरवणे एवढाच केलेला असतो. यात पॉवरचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. एखाद्या खडकावर पाणी आदळावे तसेच येथे टर्बाईनवर आदळते व पुढे जाते. या गोष्टी अगदी सरळ वाटल्या तरीही किमान पंचवीस ते तीस वर्षे आपल्या देशात असे पाणी शेतकऱ्यांनी नाकारले आहे, ही सत्यस्थिती आहे.गोबरगॅस वापरला असता स्वयंपाकघरात वास सुटुन हवा दूषित होते हा गैरसमज. गॅस जळतो, तेव्हा फक्त कार्बन डाय ऑक्साइड हवेत राहतो. गोबर गॅस फक्त जळण्यापुरताच स्वयंपाकघरात येतो व ज्वलनानंतर त्याचा कसलाही वास सुटणे, हवा दूषित होणे यांचे कारणच राहत नाही. प्रदूषणाचे तर कारणच नसते. शेगडी वा लाकडे जाळल्यावर जितका कार्बन डायाक्साईड पसरतो, त्याचा दहा टक्केही गोबरगॅस ज्वलनाने निर्माण होत नाही. धूर तर नसतोच. ज्वलनाला आच उत्तम मिळते, हे वेगळेच. तेव्हा गोबरगॅस वापरावा, हे उत्तम.'अधिक चरबी, तेल तूप असलेले पदार्थ खाऊन ऊर्जा मिळते, ती जास्त पौष्टिक असते,' हा गैरसमज पसरण्याचे कारण तसेच आहे. पहेलवान मंडळी खुराक म्हणून अनेकदा भरपूर तूप, लोणी व चरबीयुक्त पदार्थ खात असतात. सामान्य माणूस त्याचेच आंधळे अनुकरण करू बघतो. स्निग्ध पदार्थातून जास्त ऊर्जा मिळते, हे अर्धेच बरोबर; कारण ही ऊर्जा लगेच उपलब्ध कधीच होत नाही, तर शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते. पहेलवान मंडळी अनेकदा थुलथुलीत दिसतात, त्याचे हेच कारण. संतुलित आहार प्रथिनयुक्त ऊर्जा घेतली, तर तिचा वापर लगेच केला जातो. जागतिक कीर्तीचे मल्ल बघितले तर त्यांच्या अंगावर चरबीचा कणही दिसत नाही, हे त्यामुळेच. ग्लुकोजची साखर खाल्ल्यामुळे तात्काळ खूप ऊर्जा मिळून तरतरी येते, हा एक गोड गैरसमज मुद्दाम पसरवला गेला आहे. ग्लुकोज, शुक्रोज, फ्रुक्टोज, माल्टोज या विविध साखरेच्या प्रकारांचे ग्लुकोजमध्येच रूपांतर होते. शिरेतून ग्लूकोज भरल्याने ताकद मिळते, हा एक भल्याभल्या शिकलेल्यांचाही गैरसमज आहे. पोटभर चौरस आहार हेच खरे ऊर्जेचे साधन होय.असे काही गैरसमज व ते दूर करायचा हा अल्पसा प्रयत्न.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत ?२) भारतात पुरुष साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे ?३) चंद्रशेखर आझाद ( तिवारी ) यांचा जन्म केव्हा झाला ?४) दिशा पाहण्यासाठी कोणते यंत्र वापरतात ?५) कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाची सर्वोत्तम सरासरी कोणाच्या नावावर आहे ?*उत्तरे :-* १) सुधीर मुनगंटीवार २) ८४ % ३) २३ जुलै १९०६ ( भाबर, मध्यप्रदेश ) ४) होकायंत्र ५) डॉन ब्रॅडमन ( पहिल्या ८० डावात ९९.९४ सरासरी )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संतोषजी बदरखे ● अतुल वैद्य● दत्तप्रसाद सुरुकुटवार● प्रशांत वीरभद्र रुईकर● दिगंबर सोळंके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण चंद्र सूर्य यांच्या आकाराचे चित्र पटकन काढू शकू; पण त्यांच्यातल्या प्रकाशाचे अंग, म्हणजेच त्यांचे प्राणतत्व, आपल्या हाती लागत नाही. 'प्रकाशाचे अंग' हाती यावे, अशी इच्छा बाळगणा-यांना प्रकाशाचे चटके सोसण्याची तयारी ठेवावीच लागते. प्रकाशाची संजीवकता अनुभवताना त्यातली दाहकताही अनुभवावीच लागते. कोणत्याही कलेत ' प्रकाशाचे अंग' हाती लागावे, म्हणून मोठी साधना करावी लागते. ना.ग.गोरे यांनी 'दिगंबर' कथेमध्ये एका मूर्तिकाराच्या निर्मितीप्रक्रियेचा प्रवास रेखाटला आहे.**कथानायक अरिशिनेमी हा एक कसबी पाथरवट असतो. त्याने अनेक मंदिरे, प्रासाद घडवलेले असतात. मात्र एकाच प्रकारच्या कामामुळे तो अस्वस्थ झालेला असतो. बारा वर्षे तो काम न करता घालवतो. नंतर जेव्हा त्याला देऊळ बांधायचे बोलावणे येते, तेव्हा ते मंदिर 'बिनखांबाचं, बिनदाराचं, बिनमंडपाचं असणार!' असं तो ठरवतो. तो खूप भटकतो. खूप मंदिरे पाहतो. तो परत येतो, तेव्हा एका प्रचंड विजेच्या लोळामुळे एक शिलाखंड उजळून निघालेला तो पाहतो. तेव्हा तो ठरवतो की मूर्तीला टेकडी हेच आसन असेल आणि दिशांचा मंडप असेल ! त्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडून जगप्रसिद्ध अशी श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराची मूर्ती उभी राहिली. या कथेतून कलावंतांच्या आयुष्यात चाकोरीबाहेरच्या निर्मितीचे बीज सुचण्याचा, स्फूर्तीचा, क्षण किती ताणलेल्या प्रतीक्षेनंतर उगवू शकतो, कलावंतासाठी अस्वस्थता हे वरदान का ठरते, हे कळते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मैत्री तुझी माझी*मैत्री तुझी माझीआरसा नितळ,दिसे प्रतिबिंबअगदी निर्मळ...संकटात नित्यधावते वेळीच,तुझी आणि माझीमैत्री वेगळीच...नाते ग आपले हे जगावेगळे, बंध हे मनाचेआहेत आगळे...मनातील माझ्याओळखते कशी,आहे अशी मैत्रीही बावनकशी...जन्मोजन्मी हीचमैत्रीण मिळावी,सुखी माझी सखीसदैव असावी...मैत्रीचा हा हातहाती राहो नित्य,अखंड ही मैत्रीहेच खरे सत्य...© सौ.गौरी शिरसाट मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••घर जेव्हा बांधलं जातं तेव्हा मुख्यत: पायाभरणीचा विचार केला जातो, नंतर भिंतीचा आणि त्यानंतर डोक्यावर असणा-या छताचा.हे जरी खरं असलं तरी यात प्रामुख्याने रेती, सिमेंट,वीटा,गजाळी आणि बांधकाम करणा-या कारागिरांचे कौशल्य लागते.केवळ कोणत्याही एका घटकावर घर पूर्ण होत नाही.त्याचप्रमाणे माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आहे.जर व्यक्तिमत्त्व विकासाचे पहायचे झाले तर लहानपणी घरात असणा-या आईवडिलांचे संस्कार, नंतर घरातल्या इतर रक्तातल्या नात्यातील लोकांचे संस्कार,परिसरातील मित्र,शेजारी यांच्या सहवासातून घडलेले संस्कार,शाळेतील शिक्षकांकडून घडवल्या गेलेले संस्कार आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचनातून मनावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडल्या गेलेले संस्कार या सर्व घटकातून मिळालेली उत्तम संस्कारांची पायाभरणी हीच खरी माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे घटक आहेत.यातील एखाद्या जरी घटकांकडून कमतरता भासली तर व्यक्तिमत्त्व विकास व्हावा तितका होऊ शकत नाही.हे सारे घटक माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे पायाभूत घटक आहेत.ज्याप्रमाणे घर मजबूत करण्यासाठी पायाभरणी आणि त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य उत्कृष्ट दर्जाचे असायला हवे तेव्हाच घर कुठे चांगले सुंदर बनू शकते त्याचप्रमाणे व्यक्तिमत्त्व विकासासाठी लागणारे वरील उल्लेखिलेल्या घटकांची नितांत गरज आहे.यातला एकजरी घटक कमी पडला तर माणसांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया कच्चा राहू शकतो.म्हणून यांना आपल्या जीवनात महत्त्वाचे खरे स्थान आहे हे विसरून चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠🏕🏠 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *समर्पण*एक साधू भिक्षा मागत दारोदार फिरत होता. वृद्ध, असहाय अशा त्या साधूची दृष्टीही थोडी अधू होती. त्याने एका मंदिरासमोर जाऊन भिक्षेसाठी आवाज देण्यास सुरुवात केली. हे पाहून पांडुरंगाने त्याला म्हटले, '' महाराज, पुढे व्हा. तुम्हाला भिक्षा देईल अशा व्यक्तीचे हे घर नव्हे.'' साधू म्हणाला, '' जो कोणास काही देत नाही, असा या घराचा मालक आहे तरी कोण ?'' पांडुरंग म्हणाला, '' अहो, हे घरच नाही. हे मंदिर आहे. याचा मालक साक्षात परमेश्वर आहे. '' हे ऐकून त्या साधूने एकवार आकाशाकडे पाहिले. त्याचे हदय भरुन आले. त्याने आकाशाकडे पाहात हात पसरले. तेथेच उभा राहिला. पुढे मंदिराच्या दारात त्याला नाचतानाही पांडुरंगाने पाहिले. त्याचे डोळे अलौकिक तेजाने लकाकत होते. त्याच्या वृद्ध शरीरातून दिव्य प्रकाश पसरत होता. पांडुरंगाने त्याला आनंदाचे कारण विचारले. साधू म्हणाला, '' जो मागतो, त्याला मिळते. फक्त समर्पण करण्याची वृत्ती पाहिजे.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 26/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆१९९४ : लोन टेनिसपटू रमेश कृष्णन आणि मध्यम पल्ल्याचा धावपटू बहादूर प्रसाद यांना के. के. बिर्ला फांउंडेशनचा पुरस्कार जाहीर💥 जन्म :-◆१९१० - मदर तेरेसा, समाजसेविका; 'नोबेल पारितोषिक' आणि 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित◆१९२२ - गणेश प्रभाकर प्रधान, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी विचारवंत, पत्रकार व शिक्षणतज्ञ◆ १९४४ : अनिल अवचट लेखक व सामाजिक कार्यकर्ते💥 मृत्यू :-◆१९४८ - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मराठी नाटककार, 'केसरी'चे संपादक◆१९५५ - अ. ना. भालेराव, मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक◆१९९९ - नरेंद्रनाथ, भारतीय टेनिसपटू◆१९५५ - बालन के. नायर, मल्याळी चित्रपट अभिनेते◆ २०१२ : ए. के. हंगल चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिकसंकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 20 लाख रुपये आर्थिक मदत देणार, सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नोंदणीकृत स्कूल बसशिवाय विशिष्ट स्कूलबससाठीची सक्ती शाळांना महागात पडणार, अशा शाळांची शिक्षण विभागामार्फत चौकशी होणार, सरकारची माहिती*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *घोषणाबाजी आणि अभूतपूर्व गोंधळामुळे गाजलेल्या अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *घटनापीठासमोर होणाऱ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिश्चिततेचं सावट, ठाकरे आणि शिंदे गटातील वादावरच्या अनेक घटनात्मक प्रश्नांच्या उत्तरांची प्रतीक्षा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त जागा भरणार, शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती, मराठा समाजातील 1200 उमेदवारांना आरक्षित पदावर नियुक्त्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टीईटी परीक्षेत शिक्षण अधिकाऱ्याची मुलगी अपात्र असताना पात्र केल्याचा आरोप, अधिकाऱ्याकडून आरोपाचं खंडन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली आमदारांची बैठक, पुढच्या रणनितीवर होणार चर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*इंग्रजी महिन्याची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gZjoOzwNoTs~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माझा फळा-माझी लेखणी*हा उपक्रम राबविलेल्या शाळांच्या उपक्रमशील शिक्षकांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया. .........https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_25.html*संकल्पना - नासा येवतीकर*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग*--------------------------------------सह्याद्रीच्या पूर्व पायथ्याशी असणारे हे तीर्थक्षेत्र नाशिक पासून २९ कि. मी. वर आहे. त्र्यंबकेश्वराचे मंदीर हे श्रीमंत बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांनी १७५५ ते १७८६ च्या दरम्यान बांधले. त्याकाळी हे मंदीर बांधण्यासाठी १६ लाख रूपये खर्च आला, आणि साधारणत: ३१ वर्षे मंदिराचे बांधकाम सुरू होते. चार प्रवेशद्वारे असलेल्या, फरसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामधे ते दिमाखाने उभे आहे. उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ (साठवणीची) कोठी आहे. मंदिराच्या महाद्वारा समोरच मोठी दीपमाळ आहे. प्रवेशानजिकच असलेल्या, सुबक कोरीव काम केलेल्या खाबांच्या घुमटामधे महानंदी विराजमान झाले आहेत. गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे.*या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्टय म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामधे सुपारीएवढया आकाराची तीन लिंगे आहेत.*ही लिंगे, ब्रह्मा, विष्णु आणि शिव, म्हणजे, विश्वाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्या शक्तींची प्रतिके आहेत. ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांना अभिषेक करताना दिसते. हे पंचमुखी आराध्य दैवत इथे दिवसातून तीन वेळा पूजिले जाते. मुघलांकडून मिळवलेला पाचू-हिरे जडित मुकूट भाऊसाहेब पेशवे यांनी श्रीं चे चरणी अर्पण केला आहे. हा मुकूट मोघलांनी म्हैसूरच्या राजाकडून बळकावला होता. रुद्र, रुद्री, लघुरुद्र, महारुद्र किंवा अतिरुद्र यांचे पठन करुन त्र्यंबकेश्वरीचा हा शिव पूजला जातो. रुद्राक्षाला धार्मिक महत्व असून भगवान शिवाच्या गळयात रुद्राक्षांची माळ असते. रूद्राक्ष हे फळ असून त्याची झाडे त्र्यंबकेश्वर येथे आढळतात.*त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक उत्सव :*१) सिंहस्थ कुंभमेळा : सर्वसाधारणपणे १२ वर्षांतून एकदा, जेंव्हा गुरू हा ग्रह सिंहराशीमधे, (लिओ) असतो.२) गोदावरी दिन : माघ (फेब्रुवारी) महिन्यातील शुध्द पक्षातील तेजस्वी चंद्रप्रकाशाचे, पहिले बारा दिवस.३) निवृत्तीनाथ उत्सव : पौष मासातील तीन दिवस, सर्वसाधारणपणे, जानेवारीमधे हा उत्सव येतो.४) त्र्यंबकश्वरची रथयात्रा : कार्तिक पौर्णिमेस, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेस येणारी यात्रा.५) महाशिवरात्री : माघ कृष्ण त्रयोदशीस. साधारणपणे मार्च महिन्यात येते.----------------------------------*त्र्यंबकेश्वरला कसे जाल?*-----------------------------------हवाईमार्ग - जवळचे विमानतळ नाशिक. ३९ कि.मी.रेल्वेमार्ग - जवळचे रेल्वेस्थानक नाशिकरोड, मध्यरेल्वे पासून ४० कि.मी. अंतरावर.बसमार्ग - मुंबई- त्र्यंबकेश्वर १८० कि.मी, पुणे - त्र्यंबकेश्वर २०० कि.मीनाशिक-त्र्यंबकेश्वर २९ कि.मी.नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून नाशिक-त्र्यंबकेश्वर अशा एस. टी. महामंडळाच्या गाडया दर अर्ध्या तासाने चालू असतात.त्र्यंबकेश्वर हे नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासून ४० कि.मी अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी बस व टॅक्सी उपलब्ध असतात.तेथे सोयी सुविधांनी युक्त अशा धर्मशाळा मिळतात. तसेच तेथील क्षेत्रोपाध्याय आवश्यकतेनुसार रहाण्याची व खाण्याची सोय करतात. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताने अवकाशात एकाच वेळी किती उपग्रह पाठविण्याचा विक्रम केला होता ?२) सूर्यमालेतील बटूग्रह कोणता ?३) क्रांतिकारक भगतसिंह यांना केव्हा फाशी देण्यात आली ?४) नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात १९२ धावा काढणारे सलामीवीर कोण ?५) राजू श्रीवास्तव हे कोण आहेत ?*उत्तरे :-* १) १०४ उपग्रह ( १५ फेब्रुवारी २०१७ ) २) प्लूटो ३) २३ मार्च १९३१ ४) शिखर धवन ( ८१ धावा ) व शुभमन गिल ( ८२ धावा ) ५) प्रख्यात विनोदी कलाकार*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिगंबर खपाटे बन्नाळीकर● प्रशांत इबितवार येवती● संदीप आवरे चिकना● विशाल कन्हेरकर अमरावती● नारायण शिंदे, रत्नागिरी● प्रशांत कोकणे● मधुकर बोईनवाड● संदीप सोनकांबळे● सुमेध वाघमारे● मारोती ताकलोर● दत्ता बोंदलवाड● अभय रन्नावरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपल्या लहानपणी मुलांचं रडणं थांबविण्यासाठी कचकडी खुळखुळा होता. तो बाळाचे रडणे थांबवून त्याला हसरा करायचा. आता त्या खुळखुळ्याची जागा मोबाइलने घेतली आहे. कचकडी खुळखुळा बाळ लहान असेपर्यंत उपयोगी होता, मात्र हा नवा खुळखुळा माणसाच्या जन्मापासून मरेपर्यंत हाती राहतोय, असं दिसतयं. कचकडी खुळखुळ्यात नाद निर्माण करणारे खडे भरलेले असायचे. मोबाइलनामक खुळखुळ्यात नादाला लावणारे अॅप्स भरलेले असतात. हा खुळखुळा व्हिडीओ गेमचा नाद लावतो. हळूहळू फोन करायला शिकवतो, व्हाॅटस् अॅप शिकवतो, आठवीला गेला की 'मिस् काॅल' देऊ लागतो. युवापिढी रात्र-रात्र जागून चॅट करू लागते.**माणूस कमवायला लागला की, मग तोंड लपवून 'फेसबुक' वर बाता मारू लागतो. लग्न झाले की, फेक अकाउंटवरून ह्रदय आणि मन मोकळं करत राहतो. कधी लाईक, कधी कमिंट, असं व्यक्त-अव्यक्त अभासी जगात जगू लागतो. गुड माॅर्निंग, गुड इव्हिनिंग, स्वीट ड्रीम, काँग्रॅट्स करत लक्षात येतं की, हे सारं झूट ! अवतीभवती संदेश, शुभेच्छा, सहवेदनांचा पाऊस; पण प्रत्यक्ष नक्षत्र मात्र कोरडंच ! अभासी जगात वाढलेली पिढी कोरडे जग जगताना आपण अनेकदा पाहतो. खरे पाहिले तर खुळखुळा, मोबाइल हे सारे त्या त्या काळातील अभासी भावच ! माणूस भावाचा भुकेला असतो. अभासी, भोगी संस्कृतीच्या जागी वास्तव, संवेदी, जीवाभावाची संस्कृती जपायची तर प्रसंगी जीव देऊन भाव, संबंध, नाते जपणे, जोपासणे म्हणजेच खरं जगणं !!!* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ☀☀ ☀ ☀ ☀ ☀☀☀ *श्री. संजय नलावडे,मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••बालकविता - माझी नानी--------------------------------माझी लाडकी नानीसांगे रोज कहाणीगाई छानशी अंगाईमी गाढ झोपी जाई ।।म्हणे माझी नानीपहाटे की रे उठावेसांगितलेले ते ऐकावेआचरणात आणावे ।।भले व्हावे आपुले हेनानीचे सांगणे खरेवागू या आपण चांगलेआपल्यासाठी के बरे ।।---------------------------------अरुण वि.देशपांडे- पुणे(आली आली परीराणी संग्रह-2012)•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात दुःख किती जरी असले तरी ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता आहे तोच आपल्या जीवनात दुःखावर मात करुन यशस्वी होऊ शकतो .© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद - ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रोधाला संयमाने जिंका*एकदा भगवान श्रीकृष्‍ण, बलराम आणि सात्‍यकी हे तिघे जंगलातून जात असताना रात्रीच्‍या वेळी काहीच न कळाल्‍याने रस्‍ता चुकले. जंगल घनदाट होते, तेथे न पुढे जाण्‍याचा मार्ग दिसत होता ना मागे येण्‍याचा. तेव्‍हा तिघांनीही असा निर्णय घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्‍थ व्‍हायचे. तिघेही दमलेले होते पण प्रत्‍येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्‍याचे ठरवले. पहिली पाळी सात्‍यकीची होती. सात्‍यकी पहारा करू लागला तेव्‍हाच झाडावरून एका पिशाच्‍चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्‍च झाडावरून खाली उतरले व सात्‍यकीला मल्‍लयुद्धासाठी बोलावू लागले. पिशाच्‍चाने बोलावलेले पाहून सात्‍यकी संतापला व क्रोधाने पिशाच्‍चावर धावून गेला. त्‍याक्षणी पिशाच्‍चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्‍लयुद्ध झाले. पण जेव्‍हा जेव्‍हा सात्‍यकीला क्रोध येई तेव्‍हा तेव्‍हा पिशाच्‍चाचा आकार मोठा होई व ते सात्‍यकीला अजूनच जास्‍त जखमा करत असे. एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्‍यांनी सात्‍यकीला झोपण्‍यास सांगितले. सात्‍यकिने त्‍यांना पिशाच्‍चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्‍चाने मल्‍लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्‍चाशी लढायला गेले तर त्‍याचा आकार हा वाढलेला त्‍यांना दिसून आला. ते जितक्‍या क्रोधाने त्‍याला मारायला जात तितका त्‍या पिशाच्‍चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्‍णाची होती. पिशाच्‍चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्‍णांना आव्‍हान दिले पण श्रीकृष्‍ण शांतपणे मंदस्मित करत त्‍याच्‍याकडे पहात राहिले. पिशाच्‍च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्‍णांना बोलावू लागले पण श्रीकृष्‍ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले व एक आश्‍चर्य झाले ते म्‍हणजे जसे जसे पिशाच्‍चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्‍याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट झाली शेवटी आकार लहान होत होत पिशाच्‍चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्‍णांनी अलगद त्‍याला आपल्‍या उपरण्‍यात बांधून ठेवले. सकाळी सात्‍यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्‍णांनी तो किडा त्‍यांना दाखविला व म्‍हणाले,’’ तुम्‍ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्‍हता कारण हे क्रोधाचे पिशाच्‍च होते. त्‍याला शांती हेच औषध आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्‍याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो. मी शांत राहिलो म्‍हणून हे पिशाच्‍च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.’’तात्‍पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 24/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 .🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९६६ - विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.◆१९९५ - मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.💥 जन्म :-◆१८३३ - नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक.◆१८७२ - न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; 'मराठा', केसरी वृत्तपत्रांचे संपादक.◆ १९०८ - हुतात्मा शिवराम हरी राजगुरु, भारतीय क्रांतिकारक.💥 मृत्यू :-◆१९२५ - डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ◆ १९९३ - प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू◆ २००८ - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गेल्या 24 तासांत दुसऱ्यांदा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी नाही, पुढच्या तारखेकडे लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आठ पदरी करा, विनायक मेटेंच्या अपघातावर विधानसभेत चर्चेदरम्यान अजित पवारांची मागणी, चालकाच्या बदलत्या जबाबाची नेत्यांकडून दखल*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *मुंबई, ठाण्यात लहान मुलांमध्ये टॉमॅटो फ्लूचा प्रसार अधिक, चिकनगुन्या आणि डेंगूसदृश लक्षणं दिसताच डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *डोंबिवलीतील गायकवाडवाडी परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट, तीन महिलांसह पाच वर्षाचा मुलगा जखमी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *बॉक्सऑफिसवर आपटलेल्या लालसिंग चड्डा सिनेमाला ओटीटीवरही भाव मिळेना, नेटफिक्ससोबतची बोलणी फिसकटली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पंतप्रधान मोदीं आज हरियाणा-पंजाब दौऱ्यावर; महत्त्वाच्या उपक्रमांचे उद्घाटन करणार, सुरक्षेबाबत पोलीस सतर्क*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धत्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजय मिळवत आयसीसी रँकिंगमध्ये तिसऱ्या स्थानी प्रगती केली असून भारताला एका गुणाचा फायदा झाला आता भारताची रेटिंग 111 झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the Occupation👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/XQiONqjbUmM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सोशल मीडिया आणि आधार*https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_23.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया खालील क्रमांकवर जरूर द्यावे~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उल्कापात म्हणजे काय ?* 📙रात्रीच्या वेळी शिळोप्याच्या गप्पा रंगल्या असताना निरभ्र आकाशात अचानक एखादा चमकदार पदार्थ झळाळत निखळताना दिसतो. सगळ्यांचेच लक्ष तिकडे वळते. पण हा झळाळणारा पांढराशुभ्र चमकदार पदार्थ पृथ्वीच्या नजीक आल्यावर दिसेनासाही होतो. हा असतो उल्कापातातला एक छोटासा तुकडा. पृथ्वीवर दरवर्षीच अनेक वेळा लहान मोठ्या उल्का कोसळत असतात. त्यांच्याबद्दल विविध अंदाज व्यक्त होतात. पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या उल्कांचा आकडा लक्षात घेतला तर रोज एखाद दुसरी उल्का जमिनीपर्यंत पोहोचते. पण न पोहोचणाऱ्या त्यापेक्षा कितीतरी जास्त असतात. त्या वातावरणात होणाऱ्या घर्षणाने तापून प्रकाशमान होतात, वितळतात व नंतर त्यांची वाफ होऊन वातावरणातच नष्ट पावतात. खऱ्या अर्थाने एखादी मोठी उल्का येथे येऊन आदळण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. असा सर्वात मोठा ज्ञात प्रकार अॅरिझोना या अमेरिकेतील राज्यात घडला असावा. किमान पंचवीस हजार वर्षांपूर्वी घडलेल्या या उल्कापातातील उल्केचे वजन पन्नास हजार टन असावे. यामुळे निर्माण झालेला खळगाच मुळी सव्वा किलोमीटर व्यासाचा आहे. भारतात लोणारचे तळे याच पद्धतीने तयार झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. उल्कापाताने निर्माण झालेले खड्डे हे चंद्रावर तर ठायीठायी आढळतात. ऑस्ट्रेलिया व ब्राझीलमध्ये असे मोठाले उल्कापात अलीकडच्या शतकात झाले आहेत.उल्कापातातील दगड हे पृथ्वीवरच्या दगडांपेक्षा एकदम वेगळे असल्याने त्याबद्दल शास्त्रज्ञांना कुतूहल वाटत आले आहे. काही पूर्णत: लोहाचे काही पूर्णत: शिलांचे तर काहींमध्ये मिश्रा असे हे दगड असतात. सूर्य व ग्रहमालिका तयार झाली त्या वेळी काही अवशेष अवकाशातच भिरभिरत राहिले. त्यांतील काही शिळा, काही धूर, तर काही वायूरूप अवस्थेत आहेत. ग्रहांच्या आकर्षणाने ते ज्यावेळी कक्षेत खेचले जातात तेव्हा उल्कापात घडतात. पृथ्वीचे परिभ्रमण चालू असताना काही वेळा एखाद्या अशा धुळीच्या लोटातून पृथ्वी जाते. अनेक छोटेमोठे उल्कापात या वेळी होतात. गारांचा सडा पडावा तशा या छोट्यामोठ्या उल्का वातावरणात येतात; पण त्यांतील बहुसंख्य तेथेच वितळून चकाकत नष्ट होऊन जातात. पृथ्वीवर समुद्रात कोसळणाऱ्या उल्कांचा तर पत्ताच लागत नाही व अशांचा आकडा फार मोठा असणार आहे.उल्कांचा संग्रह करणारे अनेकजण आहेत. हा एक तेजीत चालणारा व्यवसाय आहे. उल्का वा पृथ्वीवरच्या दगड ही जाण त्यासाठी असणे ही प्रमुख अट. येथेच बरेचजण गळतात. त्यानंतर यासाठी करावी लागणारी वणवण व त्याला लागणारा अफाट पैसा ही दुसरी अडचण. तिसरी अडचण विविध देशांचे कायदे. पण यावरही मात करून अनेकजण ही हौस भागवतात, तर काहीजण यातूनच पैसा करतात. मोठ्या आकाराच्या उल्केला कित्येक हजार रुपयांची मागणी सतत असते, हे विशेष.उल्कापाताचा एक मोठा अंदाज फार पुरातन काळी झालेल्या उलथापालथीशी नेहमीच जोडला जातो. या महाप्रचंड उल्कापातानेच पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात धूर, धूळ साचून सूर्यप्रकाश पोहोचायला अडथळा झाला असावा व येथील प्राणीजीवन खूपसे नष्ट झाले असावे, असे काहींचे म्हणणे आहे. डायनॉसॉर जातीचे महाकाय प्राणी किंवा सरपटणाऱ्या जाती यातच उपासमार होऊन नष्ट झाल्या असाव्यात, असे मानले जाते. या अंदाजाला पुष्टी देणारा त्या उल्कापाताचा मोठ्या आकाराचा पुरावा मात्र मिळत नाही, ही या अंदाजातील कमतरता म्हणावी लागते. तुम्ही राहता त्या गावातील संग्रहालयात एखादी उल्का आहे का याची चौकशी करा. नसल्यास कुठे बघायला मिळेल, याची माहिती संग्रहालयाच्या प्रमुखांना विचारा. चंद्रावरील आणलेले काही दगड नील आर्मस्ट्राँग यांनी आपल्या देशाला भेट दिले आहेत, हे ज्ञात आहे का ?*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ विश्वास हा जबरदस्तीने निर्माण करण्यासारखी गोष्ट नाही. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत ?२) 'पाचोळा' ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली ?३) १ ते १०० मध्ये एकूण दोन अंकी मूळसंख्या किती ?४) युवा क्रांतिकारक भगतसिंह यांचा जन्म केव्हा झाला ?५) आग्रा ( उत्तरप्रदेश ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती फूट उंचीचा पुतळा उभारला जाणार आहे ?*उत्तरे :-* १) दीपक केसरकर २) प्राचार्य रा. र. बोराडे ३) २१ मूळसंख्या ४) २८ सप्टेंबर १९०७ ५) १०० फूट*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्याम ठाणेदार, पुणे● श्रीकांत भुजबळ साहेब● हणमंत बोलचेटवार● संजय पाटील, पुणे● ऋषिकेश शिंदे● गोपाल ऐनवाले● सुनीलकुमार बावसकर● प्रितिष पाटील● भाऊराव शिंदे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोबाईल स्तोत्रं* लागते ओढ होता प्रातःकाळतसे पाहता,नसे ओढीची वेळ ...||१||सर्वांठायी लावूनी वेढ तू गोडसहान थोर भोवती तुझ्या सर्वकाळ ..||२||क्षणाक्षणा वाढे आतुरता होई घालमेलपाहत राही कोणता मॅसेज,कोणाचा मेल ..||३||प्रभाते कर दर्शनमचा सहज पडला विसरमुल्य वाटे ना कशाचे तूचं वाटे अग्रेसर ..||४||जातील डोळे, स्थूल शरीर,लागेल चष्माकळते सारे परी तुझाच राहील वरचष्मा ...||५||अतिशहाणे झाले जन तुझ्याचमुळेपसरु दे चौफेर तुझे तुझेच जाळे ...||६||डोके हॅंग झाले तरी चालेल देवातू नको तसे राहू, चाखू दे मेवा ...||७||मन मुके झाले,शब्द बोलते केले...जग जवळ आले,जवळचे दूर गेले ...||८||बेचैन जीवाची बेचैनी वाढते क्षणाक्षणालाध्यास लागला लागला हरेक जीवाला ...||९||मन हरवले धन जाऊ दे तुझ्या ठायी, तुझं पायीइति आदिदेवमोबाईल स्तोत्रं संपूर्णम् ...॥१०।। *हणमंत पडवळ, उस्मानाबाद.*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नाते असे तयार करा की,ती शेवटपर्यंत कायम टिकून राहिली पाहिजे.जर असे नाते बनवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्या मनातील स्वार्थीपणाला तिलांजली द्यायला हवी आणि त्याबरोबरच प्रेम,जिव्हाळा,मैत्री, आपुलकी इ.गुणांना प्राधान्य देऊन खरे माणुसकीचे दर्शन निर्माण करुन जो काही एकमेकांतला असलेला दूरावा दूर करून एक अजोड आणि अतूट नाते निर्माण करायला शिकले पाहिजे तरच आपल्या मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मानवता*जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही.*तात्‍पर्य :- ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/08/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ २०१२- राजस्थानात अतिवृष्टीमुळे ३० जण ठार.◆ १९६६- 'लुनार ऑरबिटर -१' या मानवरहीत अंतराळ यानाने चंद्रावरून पहिल्यांदाच पृथ्वीची छायाचित्रे पाठविले.◆ १९१४ - पहिले महायुद्ध - जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.◆१९२९ - हेब्रॉन हत्याकांड - हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.💥 जन्म :-◆१९७३ - मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री. ◆ १९४४- सायरा बानू ,हिन्दी चित्रपट अभिनेत्री.◆ १९१८- विदा करंदीकर, लेखक,कवी.💥 मृत्यू :-◆१९९४- आरती साहा, इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरण पटू.◆ १३८७ - ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.◆१८०६ - चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद.. शिक्षण संचालकांचा निर्णय.. शालार्थ आयडी गोठवण्याचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण.. नगरपरिषद सुधारणा विधेयक बहुमताने संमत*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अग्निसुरक्षा नियमांच्या शिफारस करण्यासाठी अखेर राज्य सरकारनं चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे. राज्य सरकारतर्फे मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती देण्यात आली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीच्या विशेष PMLA कोर्टामध्ये हजर करण्यात आले असून 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *विनायक मेटेंच्या अपघातानंतर परिवहन विभाग सतर्क; सर्व आमदारांच्या वाहन चालकांना देणार प्रशिक्षण*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ; चंद्रकांत पाटलांची घोषणा .. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंतचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क होणार माफ*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अगदी अखेरच्या 2 षटकात कमाल गोलंदाजी केल्याने 13 धावांनी भारत जिंकला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Humpty Dumpty👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/MVvqgTsRddk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*लघुकथा - पंगूम लंघयते गिरीम*दिव्यांग व्यक्तीची यशस्वी कथा.http://kathamaala.blogspot.com/2021/03/blog-post_31.htmlकथालेखन - नासा येवतीकर, धर्माबाद•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *ऊती किंवा पेशीजाल म्हणजे काय ?* 📙जगातील सर्व सजीवांचे शरीर अतिशय सूक्ष्म अशा पेशींनी तयार झालेले असते. केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने या पेशी आपण पाहू शकतो. एखादे घर जसे असंख्य चिरेबंदी दगड किंवा विटांनी बांधले जाते तसेच कार्य येथे पेशी करत असतात. प्रत्येक पेशी ही तीन घटकांनी संपन्न होते. पेशीचे आवरण, पेशीद्रव, केंद्रक हे ते घटक. वनस्पतीपेशीत आवरण जास्त घट्ट असलेल्या पेशीद्रवाचे बनते. तसे प्राणिजपेशीत आढळत नाही. प्रत्येक पेशीला अन्न, प्राणी व प्राणवायू लागतो. तसेच जन्म, वाढ, कार्य व ठरावीक काळाने मृत्यू हे चक्र ठरलेलेच असते. पेशींची पूर्ण वाढ झाली की केंद्रकाचे दोन भाग होतात व पेशींचे द्विभाजन सुरू होते. पेशीद्रव प्रत्येक तुकड्याभोवती गोळा होऊन ही क्रिया पूर्ण होते. पेशीविभाजन सतत चालू असल्याने प्राण्याच्या शरीराला पेशींचा सतत पुरवठा चालू राहतो. या पेशी विभाजनाला एकच अपवाद आहे. तो म्हणजे मेंदूच्या पेशी. त्यांची संख्या जन्मत:च निश्चित असते. त्यात वयानुसार फक्त घटच होत जाते.जरी प्राणी व मानव एकाच बीजाच्या फलितातुन जन्माला येत असला तरी बीजांडफलनाच्या क्षणी मूळ पेशी (स्टेम सेल) फलित अंड्याच्या अंतर्भागात अस्तित्वात असतात. त्यातून शरीरात निरनिराळी कार्य करणाऱ्या निरनिराळ्या आकारांच्या पेशींची निर्मिती केली जाते. अशा पेशींच्या विशिष्ट कार्य करणाऱ्या समूहाला ऊती किंवा 'पेशीजाल' असे म्हटले जाते. अस्थिपेशी, ग्रंथीपेशी, स्नायूपेशी, रक्तातील पांढऱ्या व तांबड्या पेशी, चरबीच्या पेशी, आच्छादक पेशी, संयोगी पांढरे तंतू, संयोगी लवचिक तंतू व मज्जापेशी अशी नावाप्रमाणेच विशिष्ट कार्ये या विशिष्ट पेशीजालाकडून पार पडतात. याखेरीज शरीरातील महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळा, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे, त्वचा यांची निर्मिती त्यांच्या कार्याला अनुरूप अशा पेशीजालातून केली जाते. उदाहरणार्थ, यकृतपेशी फक्त पित्तनिर्मिती करतात. मूत्रपिंडात नेफ्रॉन समूह मूत्रनिर्मिती करतो, हृदयाचे स्नायू जन्मापासून अखेरपर्यंत सतत कार्यरत राहतात.ऊती वा पेशीजालाच्या पुनर्निर्माणावर दोन पद्धतीत नियंत्रण असते. कुठेही इजा झाली, कापले व अंतर्गत इंद्रियांमध्ये बिघाड झाला, तर तेथील रक्तपुरवठ्याद्वारे यावर तातडीने मदतीला सुरुवात होते. कापल्याजागी खपली धरणे हे यांचे पहिले स्वरूप. नंतर यथावकाश त्वचेचा थर पुन्हा आच्छादला जातो. यकृताचे व त्वचेचे पेशीजाल या बाबतीत अत्यंत जागरूक असते. याउलट अस्थिपेशीजाल या पुनर्निर्मितीसाठी काही आठवडे घेतात. तुटलेली हाडे जोडायला शरीर सहा ते दहा आठवडे घेते, मात्र शस्त्रक्रियेनंतरचे टाके सातव्या दिवशीही काढता येतात. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायलाच हवी. फार मोठ्या पेशीजालाचा नाश झाल्यास त्यांची जागा तशाच ऊती वा पेशीजाल्याने कधीच भरली जात नाही. यावेळी फक्त अच्छादनाचे वा मुत्रपेशींची जागा भरून काढण्याचे काम विशिष्ट प्रकारचा तंतुयुक्त पेशींद्वारे केले जाते. शरीरावरचे मोठे कायम राहणारे व्रण, शरीरातील मोठा अवयव काढला तर त्या जागी भरून येणारे पेशीजाल हे विशिष्ट कार्य करीत नाही, तर फक्त जागा भरून काढते. एकाच प्रकारचे कार्य करणाऱ्या ऊतींचा संचय इंद्रियाचे कार्य करतो.संपूर्ण शरीरातील गुंतागुंतीची अनेक कार्ये विशिष्ट प्रकारच्या ऊती वा पेशीजालांनी सहजपणे पार पडतात; पण या साऱ्यांची निर्मिती मात्र काही मोजक्या मूळ पेशींतून होते, हे निसर्गाचेच एक गुपित आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळजोडणी असलेले देशातील पहिले राज्य कोणते ?३) युवा क्रांतिकारक मंगल पांडे यांना केव्हा फाशी देण्यात आली ?४) 'आधुनिक आर्यभट्ट' कोणाला म्हणतात ?५) भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान कोण आहे ?*उत्तरे :-* १) हेमंत सोरेन २) गोवा ३) ८ एप्रिल १८५७ ४) विक्रम साराभाई ५) हरमनप्रीत कौर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सचिन बोरसे● आनंद यादव● अनिलकुमार शिंदे● रामदास पेंडपवार,● सुनील बेंडे● भारत सर्वे● भोजन्ना चिंचलोड● बाबुराव पिराईवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?**कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••☀☀☀☀☀☀☀☀☀संजय नलावडे, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बालकविता*पाळण्यात पापामारतो गप्पाखातो धप्पाममीचामुळूमुळू रडतोदुधच पितोमटकन झोपतोबब-याचांदवा झुलतोमोर डोलतोपोपट बोलतोवेदूलाखुळखूळा खणखणपैंजण रूणझुणबाजूबंद छनछनबाळाचेदुडूदुडू चालणेअंगणी नाचणेबोबडे बोलणेछकुल्याचे- वीरभद्र मिरेवाड, नायगाव, नांदेड( फेसबुक साभार )•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••रस्ता कितीही अरुंद असला तरीही माणूस तो रस्ता पार करुन जातो त्याप्रमाणे जीवनात कितीही अडचण असली तरीही त्या अडचणीवर मात करुन जीवन जगण्याचा प्रयत्न करायला हवा.कारण जीवन हे सहजासहजी जगणे सामान्य माणसासाठी अवघडच आहे.अवघड आहे म्हणून सोडता येणार नाही किंवा निराश आणि हताशही होऊन बसता येणार नाही.स्तब्धपणे बसलात तर मार्ग काढणेही अवघड आहे.त्यातून काही ना काहीतरी युक्ती सुचता आली पाहिजे अन्यथा संकटं अंगावर झेलून लाखमोलाचे जीवन जगण्यात काही अर्थ राहणार नाही.प्रयत्न,सातत्य,सकारात्मक विचार ह्यातूनच जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०.🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹🍂🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."तात्पर्य :- भावनेच्‍या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्‍वच्‍छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहवे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 22/08/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९४४- दुसरे महायुद्ध,सोवियत युनियन ने रोमानिया जिंकले.💥 जन्म :-◆१९२० - डेंटन कूली, अमेरिकन डॉक्टर.◆१९५५ - चिरंजीवी, तेलुगू चित्रपट अभिनेता.◆१९६४ - मॅट्स विलँडर, स्वीडनचा टेनिस खेळाडू.💥 मृत्यू :-◆ १९९९-सूर्यकांत मांडरे,मराठी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा ; गणेशमुर्तींना उंचीचं बंधन नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ, दोन कॅबिनेट मंत्र्यांची खाती काढून घेतली*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *'भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात 7 सप्टेंबरपासून यात्रेला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे ? राज्यातील सत्तासंघर्षावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी खूषखबर, एसटी महामंडळाकडून यंदा कोकणात जाण्यासाठी 2 हजार 310 गाड्या सोडण्यात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हिमाचलमध्ये ढगफुटी, २४ तासांत १९ जणांचा मृत्यू, उत्तराखंडमध्येही पावसाचा हाहाकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *झिम्बाब्वे विरुद्धची तीन एकदिवसीय सामन्याची मालिका भारतानं जिंकली; दुसऱ्या सामन्यात 5 विकेट्सनं विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Letter With its Sound👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/7VFkn5D_EZc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक*http://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_24.html•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌈 *इंद्रधनुष्य म्हणजे काय ?* 🌈पावसाळ्याच्या दिवसांत जेव्हा ऊन पावसाचा खेळ चालू असतो, तेव्हा अनेकदा इंद्रधनुष्य दिसते. खरे म्हणजे हा सप्तरंगांचा खेळ असतो. पण तो आकाशात प्रचंड धनुष्य कृतीच्या आकारात समोर उभा ठाकतो. एक टोक लांबवर जमिनीला भिडलेले तर दुसरे आकाशात उंच कुठेतरी अज्ञातात गेलेले. एवढे मोठे धनुष्य इंद्राशिवाय कोणाचे असणार ? म्हणूनच बहुधा याचे नाव इंद्रधनुष्य पडले असावे. जसजसा सूर्य मावळत जातो, तसे इंद्रधनुष्य दिसेनासे होत जाते किंवा समोर पडणारा पाऊस जसा थांबतो, तसे तेही अदृश्य होते.इंद्रधनुष्य दिसण्यासाठी उन्हाची तिरीप पाहिजे. सूर्य माथ्यावर असून उपयोग नाही. पाऊस कोसळत असून उपयोग नाही. तर त्याची भुरभुर पाहिजे. सूर्यकिरण आपल्यामागून येत असणे महत्त्वाचे, तर पाऊस आपल्यापासून पुढे लांबवर पडत असला पाहिजे. हे सगळे जर जमले तर मग इंद्रधनुष्याची रंगत जमली व बराच काळ टिकली असे नक्की समजावे.स्वच्छ प्रकाश हा सप्तरंगांचे मिश्रण असते. तेव्हा एखाद्या पाणी वा काच यांसारख्या माध्यमातून ते किरण प्रवास करतात. तेव्हा वक्रीभवनाची प्रक्रिया घडते. ही प्रक्रिया घडताना जांभळ्या व निळ्या रंगाच्या प्रकाशकिरणांचा, वक्रीभवनाचा कोन जास्त असतो, तर लाल रंगांचे किरण त्या मानाने कमी वक्र पावतात. किरणांचा वेग मंदावण्याने ही क्रिया घडते. ही गोष्ट जशी एखाद्या लोलकाच्या साहाय्याने आपण एखाद्या प्रकाशझोतात बघू शकतो, तशीच पावसाच्या थेंबाच्या रूपाने ही आकाशात घडते. पावसाचे थेंब असंख्य असल्याने प्रकाशकिरणांच्या वक्रीभवनातून हा एक सलग रंगपट्टाच तयार होतो व त्यालाच आपण इंद्रधनुष्याची उपमा देतो.इंद्रधनुष्य केवळ पावसात दिसते, असेच नव्हे, तर विरणाऱ्या धुक्यामध्येसुद्धा एखाद्या दरीच्या पोटातून निघून थेट पर्वतशिखरांना ओलांडून वर जाताना दिसते. किंबहुना अनेक वेळा इंद्रधनुष्य दिसण्याची जागा म्हणजे खोल दऱ्या व त्यांच्या आसपासची गिरीशिखरे होय. दरीतून वरवर जाणारे बाष्पकण व त्यांवर उतरणारे तिरके सूर्यकिरण हे सहजपणे इंद्रधनूचा खेळ दाखवून जातात. विमानातून खाली ढगांवर दिसणारे गोल चक्राकार इंद्रधनुष्य हाही एक अद्भुत प्रकार आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" Hard times are the moments of reflection. "* *(कठीण परिस्थिती ही तुमच्यातील धैर्य/चिकाटी दाखवण्याची खरी वेळ आहे.)**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गोवा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) युवा क्रांतिकारक मंगल पांडे यांनी कोणाला ठार केले ?३) RBI ने पहिल्यांदा १ रूपयाची नोट कोणत्या साली छापली ?४) 'इंडिया गेट'चे वास्तुविशारद कोण होते ?५) १५० वर्ष झाल्यावर कोणता महोत्सव साजरा करण्यात येतो ?*उत्तरे :-* १) प्रमोद सावंत २) मेजर ह्युसन, ब्रिटिश अधिकारी ३) १९४० ४) एडविन लँडसियर ल्युटन्स ५) सार्ध शती महोत्सव*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गजानन पाटील, हिंगोली● शिवा संजय गैनवार● नागराज यंबरवार● आशिष देशपांडे● गुरुदास आकेमवाड, बरबडेकर● शंकर गंगुलवार● मुजीब शेख● आकांक्षा नागेश तांबोळी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*देवाचे खरे मंदिर कोणते - जेथे त्याला बंद दरवाज्यामागे कडी-कुलपात सुरक्षित ठेवले जाते ते ? जेथे प्रवेशासाठी तिकीट काढावे लागते ते ? जेथे आधिक पैसे देऊन लवकर दर्शन घेता येते ते ? की आपल्या घरातलाच तो पवित्र राखलेला एक कोपरा, जेथे आरती म्हटली जाते ? ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. त्याला तशा मंदिरांची गरज नाही.**परमेश्वराचे खरे मंदिर आपणच आहोत; कारण त्याचा पवित्र आत्मा आपल्यात राहतो. आपल्या ह्रदयातील भव्य उपासना- मंदिराच्या परमपवित्र स्थानांत सर्वांना, अगदी अनिर्बंधितपणे जाता यावे ही एक सुंदर कल्पना आहे आणि ती लवकर साकार व्हावी. पण त्याआधी आपल्या अंत:करणावर आपण काय लिहिले आहे तेही बघितले पाहिजे. असे न होवो की, आपल्या अंत:करणावरची 'प्रवेश बंद' ची पाटी वाचुन परमेश्वर बाहेरच उभा राहिला असेल.*•• ● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••बालकविता *वाहतुकीचे नियम*🚲🚕🏎️🏍️मित्रांनो लक्षात ठेवा कायमसाधे सोपे वाहतुकीचे नियमआधी उजवी,मग डावीकडेबघू रस्ता ओलांडताना गडेकरू सुलभतेने पार अंतरपाळत झेब्रा क्रॉसिंगचे नियममित्रांनो लक्षात ठेवा कायमसाधे सोपे वाहतुकीचे नियम"थांब जरा"लाल म्हणतो"हो तयार" पिवळा सांगतो"जा" हिरवा करतो इशारारंगीत "सिग्नल लाईट " नियममित्रांनो लक्षात ठेवा कायम साधे सोपे वाहतुकीचे नियमवळणावर सुचक त्रिकोणातपुल,खाई,डोंगर नकाशातसहाय्यक नागमोडी वाटेवरहे "आदेशात्मक चिन्ह" नियममित्रांनो लक्षात ठेवा कायम साधे सोपे वाहतुकीचे नियमप्रवास करू अपघात टाळूनसिटबेल्ट बांधून,हेल्मेट घालूनमाझी सुरक्षा माझी जबाबदारीअंगीकारू सुरक्षिततेचा नियममित्रांनो लक्षात ठेवा कायम साधे सोपे वाहतुकीचे नियमशैलजा गोरडे ( फेसबुक साभार )•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात.अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासारविचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नदी, मासा, युक्ती*एका नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही 🕸म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. त्याच्या मनात एक विचार आला आणि त्याने एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळी बराच वेळ विचारात पडला.त्यानंतर त्याला सूचले की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.कोळ्याची ही युक्ती कामी आली.तात्पर्य :- युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.काही बाबीसाठी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते.आणि कमी वेळेत कार्य सार्थकी लागते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 20/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ *भारतीय अक्षय ऊर्जा दिन* ◆ *सद्भावना दिन* ◆ *जागतिक डास दिन*💥 ठळक घडामोडी :-◆ २००८- कुस्तीगीर सुशीलकुमार याला बीजिंग ओलीम्पिक मध्ये ब्रॉंझ पदक मिळाले.◆१९९७ - सूहाने हत्याकांड - अल्जिरियामध्ये ६० व्यक्ती ठार. १५ अधिक व्यक्तींचे अपहरण.💥 जन्म :-◆१९४४ - राजीव गांधी, भारताचे माजी पंतप्रधान.◆ १९४६ - एन.आर. नारायण मुर्ती, भारतीय उद्योगपती.💥 मृत्यू :-◆ २०१३-नरेंद्र दाभोळकर ,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व थोर समाजसुधारक,विचारवंत यांची पुणे येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली.◆ २०१३- जयंत साळगावकर, ज्योतिर्भास्कार,लेखक व उद्योजक.◆१९९७ - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शिर्डीच्या साईमंदिरात पारंपरिक पद्धतीने दहिहंडी फोडण्यात आली. दहिहंडी फोडल्यानंतर दुुपारची आरती पार पडली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कर्जबुडव्या निरव मोदीच्या मुंबईतील HCL हाऊसचा 23 सप्टेंबरला लिलाव, कर्जवसुली लवादाचा आदेश*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जात आहे. हा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथील मैदानात खेळवला जाणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यात दुर्मिळ 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव, बुलढाण्यात आढळले 9 रुग्ण, जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ठाकरे सरकारनं लागू केलेले सीबीआय तपासावरचे निर्बंध उठण्याची शक्यता, राज्य सरकारच्या अनुमतीशिवाय सीबीआयला तपासाचे अधिकार मिळण्याची चिन्ह*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *धोका वाढला; मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या हजार पार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स हा भारतातील गरीब मुलांना मदत करणार आहे. यासाठी त्याने भारतातील एका संस्थेसोबत एक करार केला आहे. या संस्थेच्या माध्यमातून तो भारातातील वंचित मुलांना मदत करणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*तूच आहेस का सुतार पक्षी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/J6J8bdtnsIc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक फोटोग्राफी दिन - 19 ऑगस्ट*https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_19.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणजे काय ?* 📙सूक्ष्मदर्शक भिंगाचा वापर प्रथम लहान वस्तू बघण्यासाठी केला गेला. मग जिवाणूंचा शोध लावला गेला. त्यांच्याबद्दलचे संशोधन चालू असतानाच पेशींच्या अंतर्गत हालचालींबद्दल औत्सुक्य निर्माण झाले होते. पण सूक्ष्मदर्शक यंत्रांची ताकद कमी पडू लागली होती. पेशीतील न्युक्लियस दिसत होता; पण त्याच्या पुढे फारसे जाता येत नव्हते. याच सुमाराला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला.हा काम कसा करतो ? अतिशय काळजीपूर्वक व जास्तीत जास्त पातळ गोष्टींचे निरीक्षण करण्यासाठी याचा वापर करतात. अगदी पातळ असा केस या मायक्रोस्कोपखाली बघितल्यास जाड मनगटाएवढ्या दोरखंडासारखा दिसतो. सर्वसाधारणपणे १०,००० ते ५०,००० पट मोठी प्रतिमा करण्याची याची शक्ती असते.एका तीव्र स्रोतातून इलेक्ट्रॉनचा झोत चुंबकीय क्षेत्रातून एकवटून पाहावयाच्या गोष्टींवर सोडला जातो. तपासणी करावयाच्या वस्तूंमधील प्रत्येक अणूची दखल हा झोत घेतो व त्याचा एक आराखडा समोरच असलेल्या इलेक्ट्रॉन शोधकातर्फे टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागतो. योग्य त्या पद्धतीत झोताचे केंद्रीकरण झाल्यावर गरजेप्रमाणे त्याचे फोटो घेता येतात. झोतातले इलेक्ट्रॉन्स नेमके काय करतात ? प्रकाश लहरींपेक्षा यांची पृथक्करण शक्ती कितीतरी पटींनी जास्त असल्याने वस्तूची प्रतिमा जवळपास एक लक्ष पट मोठी दिसू शकते. मुख्यत्वेकरून जेनेटिक्समधील संशोधन, डीएनए व आरएनए या संदर्भातील प्रयोग, विषाणूंचा शोध यांसाठी या मायक्रोस्कोपचा वापर केला जातो. भारतातील फार मोठय़ा शहरांतील मोजक्या प्रयोगशाळांत अत्यंत कुशल वैज्ञानिक यांचा उपयोग करतात.HIV वरचे संशोधन, H1 N1 या विषाणूने होणाऱ्या स्वाइन फ्लू बद्दलचे संशोधन हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपशिवाय शक्य नव्हते. बायोटेक्नॉलॉजी संदर्भातही अनेक बाबतीत याचा वापर अत्यावश्यक ठरतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'अक्षय ऊर्जा दिवस' कधी साजरा केला जातो ?२) १२५ वर्षे झाल्यावर कोणता महोत्सव साजरा केला जातो ?३) कोणत्या शासकाने 'रुपया' या शब्दाचा वापर सर्वप्रथम केला ?४) 'आगाखान पॅलेस' ही वास्तू कोठे आहे ?५) १९५३ साली संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या जगातील पहिल्या महिला कोण ?*उत्तरे :-* १) २० ऑगस्ट २) शतकोत्तर रौप्य महोत्सव ३) शेरशाह सुरी, सुरी वंश ४) पुणे ५) विजयालक्ष्मी पंडित *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हरीश बुटले, संपादक, पुणे● इरेश्याम झंपलकर, कुंडलवाडी● विजय दिंडे, हुनगुंदा● गणेश येवतीकर, येवती● शशांक बामनपल्ले, नायगाव● दीपक पाटील● सतीश दिंडे● जयपाल दावनगीरकर● विवेक सारडे● प्रमोद मुधोळकर● आदित्य रावजीवार● कांतीलाल घोडके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.**स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.* *॥ रामकृष्णहरी ॥*☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कृष्ण जन्मला ..*श्रावण अष्टमी रात पावसाळीबेहोशी निद्रेची निशा काळी काळीअलौकिक भाग्यवंत आठवा आला देवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..वसुदेव देवकी अपार आनंदानेअंतरातूनी त्रासूनी कंस भयानेवाचवू कसे काळजाच्या तुकड्यालादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..तुटल्या कड्या ,दारे उघडली कारागृहातूनी बाहेर पडलीपुत्रास घेवूनी वसुदेव निघालादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..यमुनेला महापूर पाणीच पाणी कंसापासून वाचविणे निग्रह मनीबालजीव डोईवर ,झरझर चालला देवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..गोकुळी वसुदेव मित्र नंदाकडेपुत्रास ठेऊनी रक्षणाचे साकडेनंदाची कन्या घेऊनी आलादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..यशोदा माता पुत्रास बघूनीधन्य धन्य झाली ती जीवनीआनंदी आनंद गोकुळी झालादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..नंदाचा नंदलाल यशोदेचा कान्हा देवकीला फुटे मायेचा पान्हाहर्षानंद घेऊनी गोपाल आलादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..धावू लागला ,खेळू लागलाबोल बोबडे बोलू लागलानंदाघरी दिव्य स्वर्ग अवतरलादेवकीच्या उदरी ग कृष्ण जन्मला..मीना खोंड, लंडन7799564212•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करुन नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.कारण तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही आहात.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एकीचे बळ*एका वृद्धाने सदान्- कदा भांडणार्‍या आपल्या मुलांना हातभर लांबीची एकेक काठी मोडायला सांगणेएक गृहस्थ म्हातारपणामुळे बराच थकला होता. आयुष्यात चांगली कमाई करून आणि स्वत: चांगले जीवन जगूनसुद्धा त्याच्या पाच मुलांमध्ये सदान्-कदा चालणार्‍या भांडणांमुळे तो दु:खी होई. त्याने आपल्या मुलांना बराच उपदेश केला; पण पालथ्या घडावर पाणी. एके दिवशी त्याने आपल्या पाचही मुलांना प्रत्येकी हातभर लांबीची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे ती मुले एकेक काठी घेऊन आली. त्या गृहस्थाने त्यांच्यापैकी प्रत्येकाला आपापली काठी मोडण्यास सांगितले. वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट प्रत्येक मुलाने लगेचच करून दाखवली.वडिलांनी पाच काठ्यांची जुडी करून प्रत्येकाला ती मोडायला सांगितल्यावर एकालाही ती मोडता न येणेपुन्हा त्या गृहस्थाने त्या मुलांना तशाच प्रकारची एकेक काठी घेऊन यायला सांगितले. पाच जणांनी पाच काठ्या आणून वडिलांपुढे ठेवल्या. वडिलांनी त्या पाच काठ्यांची एका दोरीने मोळी बांधली आणि प्रत्येकाला ती मोडायला सांगितली. पाच काठ्या एकत्र असलेली ती मोळी आपल्या पाच मुलांपैकी कुणालाच मोडता येत नसल्याचे पाहून तो गृहस्थ त्यांना म्हणाला, बघितलंत ना ? एकीचे बळ किती असते ते ? वडील एवढेच बोलले; पण ते सूज्ञ मुलगे समजायचे ते समजले. तेव्हापासून एकजुटीने वागू लागले.संघटित राहून केलेल्या कार्यास यश नक्कीच प्राप्त होते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📷 *जागतिक छायाचित्रण दिन* 💥 ठळक घडामोडी :-◆ १९८७ - युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.◆ १९९१ - सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.💥 जन्म :-◆१९०३ - गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.◆ १९२२ - बबनराव नावडीकर, मराठी गायक.◆ १९८७ - आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-◆ १६६२ - ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *दही हंडीला खेळाचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. शासकीय नोकऱ्यांमध्ये खेळाडूंच्या आरक्षणासाठीही गोंविदा पात्र, दहीहंडी दरम्यान अपघात झाला तर मिळणार आर्थिक मदत*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * 'बेस्ट'चं आधुनिक पर्व सुरू; देशातील पहिल्या एसी डबलडेकर बसचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *खऱ्या दागिन्यांच्या जागी बनावट दागिने; अमरावतीमध्ये युनियन बँकेच्या लॉकरमधील तीन कोटींचे दागिने बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार, काश्मीरमध्ये बाहेरच्या 25 लाख मतदारांनाही मतदारयादीत मोकळीक*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारकडून 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक; 7 भारतीय आणि 1 पाकिस्तानच्या चॅनलचा समावेश, प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी यूट्यूबचा केला जात होता वापर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात पुन्हा घातपाताचा प्रयत्न? श्रीवर्धनमध्ये एका बोटीत आढळल्या एके-47, ओमानमधून एके-47 सह बोट रायगडच्या किनाऱ्यावर, सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह! रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *शिखर-शुभमनची अभेद्य भागिदारी, भारताचा झिम्बाब्वेवर 10 गडी राखून विजय, मालिकेतही 1-0 ची आघाडी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Body Parts Class 3rd Chapter 1.2👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/YP-bqnOfJMA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - कुलदीपक* शिल्पाला मुलगा झाला ही बातमी तिच्या सासूच्या कानावर गेली तशी तिची सासू कमलाबाई खूपच आनंदून गेली. वंशाला दिवा मिळाला म्हणून शेजारी पाजारी आनंदाने सांगत सुटली. शिल्पा सरकारी दवाखान्यात होती, सोबत तिचा नवरा दीपक देखील हजर होता. घरातील काम आटोपून कमलाबाई लगेच दवाखान्यात.........लघुकथा पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_16.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पिटूनिया*फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या शास्त्रीय नावाच्या वंशातील काही जाती बागेत शोभेकरिता विशेषेकरून लावलेल्या आढळतात. एकूण जाती सु. ४० (ए.बी. रेंडेल यांच्या मते १४) असून त्यांचा प्रसार द. आणि उ. अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आहे. भारतात काही जाती बाहेरून आणून लावल्या आहेत.बागेतील शोभा वाढविण्यासाठी अनेक संकरज प्रकार आज उपलब्ध आहेत; तथापि त्या सर्वांचा उगम अर्जेंटिनातील पिटूनियाच्या निक्टॅजिनिफ्योरा, व्हायोलॅशिया, अक्सिलॅरिस व इंटिग्रिफोलिया या जातींच्या संकरात आहे. दुहेरी पाकळ्यांचे व अनेक भडक रंगांचे आधुनिक प्रकार संकरातून व निवडीने काढले गेले आहेत. मूळच्या जाती सु. ३०-४५ सेंमी. उंच, सरळ वाढणार्‍या, वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणार्‍या) ओषधी [ ® ओषधि ] असून पाने साधी, मध्यम आकारमानाची, आयत, समोरासमोर आणि खोडाच्या टोकाकडे बिनदेठाची तर बुंध्याकडे लांब देठाची, कधी सर्वच आखूड किंवा बिनदेठाची असतात.सर्व भागांवर प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले एकेकटी, विविध रंगांची, तुतारीसारखी व कक्षास्थ (पानांच्याबगलेत) असतात; केसरदले पाच असून इतर सामान्य शारीरिक लक्षणे ð सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया अथवा दाब कलमांनी करतात. बी ऑगस्ट ते ऑक्टोबरात किंवा मैदानी प्रदेशात मार्च ते जूनमध्ये व डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलमध्ये पेरतात; महिन्याने रोपे दुसरीकडे वाफ्यात (कडेने किंवा मध्ये) लावतात. दुहेरी पाकळ्यांच्या जातींची लागवड कलमांनी करतात.लावल्यापासून तीन ते चार महिन्यांनी फुले येऊ लागतात व ती बराच काळ येत राहतात. खिडकीजवळ केलेल्या वाफ्यांत ही झाडे अधिक शोभिवंत दिसतात; कुंड्यांतूनही लावतात. पिटूनिया हायब्रिडा हा संकरज प्रकार लोकप्रिय आहे. टोमॅटो व बटाट्याजवळ ही झाडे लावू नयेत कारण उपद्रवकारक अशा कीटकांपासून त्यांना इजा पोहोचणे शक्य असते *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" उत्तम चरित्र आणि प्रामाणिकपणा हे माणसाचे कधीच न संपणारे धन असते..! "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणारे भारतीय प्रधानमंत्री कोण ?२) संस्कृतच्या कोणत्या शब्दापासून 'रुपया' हा शब्द बनला आहे ?३) RBI ने पहिली नोट कोणती व केव्हा छापली ?४) निर्माणाधिन जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची किती मीटर आहे ?५) गिनीज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झालेली राष्ट्रध्वजाच्या आकारातील जगातील सर्वात मोठी मानवी साखळी कोठे तयार करण्यात आली ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) रुप्यकम ३) ५ रू. ( १९३८ ) ४) ३५९ मी. ५) चंदीगड क्रिकेट स्टेडियम, ( ५८८५ विद्यार्थी ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● उत्तम सदाकाळ, साहित्यिक● संभाजी पाटील● महेश हातझडे, गोंदिया● शिवा टाले, नांदेड● संदीपराजे गायकवाड, बिलोली● योगेश मठपती● प्रीती माडेकर, यवतमाळ● संतोष कडवाईकर● मन्मथ चपळे● मोहन शिंदे● विलास वाघमारे● अमोल चव्हाण● आकाश बोर्डे● मोहनराव पाठक, पुणे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तरूणपणी आईवडिलांचा, पुढे पत्नीचा आणि त्यानंतर पुत्रांचा विरह भगवान रामाला सहन करावा लागला. यात काय दु:ख नव्हते? इच्छामरणी असूनही आणि आयुष्यभर दु:खाशी संग्राम करूनही भीष्मांना अखेरीस शरपंजरी व्हावे लागले. कुटुंबातील यादवी आणि एकमेकांचे जीव घेणारे सोयरे पाहण्याची वेळ युगंधर कृष्णावर येते, आणि पारध्याच्या बाणाने आयुष्याची अखेर होते. रामायण आणि महाभारत यामधील अनेक पात्रे दु:खाने आणि वेदनेने वाहताना दिसतात. तरीही ही महाकाव्य जीवनाच्या विविध अंगाना स्पर्श करून दिव्यत्व जगविण्याची आणि जागविण्याची प्रेरणा देतात.**लहानसहान गोष्टींपासून आपला त्रागा सुरू होतो आणि माझ्याच नशीबी हे का? हा प्रश्न पडतो. तुम्हाला जशा समस्या आहेत तशा दुस-यांनाही आहेत. त्यांचे स्वरूप वेगळे आहे. 'जगी सर्व सुखी असा कोण आहे' या समर्थ रामदासांच्या प्रश्नाला उत्तर मिळत नाही. त्या उत्तरासाठी सुखाचा सदरा आपणच तयार करायला हवा, आणि तो जसा परिधान करायला हवा तसा अंतर्मनातील दु:खाच्या अंधारावर चांदण्यांचा वर्षावही करायला हवा. आपणही दु:खाचे शंभर धागे मोजत बसणार की सुखाचा धागा धागा विणत जाणार? व्यक्तीगत दु:खापासून सार्वजनिक दुराचारापर्यंत आपण भ्रष्टतेचे, नष्टतेचे पोकळ शंख फुंकणे थांबविले पाहिजे आणि दिव्याने दिवा पेटणारा प्रकाश पेरला पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सोहळा कृष्णजन्माष्टमीचाश्रीकृष्णजन्माष्टमीचा सणबाळकृष्णाचा हा जन्मदिनपाळण्यात हलवूनी कान्हागाऊया श्रीहरीचे गुणगानसावळा हा मुरली मनोहरयशोदेचा लडिवाळ कान्हाअवखळअल्लड खोड्यांनीफुटतो यशोदेला प्रेमपान्हासुंदर हासरे ते मुखकमलशांत निजला वेणूगोपाळशोभे हातात सुवर्ण कंकनपायी वाजवितो तोडे चाळमूर्तिमंत डोळे आकर्षतीबाळाची स्नेहाळ ती दृष्टी बाजूबंद शोभे दंडामध्येमुखकमलांतच वसे सृष्टी कुरळे कुंतल तान्हुल्याचेत्यावर मोरपिसाची मायायशोदामैयाची प्रेमपाखरकन्हैया वर जणू छत्रछायासौ.भारती सावंत, मुंबई•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्ती अश्रूंचा सहारा घेऊन जगतात त्या जीवनात कुठेतरी पराभव पत्करलेल्या असतात किंवा त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला असतो किंवा कुणीतरी मनाविरुद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले असते.हे जरी खरे असले तरी अशा व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमकुवत झाल्याने त्यांना जीवनात जगण्याची काही अपेक्षा उरली नाही किंवा आता आपण जगून तरी काय करावे असा सतत विचार करत आणि डोळ्यांत अश्रू आणून कसेबसे जीवन जगतात.अशा दुबळ्या मनाने जीवन जगण्यापासून जीवनाला परावृत्त करायचे असेल तर जीवनात आणि आपल्यासमोर चांगले जीवन जगण्याची उमेद प्रथमत: नजरेसमोर ठेवायला हवी, नेहमी आपण काहीतरी असले तरी मी कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे असा उदात्त विचार करून जगायला शिकले पाहिजे,कुणीजरी आपले मन दुखवण्याचा प्रयत्न केलातरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन असाही सकारात्मक विचार केला आणि मन घट्ट करून जगायला शिकले तर अश्रूंचा आधार घेऊन जगायची काही गरजच भासणार नाही.जीवन तर सुखदु:खाने भरलेले आहे ते कुणाच्या वाट्याला कमी-जास्त असणारच.सुख जास्त झाले म्हणून जास्तही त्या सुखाचा अतिरेक होऊ द्यायचा नाही आणि दु:ख झाले म्हणून अति दु:खी व्हायचे नाही.आपण सारेजण सुखदु:खाच्या चक्रव्युहात अडकलेलोच आहोत आणि त्या चक्रव्युहाला भेदूनच चांगले जीवन जगायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अधिकचा मोठेपणा सांगणे*एक इसम फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला. व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून आणि अधिकाधिक मोठेपणा करून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही. म्हणून माणसाने मोठेपणाचा जास्त आव आणून वागू नये आणि बोलू नये. वाजवीपेक्षा जास्त बढायी करणे म्हणजे फजीती करणे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 18/08/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १२०१ - रिगा शहराची स्थापना.★ १९७१ - व्हियेतनाम युद्ध - ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलँडने आपले सैनिक व्हियेतनाममधून काढून घेण्याचे ठरवले.★ २००८ - पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफने राजीनामा दिला.💥 जन्म :-★ १६९२ - लुई हेन्री, डुक दि बर्बन, फ्रांसचा पंतप्रधान.★ १६९९ - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.★ १७५० - अँतोनियो सालियेरी, इटालियन संगीतकार.★ १८७२ - विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.★ १९६२ - फेलिपे काल्डेरॉन, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.💥 मृत्यू :-★ १२२७ - चंगीझ खान, मंगोल सम्राट.★ १९४० - वॉल्टर पी. क्रायस्लर, अमेरिकन उद्योगपती.★ १९४५ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.★ १९९८ - पर्सिस खंभाता, भारतीय अभिनेत्री.★ २००८ - नारायण धारप, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी ,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी द्रोपदी मुर्मू यांची देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्द्ल अभिनंदन केलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *विमानात प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, कोरोनाची वाढता रुग्णसंख्या पाहता मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल नागरी हवाई वाहतूक संचालनालयानाचे निर्देश*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भाजपची केंद्रीय निवडणूक समिती आणि संसदीय मंडळ जाहीर, फडणवीसांना संधी तर गडकरींना वगळले*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जायकवाडी धरणातून तब्बल 66 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाराष्ट्रात जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यात 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार 68 जणांचा मृत्यू झालाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चंद्रकांत पंडीत यांच्यावर केकेआरच्या मुख्यप्रशिक्षकपदाची जबाबदारी!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टीम इंडियाचं बिझी शेड्युल! पुढील चार वर्षात खेळणार 183 आंतरराष्ट्रीय सामने; आयसीसीकडून 'फ्यूचर टूर प्रोग्राम' जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Class 1st Chapter 1.7👇**My Name**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/pksmVILbWOQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *नपा हद्दीतील सरकारी शाळा*लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.http://nasayeotikar.blogspot.com/2020/06/blog-post_60.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🔭 *वैज्ञानिक दृष्टिकोण* 🔬*प्रश्न - संमोहनाच्या प्रभावाखाली एखाद्या व्यक्तीस चोरी करावयास लावणे शक्य आहे काय?**उत्तर-* ज्या व्यक्तीने पूर्व - आयुष्यात कधीही चोरी केलेली नाही वा चोरी करणे पाप आहे असा पक्का समज ज्या व्यक्तीचा आहे, अशा व्यक्तींकडून संमोहित अवस्थेत चोरी करून घेणे अशक्य आहे. संमोहन अवस्थेत व्यक्ती स्वतःला अनैतिक वाटणाऱ्या सूचना स्वीकारत नाही. अशा सूचना मिळाल्यास एकतर संमोहन अवस्थेतून ती जागृत अवस्थेत येते अथवा त्या अवस्थेत राहूनही त्या विशिष्ट सूचनांप्रमाणे वर्तन करणे नाकारते.समजा एखादा चोर आहे – त्याला संमोहन अवस्थेमध्ये नेल्यानंतर चोरी करण्याची सूचना दिली तर तो ती सूचना अमलात आणेल. कारण चोरी करणे अनैतिक आहे असे त्याला वाटत नसते. (परंतु याचाच अर्थ असा की, चोरी करण्यासाठी त्याला संमोहन अवस्थेत नेण्याची गरज नाही. जागृत अवस्थेमध्येही तो न ओशाळता, न घाबरता चोरी करेल. तीच गोष्ट तो संमोहन अवस्थेत करेल एवढेच.) संमोहनाच्या प्रभावाखाली हे दुष्कृत्य करण्यास तो धजावला, असा त्याचा अर्थ नाही.*डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे**'अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाच्या प्रथम नागरिक असलेल्या महामहिम द्रौपदी मुर्मू यांना अधिकृत अध्यक्षीय वाहन म्हणून कोणती गाडी देण्यात आली आहे ?२) निर्माणाधिन जगातील सर्वात लांब रेल्वे पुलाची लांबी किती आहे ?३) 'दि सॅटनिक व्हर्सेस' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?४) भारतीय चलनास कोणत्या नावाने संबोधतात ?५) संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत अब्दुल राउफ अजहर याला दहशतवादी घोषित करावे या भारत व अमेरिकेच्या प्रस्तावाला कोणत्या देशाने विरोध केला ?*उत्तरे :-* १) मर्सिडीज - बेन्झ एस ६०० २) १.३१५ किमी ३) सलमान रश्दी ४) रुपया ५) चीन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● शेख समदानी, बिलोली● रोहित जंगलेकर● गजानन देवकर● अगस्त्या तावरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*खरेपणा, प्रामाणिकपणा, वास्तवता, अस्सलपणा आणि यथार्थपणा अशी आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख ठेवणं चांगलं. हीच तर आपल्या जीवनाची खरीखुरी गुणसंपदा असते. माणसाने आपल्या ठायी असलेल्या गुणांची जाणीव विसरली तरी चालेल; परंतु आपल्या ठायी असलेल्या दोषांची चांगली जाणीव ठेवावी. जसं दगडातील नको असलेला भाग काढून टाकला की, सुंदर मूर्ती तयार होते, तसं आपल्या स्वभावातील दोष काढून टाकले की, निखळ आणि सुंदर व्यक्तिमत्व झळकत असतं. खरंतर गुणी माणसं लोखंडाचं सोनं बनविणा-या परिसासारखी असतात, ओसाड जमिनीचं नंदनवन करणारी असतात. म्हणून जीवनात यश मिळविण्यासाठी सत्य, पामाणिकपणा, कठोर परिश्रम, न्याय आणि चारित्र्याची गरज असते हे विसरता येणार नाही.**सत्य म्हणजे सत्यवाणी, सत्य विचार, सत्य आचार आणि सत्य उच्चार होय. सत्य म्हणजे जीवन. असत्य म्हणजे मरण. अनेक माणसं अशी जगता जगता मरत असतात आणि अनेक माणसं मरूनदेखील जगत असतात. यासाठी आपण स्वत: सत्यभाषी झाले पाहिजे. समाज सत्याचा आदर करतो. प्रामाणिकपणाची कदर करतो. न्यायची चाड बाळगतो. श्रमाची महती गातो आणि चारित्र्याची पूजा करतो. आज 'सत्यमेव जयते' हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनला पाहिजे. यासाठी सत्याचे महत्व आपल्या मनाच्या पाटीवर कायमचे कोरून ठेवले पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कृष्ण जन्मला ग सखेअष्टमीच्या रात्री ग आनंदी आनंद जाहला चोहीकडे,आज कृष्ण जन्मला ग सखे कृष्ण जन्मला,तिमिर दाटला चोहीकडे,बरसत होत्या जलधारा,यमुनेलाही होता पूर ग सखये,चिंतित जाहली देवकी,धडधडले अंतःकरण दिधला निरोप संचित होऊनी,डोईवरी ठेवुनी बाळ कृष्णाला, वसुदेव जाई यमुना पार,कोसळणाऱ्या जलधारा, अन् विद्युलतेचा लखलखाट,धडकी भरवी वासुदेवाच्या मनी,क्षणात प्रभुच्या रक्षणार्थ शेष आला धावुनी,छत्र धरीले तयाने फणांचे भगवंताच्या डोइवरी,अन वाटही केली यमुनेंनेही, कृष्ण मुरारीला,कृष्ण जन्मला ग सखे आज कृष्ण जन्मला.- योगेश सराफ (लेखणी वेडा)Facebook वॉल वरून साभार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे काट्यातून गुलाबाला फुलण्यासाठी काट्याशी टक्कर द्यावीच लागते तेव्हा कुठे गुलाबाला इतरांना आनंदी पाहता येते.जर इतरांना आनंद द्यायचा असेल तर आपले दुःख त्यांच्यासमोर मांडून चालणार नाही.जर मांडलेत तर त्यांना आनंदाने आपण पाहू शकणार नाही.उलट त्यांच्या आनंदावर विरजण टाकल्यासारखे होईल.इतरांना सुखात आणि आनंदात पहावयाचे असेल तर आपल्याला होत असलेले दु:ख बाजूला सारून त्यांना होणा-या दु:खावर फुंकर घालून सुखाचे काही क्षण देऊ शकतो आणि एवढी तयारी जर आपण ठेवली तर इतरांना जसा आनंद देता येईल त्या आनंदाबरोबरच आपल्या जीवनात आनंद लुटता येईल.नाही तर त्यांच्या डोक्यावर दु:खाचे ढग जसे दाटलेले पहायला मिळतील तसेच आपल्याही डोक्यावर दु:खाणे ढग अधिक गर्दी करुन राहतील.मग आपल्या सुखी जीवनाचे कोणतेही इप्सित साध्य होणार नाही.इतरांना दु:ख देण्यापेक्षा,मन दुखवण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसे फुलवता येईल याचा प्रयत्न करायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जबाबदारीने कार्य करणे.*राज्यकारभारापेक्षा इतर अवांतर गोष्टीत रस घेणाऱ्या एका राजाने आपल्या सेनापतीला दोन प्रश्न विचारले व उत्तरे देण्यासाठी त्याला एका आठवड्याची मुदत दिली. सेनापतीने आपल्याच चेहऱ्य मोहोऱ्याच्या आपल्या एका सेवकाला आपला पोषाख घालायला देऊन, आणि त्या प्रश्नांची उत्तरे पढवून, राजाकडे पाठविले. ‘हा आपला सेनापतीच आहे’ अशा समजुतीनं राजानं त्याला विचारलं, ‘काय सेनापतीसाहेब ? मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तयार आहेत का ?’ नकली सेनापती म्हणाला, ‘महाराज ! ते प्रश्न आपण पुन्हा विचारलेत तर बरे होईल.’ राजा – समोरच्या पर्वताची माती एकूण किती टोपल्या होईल ? नकली सेनापती – त्या पर्वताच्या एकूण क्षेत्रफ़ळाच्या एक दशांश आकाराची जर एक टोपली बनवली, तर त्या पर्वताची एकूण माती दहा टोपल्या होईल. राजा – वा: ! अगदी बरोबर आहे उत्तर. सेनापतीसाहेब ! आता माझ्या मनात काय आहे ते सांगा. नकली सेनापती – सध्या तुमच्या मनात तुम्ही सेनापतीशी बोलत आहात असं आहे; पण मी खरा सेनापती नसून, सेनापतीच्या सोंगात तुमच्याकडे आलेला सेनापतीसाहेबांचा नोकर आहे. राजा – मग तुम्ही दोघांनी मला असं का फ़सवलं ? नकली सेनापती – माझ्या धन्याचं असं म्हणणं आहे की, जे माणसं मोठ्या पदांवर आहेत, त्यांनी मनोरंजनाच्या भलत्यासलत्या गोष्टीत वेळ वाया घालवू नये. राजाचं कर्तव्य राज्य उत्तम त-हेनं चालविण हे आहे, तर सेनापतीचं कर्तव्य राज्याचं उत्तम त-हेनं रक्षण करणे हे आहे. अशा अशा स्थितीत आपण त्यांना नसते प्रश्न विचारुन त्यांच मन त्यांच्यापुढे असलेल्या मुख्य प्रश्नांवरुन उडवून भलत्याच प्रश्नांकडे वेधता. त्यांना आपलं हे वागणं मान्य नसल्यामुळे, त्यांनी आपल्या मामुली प्रश्नांची उत्तर देण्यासाठी माझ्यासारख्या मामुली सेवकाला सेनापतीचं सोंग घेऊन पाठविलं.’ नकली सेनापतीच्या या खुलाशानं राजा वरमला आणि मनोरंजनाच्या बाबींतून लक्ष काढून त्याने ते राज्यकारभारात घातले.साभार - इंटरनेट*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 17/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १८६२ - अमेरिकेत आपल्याच जमिनींवरुन हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.★ १९६० - गॅबनला (झेंडा चित्रीत) फ्रांस पासून स्वातंत्र्य.★ १९६९ - कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनार्‍यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.★ १९७९ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.★ १९८८ - विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.💥 जन्म :-★ १८४४ - मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.★ १९२६ - ज्याँग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.★ १९३२ - व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.★ १९३३ - जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.★ १९७७ - थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.💥 मृत्यू :-★ १३०४ - फुकाकुसा, जपानी सम्राट.★ १९२४ - टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★ १९८८ - मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया**जि प शाळा बिरसी,जि गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत आज सकाळी ११:०० ते ११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत होणार, सर्व नागरिकांनी यात सहभागी होण्याचे राज्यशासनाचे आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महानगर गॅसने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजी प्रति किलो ६ रुपये, तर पीएनजीच्या दरात ४ रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामांन्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *केंद्र सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर राज्य सरकारनेदेखील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बिहारमध्ये नव्याने स्थापन झालेल्या महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. त्यात राजदच्या १६, तर जदयूच्या ११ जणांना मंत्रीपद; बिहारमध्ये विस्तारात काँग्रेसच्या दोघांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमूल’ने दुधाच्या किमती वाढवल्या; सामान्यांचं आर्थिक गणित बिघडणार ? अहमदाबाद, गुजरात, दिल्ली, एनसीआर, मुंबई आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी हे नवे दर लागू होतील.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी सचिव आणि झारखंड क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *‘फिफा’ची भारतावर बंदी ! न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे निर्णय ; कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद गमावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••Class 5th chapter 1.7*Talking about things 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/ExuBsAJzRis~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पौर्णिमा - अमावस्या*https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post_15.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *आम्ल म्हणजे काय ?* 📙चिंच कशी आंबट असते ? हिरवीगार चिंच खाल्ली, तर दात अगदी आंबून जातात. लिंबाचा आंबटपणा मात्र काही वेळा हवाहवासा वाटतो. विशेषतः उन्हाळ्यात तर तो आवडतोच. ताकाचा आंबटगोडपणा तर पाहिजेच असतो. अगदी मधुर ताक समोर आले, तर पिववत नाही. या सर्व आंबटपणाचे कारण काय असते ?या प्रत्येकात एक अाम्ल असते. आम्लाचे (Acid) विविध प्रकार आहेत. आज जगात शेकडो प्रकारची आम्ले शोधली गेली आहेत, वापरातही आहेत. आपल्या पोटातही एक प्रमुख अाम्ल सतत स्रवत असते. पोटातल्या आम्लाचे नाव हायड्रोक्लोरिक अॅसिड. फळांमध्ये असते ते सायट्रिक अॅसिड, तर दुग्धजन्य खाद्यपदार्थात तयार होते ते लॅक्टिक अॅसिड. या आम्लांची चव आंबटसर लागते. अर्थातच त्यांची तीव्रता जेव्हा कमी असते, तेव्हाच. अन्यथा चक्क जीभ भाजली जाते. जीभच काय पण एखादे तीव्र अंमल म्हणजे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प आहे, असे आम्ल जेव्हा कातडीच्या, कापडाच्या, लाकडाच्या किंवा लोकरीच्या संपर्कात येते, तेव्हा ती वस्तू चक्क त्यात विरघळून नष्ट होऊ लागते. तीव्र सल्फ्युरिक अॅसिडमुळे तर कातडी चक्क जळते. म्हणूनच त्याला तेजाब असे म्हणतात.सल्फ्यूरिक, नायट्रिक व हायड्रोक्लोरिक अशी तीन प्रमुख तीव्र आम्ले आहेत. आम्लपदार्थ म्हटल्यावर डोळ्यांसमोर फक्त द्रवच येतो. पण ते खरे नव्हे. कित्येक आम्ले घनरूपही असतात. मात्र एक गोष्ट महत्त्वाची - सर्व आम्लांमध्ये हायड्रोजनचा अणू असतोच. एखादे आम्ल जेव्हा धातूबरोबर संयुक्त पावते, तेव्हा हायड्रोजनचा अणू सुटा होऊन वायूरूप धारण करतो.एखादी वस्तू वा द्रव हा आम्लधर्मी असेल, तर लिटमसच्या कागदाच्या सहाय्याने तो पारखून बघता येतो. द्रवामध्ये लिटमस कागद बुडवला, तर निळा लिटमस लाल होतो. घन आम्ल असेल, तर कागद ओला करून वापरला जातो. आम्लाची तीव्रता ठरवण्यासाठी pH हे परिमाण ठरवले गेले आहे. ० ते ७ च्या दरम्यान सर्व आम्ल व ७ ते ‍१४ या दरम्यान सर्व अल्क पदार्थ मोडतात. शुद्ध पाणी हे सात pH चे असते. सर्वात तीव्र आम्ल ० परिमाण दाखवते, तर अतितीव्र अल्क १४ परिमाणात मोडते. दोन्ही एकमेकांच्या विरुद्धगुणी असतात.उद्योगधंद्यांमध्ये सल्फ्युरिक अॅसिड प्रचंड प्रमाणावर वापरले जाते. खते, रंग, बॅटरीमधील पाणी, स्फोटके, साबण, प्लॅस्टिक या सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक अॅसिडचा विविध स्फोटकांत वापर करतात. हायड्रोक्लोरिक अॅसिड तर पोटात सतत काम करतच असते. त्याचा साठा पोटात गरजेपेक्षा जास्त होऊ लागल्यास घशाशी जळजळते व आंबट व ढेकरा येतात. पण याच अाम्लामुळे खाल्लेल्या अन्नातील सर्व जंतूंचा प्रथम नाश होतो. अर्थातच शरीराला त्रास देऊ शकणारे सर्व अपायकारक घटक इथेच नष्ट केले जातात.मानवाला आम्ल पदार्थ अनेक वर्षांपासून माहित आहेत. कृत्रिमरीत्या तयार केलेली आम्ले जरी फक्त गेली काही शतकेच ज्ञात असली तरी पुरातन धातूयुगापासूनच नैसर्गिक आम्लपदार्थांंचे ज्ञान मानवाला असावे. तांबे, पितळ, लोखंड, ब्राँझ इत्यादी विविध धातूंच्या वस्तू चकचकीत ठेवणे, आकर्षक ठेवणे त्याशिवाय शक्यच झाले नसते. चांदीच्या वस्तूंना झळाळी देणे, सोन्याला चकाकी आणणे या प्रकारासाठीसुद्धा आम्लांचा उपयोग चालूच राहील.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ६८ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानुसार सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कोणता ?२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - २०२२ मध्ये भारताने एकूण किती पदके मिळविली ?३) व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये जगात सर्वाधिक स्त्री वैमानिक कोणत्या देशाचे आहेत ?४) आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन केव्हा साजरे केले जाते ?५) महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) तानाजी २) ६१ पदके ( २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य ) ३) भारत ४) १३ ऑगस्ट ५) चंद्रशेखर बावनकुळे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● मीना खोंड, साहित्यिक● बालाजी मदन इंगळे, साहित्यिक● राजेश कुंटुरकर● रवींद्र धुप्पे● अरुणा भोसले● सचिन एडके● बालाजी बरडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हसत दु:खाचा केला मी स्विकार,* *वर्षिले चांदणे पिऊन अंधार..* *प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री,* *आनंदयात्री, मी आनंदयात्री !**दु:खाचा स्विकारही हसत करायचा असतो. दु:खाला धैर्यानं सामोरे जायचे असते. दु:ख सत्वपरीक्षा घेतात. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे ज्याच्या त्याच्या भाळी दु:ख असते. अशा दु:खाचा बागुलबुवा करून अंधारयात्री व्हायचे, की या दु:खातून माझे आयुष्य तावून सुलाखून पुन्हा झळाळायचे आहे असं म्हणत प्रकाशाचे गाणे गात आनंदयात्री व्हायचे?**दु:खे समृद्ध अनुभवांची अनुभूती देतात.त्यामुळे खरं तर त्यांच्याबद्दल कृतज्ञ असायला हवे. कारण दु:खानंतरचे सुख आनंदाचा पारिजात फुलवते. जेवनातही विविध चवी हव्यात. चित्रातही अनेक रंग लागतात. गाण्यातही सप्तसूर. मग आयुष्य तरी एका चवीचे, एका रंगाचे, एका सुराचे का हवे? आपल्यात विश्व पाहणे आणि आपणच विश्व होणे. मग अणूरेणसारखे दु:ख आकाशाएवढे का करायचे? नसलेले दु:ख घेऊन का ऊर बडवायचे? वेदनेच्या कल्पनेने का हाय खायची? पायात वहाण नाही म्हणून शोक करणारी व्यक्ती जेंव्हा पाय नसलेल्या व्यक्तीला पाहते तेंव्हा तीचा शोक अनाठायी ठरतो. पाय गमावलेला सैनिक जेंव्हा सहजवानाचा मृतदेह पाहतो तेंव्हा त्याचे दु:ख कमी क्लेशदायी ठरते. जेंव्हा बागडायच्या वयातील छोटी मुले रूग्णालयात व्याधीग्रस्त होऊन मरणयातना भोगताना दिसतात, तेंव्हा वयाने वाढलेल्या आपल्या शरीराला आलेल्या सर्दी, ताप, खोकल्याचे दु:ख ते काय?* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माझा भारत महान*पराक्रमी देश माझाशूरवीर जवानांचा क्रांतिवीर देशभक्तअभिमान आम्हां यांचा..१सुजलाम सुफलामसुबत्तेची धान्यराशीशांती एकता बंधुतासौख्य नांदे मजपाशी..२घुमे नाद आसमंतीमावळ्यांचा इतिहासजय भवानी मातेचाआशीर्वाद हमखास..३ध्वज लहरे आकाशीहोई जल्लोष गगनीमिळो आनंद अंतरीसत्यमेव ब्रीद मनी..४अशा भारत देशाचाजगी वाढवूया मानभारतीय असल्याचाआहे सार्थ अभिमान..५*©® सुचित्रा कुंचमवार✍️**नवी मुंबई*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ईश्वराच्या नामस्मरणाने आपल्या चलबिचल झालेल्या मनाला स्थैर्य लाभते आणि नित्य चांगल्या कामामध्ये हात गुंतून राहिले तर तन आणि मन समाधानी होते.या दोन्ही मधून माणसाला सुखाने जीवन जगण्याचा खरा मार्ग सापडतो.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अंधारात कसा चढणार डोंगर*तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊम्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने....रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला....इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.''म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!वाट पाहात बसून कशाला राहायचं?जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. प्रत्येकाजवळ किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश असतो आणि तो ध्येयपूर्तीसाठी पुरेसा असतो. फक्त जिद्द असावी लागते ध्येयापर्यंत पोहचण्याची.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 12/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १२८१ - जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.◆ १८३३ - शिकागो शहराची स्थापना.◆ १९०८ - सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.◆ २००० - रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.◆ २००५ - श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या💥 जन्म :-◆ १८५९ - कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.◆ १८८७ - इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.◆ १९१९ - विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.◆ १९२४ - मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.◆ १९४९ - मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार💥 मृत्यू :-*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जम्मू-काश्मीरच्या राजौरीत दहशतवादी हल्ला, 3 जवान शहीद, चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, आत्मघातकी हल्ल्याचा कट उघडकीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जालना-स्टील कंपनीच्या मालकाच्या घरी-कार्यालयावर आयकरचे छापे, 390 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचा पर्दाफाश, 58 कोटींची रोख, 32 किलो सोनं जप्त*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आरबीआयकडून पुण्यातील रुपी बँकेचा परवाना रद्द, तर लक्ष्मी बँकेवरचे निर्बंध तीन महिन्यांनी वाढवले, ठेवीदारांची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अतिवृष्टीमुळे शिवाजी विद्यापीठानंतर नागपूर विद्यापीठाचं कार्यक्षेत्र असलेल्या चारही जिल्ह्यातील परीक्षा रद्द, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, आजही जोर कायम राहणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रक्षाबंधनानिमित्त भावाचं तोंड गोड करण्यासाठी मुंबईतल्या भगिनींची मिठाईच्या दुकानात गर्दी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपयांची मदत, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, सरकारनं तोंडाला पानं पुसल्याची अजित पवारांची टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने झिम्बाब्वे दौऱ्याआधीच कर्णधार बदलला, शिखरऐवजी केएल राहुलकडे नेतृत्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*प्रसिद्ध महिलांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FpDuS4HGmyM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱996021703~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वेळेचे नियोजन*वेळ ही एक अशी वस्तू आहे जे की कोणासाठी ही थांबत नाही. मग तो श्रीमंत असो की गरीब सर्वांसाठी वेळ सारखाच असतो. जो वेळेची कदर करतो वेळ त्याची कदर करते. जो वेळेला ओळखतो त्याला नंतर वेळ ओळखते. गेलेली वेळ किती ही पैसा खर्च केला तरी परत मिळत नाही. म्हणून......पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2019/08/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अँपिअर म्हणजे काय ?* 📙विद्युतप्रवाह तारेतून वाहत असताना तो मोजण्याचे माप म्हणजे अॅम्पिअर (Ampere) होय. हे मोजण्याच्या साधनाला अॅमिटर (Ammeter) असे म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ आंद्रे ऍम्पीअर याने वीजप्रवाह कसा मोजायचा, ते शोधून काढले. त्याच्याच नावाने हे मोजमाप मग प्रचलित झाले आहे.विद्युत प्रवाह वाहतो म्हणजे तारेतील इलेक्ट्रॉन एका दिशेने वाहत असतात. विजेचा दिवा लावला असताना त्याच्या तारेतून एका सेकंदाला तीन मिलियन मिलियन मिलियन इतके इलेक्ट्रॉन वाहतात. एक मिलियन म्हणजे एक दशलक्ष. आकडा बरोबर लिहिण्यासाठीसुद्धा मिनिटभर लागेल.मग हे सारे सोप्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपण विद्युतप्रवाह अँपिअरध्ये मोजतो. याचा उच्चार थोडक्यात अँप असाही करतात. एक अँपिअर म्हणजे दर सेकंदाला ६ मिलियन मिलियन मिलियन इलेक्ट्रॉनचा प्रवाह होय.अॅमिटरने जेव्हा विद्युतप्रवाह मोजतात, तेव्हा हा अॅमिटर विजेच्या 'सर्किट'मध्ये जोडला जातो. त्यावरचा काटा किती वीजप्रवाह वापरला जात आहे, हे तात्काळ दर्शवतो.घरगुती वापरासाठी आपण अर्धा ते पाच अँपिअरचा वीजप्रवाह वापरत असतो. इस्त्री, विजेची शेगडी, पाणी तापवायचा गिझर यांन जास्त वीजप्रवाह लागतो. तर विजेचे दिवे, ट्यूबलाइट, पंखे यांना जेमतेम अर्धा ते एक अँपिअरचा प्रवाह लागतो. विजेचा प्रवाह जितका जास्त लागणार असेल तितकी विजेच्या तारांची जाडी वाढवावी लागते. एखाद्या कारखान्याच्या विजेच्या तारा घरातील तारांपेक्षा किती जाड असतात, ते लक्ष देऊन बघण्यासारखे असते.वीजप्रवाहाचा एक महत्त्वाचा गुणधर्म हा की त्यामुळे चुंबकसूची हलते म्हणजे चुंबक क्षेत्र निर्माण होते. दुसरा महत्त्वाचा गुणधर्म हा की वीजप्रवाहाने उष्णता निर्माण होते. जितका वीजप्रवाह जास्त तितकी त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती वाढत जाते. वेल्डिंग मशीनमधील पन्नास ते तीनशे ॲम्पिअरचा प्रवाह धातु वितळवण्याइतकी सुद्धा उष्णता निर्माण करू शकतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरण सोपे असते, जगण्यासाठी मात्र धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मूळ गाव कोणते ?२) बंगालचे वनरुपी डॉक्टर म्हणून कोणाला ओळखले जात असे ?३) जागतिक आदिवासी दिन केव्हा साजरा केला जातो ?४) पेशीभित्तिका असणाऱ्या व प्रकाश संश्लेषण करणाऱ्यांना काय म्हणतात ?५) 'द लाईन' नावाचे जगातील पहिले व्हर्टिकल शहर कुठे स्थापित केले जाणार आहे ?*उत्तरे :-* १) किठाना, जि. झुंझुनू , राजस्थान २) सुशोवन बंडोपाध्याय ३) ९ ऑगस्ट ४) वनस्पती ५) सौदी अरेबिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रविकुमार येळवीकर● वसंत हंकारे● पांडुरंग गायकवाड● बालाजी घायाळ● आशिष अग्रवाल● पोतन्ना लखमावाड, पत्रकार● भीमा भंडारी● दीपक कोकरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*स्वत:वर विश्वास असणे फार महत्वाचे आहे. तो नसल्यास न्यूनगंड निर्माण होतो. मानवी जीवन सुंदर आहे, यावर विश्वास ठेवल्यास मनात जगण्यासाठी नवी उमेद निर्माण होते. आशावदी दृष्टीकोन हा विश्वासाचाच अविभाज्य भाग आहे. आशावाद मानवी मनाला प्रेरणा देऊन कर्तव्य पार पाडण्यासाठी लागणारी ऊर्जा पुरवतो. विश्वासाचा संबंध व्यक्तीच्या ह्रदयाशी, मनाशी असतो. तो दृश्य स्वरूपात नसून अदृश्य स्वरूपाचा असतो. तो समजून घ्यायचा असेल, तर आपल्या आत डोकवावे लागेल.**याच विश्वासाची गळचेपी होत असल्याचे आज पावलोपावली जाणवते. मुलांचा आईवडिलांवरील, आई-वडिलांचा मुलांवरील, पती-पत्नीच्या नात्यातील, विद्यार्थ्यांचा गुरूजनांवरील, रूग्णांचा डाॅक्टरांवरील, मित्र-मैत्रिणींचा एकमेकावरील, जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास कमी होत चाललाय...त्याला तडा जात असल्याचे आपल्याला दिसते. याचे कारण स्वार्थधुंदीत आपण माणूसपण विसरू लागलो. औपचारिकता आणि आधुनिकतेच्या नावाखाली विश्वासाला नख लावणे सुरू झाले. मॅथ्यू अरनाॅल्ड हा कवी मानवी जीवनातील विश्वासाची व्याप्ती व खोली स्पष्ट करण्यासाठी समुद्राची प्रतिमा वापरतो. भूतकाळात विश्वासाची व्याप्ती समुद्राएवढी होती. प्रत्येकाच्या ह्रदयात विश्वासाला महत्वाचे स्थान होते. अशीच परिस्थिती चालत राहिली, तर भविष्यात विश्वासाची अवस्था केविलवाणी होईल. मानवी समाजात विश्वासाची जागा संशय घेईल व सर्वत्र सावळागोंधळ निर्माण होईल. चला तर..अंतस्थ विचार बदलून विश्वासाला पात्र बनू या..* *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••।। भारत देश महान ।। विविध पंथ धर्म नि जातीचे लोकंयेथे नांदतात गुण्यागोविंदाने छाननाना लहान सहान प्रांताने बनला देशगर्वाने म्हणू माझा भारत देश महान .....१भारताला लाभली गौरवशाली परंपरापाहिले अनेक क्रांतीवीर नि शूरवीरात्यांचे नाव घेता वाटे आम्हा अभिमानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान .....२आमच्या अज्ञानाचा फायदा घेउनीदीडशे वर्षे राज्य केले इंग्रजांनीचलेजाव लढ्याने जागा झाला स्वाभिमानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान .....३गुलामगिरी समूळ नष्ट करण्यासाठीदेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीअनेकांनी दिले आपल्या प्राणांचे बलिदानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान.....४अनेकांचे कष्ट अखेर आले फळालास्वातंत्र्य मिळाले पंधरा ऑगस्टलाएकमुखाने गाऊ भारतमातेचे गुणगानगर्वाने म्हणू माझा भारत देश महान ....५- नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद, 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• शिक्षणामुळे केवळ माणूस शहाणा होत नाही तर त्याच्यामध्ये असणारा अज्ञानपणा,अयोग्य दिशेने जाणारे पाऊल,आपल्यात असलेला कमीपणा दूर करण्याचा मार्ग आणि जीवनात कसे जगायचे याचे शास्त्रशुध्द ज्ञान शिक्षणामुळे मिळते.तसेच सुखी व समृद्ध जीवन म्हणजे काय याबद्दलचीही जाणीव शिक्षणामुळे मिळते.म्हणून शिक्षणाचा खरा मार्ग आपल्या जीवनासाठी आपल्या प्रगतीचे केंद्र मानून स्वीकारणे काळाची गरज आहे.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्णाची दानशुरता* कर्ण दुर्योधनाचा खास मित्र होता. तो दानशूर म्हणून प्रसिद्ध होता. आपल्याकडे आलेल्या याचकाला तो कधीही रिकाम्या हाताने जाऊ देत नव्हता.एकदाचा हा प्रसंग एकदा भगवान श्रीकृष्ण अणि अर्जुन गप्पा मारत बसले होते. बोलता बोलता कर्णाच्या दानशूरपणाविषयी बोलणे चालू झाले. कृष्णाने कर्णाच्या दानशूरतेचे कौतुक केले. श्रीकृष्ण म्हणाला, ''कर्णाइतकी उदार व्यक्ती दुसरी कुणीही नाही.'' या बोलण्याचे अर्जुनाला जरा आश्चर्यच वाटले. अर्जुन म्हणाला, ''श्रीकृष्णा, धर्मराजही दानशूर आहे.'' सर्वांत अधिक दानशूर कोण आहे ? यावर मग त्यांची चर्चा चालू झाली. श्रीकृष्ण नेहमीप्रमाणेच याही गोष्टीची प्रचीती आणून देण्यासाठी सिद्ध होता. श्रीकृष्ण म्हणाला, ''ठीक आहे, उद्याच आपण धर्मराज आणि कर्ण दोघांकडे जाऊन या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.'' पावसाळयाचे दिवस होते. दुसऱ्या दिवशी उजाडताच श्रीकृष्ण आणि अर्जुन धर्मराजाकडे गेले. धर्मराजाला आनंद झाला. त्याने त्या दोघांचे स्वागत केले. त्यांच्या येण्याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ''राजधानीत एक महत्त्वाचे बांधकाम अचानक करावयाचे आहे. त्यासाठी लाकडे हवी आहेत.'' धर्मराजाने आपल्या सेवकांना बोलावले आणि बांधकामासाठी उत्तम प्रतीचे लाकूड आणण्याची आज्ञा केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बराच वेळ झाला, तरी सेवक काही परतले नाहीत. बऱ्याच वेळाने सेवक परत आले, तेही खाली मान घालून. धर्मराज म्हणाला, ''काय झाले ? लाकडे मिळाली नाहीत का ?'' सगळीकडे पाऊस पडत असल्याने सारी लाकडे भिजलेलीी होती आणि त्यामुळे सेवक लाकडे आणू शकले नव्हते. नाईलाजाने धर्मराजाने अर्जुन आणि श्रीकृष्णाला लाकडे न मिळाल्याचे कारण सांगितले. श्रीकृष्ण आणि अर्जुन परत फिरले. त्यानंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्णाकडे येण्यास सांगितले. त्याच्याकडे गेल्यावर कर्णाने त्यांना आदराने आसनावर बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यावर अर्जुनाने लाकडांची तातडीने आवश्यकता असल्याचे सांगितले. कर्ण म्हणाला, "एवढेच ना, मग त्यात एवढी चिंता करण्यासारखे काय आहे ?'' असे म्हणून त्याने आपल्या सेवकांना लाकडे आणण्यासाठी पाठवले. थोड्या वेळाने परत आलेले सेवक त्याला म्हणाले की, पावसाच्या पाण्याने सारी लाकडे ओली झाल्याने लाकडे मिळू शकली नाहीत. सेवकांचे बोलणे ऐकताक्षणी कर्ण आत गेला. बराच वेळ होऊनही कर्ण बाहेर येत नाही, असे पाहून अर्जुन श्रीकृष्णाकडे बघायला लागला. श्रीकृष्ण त्याला समवेत घेऊन कर्णाच्या दालनात गेला. बघतो तर काय, कर्ण आपल्या पलंगाचे पाय कापत होता. आजूबाजूला इतर लाकडी सामान तोडून ठेवलेले होते. आता त्यांना कर्णाला वेळ का लागला, याचे कारण उमगले. अर्जुनाने विचारले, ''कर्णा, एवढ्यासाठी तू तुझे चंदनाचे कलात्मक लाकडी पलंग कशाला तोडलेस ?'' त्यावर कर्ण उद्गारला, '' या वस्तू काय पुन्हा बनवता येतील; पण कुणाला आपल्याला काही देण्याची वेळ यावी आणि आपण तो क्षण गमवावा, यासारखे दु:ख कोणते असेल ?'' पुढे याच कर्णाने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली आणि आपल्या त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण इतिहासात ठेवले. मुलांनो, दानशूर कर्णाची गोष्ट आपण पाहिली. आपल्याला आपली छोटीशी वस्तूही देण्याची इच्छा नसते. येथे तर त्याने आपली वरदान मिळालेली अंगभूत कवचकुंडलेही दान केली.केवढी ही महानता दानशुरता. आपल्यालाही आपल्या वस्तूंचा त्याग करता आला पाहिजे. आपणही समाजाचे देणे लागतो ह्या हेतूने जगावे..*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 10/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९९९-औषधांच्या दुकानांवर विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.◆१९८८ - दुसर्‍या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.◆ १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.💥 जन्म :-◆ १८९४- व्ही.व्ही. गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती◆१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.◆१९६०-देवांग मेहता,भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व.💥 मृत्यू :-◆१९४२-हुतात्मा शिरीषकुमार.◆ १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.◆१९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण, शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी, राज्यभरात फटाके फोडून जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांचा भाजपला धक्का देत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, जेडीयू एनडीएमधून बाहेर*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारतात जुलै महिन्यात 59 हजार 586 ट्रॅक्टरची विक्री, उत्तरप्रदेश व राजस्थान नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांती दिनानिमित्त तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांसह पालकांकडून सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये शिक्षक संघटनेकडून विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *CWG 2022 : भारताला अथलेटिक्समध्ये अच्छे दिन, कॉमनवेल्थमध्ये 8 पदकं जिंकत रचले अनेक रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Sea Animals समुद्री जीव ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/8xLWx9D-JVA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात.........पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर clik करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) 'जीवनशिक्षण' हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते ?३) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतो ?४) अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?५) पृथ्वीचा परिवलन कालावधी किती तास असतो ?*उत्तरे :-* १) मा. जगदीप धनखड २) विद्या प्राधिकरण ३) उपराष्ट्रपती ४) परजीवी वनस्पती ५) २४ तास*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हेमंत पापळे, अकोला● गणेश मोहिते● राहुल मगरे● रामदास देशमुख● तुकाराम यनगंदलवार● अशोक मगरे● व्यंकटेश पुलकंठवार● माधव परसुरे● अविनाश गायकवाड ● सचिन सुरबुलवाड● दिगंबर भीमराव सावंत● गोविंदराव शिवशेट्टे● संतोष येवतीकर● डॉ. चंद्रकांत पांचाळ● नागराज आहिरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.**अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✍🏻 लेखणी ✒️* (मराठी कविता) असता सखे तु सोबतीलानकोच वाटते कुणी.. तूझ्यातुन बहरता शब्द प्रेमाचेअन ती मधुर वाणी.. तुझ्या सहवासा गुंतल्यावर अबोलही बोलायला लागतात.. निशब्द जरी बोलणे त्यांचे तुलाच तर कळायला लागतात.. तू असताना सोबतीलामी स्वतःच हरवून जाते.. कदाचित हेच प्रेम असावंअन मी तुझ्यात रंगून जाते.. प्रेम करायला शिकविले तू अन जगण्यास शिकवले.. खचताना मला सखे तू पुन्हा उगण्यास शिकवले..क्रांतीचे शस्त्र तूअन रूपाने देखणी.. वास्तवाचे चित्र तूअन प्रिय माझी लेखणी.. *_कु प्रतिक्षा गजानन मांडवकर_🌹*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते आणि तीच गोष्ट तुमच्या जीवनात मागे खेचण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.ती म्हणजे तुमचे मन.जर तुमचे मन सतत चिंतनशील, प्रयत्नशील, कृतीशील आणि येणाऱ्या प्रत्येक वेळेला तुम्हाला धैर्य देऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते तसेच तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करुन चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते त्या मनाची सकारात्मक बाजू बळकट करणे ही एक तुमच्या जीवनातल्या जमेची गोष्ट आहे.ही ऊर्जा जोपर्यंत तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच मागे खेचनार नाही.जर का तुमची काहीच काम करण्याची इच्छा होत नाही,काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला करावेसे वाटत नाही,आजचे काम उद्याला करु,आज नाही केले तर काय बिघडले अशी जेव्हा तुमच्या नकारात्मकतेची उर्जा तुमच्या जीवनात बळावते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाला एका अधोगतीकडे घेऊन जात आहात हे सिद्ध होते.अशी जेव्हा तुमच्या जीवनात एकाच मनातल्या दोन बाजू जेव्हा तुमच्या जीवनात घालमेल करुन तुमची मानसिकता बदलून टाकतात अशावेळी आपण काही वेळ शांत रहावे आणि आपल्या हातून काही अनुचित घटना होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.आपल्या जीवनाला कोणते मन चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाणार आहे त्याचा विचार करावा.मग आपल्या जीवनाचे जेथे कल्याण होईल त्या चांगल्या सशक्त मनाच्या गोष्टींचा जरुर विचार करावा आणि जीवन समृद्ध करावे.एखादी गोष्ट जरी नकारात्मक विचार करत असेल तर तुमच्या चांगल्या विचारांमुळे ती टिकून शकत नाही आणि मग तुम्ही सातत्याने चांगल्याच गोष्टींचा विचार जीवनात अमलात आणाल हे खात्रीने तुम्ही सांगू शकताल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर*सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?'सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठ असाव हे ही तितकेच खरयं.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 06/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 . 🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.◆ १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.💥 जन्म :-◆ १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.◆ १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.💥 मृत्यू :-◆ १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.◆ २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 50 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता 14.2 किलोचं एक सिलेंडर 999.50 रुपये म्हणजेच जवळपास 1000 रुपयांना मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेचीही शक्यता आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंचा राजीनामा नामंजूर, कारवाईची टांगती तलवार कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यभर सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत गोविंदांसाठी आता 10 लाखांचा विमा, देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून भाजपची मोहीम, नितेश राणेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारत २० पदकासह पदकतालिकेत सातव्या स्थानावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीर स्मृती मानधनानं 2 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Insects Name कीटकांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/CYdSAiXcBsE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते............पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.........https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल.स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ कोणते ?२) भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती कोण ?३) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात ?४) फ्यूज तार कशापासून बनवलेली असते ?५) सर्वात लवकर येणारे पिक कोणते ?*उत्तरे :-* १) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ २) रामनाथ कोविंद ३) दिनमान ४) शिसे व टिन ५) मका *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नरसिंह पावडे देशमुख● सुदर्शन पा. जोगदंड● शंकरलाल जैस्वाल● राजेंद्र पोकलवार● गंगाधर दगडे● दीपक पा. हिवराळे● हर्ष पाटील● इरेश वंचेवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.**दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पुढील आठवड्यासाठी विषय*" रक्षाबंधन / स्वातंत्र्य दिन / तिरंगा "**श्रावण सम्राट* ( अष्टाक्षरी रचना )येता श्रावण सम्राटसडा सांडतो प्राजक्त,भ्रमरांची ती विमानंनिलांबरी ही आरक्त //१//लेकीबाई माहेरालाचिऊताई खेळे पाणी,सणवार, खेळ, झोकेदुग्ध गाभारा कहाणी //२//खेळ ऊन पावसाचाधरा पिकं नक्षीदार,अन् रंगीत फुलांचानेसे शालू बुट्टेदार //३//श्रावणाच्या स्वागतालासप्तरंगी इंद्रधनू,पोथी, पुराणं अंगणीतृप्त सर्जा, कामधेनू //४//घट दुधाचे सांडतीभूमी पुष्प अलंकृत,गंधाळला गाभाराहीसुवासिनी सालंकृत //५//सौ. सरोज सुरेश गाजरे.भाईंदर, ठाणे९८६७३९४००१•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोक तुम्ही तुमच्या जात असलेल्या चांगल्या ध्येयाकडेही वेगळ्या दृष्टीने पाहत असतात आणि आपल्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्नही करतात,परंतु त्यांच्या अशा वृत्तीमुळे आपण आपले चांगले ध्येय सोडायचे नाही.लोक तर या जगात चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटालाही नाव ठेवतात.त्यांच्याकडे पाहून आपण काहीही करायचे नाही जे आपणास आणि आपल्या मनास योग्य आहे आणि लोकांना फायद्याचे आहे आपण निश्चित केलेल्या ध्येयापासून त्रास होणारे नसेल तर नक्कीच त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावे. तरच आपले आणि इतरांचे कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मासा आणि हंस*एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.*तात्पर्य :-*मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/08/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-१९१४ - जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरात सुरू झाला१९८१ - अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले💥 जन्म :-१८९० - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.१९६९ - वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-८८२ - लुई तिसरा, फ्रांसचा राजा*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठवाड्यात 66 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भरला पीक विमा; 35 लाख हेक्टरला विमा कवच*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पुण्यात गुरुवारपासून CNG दरात 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यापासूनची ही सातवी दरवाढ आहे. 91 रुपये प्रति किलोने पुण्यात सीएनजी विकला जात आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय धडाधड रद्द का केले? शिंदे-फडणवीस सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महामार्गांच्या गुणवत्तापूर्ण निरीक्षणासाठी Mobile Inspection Vans; गुजरात, राजस्थान, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये हा प्रोजेक्ट सुरू होणार असून भविष्यात संपूर्ण देशभर लागू करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *महाविकास आघाडीला पुन्हा धक्का; मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रविण दरेकर यांचा मार्ग मोकळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवस अखेर भारताने ५ सुवर्ण, ६ रौप्य आणि ७ कांस्य पदकांसह १८ पदक जिंकली आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय हॉकी संघानं वेल्सला 4-1 नं नमवलं, सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत, वेल्सविरुद्ध 4-1 असा विजय नोंदवून भारतीय पुरुष हॉकी संघानं बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn the vehicles वाहनांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/pr3i029iAQU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सुरक्षित प्रवास करू या* आजकाल प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. प्रवासाला निघलेला व्यक्ती सुखरूप घरी परत आल्यावर घरातले सर्व सदस्याचे जीव भांड्यात पडल्यासारखे होते. हायवेचे रस्ते तर जणू अपघाताचे माहेरघरच बनले आहेत. दररोज किती तरी अपघात होतात आणि कित्येक लोकांचे जीव जातात याची काही गिनती नसते. इकडे छोट्या रस्त्यावर सुध्दा अपघात.........https://nasayeotikar.blogspot.com/2018/04/blog-post_26.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *खडकाचं वय कसं मोजतात ?* 📙 जगातली सजीवसृष्टी कार्बनच्या मेरूदंडावर उभी राहिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक सजीवाच्या प्रत्येक अवयवात कार्बनची रसायनं उपस्थित असतात. याचाच आधार घेऊन विलार्ड लिबी यांनी सजीवांच्या पुरातन अवशेषांचं वय शोधण्याची एक प्रक्रिया विकसित केली. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला.हवेतला कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती कार्बोदकं तयार करतात. प्रत्येक सजीवांच्या अन्नसाखळीची सुरुवात तिथूनच होते. हवेत कार्बनची दोन रूपं उपस्थित असतात. एक स्थिर आणि बहुसंख्य असलेलं बारा अणुभाराचं समस्थानिक आणि दुसरं अस्थिर व किरणोत्सर्गी असलेलं चौदा अणुभाराचं समस्थानिक. या दोन्हींच्या वस्तुमानात फरक असल्यामुळे त्यांची वेगवेगळी ओळख पटवणं सोपं जातं; पण त्यात दोन्हींचेही रासायनिक गुणधर्म सारखेच असल्याने हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेताना वनस्पती त्यांच्यात भेदभाव करत नाहीत. त्यामुळे हवेत या दोन रुपांचं आपापसात जे गुणोत्तर असतं तेच जिवंत वनस्पतींमध्येही दिसून येतं. कारण किरणोत्सर्गामुळे जरी त्यातल्या चौदा अणुभाराच्या रूपाचा थोडासा र्‍हास होत असला तरी सतत हवेतून त्याची भरपाई होत असल्यामुळे जोवर ती वनस्पती जिवंत आहे तोवर त्यांच्या अंगचं या दोन रूपांचं आपापसातलं गुणोत्तर हवेतल्या त्यांच्या गुणोत्तराइतकंच राहतं.ती वनस्पती मृत पावली की परिस्थिती बदलते. आता हवेतून नव्यानं कार्बनडायऑक्साइड अंगात शिरत नसल्याने त्यातल्या १४ अणुभाराच्या रूपाच्या र्‍हासाची भरपाई होत नाही. ज्या वेगानं तो क्षय होतो त्याच वेगानं त्यांचं गुणोत्तरही बदलत जातं. किरणोत्सर्गी रूपाचा र्‍हास त्याच्या अर्धायनात मोजला जातो. जेवढ्या काळात मूळ राशीतला पन्नास टक्के भागाचा र्‍हास होतो त्या कालावधीला त्या रूपाचं अर्धायन असं म्हणतात. चौदा अणुभाराच्या कार्बनचं अर्धायन ५७६० वर्ष आहे. म्हणजेच तेवढा कालावधी उलटला की त्या वनस्पतीच्या अवशेषातील बारा अणुभाराच्या रूपाची मात्रा तेवढीच राहते; पण चौदा अणुभाराच्या रूपाची मात्रा निम्मी होते. म्हणजेच गुणोत्तर दुपटीनं वाढतं. तसं झाल्यास त्या अवशेषाचं वय ५७६० वर्षे आहे, असं निदान करता येतं. या पद्धतीलाच रेडिओकार्बन डेटिंग असे म्हणतात.सर्वच पुरातन अवशेषांमध्ये कार्बन असतोच असं नाही. उदारणार्थ, खडकांसारख्या असेंद्रिय निर्जीव पदार्थांमध्ये कार्बन नसतो. शिवाय किरणोत्सारी कार्बनचं अर्धायन तेवढंसं जास्त नसल्यामुळे त्याच्या दसपटीने म्हणजेच साधारण ५० हजार वर्षांपूर्वीच्या अवशेषांच्या वयाचं निदान अचूकपणे करता येतं. त्याहून पुरातन असलेल्या पदार्थांबाबतच्या निदानात संदेह निर्माण होतो.एक स्थिर आणि एक किरणोत्सारी अशा दोन मूलद्रव्यांच्या जोड्या मिळाल्या तर हीच पद्धत अवलंबली जाऊ शकते. अशा अनेक जोड्या आता शोधून काढल्या गेल्या आहेत. युरेनियमची खनिजं खडकांमध्ये असतात. त्याच्या क्षयमालिकेत अशा जोड्या सापडतात. त्यांचा आधार घेऊन खडकांचं वय मोजण्याची रेडिओमेट्रिक डेटिंग पद्धत विकसित केली गेली आहे. तिची मदत घेऊन कोणत्याही खडकाचं वय किती हे आता अचूकपणे सांगता येणं शक्य झालं आहे.- *डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ साधे जीवन जगणे ही जगातील सर्वात चांगली गोष्ट आहे.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) अमेरिकेने अफगाणिस्तानात नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यात कोणाचा खात्मा केला ?२) हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते ?३) जागतिक नागरी सरंक्षण दिन २०२२ ची थीम काय आहे ?४) बुद्धिबळ स्पर्धेत जगातील नंबर वन मॅग्नस कार्लसनला पराभूत करणारा भारतातील सर्वात तरुण खेळाडू कोण बनला आहे ?५) देवदार, पाईन ह्या वनस्पती कोणत्या प्रदेशात आढळतात ?*उत्तरे :-* १) अयमान अलजवाहिरी, अल कायदाचा प्रमुख २) खोडापासून ३) प्रत्येक घरात नागरी सरंक्षण आणि प्रथमोपचार ४) रमेशबाबू प्रज्ञानानंद ५) हिम प्रदेश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीराम पा. जगदंबे, धर्माबाद● अभिनंदन प्रचंड, विषय शिक्षक● सय्यद जाफर● दत्तात्रय सितावार● किरण सोनकांबळे● साईनाथ जायेवाड● देवराव कोलावाड● मनोज मानधनी● सचिन वसरणीकर● शेख वाजीद● विकास कांबळे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.**रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🤝 मैत्री 🤝*मैत्रीचे बंधन चिवट अतुटनसे पडे मनीकधी वैर फूट येई मित्र सदासंकटी धावून धास्तावल्या जिवाघेई सावरून निष्पाप मैत्रीचेप्रेमळ सुमनसान्निध्यात नित्य फुलवी जीवनऋणानुबंधाचाघट्ट असा धागा ह्रदय कप्प्यातएकमेव जागा✍️ *अर्चना गरूड**ता.किनवट,जि.नांदेड*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमच्या मनात चार विचार येत असतील तर त्यातील एक चांगला विचार निवडून त्याचा मनातून स्वीकार करा आणि पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठलाग करा नक्कीच ते पूर्ण होईल.कारण तो विचार हा तुमचे ध्येय असेल.कारण ध्येय असणारी माणसे कधीच मागे हटत नाहीत.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद : ९४२१८३९५९०🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कर्म हीच पूजा* एकदा एक बाई रामकृष्ण परमहंसाकडे आल्या आणि म्हणाल्या , " मला या संसाराचा विट आला आहे . मुलं मोठी झाली. आता प्रपंच सुटेल असे वाटले . पण नातवंडांच्या प्रेमात पडले . रोज त्याला सांभाळावे लागते . तेव्हा आता घर सोडायचा विचार आहे . " रामकृष्णांनी विचारले , " घर सोडून तुम्ही काय करणार ? "त्या बाई म्हणाल्या , " गंगेच्या तीरावर एक झोपडी बांधणार . त्यात श्रीकृष्णाची मूर्ती बसविणार . रोज त्या मूर्तीची पूजा करणार . कृष्णाला नेवैद्याने जेवू घालणार . कृष्णाला झोपेतून उठविणार, आंघोळ घालणार . " परमहंसांनी विचारले , " श्रीकृष्णाची मूर्ती दगडाची असणार न ? " तेव्हा त्याबाई ' हो ' म्हणाल्या . रामकृष्णांनी विचारले , " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार ? " त्या बाई ' हो ' म्हणाल्या . त्यावर रामकृष्ण म्हणाले . " आपण दगडाच्या मूर्तीत श्रीकृष्ण पाहणार , मग नातवंडामध्ये श्रीकृष्ण का पाहत नाहीत ? श्रीकृष्ण समजून नातवंडाला जेवू घाला. श्रीकृष्ण म्हणून आंघोळ घाला. श्रीकृष्ण म्हणून त्याला झोपवा. " तुम्ही तुमच्या नातवंडानाच तुमचा श्रीकृष्ण समजून वागा. मनातला भाव चांगला ठेवा म्हणजे तुम्हाला सर्वत्रच भगवंत दिसेल आवश्यक नाही मुर्तीतच देव पाहणे.तुम्ही तुमच्या नित्यकर्मात पण देवाचे दर्शन घेऊ शकता.*तात्पर्य : नित्य कर्मामध्ये भगवतभाव ओतला की ते कर्म नाम साधनेच्या दर्जाचे होते व तेच कर्म पूजा ठरते.**'कर्मे ईशू भजावा.'**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ *क्रांतिसिंह नाना पाटील जयंती*💥 ठळक घडामोडी :-■२००४-राज्यपाल महमंद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.■ १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.■ १९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार. ■ १९४८-भारतीय अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली.(Indian Atomic Energy Commission)💥 *जन्म* :-●१९००-क्रांतिसिंह नाना पाटील,स्वातंत्र्य सैनिक ,समाजसुधारक.● १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.● १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :-◆ १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.◆ २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.◆ १९५७-देवदास गांधी,पत्रकार,हिंदुस्थान टाईम्स चे संस्थापक,महात्मा गांधींचे पुत्र.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे आणि जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अभिजीत चौधरींनी पदभार स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : जिल्ह्यातल्या प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचे नाव आलेच पाहिजे. यासाठी मतपरिवर्तन करून प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांचा दृष्टीकोण बदलण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांमध्ये जनजागृती करा, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसई पूर्वेतील रहिवाशी असलेल्या आलिया पवार यांनी गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी सुरु केली आहे. दोन सत्रांत झोपडपट्टीतील सुमारे 30 ते 40 मुलांना त्या मोफत शिकवणी देत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने पाचव्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदक खिशात घातली असून दोन रौप्य पदकंही जिंकली आहेत. एकूण 13 पदकं जिंकली आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••8️⃣ *भारताने वेस्ट इंडीजवर मिळवलेल्या या विजयाने भारताने मालिकेत 2-1 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Birds Name👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EmGAyBlKj0Q~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सलामत तो ......* हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे....https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आपल्या शरीरात एकूण किती जनुकं आहेत ?* 📙आपल्या यच्चयावत अनुवांशिक गुणधर्मांचा आराखडा डीएनए या रसायनाच्या रेणूंमध्ये सांकेतिक रूपात साठवलेला असतो. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात असलेल्या डीएनएमध्ये ही माहिती साठवलेली असते. या डीएनएची रचना दुहेरी गोफासारखी किंवा गोल गोल जिन्यांसारखी असते. या जिन्याच्या पायऱ्या समोरासमोरच्या कठड्यांना जोडलेल्या नायट्रोजनयुक्त घटक रेणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक पायरी ही समोरासमोरच्या दोन रेणूंच्या जोडगोळीची बनलेली असते. या घटक रेणूंच्या अनुक्रमाक अनुवांशिक गुणधर्मांची माहिती साठवलेली असते. या माहितीचा एकक म्हणजे एक जनुक.आपल्या शरीरातल्या डीएनएमध्ये एकूण तीन अब्ज पायऱ्या म्हणजेच नायट्रोजनयुक्त घटक असतात. तीन पायऱ्या मिळून जो एक कोडाॅन होतो तो प्रथिनांच्या साखळीतील एका घटकाविषयीचा आराखडा सांकेतिक रूपात आपल्यात दडवून ठेवतो. याचा अर्थ झाला की असे किमान एक अब्ज कोडाॅनं आपल्या शरीरात असतात. जनुकं अशा काही कोडाॅनची बनलेली असतात. काही जनुकं थोड्याच कोडाॅनची असतात, तर काहींची लांबी त्याच्या कितीतरी पट असते. त्यामुळे शरीरात एकूण नक्की किती कोडाॅन आहेत याची माहिती नव्हती; पण एकूण कोडाॅनच्या संख्येवरून किमान एक लाख तरी जनुकं शरीरात असावीत, असा अंदाज केला गेला होता. मानवाच्या यच्चयावत जनुकसंचयाचं वाचन करण्याचा 'ह्युमन जीनोम' हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यापूर्वी मूषक वगैरेसारख्या काही प्राण्यांच्या जीनोमचं वाचन करण्यात आलं होतं. त्यातून त्या प्राण्यांच्या शरीरातल्या एकूण जनुकांच्या संख्येची माहिती मिळाली होती. त्यावरूनही हा अंदाज योग्य वाटत होता.पण प्रत्यक्षात जेव्हा मानवी जनुकसंचयाचं वाचन सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसा वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं दिसून आलं. आजमितीला अशी चाळीस हजार जनुक असावीत असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या बहुतेक वैज्ञानिकांचे मत आहे. ते सर्व मान्य आहे असं नाही. कारण ऐकून डीएनएपैकी कितीतरी भाग कोणत्याच प्रथिनाच्या उत्पादनात सहभागी नसल्याचं दिसून आलं आहे. याला जंक डीएनए किंवा इन्ट्राॅन असं म्हणतात. प्रथिनांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या डीएनएला एक्झॉन असे म्हणतात. या दोन्हींची एकमेकांमध्ये गुंफण झालेली आहे. म्हणजे दोन एक्झॉनच्यामध्ये काही इन्ट्राॅन आहेत. तसंच एका जनुकामध्ये एकाहून अधिक एक्झॉन असतात आणि ते काही इन्ट्राॅनमुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात, हेही दिसून आलं आहे. म्हणूनच काही वैज्ञानिक या ४० हजारांच्या आकड्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मते खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक असावी; आणि ७० ते ८० हजार जनुकं शरीरात असावीत, असा त्यांचा दावा आहे. जसजशी हय़ुमन जिनोमची अधिक तपशीलवार माहिती हाती येत आहे तसतसा यापैकी कोणता दावा खरा आहे यावर अधिक प्रकाश पडणार आहे.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते ?२) बुद्धिबळ खेळाचा विश्वचषक समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा पहिल्यांदाच कोणत्या देशात सुरू आहे ?३) 'रानपिंगळा सरंक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?४) कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?५) लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागातून मिळतो ?*उत्तरे :-* १) के. आर. नारायणन २) भारत ( १८८ देश, १७०० खेळाडू ) ३) २४ ऑक्टोबर ४) कार्बन, हायड्रोजन, प्राणवायू ५) फुलांपासून *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● अजय बिरारी● पोतन्ना चिंचलोड, येवती● प्रदीप कार्ले● उत्तमराव नरवाडे● भवरसिंग*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.**देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*पाऊस*आला आला महापूर झाला हाहाकारपूरामध्ये वाहून गेला जगण्याचा सार ...मित्रा, पूरामध्ये वाहून गेलाजगण्याचा सार ...व्हरका वासे वापरलेलं गोदाकाठी घर होतंभान हरपून सारं कसं घरासाठी जगनं होतंउध्वस्त झालं घर वाहून गेला संसार ...पूराच्या त्या पाण्यानं घर निघालं न्हाऊनघराचं अस्तित्व माझ्या सारं गेलं वाहूनअस्तित्वासाठी आता फिरतो दारोदार ...माहित नाही कसा असतोजमीनीचा सातबारामाझ्या जवळ नाही की होआठाचा ही उतारारहिवासी इथला मी ना ओळख ना आधार ...*अनुरत्न वाघमारे, नांदेड*9673643276•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या प्रगतीकडे नेण्याचे काम करते.- व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...**त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.**मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.**बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💐 *_फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा_* 🌹 वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात व कमी कालावधीत अनेकापर्यंत पोहोचण्याचा उत्तम माध्यम आहे. आणि हे सर्व आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे आणि मी ते दररोज वाचतो व हजारो मित्रांना शेअर करीत असताना मनस्वी आनंद होतो.महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे अंधकारमय जीवन पुन्हा प्रकाशमय झाल्याचे उदाहरणे आहेत.एकंदरीत आपल्या समुहाच्या माध्यमातून एक उत्तम समाजसेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे श्री येवतीकर सरांसह सर्वांचे मनःपूर्वक आभार.पुढील वाटचलीस मंगलमय शुभेच्छा...🙏✍ _श्री शिवानंद चौगुले,चिंचवड_ _विशेष कार्यकारी अधिकारी_•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 02/08/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ◆ *वायु सेना दिन - रशिया*◆💥 ठळक घडामोडी :- ■ १७९०- अमेरिकेत पहिली जनगणना सुरू.■ १९८५ - डेल्टा एरलाइन्सचे एल.१०११ प्रकारचे विमान अमेरिकेतील डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३७ ठार.■ १९९० - इराकने कुवैतवर आक्रमण केले.💥 *जन्म* :-◆१८६१-प्रफुल्लचंद्र रे,बंगालमधील प्रसिध्द रसायनशास्त्रज्ञ,◆ १९३२ - पीटर ओटूल, आयरिश अभिनेता. ◆१९५८ - अर्शद अय्युब, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 *मृत्यू* :-● १५८९ - तिसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.● १६११ - केटो कियोमासा, जपानी सामुराई.● १९२३ - वॉरेन हार्डिंग, अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *महाविकास आघाडीचे निर्णय रद्द केल्याबद्दल शिंदे सरकारविरोधात हायकोर्टात याचिका, याचिकेवर याच आठवड्यात सुनावणी घेण्याचं हायकोर्टाकडून निश्चित*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास स्वस्त होणार? भारताचा 116 देशांसोबत करार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *संजय राऊत यांची ईडी आज चौकशी करणार; राऊतांचे वकिल त्यांना भेटण्यास ईडी कार्यालयात येणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अल-कायदा प्रमुख अल-जवाहिरी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार, बायडेन म्हणाले, "आता खरा न्याय झाला"*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरचा कांस्य पदकावर कब्जा, कॉमनवेल्थमध्ये भारतानं नववं पदक जिंकलं!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडीज 5 गडी राखून विजयी, मालिकेतही साधली बरोबरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*A to Z👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wjpvRBVPoaI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रदूषण एक समस्या* मनुष्याचे सरासरी आयुष्य जे की पूर्वी शतकाची होती. ती आता हळूहळू कमी होत आहे. आत्ता माणसाचे आयुष्य सरासरी सत्तरच्या आसपास झाले आहे. विविध कारणामुळे मनुष्य आजारी पडत आहे आणि मृत्युमुखीदेखील पडत आहे. डॉक्टराना देखील निदान होणार नाहीत असे रोग जडत आहेत. एशोआरामच्या जिंदगीमुळे देखील माणसाचे आयुष्य घटत चालले आहे. यातच प्रदूषण ही एक महत्वपूर्ण समस्या जाणवत आहे. .......पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2018/12/blog-post_10.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷🍃 *काव्यांगण रोज एक कविता* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*श्रावण*पानापानांत श्रावणमनामनात श्रावणपशुपक्षी झाडेवेलीगेली चिंबचिंब होऊन! सप्तरंगी इंद्रधनू आले नभात रंगून आळस निराशा मनीच्या टाकू चला झटकून! साज पोपटी लेवूननवचैतन्य दाटलेनववधू समान धरती आकाश भेटले! कड्या कपारी मधून खळाळती हे निर्झर भान हरून रानात नाच करीती मयुर!सणउत्सव घेऊनआला पहा श्रावणपोथीपुराणांचे चालेघरोघरी पारायण! भजन किर्तनाची धुन घुमे मंदिरा मधून धुंद फुलांच्या गंधाने गेले चराचर मोहून! चिंब श्रावणसरीने गेली मोहरून काया आला श्रावण श्रावण अवघी धरा जगवाया ! श्रीमती सुनिता वाव्हळजि.प.प्रा.शाळा कुरुळीता.खेड जि.पुणे.Mob. 8080362939•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“ विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शपथविधी समारंभात भाषणाची सुरुवात कोणत्या शब्दाने केली ?२) एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडीजला पहिल्यांदा त्यांच्या भूमीत 'व्हाइटवॉश' देणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता ?३) सारस पक्ष्यबाबत माहिती होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया कडून कोणत्या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे ?४) ऑस्कर पुरस्काराची सुरुवात कधी झाली ?५) 'कॉस्टिक सोडा' चे शास्त्रीय नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) जोहार २) शिखर धवन ३) 'सारसाची सुरस कहाणी' ४) १९२९ ५) सोडिअम हायड्राक्सईड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दयानंद भुत्ते● रवींद्र वाघमारे● दिगंबर वाघमारे● कैलाश चंदोड● काशीनाथ उशकलवार● जी. पी. मिसाळे● आनंद पाटील धानोरकर● शिलानंद गायकवाड● प्रतीक गाडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.**माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *संधी* एक दानशूर राजा होता.त्यानं एक दिवस जाहिर केलं की,उद्ध्या माझ्या महालाचा मुख्य दरवाजा उघडला जाईल.त्या . नंतर ज्याला जी वस्तू हवी असेल,त्यानं फक्त त्या वस्तूला हात लावायचा. दुसरा दिवस उजाडला,सर्व लोक राजवाड्यात शिरले,गर्दी जमली.प्रत्येकजण आपल्याला हवी असलेली वस्तू शोधायचा, कुणी सोने घेतले,कुणी पैसे,कुणी घोडा तर कुणी दुभती जनावरे. राजा एका कोप-यात थांबून हा सर्व प्रकार पाहात होता.अचानक,त्याचं लक्ष एका चिमुकलीवर गेलं.ती गर्दीतून वाट काढत हळूहळू राजाच्या दिशेने येत होती.राजा पहात असतानाच ती त्याच्याजवळ पोहोचली आणि तिने आपल्या नाजूक हातांनी राजाला स्पर्श केला.क्षणार्धात राजा तिचा झाला.राजाच तिचा झाल्यामुळे तिथल्या सर्व वस्तूदेखील तिच्या मालकीच्या झाल्या. 💐विचार करा💐 ज्या पध्दतीने राजाने लोकांना संधी दिली होती त्याच पध्दतीने परमेश्वर आपल्या प्रत्येकाला रोज संधी देतो.पण,त्या लोकांसारखीच आपली चूक होते,परमेश्वराऐवजी आपण,त्याने निर्मिलेल्या प्रापंचिक वस्तू निवडतो.पण,देवच जर आपला झाला तर संपूर्ण जगच आपले होईल, खरंय ना !!! *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/08/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती* *लोकमान्य टिळक पुण्यतिथी* 💥 ठळक घडामोडी :-■ १९९४- भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.जगातील अशा तऱ्हेची पहिली योजना.■ २००१-सोलापूर विद्यापीठाची स्थापना.■१९९६ - मायकेल जॉन्सनने २०० मीटर अंतर १९.३२ सेकंदात धावून विश्वविक्रम रचला.💥 *जन्म* :-◆ १८९९-कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.◆ १९१० - मोहम्मद निसार, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९२० - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे◆ १९५२ - यजुर्वेन्द्रसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆ १९५५ - अरूणलाल, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 *मृत्यू* :-● १९२० - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक, वृत्तपत्र संपादक.●२००८-हर किशन सिंग सुरजित, मार्क्सवादी नेते.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 12 लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीला मंजुरीची शक्यता, नुकत्याच झालेल्या मंत्रिगटाच्या बैठकीत साखर निर्यातीचा अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतात ऑक्टोबरपासून 5G सेवा सुरु होणार, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आयसिस कनेक्शनवरुन देशभरात एनआयएची छापेमारी, कोल्हापूरच्या हुपरीमधून एकजण ताब्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आश्रमशाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षकांनाही आता ‘जागतिक दर्जाचे भविष्यवेधी शिक्षण विचार’ या संकल्पनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत आहे. विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहम : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्या महिला संघाचा क्रिकेट सामना पार पडला. भारतीय संघानं या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केलं आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून वेटलिफ्टर संकेत सरगरला तीस लाखांचे पारितोषिक जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••श्रावण मासारंभ निमित्ताने प्रासंगिक लेख *श्रावण पाळा ; आजार टाळा*हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. या महिन्यात बहुतांश लोकं देव देव करण्याकडे वळतात. मांसाहार खाणारे ह्या महिन्यात वर्ज्य करतात. काही लोकं या महिन्यात केस कापणे देखील टाळतात. पूर्ण महिनाभर हिंदू धर्मातील मंडळी कोणतेही अधर्म होऊ नये याची काळजी घेतात. यामागे धार्मिकसोबत काही वैज्ञानिक कारणे आहेत. जसे की या महिन्यात मांसाहार वर्ज्य करणे........https://nasayeotikar.blogspot.com/2019/07/blog-post_31.htmlवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷🍃 *काव्यांगण - रोज एक कविता* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••श्रावण हिरव्या हिरव्या गवततृणाचेलेऊन अलंकार मखमालीचेसजली ही अवघी वसुंधरा आला नाचत श्रावण हसरा...विविध सणांची घेऊन बरसातअंगणी बहरला हा पारिजातमादक,मोहक गंधाचा फुलोराआला नाचत श्रावण हसरा...हर्ष भरूनी मनी मानसीहितगूज चाले फुलापानांशीरिमझीम रिमझीम वर्षाधाराआला नाचत श्रावण हसरा...हिरवी हिरवी सजली सृष्टी सौंदर्याची देऊनी दृष्टी हर्षोल्हास भरूनी साराआला नाचत श्रावण हसरा...सौ. रूपाली गोजवडकरसहशिक्षिका जि.पकें.प्रा.शाळा वाजेगाव नांदेड.8007874965•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा तीन तास लवकर येणे चांगले.”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेस नुकताच कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे ?२) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या समाजातील आहेत ?३) २०४८ मध्ये कोणत्या देशाने ऑलिंपिक खेळ आयोजित करण्याची घोषणा केली आहे ?४) पाकिस्तान येथे नुकत्याच पहिल्या हिंदू महिला DSP कोण झाल्या आहेत ?५) तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) आंतरराष्ट्रीय IGEN IVD स्वयंसेवक पुरस्कार - २०२१ २) संथाल आदिवासी समाज ३) भारत ४) मनीषा रूपेता ५) एम. के. स्टॅलिन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ.कुसुम कवठाळे मॅडम कै.गं.पो.सब्बनवार मा.विद्यालय.● गोविंद पाटील जाधव रोशनगावकर● एकनाथ डुमणे, मुखेड● मंगेश हनवत्ते, नरसी● साईनाथ पाटील मोकलीकर● दिलीप साळुंके● नागेश टिपरे● विश्वनाथ चन्ने, कळमनुरी● बालाजी गायकवाड● शिवसांब गणाचार्य, नांदेड● यादव एकाले● पवनकुमार भाले, धर्माबाद● आनंद पेंडकर, माहूर● बंडू पाटील मोरे● संजीवकुमार हामंद, करखेली● मुखीत अहमद, नांदेड● सतीश दरबस्तेवार, कुंडलवाडी● शिनू दर्शनवाड, येवती*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'दिवा' हा अशी एक शक्ती आहे ज्याशिवाय जग उजळून निघूच शकत नाही आणि उजाडल्याशिवाय वास्तवाचा प्रकाश पडत नाही. 'दिवा' हा वास्तवाची लख्ख जाणीव करून देणारा दृष्टीदाता, घनघोर अंधारातला विश्वासाचा सोबती असतो. तो प्रकाश देऊन सत्य उजागर करीत असतो. उजेडालाच एकमेव सत्याचा चेहरा लाभलेला आहे म्हणून प्रत्येकजण त्याचा याचक बनून आराधना करतो. सर्वच चांगल्या कार्याचा आरंभ करताना दिवे लावले जातात. ही गोष्ट हेच प्रतीत करते की, अजूनही आमच्या जगण्यातला अंधार पूर्णत्वाने नाहीसा झालेला नाहीये.., पण तो आम्हाला निश्चितपणे दूर करायचा आहे, या निश्चयाचे हे प्रतीक.**प्रत्येकाच्या मनातही असा उजेड निर्माण होण्यासाठी म्हणून माणुसकीचा दिप लावायला मात्र आम्ही सपशेल विसरून जातो. तशी तर प्रत्येकाला उजेडाची आस असते, पण डोक्यात कुठल्या न कुठल्या प्रकारचा अंधार असतो. जेव्हा हा अंधार पूर्णत्वाने दूर होतो, त्यावेळी ती व्यक्ती तेजाने उजळते आणि अनेक पिढ्यांना प्रकाशमान करते..आपल्या मेंदूतले असे सारे अंधारकोपरे उजळून निघावेत नि आपल्यातला माणूस तेजाने तळपू लागावा, यासाठी आपण 'दिपपूजन' का करू नये? जळणं वा तेवणं हे जिवंत असल्याचं द्योतक, परंतु दिव्याचं जळणं हे कधी स्वत:साठी नसतं. ते इतरांना प्रकाश देण्यासाठीच जळत असतात. इतरांना उजाळण्यातच त्यांच्या जळण्याची सार्थकता असते. आज-उद्या 'दिप अमावस्या आहे. व्यसनाधीन होऊन बेशुद्ध होण्यापलीकडेही आयुष्य असतं हे ठळकपणे दर्शवणारी 'दर्श-अमावस्या'! आपल्या ह्रदयात निरंतर ज्ञानाचा दिवा तेवत ठेवायला याहून उत्तम दिवस नाही..शुभेच्छा!* *॥ रामकृष्णहरी ॥*💡💡💡💡💡💡💡💡💡 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Fruit Name फळांची नावे👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/vjhQPhdlH7M~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जी व्यक्ती सातत्याने कष्ट करते त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, नम्रता, आपल्या माणसांविषयी व इतराविषयी आत्मियता हे गुण नक्कीच असतात. तो कधीही इतरांची बरोबरी करत नाही. ती आपली सारी स्वप्ने आपल्या हातातच आहेत आणि त्या हातातून जे काही घडते तेच आपले प्रारब्ध आणि तेच आपले विश्व समजते. अशा व्यक्तीच्या मनामध्ये कधीही कुणाचे वाईट व्हावे आणि आपलेच चांगले व्हावे असे विचार आणत नाही. म्हणून अशा व्यक्ती जीवनात पूर्णतः समाधानी असतात.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *तिहेरी फिल्टर*एके दिवशी एक व्यक्ती महान चाणक्याला भेटली आणि म्हणाली, 'मी तुमच्या मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का?'एक मिनिट थांबा' चाणक्यने उत्तर दिले. 'काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला.' ट्रिपल फिल्टर चाचणी असे म्हणू...... चालेल?ती व्यक्ती म्हणाली, 'तिहेरी फिल्टर?'ठीक आहे. चाणक्य पुढे म्हणाला. 'माझ्या मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, म्हणूनच मी त्याला तिहेरी फिल्टर चाचणी म्हणतो, आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का? 'थोडस थांबून ती व्यक्ती म्हणाली 'नाही,' 'खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि .......' 'ठीक आहे,' चाणक्य म्हणाले तुम्ही जे मला सांगणार आहात ते खर आहे, याची खात्री नाही तुम्हाला?, आता दुसरा फिल्टर, आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहूया. आपण माझ्या मित्राबद्दल काहीतरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय?'ती व्यक्ती म्हणाली 'नाही, उलट ........' 'मग, मधेच तोडत चाणक्य पुढे म्हणाले,' तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे, आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर..... जे तू मला माझ्या मित्राबद्दल सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय?''नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही' ती व्यक्ती ओशाळत म्हणाली.'ठीक आहे,' म्हणजे 'जर तुम्ही मला सांगू इच्छिता, ते ना सत्य आहे,ना चांगले आहे , ना मला उपयोगी देखील आहे, तर मला ते का सांगता आहात?' प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रिय जनाबद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या तिहेरी फिल्टरचा वापर करा. मैत्रीवर भरवसा ठेवा, हे तिहेरी फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे. आपसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे तिहेरी फिल्टर आचरणात आणायला पाहिजे . हीच आहे चाणक्य-नीती.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बुलेटीन विषयी वाचकांची प्रतिक्रिया*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सप्रेम नमस्कार,मी मधुकर चिंतामण पवार, प्रेरणा विद्यालय सोनावळे, ता.मुरबाड, जिल्हा ठाणे.सर्वप्रथम चार वर्षांचा प्रवास अविरत पूर्ण केल्या बद्दल "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "टिमचे मनपुर्वक अभिनंदन 🌹🌹 2 सप्टेंबर 2018 रोजी "फ्रेश मॉर्निंग बुलेटीन "गृपला जोडलो गेलो आणि वाचक बनलो."सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट".या वाक्याच्या अक्षरशः प्रेमात पडलो.शालेय परिपाठासाठी वाहून घेतलेल्या या गृपच्या सहवासात परिपाठाचं महत्व खर्या अर्थाने कळलं.गृपमधलं सर्व संकलन,निवेदन अगदी प्रमाणबद्ध व अर्थपुर्ण.नासाजिंच वृत्त निवेदन व स्तंभलेखन अप्रतीम.संतोषजिंच दिनविशेष संकलन,कुणालजिंच्या बातम्या संकलन,राजेंद्रजींची विशेष माहिती.सौ.भारतीजींचा फ्रेश सुविचार.संगीताजींची प्रश्नमंजुषा ,वाढदिवसाच्या शुभेच्छा..एकनाथजींच कबिरांचे बोल,व्यंकटेशजिंच विचारधन,प्रमिलाताईंची बोधकथा सारं सारं अप्रतीम.माझं महतभाग्य मी आपल्या गृपचा सदस्य आहे.पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🙏💐🍫❤🌹🌷💛💚🧡👍•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) http://fmbuletin2019.blogspot.com/2022/07/30072022.html~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 30/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-■ २०१४ - पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.■ २००१- राजस्थानातील अलवर येथील राजेंद्रसिंग यांना 'रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.छोटे बंधारे बांधून पाणी साठवण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून काम केले आहे.■ २०००-चंदन तस्कर वीरप्पनने डॉ राजकुमार यांचे अपहरण केले.■ १९९७- गानकोकिळा लता मंगेशकर यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर.💥 *जन्म* :-● १९४७ - आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.● १९७३ - सोनू निगम, पार्श्वगायक.💥 *मृत्यू* :-● १९४७ - जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.● १९९४ - शंकर पाटील, मराठी लेखक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठा समाजाला पुन्हा धक्का ! इब्डल्यूएस आरक्षणाचा लाभ देणारा जीआर हायकोर्टाकडून रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *भारतीय ज्वेलर्सना परदेशातून सोने आयात करणे सोपे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज सुरू केले.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून मागितली माफी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बायोलॉजिकल वडिलांच्या मृत्यूनंतर आई हीच मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते. तिला आपल्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *५ जी स्पेक्ट्रमच्या ९ फ्रीक्वेन्सी बँड्सचा सध्या लिलाव सुरू आहे, तिसऱ्या दिवसअखेर 5-जी स्पेक्ट्रमसाठीची बोली १.४९ लाख कोटींवर पोहोचले...असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय कॅबिनेटने बीएसएनएल कंपनीला १.६४ लाख कोटी रुपयाच्या पॅकेजला दिली मंजुरी, कंपनी आपल्या नेटवर्क आणि सर्विसला सुधारण्यासाठी या पैशाचा वापर करणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *बर्मिंगहम : भारताच्या शिवा थापाने राष्ट्रकुल स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पाकिस्तानच्या बी. सुलेमानवर ५-० असा दणदणीत विजय साकारला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*🚀 काव्यांगण - रोज एक कविता 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये रोज एक कवी-कवयित्री यांची एक कविता 01 ऑगस्ट पासून प्रसारित करण्यात येणार आहे.*ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सप्ताहाचा विषय आहे - श्रावण, पाऊस, सरी, नागपंचमी*सूचना - ◆ कविता 20 ओळीच्या वर नसावी◆ कवितेत कोणतेही इमोजी नसावे◆ कवितेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक लिहावे◆ निवडक कविता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* मध्ये प्रसारित करण्यात येतील.आपल्या कविता खालील क्रमांकावर whatsapp करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संयोजक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला ?* 📙तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्‍यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणुंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपाने आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचं इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. सहाजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेनं आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या ताऱ्यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटूंमध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता.त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणे शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू ताऱ्यांसारखेच स्थिर असल्याचं दिसतं त्यावरून हीच तार्‍यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत तार्‍यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता. तरीही ते स्थिर कसे होतात ? हा प्रश्न अनुत्तरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते.पण क्वांटम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाउलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाइनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्याचं वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचं रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता.त्यावेळचे खगोलमहर्षी त्या तरुणाचे गुरू अार्थर एडिन्गटन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतराने इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचं सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर. त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“संभाषणाचा सर्वात वाईट प्रकार म्हणजे वादविवाद.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारतातील पहिला प्रामाणिक हर घर जल जिल्हा कोणता बनला आहे ?२) विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( भालाफेक ) नीरज चोप्रा या खेळाडूने किती मीटरचा थ्रोसह रौप्यपदक मिळविले ?३) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथग्रहणवेळी कोणत्या प्रकारची साडी परिधान केली होती ?४) अलीकडेच कोणत्या देशाने उष्णतेच्या लाटांमुळे रेड अलर्ट जारी केला आहे ?५) कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) बुरहानपूर, उत्तरप्रदेश २) ८८.१३ मीटर ३) संथाली साडी ४) इंग्लंड ५) २६ जुलै *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नागनाथ इळेगावे● कु. नक्षत्रा सब्बनवार● सचिन गादेवार● प्रवीण चातरवाड● विजय कुऱ्हाडे● प्रियंका घुमडे● शेख नवाज● निलेश कोरडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रत्येक अस्वस्थ माणसाने थोड आत डोकावून पहावं. तिथं त्याला एक अतृप्त जीव येरझारा घालतांना सापडेल. माणूस लहान असो, मोठा असो, त्याला जे काही हवं आहे, ते मिळत नसल्याची नांगी सतत डंख मारीत असते. जी काही आपली पात्रता आहे, त्यानुसार आपल्याला जे हवं आहे, ते मिळत नाहीये, ही भावना त्याला छळत असते. शांतपणे जगू देत नाही. प्रत्येक छोट्यामोठ्या गोष्टींमागे एक सुप्त अहंकार असतो आणि जोपर्यंत हा असा अहंकाराचा जागता पहारा आहे, तोपर्यंत कुणाच्याही आशीर्वादाने कोणतीही शांती मिळणार नाही? औदासीन्य नाहीसं कसं होणार? अहंकारानं मन काठोकाठ भरलेलं असलं, तर आशीर्वादानं आत उतरायचं कसं? भांड रिकाम हवं, तरच ते भरता येईल.**कवी शांताराम आठवले यांनी एका ओळीत जे सांगितलंय, “जो हसला, तो अमृत प्याला” हे अत्यंत सार्थ आहे. अहंकार संपला रे.. संपला की स्वास्थ्य आणि आनंदा व्यतिरिक्त उरतं काय? आपल्या शांततेच्या आड आपण स्वतः च येतो. हा अडथळा दूर होणं महत्वाचं. कबीर यालाच 'सहजयोग' म्हणतात. हा अहंकार मिटला, तर जीवन प्रतिक्षणी पूज्य भावाने व्यापून जाईल. राहत्या वास्तूत प्रतिदिन गंगास्नान घडेल. तुम्ही जिथं जिथं विहार कराल, ते ते तीर्थस्थळ घडेल. अर्थात ही प्रचिती येण्यासाठी मुळ अहंकार गेला नाही तर.. प्रार्थना, पूजा, तीर्थयात्रा सगळं व्यर्थ आहे!* *॥ रामकृष्णहरी ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय |चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अनमोल क्षण*प्रसिध्द लेखक कै. वि. स. खांडेकरांकडे अलोट गर्दी जमली होती. लोक हार घेऊन अभिनंदनासाठी तिष्ठत उभे होते. कॅमेरे सरसावुन फोटोग्राफर धावपळ करत होते. खांडेकरांना साहित्य ऍकेडमीचे पारितोषिक मिळाले तेव्हांचा प्रसंग.एका पत्रकाराने विचारले, 'आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता ?' खांडेकरांनी दोन क्षण डोळे मिटले. प्रसंग त्यांच्या डोळयासमोर दिसु लागला. ते म्हणाले, 'आज सकाळीच एका अपरिचिताने येऊन माझ्या गळयात हार घातला. माझ्या पायावर डोकं ठेवलं मी विचारलं, 'कोण आपण? मी ओळखलं नाही'.'साहेब, आज मी आहे तो आपल्यामुळेच. फार फार वार्षापुर्वी मी एका तळयाच्या शेजारून फिरत असता अचानक तोल जाऊन मी पाण्यात पडलो. मला पोहता येत नव्हतं, मी गटांगळया खाऊ लागलो. माझी ती अवस्था आपण पाहिलीत आणि ताबडतोब पाण्यात उडी घेतलीत. घाबरलेला मी गळयाला मिठी मारली. आपण जोरात हिसका देऊन मिठी सोडवलीत व ओढतच मला पाण्याबाहेर काढलंत. कुठलीही ओळख न देता उपकाराची भावना प्रगट न करता आपण निघून गेलात. मागून मला कळले मला वाचवणारे सुप्रसिध्द लेखक खांडेकर होते. तेव्हांपासुन आपल्याकडे यायचे होते तो योग आज आला'.खांडेकर म्हणाले, 'कोणालातरी जगायला आपण मदत करू शकतो ही गोष्ट माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. तोच क्षण माझ्या जीवनातला अनमोल क्षण होय'.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून ) http://fmbuletin2019.blogspot.com/2022/07/29072022.html~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 29/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९८७- भारताचे पंतप्रधान राजीव गांधी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जे.आर.जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका करारावर सह्या केल्या.◆ १९८५-मल्याळम लेखक टी. एस. यांना ज्ञानपीठ पुरस्कार.◆ १९५७- 'इंटरनॅशनल अँटॉमिक एनर्जी एजन्सी(IAEA) ची स्थापना.◆ १९४६-टाटा एयरलाइन्सचे 'एयर इंडिया' असे नामकरण करण्यात आले.💥 *जन्म* :-● १९२२ - बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.● १९२५ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.● १९५९ - संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 *मृत्यू* :-● २००८ - इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक. ● २००९- महाराणी गायत्री देवी ,जयपूरच्या राजमाता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आता 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बनवा मतदार ओळखपत्र, वर्षातून चार वेळा नोंदवता येणार नाव, निवडणूक आयोगाचा निर्णय, पण मतदानाचा अधिकार मात्र 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला सावरकरांचं नाव, राज्यपालांच्या सूचनेनुसार झालं नामकरण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जुलैमध्ये सरासरीपेक्षा 300 मिमी अधिक पावसाची नोंद, खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पुण्यातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची 'ईडी' चौकशी; राजकीय नेत्यांपाठोपाठ शिक्षणसंस्थाही रडारवरबोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना 'ईडी'ने चौकशीसाठी बोलवले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *भारतीय संघाने वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत 3-0 च्या फरकाने मात दिली. यावेळी मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताकडून दमदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय फुटबॉल संघाने फिफा नेशन्स कप 2022 स्पर्धेसाठी यंदा पहिल्यांदाच पात्रता मिळवल्यानंतर पहिला-वहिला विजयही मिळवला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✒️ काव्यांगण- रोज एक कविता 🖋️*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *काव्यांगण - रोज एक कविता*फ्रेश मॉर्निंग बुलेटिन मध्ये रोज एक कवी-कवयित्री यांची एक कविता 01 ऑगस्ट पासून प्रसारित करण्यात येणार आहे.*ऑगस्ट महिन्यातील पहिल्या सप्ताहाचा विषय आहे - श्रावण, पाऊस, सरी, नागपंचमी*सूचना - ◆ कविता 20 ओळीच्या वर नसावी◆ कवितेत कोणतेही इमोजी नसावे◆ कवितेखाली आपले नाव, जिल्हा व मोबाईल क्रमांक लिहावे◆ निवडक कविता *फ्रेश मॉर्निंग बुलेटिन* मध्ये प्रसारित करण्यात येतील.आपल्या कविता खालील क्रमांकावर whatsapp करावे. ~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ संयोजक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ढगांचं बारसं कोणी केलं ?* 📙मे १७८३ पासून त्या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत बहुसंख्य युरोपीय देशांच्या आकाशात एक विलक्षण दृश्य पाहायला मिळत होतं. आईसलँडमधील एल्डेयार इथं तसंच जपानमधील असामा यामा इथं ज्वालामुखींचे उद्रेक झाले होते. त्यातून बाहेर पडलेली राख आणि राळ यांचं मिश्रण साऱ्या उत्तर गोलार्धामधील आकाशात पसरलेलं होतं. त्या दृश्यानं अनेकांना विस्मयचकित केलं होतं. कलाकारांनी त्याची चित्रं रंगवली होती. नियमित रोजनिशी लिहिणाऱ्यांनी त्याची तपशीलवार वर्णनं नोंदवून ठेवली होती. साहित्यिकांनी आपल्या कथा कादंबऱ्यांसाठी त्या आकाशदर्शनाची पार्श्वभूमी वापरली होती. त्यात भर पडली ती १८ ऑगस्टच्या रात्री एक धगधगता तेजस्वी अशनी त्या आकाशात चमकून गेला तेव्हा. सर्वांच्याच डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या त्या दृश्यानं एका अकरा वर्षांच्या मुलाच्या मनावर कायमची मोहिनी घातली नसती तरच नवल. त्या दिवसांपासून ल्युक हार्वर्डला आकाशदर्शनाचा छंद जडला. वास्तविक पुढील आयुष्यात त्यानं खगोलशास्त्राचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नव्हता वा त्या विषयाचा अभ्यासही केला नव्हता. वनस्पतीशास्त्रातली पदवी त्यानं मिळवली होती. तरीही आकाशदर्शनाचं त्याचं वेड काही कमी झालं नाही.त्याच सुमारास डेन्मार्कमधील वनस्पतीशास्त्रज्ञ कार्ल लिनायस यानं वनस्पतीचं वर्गीकरण करणारी एक प्रणाली विकसित केली होती. ती सर्वत्र गाजली होती. आजतागायत त्याच प्रणालीचा वापर होतो आहे. तरुण ल्युकवरही त्याचा प्रभाव पडला होता. त्या भरात त्यानंही त्या वर्गीकरणामध्ये आपल्या परीनं थोडी भरही घातली होती.वनस्पतीचं वर्गीकरण करता येतं, तर मग आकाशात नेहमीच दिसून येणाऱ्या ढगांचं वर्गीकरण का करता येऊ नये, असा विचार त्याच्या मनात घोळू लागला होता. त्याच सुमारास फ्रेंच वैज्ञानिक ज्याँ बातिस्त लमार्क यानं आकाशात दिसणाऱ्या ढगांची पाच ढोबळ वर्गांमध्ये विभागणी केली होती. तशी ती जुजबीच होती; पण तोवर तसा प्रयत्न कोणीच केला नसल्यानं लमार्कच्या वर्गीकरणालाही मान्यता मिळाली. त्यामुळे ल्युक हाॅवर्डला अधिक प्रोत्साहन मिळालं आहे आणि मग त्यानं अधिक तर्कसंगत अशी आपली प्रणाली सादर केली.त्याने एकंदरीत चार मार्ग प्रतिपादित केले होते. एक *क्युम्युलस* म्हणजे एखाद्या ढिगासारखे दिसणारे, दोन *स्ट्रॅटस* म्हणजे एकावर एक थर असणारे, तीन *सिर्रस* म्हणजे कुरळ्या केसांसारखे वेटोळेदार आणि लांबलचक असणारे आणि चौथे *निम्बस* म्हणजे पाण्याचा साठा असणारे पावसाळी ढग. या चार वर्गांमध्ये संकर होण्याची शक्यताही त्यानं वर्तवली होती. त्यानुसार पावसाळी पण ढिगासारखे असणारे ते *क्युम्युलोनिम्बस* कुरळ्या केसांचे थरावर थर असणारे सिर्रोस्ट्रॅटस वगैरे.अठराव्या शतकाची अखेर होता होता हाॅवर्डच्या या वर्गीकरणाला सर्व स्तरांमधून विस्तृत मान्यता मिळत गेली. आजही यांच वर्गीकरणाचा वापर केला जात आहे. ढगांचे गुणधर्मही या वर्गीकरणातून प्रतीत होतात याचीही प्रचिती आता मिळालेली असल्यामुळे तर या वर्गीकरणावर शिक्कामोर्तबच झाले आहे. म्हणून ल्युक हॉवर्डलाच ढगांचं बारसं केल्याचं श्रेय द्यायला हवं.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“संकटात सापडल्यावरच माणूस स्वतःला ओळखतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'वनांचा शेतकरी' ( The farmer of the forest ) कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) विश्व अँथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ( भालाफेक ) पदक ( रौप्यपदक ) मिळवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ?३) संथाली भाषेत अभिवादनासाठी कोणता शब्दप्रयोग केला जातो ?४) भारताचा राष्ट्रप्रमुख कोण असतो ?५) आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपतीची बिनविरोध निवड झाली आहे ?*उत्तरे :-* १) धनेश ( Hornbill ) २) नीरज चोप्रा, भालाफेक ३) जोहार ४) राष्ट्रपती ५) एक वेळा, भारताचे सातवे राष्ट्रपती संजय नीलम रेड्डी, १९७७*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ. गीता शिवा वसमतकर● सुनील कोल्हे● सुदीप दहीफळे● दलित सोनकांबळे● माधव मुस्तापुरे● संजय पंचलिंग*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'घराच्या, शहराच्या आणि देशाच्या दुरवस्थेला दुसरा-तिसरा कोणी जबाबदार नसून, माझ्यातल्या 'मी' जबाबदार आहे. ' असे बाबासाहेब पुरंदरे एकदा म्हणाले होते. 'मी' हा एवढा मोठा असतो, की त्याचे सहजासहजी समाधान होत नाही. त्याला अहंकाराचा स्पर्श असतो. तो दुखावू नये, म्हणून काळजी घेतली जाते. 'मी हे का करावे','माझा याच्याशी काय संबंध' यासारखे प्रश्न विचारून आपल्यातला 'मी' अनेक सामाजिक कर्तव्यांपासून दूर जातो. एकदा का होईना 'मी'ने 'मी'चे ऐकले, तर व्यक्तीमत्वात सकारात्मक बदल होईल.**वाल्याने 'मी'चा खरा आवाज ऐकला. वाटमारी सोडली आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. वाटमारी करणारा वाल्या पुढे भारतीय संस्कृतीचा वाटाड्या बनला. मी कोणाला दोष देणार नाही. माझ्याकडून होईल तेवढे सत्कार्य मी करेन माझ्या हातून चांगले होण्याची शक्यता नसेल, तेंव्हा मी कोणाचे वाईट करणार नाही. यासारखी छोटी छोटी सूत्रे प्रत्येकाने आचरणात आणली, तर समाजस्वास्थ्य सुधारेल. यात शंका नाही. 'मी' चूक करतो म्हणून 'आम्ही' चूक करायला धजावतो. 'मी' सुधारलो तर जग सुधारेल. सकल जीवन समृद्ध करण्यासाठी 'मी'वर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस हा परिवर्तनशील जीव आहे. त्याच्यावर जेव्हढ्या लवकर परिणाम होईल तेव्हढा कुणावरही होणार नाही. म्हणून फक्त सकारात्मक विचार करावा. त्यातून 100% परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.* *बाणभट्ट गुरुकुल आश्रमात शिक्षण घेतांना त्याला काहीच येत नव्हते, तो अभ्यासात सर्वात मागे असायचा, त्यामुळे एक दिवस तो आत्महत्या करायला निघाला.* *एका विहिरीजवळ आल्यावर त्याच्या असे लक्षात आले की पाण्याची बादली जिथून खाली वर येते तिथे एक चरा म्हणजे खोल जागा तयार झालेली दिसली.चमत्कार झाला--जर दगड साध्या दोराच्या सततच्या घर्षणाने झिजू शकतो तर जिवंत माणूस का नाही? आणि या प्रश्नाने हर्षाच्या राजवटीत बाणभट्ट हा प्रसिध्द कादंबरीकार जन्माला आला.* *ज्याला त्यावेळचा आणि आजचा समाज विद्वान म्हणून संबोधतो.* *आपणही जरा विचार करा जर सातत्याने एखादी अशक्य गोष्ट घडू शकते मग आपण प्रयत्न का सोडायचे?* *शेवटी म्हणतात ना ,प्रयत्ने वाळूचे कण रगडीता ,तेलही गळे**अशोक कुमावत* *( राष्ट्रपती पुरस्कार विजेते )*📱 9881856327•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनातले सगळेच प्रश्न सहज मिटतील असे नाही.काही प्रश्न सहज प्रयत्न केल्यावर मिटतात तर काही अथक प्रयत्न करुनही मिटत नाहीत.अशावेळी मनुष्य आपला स्वत:चा आत्मविश्वास गमावून बसतो आणि आपलं नशिबच तसे आहे आता आपण काय करू शकतो अशा नकारात्मक विचारावर विश्वास ठेवतो.असे केल्याने प्रश्न मिटत नाहीत तर त्या प्रश्नांना ठामपणे समोर उभे राहून मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करुन जे काही आपल्यासमोर संकटं किंवा प्रश्न उभे राहतील त्याला तोंड देऊ आणि समर्थपणे जीवन जगू.असे विचार आणले तर जीवनाचा कोणताही प्रवास आनंदाने करु शकतो.कारण जीवनच संघर्ष आहे त्याला सामोरे गेलेच पाहिजे.हतबल होऊन किंवा विश्र्वास गमावून चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महती आईची*एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. ''*तात्‍पर्य :-**आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 28/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-● १९४३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार💥 *जन्म* :-★ १९३१ - जॉनी मार्टिन, ओस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.★ १९३६ - सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.★ १९३८ - आल्बेर्तो फुजिमोरी, पेरूचा राष्ट्राध्यक्ष.★ १९४५ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार💥 *मृत्यू* :-◆ ४५० - थियोडॉसियस, पवित्र रोमन सम्राट.◆ १०५७ - पोप व्हिक्टर दुसरा.◆ १७९४ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.◆ १८४९ - चार्ल्स आल्बर्ट, सार्डिनियाचा राजा.◆ १९३४ - लुइस टॅंक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.◆ १९६८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, नव्या सरकारला 9 ऑगस्टपर्यंतचं अल्टिमेटम, अन्यथा उठाव करण्याचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्राकडून 1.64 लाख कोटींच्या विशेष पॅकेजला मंजुरी निर्णय घेतला आहे. तसेच केंद्राकडून बीएसएनएल आणि बीबीएनएलच्या (भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड) मर्जरला देखील हिरवा कंदिल देण्यात आला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पुढचे तीन दिवस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, तर बिहार आणि उत्तर प्रदेशात वीज काळ बनून कोसळली, एकूण 28 जणांचा मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अजित पवार उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त विदर्भ, मराठवाड्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अकोल्यात रेल्वेसह भाजप खासदाराचं घरं बॉम्बने उडवण्याची धमकी; कॉल 'फेक' असल्याची अकोला पोलिसांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अनेक राजकीय नेते, बड्या उद्योजकांना तुरुंगवास घडवणाऱ्या PMLA कायद्याचं आज भवितव्य ठरणार, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अन्न म्हणजे पूर्णब्रह्म*अन्न , वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यातील अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सजीव धडपडत असतो. अश्मयुगीन काळातील लोक अन्नाच्या भटकंतीत अनेक वर्षे घातली. या अन्नाच्या शोधातच त्यांनी अग्निचा शोध लावला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.........पूर्ण लेख खालील लिंकवर वाचण्यास मिळेल.https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post_69.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *अन्नाशिवाय माणूस किती काळ जगेल ?* 📙या प्रश्नाचं एकच एक असं उत्तर देता येणं कठीण आहे. व्यक्ती व्यक्तीनुसार त्यात फरक पडू शकतो. कारण मुळात त्या व्यक्तीचं वजन किती होतं, त्याचं सर्वसाधारण आरोग्य कसं होतं, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या विकारांचा प्रादुर्भाव होता की काय व मुख्य म्हणजे शरीरात कितपत पाणी होतं यावर हा काळ अवलंबून असतो. जोवर शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखलं जात आहे तोवर केवळ अन्नत्यागापोटी किती काळ काढता येईल, याविषयीची विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही. वयाच्या ७४ व्या वर्षी महात्मा गांधींनी केवळ पाणी घेऊन २१ दिवस उपोषण केलं होतं. त्यापायी त्यांचं वजन जरी घटलं तरी आरोग्यावर तितकासा अनिष्ट परिणाम झाला नव्हता. मायकेल पील यांनी १९९७ साली 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' मध्ये प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात आणि २८,३६,३८ आणि ४० दिवस अन्नावाचून काढलेल्या व्यक्तींविषयीचा विश्वासार्ह अहवाल दिला होता. एवढे दिवस शरीर अन्नावाचून कसं काढू शकतं, याचं कारणही त्यात त्यांनी नमूद केलं होतं.शरीराचं नेहमीचं कार्य चालतं त्याला चयापचय म्हणतात. त्याचा कार्यवेग राखण्यासाठी आपल्याला पोषणाची म्हणजेच अन्नाची गरज भासते; पण जेव्हा या पोषणाची कमतरता भासते तेव्हा शरीर चयापचयाच्या कार्यवेगातही योग्य ते बदल करतं असं दिसून आलं आहे. थायरॉईड ग्रंथीतून होणार्‍या स्रावांचा वापर करून शरीर हे साध्य करतं. या बदलाचं प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळं असू शकतं. साहजिकच अन्नावाचून किती काळ काढता येईल हे या घटकावरही अवलंबून असतं.जोवर पाण्याच्या प्रमाणात लक्षणीय फरक पडलेला नाही तोवर अतिशय अल्प अन्नसेवनावर दीर्घकाळ काढल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळछावणीतील कित्येक जणांना जवळजवळ उपाशी अवस्थेत दिवस काढावे लागले होते. हा काळ काही महिन्यांपासून तीन चार वर्षांपर्यंतही होता. त्यापायी त्यांच्या शरीराचा जवळजवळ हाडांचा सापळा झाला होता. तरीही त्या स्थितीत त्यांच्या अंतर्गत अवयवांचं काम व्यवस्थित चालून ती मंडळी जिवंत राहिली होती. एवढेच नाही तर तिथून सुटका झाल्यानंतर ती पूर्वावस्थेत येऊ शकली होती.'अॅनोरेक्सिया नर्वोसा' या रोगानं पछाडलेल्या व्यक्ती जाणूनबुजून स्वतःची उपासमार करून घेतात. आपलं वजन कमी करण्याच्या अतिरेकी हट्टापायी काहीजणांना ही व्याधी जडते. अशा मंडळींचं वजन तब्बल ४० टक्क्यांनी घटतं. त्याहून अधिक घट मात्र ते सहन करू शकत नाहीत. कर्करोगाची बाधा झालेल्या व्यक्तींनी नेहमीइतकंच अन्नसेवन केलं तरी त्यातलं पोषण कर्करोगग्रस्त पेशी पळवत असल्यामुळे इतर शरीराला योग्य तितके उष्मांक मिळत नाहीत. त्यांच्याही बाबतीत वजन ४० टक्क्यांहून अधिक घटलं तर मृत्यू ओढवतो. वजनात तितकी घट होण्यास किती वेळ लागेल हे अर्थात व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून असतं.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Well beginning is the half done.* *( चांगली सुरूवात म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे आहे. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कैद्यांच्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने 'जिव्हाळा' कर्जयोजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?२) पश्चिम बंगाल राज्याचा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?३) नवनिर्वाचित राष्ट्रपतीला राष्ट्रपतिपदाची शपथ कोण देतात ?४) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कोणता दिवस 'उज्ज्वला दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ?५) भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) बंग विभूषण ३) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ४) १ मे ५) एन. व्ही. रमना*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● चंद्रकांत पिलाजी● दिगंबर जैरमोड● बालाजी गुट्टे● अंकुश शिंदे● बाळू उपलेंचवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *माणूस बर्‍याचदा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व, चिंतन, शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी परि जागा चुकलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधाने ऊर फुटेतो धाव धाव धावतो. 'कस्तुरी' स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय.**थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर कोणीही अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडला! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो-शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकीवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना संत कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो, दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्मच माणसाला अमर करते. हे जीवनाचे फलित आहे. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनाचं नंदनवन होवून जातं.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *प्रेरणादायी विचार* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खरे जीवन समजून घ्या.**एकदा एक काम करा, स्वतःलाच फोन लावून बघा, स्विच ऑफ, नो रेंज, व्यस्त असे अनेक प्रकार होतील पण फोन लागणार नाही.* *या जगात आपण सगळ्यांसाठी आहोत, वेळ पण देतो आणि स्वतःसाठी, बघा स्वतःसाठी आपण नेहमी व्यस्त आहोत, जगून घ्या,* *वागणं चांगल नसेल तर, साधी उचकीही लागत नाही. बोलणं गोड़ नसेल तर, महागडया मोबाइलवर घंटी पण वाजत नाही.**आणि घर मोठ असो वा लहान जर गोड़वा नसेल तर, माणूसच काय, मुंगीसुद्धा जवळ येत नाही. मग एवढा अभिमान कशापायी, खरे जीवन जगा ।**अशोक कुमावत* *(राष्ट्रपती पुरस्कार विजेते*)📱 9881856327•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रत्येकाच्या जीवनात निराशा ही सवतीसारखी नेहमी मनाला छळत असते.ती सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने मनाला विचलीत करते.अशा स्थितीतून तिला हद्दपार करण्यासाठी काही ना काहीतरी करण्यासाठी तो आशेकडे धावतो आणि त्यातुन सुटका करून घेतो.अर्थात जीवनात निराशेने घर केले तर नक्कीच आशेचा शोध घेऊन निराशेला बाजूला सारतो आणि जीवन निराशेतून मुक्त करतो.निराशा जरी जीवनात आली तरी घाबरायचे नाही तिला हिमतीने तोंड देत आशेचा शोध घ्यायला शिकले पाहिजे आणि त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.हीच आपल्या जीवनाची खरी परीक्षा आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रलोभनापासुन सावधपणे वागणे.*एका जंगलात मोठ्या संख्‍येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्‍या सहका-यांची संख्‍या कमी होत चालल्‍याचे एका हरणाच्‍या लक्षात आले. त्‍याने आपल्‍या इतर सहका-यांना सावध केले परंतु कोणीच त्‍याच्‍याकडे लक्ष दिले नाही. त्‍या हरणाने आपल्‍या मित्राला सांगितले की डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्‍या वृक्षांच्‍या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जाणेच न बरे. त्‍याचा मित्र त्‍याची गोष्‍ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्‍या पानाआड दडलेल्‍या शिका-याने दोघांकडे फळे फेकण्‍यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे. त्‍याने मित्राला सावध केले पण मित्र हरीण लोभाच्‍या बळी पडून फळे खाण्‍यासाठी पुढे गेला आणि शिका-याने त्‍याची लगेचच शिकार केली. चतुर हरणाला वाईट वाटले. पण मित्राने त्‍याचे म्‍हणणे ऐकायला हवे होते हे ही खरेच की नाही.*तात्‍पर्य :- आजच्‍या काळात कोणी जर आपल्‍याला प्रलोभन दाखवून जर फसवत असेल तर आपण सावध राहायला हवे किंवा कोणी जर सावध करत असेल तर त्‍याचे ऐकायला हवे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 27/07/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-■ १९९९- द्रव खनिज तेल वायूचा (LPG)वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.■ २००१- सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू व गुटखा सेवनावर व जाहिरातीवर बंदी चा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.■ २०१२-लंडन येथे ३० व्या ओलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.💥 *जन्म* ● १८९९- पर्सी हॉर्नीब्रूक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.● १९१५- जॅक आयव्हरसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.💥 *मृत्यू°*◆ २००२ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.◆ २००३ - बॉब होप, इंग्लिश अभिनेता. ◆ २०१५ - डॉ. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने पंजाब सरकारने घेतला मोठा निर्णय यापुढे शहीद जवानांच्या कुटुंबाला मिळणार एक कोटी रूपयांची*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्देशानंतर नियमामध्ये सुधारणा*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यसभेत गोंधळ, तृणमूलच्या सात जणांसह 19 खासदारांचं एका आठवड्यासाठी निलंबन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राजस्थानसह जम्मू काश्मिरमध्ये मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नैसर्गिक वायूचे प्रमाण आताच्या 6.3 टक्क्यांवरुन 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट : केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी 8.2 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांवर घसरेल असा अंदाज आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) व्यक्त करण्यात आला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-20 संघ त्रिनिदाद येथे दाखल. येत्या 29 जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात टी-20 रंगणार मालिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रश्न कमी पटसंख्येच्या शाळेचा ...*दोन वर्षाखाली दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जवळपास एक हजार चारशे शाळा बंद करण्यात आल्या होत्या आणि त्यात जास्तीत जास्त सरकारी शाळांचा समावेश होता. या शाळा बंद झाल्यामुळे या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे जवळच्या शाळेत समायोजन करण्यात आले. शिक्षक काय कोठे ही जाऊन नोकरी करू शकतो ? त्याला त्याचे तेवढे दुःख नाही मात्र इयत्ता पहिली ते चौथी वर्गात शिकणाऱ्या सहा ते दहा वयोगटातील मुलांचे काय हाल होतात ? याचा जरा देखील विचार केला जात नाही याचे फार मोठे दुःख आहे. ......पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे. https://nasayeotikar.blogspot.com/2019/05/blog-post.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *इंटरनेटची मालकी कोणाकडे आहे ?* 📙अमेरिकेच्या संरक्षण खात्यासाठी संशोधन करणाऱ्या काही वैज्ञानिकांना सतत संपर्कात राहणं आणि एकमेकांना आपण वाचलेल्या किंवा लिहिलेल्या लेखांची, अहवालांची साद्यंत माहिती सतत देणं आवश्यक वाटलं. त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांनी त्यांना समाधान मिळत नव्हतं, म्हणून त्यांनी आपापले संगणक एकमेकांना बिनतारी पद्धतीनं जोडून एक जाळं निर्माण केलं. याला त्यांनी 'अर्पानेट' असं नाव दिलं. त्याचा वापर त्यावेळी तरी मर्यादित होता; पण ती संकल्पना एका क्रांतीची उद्गाती ठरली. ही संकल्पनाच आजच्या इंटरनेटचा आत्मा आहे.त्यावेळी फक्त त्या संशोधकांचेच संगणक एकमेकांशी जोडले गेले होते. ते संशोधकही एकमेकांपासून फार दूर नव्हते; पण एकदा अशा प्रकारे बिनतारी पद्धतीने संगणक एकमेकांशी जोडता येतात हे समजल्यावर त्याचं एक जगड्व्याळ जाळं तयार व्हायला फार वेळ लागला नाही. ते जाळ बांधण्यासाठीच्या पायाभूत सुविधा प्रस्थापित करायला काय वेळ लागला असेल तेवढाच.त्या पायाभूत सुविधांमध्ये अनेक प्रणालींचा समावेश आहे. संगणक एकमेकांशी जोडता येण्यासाठी संगणकांमध्ये काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक घटकांचा अंतर्भाव करावा लागला. यांना इथरनेट कार्ड म्हणतात. पूर्वी ते स्वतंत्रपणे घेऊन संगणकाशी जोडावं लागत असे. आता ते संगणकातच अंतर्भुत केलेलं असतं. टेलिफोनद्वारे संगणकांची जोडणी करण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. आता तर राऊटर वापरून संपूर्ण घरात किंवा मोठ्या परिसरात इंटरनेट प्रमाण उपलब्ध होण्यात होईल अशी 'वायफाय' प्रणाली विकसित केली गेली आहे. संगणकातले संदेश एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उपग्रहांचा वापर होतो. आणि या सर्व प्रणाली व्यवस्थित आपापलं काम करतील यासाठी काही खास मंत्रावळी म्हणजेच सॉफ्टवेअरचीही निर्मिती केली गेली आहे. ही मंत्रावली वापराच्या दृष्टीने अधिकाधिक सुलभ व्हावी सर्व गरजांसाठी ती उपयोगी पडावी आणि संदेशवहन वेगवान व्हावं यासाठी नवनव्या सुधारित मंत्रावलीही सतत तयार होत असतात. त्याशिवाय जगभरची विविध प्रकारची माहिती साठवून ठेवण्यासाठीची व्यवस्थाही करावी लागते. पूर्वी अशा प्रकारची माहिती कागदावर लिहिली जाऊन त्याचं दप्तर कपाटांमध्ये साठवून ठेवलं जात असे. आता ते संगणकाद्वारे दृकश्राव्य फितींवर साठवून ठेवलं जातं. 'क्लाऊड कॉम्प्युटिंग' या नव्या संकल्पनाद्वारे तर ते आभासी साठवणुकीद्वारे सुरक्षित ठेवलं जातं. यापैकी प्रत्येक सुविधा महत्त्वाची असली तरी ती संपूर्ण जाळ्याचा एक छोटासा भागच आहे. त्या त्या भागांपुरती मालकी निरनिराळ्या व्यक्ती, उद्योग, संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी यंत्रणा यांच्याकडे असली तरी संपूर्ण इंटरनेटवर कोणाचीही मालकी नाही. कोणी एक संस्था वा उद्योग इंटरनेटचा मालक नाही. त्यामुळे बलवान राष्ट्रांनाही इंटरनेट संपूर्णपणे बंद करण्यात यश मिळत नाही. इंटरनेट सुविधा आपल्याला पुरवणाऱ्या संस्थांवर बंदी घालून आपापल्या राज्यापुरती ती यंत्रणा बंद केली जाऊ शकते. इंटरनेटच्या वापरात सुसूत्रता आणणाऱ्या काही नियंत्रक संस्था आहेत. त्या आपल्याला निरनिराळे पत्ते किंवा ओळखपत्र मिळवून देण्याची व्यवस्था करतात; पण त्यांच्याकडेही संपूर्ण इंटरनेटची मालकी नाही. कोणीही मालक नसलेली आणि तरीही सुरळीत चाललेली 'इंटरनेट' ही एकमेव बहुपयोगी यंत्रणा आज अस्तित्वात आहे.*बाळ फोंडके यांचा 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) राष्ट्रपतींच्या वाहनावर क्रमांकाऐवजी काय असते ?२) सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या आयोगाच्या शिफारशी मान्य करत स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींचे आरक्षण कायम ठेवले आहे ?३) पती-पत्नीस एकत्र जेवावयास बोलावले तर त्यास काय म्हणतात ?४) पंचायत राजचे तीन स्तर कोणी सुचविले ?५) पोलाद तयार करण्यासाठी कोणत्या खनिजाचा प्रामुख्याने वापर केला जातो ?*उत्तरे :-* १) राष्ट्रीय चिन्हाची पाटी २) बांठीया आयोग ३) मेहूण ४) बळवंतराय मेहता समिती ५) मॅगनीज *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हणमंत पडवळ, उस्मानाबाद● उत्कर्ष मादसवार● शशिकला बनकर● मारोती ताकलोर● श्रीकांत क्यादरवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपला चालताना तोल जातो, उठताना तोल जातो, बसताना तोल जातो, बोलताना तोल जातो, वागताना तर नेहमीच तोल जातो. कोणताही ताल नसताना तोल जातो. तोल सांभाळत जगण्याच्या प्रयत्नात आपण कधी बेताल होतो समजत नाही. खोटे आणि दिखाऊ वागणे नेहमीच धडपडते. खरे आणि अस्सल राहणे ठामपणे चालत जाते. कळपातील मेंढी वाघाचे कातडे अंगावर पडल्याने वाघासोबत चालू लागते, पण जेंव्हा डरकाळी फोडण्याची वेळ येते तेंव्हा ती मेंढी बें बें असाच आवाज करते. मग वाघांना तिचा फडशा पाडायला वेळ लागत नाही. तोलहीन आणि खोटेनाटे व्यवहार आपला केंव्हा फडशा पाडतील हे सांगता येत नाही.**माणसाच्या खोट्यानाट्या व्यवहारांनी बोरी-बाभळीच्या अंगावरसुद्धा काटे येतात,असे बहिणाबाई चौधरी लिहितात. 'जगण्यात हरवलेले जीवन कुठे आहे?' हे जीवन स्वत:शी प्रतारणा करून खोटेनाटे वागण्यात, स्वत:चा खोटा अहंभाव जपण्यात हरवून गेले आहे. दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला नि:स्वार्थीपणे गुंतवून घेणारा आणि त्या सोडविण्याची धडपड करणारा साहित्यिक असे कुसुमाग्रजांनी वि.स. खांडेकरांबद्दल लिहिले होते. आपण दुस-याच्या समस्यांमध्ये स्वत:ला गुंतवून घेतो का? ते करत असू तर जगण्यातले जीवन हरवले जाणार नाही. 'बुडती हे जन, न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणवुनी' असा तुकारामांनी सांगितलेला कळवळा जेंव्हा ह्रदयातून वाहत राहील तेव्हा जीवन जगण्यात हरवले जाणार नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• हरिया जांणे रूखड़ा, उस पाणी का नेह ।सूका काठ न जानई,कबहूँ बरसा मेंह ॥सारांश वृक्षास कळे सिंचन जया प्रिय ते जीवन शुष्क काष्ठ काय जाणे ? थेंब मोतिया समानमहात्मा कबीर पटवून देतात की मनाच्या तयारीवर सर्वकाही अवलंबून असतं. पाण्याचं महत्त्व , त्याचा स्नेह व सिंचन केवळ हिरव्या वृक्षाला समजू शकतात. वाळलेल्या लाकडाला जवळून जाणारा जल प्रवाह किवा अमृतरूपी जलधारांच्या वर्षावाचं काय अप्रुप वाटणार आहे बरं ! मोत्यासम थेंबाचं त्याला काहीच महत्व नसतं. कारण त्याच्या ठायी असणारं भावनाशिल मन कधीच मेलेलं असतं. मुर्दाड मनाच्या माणसाला बाग, हिरवळ, प्रेम, आपुलकी, सहानुभुती संवेदना आदि भावना काय कळणार ? ते खरं तर दगडा समान निगर गट्ठ बनलेले असतं. त्याच्यावर कितीही जलधारांचा अभिषेक केला तरी दगड द्रवत नाही. तसे दगणडासमान निष्ठूर निर्दयी माणसासोबत एकतर्फी कितीही प्रेमळ वागलात तरी त्याच्या मुळ स्वभावात तीळमात्र स्नेहार्द्र भाव निर्माण होण्याची सुतराम शक्यता नसते. . त्यांचा स्वार्थ साधला की संपलं . खरं तर यांचं असणं नसणं नसण्यातंच जमा असतं. ओसाड निर्दयी मनामध्ये दयेचे निर्झर प्रवाहित होणं अशक्य आहे. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काहीवेळा काहींच्या बाबतीत मनुष्याचा स्वभाव समोरची परिस्थिती पाहून बदलत असतो.कधी कधी असेही वाटते की,आपण कमी वेळेत खूप काही करुन धनाढ्य व्हावे आणि आनंदाने जीवन जगावे.या वाईट मोहासाठी तो वेगवेगळ्या गैरमार्गाचा अवलंब करतो आणि संपत्ती अर्थात माया जमवण्याच्या मोहात पडतो.जी माया जमवली त्यात त्याला समाधान तर नसतेच अजूनही त्याच्यापेक्षा अधिक माया जमवण्यात वेळ खर्च करतो.परंतु हे त्याच्या लक्षात येत नाही की,आपण वाममार्गाला लागलो आहोत, दुस-याला लुटलो आहोत ही जी काही वाईट सवय लागली आहे ती आपल्या मनाला समाधान देणारी नाही.केवळ आपल्या मोहापायी, आपल्या स्वार्थासाठी इतरांच्या जीवाला त्रास देऊन आपल्या नको त्या गोष्टीच्या नादाला लागलो आणि हावरटपणाचा कहर केला. त्यामुळे आपले जीवन हे जीवन राहिले नसून आपण इतरांच्या नजरेत एक गुन्हेगार ठरलो आहोत आणि ते ही आपल्या स्वार्थी मोहापायी ?हा मोह काहीच कामाचा नाही.ज्यामुळे माणसातील माणुसकी नष्ट झाली.त्यापेक्षा मनाचा हावरटपणा सोडून द्यावा, भरपूर मेहनत करावी,आपल्या कृत्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपले जीवन सुखासमाधात जावे.यापेक्षा आपल्या कोणत्याही अपेक्षा असू नयेत.हाच मंत्र चांगले जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे.नाही तर नको त्या मोहात जाणे आणि आपल्याच हाताने जीवन दु:खमय जगणे यापेक्षा जीवनाचे वाईट चित्र काय असू शकेल ?© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कुत्रा आणि लांडगा*एक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोड झाला होता. काहीतरी खायला मिळाले तर पहावे म्हणून तो चांदण्या रात्री फिरत होता. तेव्हा त्याला एका झोपडीजवळ दारावर एक लठ्ठ कुत्रा बसलेला दिसला. त्याने त्याला रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर लांडगा त्याला म्हणाला, ''तू फार चांगला दिसतोस, तुझ्यासारखा देखणा व धष्टपुष्ट प्राणी आजपर्यंत मी पाहिला नाही. याचे कारण तरी काय? मी तुझ्यापेक्षा जास्त उद्योग करतो, पण मला पोटभर खायला मिळत नाही.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी करतो ते तू करशील तर माझ्यासारखाच तूही सुखी होशील.''त्यावर लांडग्याने विचारले, ''तू काय करतोस?'' कुत्रा म्हणाला, ''दुसरे काही नाही. रात्रीच्या वेळी मालकाच्या दारापुढे पाहारा करून मी चोराला येऊ देत नाही.'' लांडगा म्हणाला, ''एवढंच ना? ते मी मनापासून करीन बाबा. अरे मी रानात भटकत थंडीवारा सोसतो तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे?'' याप्रमाणे दोघांमध्ये बोलणे चालले असता कुत्र्याच्या गळ्याला दोरीचा करकोचा पडलेला लांडग्याने पाहिला. तेव्हा तो कुत्र्याला म्हणाला, ''मित्रा, तुझ्या गळ्यात काय रे हे?'' कुत्रा म्हणाला, ''अं हं. ते काही नाही.'' लांडगा म्हणाला, ''तरी पण काय ते मला कळू देत.'' कुत्रा म्हणाला, ''अरे, मी थोडासा द्वाड आहे, लोकांना चावतो, म्हणून मी दिवसा झोपलो तर रात्री चांगला पहारा करीन म्हणून माझा मालक मला दोरीने बंधून ठेवतो पण दिवस मावळला की तो मला सोडतोच. मग मी वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. खाण्यापिण्याविषयी विचारशील तर माझा मालक आपल्या हाताने मला भाकरी खाऊ घालतो. घरची सगळीच माणसं मला मायेने वागवतात. पानावर उरलेली भाकरी माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाला देत नाहीत. तेव्हा तू पहा, माझ्यासारखा वागशील तर तही सुखी होशील.'' ते ऐकताच लांडगा मागच्यामागे पळू लागला. त्याला हाका मारीत कुत्रा म्हणाला, ''अरे, असा पळतोस काय?'' लांडगा दुरूनच म्हणाला, ''नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुलाच लाभो. स्वतंत्रपणे वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग, तुझ्यासारखे बांधून ठेऊन जर मला कोणी राजा केले तर ते राजेपणदेखील मला नको!''तात्पर्य : स्वतंत्रपणा असताना गरिबीही चांगली. पण परतंत्रपणा असेल तर श्रीमंतीचाही काही उपयोग नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 26/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*विजय दिन - भारत* (कारगिल युद्धाची समाप्ती)💥 ठळक घडामोडी :-◆ १९६५ - मालदीवला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.◆ २००५ - मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.◆ २००८-अहमदाबाद शहरात २१ बॉम्बस्फोटात ५६ मृत्युमुखी तर २०० जखमी.◆ २०११ - मोरोक्कोमध्ये सी.१३० प्रकारचे विमान कोसळले. ७८ ठार.💥 *जन्म*◆१८८५-मुग्धा गोडसे,अभिनेत्री व मॉडेल.◆ १९२७ - जी.एस. रामचंद, भारतीय क्रिकेट खेळाडू.◆ १९४३ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक. ◆ १९४९ - थक्शिन शिनावत्र, थायलंडचा पंतप्रधान.💥 *मृत्यू*◆ १८६७ - ओट्टो, ग्रीसचा राजा.◆ १९५२ - एव्हा पेरोन, आर्जेन्टिनाची गायिका.◆ २००९ - भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी घेतली पद आणि गोपनियतेची शपथ, ''गरीबही स्वप्न पाहू शकतात'', द्रौपदी मुर्मू यांचे शपथविधीनंतर जनतेला संबोधितपर भाषणात म्हणाल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार; बोगस मतदारांना आळा घालण्यासाठी 1 ऑगस्टपासून राज्यात खास मोहीम, आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग विरोधातील काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा ; अजित पवारांचं सरकारला पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *शिक्षक भरती घोटाळ्यातील आरोपी पार्थ चॅटर्जी यांची सहकारी अर्पिताची डायरी ईडीच्या हाती, अनेक गौप्यस्फोट होणार ? अर्पिता मुखर्जीला ईडी कार्यालयात घेऊन जाणाऱ्या गाडीला अपघात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भारताने गेल्या 5 वर्षांत चीन सीमेजवळ 2088 किमी लांबीच्या रस्त्याचे केले बांधकाम, सरकारने संसदेत दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *डिसले गुरुजींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, 'डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया' पुरस्कार जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *एका वर्षात 78 वेळा वाढले पेट्रोलचे दर, आप खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्र सरकारचे उत्तर*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भूक*https://storymirror.com/read/story/marathi/yk8b6w78/bhuuk/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रक्तदान कोण करू शकत नाही ?* 📙 रक्तदान हे श्रेष्ठदान आहे यात शंकाच नाही. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या कोणाचंही कौतुक करायला हवं. पण आपण एखादं दान देतो ते तेव्हा ते सत्पात्री असावं अशी खबरदारी जशी आपण घेतो तशीच ते दानही 'योग्य' आहे याचीही खातरजमा करून घेणं आवश्यक असतं. त्यामुळेच इच्छा असली तरी काही जणांना तात्पुरत्या काळाकरता तसंच इतर काही जणांना कायमचं रक्तदान करण्यापासून रोखलं जातं.ही नकारघंटा वाजवली जाणार्यांची यादी दात्याच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी जशी बनवली जाते तशीच घेत्याच्याही आरोग्यावर लक्ष ठेवून बनवली जाते. म्हणूनच रक्तदान केल्यामुळे दात्याला कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागू नये, याची काळजी घेणं आवश्यक ठरतं. त्या तत्त्वानुसारच, ज्यांच्यामध्ये सर्दी, पडसे, खोकला किंवा ताप यासारख्या कोणत्यातरी रोगजंतूचा उपसर्गाची लक्षणं दिसत आहेत त्यांना ती लक्षणं नाहीशी होईपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्या रोगावर उपचारासाठी प्रतिजैविकांसारखी काही औषध दिली असतील तर त्यांचा असर नाहीसा होईपर्यंत रक्तदानाला मनाई करण्यात येते. एखाद्याला स्वतःलाच जर रक्त दिलं गेलं असेल तर त्या दानापासून एक वर्षांपर्यंत त्याला रक्तदान करता येत नाही. बाळंत झालेल्या स्त्रीला पुढचे सहा आठवडे रक्त देता येत नाही. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, ज्या स्त्रीला पाळी आलेली आहे, ज्या व्यक्तीने पुरुष अथवा स्त्री वेश्येशी समागम केला आहे, जिचा गर्भपात झाला आहे, अशांनाही काही काळापुरतं रक्तदानावरच्या बंदीला सामोरं जावं लागतं.पण ही झाली तात्पुरती बंदी. बंदीचा काळ उलटून गेल्यावर त्यांना रक्तदान करता येतं; पण काही व्यक्तींना तर रक्तदानापासून कायमचं दूर ठेवण्यात येतं. यात ज्यांनी रक्तवाहिनीवाटे नशील्या पदार्थांचं सेवन केलं आहे अशांचा समावेश होतो. मग ते त्यांनी एकदाच का केलेलं असेना. तसंच ज्यांना एड्सला कारक असलेल्या एचआयव्ही या विषाणूंची बाधा झालेली आहे, अशांचंही रक्त घेतलं जात नाही. हिमोफेलिया, थॅलेसेमियासारख्या रक्ताच्याच रोगांची लागण ज्यांना झालेली आहे अशांनाही रक्तदान करता येत नाही. वयाच्या अकराव्या वर्षांनंतर ज्यांना विशिष्ट प्रकारची कावीळ झालेली आहे, कर्करोग किंवा मल्टिपल स्क्लेरॉसिस या रोगांनी ग्रासले आहे, अशांनाही रक्तदान करण्यापासून परावृत्त केलं जातं. वेश्याव्यवसाय करणाऱ्या कोणालाही मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरुष रक्तदान करता येत नाही. ज्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा तो येऊ नये यासाठी ज्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, अशांनाही रक्तदान करता येत नाही. तीच बाब पक्षाघाताचा झटका येऊन गेलेल्यांनाही लागू होते. ही बंदी दात्यापेक्षा हे रक्त ज्याला दिलं जाण्याची शक्यता आहे अशा व्यक्तीच्या आरोग्याच्या काळजीतून घेतली जाते. कारण त्या व्यक्तीवर हे दान घेतल्यानंतर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. 'भीक नको पण कुत्रा आवर' अशी त्यांची परिस्थिती होऊन जाते.ही एवढी लांबलचक यादी असली तरी रक्तदानास पात्र असतात अशांची यादी याच्या कितीतरी पटींनी मोठी आहे. म्हणून रक्तपेढ्यांमध्ये सहसा रक्ताचा तुटवडा नसतो.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••एका चुकीच्या शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी केलेल्या हजार चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या.नात्यामध्ये आणि मैत्रीमध्ये कधीच दुरावा येणार नाही.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविद हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?२) सर्वाधिक अंतराने विजयी झालेले राष्ट्रपती कोण ?३) कोणत्या शाहिराने 'गर्जा महाराष्ट्र' हे गीत लिहिले आहे ?४) नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी कोणाचा पराभव केला ?५) 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील तारक मेहता यांचे वास्तव नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) १४ वे २) राजेंद्र प्रसाद ( ९९.३ % , १९५७ ) ३) कृष्णराव साबळे ४) यशवंत सिन्हा ५) शैलेश लोढा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● वैभव पाटील भोसले● रमेश मस्के● उदयकुमार केंद्रे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*डाॅ. राधाकृष्णन् यांनी आपल्या बोलण्यातून जगभर ख-या आणि शाश्वत धर्माची मूल्ये सांगितली. या निमित्ताने ते बोलत राहिले आणि सरोवरात कमलपुष्पे फुलत जावीत तसे त्यांचे बोलणे फुलत गेले. सत्ताधीशांचे स्तुतीपाठक खूप असतात. पण राजा तू चुकतो आहेस, असे बोलण्याची धमक असणारे क्वचित असतात. इष्ट असेल ते बोलणार, शक्य असेल ते करणार, असे म्हणणा-या गोपाळ गणेश आगरकरांना केवळ ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. दारिद्र्य, दमा यांच्याशी झुंज देत धिक्कार व अपमान सोसूनही त्यांनी प्रबोधनाचा ध्यास घेतला आणि त्यासाठी काम केले.**ज्ञानी माणसाने जगाला मार्ग दाखवावा. आपण वेगळे आहोत असे वागू नये. आपले अलौकिकत्व लोकांसाठी असावे. असा मार्ग दाखिवण्याचे काम जसे संतांच्या लेखनातून होते, वर्तनातून होते तसे बोलण्यातूनही होते. मूर्ख व कृतिहीनांचा वाचाळपणा आणि शहाण्या व कर्मवीरांचे मौन समाजाला घातक असते. रामदासांनी मूर्खांची लक्षणे सांगितली आहेत. त्यामध्ये 'दुर्जनांचेनि बोलणारा, मर्यादा सांडून चालणारा' त्याचप्रमाणे 'आदरेविण बोलणारा, न पुसता साक्ष देणारा' मूर्ख म्हटला आहे. तर उत्तम लक्षणांमध्ये 'विचारेविण बोलो नये, विवंचणेविण चालो नये' हेही सांगितले आहे. आपल्याला आयुष्यात गोडी निर्माण करायची असेल तर आपले बोलणे मधुर हवे. त्यासाठी आपले अंतरंग मधुर हवे. मग सर्वच मधुर होऊन जाईल.* *॥ रामकृष्णहरी ॥*🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚🐚 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल -9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पत्ता बोला वृक्ष से ,सुनो वृक्ष बनराय |अब के बिछड़े न मिले , दूर पड़ेंगे जाय ||अर्थ : संघटनेचं विघटन झालं की उभारी घेणं अवघडच असतं. हे पटवून देताना महात्मा कबीरांनी निसर्गातला किती समर्पक दृष्टांत दिलेला आहे. पान झाडाला म्हणतं, ' हे तरूवर वृक्षराज तुम्ही ऐका तर खरं ! आज तुम्ही भक्कमपणे उभे आहात. या तुमच्या भक्कम पणासाठी आम्ही लक्षावधी पानांनी स्वतःला ऊन्हात सूर्यासोबत टक्कर देत त्याला न घाबरता अंगावर घेतलं. ऊन्हात राबून स्वतःचं नाजूकपण तुझ्या संगोपणात साकारण्यात विसरूनच गेलो. अन राठ होवून पिकत गेलो. आम्ही जुन्या दमाची परंतु अनुभवी तुझ्या स्वछंद बागडण्याला मुरड घालून ताळ्यावर आणू पाहाणारी तुला नकोशे वाटतोय. नव्या दमाची फौज तुला हवी. तिला जशी फुस दिली तशी ती उधळते. भूत भविष्याचा विचार न करता वर्तमानाच्या क्षणिक फसव्या मोहात पाडून तू त्या नव्या नाजूक पात्यांना फसवून स्वतःच वैभव आभाळी मिरवू पाहात आहेस. तुझे पाय त्या वटवृक्षावाणी मजबुतीनं कुठं घट्ट रोवलेले आहेत ? त्याच्या सोबतीला जुने नवे असे पानाचे अक्षौहिनी सैन्य खोडाआधी भक्कमपणे ऊन, वारा थंडीशी टकरायला तयार आहे. म्हणून तर वडाचं राज्य दीर्घकाल चालतं. तो आधार असणार्‍या पान अन मातीची नाळ वड तुटू देत नाही. तू मात्र "विद्या आली हाता अन गुरूला लाथा"असं वागून नवीन पिढी बिघडवत आहेस. ती पिढी बायका पोरं झाली की मायबापा पासून दुरावून स्वतःचा अधःपात करून ऊर फोडून घेत आहेत. तुला वैभव उंच आभाळी नेल्यासारखं वाटत असलं तरी वादळं वावटळी मध्ये सर्वात आधी ताडमाड उंचीची दिखाऊपणा करणारी भक्कम आधार नसलेलीच झाडंच आधी आडवी होतात. दुरावलेलं गळालेलं पान पुन्हा आधाराला कधीच जवळ येत नाही. ते नव निर्माणासाठी मातीशीच एकरूप होवून जातं ! सोबत्यांना (जनतेला) मारून नव्हे तर सोबत घेवून मोठं होता येतं. हे झाडांनी विसरता कामा नये. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जेव्हा एकाच बिंदूतून कितीतरी रेषा काढलेल्या आपण पाहिलेल्या आहेत तरीही त्या एकमेकांना एकाच बिंदूत छेदून पुढे सरळ मार्गाने निघून जातात आणि त्याच रेषा परत एकाच बिंदूत एकत्रीत येऊन मिळतानाही पाहिले आहे.असा जर आपण विचार केला तर आपले हृदय आणि मनही एकच आहे.आपणच आपल्या हृदयातून आणि मनातून अनेक माणसांना जोडण्याचे काम करत असतो.त्यात काहींना काही कारणाने जवळ करतो तर काही माणसे आपल्यापासूनच जवळ येऊन दूर जातात.जे दूर जातात त्यांचा विचार करु नका,कारण त्यांना स्वातंत्र्य आहे.परंतु जी माणसे तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात त्यांना दूर करु नका कारण त्यांना तुमचे मन आणि हृदय कळलेले असते.तुम्ही त्यांचे केंद्रस्थानी आणि बिंदूस्थानी आहात.तुम्हीच त्यांचे आधारही आहात आणि त्यांची प्रेरणाही.सा-यांना जवळ करण्याचे बिंदूसारखेच काम करायला शिकले पाहिजे तरच जीवन समृद्ध होईल.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०./८०८७९१७०६३.🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आपल्या माणसाकडून मिळालेले दुःख*एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."*तात्पर्य- आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🛟 दि. 25/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 🛟. *दिनविशेष . 🛟* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••★ *गॅलिशिया दिन - गॅलिशिया(स्पेन)* ★ *संविधान दिन - पोर्तोरिको*★ *प्रजासत्ताक दिन - ट्युनिसीया*💥 ठळक घडामोडी :-◆ १९७८ - जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन चा इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्म.◆ १९९७ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.◆ २००७ - प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.💥 *जन्म*◆ १९२९ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.◆ १९७८ - लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी💥 *मृत्यू*◆ १८८०-गणेश वासुदेव जोशी उर्फ 'सार्वजनिक काका' समाजसुधारक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *भारताच्या 15 वे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आज शपथविधी सोहळा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आयसीएसई 12वीचा निकाल जाहीर, ठाण्यातील उपासना नंदी देशात पहिली*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अविवाहित मातेचे मूलही देशाचा नागरिक, पालक म्हणून जन्म दाखल्यावर फक्त आईचे नाव लिहिण्याचा अधिकार, केरळ उच्च न्यायालयाचाआदेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपाक्सला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ * ब्रिटिन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक पिछाडीवर पडले असून परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी आघाडी घेतली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्यमहाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 2 गडी राखून शानदार विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - लिफ्ट*https://storymirror.com/read/story/marathi/rlufif6t/liphtt/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *पृथ्वीवरून पाठविलेला संदेश मंगळावर पोहोचायला किती वेळ लागेल ?* 📙भारताने चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पाठवलेल्या 'चंद्रयान' या अवकाशयानाशी संपर्क तुटल्यामुळे तो प्रकल्प अर्धवट सोडून द्यावा लागला होता. तरीही जे नऊ महिने ते यान आपलं आखून दिलेलं काम इमानेइतबारे पार पाडत होतं, त्या काळात निर्धारित कामापैकी ९० टक्के काम पार पडल्याचं आपल्या अंतराळविज्ञान विभागानं जाहीर केलं आहे. साहजिकच त्या यानाशी संपर्क साधण्याची, दळणवळणाची व्यवस्था कार्यक्षम होती यात शंका नाही. तरीही अशा यानाला जमिनीवरच्या नियंत्रण कक्षातून विशिष्ट कामगिरी पार पाडायचा आदेश त्याला मिळायला किती वेळ लागत असेल, हा एक उत्कंठा लावणारा प्रश्न मनात उभा राहतो. कारण एखादी कामगिरी त्या यानानं तात्काळ पार पाडावी असं वाटत असेल तर हा संदेश किती वेगाने त्याच्यापर्यंत पोहोचतो याला महत्त्व येतं.चंद्र त्या मानाने पृथ्वीच्या जवळ आहे. पण मानवांनं आता मंगळ, शुक्र, गुरू, शनी एवढंच काय, पण नेपच्यूनसारख्या अतिदूर असणाऱ्या ग्रहांवरसुद्धा यानं पाठवली आहेत. त्यांचं नियंत्रण जमिनीवरूनच केलं जात आहे आणि त्या यानांनी मिळवलेली माहिती नियंत्रण कक्षाकडे संग्रहितही होत आहे. या साऱ्या दळणवळणाला किती वेळ लागतो ? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला दोन बाबींची माहिती हवी. या संदेशांच्या प्रवासाचा वेग आणि त्या याना किंवा ग्रहापर्यंतच अंतर.जमिनीवरून संदेश पाठवले जातात ते रेडिओलहरींच्या माध्यमातून. उलट दिशेने येणारी माहितीही त्याच रूपात मिळवली जाते. आपल्या नजरेला भावणारा 'तानापिहिनिपाजा' या पट्टय़ातला दृश्य प्रकाश किंवा क्ष-किरणं किंवा मोबाइल फोनच्या दळणवळणासाठी वापरलं जाणारं मायक्रोवेव्ह प्रारण ही सर्व विद्युतचुंबकीय वर्णपटाचाच एक भाग आहेत. रेडिओलहरीही याच वर्णपटात मोडतात. त्यामुळे या सर्वांचा वेग सारखाच आहे. प्रकाशाचा वेग अचूक मोजला गेला आहे. तोच मग रेडिओलहरींचाही वेग ठरेल. तो आहे एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्या वेगाने हे संदेश आपली वाटचाल करत असतात.पृथ्वी आणि मंगळ दोन्हीही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. या भ्रमणाचा दोन्हींचा वेगही वेगवेगळा आहे. त्यामुळे कधी हे दोन ग्रह सूर्याच्या दोन बाजूंना असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर सर्वात जास्त असतं. इतर वेळेला तो ते सूर्याच्या एकाच बाजूला असतात, त्या वेळी त्यांच्यामधलं अंतर किमान असतं. मंगळ आणि पृथ्वी यांच्यामधलं किमान अंतर आहे ७.८ कोटी किलोमीटर. प्रकाशाच्या वेगाने पार करायला केवळ ४.३ मिनिटं लागतात; पण त्या दोघांमधलं कमाल अंतर आहे ३७.८ कोटी किलोमीटर. ते पार करायला मात्र रेडिओसंदेशांना तब्बल २१ मिनिटं लागतात.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••सूर्याच्या किरणांनी जशा बर्फाच्या राशी कोसळतात, तशाअहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओलाव्याने विरघळतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) राष्ट्रपतिपदी निवडून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी केव्हा आहे ?२) विरोधी पक्षाचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना किती टक्के मते मिळाली ?३) 'पूर्ण आंदोलन' चा नारा कोणी दिला ?४) कोणत्या नदीच्या खोऱ्याला 'संतांची भूमी' म्हणून संबोधले जाते ?५) 'हसविणारा वायू' ( Laughing Gas ) कोणत्या वायूला म्हटले जाते ?*उत्तरे :-* १) २५ जुलै २०२२ २) ३६ % ३) जयप्रकाश नारायण ४) गोदावरी नदी ५) नायट्रस ऑक्साइड*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संगीता भालसिंग● साईनाथ कामीनवार, शिक्षक● रामकुमार चिलकेवार, शिक्षक● श्यामकुमार चिलकेवार, शिक्षक● श्रीधर चिंचोलकर, मुख्याध्यापक● अभिषेक येरावार● नरेंद्र राठोड● गजानन महाजन● रुचली चंदेल बायस● ज्ञानेश्वर पाटील● साईनाथ भोरे● गंगाधर मानगुर्ले● नागेश कोलोड● लक्ष्मण सुरकार● संतोष श्रीखंडी● गोविंद मानेमोड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण जे बोलायला हवे ते बोलत नाही. जे बोलू नये ते बोलून जातो. जे पोटी असते ते ओठी येते असे म्हणतात. काही वेळा पोटी काही नसताना भलतेच ओठी येते. अनवधानाचे ते बोलणे सावरण्यासाठी मग खूपच बोलणे सोसावे लागते. काही लोक खूपच बडबडतात. काहींचे मौन बोलके असते. शांतपणे अविरत श्रमाची कास धरणा-यांचे यशच खूप काही बोलून जाते. नाहीतर बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असणा-यांची संख्या बरीच आहे. न्यायालयातील उलटतपासात साक्षीदाराने काय बोलावे यापेक्षा काय बोलू नये याला खूप महत्व आहे.**रामदासांनी शिवरायांचे मोठेपण सांगताना 'शिवरायांचे कैसे बोलणे' असा शब्दप्रयोग करून, त्यांच्या पदपथावर चालण्यास सांगितले. संतांच्या बोलण्याला अनुभूतीचा आधार असतो. महापुरूषांच्या बोलण्याला त्यांच्या जीवनकार्याची धार असते. चर्चिलच्या प्रभावी बोलण्याने दुस-या महायुद्धात ब्रिटनच्या लोकांना लढण्याचे धैर्य वाढले. अब्राहम लिंकनच्या बोलण्याने अमेरिकेची फाळणी टाळली गेली. मार्टिन ल्यूथर किंगच्या ''गुणवत्ता त्वचेच्या रंगावर नाही तर चारित्र्यावर ठरेल' या वक्तव्याने जगभर प्रभाव पाडला. गांधीजीचा 'चले जाव' , सुभाषबाबूंचा 'जयहिंद' आणि क्रांतीकारकांचा 'वंदे मातरम' ह्या एकाच शब्दाने इंग्रजांना पळता भुई थोडी झाली. नाहीतर,'बालिश बहु बायकात बडबडला' असे बडबडणारे तर अनेक असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नहाये धोये क्या हुआ , जो मन मेल न जाय |मीन सदा जल में रही , धोये बॉस न जाय ||अर्थ : नहाणे धुणे देखावागेला न मनीचा मळसदा पाण्यात मासळीदुर्गंध न काढी जळ महात्मा कबीर दिखाऊ पणाला फटकारतात. नहाणे , धुणे व सुंगधाने सजणे हा तर केवळ बाह्य देखावा आहे. जर मनाचीच सफाई झाली नाही तर विवेकी व निरामय जीवनशैली विकसित होणार नाही व त्याशिवाय विश्वात्मक भाव दृढ कसा होणार ? मासा सदा सर्वकाळ पाण्यात राहूनही अंगीचा दुर्गंध त्यागीत नाही. तिथे पाण्याचा काय दोष असणार आहे. बाह्य बदलापेक्षा आंतरिक बदल महत्त्वाचा असतो. तो अवगुण कायमचे दूर करतो. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दररोज एक चांगला विचार मनात आणला तर जीवनाला एका नव्या विचारांची संजीवनी भेटते.त्या एका चांगल्या विचारांमुळे आयुष्यात होणा-या चुका तर टळतीलच पण चांगला विचार केल्यामुळे वाईट विचारांची पुनरावृत्ती होणार नाही.जीवन चांगल्या विचारांमुळे अधिक समृद्ध बनते आणि त्यामुळेच ख-या जीवनाचे सार काय आहे ते कळते.आचार आणि विचारांमध्येही स्वत:च्या माणसातला माणूस घडवताना सतत प्रयत्न करताना दिसतो.म्हणून रोजच्या जीवनात एका चांगल्या विचारांची माणसाला भूक आणि गरजही असायला हवी.ती गरज सज्जनांच्या सहवासातून,ग्रंथ आणि पुस्तकांच्या सहवासातून पूर्ण करता येते.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आशेची थोरवी*एक भुकेलेला डोमकावळा एका उंबराच्या झाडावर बसला होता. तो वाट पाहात होता. उंबराची फळे अजून पिकली नाहीत. ती कधीतरी पिकतील याची वाट पाहात तो तिथेच बसून होता.हा डोमकावळा बराच काळ तिथेच बसला आहे, असे एका कोल्ह्याच्या लक्षात आले. तेंव्हा त्याने त्याला कारण विचारले.डोमकावळयाने कारण सांगितल्यावर कोल्हा त्याला म्हणाला, 'अरे वेडया, आशेने असा वाहून जाऊ नकोस. आशेमुळे माणसाला भ्रम तेवढा होतो. अशाने वाट पाहून कुणाचेच पोट भरत नाही.तात्पर्य - केवळ आशा करणे व्यर्थ आहे. प्रयत्न हवा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~दि. 23/07/2022वार - शनिवार •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 . *दिनविशेष . * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लोकमान्य टिळक जयंती* 💥 ठळक घडामोडी :-● १९६८ - अल ऍलच्या बोईंग ७०७ प्रकारच्या विमानाचे रोममधून अपहरण.●१९७० - ओमानमध्ये राजकुमार काबूस इब्न सैदने आपल्या वडिल, सैद इब्न तैमूरला पदच्युत करून सत्ता बळकावली.💥 जन्म :-◆१८५६ - बाळ गंगाधर टिळक, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी.◆१९०६ - चंद्रशेखर आझाद, भारतीय क्रांतिकारक.◆ १९१७ - लक्ष्मीबाई यशवंत भिडे (ऊर्फ माई भिडे), मराठी नाट्य-चित्रपट अभिनेत्री.◆१९७३ - मोनिका लेविन्स्की, व्हाइट हाउसमध्ये काम करणारी स्त्री.◆ १९७५ - सूर्य शिवकुमार, तमिळ अभिनेता.💥 मृत्यू :-■ १९९७ - वसुंधरा पंडित, भारतीय गायिका.■ २००४ - मेहमूद, हिंदी चित्रपट अभिनेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, यात 'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला 'सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा', तर अजय देवगणच्या 'तान्हाजी'ला 'लोकप्रिय हिंदी सिनेमा'चा पुरस्कार जाहीर झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *CBSE बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 90.48 टक्के CBSE परीक्षेत मुलींची बाजी! तान्या सिंहने मिळवले 500 पैकी 500 गुण*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीवर राहणार ड्रोनची नजर, सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईसह 13 महापालिकांचे आरक्षण नव्यानं जाहीर होणार, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं आरक्षण रद्द*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार अनंत उर्फ नंदा खरे यांचे आज पुण्यात निधन, वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा तीन धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - ब्लू व्हेल*https://storymirror.com/read/story/marathi/p5b2dmy2/blu-vhel/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌍 *पृथ्वीच्या पोटात किती उष्णता असते ?* 🌍पृथ्वीचा जन्म झाला तेव्हा तो एक धगधगता तापलेला वायूचा गोळा होता, असं आपण नेहमी ऐकतो. ते खरंही आहे. वैज्ञानिकांच्या मनात त्याबद्दल दुमत नाही. जोवर तो असा तापलेल्या वायूंचा गोळा होता तोवर त्याला कोणतंही ठोस रूप नव्हतं ; पण जसजसा काळ उलटत गेला तो तापलेला गोळा थंड होत गेला. त्या गोळ्याला रूप येऊ लागलं. उंच सखल भूप्रदेश तयार झाले. सतत वाफेच्या रूपात असलेलं पाणी द्रवरूप झालं. त्याचे सागर झाले. हळूहळू पृथ्वीचा पृष्ठभाग निवला. इतका की सजीव सृष्टी त्यावर अवतरली, रुजली, फोफावली. तरीही पृथ्वीचा गाभा मात्र तापलेला राहिला आहे. तिथं असले उष्णता अजूनही कायम आहे. उन्हाळ्यात धरती तापते तेव्हा उन्हाच्या काहिलीपासून आपलं रक्षण करण्यासाठी काही प्राणी बिळात जाऊन बसतात. विशेषत: वाळवंटी प्रदेशात हे दिसून येतं. त्यामुळे पृथ्वीच्या पोटात थंडावा आहे असा समज होतो. पण तो खरा नाही. पृष्ठभागाला तापवणारा सूर्यप्रकाश मातीच्या काही थरांमुळे झाकला गेला की तापमान काहीसं घसरतं. पृथ्वीच्या पोटात जसजसे आपण शिरत जाऊ तसतसा तो भाग उष्णच असल्याचं स्पष्ट होतं.पृथ्वीच्या पोटात किती उष्णता आहे, याची माहिती वैज्ञानिकांनी मिळवलेली आहे. त्यानुसार पृथ्वीच्या गाभ्याचं तापमान ४०००अंश सेल्सिअस आहे. याचं नीट आकलन होण्यासाठी आपण काही तुलनात्मक आकड्यांचा विचार करू शकतो. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान ५००० अंश सेल्सिअस आहे. म्हणजे पृथ्वीचा गाभाही साधारण तेवढाच तापलेला आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवातले आकडे सांगायचे तर पाणी समुद्रसपाटीवर १०० अंश सेल्सिअसला उकळतं. साठ अंश सेल्सियसपेक्षा जास्त गरम असलेल्या पाण्यानं अंग भाजून निघू शकतं. आजवर पृथ्वीवर सर्वात जास्त नोंद झालेलं तापमान ५८ अंश सेल्सिअस आहे. १९२२ मध्ये लिबियामध्ये त्याची नोंद झाली होती.पृथ्वीचा गाभा लोह आणि निकेल या धातूंचा बनलेला आहे. लोहही साधारण १५३५ अंश सेल्सियसला वितळतं. मग पृथ्वीचा गाभा संपूर्णपणे द्रवरूप लोहाचा आहे, असा समज होईल; पण त्या लोहाला प्रचंड दाबही सहन करावा लागतो. जसजसा दाब वाढत जातो तसतसा कोणत्याही पदार्थाचा उत्कलनबिंदू चढत जातो, त्यामुळे ४००० अंश तापमान असूनही लोह वितळत नाही. मात्र ते अतिशय तापलेलं असतं. त्या गाभ्याच्या वरच्या थरातलं तापमान तुलनेने कमी असतं. त्यामुळे ४००० अंश तापमान हे सरासरी तापमान असावं आणि अगदी केंद्रबिंदूजवळ गेल्यास ते त्याहूनही अधिक असावं असं काही वैज्ञानिकांचं मत आहे.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दुसऱ्याच्या चुकामधुन शिका, कारण स्वत:च्या चुकांमधुन शिकायला आयुष्य फार थोड असत - आर्य चाणक्य*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे १५ वे नवनिर्वाचित राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली ?२) भारताची पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती कोण ?३) भारताची दुसरी महिला राष्ट्रपती कोण ?४) देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्म झालेल्या पहिल्या राष्ट्रपती कोण ?५) एनडीएच्या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून कोणाची निवड झाली होती ?*उत्तरे :-* १) मा. द्रौपदी मुर्मू २) मा. द्रौपदी मुर्मू ३) मा. द्रौपदी मुर्मू ४) मा. द्रौपदी मुर्मू ५) मा. द्रौपदी मुर्मू*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● उदयकुमार शिल्लारे● प्रदीप दळवी● संतोषसुवर्णकार● लक्ष्मण मलगिरे● जितेंद्र पाटील● वैभव पाटील● विक्की पाटील● अविनाश धुप्पे● शंकर बोईनवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणूस जोवर जिवंत असतो, तेंव्हा त्याच्या अपेक्षा असतात. इच्छा असतात. त्या कुणाच्या गावाला पोहचत नाहीत. त्याच्या आकान्तहाका कुणाला ऐकू येत नाहीत. नंतर मात्र त्याच्या कौतुकाचे पाढे सुरू होतात, पोवाडे गायले जातात. जिवंतपणी त्याच्या हाकांचा कानोसा घेतला असता, तर नक्कीच त्याच्या जगण्याचे काही दिवस वाढले असते. भुकेल्याची अपेक्षा फार नसते, त्यास भाकर हवी असते, तहानलेल्याला पाणी, कष्टक-याला त्याच्या घामाचा मोबदला, कलाकाराला त्याच्या कलेची दाद, एवढीच तर अपेक्षा असते... फक्त एक सेकंद जगण्याची... पण त्याच्या हयातीत आपल्याला पकडता येत नाही त्याचा जिवंत सेकंद..**सोनं तोळ्यात मापतात. मात्र, त्याहीपेक्षा माणसाचा माणसासाठीचा कौतुकाचा, जिव्हाळ्याचा शब्द महागला आहे. माणसाचं अपयश हे की तो पैसे मिळविण्याचं तंत्र तर शिकलाच; तंत्रज्ञानालाही त्याने असे आत्मसात केले की तंत्रमानव म्हणून कुशल झाला. पृथ्वीवर तर त्याने सत्ता काबीज केलीच, पण आज तो इतर ग्रहावरही चढाई करतोय. मात्र जिवंत राहण्याचं तंत्र तो शिकू शकला नाही. जगण्या-मरण्यातल्या एका श्वासांचं अंतर जेव्हा माणसास कळेल तेव्हा त्याच्या आत माणुसकीचा दीप तेवून उठेल.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर हरि सो हेत कर,कोरै चित ना लायेबंधियो बारि खटीक के,ता पशु केतिक आये।सारांशकबीरा हरी स्मरण करनको मनी कचर्‍याचा भरकसाया दारी बांधला पशूतया आयुष्याचा विचार कर महात्मा कबीर म्हणतात की ईश्वराशी नाते जोड. जो सर्वत्र भरून उरला आहे. तो वार्‍याच्या रूपाने तुझ्याशी संवाद साधतो. पाण्याच्या रूपाने तुझे तन मन शितल करतो. प्रकाशाच्या रुपाने तुझं अंतरंग उजळून टाकतो. मात्र तू तर वरवरच्या बाह्य प्रतिक रुपालाच भुलतो आहेस. तू स्वार्थाने अंध होऊन ईश्वराचं सर्वव्यापी रूपंच विसरून गेला आहेस. अशा वरवरच्या ढोंगी भक्तीने तुला ईश्वराचं सत्य स्वरूप कसं काय कळणार आहे? शिवरूप तर सर्वत्र भरून आहे. निसर्गाच्या आविष्कारात ते सामावलेलं आहे. ते कळलंच नाही तर सुंदराचा कसा साक्षात्कार होईल बरे ! पळापळाने आयुष्य मृत्यूकडे धाव घेत आहे. मानवी जन्म जणू कसायाच्या दारी बांधलेल्या पशूसमान आहे. त्या पशूवर कसाई कोणत्या क्षणी सुरी चालवील काय माहित ? आयुष्याची क्षणभंगुरताही तशीच आहे. तुझ्याकडे उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून घे. तो सत्कारणी लाव. से प्रेम करो। अपने चित्तात भरलेला विकारांचा कचरा भिरकावून दे. शिवस्वरूप सत्याचा अंगिकार कर. जीवनातल्या सुंदरतेच्या जागा परमानंदाने भरून घे . एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कामात सातत्याने करत असलेले प्रयत्न आणि त्यात मिळालेले यश हे तुमच्या मनाला समाधान देणारे आहे.प्रयत्नातून मिळालेला आनंद हा तुमच्या जीवनात अधिक महत्वाचा आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनशांती*एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, "हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड.*ता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 22/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पाय दिन (२२/७ =पाय π)*💥 ठळक घडामोडी :-१९४२ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेत पेट्रोलचे रेशनिंग सुरू करावे लागले.१९४२ - ज्यूंचे शिरकाण - वॉर्सोतून ज्यूंना तडीपार करणे सुरू झाले.१९४३ - दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.💥 जन्म :-१९१८ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.१९२३ - मुकेश, पार्श्वगायक.१९३७ - वसंत रांजणे, भारताचा कसोटी क्रिकेट खेळाडू.*१९७० - देवेंद्र गंगाधर फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री*💥 मृत्यू :-१९१८ - ईंद्रलाल रॉय, भारतीय वैमानिक. २००३- उदय हुसेन,कुसे हुसेन ,सद्दाम हुसेनची मुले.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राष्ट्रपतीपद निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय, यूपीएच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव, राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मिळवला मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम निर्बंधमुक्त, यंदा राज्यात गणेशोत्सव धूमधडाक्यात, सरकारनं दहीहंडीवरील सर्व निर्बंध हटवले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गुजरात निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री केजरीवाल यांची मोठी घोषणा, 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी चौथ्या स्थानावर, बिल गेट्सना मागे टाकले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांचा राजीनामा, विश्वासदर्शक ठरावावेळी मित्र पक्षाची अनुपस्थिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *kolhapu जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील तेरवाड येथील निकिता सुशील कमलाकरने आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला वनडे सामना सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का, लोकेश राहुलला करोना*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - सरपंच*https://storymirror.com/read/story/marathi/baeglro2/srpnc/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा गुंजारव का करतात ?* 🐝मधमाशा अवतीभवती घोंघावयाला लागल्या की त्यांचा गूं गूं असा आवाज येत राहतो. इंग्रजीत यालाच 'बझिंग साऊंड' असं म्हणतात. जणू त्या तोंडानेच तसा आवाज करत राहतात, असं आपल्याला वाटतं. पक्षीही तोंडांनं आवाज करतात. प्रत्येक पक्ष्याचा आवाज वेगवेगळा असतो. त्या आवाजावरून पक्ष्याची ओळखही पटते; आणि तसा आवाज पक्षी का काढतात, याचीही माहिती आता मिळालेली आहे. एकमेकांशी दळणवळण साधण्यासाठी, संवादासाठी पक्षी आवाज काढतात. मधमाशाही तसाच एकमेकींशी संवाद साधण्यासाठी हा गुंजारव करत असतील, अशीच समजूत झाल्यास मग नवल नाही.प्रत्यक्षात मात्र मधमाशांचा हा आवाज त्यांच्या तोंडातून येत नाही. तो त्यांच्या पंखांचा फडफडाट असतो. त्या एकाच जागी स्थिर असताना, मोहोळात राहुन आपापलं काम करत असताना हा गुंजारव आपल्याला ऐकू येत नाही. त्या जेव्हा मोहोळातून बाहेर पडून उडायला लागतात तेव्हाच त्यांचा गुंजारव ऐकू येतो. त्यावरून हा त्यांच्या पंखांचा फडफडाट असावा, हे ध्यानात यायला हवं. उडणाऱ्या सर्वच कीटकांना आपले पंख फडफडावे लागतात. त्यामुळे तिथल्या हवेत कंपनं सुरू होतात. हवेच्या कंपन्यांमुळेच ध्वनी निर्माण होत असल्याने पंखांच्या या फडफडाटाचं रुपांतर आवाजात होत असतं. मात्र, तो आवाज आपल्याला ऐकू येणं हे त्या कंपनांच्या वेगावर आणि त्यात असलेल्या ऊर्जेवर अवलंबून असतं. निरनिराळ्या कीटकांच्या पंखांच्या फडफडण्याचा वेग मात्र वेगवेगळा असतो. फुलपाखरंही उडताना आपले पंख फडफडवत असतात. मात्र त्यांचा वेग मंद असतो. एका सेकंदाला फार फार तर सहा ते दहा वेळा त्यांचे पंख फडफडतात. त्यामुळे होणाऱ्या हवेच्या कंपनापोटी आपल्याला ऐकू येईल एवढा आवाज निर्माण होत नाही. डासांच्या पंखांचं फडफडणं मात्र वेगात होतं; पण ते अतिशय लहान असल्यामुळे त्यापोटी निर्माण होणाऱ्या हवेच्या कंपनांचा आवाज जर ते डास आपल्या कानाच्या अगदी जवळ असतील तरच ऐकू येतो. मधमाश्यांचे पंख त्या मानाने मोठे असतात आणि त्यांच्या फडफडण्याचा वेगही जास्त असतो. एका सेकंदात ३०० ते ४०० वेळा हे पंख फडफडतात. साहजिकच त्यापोटी हवेत उठणारी कंपनंही जोमदार असतात. त्यांचाच आवाज गुंजारवाच्या स्वरूपात आपल्या कानी पडतो.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'का ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••“आयुष्य सहज सोप जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कोणत्या पक्ष्याचे घरटे कमळावर असते ?२) संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव कोण आहेत ?३) जगातील एकमेव गाव कोणते जिथे कधीच पाऊस पडत नाही ?४) प्लास्टिकची निर्मिती कशापासून केली जाते ?५) २०२०-२१ चा राज्य सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*उत्तरे :-* १) कमळपक्षी ( जकाना ) २) अँटोनियो गुटेरेस ३) पासीघाट, अरुणाचल प्रदेश ४) नेपथा / पेट्रोलियम पदार्थ ५) पं. हरिप्रसाद चौरसिया, प्रख्यात बासरीवादक*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● मा. श्री सुमंत भांगे, ● प्रल्हाद तुमेदवार● दामोदर साळुंखे● संजय कदम, पत्रकार, दै. देशोन्नती● अनुराधा हवेलीकर● धनराज वाघ● विश्वनाथ चित्रलवार● संतोषकुमार दुरगुडे● पद्माकर मुळे● अमोल गायकवाड● अल्ताफ शेख● श्रीनिवास वाघमारे● संतोष जाधव● महेश व्ही. जाधव बिजापूर● प्रल्हाद तुमेदवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*या जगात संपूर्ण निष्पाप कोण? तर एकही नाही. या पृथ्वीवर कोणीही नाही. उलट, पापालाच सुखाचे साधन मानणारे सर्वत्र आहेत. सर्व प्रार्थना मंदिरात रोज तथाकथित पुण्यचिंतनात वेळ घालवणारे किंवा भक्तीचे भस्म अंगाला फासणारे यापैकी कुणीही पूर्ण शुद्ध नाही. म्हणूनच की काय गीतापुरूष कृष्ण म्हणतात..... ब-या-वाईटासह अर्थात शिव-अशिवासह जो असतो तो पुर्ण पुरूष. प्रत्येकामध्ये काही ना काही दोष आहेतच, संपूर्ण निर्दोष असा माणूस सापडणे शक्य नाही. या दोषांनाच आपण पाप समजतो. बहुजनांच्या हितासाठी प्रसंगी खोटं बोलावं लागत असेल तर ते पाप नाही, असं सांगितलं जातं.**राष्ट्रभक्त सैनिकालाही शत्रूच्या तावडीत असताना सतत खोटं बोलून खरी माहिती लपवायची असते. त्यासाठी तो वाट्टेल ते हाल भोगायला सिद्ध असतो. पांडव ज्येष्ठ बंधू धर्मराजाला 'नरो वा कुंजरो वा' असे मोघम उत्तर हेतुपूर्वक द्यावे लागले. युद्धात आणि प्रेमात सारं काही माफ असतं म्हणतात. असो, आपला मुद्दा आहे जगी सर्व निर्दोष असा कोण आहे? कुणीही नाही. काही अतिजागृत देवस्थाने संपत्तीने तुडुंब भरत आहेत. दानातील नोटा आणि सुवर्ण मोजायला यंत्रे लावावी लागत आहेत. कुठून आला हा पैसा, देवळाबाहेर भुकेलं तान्हं घेऊन माय पेलाभर दूधासाठी लोकांच्या पायापोटी पडत आहे. तिला बाजूला हाकलून दगडाच्या देवाचे शुद्ध दूधाने अभिषेकांवर अभिषेक होत आहेत. माझ्या मते हेच महापाप आहे..* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••💥💥💥💥💥💥💥💥💥संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••हिन्दू कहें मोहि राम पियारा,तुर्क कहें रहमाना, आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोउ जाना।सारांश महात्मा कबीर चराचरात ईश्वर पाहतात. सर्वांठायी परमात्म्याचा अधिवास असतो. मानवाठायी असणारं चैतन्य म्हणजेच परमात्म्याचं रूप नाही का ? आमच्या उपासनेच्या पद्धती भिन्न आहेत. कोणत्याही धर्म पंथाचा माणूस असो त्याचा जन्म आणि मृत्यू भिन्न असतो का ? माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्यावर त्या त्या धर्म पंथाचे संस्कार बिंबवले जातात. खरे तर माणूस जन्माला येतो माणूस म्हणूनच परंतु त्याच्यावर जाती, धर्माचे, पंथाचे जे संस्कार केले जातात ती सर्व कृत्रिमता आहे. ती कुठल्या तरी भितीपोटी, समुहाच्या वेगळेपणासाठी निर्माण केलेली ही वरवरची व्यवस्था आहे. तिला कुठलाही शाश्वत आधार नाही आहे. शाश्वत व अंतिम सत्य माणूस हा माणूस व मानवता हाच त्याचा धर्म आहे. सर्वांच्या निर्मिती पासून विसर्जनापर्यंत त्याचा माती हाच आधार आहे. हे शाश्वत सत्य सर्वांना कळतंय पण वळत नाही. अशी वास्तविकता आहे. जे स्वतःला हिंदू म्हणवून घेतात त्यांना राम प्रिय आहे. जे स्वतःस मुसलमान मानतात त्यांना रहिम प्यारा आहे. राम आणि रहिम हे दोन्ही मानव कल्याणासाठी झिजले. त्यांच्या कृर्तृत्वातून आदर्श जीवनाचा बोध मिळतो. त्यांनी माणसामाणसात भेदभाव केल्याचे इतिहास सांगत नाही. तरी त्यांच्या नावावरून दंगली घडणे मानवतेला अशोभनीय आहे. त्यांची नावं घेवून लढाया करणार्‍यांना विशाल अशा मानवता धर्माचं खरं स्वरूप व मानव कल्याणाचं मर्मच कळलेलं नाही.एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक महत्वाची आहे.कारण धनाच्या श्रीमंतीने त्याच्यामध्ये जगातल्या उपभोग्य वस्तू खरेदी करुन तात्पुरता आनंद मिळवता येतो आणि तोही स्वत:साठी.दुसरे असे की,माणसे जोडण्याऐवजी तोडण्यातच तो यशस्वी होतो.एखादी कुणीजरी व्यक्ती आली तरी त्यांच्या मनात फक्त पैसे मागण्यासाठीच आला आहे अशी शंका निर्माण होते.त्यामुळे नातेसंबंध जोडण्याऐवजी तोडण्याचीच भूमिका त्यांच्या अंगी असते.अशा श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती ही सदैव इतरांच्या मनावर राज्य करत जीवन व्यवहार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण काम करते.एकमेकांची मने ओळखण्याचे काम, सुखदुःख जाणणे, संकटकाळी धाऊन जाणे,आपले मन कुठेतरी मोकळे करणे, नातेसंबंध दृढ करणे ह्या सा-या गोष्टी मनाच्या श्रीमंती असणा-यामध्ये सदैव वास करत असतात.अशी माणसे सदैव नवीन काहीतरी शोधत असतात की जे आपले आणि इतरांचे नाते दृढ करतात.अशा माणसांमध्ये स्वार्थ,मतभेद,दुरावा,गर्व,अशा प्रवृत्ती कधीही वास करत नाहीत.म्हणून मनाची श्रीमंती ही सर्वमान्य असून एक सशक्त समाज घडविण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *चतुर बिरबल*बिरबलच्या चातुर्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती. तेव्हा त्याला पाहण्यासाठी दरबारात एक पंडित आला होता. बादशहाच्या परवानगीने त्याने दोन प्रश्न बिरबलाला विचारलेपंडित : खरा ज्ञानी कोण व अज्ञानी कोण? बिरबल : ज्याच्याशी केलेली चर्चा फलदायी ठरते, तो ज्ञानी आणि निरर्थक ठरते तो अज्ञानी असतो.पंडित : सर्वांत उत्तम ऋतू आणि सर्वात वाईट ऋतू कोणती?बिरबल : पोटभर खायला, अंगभर ल्यायला आणि आपली जवळची माणसे प्रेम करायला असतील, तर सर्वच ऋतू उत्तम असतात. परंतु खायला अन्न नाही, ल्यायला वस्त्र नाही आणि कोणी प्रेम करणारेही नाही, अशी ज्याची स्थिती असेल, त्याला सर्वच ऋतू वाईट असतात.बिरबलाने दिलेली अशी उत्तरे ऐकताच तो पंडित बादशहाला म्हणाला, ''खाविंद, मला वाटले होते, त्यापेक्षा कितीतरी पटींनी बिरबलजी अधिक चतुर आहेत.''*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 21/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.★ १८३१ - लिओपोल्ड पहिला (चित्रात) स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.★ १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.★ १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.💥 जन्म :-★ १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.★ १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.★ १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.💥 मृत्यू :-★ १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.★ २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू, दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * महाराष्ट्रातील राजकीय पेच ; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार, 27 जुलैपर्यंत प्रतित्रापत्र आणि दस्तावेज दाखल करण्याचे निर्देश..*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला! PM मोदींचे लस उत्पादकांना पत्र, भारताचा 200 कोटी कोरोना लसींचा विक्रम, बिल गेट्स यांच्याकडून अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, 134 मतांनी विजयी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; मुंबई, चेन्नईसह 6 संघामध्ये रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान मोदींकडून विजयी मंत्, बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भिजवणारा पाऊस*https://storymirror.com/read/story/marathi/y4627myp/bhijvnnaaraa-paauus/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फ्ल्यू म्हणजे काय ?* 📙कोणी शिंकले, खोकले, ताप आला की 'फ्ल्यू' झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा हा भयंकर रोग. एन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. १९१८ मध्ये या रोगाने २ कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडले. विषाणूच्या संरचनेत सदोदित होणाऱ्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाचा भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसऱ्याला होतो.एन्फ्लूएन्झाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे, हे उपाय करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएन्झा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Confidence is a key to success.* *( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतः ची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले व एकमेव राज्य कोणते ?२) सिंगापूर ओपन महिला बॅडमिंटन स्पर्धा २०२२ चे जेतेपद कोणी पटकावले ?३) भारतातील पहिले कार्बन - न्यूट्रल विमानतळ म्हणून कोणते विमानतळ बांधले जात आहे ?४) नवी मुंबई विमानतळाचे कोणत्या नावाचे नामकरण करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?५) दोनदा उपराष्ट्रपतिपदावर राहिलेले उपराष्ट्रपती किती व कोणते ?*उत्तरे :-* १) केरळ २) पी. व्ही. सिंधू , भारत ३) लेह विमानतळ ४) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ ५) दोन - सर्वपल्ली राधाकृष्णन ( १९५२ - ६२ ) , मो. हमीद अन्सारी ( २००७ - १७ ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संजीव गंजगुडे, अध्यक्ष, मराशिप बिलोली● श्रीकांत कांता विनायकराव● शशी खंडाळकर,रत्नागिरी● कवयित्री सोनाली चंदनशिवे● शिवराज मोरडे● विजय वाटोरे, हिमायतनगर● रविकांत कुलकर्णी, देगलूर● वृषाली शिंदे,मुंबई● चिंतामणी जाधव,मुंबई*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*उद्योगी पुरूषालाच लक्ष्मी पसंत करते. दुबळी माणसे दैवात नाही असे म्हणत राहतात. नशीबात नव्हते असे रडगाणे गात राहतात. दैवावर, नशीबावर मात करून आपल्या स्वकर्तृत्वाने सामर्थ्य गाजविणे त्यांना कधीच जमत नाही. प्रयत्न करूनही जर काहीही यश मिळाले नाही तर दोष कुणाचा ? अशावेळी तो तुझा दोष नाही असे संस्कृत सुभाषितकार सांगतात. बरेच लोक अपयशाचे खापर दुस-यावर फोडतात. स्वत:च्या चुकांकडे पहात नाही. प्रत्येकाने रोज आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक दिवशी आपले वर्तन कसे झाले याचा विचार करावा. आज मी पशूसारखा तर वागलो नाही ना? आज माझे वर्तन सज्जन माणसासारखे झाले आहे ना? हे तपासून पहावे.**प्रत्येकाचे हातून कळत-नकळत चुका होत असतात. पण तारुण्याच्या उन्मादात, सत्तेच्या-पैशाच्या कैफात माणसाला त्याची जाणीव होत नाही. तसेच माणसाला आपल्यातील अवगुणांचीही जाणीव होत नाही. "कासया वर्णू इतरांचे दोष, माझे ठायी काय वाण असे?"असे संत तुकारामांनीही म्हटले आहे. वाईट माणसांच्या संगतीमुळे चांगली माणसे बिघडल्याची अनेक उदाहरणे आपणांस सांगता येतील. वाईट संगतीमुळे काही व्यसनाधीन होतात तर कधी कधी नैराश्याने आपले जीवनच संपवितात. धोक्याच्या वळणावर जागं करणारे फार क्वचितच भेटतात. 'जीवन कसं जगावं' याचं मार्गदर्शन करणारे 'दिपस्तंभ'सारखे असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय |चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्‍या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदतीचा हात*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्‍या - जाणार्‍या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्‍या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्‍या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 20/07/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन* 💥 ठळक घडामोडी :-२०००-अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर.१९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली. १९६९-अपोलो -११या अंतराळयानातून गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव बनला.१९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.१९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.१९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.💥 जन्म :-१९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.१९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.१९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.१९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-१९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.१९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अव्वल स्थानी आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीची कारवाई*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडाऱ्यात पूरस्थिती कायम, जनतेचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचं आव्हान, उपमुख्यमंत्री चंद्रपूर, वर्ध्याला भेट देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अग्निपथ योजनेवरील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, योजना रद्द करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशीच्या उंबरठ्यावर, महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दीर्घकालीन आजारामुळे मुंबईतल्या रुग्णालयात सुरु होते उपचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने ५४ व्या आशियाई स्पर्धेत आपल्या पदकांचा धडाका कायम राखला. आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या डॉक्टर मंजिरी भावसारला कांस्यपदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - साहस*https://storymirror.com/read/story/marathi/0gnisi1w/saahs/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⏰ *एक सेकंद म्हणजे किती काळ ?* ⏰काळ मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक दोन निरनिराळ्या घटनांमध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागतं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उगम झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही.तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन अवधीतल्या काळाची मात्रा किती हे समजणं आवश्यक होतं. त्यासाठी मग वरचेवर होणाऱ्या एका आवर्तनातून जाणाऱ्या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सुत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली.नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करून त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककांची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रितीनं होणाऱ्या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत कितीतरी वेळा होणारी आवर्तनं आहेत काय, याचा शोध सुरू झाला. अणूंच्या अंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्याचं स्पष्ट झालं. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं की काही अणू आपल्या निरनिराळय़ा ऊर्जापातळींमध्ये सतत वर खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायरी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तनं अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्‍याचा हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पूरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पुर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••१) 'कॉमनवेल्थ गेम्स २०२२' कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?३) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२२ या वर्षासाठी NIRP क्रमवारीत सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था म्हणून कोणत्या शिक्षणसंस्थेने प्रथम क्रमांक पटकावला ?४) उस्मानाबादचे कोणते नामांतर करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?५) उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाची निवड करण्यात आली आहे ?*उत्तरे :-* १) इंग्लंड २) द्रौपदी मुर्मू ३) IIT मद्रास ४) धाराशिव ५) मार्गारेट अल्वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● साईनाथ माळगे● गंगाधर पालकृतवार● लक्ष्मण दावणकर● मोहन कुलकर्णी● दत्तात्रय तोटावाड● व्यंकट चिलवरवार● श्रीराम भंडारे● राहूल लोखंडे● दिनेश राठोड● सचिन पिसाळ● साईकुमार ईबीतवार● करुणा खंडेलोटे● ज्ञानेश्वर कोकरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.**रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.**महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.**"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●•• ⚜⚜⚜⚜⚜संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुखपीव ब्रह्म लौ ध़ायेआतम अनुभव सेज सुख,तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुखजलद ब्रम्हानंद दायीआत्मानुभव प्राप्तीचीसर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.📲 9421839590•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एकदा राजाने सेवकाला अचानक तीन प्रश्न विचारले.**१) ईश्वर कुठे राहतो ?**२) ईश्वर कसा मिळेल ?* *आणि**३) ईश्वर काय करतो ?* *अचानक हे प्रश्न ऐकून सेवक गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.* *सेवक घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, सेवक म्हणाला ''मुला आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.* *सेवकाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन सेवक दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. सेवकाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.* *सेवक म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"* *मुलाने विनंती केली की, महाराज, एक पेला दूध - साखर घालून आणा. दुध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.* *परंतु महाराज यात साखर दिसते का ? महाराज म्हणाले नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज!* *तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरातअसून तो दिसत नाही.* *महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला* *''महाराज थोडे दही मागवाल का?''महाराजांनी दही मागवले. मग पुत्र म्हणाला ''महाराज! यात लोणी दिसतो का? "महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल" पुत्र म्हणाला "महाराज देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन- साधना-तपश्चर्या करावीच लागेल,* *मंथुनी नवनीता।* *तैसे घे अनंता।।* *"महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो?"* *पुत्र म्हणाला महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य'' पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो" महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. आणि तो पुत्र स्वतः सिंहासनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे" महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही".* *बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो, त्याने ठरविले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो.* *तुका म्हणे नोहे* *काय त्या करिता!**चिंतावा तो आता विश्वांभर!* *"दुखी"रहना है तो, सब मे कमी खोजो,* *और**"प्रसन्न" रहना है, तो सब मे "गुण" खोजो.!* *...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा* *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा !* *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,**पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 19/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहीद दिन - म्यानमार*💥 ठळक घडामोडी :-१९९९-'मैत्रेयी एक्सप्रेस' या कोलकाता ते ढाका बससेवेचेतत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी उदघाटन केले.१९६६-'शिवसेना'या राजकीय पक्षाची स्थापना झाली.१९८५ - ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.१९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.💥 जन्म :-१८९६ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.१९३४ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.१९३८ - डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.१९४७-सलमान रश्दी ,ब्रिटिश लेखक💥 मृत्यू :-१९४७ - ऑँग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.१९६५ - सिंगमन र्‍ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.१९८० - निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *'संसद संवादाचं सक्षम माध्यम, जिथं खुल्या मनानं उत्तम चर्चा आवश्यक'; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रपती निवडणुकीसाठी संसदेत 99.18 टक्के मतदान, राज्यातील 283 आमदारांनी बजावला अधिकार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा भाग 2 भरण्यासाठी 22 जुलै पासून सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *जायकवाडी धरणातून कुठल्याही क्षणी पाण्याचा विसर्ग ; गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन ; 5 कोटी 12 लाखाचे दान जमा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गोदामाई हिरवाईने नटणार, नाशिक मनपा करणार एक लाख वृक्षारोपण, अभिनेते सयाजी शिंदेही होणार सहभागी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार असणाऱ्या बेन स्टोक्सने घेतला अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - जादूची पिशवी*https://storymirror.com/read/story/marathi/epuemarh/jaaduucii-pishvii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *वादळाचं बारसं कोण करतं ?* 📙२००९ हे वर्ष सरता सरता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला उद्ध्वस्त करणारं वादळ आठवतं ? त्यानं केलेल्या विध्वंसाच्या खुणा आजही तिथं जागोजागी दिसतात. त्या वादळाचं 'फयान' हे नाव तर तिथल्या नागरिकांच्या मनावर कायमचं कोरलेलं आहे. तीच गत अमेरिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील न्यू आॅर्लियान्स या शहराची. 'कत्रिना' हे नाव उच्चारलं तरी मंडळी चळाचळा कापायला लागतात. कारण २००५ साली त्या तुफानानं त्या शहराची केविलवाणी अवस्था करून सोडली होती.वादळ, तुफान, झंझावात, चक्रावर्त अशा अनेक नावांनी ही वादळं ओळखली जातात. इंग्रजीतही सायक्लॉन, टायफून, हरिकेन, स्टाॅर्म अशी नावं आहेत. तरीही त्यांना 'फयान' किंवा 'कत्रिना' याच्यासारखी विलक्षण नावं देतं कोण ? असा प्रश्न मनात येतोच. भूकंप हाही एक नैसर्गिक प्रकोपच आहे; पण भूकंपांना कधी अशी नावे दिलेली आढळत नाहीत. तर मग वादळांचंच असं बारसं कोण करतं ?जसजशी हवामान अंदाजाची यंत्रणा अधिक कार्यक्षम होत गेली, तसतशी वादळांची पूर्वसूचना मिळणे अधिक शक्य होत गेलं. त्यात हंगामामध्ये एकाहून अधिक वादळं एकाच प्रदेशात एकापाठोपाठ येऊन थडकत असतात. अशा वेळी त्यांची वेगवेगळी ओळख पटवण्याची गरज भासू लागली. त्यातूनच मग त्यांचं नामकरण करण्याची प्रथा अस्तित्वात आली.त्याची जबाबदारी मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटिआॅराॅलॉजिकल ऑर्गनायझेशन' या संस्थेने उचललेली आहे. त्या संस्थेने जगातील तीन वेगवेगळ्या वादळप्रवण क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. उत्तर हिंदी महासागर, उत्तर अटलांटिक महासागर आणि ईशान्य पॅसिफिक महासागर अशी ही ढोबळ विभागणी आहे. उत्तर हिंदी महासागरात उठणाऱ्या वादळांचं बारसं करण्याची जबाबदारी आठ देशांनी उचलेली आहे. यात भारत, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, थायलंड आणि ओमान हे देश येतात. त्यांनी सर्वांनी मिळून प्रत्येक देशाने आठ अशी चौसष्ट नावांची यादी बनवलेली आहे. त्यातून अनुक्रमाने भारतीय हवामान खाते या वादळाचे नामकरण करतं. 'फयान' हे नाव म्यानमारने सुचवलेलं होतं. यानंतर येणाऱ्या वादळाला ओमानने सुचवलेले 'वार्द' त्यानंतरच्या वादळाला पाकिस्ताननं सुचवलेलं 'लैला' अशी नावं यादीवर आहेत. यापूर्वीच्या वादळांना दिलेली नर्गिस (पाकिस्तान), रश्मी (श्रीलंका), कायमुख (थायलंड), बिजली (भारत), निशा (बांगलादेश) व ऐला (मालदीव) ही नावे होती. कोणाही व्यक्तीवरून ही नावे दिली जात नाहीत. एकदा एक नाव वापरल्यावर त्याचा परत वापर केला जात नाही. ही यादी संपायच्या आधी पुढची यादी तयार केली जाईल. इतर क्षेत्रांसाठी काही तपशील वगळता अशाच प्रकारची पद्धत वापर अवलंबली जाते. उदाहरणार्थ उत्तर अटलांटिक प्रदेशासाठी तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. अनुक्रमाने त्यांच्यामधील नावं वापरली जातात. तिथे एकाआड एक पुरुषी नाव तर एका आड एक बायकी नाव दिले जाते. पॅसिफिक महासागरातल्या वादळांना नावं देण्यासाठीही संबंधित राष्ट्रांनी अशाच प्रकारची यादी तयार केलेली आहे. तेव्हा वादळांचं बारसं मुख्यत्वे 'वर्ल्ड मीटियोरोलॉजिकल ऑर्गनायझेशन' संबंधित देशांच्या हवामान खात्यांच्या सहकार्यानं करत असते.*बाळ फोंडके यांच्या 'कोण ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••संकटांना भिऊ नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सनदी लेखापाल ( सीए ) च्या परीक्षेत देशात पहिला आल्याचा मान कोणी प्राप्त केला ?२) एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून कोणाची निवड झाली आहे ?३) 'जागतिक सर्प दिन' कधी साजरा केला जातो ?४) थोर समाजसेवक बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मस्थान कोणते ?५) औरंगाबादचे कोणते नामांतर करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?*उत्तरे :-* १) मीत शहा, मुंबई २) जगदीप धनखड ३) १६ जुलै ४) पोंभुर्ले, रत्नागिरी ५) छत्रपती संभाजीनगर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● रविकिरण बलूले● मनोज बडे● अमोल पाटील सावंत● अनिकेत पडघन● गजानन शिराळे● श्रीनिवास मुरके*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत संघर्ष आहे. हा संघर्ष आतल्या श्वासांबरोबर सुरू होतो आणि श्वासांबरोबरच संपतो. मी खूप दगदग केली आहे. तेलाच्या घाण्याला बैलाला जुंपावे तसे आयुष्याला जुंपलो आहे. आता थोडे आरामाचे क्षण आले आहेत. थोडा विश्राम करतो असे जर कुणी म्हणाले, तर हा विचार आयुष्याला पूर्णविरामाकडे नेतो. माणूस उद्यमशिल राहिला नाही तर त्याचे अस्तित्व संपते. बुद्धिने श्रमाचा ठेका धरला तर आयुष्याचे सप्तसुरात न्हाणे होईल.**कु-हाडीने लाकडे फोडणारा प्रचंड शारीरीक श्रम करीत असतो. रस्त्याकडेला झाडाखाली बसलेला चर्मकार दिवसभर अखंड कामात असतो. या कामाला बुद्धीची जोड मिळाली, तर श्रम कमी होतील, उत्पन्न वाढेल आणि कामात आनंद निर्माण करता येईल. त्यामुळे उद्योगशिल राहणे जितके गरजेचे असते तितकेच त्या उद्योगशिलतेला बुद्धिने दिशादर्शन करणेही आवश्यक असते. प्रतिकूलतेचे आव्हान स्विकारून ते अनुकूल करणारे श्रमर्षि थेट ब्रम्हांडनायक भास्करांनी नाते सांगतात. प्रतिभेला परिश्रमाची साथ मिळाली तर वाळवंटातही नंदनवन फुलत असेल, तर ही साथ घेऊन नंदनवनी असणारे आपण बहरून यायलाच हवे ना !* *॥ रामकृष्णहरी ॥*🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• परबत परबत मै फिरया, नैन गवाए रोई |सो बूटी पौ नहीं , जताई जीवनी होई || अर्थ माणूस बर्‍याचशा ऐकीव आणि भ्रामक बाबींच्या मागे लागून जीवनातला अनमोल वेळ वाया घालवत असतो. अमृत प्राशन करणे, अमर होणे, संजीवनी व बर्‍याच अशा काही बाबी वारंवार चर्चेत येतात. या सर्व बाबींचा भौतिक विचार करून माणूस दमछाक करून घेतो. सर्व काही आपल्याच ठायी असणार्‍या कर्तृत्त्व , चिंतन , शांती व समाधानातून प्राप्त होणार्‍या या लौकिक बाबी ! मात्र माणूस वरवरचा विचार करून स्वतःची दमछाक करून घेतो. 'तुझं आहे तुजपाशी पण जागा विसरलाशी.' अशीच ही गत म्हणावी लागेल. कस्तुरी मृग कस्तुरीच्या सुगंधानं ऊर फुटेतो धाव धाव धावतो. कस्तुरी स्वतःजवळ असूनही त्याचा अंत मात्र तिच्याच शोधात होतो. तसंच माणसाचं झालंय. थोडसं पूर्वजांकडं डोकावून पाहिलं तर सर्वच जण अमरत्व गाठू शकले नाहीत. ज्यांनी ध्येयासाठी झपाटून आपल्या कर्तृत्तवाचा ठसा उमटवला. खरं तर त्यांनाच अमृताचा खर्‍या अर्थानं कुंभ सापडलेला ! त्यांनी तो कर्माच्या रूपानं प्राशन केला. आज हजारो शेकडो वर्षे लोटली. ते देहाने नसले तरी कार्य रूपानं अमर आहेत. त्यांच्या हयातीत कधी त्यांनी भ्रामक अमृताचा शोध घेतला नाही. त्यांनी कधी वेगळ्या स्वर्गाचा विचार केल्याचे ऐकिवात नाही. आपल्या कार्य क्षेत्रातंच मनोभावे स्वर्ग निर्माण केला. 'नर करणी करे सो नारायण होय ।' याची प्रचिती दिली. ज्यांनी लौकिकता व नैसर्गिकपण नाकारलं. ते सर्व अवहेलनेचे धनी ठरले आहेत. प्रतिकांचा उथळ अर्थ घेवून धावपळ करून चालत नाही. चिंतन व मननातून शाश्वत सत्ये बाहेर पडतात. ती शोधली की माणूस अजरामर होतो. हे त्या मागचं रहस्य सांगताना महात्मा कबीर म्हणतात, पर्वता पर्वतावर फिरून थकलो , दमलो, प्रसंगी रडलोही परंतु सहज अमर करणारी संजीवनी काही प्राप्त झालीच नाही. कर्म गुटिकाच माणसाला अमर करते. हे जीवनातून फलित निघालं. कर्मभूमीत हृदय आणि हृदयात कर्मभूमीला आसरा दिला की जीवनच नंदनवन होवून जातं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• चांगल्या विचाराने आणि चांगल्या संगतीने खरा माणूस घडतो. आपल्या जीवनात नेहमी चांगला विचार करत राहिल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळते आणि मनस्वी आनंद मिळतो.तो आनंद इतरांचे वाईट व्हावे आणि माझेच भले व्हावे असे विचार सतत आपल्या मनात असतील तर आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखे होईल.त्यात आपली प्रगती होण्यापेक्षा अधोगतीच होईल. तसेच चांगल्यांच्या सहवासात राहिले तर आपल्या मनातील वाईट विचारांना कधीच संधी मिळणार नाही.चांगली माणसे स्वत:साठी आणि इतरांसाठी नेहमी चांगलाच विचार करत असतात.सुसंगती सदा जोडावी ती म्हणजे चांगल्या सज्जनांची आणि पुस्तकांची तसेच ग्रंथांची.यांच्या सानिध्यात राहिल्यावर देखील आपले जीवन सुखी व समृद्ध बनेल.त्यामुळे आपण इतरांसमोर एक आदर्श म्हणून उभे राहू.© व्यंकटेश काटकर, नांदेड.📱९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.📚🌱📚🌱📚🌱📚🌱📚 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *खोड मोडली*सखाराम नावाचा एक ‍मीठाचा व्यापारी होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. ते फार आळशी होते. रोज सकाळी सखाराम गाढवाच्या पाठीवर मीठाच्या पिशव्या लादत असे. मग तो गाढवाला घेऊन शेजारच्या गावात मीठ विकायला जात असे. जाताना एक ओढा लागत असे. एके दिवशी ओढा ओलांडत असताना गाढवाचा पाय अचानक घसरला व ते पाण्यात पडले. त्यामुळे त्याच्या पाठीवरचे मीठाचे पोते पाण्यात भिजले.त्यातील मीठ विरघळल्याने ते हलके झाले. त्यामुळे गाढवाचे ओझे कमी झाले. त्याला चांगलाच आराम मिळाला. दुसर्‍या दिवशी गाढवाने मुद्दाम पाण्यात पडल्याचे नाटक केले. मीठ पुन्हा पाण्यात भिजल्याने त्यादिवशीही गाढवाला आराम मिळाला. मग तो सारखेच असे करू लागला. पण लवकरच सखारामला ही युक्ती लक्षात आली. त्याची खोड मोडण्यासाठी मग त्याने एके दिवशी त्याच्या पाठीवर कापसाचे ओझे ठेवले.ओढा लागताच गाढवाने पुन्हा पडल्याचे नाटक केले. मात्र, या वेळी पाटीवर मीठाऐवजी कापूस असल्याने तो भिजल्यावर चांगलाच जड झाला. त्यामुळे गाढवाला लवकर उठता येईना. त्याला त्या दिवशी अधिकच ओझे वाहावे लागले. त्याला चांगलीच अद्दल घडली. तेव्हापासून गाढवाने कधीच पाण्यात पडल्याचे नाटक केले नाही व कामचुकारपणा केला नाही.*तात्‍पर्य: कामातून पळवाट शोधणे केव्हाही वाईट.आळस,कामचुकारपणा केल्यास स्वतःचेच नुकसान होते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 16/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक सर्प दिन* 💥 ठळक घडामोडी :-१९९८- गुजरातमध्ये शाळा प्रवेश करताना पाल्याच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा अधिकार असल्याचे शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत माहिती दिली.१९९२-भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकरदयाल शर्मा यांनी निवड ,झाली.१९६९-चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या'अपोलो-११'अंतराळायानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.💥 जन्म :-१९०९ - अरुणा असफ अली,स्वातंत्रसेनानी१९६८ - लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.१९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड१९७३ - शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.१९८४ - कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-१८८२ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.१९१६ - इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.१९९३-उस्ताद निसार हुसेन खां-पदमभूषण*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *९२ नगरपरिषदांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोमवार १८ जुलैपासून होणारे विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. हुजूर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीतही ऋषी सुनक यांनी आघाडी घेतली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाने 14 आणि 15 जुलैला होणाऱ्या सर्व विभागांच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. या परीक्षा आता 18 आणि 19 जुलैला घेण्याचा मुंबई विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF)द्वारे महाविद्यालयांचे मानांकन घोषीत करण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजने प्रथम स्थान पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सिंगापुर ओपन 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूने एन्ट्री मिळवली असून प्रणॉय आणि नेहवाल यांना मात्र क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - एक मत* https://storymirror.com/read/story/marathi/kpeg22xr/ek-mt/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌊 *भरती केव्हा येते ?* 🌊खरं तर प्रत्येक क्षणी जगात कुठे ना कुठे भरती येतच असते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे कुठेतरी ओहोटीचा खेळ चालू असतो. त्यामुळे प्रश्न विचारायचाच झाला तर कोणत्याही एका विवक्षित ठिकाणी भरती केव्हा येते असा विचारायला हवा. म्हणजे मुंबईला किंवा रत्नागिरीला किंवा चेन्नईला भरती केव्हा येते असा.पण त्याआधी हे भरती ओहोटीचं चक्र का चालू असतं याचा विचार करायला हवा. जर आपल्याला चंद्र हा उपग्रह नसता तर भरती ओहोटी आली नसती. निदान आज जसा जाणवण्याइतका समुद्राच्या पातळीत जो चढउतार होतो तो झाला नसता. चंद्र पृथ्वीच्या मानानं आकारमानाने लहान आहे. पण तो सूर्यापेक्षा कितीतरी जवळ आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल असतं. ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असतं. म्हणजेच जेवढं वस्तुमान जास्त तेवढं हे बलही जास्त. आणि जवळ अंतर कमी तेवढंही आकर्षण जास्त.पृथ्वीचं आकर्षण चंद्राला जाणवतं. आणि म्हणून तो पृथ्वीभोवती एका ठराविक कक्षेत प्रदक्षिणा घालत राहतो. तसंच चंद्राच्या आकर्षणाचाही प्रभाव पृथ्वीवर पडतो. पण चंद्राचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे पृथ्वीची भूमी तेवढी चंद्राकडे खेचली जात नाही. पृथ्वीवरचं पाणी मात्र द्रवरूप असल्यामुळे चंद्राच्या दिशेने खेचले जाते. साहजिकच त्या बाजूला समुद्राची पातळी वाढते. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच १८० अंशावरच्या ठिकाणचे पाणी चंद्रापासून दूर असते. त्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचे बल कमी होते. तिथले पाणी चंद्राकडे तसं खेचलं जात नाही. पण जमीन थोडीशी का होईना खेचली जाते. त्यामुळे तिथल्या समुद्राचीही पातळी वाढते.या दोन्ही ठिकाणी समुद्राच्या पाण्याला आलेल्या फुगवट्यामुळे त्याच्या काटकोनात म्हणजेच त्यापासून ९० अंशांवर असणाऱ्या ठिकाणचे पाणी किनाऱ्याच्या दिशेने खेचले जाते. सहाजिकच तिथे समुद्राच्या पाण्याची पातळी घटते. ओहोटीचा अंमल सुरू होतो. अशा रीतीने कोणत्याही क्षणी जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी भरती तर दोन ठिकाणी ओहोटी येत असते.पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारत असते. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावरचे वेगवेगळे प्रदेश चंद्राकडे मोहरा फिरवुन राहत असतात. साहजिकच भरती, आणि अर्थातच ओहोटी, येण्याच्या ठिकाणात बदल होत जातो. पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी चोवीस तासात पूर्ण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी दिवसातून दोन वेळा भरती येते, तर दोन वेळा ओहोटी येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला १७५ वर्षे झाल्यानिमित्त केंद्र सरकार किती रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे ?२) वार्षिक लैंगिक समानता अहवाल २०२२ नुसार जगातील सर्वाधिक समतावादी देश कोणता ?३) नथ्थुराम गोडसे यांनी कोणत्या तारखेला महात्मा गांधीची हत्या केली ?४) राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो ?५) व्यंजन म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) १७५ रू. चे नाणे २) आईसलँड ३) ३० जानेवारी १९४८ ४) २६ नोव्हेंबर ५) ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्या वर्णांना व्यंजन म्हणतात. *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जयवंत हंगरगे, मुख्याध्यापक● मारोती गाडेकर● सुरेश भाग्यवंत*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.**भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर कलि खोटी भाई , मुनियर मिली न कोय | लालच लोभी मस्कारा , टिंकू आदर होई || अर्थ : हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना महात्मा कबीर ढोंगाला भुलणार्‍या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्‍या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात. भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त. भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग .१ कृत युग, २ त्रेता युग ,३ द्वापार युग, व ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते. हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे.या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार नसावा.*एकदा एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी दगडाचा शोध घेत होता.तो रस्त्याने जात असतांना त्याला मोठे दोन दगड दिसले ,आणि मुर्तीकाराने ठरविले की या दगडाच्या छान सुबक दोन मुर्त्या तयार कराव्या.दगडाचे निरीक्षण करून मुर्तीकाराने कशी मूर्ती तयार करावी याबाबत मनात आराखडा तयार केला.आणि दोन्ही दगडाला सांगितले की, मी तुमच्यापासून छान मूर्ती तयार करणार आहे तेव्हा तुम्ही मला साथ द्यावी.छन्नी हातोडा घेऊन मूर्तिकार दगडाला आकार देत असतांना पहिला दगड म्हणाला मला त्रास होतो, माझ्यावर घाव करू नका. तेव्हा मुर्तीकाराने दगडाला समजविले की, मी हळूहळू घाव देणार तू तुझ्यातील कडकपणा कमी कर. थोडा नरम हो म्हणजे मला घाव घालायला त्रास होणार नाही व तुला पण जास्त त्रास होणार नाही.पहिला दगड स्वतःतील अहंपणा सोडायला तयार नव्हता.मुर्तीकाराने दुसऱ्या दगडाला समजविले दुसरा दगडाने स्वतःमधील कठीणपणा कमी करून नरमपणा घेतला व काही दिवसातच अतिउत्तम , सुंदर अशी राधाकृष्णची मूर्ती मुर्तीकाराने तयार केली.मूर्तीची स्थापना झाली तेव्हा बाजूला पडलेला कडक मोठा दगड बघून त्याचा उपयोग लोकांनी नारळ फोडण्यासाठी केला.मुर्तीकाराचे ज्या दगडाने ऐकले त्या दगडाची मूर्तीत रूपांतर झाले व सर्व लोक भक्तिभावाने पूजा करायला लागले. कुंकूम तिलक लावून हारापर्ण करतात, छान वस्त्र परिधान करतात आणि ज्या दगडाने स्वतःचा अहंकार सोडला नाही , मुर्तीकाराचे ऐकले नाही त्या दगडाला जीवनभर नारळाचे घाव सहन करावे लागते.पूजा करणारे लोक अंगावर पाय देऊन राधाकृष्णच्या मूर्तीची पूजा करायला जातात. त्यावेळी अहंकारी दगडाला खूप दुःख झाले पण वेळ गेलेली होती.*तात्पर्यः अहंकारपणाने वागल्यास स्वतःचेच नुकसान होते म्हणून अहंकार अंगी नसावा.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 15/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९९७-पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगॅसेसे पुरस्कारासाठी निवड.१९५५-भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न'हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.💥 जन्म :-१९४९-माधव कोंडविलकर,दलित साहित्यिक.१९३२-नरहर कुरुंदकर,विद्वान,टीकाकार आणि लेखक.१९२७-प्रा.शिवाजीरावभोसले,विचारवंत,कुलगुरू(डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)१९०३-के.कामराज, स्वातंत्रसैनिक,खासदार व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री.१६११-मिर्झा राजे जयसिंग.💥 मृत्यू :-२००४-डॉ बानू कोयाजी, सामाजिक कार्यकर्त्या.१९९९-इंदूताई टिळक,सामाजिक कार्यकर्त्या.१९९९-जगदीश गोडबोले,पर्यावरणवादी लेखकव सामाजिक कार्यकर्ते.१९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. देशातील सध्याचे राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडं जड असून त्यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान 28 महिन्यात पूर्ण झालेल्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे करणार उद्घाटन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शाळा देखील बंद आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला मोठा निर्णय, इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 31 जुलै रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईच्या माय उडान ट्रस्टकडून मुंबई महापालिकेच्या शाळेत सुसज्ज कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन, पालिकेच्या भायखळा पश्चिमेच्या शाळेत झाली ही लॅब सुरू, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून कॉम्प्युटरचं प्रशिक्षण तसंच कोडिंगही शिकवण्यात येणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सामान्यांच्या खिशाला बसणार झळ, चुरमूरे, पापड, दही, लस्सी, ताक गूळ, खांडसरी साखर याच्यावर 5 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा सरकारने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ EMM Negative रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तींना रक्तदानही करता येत नाही किंवा इतरांचे रक्तही घेता येत नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित! निवडणूक आयोगाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आईचे घर*https://storymirror.com/read/story/marathi/zv24dxqu/aaiice-ghr/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू.आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू.हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्ञानी डोळ्याने जगतो, तर अज्ञानी कानाने जगतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ब्रह्मांडाचे आतापर्यंतचे ( जुलै २०२२ ) सर्वोत्तम रंगीत चित्र नासाच्या कोणत्या दुर्बिणीने टिपले आहे ?२) 'मिल्कमॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?३) 'द फर्स्ट कपल टू वॉक अराउंड इंडिया' हा २०२२ चा राष्ट्रीय विक्रम कोणी केला ?४) भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने केव्हा संमत केला ?५) स्वरादी म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २) डॉ. वर्गीज कुरियन, श्वेतक्रांतीचे जनक ३) बेनी कोट्टाराथील व मॉली बेनी, कोच्ची ४) १८ जुलै १९४७ ५) ज्या वर्णाच्या सुरुवातीस स्वर आहे त्यास स्वरादी म्हणतात. ( अं, अ: ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीकांत जोशी● राजेश्वर डोमशेर, मुख्याध्यापक● गंगाधर बिजेवार● बालाजी हिवराळे● शुभम बतुलवार● शंकर हांड्रे● संतोष ईबीतवार● आनंद गाजेवार● विष्णू शिंदे● नवाज शेख● वसंत सिरसाट● राजू कदम● उत्तम पाटील चोळाखेकर● विष्णुराज कदम● विजयकुमार पाटील घुळेकर● सचिन खंडगावे● पांडुरंग चंदवाड● प्रणित राखोंडे● वसंत बोनगिरे● सुनील बेंडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.*••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆संजय नलावडे, मुंबई9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं,खिन खारा खिन मीठकलहि अलहजा मारिया,आज मसाना ठीठ।सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्‍या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता*‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला.तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 12/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जागतिक बाल कामगार निषेध दिन *आषाढी एकादशी निमित्ताने सर्वाना हार्दीक शुभेच्छा*💥 ठळक घडामोडी :-१९८२-NABARD ची स्थापना१९९९- 'महाराष्ट्र भूषण 'हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार सुनील गावस्कर यांना प्रदान२००१-कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना 'टिळक पुरस्कार'जाहीर२००५ - आल्बर्ट दुसरा मोनॅकोच्या राजेपदी.💥 जन्म :-१८६४ - इतिहासाचार्य वि.का.राजवाडे, मराठी इतिहास संशोधक१८६४ - जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर, अमेरिकन शास्त्रज्ञ. (चित्रीत)१९२० - यशवंत विष्णू चंद्रचूड, भारताचे माजी सरन्यायाधीश.१९४७ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९६५ - संजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००० - इंदिरा संत , मराठी कवयित्री. २०१२-दारा सिंग ,मुष्टियोद्द्धा व अभिनेता२०१३-प्राण ,हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेच्या नव्या इमारतीवर भव्य 'अशोक स्तंभ', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरातप्रमाणे महाराष्ट्राशेजारील तेलंगणा राज्यातही पावसाचा धुमाकूळ सुरू आहे... पूरस्थितीमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसानं नद्या दुथडी भरून वाहतायत. पुरामुळे अनेक पूल रस्ते पाण्याखाली गेल्यानं इथे अनेक गावांचा संपर्क तुटलाय*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आमदार अपात्रता आणि अन्य याचिकांवरील सुनावणीबाबत अनिश्चितता, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी शिवसेनेचे वकील कोर्टात विनंती करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुढील 3-4 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, कोकणासह, सातारा पुणे, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड अलर्ट, राज्यातील धरणं भरण्यासही सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *अमरनाथमधील ढगफुटीनंतर सुरक्षा दलांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, आत्तापर्यंत १६ भाविकांचे मृतदेह हाती, ४१ जण अजूनही बेपत्ता*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची महत्वपूर्ण घोषणा, नागपुरात धावणार ब्रॉडगेज मेट्रो ! रेल्वे बोर्डाची मंजुरी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात नोवाक जोकोविच विजयी, ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला हरवलं, सलग चौथ्यांदा पटकावलं विम्बल्डनचं जेतेपद8*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गिनीज बुकात नोंद झालेली जगातील सर्वात वृद्ध हवाईसुंदरी ( एअरहोस्टेज ) कोण ?२) जगातील पहिला मोबाईल कॉल कोणी केला ?३) जपानची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी ज्या उपाययोजना केल्या त्यास काय नाव पडले ?४) मुळाक्षरे म्हणजे काय ?५) 'फोर्ट विल्यम' म्हणजेच आजचे कोणते शहर होय ?*उत्तरे :-* १) बेट नॅश ( ८६ वर्षे ) , अमेरिका २) मार्टिन कूपर , ३ एप्रिल १९७३ ३) आबेनॉमिक्स ४) अक्षरांचा समूह जो भाषेत वापरतात त्यांना मुळाक्षरे म्हणतात. ५) कोलकाता *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दिलीप इंगळे● हरिहर धुतमल● हितेश माधवी● साई गाडगे● प्रवीण दबडे पाटील● शिल्पा जोशी● नागेश पडकूटलावार● अविनाश पांडे● नमन यादव● सुनील देवकरे● अमरजुल हुसैन● दादाराव जाधव● नंदकुमार कौठकर● अभिजित राजपूत● माधव उमरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हेतल चा अनुभव*हेतल दुपारी शाळेतून घरी आली. घराला कुलूप होते. कारण तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. तिने कुलूप उघडले व घरात आली. खिडक्या उघडल्या. गणवेश बदलला. ती हात पाय धुऊन खाऊ शोधु लागली. अचानक जोरदार पाऊस पडू लागला. तिने पटापट दारे खिडक्या बंद केल्या. तिचे लक्ष घड्याळ कडे गेले. बराच उशीर झाला आहे, असे म्हणून ती जवळच्या खुर्चीत बसली. तिला हळूहळू पावसाचे गाणे आठवू लागले. ती हळूहळू गुणगुणू लागली. आता पावसाचा आवाज कमी झाला व तिने खिडक्या उघडल्या. तरीपण रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हळूहळू पाऊस थांबला. पानाआड लपलेले पक्षी बाहेर आले व त्यांनी आपल्या पंखाना झटकले. बाहेर लख्ख ऊन पडले. बाहेर कसं स्वच्छ सुंदर वाटत होते. आता संध्याकाळ झाली. दारावरची बेल वाजली +डिंग डाँग) आई आली असे म्हणतात हेतल पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले. आणि आईबाबा तिचा समोर उभे होते. इतक्यावेळ कंटाळलेली हेतल आईला जाऊन बिलगली. हाच होता तिचा अनुभव.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 11/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक लोकसंख्या दिन*💥 ठळक घडामोडी :-१९९४- दिल्लीच्या माजी पोलीस महानिरीक्षक किरण बेदी (तुरुंग) यांना ' रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार' जाहीर.२००१-आगरताळा ते ढाका या शहरादरम्यान बससेवा सुरू झाली.२००३ - १८ महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस सेवा पुनः सुरू.२००४ - सी.आय.ए.च्या निदेशक जॉर्ज टेनेटने राजीनामा दिला.२००६ - मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट. १००हून अधिक ठार.💥 जन्म :-१९२२-शंकरराव खरात,दलित साहित्यिक, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू.१९१६ - गॉफ व्हिटलॅम, ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान.१९३० - जॅक अलाबास्टर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.१९५० - जिम हिग्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.१९५३-सुरेश प्रभू, माजी केंद्रीय मंत्री💥 मृत्यू :-१८०४ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा अर्थमंत्री.१९५९ - चार्ली पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.१९८९ - सर लॉरेंस ऑलिव्हिये, ब्रिटीश अभिनेता.२००९-शांताराम नांदगावकर-गीतकार*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *नैसर्गिक शेतीचे सूरत मॉडेल संपूर्ण देशासाठी आदर्श बनेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा केली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, मुलगा खासगार श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांश शिंदे असं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *गडचिरोलीत मुसळधार पाऊस, आलापल्ली ते भामरागडसह अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कोकणासह विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्र सरकारने सामाजिक आर्थिक जनगणनेची माहिती देशभरातील राज्यांना दिली असती तर ओबीसी समाज अडचणीत आला नसता, अशा शब्दात भुजबळ यांनी केंद्र सरकारवर केली टीका*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सूर्यकुमारचं शतक व्यर्थ, इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची संधी हुकली, 17 धावांनी भारत पराभूत तरी मालिका 2-1 ने जिंकली*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रशियात जन्मलेल्या पण कझाकिस्तानचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रायबाकिनाने विम्बल्डन स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. अंतिम लढतीत एलेनाने ट्यूनिशियाच्या ऑन्स जबेरवर 3-6, 6-2, 6-2 अशी मात केली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - कानमंत्र* https://storymirror.com/read/story/marathi/ohy3fxfi/kaanmntr/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌍 *पृथ्वीचा परीघ किती आहे ?* 🌍या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आपल्याला आपली पृथ्वी एखाद्या चेंडूसारखी गोल, गरगरीत, वाटोळी आहे हे गृहित धरायला हवं. वास्तवात ती तशी नाही. दोन्ही ध्रुवांच्या इथे ती जराशी दबल्यासारखी आहे. उलट विषुववृत्ताच्या ठिकाणी ती जराशी फुगल्यासारखी आहे. स्वतःभोवती सतत ती गरगर फिरत असते, त्यामुळे तिच्या आकारात हा फरक झालेला आहे. तरीही तिचा परीघ किती आहे हे समजून घेण्यासाठी आपण ती गरगरीत आहे, असं समजल्यास फारसा फरक पडणार नाही.आता परीघ म्हणजे कोणत्याही एका ठिकाणाहून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागाला धरून सरळ प्रवास करत निघालो तर परत त्याच ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण किती मजल मारली असेल, याचं गणित आहे. तेव्हा अशा प्रवासासाठी असलेल्या साधनांवरूनच आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू शकतो.पृथ्वीच्या काळी समुद्रावर प्रवास करणाऱ्या नावाड्यांना आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत हे समजण्यासाठी फारशी साधने नव्हती. त्यामुळे आकाशातल्या ग्रहगोलांनाच विचारात त्यांची वाटचाल होत असे. उत्तर गोलार्धात ध्रुवतारा उत्तर दिशा दाखवत असे. त्याच्यानुसार मग इतर दिशा ओळखल्या जात. तसंच आपण किती मजल मारली आहे हे समजण्यासाठीही अशाच गणताची मदत घेतली जात असे. त्यातूनच नॉटिकल माईल म्हणजेच 'नौकायानातला मैल' मैल ही संकल्पना पुढे आली. याचंच संक्षिप्तीकरण होऊन 'नाॅट' हे एकक रूढ झालं आहे. त्यामुळे जहाजांचा वेग हा दर ताशी अमुक इतके नाॅट असा मोजला जातो.जमिनीवरून प्रवास करत असतानाही आपण मैल हे अंतर मोजण्याचे एक एकक पाळतो; पण नॉटिकल माईल आणि आपल्या नेहमीच्या ओळखीचा मैल यांच्यात फरक आहे, कारण त्या एककांची व्याख्याच वेगळी आहे. पृथ्वी गोलाकार असल्यामुळे त्या गोलाचे ३६० अंश संभवतात. या वर्तुळापैकी एक मिनिटाची आर्क म्हणजे एक नॉटिकल माईल अशी त्याची व्याख्या केली गेली आहे. म्हणजेच या वर्तुळाच्या एक अंशाच्या एक-साठांश इतक्या भागाचा प्रवास केल्यास एक नॉटिकल माईल अंतर कापलं जातं. तेव्हा संपूर्ण ३६० अंशांचा प्रवास करायचा झाल्यास ६० x ३६० म्हणजेच २१६०० नॉटिकल माईल इतकं अंतर होतं ; पण एक नॉटिकल मैल हा आपल्या जमिनीवरच्या मैलापेक्षा मोठा असल्यामुळे हेच अंतर २४८५७ मैल किंवा ४०००३ किलोमीटर इतकं भरतं.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातुन* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जगात दुसऱ्याला हसणे सोपे पण, दुसऱ्यासाठी रडणे फार कठीण.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल भारताने कोणत्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा पाळला ?२) जगात व्हाट्सअप्पचा सर्वाधिक वापर कोणत्या देशात होतो ?३) वर्ण म्हणजे काय ?४) नाशिक येथे उदोजी वसतिगृह कोणी सुरू केले ?५) मुस्लीम लीगचे प्रथम अध्यक्ष कोण होते ?*उत्तरे :-* १) ९ जुलै २०२२ २) भारत ३) मूलध्वनी जो आपल्या मुखातून निघतो त्याला वर्ण म्हणतात. ४) छत्रपती शाहू महाराज ५) आगाखान*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● शिवाजी सूर्यवंशी● अनुपमा अजय मुंजे● प्रभुनाथ देशमुख● प्रमोद मंगनाळे● संतोष चव्हाण● नरेश गोट्टम● साईकिरण अवधूतवार● प्रकाश नाईक● स्वप्नील शिंदे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*गाण्याचा रियाज करावा तसा दु:खाचा रियाज करता येईल का? गाण्याच्या रियाजाने गायकांस त्याचा आवाज टिकवून धरता येतो. आवाजाची धार शाबूत राहते. त्याचं गाणं दिवसेंदिवस खुलत जातं. दु:खाच्या रियाजाने असं काही होईल का? दु:ख जर आणखीनच टोकदार होणार असेल तर दु:खाचा रियाज करायला कुणी धजणार नाही. कुणाला हवं आहे दु:खं ! नकोच आहे दु:खं. त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून पृथ्वीभर जेवढे काही देव आहे, त्यांना साकडे घालून होते. खुद्द देवालाच दु:खाच्या संदर्भात जाब विचारणा-या माणसाची कथा आपण ऐकलीच आहे.**माणूस देवाला म्हणतो की, 'देवा तू सुखात माझ्याबरोबर असतो. कारण तेंव्हा दोन माझी अन् दोन तुझी पावलं उमटलेली असतात. मात्र दु:खात तू माझ्यासोबत नसतोस, कारण तेंव्हा माझी एकट्याचीच पावलं उमटलेली असतात !' तेंव्हा देव त्यास म्हणतो,'अरे दु:खातही मी तुझ्याबरोबरच होतो! ज्या दोन पावलांची गोष्ट तू करतो आहेस, ती पावलं तुझी नसून माझीच आहे. मी तुला कडेवर उचलून घेतलं होतं.' तरी माणूस मान्य करणार नाही. हीच माणसाची मोठी समस्या आहे. माणूस दु:खाचा बाऊ फार करतो. दु:खाची सवय करून घ्यायची ..ही गोष्ट फार लांब राहिली. सुख पाहता जवापाडे । दु:ख पर्वताएवढे ॥ तुकाराम महाराजांनी सुखाचे आणि दु:खाचे माप आपल्यासमोर ठेवले आहे. सुख जवसाच्या 'बी' इतके लहान, तर दु:ख पर्वताएवढे विशाल आहे. जवसाच्या बी इतक्या छोट्या असलेल्या सुखाचे व्यवस्थापण आपण करीत असतो. मात्र, पर्वताएवढ्या दु:खाचे व्यवस्थापण आपण बिलकुलही करीत नाही. म्हणून ते कमी व्हायच्या ऐवजी वाढत जाते..इतके की जवसा एवढ्या सुखाचाही तेच चट्टामट्टा करून टाकते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●•• ⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡⚡ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• नागिन के तो दोये फन,नारी के फन बीसजाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस।सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.वासनेच्या मागे नको धावू मनापहा त्या रावणा काय झालेचंद्रा पडली भगे इंद्र झाला काळानारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्याप्रमाणे विद्यार्थीजीवनात विद्यार्थी मन लावून जिद्दीने आणि अभ्यासात सातत्य ठेवून परीक्षेत यश मिळवतो.त्याचप्रमाणे माणसाने जीवनात कोणत्याही कठीण प्रसंगावर विजय मिळवायचा असेल तर आपल्या मनाची तयारी,त्यासाठी लागणारी मनातून जिद्द आणि यश मिळेपर्यंत सातत्य ठेवायला हवे.समजा पहिल्याच प्रयत्नात अयशस्वी झाले तर तिथेच माघार न घेता आपण त्यात कुठे कमी पडलो याचा शोध घेऊन त्यात सुधारणा करण्याची तयारी करावी आणि आपले मन खचू न देता तेवढ्याच जोमाने तोंड देण्यासाठी सज्ज रहावे मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मग तुमच्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असला तरी तुम्ही माघार घेणार नाहीत.©व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद...९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सकारात्मकता* एके दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे. त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते. बैल आणखीनच हंबरू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली. बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला . तात्पर्य : तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे.त्यासाठी सकारात्मक विचार करा. सकारात्मक जगा.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 09/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१८७३ - मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.१९५१ - भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली१९६९ - वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.💥 जन्म :-१९२५ - गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.१९३८ - संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-२००५-डॉ रफिक झकारिया, महाराष्ट्राचे माजी नगरविकास मंत्री आणि लोकसभा सदस्य*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम केला जाहीर, 18 ऑगस्टला मतदान तर 19 ऑगस्टला मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्र्यांचा ताफा शहरातून जात असताना अन्य वाहतूक थांबवली जाणार नाही.. व्हीआयपींच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस महासंचालक आणि आयुक्तांना निर्देश*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात रेड अलर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाराष्ट्रातील जनतेच्या खिशाला कात्री, महावितरणने इंधन समायोजन आकार अर्थात FAC मध्ये प्रचंड वाढ केल्याने ग्राहकांना जादा आकाराने खरेदी करावी लागणार वीज*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या, गोळीबारानंतर उपचारादरम्यान मृत्यू*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *वैष्णवमय झालं पंढरपूर, वारकऱ्यांना आस विठूरायाची, विठूमाऊलीच्या भेटीसाठी संतांच्या पालख्या पंढरीच्या वेशीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल; विराट कोहली, ऋषभ पंत व रवींद्र जडेजा संघात परतणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - रेल्वेतील शाळा*https://storymirror.com/read/story/marathi/n96hoqhe/relvetiil-shaalaa/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ?* 📙'जीवेत शरद: शतम्' असा आशीर्वाद किंवा शुभेच्छा कोणालाही दिल्या जातात. माणसाचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे अशी जी एक सर्वसाधारण समजूत आहे त्याचीच ही परिणती आहे; पण माणूस जास्तीत जास्त शंभर वर्षे जगू शकतो या समजुतीला कोणता आधार आहे ? कारण आजही शंभरी गाठलेल्या व्यक्तींची संख्या पूर्वीपेक्षा जास्त असली तरी एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्यच आहे. म्हणून तर शंभरी ओलांडलेल्या आलेल्या व्यक्तीकडे नवलाईने पाहिलं जातं.तेव्हा खरा प्रश्न हा आहे की माणसाचं सरासरी आयुर्मान किती आहे ? त्याला काही नैसर्गिक मर्यादा आहेत की नाही ? इतिहास पाहिला तर याचं उत्तर दे़ सोपं होत नाही. कारण माणसाचं सरासरी आयुर्मान वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या भौगोलिक स्थानी वेगवेगळं राहिलं आहे. अश्मयुगात ते जेमतेम २५ ते ३० वर्षांचं होतं. ब्राँझयुगात तर ते अठरापर्यंत घसरलं होतं. पण त्याच युगात स्वीडनसारख्या ठिकाणी ते त्याहून दुप्पट ते तिप्पट होतं. सिकंदर वयाच्या बत्तिसाव्या वर्षी निधन पावल्याचं इतिहास सांगतो; आणि आपण त्याला अल्पवयातच मृत्यू आल्याचं निदान करतो. पण ग्रीक संस्कृतीत काय किंवा रोमन संस्कृतीत काय सरासरी आयुर्मानच तिशीपेक्षा जास्त नव्हतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाही पंचवीस ते तीस हीच सीमा त्यानं गाठली होती. आज जगातलं सरासरी आयुर्मान ७० वर्षांचं आहे. आपल्या देशातही परिस्थिती वेगळी नाही. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा म्हणजेच उण्यापुऱ्या साठ वर्षांपूर्वी देशातलं सरासरी आयुर्मान ३५ वर्षांचं होतं. आज ते ६७ झालं आहे.याचं कारणही स्पष्ट आहे. मृत्यूदरात झालेली लक्षणीय घट. ती तशी झाली कारण सार्वजनिक आरोग्यसुविधांमध्ये फार मोठा फरक पडला आहे. ज्या सांसर्गिक रोगाला माणूस बळी पडत असे त्यापैकी बहुतेक रोगांना आळा घालण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्या रोगांचा उपसर्ग होण्यास अटकाव करणाऱ्या प्रभावी लसी उपलब्ध झाल्या आहेत, तसंच लागण झाल्यानंतरही त्यावर मात करणारी शक्तिशाली औषधंही सहजगत्या मिळत आहेत. आहारात आणि त्यामुळे उपोषणातही वेगाने प्रगती झाली आहे. वाढत्या वयात मिळणाऱ्या सकस आणि पर्याप्त अन्नापायी माणूस सुदृढ बनत चालला आहे. उतारवयातही त्याचं स्वास्थ्य टिकून रहत आहे.ही जी वाढ झालेली आहे ती नैसर्गिक मर्यादा गाठण्यात ज्या काही अडचणी येत होत्या त्यांचं निराकरण झाल्यामुळे आलेली आहे. माणसाच्या जनुकीय साठय़ामध्येच त्याच्या एकंदर आयुर्मर्यादेचं इंगित दडलेलं आहे. २००९ सालचं नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेले संशोधन या विषयाशीच निगडित आहे. त्यानुसार आपल्या यच्चयावत शारीरिक, शरीरक्रियाविषयक तसंच वर्तणुकीबाबतचेही गुणधर्म निर्धारित करणारी जनुकं च्या गुणसूत्रांमध्ये लपलेली असतात, त्या गुणसूत्रांच्या एका टोकाला असलेल्या टोपीमध्ये, टेलोमिअरमध्ये, आयुर्मर्यादा निश्चित करणाऱ्या जनुकांचा साठा असतो. ती जनुकं कार्यान्वित करणारं एक विकरही, टेलोमरेझ शोधुन काढलं गेलेलं आहे. तेच आयुर्मर्यादेची निश्चिती करत असतं. त्याचं कार्य नेमकं कसं चालतं याचं गुढ उकललं की मग माणूस जास्तीत जास्त किती जगू शकतो ? या प्रश्नाचं नेटकं उत्तर देणं शक्य होईल.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वेळ आल्यावर आपल्या गरजा बदला पण आपल्या गरजेसाठी आपली माणसं बदलू नका.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) १९७३ मध्ये सार्वजनिक ठिकाणी पोर्टेबल मोबाईल फोन वापरणारे पहिले व्यक्ती कोण ?२) ब्रिटिश सरकारच्या 'चेव्हनिंग' या जागतिक प्रतिष्ठेच्या ४५ लाखांची शिष्यवृत्ती मिळविणारा देशातील पहिला वकील कोण ?३) संत तुकारामांच्या गाथेचा इंग्रजी अनुवाद प्रथम कोणत्या कवीने केला ?४) दादोबा पांडुरंगांनी मानवधर्म सभेची स्थापना कोठे केली ?५) संस्कृतात क्रियापदाला काय म्हणतात ?*उत्तरे :-* १) मार्टिन कूपर २) दीपक चटप , चंद्रपूर ३) कवी दिलीप चित्रे ४) सुरत ५) आख्यात*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीकृष्ण राचमाळे● पंडीत पवळे● बालाजी अनमूलवाड बेळकोणीकर● घनश्याम सोनवणे● महेश जाधव● साईनाथ विश्वब्रम्ह● अनिल उडतेवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एकदा पंक्चर काढणा-याकडे उभा असताना एका टायरमधली हवा फस्सकन गेली. वाटले 'मृत्यू' असाच होत असणार. मृत्यूविषयी एक ऑब्सेशन अनेकांच्या मनात खोल असते. एका मित्राला सतत एक विचित्र समस्या छळत असते. त्याच्या अंत्यदर्शनाला येणारे लोक गाड्या कुठे लावतील ? त्या दिवशी पाऊस असेल का ? आता याची काळजी मागे राहिलेले घेतील की ! अशी सत्वहीन माणसं जगण्याला काही देत नाहीत आणि घेतही नाहीत.**दु:ख घेता येत नाही तर देऊ नये. 'सुख द्यावे आणि घ्यावे' हे सूत्र जगण्याचा 'तोल आणि ताल' संभाळते. कविराज विंदा करंदीकर यांनी कुणाकडून काय घ्यावे याची यादी दिलीय, पण.... असे घेता येते का ? काही जिंदादिल माणसे सतत देत राहतात, घेणे त्यांच्या गावी नसते. जिंदगी घोटा-घोटाने पिण्याचा 'अमृतरस' आहे. या रसाचे भोक्ते किती राहिलयं ते चुकूनही पहात नसले तरी त्यामुळे त्यांचे 'अक्षयपात्र' भरलेले राहते. तसे तुमचेही राहो, हिच आज 'अक्षयतृतीया'ची सर्वांना शुभेच्छा !*••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख ।एरव्ही कोण पुसतो आणिक ?तुम्ही आहात राव की रंक ।आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात.परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शहाणा ग माझा राजा*मनू शाळेच्या पायऱ्या उतरत होता. अचानक त्याला मुसमुसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिलं, तर पायरीच्या कडेला एक फुलपाखरू पडलं होतं. फुलपाखरू जखमी होतं. " अरे काय काय झालं तुला? " मनूनं विचारलं. " तो गणू दृष्ट आहे. त्यांना मला पकडले . माझे पंख फाटले”.“ अरे रे! "“ आता मी घरी कसा जाऊ? मला आई पाहिजे ना.?”“ कुठे आहे तुझं घर?”“ त्या सुर्यफुलाच्या शेतात.”“ चल. मी नेतो तुला तुझ्या घरी.”“ हळूचं हं ! " मनून फुलपाखराला हळूच ओंजळीत घेतलं आणि सूर्यफुलाच्या शेतात अलगद सोडलं. घरी गेल्यावर मनूनं आईला ही हकीकत सांगितली. आईन मनूला जवळ घेतलं. मनूचा लाड केला आणि म्हणाली, “ शहाणा ग माझा राजा तो.”तात्पर्य.. मुक्या प्राणिमात्रांची काळजी घ्यावी. कोणालाही आपला त्रास होणार नाही. आपल्यामुळे इजा पोहोचणार नाही ही दक्षता घ्यावी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 08/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-२०११-रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.)असलेली नाणी प्रथमच चलनात आली.२००६-मुख्य निवडणूक आयुक्त असतांना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन.शेषन यांना" रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार" जाहीर. १९९७-बीजिंग आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६किलो वजनी गटात कुंजुरांनी देवीने रौप्य पदक पटकावले१४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.💥 जन्म :-१९०८ - वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.१९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००६ - प्रा.राजा राव,तत्वज्ञानाचे प्राध्यापक.२००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गोदावरीचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना सांगितले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारने पिठाच्या निर्यातीवर घातले निर्बंध*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत 186 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक बेघर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा ; नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असणार, नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संत तुकाराम महाराजांची पालखी पिराच्या कुरोली मुक्कामी; तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा भंडीशेगाव येथे मुक्काम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नव्याने 5 टक्के जीएसटी, अंतिम बोजा ग्राहकांवर पडणार असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप, महागाई वाढण्याची भिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत मालिका 3-0 खिशात घातली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...*लघुकथा - हाताची जादू ओळखणारा शिक्षक* Audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.https://youtu.be/-R9ZpCSvOokलघुकथा वाचण्या साठी खालील लिंक वर क्लीक करावेhttps://storymirror.com/read/story/marathi/19r6650g/haataacii-jaaduu/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?*'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले.सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खुप प्रगती होईल*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जग ही एक रंगभूमी आहे' हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले होते ?२) दलाई लामा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव काय ?३) छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे दुकान काढून दिले होते ?४) जगातील कोणत्या देशाने लोकशाहीचा प्रथम परिचय करून दिला ?५) जगातील पहिले तरंगते शहराची निर्मिती कोणत्या देशात साकारण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) शेक्सपिअर २) कुंदन ३) गंगाधर कांबळे ४) ग्रीस, इ. स. पूर्व ७०० ५) दक्षिण कोरिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुरेश तायडे● अनिल बेद्रे● मलेश भूमन्ना बियानवाड● आनंदराव नारायणराव सूर्यवंशी● लालू शिरगिरे● श्रद्धा कळसकर● अशोक पवार● दीपक वानखेडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.**मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कलि मंह कनक कामिनि,ये दौ बार फांदइनते जो ना बंधा बहि,तिनका हूॅ अमै बंद ।सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्‍या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना जीवन जगण्याची कला अवगत झाली तो कधीच कुणासमोर जीवन कसे जगावे असं विचारत नाही किंवा कोणतीच तक्रार कुणाकडे करीत नाही.तो कसेही आणि कोणतेही संकट असो त्याला तो आपल्या कलेने तोंड देऊन यशस्वी होतो.परंतु ज्यांना जीवन कसे जगावे किंवा जीवनात आलेल्या प्रसंगाला कसे आणि कोणत्या पध्दतीने तोंड द्यावे हे जमत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही आणि होणारही नाही.तो दरवेळी काहीना काही बहाणे करुन आपल्या जीवनाला व जगण्याला दोष देत बसतो.आपल्या नशीबाला दोष देण्यापेक्षा हातपाय हलवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा सकारात्मक विचार आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवन जगणे आनंददायी होईल अन्यथा दु:खच भोगावे लागतील यांत तीळमात्र शंकाच नाही .© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ...‌9421839590/8087917063.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इसापची समयसुचकता*ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.चांगले शोधून काढणे ही आपली सचोटी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 07/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.💥 जन्म :-१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.१९८१ - भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी💥 मृत्यू :-१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी झाली वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा, उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिवसेनेचे 11 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी सेना खासदारांचं पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा, पंचगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा, प्रशासनाच्या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापुरात रेड अलर्ट, एनडीआरएफच्या टीम्स तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्ञानोबांच्या पालखीचं खुडूस फाट्याजवळ दुसरं गोल रिंगण, तर तुकोबा रायांची पालखी बोरगाव मुक्कामी जाणार, माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहित शर्माला विश्रांती, तर शिखर धवनकडं कर्णधारपद!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सर्वात कमी वयात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागली होती ?२) कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम कोणी केला ?३) मोबाईल फोनचे जनक कोण ?४) 'समाजस्वास्थ्य' हे मासिक कोण चालवित होते ?५) जगात 'बिटकॉईन' या आभासी चलनाला कायदेशीर मान्यता देऊन 'बिटकॉईन सिटी' बनविण्याची योजना आखणारा पहिला देश कोणता ?*उत्तरे :-* १) शिवराज पाटील, ४२ व्या वर्षी, १९७८ साली २) जसप्रीत बुमराह, भारत ( २९ धावा ) ३) मार्टिन कूपर, अमेरिका ४) र. धो. कर्वे ५) एल. साल्वाडोर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दत्ताहारी पाटील कदम बेलगुजरीकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, धर्माबाद● प्रज्ञा घोडके, साहित्यिक● रमेश चांडके, हैद्राबाद● ऋषीकेश देशमुख, साहित्यिक● सय्यद युनूस, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कुल● संदीप डोंगरे● महेश जोशी, पत्रकार● श्रीकांत माने● प्रकाश गोरठकर● विजय पाटील रातोळीकर● माधव कांबळे● आशिद लाव्हाळे● ज्वालासिंह घायाळे● दिगंबर पांचाळ● हरी ओम राठोड● व्यंकट ताटेवाड● लक्ष्मण कांबळे● पिराजी कटकमवार● हणमंत जाधव● जगन्नाथ पुलकंठवार● बालासाहेब पेंडलोड● साईनाथ वाघळे● गजानन काठेवाडे● साईनाथ हामंद● शंकर रामलू बलीकोंडावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्‍यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.〰️〰️〰️〰️〰️〰️*✍संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 05/07/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९७५- 'देवी' या रोगाचे भारतातून समूळ उच्चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.१९९६- संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ ए पी जे अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना 'आर्यभट्ट पुरस्कार'जाहीर२००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.२००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडाँग-२, स्कड व तेपोडाँग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली💥 जन्म :-१८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक. १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये. १९१६-के. करूणाकरन,केरळचे माजी माजी मुख्यमंत्री१९४६-रामविलास पासवान,केंद्रीय मंत्री💥 मृत्यू :-१६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.१९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.२००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.२००५-बाळू गुप्ते,लेग स्पिन गोलंदाज*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आठवण गावाची*https://storymirror.com/read/story/marathi/li2r4x05/aatthvnn-gaavaacii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🦅 *पक्षी केव्हा स्थलांतर करतात ?* 🦅रोटी, कपडा और मकान या मनुष्यप्राण्याच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. यातला कपडा ही केवळ मनुष्यप्राण्याचीच गरज आहे. पण रोटी व मकान यांच्या गरजा मात्र प्राणिसृष्टीच्या प्रत्येक सदस्याला भासतात. त्यामुळे त्यांची जिथे चांगली सोय होईल तिथेच जास्तीत जास्त वास्तव्य करण्याकडे प्रत्येक प्राण्याचा कल असतो. तो प्रदेश हा त्या प्राण्याचा नैसर्गिक अधिवास बनतो. त्या क्षेत्रात त्याला मुबलक अन्न मिळतं, पाण्याची सोय होते, राहण्याची गुहा मिळतात किंवा घरटी बांधता येतात. आपलं पुनरूत्पादन करून पुढची पिढी जन्माला घालण्यासाठी सर्व प्रकारे योग्य वातावरण लाभतं. आपला कळप वाढवता येतो. पक्षी हे प्राणीसृष्टीचाच अविभाज्य भाग असल्यामुळे त्यांनाही हे लागू पडतं. परंतु या अधिवासातील पर्यावरण सतत तसंच राहत नाही. ऋतुमानानुसार त्यात फरक पडत जातो. तापमान बदलतं. पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं. फळांचाही हंगाम असतो. तो ओसरला की तीही मिळेनाशी होतात. किडामुंगीही या बदलत्या पर्यावरणाला अनुसरुन आपल्या बिळात गडप होण्याची धडपड करतात. अन्नाची चणचण भासू लागते. तापमानही सुसह्य राहत नाही. अशा परिस्थितीला तोंड देत तगून राहण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते. अशा वेळी ते स्थलांतर करतात. तरीही या स्थलांतरासाठी इतर काही घटना घडण्याची आवश्यकता भासते. पर्यावरण प्रतिकूल होत चाललं की पक्ष्यांच्या शरीरात काही विशिष्ट संप्रेरकांचा स्त्राव होऊ लागतो. तो त्यांना उडत जात दूरचा पल्ला गाठण्यासाठी आवश्यक ती प्रेरणा आणि ताकद देतो. तसंच हा दूरचा पल्ला गाठण्यासाठी शरीरही बळकट करावं लागतं. दीर्घ काळपर्यंत उडत राहण्यासाठी स्नायूंना बळकटी यावी लागते. त्यासाठी जेव्हा अन्न मुबलक प्रमाणात मिळत असतं तेव्हा ते खाउन शरीर लठ्ठ करावं लागतं. चरबीचा साठा करावा लागतो. तो पर्याप्त झाल्याशिवाय स्थलांतर करता येत नाही. बहुतांश पक्षी स्थलांतर करताना सहा ते आठ हजार मीटर उंचीवरुन उडत राहणं पसंत करतात. कारण त्या उंचीवरचं घसरलेलं तापमान सतत उडत राहण्यामुळं शरीरात जी उष्णता निर्माण होते तिचा निचरा करण्यासाठी उपयोगी पडतं. तसंच पक्षी एकेकटे कधीच स्थलांतर करत नाहीत. त्यांचा कळपच्या कळप या प्रवासावर निघतो. काही पक्षी तर हजारो किलोमीटर दूरवरच्या तात्पुरत्या अधिवासाच्या प्रदेशात स्थलांतर करतात. तो आपल्या विणीच्या हंगामासाठीही उपयुक्त आहे याची खातरजमा त्यांनी करून घेतलेली असते. त्याचा शोध त्यांनी पूर्वीच घेतलेला असतो व तिथं जाण्याची वाटही त्यांच्या आठवणीत साठवून ठेवलेली असते. त्यामुळं नेहमीच्या नैसर्गिक अधिवासातली परिस्थिती प्रतिकूल बनली, शरीरातल्या चरबीचं प्रमाण पुरेसं वाढलं, अंगात संप्रेरकांचा पाझर पर्याप्त झाला आणि सगळ्या कळपाची तयारी झाली की पक्षी स्थलांतर करतात.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *Health is wealth.*(चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.)*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* महाराष्ट्र2) *दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मु काश्मीर3) *चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* उडीसा4) *सांभर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* राजस्थान5) *वुलर सरोवर कोणत्या राज्यात आहे ?* जम्मू काश्मीर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. मनोज तानुरकर● गंगाधर कांबळे● गिरीश कहाळेकर● संतोष शेळके● फारुख शेख● नरेश शिलरवार● अजय चव्हाण● गजानन बुद्रुक● बालकिशन कौलासकर● रमेश अबुलकोड● किशन कवडे● सुधाकर चिलकेवार● बबलू दबडे● परमेश्वर अनिल कवडेवार● सुदर्शन पाटील● मोतीराम तोटलोड● नागनाथ भत्ते● मारोती कदम● अनिल गायकांबळे● चक्रधर ढगे● सुभाष कुलकर्णी● राजरेड्डी बोमनवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*स्वत:वर खुश असणा-यांना लोक खूप घाबरतात. त्यांना या लोकांबद्दल खूप आसूया वाटते. सर्वसामान्य माणसे जगात सर्वाधिक नाराज जर कोणावर असतील, तर ती स्वत:वरच असतात. त्यांच्या हातुन चुका होतात. कधी कधी तर त्याच त्याच चुका परत परत होतात. नियतीचे फासे सततच असे पडत राहतात, की सारखेच हस्यास्पद व्हायची वेळ यावी. इतरांच्या हातात कायम राजे, एक्के आणि यांच्या हातात दुर्री-तिर्री, हे तर नेहमीचेच. यांनी चुका सुधारायच्या ठरविल्या तरी पटापट यांना त्या सुधारता येत नाही. त्याच त्याच बाॅलवर परत परत विकेट जात राहते.**काय केले म्हणजे आपल्याला प्रतिष्ठा मिळेल ? लोक आपल्याला महत्वाचे आणि सन्माननीय समजतील? याचा विचार करण्यात यांचे तासन् तास जातात. तरीही त्यांना असाच निष्कर्ष काढावा लागतो, की अजून आपल्याला खूपच मेहनत करावी लागेल. आणि मग स्वत:ला दोष देत, स्वत:ला सुधारण्याचा पुन:पुन्हा प्रयत्न करत ते जगत राहतात. अशा खचलेल्या आणि जगाच्या गणितात हुकलेल्या लोकांनी सगळा परिसर भरलेला असताना जर एखादा नखशिखांत स्वत:वर खुश असेल तर जगाला त्रास होणारच.**"परंतु जो स्वत:वर प्रेम करीत नाही, त्याच्यावर जग प्रेम करीत नाही."*संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नागिन के तो दोये फन,नारी के फन बीसजाका डसा ना फिर जीये, मरि है बिसबा बीस।सारांश महात्मा कबीर व्यभिचारी व दुराचारी स्त्री-लंपटाना वरील दोह्यातून सचेत करतात. सापिनीला तर केवळ दोनच दात असतात. तिचा दंश झाला तर वैद्याकडून विष उतरवून टाकता येईल. परंतु स्त्रिला वीस दात असतात. तिचा दंश ज्याला झाला त्यातला कोणीही जीवित सुरक्षित राहू शकत नाही. तिचा दंश जर वीस लोकांना झाला तर वीसचे वीस मरून जातील. काम भावना सीमित असली पाहिजे. तिचं संतुलन राखता आलं पाहिजे. काम भावनेचं संतुलन बिघडलं की ती माणसाच्या आवाक्यात राहात नाही. ती त्याला मन मानेल तशी नाचवते. परिणाम स्वरूप माणूस अधःपतित होतो. लोक लज्जेचा , हेटाळणीचा विषय होतो. मग ती ईश्वरांची रूप मानलेली पात्र असोत की सामान्य जण साबुत राहात नाहीत. शंकर , इंद्र, चंद्र, रावणाचे चारित्र्य या माया मोहिणीने डागाळून टाकले. तिथं सामान्यांची काय बात घेऊन बसला आहात. यावर चांगदेवांच्या पुढील ओळी फारच बोलक्या आहेत.वासनेच्या मागे नको धावू मनापहा त्या रावणा काय झालेचंद्रा पडली भगे इंद्र झाला काळानारद चुकला चाळा भजनाचा अगदी अलीकडे समाजानं ज्यांना डोक्यावर घेतलं होतं अशा संत म्हणवून घेणार्‍यांनी स्व-संतुलन हरवून वासनेच्या आहारी जावून आज ते गजाआड दुर्दशेचे भोग भोगत आहेत. भल्या भल्यांची मायेनं अशी वासलात लावून टाकलीय. मात्र ज्यांनी स्वतः वरील नियंत्रण ढळू दिलं नाही. अशी पात्रंही कमी नाहीत की जी अनुकरणास पात्र ठरलीत. शुक, भीष्म हे निश्चयाचे महामेरूच होते. जगद्गुरू तुकोबारायही माया मोहात गुरफटलेल्या जीवांना पाहून हताश होवून म्हणतात बुडती हे जण न देखवे डोळा ।येतो कळवळा म्हणोनिया । तेव्हा माणसानं आपण अवहेलनेचे धनी होणार नाहीत . याची जाणीव ठेवून वागण्याचा प्रयत्न करावयास हवा. तुकोबांनी सांगितलेलं 'पराविया नारी माऊली समान...' हे सुत्र कायम जपलं जपायला हवं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पैसा काहीवेळी कामाला येतो आणि त्यातून उपभोगण्यासाठी वस्तू खरेदी करता येतात परंतु आशीर्वाद हा आयुष्यभर पुरत असतो आणि कोणत्याही संकटातून दूर करण्यासाठी देवासारखा पाठीशी असतो...म्हणून कुणाच्या पैशाची अपेक्षा करु नका तर कुणाच्या आशीर्वादाची अपेक्षा करा यातच खरे समाधान आहे....©व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकाराचे बीज विनाशकारी*एक गाय गवत चरायला जंगलात जाते. संध्याकाळच्या वेळेस तिच्या लक्षात आले की, एक वाघ तिच्याकडे दबक्या पावलाने येत आहे. ती भीतीने इकडे तिकडे पळू लागली. वाघ सुद्धा तिच्या पाठीमागे धावू लागला. धावता धावता गाय एका तलावापाशी पोहचली आणि घाबरलेली गाय त्या तलावात शिरली..वाघ देखील तिच्या पाठीमागे त्या तलावात शिरला. त्या दोघांनाही कळून चुकले की तलाव फारसा खोल नाही आणि त्यात पाणी सुद्धा कमी आहे ,मात्र चिखल जास्त आहे. त्या दोघांमधील अंतर तसे कमी होते परंतु ते दोघेही काही करू शकत नव्हते.गाय त्या चिखलात हळूहळू रुतायला लागली. वाघ तिच्या अगदी जवळ होता, परंतु तो सुद्धा त्यात रुतायला लागला होता. दोघेही अगदी गळ्यापर्यंत रुतलेली होती. दोघेही हलू शकत नव्हते.थोड्या वेळाने गाईने वाघाला विचारले, तुझा कोणी गुरू किंवा मालक आहे का ? वाघ घुश्यात म्हणाला , मी तर या जंगलाचा राजा आहे; माझा कोणी मालक नाही; मीच ह्या जंगलाचा मालक आहे. गाय त्याला म्हणाली ,परंतु तुझी शक्ती तुला याक्षणी काहीच उपयोगाची नाही. वाघ गायीला म्हणाला की, तुझे हाल देखील माझ्या सारखेच आहेत की . तेव्हा गाय त्याला हसून म्हणाली, बिलकुल नाही माझा मालक मला संध्याकाळ झाली अजून आली नाही म्हणून शोधत येईल आणि या चिखलातून मला काढून घेऊन जाईल.थोड्या वेळाने खरंच एक माणूस आला आणि गायीला चिखलातून बाहेर काढून घरी घेऊन गेला. जाताना गाय आणि मालक एकमेकांकडे कृतज्ञतेने पहात होते, त्यांच्या मनात असून सुद्धा ते वाघाला बाहेर काढू शकत नाही कारण त्यांच्या जीवाला धोका होता.आता या कथेतून बोध हा आहे की,गाय हे समर्पित हृदयाचे प्रतीक आहे.वाघ हे आपले अहंकारी मन आहे.मालक हे ईश्वराचे प्रतीक आहे ,तर चिखल हा संसार आहे आणि संघर्ष ही अस्तित्वाची लढाई आहे.कोणावर निर्भर असणे चांगली गोष्ट नाही ,परंतु मीच श्रेष्ठ आहे, मला कोणाची मदतीची गरज नाही, हाच अहंकार विनाशाचे बीज रोवते.〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ 🌺संकलन🌺*प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 04/07/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९९९-लष्कराच्या१८व्या बटालियन ने कारगिलमधील द्रास सेक्टर मधील टायगर हिल्स हा लष्करीदृष्ट्या महत्त्वाचा टापू घुसकरांच्या तावडीतून मुक्त केला.१९९७-नासाचे 'पाथफाईंडर' हे मानवविरहीत यां मंगळावर उतरले.१७७६ - अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले. 💥 जन्म :-१८९८ - गुलजारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान.१९३० - जॉर्ज स्टाइनब्रेनर, अमेरिकन उद्योगपती.१९४३ - हराल्डो रिव्हेरा, अमेरिकन पत्रकार.💥 मृत्यू :-१९०२ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - मुलगी*https://storymirror.com/read/story/marathi/ah72vg9p/mulgii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *डायनासोरचा विनाश केव्हा झाला ?*पृथ्वीचं पर्यावरण सतत बदलत असतं. निसर्गाचा तो नियमच आहे. सजीवसृष्टीवर या बदलांचा प्रभाव पडतच असतो. त्यामुळे या बदलांशी मिळतंजुळतं घेत तगून राहण्याची क्षमता या सजीवांच्या प्रजातींमध्ये असते त्यांची वाढ होते, विकास होतो. ती प्रजाती तगडी होते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा जास्त वापर तिच्याकडून होतो. सहाजिकच तुलनेने दुबळ्या असणाऱ्या प्रजातींची हळूहळू पिछेहाट होत कालांतराने ती प्रजाती नष्ट पावते. आजवर अशा अनेक प्रजातींचा उदय झाला, विकास झाला, काही काळ या पृथ्वीतलावर नांदल्या आणि हळूहळू विनाश पावल्या. आपण ज्या मनुष्यजातीत मोडतो त्या होमो सपायन्स या प्रजातीचा उदय होण्यापूर्वीही होमो इरेक्ट्स, निआनडर्थल वगैरे मानवासारख्या प्रजाती या भूमितलावर नांदत होत्या. पण त्या होमो सपायन्सइतक्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या बाबतीत तगड्या नसल्यामुळे विनाश पावल्या. निरनिराळ्या प्रजातींची उत्क्रांती करण्याचे असे प्रयोग निसर्गाकडून नेहमीच होत आले आहेत. त्यातले जे यशस्वी झाले त्या प्रजाती आज आपल्याला सभोवार दिसतात. जे प्रयोग अयशस्वी झाले त्या प्रजाती आता नष्ट झाल्या आहेत. डायनोसॉर ही अशीच एक प्रजाती होती. तिचा उदय निसर्ग नियमांनुसार झाला. तब्बल साडेसोळा कोटी वर्ष ती प्रजाती या भूमितलावर नांदली. त्या वेळेची ती सर्वात प्रबळ प्रजाती होती. पण कालांतराने तिचा विनाश झाला तो मात्र उत्क्रांतीच्या नियमानुसार झाला नव्हता. एका विलक्षण अपघातापोटी ती दुर्घटना झाली. अवकाशातून एक अजस्त्र लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळला. आज जिथे मेक्सिको आहे साधारण त्या प्रदेशात हा अाघात झाला. तो आघात इतका भयानक होता की तो लघुग्रह पृथ्वीचं कवच फोडून तिच्या पोटात घुसला. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ, कचरा आकाशात फेकला गेला, आगी लागल्या, ज्वालामुखींचे उद्रेक झाले, त्सुनामी आली, प्रचंड वादळं झाली, तीव्र अाम्लवर्षा कोसळली. पृथ्वीच्या पर्यावरणात उलथापालथ होत सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल यांचं प्रमाण वाढलं. स्फोटासारख्या त्या आघातामुळे उष्णतेची लाट पसरली. तिच्या मार्‍यात सापडलेले सजीव वाचू शकले नाहीत. त्याचबरोबर आकाशात पसरलेल्या धुळीच्या आवरणामुळे सूर्यप्रकाश अडवला गेला. पृथ्वीवरचं सरासरी तापमान घसरलं. वनस्पतींना वाढीसाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांचा विनाश होत गेला. पर्यावरणातल्या या अचानक आलेल्या बदलांशी मिळतेजुळते घेण्यासाठी आवश्यक तितका वेळही मिळाला नाही. त्यामुळे त्यात तगून राहण्याची क्षमता असलेले सजीवही नष्ट होत गेले. या अस्मानीसुलतानीपुढे डायनासाॅरसारख्या तगड्या प्रजातीचा टिकाव लागला नाही. ही घटना धरतीच्या इतिहासातील क्रेटेशियस कालखंडाच्या अखेरीस आणि टर्शरी कालखंडाच्या आरंभाच्या सुमारास म्हणजे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाली.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जो संपुर्ण वर्षाचा विचार करतो,तो धान्य पेरतो. जो पुढील दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो..जो आयुष्यभराचा विचारकरतो, तो माणूस जोडतो..आणि जो माणसं जोडतो, तोच आयुष्यात यशस्वी होतो....*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1) *कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गाण्याची प्रथा कोणी सुरू केली ?* विष्णू दिगंबर पळसकर2) *राष्ट्रगीत प्रथम कोणत्या भाषेत लिहिले गेले ?* बंगाली3) *'चले जाव' ही घोषणा कोणी दिली ?* महात्मा गांधी4) *'आराम हराम है' ही घोषणा कोणी दिली ?* पं जवाहरलाल नेहरू5) *'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा ' ही घोषणा कोणी दिली ?* डॉ बाबासाहेब आंबेडकर*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● बंडू अंबटकर● बंडोपंत लोखंडे● गोविंद कवळे● वृषाली सानप काळे● कमलाकर जमदाडे● प्रदीप यादव● अविनाश खोकले● श्याम उपरे● उदय स्वामी● प्रभाकर शेळके● परमेश्वर म्हेत्रे● श्रीधर जोशी● नवनाथ मुसळे● राजकुमार बिरादार● बालाजी मंडाळेकर● गणेश मंडाळे● प्रकाश भादेकर● शहेबास खुरेशी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कुटुंब संस्थेचा मध्यवर्ती केंद्रबिंदू म्हणजे घर. घराचे आकर्षण फक्त मानवालाच असते असे नाही, तर पहाटेपूर्वी आकाशात भरारी घेतलेले पक्षी, माळरानावर चरण्यासाठी गेलेली जनावरे सायंकाळी आपल्या घराकडे वळतात. घर हे माणसांइतकेच पशुपक्षी, जनावरांना हक्काचा निवारा वाटते. पूर्वीची घरे एकत्र कुटुंबपद्धतीला सामावून घेणारी होती. दोन-तीन पिढ्यांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र रहायचे. लहान मुला-मुलींच्या किलबिलाटाने घराचे गोकुळ होऊन जात असे. घराच्या भिंती फक्त दगड मातीच्या नव्हत्या, तर त्या प्रेम, जिव्हाळ्याने रसरसलेल्या होत्या. नातेसंबंध नुसते नातेसंबंध नव्हते, तर नात्यात मायेची ऊब होती.**आज वृद्धांच्या समस्या 'आ' वासून उभ्या आहेत. मुलं परमुलखात गेल्यामुळे एकाकी पडलेली वृद्ध मंडळी एका बाजूला दिसतात, तर दुसरीकडे घरात मुलं, सुना, नातवंडे असूनही अवहेलनेने भरलेले एकाकीपण जगणारी वृद्ध मंडळी दिसत आहेत. समृद्ध संसारातील एक अडगळ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. मुला-लेकरांच्या सुखासाठी तुफान होऊन झगडलेल्या माता पित्यांना 'थकलेल्या तुफानाला कुणी घर देता का घर...?' असं म्हणत भटकायची वेळ येते. अशी अनेक झुंजलेली तुफानवादळे रस्त्याकडेला, पुलाखाली, किंवा वृध्दाश्रमात नशिबाला दोष देत कण्हत पडलेली दिसतात.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जहाँ न जाको गुन लहै, तहाँ न ताको ठाँव । धोबी बसके क्या करे, दीगम्बर के गाँव ॥ अर्थ : जिथे आपल्याला पात्रता व योग्यतेनुसार गुण व कौशल्य दाखवण्यासाठी कार्य कर्तृत्त्व करण्यास वावच नसेल तिथे राहून काय हशील होणार आहे ? तिथे राहाणे व्यर्थच आहे. ही बाब पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात की, ज्या गावात सर्व दिगंबरच (कपडे विरहित लोक) राहातात तिथे राहून धोब्याला काय उपयोग होणार आहे ? कला ही जीवनाची सावली मानली जाते. 'कलेनेच माणसाची ओळख ।एरव्ही कोण पुसतो आणिक ?तुम्ही आहात राव की रंक ।आता कोणी पुसेना ।' असे राष्ट्रसंत तुकडोजी ग्रामगीतेत म्हणतात. कलावंतानं आपली कला जीवनाचा आधार केली व कलेचा अहंकार अंगी न बाळगता तिला विनयशीलतेची जोड दिली की सर्व जग आपलंस होवून जातं. आपलं कसब व कौशल्य अशा ठिकाणी दाखवायला हवं की ते आपल्या जीवनाला स्वावलंबनाकडे नेईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा आपल्याकडे लोक पाठ फिरवतात आणि जेव्हा आपली वेळ चांगली असते तेव्हा सगळेच जवळ येतात.परिस्थिती कशीही असली तरी प्रत्येकवेळी सुखदुःखात जे आपल्या पाठीशी असतात आणि आपण प्रत्येकवेळी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाठीशी असतो तीच खरी माणुसकी असते आणि तीच खरी अंत:करणातून एकमेकांबद्दलची खरी आत्मियता असते.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *रेघ लहान झाली.*अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते. चालता चालता बादशाह अचानक थांबला. बादशहाने वाळूत बोटाने एक रेघ मारली आणि बिरबलाला विचारले. “ही रेघ पाहिलीस? ही रेघ लहान करायची, पण पुसायची नाही, जमेल तुला?”बिरबलाने एकवेळ बादशहाकडे व एकवेळ रेघेकडे पाहिले. थोडा विचार केला. पटकन खाली वाकला. रेघेशेजारी दुसरी लांब रेघ मारली आणि म्हणाला, “झाली की नाही महाराज तुमची रेघ लहान?” बादशाह चकित होऊन पाहतच राहिला!*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~

*वाचन विकास भाषिक उपक्रम .*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️http://www.pramilasenkude.blogspot.com*विषय - मराठी**📚उपक्रम - शब्द वाचूया, शब्द लिहूया.✍*🌸🌸🌸🌸🌸🌸🌸*घर, बस,वड, नळ, कप, मध,ऊस,शहर,झडप, समई, पपई, मगर , मदत,गवत,लक्ष, वचन, चटकन,चटई, यज्ञ, भट, इतर,सरबत,पपई,उकड, अहमद,घरभर,नमन, वजन,परत,टणक,थरथर,मलम,लवकर, अटक,शतक, सनद, हसत,हसन, बल, तन, तरस, भरत, मदन, अमर ,रस,उचल,उखळ, ऊब, पवन, टपटप , ढग , बबन , हसत, लवकर,फणस, उठ,आई, पाऊस, दर,धन, रमण, उगम, हळद, करण, गरम,फळ, कढई, जखम,वड, खडखड, बडबड, चरक,भरत, सरळ,परत,धरण, पण,थरथर ,दगड,गगन,जल,नग,नगर ,नमन,नऊ,छगन,खत,कसरत,कटकट,गडगड,घड,चरण,छत,जवस, वर, फणस, अननस, परस, वरण, सण, चल, भरभर, सरसर,गरज, पटकन, सरबत.*--------------------------------📚📚📚📚📚📚*✍संकलन / लेखन* *श्रीमती प्रमिला सेनकुडे.**ता.हदगाव जि.नांदेड.*http://www.pramilasenkude.blogspot.com