✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 24/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇 * 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९३२ - पुणे करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.◆ १९९५ - मृत्युंजय या कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना 'भारतीय ज्ञानपीठ' या संस्थेतर्फे 'मूर्तिदेवी पुरस्कार' जाहीर.◆ २००७ - २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २००७ मालिकेतील दक्षिण आफ़्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेला अंतिम सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृ्त्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ५ धावांनी जिंकला.💥 जन्म :-●१९१५ - प्रभाकर शंकर मुजुमदार, चित्रपट कलावंत.●१९२१ - स.गं. मालशे, लेखक व समीक्षक.💥 मृत्यू :-★ १९९२ - सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.★१९९८ - वासुदेव पाळंदे, दिग्दर्शक व संघटक.★२००२ - श्रीपाद रघुनाथ जोशी, - शब्दकोशकार, अनुवादक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात, देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *नाशिक मनपाचे निवारा केद्रांत 200 हून अधिक बेघरांना 'सहारा', बँक खात्यांसह आधारकार्डही मिळणार*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *लेबनॉनमधून स्थलांतरित आणि निर्वासितांना घेऊन जाणारी बोट सीरियाच्या किनारपट्टीवर उलटल्याने तब्बल 61 जणांचा मृत्यू झाला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशांतर्गत बाजारात तांदळाच्या किंमतीत वाढ होणार, कारण.....अन्न मंत्रालयानं दिली सविस्तर माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *शिवाजी पार्कवर ठाकरेंचाच दसरा मेळावा, राज्यभरात जल्लोष, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात वाटले पेढे*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया लेजेंड्सने Road Safety World Series मध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Who I am?ओळखा पाहू मी कोण?👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/7S5TNtg2gos~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मतदार जागृती आवश्यक* https://nasayeotikar.blogspot.com/2018/02/blog-post_11.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ?* 📙घरात घर हरघडीला ट्रान्सफॉर्मर लागतो, तर घराबाहेर, विशेषतः औद्योगिक पुरवठ्यासाठीही ट्रान्सफॉर्मरशिवाय भागत नाही. पण या दोन्हींमध्ये महत्त्वाचा फरक आहे. घरात वापरला जातो, त्यामध्ये विजेचा दाब कमी करून तीन, सहा, नऊ व बारा व्होल्ट्स इतका ठेवला जातो. या कमी केलेल्या दाबाचा वापर करून मग छोटे दिवे, नाइट लॅम्प, रेडिओ ट्रांजिस्टर, रेकॉर्ड प्लेअर, खेळणी यांचा उपयोग केला जातो. याउलट कारखान्यांना लागणारी वीज, शहराला दूरवरुन केला जाणारा पुरवठा हा अतिउच्च दाबाचा असतो. यासाठी ठिकठिकाणी दाब वाढवणारे ट्रान्सफॉर्मर बसवलेले असतात. वीजकेंद्रांपासून वीज आणण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो.ट्रान्सफॉर्मरमध्ये विजेचा दाब लहानाचा जास्त वा जास्तीचा लहान केला जातो. या दोन्हींसाठी पद्धत एकच वापरली जाते. ती म्हणजे दोन्ही लोखंडी पट्ट्यांच्या सांगण्यावर (core) शेजारीशेजारी तारांचे वेटोळे गुंडाळले जाते. एक असते प्राथमिक, तर दुसरे दुय्यम. विजेचा प्रवाह जितका कमी वा जास्त करावयाचा, दाब कमी वा वाढवायाचा, तितके वेटाळ्यातील वेढे कमी जास्त केले जातात. प्राथमिक वेटोळ्यापेक्षा दुय्यम वेटोळ्यामधील वेढे जास्त असले, तर प्रवाहदाब वाढतो. याउलट स्थितीत तो कमी होतो.खरे म्हणजे दोन्ही वेटोळी ही पूर्णतः वेगळी असतात. पहिल्या वेटोळ्यात विद्युतप्रवाह येतो व बाहेर पडतो. हा अर्थातच अल्टर्नेटिंग करंट वा AC असतो. यामुळे सांगाड्यात विद्युतचुंबकीय क्षेत्र निर्माण होते व त्याचा परिणाम होऊन शेजारील दुसऱ्या वेटोळ्यातून प्रवाह वाहणे सुरू होतो. याचा दाब वेटोळ्याच्या वेढ्यांच्या संख्येनुसार वाढतो वा कमी होतो.ट्रान्सफॉर्मर छोटा असो वा मोठा; ज्यावेळी दाब कमी होतो, तेव्हा प्रवाह वाढतो; याउलट दाब वाढला, तर प्रवाहाची शक्ती कमी होत जाते. पण याचा फायदा वीज वाहून नेण्याच्या तारांच्या आकारमानात बदल करता आल्याने होतो. प्रवाहाची शक्ती कमी झाल्याने अतिदाबाच्या तारांची जाडी खूपच कमी ठेवता येते.ट्रान्सफॉर्मरचा वापर झाल्याने अनेक बाबतीत सोय होऊ शकते. वाहनांमध्ये जेमतेम बारा व्होल्टचा प्रवाह निर्माण होतो; पण त्यावर संस्कार करून, अतिदाबाच्या प्रवाहाची निर्मिती करून ठिणग्या पाडण्याचे व वाहन चालवण्याचे काम केले जाते, याउलट लहान मुले खेळताना चुकूनही धक्का बसू नये, अशी खेळणी वीज प्रवाहाचा दाब अत्यल्प ठेवून बनवली जातात.*'सृष्टी विज्ञानगाथा या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'पक्षी जगतातील अभियंता' असे कोणत्या पक्ष्याला म्हटले जाते ?२) नुकतेच टेनिसमधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या महान टेनिसपटूचे नाव काय आहे ?३) जगात सध्या गेंड्याची संख्या किती आहे ?४) भारताची सर्वात वेगवान रेल्वे कोणती ?५) 'राष्ट्रीय बालिका दिवस' केव्हा साजरा केला जातो ?*उत्तरे :-* १) सुगरण/बया २) रॉजर फेडरर, स्वित्झरलंड ३) २९ हजार ४) वंदे भारत ५) २४ जानेवारी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● डॉ. तोफिख खान पठाण● सारंग दलाल, नांदेड● राजू यादव, हैद्राबाद● ओमसेठ गंजेवार, धर्माबाद● विरेश भगवान भंडारे● सतीश आरेवाड● रोहित शिंदे● अरविंद ठक्करवाड● राजेश गाजुलवाड● दिग्विजय अभिजित राजूरकर● प्रथम सुनील नामेवार● अक्षत मनोज तानुरकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत, याचे कारण त्यांचे कामावर प्रेम असते. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीत कंपनीच्या उपयोगी येतो, हा ही भाव असतो. जिथे फक्त पैशांचा विचार होतो तिथे आयुष्यभर राबले, तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट 'जन्माला आला...' या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसे फक्त थकत जातात.**उत्साहाने भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचे एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त, आणि निवृत्तीनंतर काम करणारे या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो, तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीने ती केली, तर ती नाही म्हणणार नाही; पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत मन नसते ती ढेपाळते, चुकते आणि मग थकवा देते. याकरीता दिवसभरात कमी काम झाले, तरी चालेल; पण ते मन:पुर्वक आणि निष्ठेने व्हावे. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*☘☘☘☘☘☘☘☘☘ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *काव्यांगण* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••शाळा कॉलेजमधील मित्र-मैत्रिणीचे *......... गेट-टूगेदर ........*कॉलेज मधील मित्र-मैत्रिणीभेटत आहेत कित्येक वर्षांनीमनात दाटल्या जुन्या आठवणीओठावर तेच जुनेच गाणीआनंदाचे ते दिवस मंतरलेलेएकमेकांत जीव गुंतलेलेएकमेकांपासून विभक्त होतांनानयनात किती अश्रू दाटलेलेसंसाराच्या या रहाटगाड्यातविसरून गेलो मी स्वतःला आज पुन्हा या गाठी भेटीनेअर्थ मिळाला माझ्या जीवनालागेले ते दिवस सरला तो काळपुन्हा असा आनंद मिळणे नाहीआयुष्याचे काय खरे असते ?जीवनात भेट होईल की नाहीशालेय जीवनातील मित्र-मैत्रिणींचेगेट टूगेदर व्हावे एकदा तरीकोण सुखात कोण आहे दुःखातयाची माहिती ही मिळेल खरीखुरी- नासा येवतीकर, धर्माबाद- 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्याकडे धन, संपत्ती, ऐश्वर्य, नोकरचाकर आणि अभिमान आहे तो फार श्रीमंत आहे असे काