✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 21/09/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आंतरराष्ट्रीय शांति दिन*💥 ठळक घडामोडी :-◆ १९९५ - भारतात अनेक व्यक्तिंनी दावा केला की गणपतीच्या मूर्तीसमोर दूध ठेवले असता त्याने ते दूध प्यायले.◆ २००३ - गॅलेलियो या अंतराळयानाने मुद्दामहून गुरूच्या वातावरणात प्रवेश केला. अत्यंत दाबामुळे यान नाश पावले.💥 जन्म :-●१९३२ - पंडित जितेंद्र अभिषेकी, भारतीय-मराठी गायक, मराठी संगीतकार.●१९८० - करीना कपूर, भारतीय अभिनेत्री.💥 मृत्यू :-◆ १९९९ - पुरुषोत्तम दारव्हेकर, मराठी नाटककार, मराठी नाट्यदिग्दर्शक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *पुणे विद्यापीठात 'ABVP'चं ठिय्या आंदोलन, परीक्षा शुल्क माफ करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *आफ्रिकेतून भारतात आणलेल्या चित्त्यांना बिष्णोई समाजाचा विरोध; पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोरोना काळातील राजकीय आणि सामाजिक गुन्हे मागे, राज्य सरकारची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात पेड ई-पास सुविधा दिली जाणार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मदर डेअरीने गेल्या महिन्यात दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *काश्मीरमध्ये चित्रपट पाहणं शक्य, 1ऑक्टोबरपासून श्रीनगर इथं राज्यातलं पहिलं मल्टिप्लेक्स सुरू होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुण्याच्या सरहद संस्थेकडून कारगिल मॅरेथॉनचं आयोजन, राज्यातील धावपटूंचाही सहभाग*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Action words कृतीयुक्त शब्द👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/v82KSVHetDI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लघुकथा - चोरी*https://nasayeotikar.blogspot.com/2019/09/blog-post_20.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *टिश्यू कल्चर म्हणजे काय ?* 📙टिश्यू कल्चर हा शब्द अलीकडे वरचेवर कानावर पडत असला व त्याचा वापर सरसहा सुरू झाला असला तरीही १९०२ साली म्हणजे शंभरापेक्षा जास्त वर्षांपूर्वी *जी. हाबरलँड* यांनी टिश्यू कल्चरची पद्धत शोधून ती यशस्वी करून दाखवली होती. त्यांनाच या शास्त्राचा प्रणेता मानले जाते. एका पेशीपासून संपूर्ण वनस्पतीची, झाडाची, रोपाची निर्मिती करणे म्हणजे 'टिशू कल्चर' असे म्हणता येईल. ही निर्मिती कृत्रिमरीत्या तयार केलेल्या वातावरणात वा प्रयोगशाळेत केली जाते. याला टोटी पोटन्सी असा शब्द वापरला जातो. प्राण्यांच्या एकाच पेशीपासून असे बनत नाही म्हणून त्यांना 'प्युरोपोटंट' असे समजले जाते. त्यासाठी क्लोनिंगची पद्धत वापरली जाते.टिशू कल्चरमध्ये पेशीसंवर्धन करण्यासाठी विविध पूरक माध्यमांचा वापर केला जातो. या माध्यमांतून वाढीला अावश्यक सर्व घटकांचा पुरवठा होतो. एकपशीयपासून छोट्या रोपापर्यंतचा प्रवास अत्यंत नाजूकपणे जपावा लागतो. त्यानंतर ही रोपे लागवडीयोग्य झाल्यावर प्रयोगशाळेतून बाहेर नेतात. मुराशिगे स्कूग यांनी १९६२ मध्ये वापरलेले माध्यम, गँबर्ग यांचे १९६८ चे माध्यम, शेंक व हिल्डर ब्रॅण्ड यांचे १९७२ चे माध्यम अशा काही माध्यमे या वृद्धीसाठी वापरली जातात. नियंत्रित तापमानात, जंतूविरहित अवस्थेत प्रयोगशाळेतच ही वाढ होत असते.या साऱ्या प्रक्रियेदरम्यान तयार होणारी सर्व रोपे पूर्णतः एकसारखी असतात. त्यामुळे एकाच प्रकारची, एकाच रंगाची फुले देणारी, एकाच दिवशी फुलणारी अशी रोपे तयार करणे शक्य झाले आहे. शोभिवंत रोपवाटीकांसाठीची रोपटी, केळीच्या बागांसाठीची छोटी रोपे अशांसाठी टिश्यू कल्चरचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. काही आठवड्यांत काही लाख रोपे तयार करणे, त्यांची निर्यात करणे हे केवळ या पद्धतीमुळेच शक्य होते.टिशू कल्चरमुळे दुर्मिळ वनस्पतींचे जतन व वृद्धी, फलोद्यान व उद्यानवृक्षांसाठीची एकसारखी निर्मिती, संशोधन यासाठी अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. महत्त्वाची व व्यवहारातील अत्यंत उपयुक्त गोष्ट म्हणजे खतांचा कमी वापर करून, किडीला सक्षमपणे तोंड देऊ शकणारी, अल्पकाळात पिके देणारी, भरघोस उत्पन्न देणारी वा दुष्काळी वातावरणातही तग धरणारी अशी वनस्पती निर्माण करणे शक्य झाले आहे.या साऱ्या प्रक्रियेतून दुय्यम उत्पादन म्हणूनही काही गोष्टी संशोधकांच्या हाती लागत गेल्या आहेत. काही प्रतिजैविके, रोगनाशके, अल्कलाॅइड्स, हार्मोन्स यांची निर्मिती शक्य होते. एकंदरीतच फार मोठे भांडवल, तज्ज्ञांची देखरेख व अद्ययावत प्रयोगशाळांची आवश्यकता असलेला हा टिश्यू कल्चरचा पसारा व आवाका आपल्या दैनंदिन जीवनाला वेढत चालला आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) मध्यप्रदेशच्या पालपूर - कुनो राष्ट्रीय उद्यानात १७ सप्टेंबर २०२२ ला सोडण्यात आलेले ८ चित्ते कोणत्या देशातून आले ?२) 'मिस्टर आयपीएल' अशी ओळख असलेल्या क्रिकेटपटूचे नाव काय ?३) जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मिती कोणता देश करतो ?४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या कार्याशी संबंधित आहे ?५) कीटकभक्षी वनस्पतींची नावे सांगा.*उत्तरे :-* १) नामिबिया २) सुरेश रैना ३) भारत ४) सामाजिक कार्य ५) घटपर्णी, व्हिनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जिग्नेश क्रांती बुद्धेवार● कु. आद्या साईनाथ लखमावाड● सौ. वर्षाराणी मारोती होनशेट्टे● सचिन तोटावाड● विष्णू गंभीरे● निशांत जिंदमवार● प्रकाश जाधव● स्मिता मिरजकर वडजे● आकाश कोलपकर● गोविंद पाटील*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*श्रीपूर येथील राजा यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजवीरसिंह याला राज्यपदी बसविण्यात आले. राजवीर वडिलांसारखाच साहसी होता पण अनुभव पाठीशी कमी असल्यामुळे अनेकदा संकटात तो घाबरत असे. अशावेळी त्याची माता त्याला हिंमत देत असे व योग्य मार्गदर्शन करून संकटातून बाहेर काढत असे. शेजारच्या राज्यातील गंगानगरमधील राजा भीमसेन याची श्रीपूरवर नजर होती. एके दिवशी भीमसेनने श्रीपूरवर आक्रमण केले. दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली, तुंबळ युद्ध झाले. भीमसेनकडे सैनिक खूप प्रमाणात होते. दोनच दिवसात भीमसेन यांनी चार मैल भागावर आपला ताबा मिळविला. राजवीरच्या तोंडून कमी सैनिकांमुळे आपल्याला हार पत्करावी लागली हे ऐकले तेव्हा राजमातेने मनातल्या मनात काही ठरवले.**राजवीर झोपण्याआधी राजमातेचे दर्शन घेण्यासाठी आला तेव्हा राजमाता लहान लहान सहा लाकडाच्या काड्या एकत्र बांधून लोखंडाच्या मोठ्या तुकड्याला तोडण्याचा प्रयत्न करीत असलेली पाहिली. राजवीरने मातेला विचारले,’’आई, सहा लाकडाच्या काड्या एकत्र करूनही लोखंडाला तोडू शकत नाही’’ राजमाता म्हणाली,’’खरं बोललास, संख्येने मजबुतीला पराजित केले जाऊ शकत नाही त्याप्रमाणे आपले वीर सैनिक आणि तू या लोखंडासारखे मजबूत व्हा. शत्रूची कितीही संख्या तुम्हाला तोडू शकणार नाही अशी ताकद तुमच्यात आहे ती जागृत करा. तुमच्या मजबुतीसमोर शत्रू गुडघे टेकेल.’’ राजवीरने याप्रमाणे केले व त्याने भीमसेनाला हरवून युद्धात विजय संपादन केला. दृढ मनोबलाने हारलेले युद्धही जिंकता येते. काही वेळेला दृढनिश्चय, ठाम मनोबल हेच यशाचे इंगित असते.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शोध घ्यायचा असतो तो चांगल्या विचारांचा,बोध घ्यायचा असतो तो गोष्टींचा,सहवास मिळवायचा असतो तो सर्जनशील व्यक्तींचा ज्यामुळे आपल्या जीवनात महत्वाचे बदल होण्यास अनुकूल ठरेल.जेव्हा केव्हा आपण विचार करायचा तर यावेळी वरील तीन गोष्टींबाबत नक्कीच करावा अन्यथा आपल्या जीवनाचे नक्कीच नुकसान होऊ शकेल की,जे आपल्या जीवनासाठी बाधक ठरेल.आपली आपल्या माणसांत आणि इतर लोकांत कवडीचीही किंमत राहणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *गैरसमज आणि अनुमान**एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो ,त्याची ताई हसतहसत म्हणाली,"दादा एक पेरु मला दे". तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरतडला.त्याची ताई काहीच बोलली नाही. मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरतडला. आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले*. *तेव्हा तिच्या लहानग्या भावानेे चिमुकले हात पुढे करुन कुरतडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणाला "ताई , हा घे.हा जास्त गोड आहे." ताईच्या डोळ्यात पाणी आले...**प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबर असतीलच, अस नाही*...*एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे हित असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment