✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/09/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१८७३ - महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.◆१८८४ - महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरवात होय.💥 जन्म :-●१९११ - राप्पल संगमेश्वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.●१९२० - भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.● १९४३ - तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.●१९५० - डॉ. अभय बंग. ●१९५७ - कुमार शानू, पार्श्वगायक.💥 मृत्यू :-★१९६४ - भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.★ १९९९ - गिरीश घाणेकर - मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *रुपयाने मोडले सगळे रेकॉर्ड ! इतिहासातील सर्वात मोठी घसरण, सणासुदीला वाढणार महागाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मेटाव्हर्ससाठी लागणारे कौशल्य निर्माण करण्यासाठी स्टार्टअप प्रोग्राम लॉन्च; आयटी मंत्रालयाचा उपक्रम*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *काँग्रेसला 19 ऑक्टोबरला नवा अध्यक्ष मिळणार, निवडणुकीचे नोटिफिकेशन जारी, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खासदार शशी थरुर यांचे नाव चर्चेत*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *विधानसभा अध्यक्षांकडून नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *रूपी बँकेला हायकोर्टाचा दिलासा, परवाना रद्द करण्याच्या निर्देशाला 17 ऑक्टोबरपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *हैदराबादमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी आलेल्या प्रेक्षकांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल सामन्यांची धुमधाम आता देशभर, सामने पुन्हा Home-Away फॉर्मेटमध्ये, सौरव गांगुलीची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Month of the Year 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/gZjoOzwNoTs~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दोषमुक्तीसाठी आत्मपरीक्षण*https://nasayeotikar.blogspot.com/2018/08/blog-post_95.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचनाची गरज* विद्यार्थ्यांनीशिकवण्याच्या आधी वाचले पाहिजे हे आपण पाहिले. मात्र वाचलेले लक्षात राहण्यासाठी काही क्लृप्त्या आहेत. वाचलेले समजणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच ते लक्षात ठेवणे व पाहिजे तेव्हा आठवणे महत्त्वाचे आहे. खाणे जेवढे महत्त्वाचे असते तेवढेच महत्त्वाचे पचवणे असते. वाचण केलेले समजून लक्षात ठेवण्याची व ती वेळेवर आठवण्याची प्रक्रिया पाहू या. वाचनानंतर झोप महत्त्वाची आहे किंवा झोपेतून जागे झाल्यावर वाचन केल्यास फायद्याचे ठरते. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी वाचनाचा सराव केला पाहिजे. ज्यांना झोप लागत नाही. झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. त्यांच्यासाठी वाचन हे एक वरदान आहे. वाचन हे निद्रानाशावर रामबाण औषध आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचन केल्यास रात्री झोपेत अर्धचेतन मनाद्वारे त्याच्यावर प्रक्रिया केली जाते.सकाळी किंवा पहाटे झोपेतून उठल्याबरोबर वाचन केल्यास स्मरणशक्ती सुधारते, कारण झोप पूर्ण झाल्यावर मेंदू व मन ताजेतवाने झालेले असते. त्यामुळे आपली काम करण्याची क्षमता उत्तम असते. नुसते वाचनच नाही तर इतर कोणतीही गोष्ट झोपेतून उठल्याबरोबर केल्यास फायदेशीर ठरते.सकाळी अथवा पहाटे काम उरकण्याचा वेग कमालीचा उच्च असतो. त्यामुळे पहाटे वाचण्याचे व लिहण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्यापूर्वी वाचणे हे उपयुक्त आहेच. मात्र दिवसभरात आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचलेले चांगलेच ठरते. वाचलेले दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी काही उपाय आहेत.** ध्यान – नियमित ध्यान केल्यास वाचनाचा वेग व एकाग्रता वाढते. आकलन क्षमता सुध्दा सुधारते. ध्यान दररोज केल्यास त्याचे इतरही फायदे होतात. मनावरील ताण कमी होण्यास व विचारांवर कंट्रोल मिळवण्यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ध्यानामुळे सजगता वाढते.** त्राटक – त्राटक साधना स्मरणशक्ती साठी खूपच लाभदायी आहे. त्राटक करण्याची पध्दती म्हणजे एक मेणबत्ती पेटवून ठेवा. डोळ्याच्या व नजरेच्या समांतरउंचीवर ठेवा. डोळ्याची पापणी न पाडता एकटक त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पहात रहा. सुरवातीला डोळ्यात जळजळ वाटेल. डोळ्यातून पाणीसुध्दा येईल. डोळ्यात जळजळ व्हायला लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी यायला लागल्यास त्राटक साधना थांबवा. नंतर पुन्हा थोड्या वेळाने प्रयत्न करावेत. टप्प्याटप्प्याने हाकालावधी वाढवत दहा मिनिटांपर्यंत न्यावा.त्राटक करण्याची अजून एक पध्दती आहे. एका मोठ्या कागदावर मध्यभागी एक सेमी व्यासाचे वर्तुळ काढा. हे वर्तुळ पूर्ण रंगवून घ्या. हा कागद नजरेच्या समांतर उंचीवर ठेवून वरील प्रमाणेच कृती करा. त्राटक साधनेचा कालावधी हा एका बैठकीत १० मिनिटांपर्यंत होण्याचे आपले लक्ष्य असले पाहिजे.** प्राणायाम – प्राणायाम केल्यास मेंदूला होणारा रक्तातील ऑक्सिजन पुरवठा जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे मेंदू तल्लख होतो. प्राणायामाच्या सोप्या पध्दती आहेत. अनुलोम व विलोमाची पाच आवर्तने दिवसातून दोनदा केली पाहिजेत. अनुलोम व विलोम करण्याची प्रक्रिया पाहू या. उजवी नाकपुडी हाताच्या बोटाने बंद करुन डाव्या नाकपुडीने शक्य तितका श्वास घ्यावा. मग डावी नाकपुडी बंद करुन उजव्या नाकपुडीने श्वास सोडून द्यावा. परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यावा आणि डाव्या नाकपुडीने सोडावा. या दोन्ही प्रक्रियेला एकत्रित पणे अनुलोम व विलोम म्हणतात. अशी पाच आवर्तने सकाळी एकदा व सायंकाळी एकदा करावीत किंवा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा सुध्दा केल्यास चालेल.वाचनातून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करुन आपल्या शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वाचनाचे आकलन होणे सुध्दा महत्त्वाचे आहे. वाचन केल्यावर वाचलेल्या विषयाच्या नोट्स काढाव्यात. नंतर वेळ मिळाल्यास त्या नोट्स वाचाव्यात. नोट्स काढणे शक्य नसल्यास वाचलेल्या विषयावर एखाद्या व्यक्तीसोबत चर्चा करावी. त्यामुळे त्या व्यक्तीला त्या वाचनाचा लाभ आपण देऊ शकतो. मात्र त्यापेक्षा आपलाच जास्त फायदा त्यातून होतो. वाचलेला विषय लक्षात राहण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. वाचन वाढवून जीवन समृध्द व यशस्वी बनवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा! *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) कर्तव्यपथ आणि इंडिया गेटजवळ उभारलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे मूर्तिकार कोण ?२) आंतररष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे पहिले तीन क्रिकेटपटू कोण आहेत ?३) जगातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?४) कोणत्या राज्यसरकारने नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे ?५) ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जगातील किती देशांना भेटी दिल्या ?*उत्तरे :-* १) अरुण योगीराज २) सचिन तेंडूलकर, भारत ( १०० शतके ), विराट कोहली, भारत ( ७१ शतके ), रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया ( ७१ शतके ) ३) बुलेट ट्रेन ४) महाराष्ट्र ५) ११७ देश*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ डॉ. सुरेश येवतीकर, वरिष्ठ व्यवस्थापकमहाराष्ट्र ग्रामीण बँक, औरंगाबाद◆ सौ. प्राजक्ता कुलकर्णी-पाठक, पुणे◆ रविंद्र जवादे, साहित्यिक◆ विशाल मनवर◆ प्रदीप माळगे◆ वीणा खानविलकर◆ साई सुरेंद्र गादेकर◆ संगीता क्षीरसागर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.**अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.* *॥ रामकृष्णहरी ॥*🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाईल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *काव्यांगण* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जुन्या सावकारी ऋणासारखाकसा जीवना तू उणा सारखाविसरलाच जाणार मीही उद्याशकासारखा वा हुणासारखाजरी सत्य आले पुरासारखेउभा ठाकलो मी तृणासारखाअशी कागदा नाळ तोडू नकोइथे शब्द माझा भ्रुणासारखामला तूच शोधीत ये ना कधीतुझ्या शोधतो मी खुणा सारखा— अभिजीत दातेसौजन्य :- इंटरनेट•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या सागरातून उसळणाऱ्या लाटा तीव्र गतीने किना-याकडे झेपावत येतात तेव्हा असे समजायचे की, नक्कीच किना-याचे नुकसान होणार आहे.त्यापासून सावध होण्याचा इशाराही दिला जातो.पण ज्या लाटा सागरातून किना-याकडे हळूहळू मार्गक्रमण करत येतात तेव्हा त्याच लाटा किना-याचे सौंदर्य वाढवतात आणि मानवी मनाला आल्हादकारक वाटतात.अशाच पध्दतीने मानवी मनाचेही लाटासारखेच आहे.काहीच विचार न करता अचानक एकाएकी घेतलेले निर्णय कधीकधी चालत असलेल्या चांगल्या जीवनाला नुकसान करु शकतात.असे निर्णय घेताना शांत चित्ताने आणि सारासारविचारपूर्वक घेतले तर सर्वांनाच फायदा होईल.असेच जीवनात सागरातल्या शांत लाटाप्रमाणे राहून जीवनालाही किना-यासारखे सुंदर बनवता येईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *निर्मळता*गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते. फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले. जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता. गुरुजींना तहान लागली होती. त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले. शिष्य झऱ्या पाशी गेला आणि त्याला असे दिसले कि तेथून नुकतेच बैल गाड्या गेल्या आहेत, बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गढूळ झाले आहे. पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत. त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही. तो तसाच परत गुरूंकडे गेला आणि म्हणाला,"गुरुजी, पाणी खूप गढूळ आहे, आपल्याला दुसरी काही तरी व्यवस्था पहावी लागेल." गुरुजी म्हणाले," अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर." शिष्य गेला, त्याला पुन्हा पाणी गढूळ दिसले, तो परत आला, गुरूंनी त्याला परत पाठवले, असे चार पाच वेळेला झाले. शेवटी शिष्य कंटाळला, त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुज्ञा मोडायला तयार नव्हता. गुरूंनी त्याला परत पाणी आणायला पाठवले. आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण या वेळी पाणी अगदी नितळ, स्वछ नि निर्मळ होते. त्याने ते पाणी कमंडलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला. गुरूंनी पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले,"वत्सा ! आपल्या मनात सुद्धा असेच कुविचारांचे बैल धिंगाणा घालत असतात. ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात. पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे. कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतिक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ, चांगले विचार येतील. भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये."तात्पर्य :- भावनेच्या भरात कोणतेही निर्णय घेऊ नयेत. मनात कायम स्वच्छ, चांगले विचार कसे येतील हेच पाहावे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment