✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 22/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १५९९ - भारतावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव★ १८२७ - जोसेफ स्मिथ जुनियरच्या म्हणण्यानुसार मोरोनी देवदूताने त्याला सोन्याच्या पत्र्यावर लिहीलेली मॉर्मोनपंथाची कथा दिली. (चित्रित)★ १९५५ - ब्रिटनमध्ये टेलिव्हिजनचे व्यावसायिकरण सुरू, सहा मिनीटांची जाहिरात ★ २०१३ - पाकिस्तानच्या पेशावर शहरात मुस्लिम दहशतवाद्यांनी चर्चच्या बाहेर हल्ला करून ७५ लोकांना ठार केले आणि १३० लोकांना जखमी केले💥 जन्म :-★ १७९१ - मायकेल फॅरेडे, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.★ १८८७ - कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक.💥 मृत्यू :-★ १५३९ - गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक.★ १९९१ - दुर्गा खोटे, अभिनेत्री★२०११ - मन्सुर अली खान पतौडी यांचे निधन *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *NPS रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ; राज्यभर शिक्षकांची बाईक रॅली*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गडचिरोलीत दोन जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, माओवाद्यांना मोठा धक्का, जनआंदोलनातून नक्षली शहरी भागात प्रभाव वाढवण्याच्या तयारीत ? सुरक्षा यंत्रणेत सहभागी होण्याची शक्यता*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *घाटकोपरमध्ये ओला चालकाची रिक्षा, टेम्पो, बाईकला धडक; आठ जण जखमी, तीन विद्यार्थ्यांचाही समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *फिफाचा नियोजित कार्यक्रम उशिरा, उपमुख्यमंत्री अजित पवार अडीच तास ताटकळत, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वेळेवर न पोहोचल्याने मंत्रालयातून बाहेर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *पत्राचाळ संदर्भातील भाजप आमदार अतुल भातखळकरांच्या आरोपांनंतर शरद पवारांचं राज्य सरकारला आव्हान, लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॉमेडी किंग राजू श्रीवास्तवने घेतला जगाचा निरोप; राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मुंबईत चालवली होती रिक्षा; 50 रुपये घेऊन बर्थ-डे पार्टीत स्टँडअप कॉमेडी, राजू श्रीवास्तव यांना फ्रेश मॉर्निंग बुलेटिन टीमकडून भावपूर्ण श्रद्धांजली !*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, कोकणकन्या एक्स्प्रेस आता 'सुपरफास्ट', गाडी क्रमांक आणि वेळापत्रकही बदललं*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••Class 1st*My fruit basket👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/y-VbWtmOi5E~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *पालकांचे मुख्याध्यापकांस पत्र*https://nasayeotikar.blogspot.com/2018/06/blog-post_29.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *डायनॅमो म्हणजे काय ?* 📙डायनॅमो म्हणजे वीजउत्पादनाचे यंत्र. या यंत्राची ताकद व आकारावरून त्याला निरनिराळी नावे दिली जातात. डायनॅमो म्हटला की, सायकल वा मोटारसायकलसाठी वापरला जाणारा वीजउत्पादक समोर येतो. जनरेटर म्हटला की, घरासाठी, छोट्या कारखान्यांसाठी वीज निर्माण करणारे यंत्र समोर येते. वीजकेंद्रांसाठी याचीच मोठी भावंडे म्हणजे भलीमोठी विद्युतजनित्रे वापरली जातात.डायनॅमोचे तत्त्व *मायकल फॅरडे* यांनी १८३१ साली शोधले. त्याआधीच्या काळात वीज छोट्या बॅटरीत रासायनिक प्रक्रियेतूनच मिळवली जात असे. सलग वीज वापरणे हे त्यामुळे अर्थातच महागडे व अवघडही होते. डायनॅमोचे तत्त्व वापरून विजेचा वापर सुरू झाला आणि सारे चित्रच बदलून गेले.कोणत्याही डायनॅमोमध्ये मुख्यत: लोहचुंबक तांब्याच्या तारेच्या वेटोळ्याभोवती फिरतो व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विजेचा वापर तारेच्या वेटोळ्याच्या दोन टोकांमधून घेऊन केला जातो. याउलट परिस्थिती पण असू शकते. म्हणजेच एखाद्या स्थिर चुंबकाभोवती तारेचे वेटोळे फिरत राहते. चुंबकीय क्षेत्र ज्यावेळी तारेच्या वेटोळ्याने छेडले जाते, त्यावेळी वीजनिर्मिती होते. डायनॅमो फिरवण्यासाठी वापरली जाणारी यांत्रिक ताकद हीच या पद्धतीत विद्युतनिर्मितीमध्ये बदलली जाते. एका ऊर्जेचे दुसऱ्या स्वरूपात रूपांतर केले जाऊन हीच ऊर्जा आपण दिव्याच्या उष्णतेच्या स्वरूपात उजेड पाडण्यासाठी वापरतो.डायनॅमोचा वापर सुरू झाला आणि वीजनिर्मितीच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली. १८६७ साली मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती करणारी केंद्रेही कार्यरत झाली होती. पण मुख्यतः डायनॅमोचा फायदा दुचाकी वाहनांसाठी आजही होतो. आडनिडय़ा अंधार्या रस्त्याला जाताना विजेरी वापरण्याऐवजी डायनॅमो चाकाला लावून फिरेल, अशी व्यवस्था केली की, सायकलचा पुढचा रस्ता स्वच्छ दिसू लागतो. एवढी त्यातून निर्माण होणाऱ्या विजेची दिव्याला पुरवली जाणारी शक्ती असते.सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये दिवे, हाॅर्न्स, वाहनांमधील छोटी मोठी यंत्रे, (रेडिओ, पाणी साफ करणारा वायपर, निरनिराळे इंडिकेटर्स) चालवण्यासाठी जास्त ताकदीचा डायनॅमोचा वापर केला जातो. एवढेच नव्हे, तर यातून तयार होणारी जास्तीची वीज रासायनिक विद्युतघटात साठवून ठेवण्याची पण अंगभूत व्यवस्था सर्व चारचाकी वाहनात केलेली असते. वाहन सुरू करत असताना किंवा वाहन बंद असताना हीच विद्युतघटातील ऊर्जा वापरून यंत्राकरवी काम करून घेता येते.सहसा दुचाकी वाहनांसाठी वापर केला असता डायनॅमोमधून दीड ते बारा व्होल्ट या दाबाची वीज निर्माण केली जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*You only lose when you give up.* *(तुम्ही तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही सोडून देता.)**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) नामिबियातून ८ चित्त्यांना भारतात आणणाऱ्या बी - ७४७ या जेट विमानावर कोणत्या प्राण्याचे चित्र रंगवण्यात आले होते ?२) कॉम्रेड ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी लांब पल्ल्याची मॅरेथॉन ( ९० किमी ) स्पर्धेत सहभागी झालेल्या गोंदियातील धावपटूचे नाव काय ?३) कर्तव्यपथ आणि इंडिया गेटजवळ उभारण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उंची किती आहे ?४) ब्रिटनच्या सम्राटपदी ( राजा ) कोणाची निवड झालेली आहे ?५) इ. स.१४०० मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला ?*उत्तरे :-* १) वाघ ( भारताचा राष्ट्रीय प्राणी ) २) बिंदेशसिंह ढाकरवार, गोंदिया ३) २८ फिट ४) चार्ल्स तिसरे ५) वास्को द गामा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सागर घडमोडे● गंगाधर चिमटलवार● खंडोबा खांडरे● सुनील फाळके● श्याम सुरने● आनंद दुड्डे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*मानवी जीवनात 'प्रेम' या भावनेला अनन्यसाधारण महत्व आहे. एखाद्याच्या वागण्या-बोलण्यात प्रेम नसेल, तर 'कोरडा रे कोरडा' असे म्हणून त्याला दुय्यम ठरविले जाते. प्रेम ही जीवनातील सर्वोच्च अवस्था असून त्याद्वारे जग जिंकता येते. शत्रूलाही मित्र बनवता येते. याच प्रेमाचे एक रूप भक्ती हे असून त्यामध्ये आपल्याला भारतातील सर्वच संतांचा समावेश करावा लागेल. या प्रेमाचाच उत्कट आणि उच्च अविष्कार जर भक्ती असेल, तर प्रेमदेखील आपल्याला शांती आणि मोक्ष मिळवून देण्याची पहिली पायरी आहे हे लक्षात घेतले पाहिजे.**या भक्तप्रेमाचे स्वरूप इतरांपेक्षा वेगळे असते. तो मागत नाही; पण काही लपवतही नाही. तो जे आहे ते स्वत:सहित उधळून टाकतो. म्हणजेच स्वत:ला तो पूर्णपणे भगवंताच्या ताब्यात देतो. मी अपात्र आहे, अशीच कायम भावना ठेवणे हे त्या प्रेमाचे खरे लक्षण असते. योग्यता नसताना मला आयुष्यात खूप काही मिळाले, अशी ज्याला जाणीव असते, तो भक्त भगवंताच्या कृपेचा खरा पाईक असतो.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वाईट विचार करणारी माणसे स्वत:चेच काय पण इतरांचेही चांगले व्हावे असे कधीही त्यांना सुचत नाही.नेहमी त्यांच्या मनात इतरांना दु:ख कसे देता येईल,त्यांचे असलेले चांगले मन कसे विचलीत करता येईल आणि त्यांना कसा त्रास देता येईल याचाच नेहमी वाईट विचार करत असतात.त्यामुळे त्यांच्या ह्या असूरी वृत्तीमुळे ते जीवनात कधीही समाधानी आणि यशस्वी होऊ शकत नाहीत.अशा वृत्ती असणा-या माणसांचा सहवासात राहणे म्हणजे विषारी सापांशी मैत्री करुन सर्वनाश करुन घेणे होय.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🐉🍁🐉🍁🐉🍁🐉🍁🐉 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कष्टरूपी राजहंस* एक जमीनदार होता. त्याला त्याच्या वाडवडीलांपासून खूप संपत्ती मिळालेली होती. अतिश्रीमंतीमुळे तो खूप आळशी बनला होता. त्याचा दिवस हा टवाळक्या करणे व हुक्का ओढत बाजेवर पडून राहणे यातच जात असे. त्याच्या या आळशीपणाचा फायदा त्याचे नोकरचाकर इमानेइतबारे घेत असत. त्याचे नातेवाईकही या आळशी स्वभावाला ओळखून होते व तेही त्याच्या संपत्तीचा गैरफायदा घेत असत, त्याची संपत्ती हळूहळू का होईना साफ करण्यात ते मश्गुल होते. एकदा परगावाहून जमिनदाराचा एक मित्र त्याला भेटण्यासाठी आला होता. त्याने हे सर्व नोकरचाकरांचे, नातेवाईकांचे वर्तन पाहिले व मित्राला कसे लुटले जात आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने हे जमिनदाराच्या कानावर घातले पण तो इतका आळशी होता की त्याने मित्राच्या बोलण्याकडे लक्षच दिले नाही. शेवटी त्याने एक हुकुमी एक्का वापरला. तो जमिनदाराला म्हणाला,’’ मित्रा, मला असे एक संतमहात्मा माहित आहेत की जे तुझी संपत्ती दुप्पट करून देऊ शकतील. फक्त तू त्यांच्या दर्शनाला चल व ते जसे सांगतील तसे तू वाग. तुझी संपत्ती अजून वाढेल.’’ जमिनदाराला पैशाची हाव सुटली व तो संतांकडे जाण्यास तयार झाला. संतांकडे जाऊन दर्शन घेतले व संतांना मार्गदर्शन करण्यास सांगितल्यावर ते म्हणाले,’’ तुझ्या शेतामध्ये एक राजहंस रोज पहाटे सूर्योदयापूर्वी येत असतो त्याचे दर्शन तू घेतल्यास तुझ्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. मात्र इतर कोणीही त्या राजहंसाला पाहण्यापूर्वी तू पाहणे गरजेचे आहे.’’ दुस-याच दिवशी जमिनदार लोभाने का होईना पहाटे उठला व शेतात गेला. त्याला तेथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. त्याचा एक नातेवाईक पाठीवर धान्याचे भरलेले एक पोते शेतातून चोरून घेऊन चाललेला दिसला. नातेवाईकाला जमिनदाराने विचारले असता तो नातेवाईक ओशाळा झाला व माफी मागू लागला. जमिनदार लवकर उठला असल्याने तो दूध पिण्यासाठी गोठ्यामध्ये गेला तर तेथे अजून एक चकित करणारे दृश्य त्याला दिसले. त्याचे नोकर हे दूधामध्ये पाणी मिसळून दूध वाढवित होते व वाढविलेले दूध हे बाजूला ठेवून त्याचे पैसे मिळविण्यासंबंधी चर्चा करत होते. जमिनदाराने हे ऐकले व नोकरांना कामावरून काढण्याची धमकी देताच ते गयावया करू लागले व काम प्रामाणिकपणे करू असे त्यांनी सांगितले. जमिनदार आता रोजच लवकर उठू लागला व राजहंसाचे दर्शन घेण्यासाठी शेतात जाऊ लागला. यामुळे सगळे नोकरचाकर, नातेवाईक, धान्यचोर यांना मालक शेतात हजर असतो याची जरब बसली व ते चोरी करेनासे झाले. लवकर उठून शेतात फेरफटका मारल्याने जमिनादाराची तब्येत पण सुधारू लागली. चोरी कमी झाल्याने दूधदुभते, धान्य, पीक, भाजीपाला यातून जमिनदाराचे धन अजूनच वाढू लागले. पण राजहंस कसा दिसत नाही हा प्रश्न घेऊन तो संतांकडे गेला असता महात्मा म्हणाले,’’ अरे तुला तर तो राजहंस दिसला पण तू त्याला ओळखू शकला नाही. परिश्रम,कष्टरुपी नावाचा एक राजहंस तुझ्या आयुष्यात आला आणि त्याने तुझ्यातल्या आळशीपणाला दूर करून तुझ्या धनाची वाढ करून दिली.’’*तात्पर्य :- कष्टरुपी, परिश्रमरूपी परिस ज्यांच्या ज्यांच्या आयुष्याला स्पर्श करतो त्यांच्या जीवनाचे सोने बनते.मेहनतीचे फळ नेहमीच गोड असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment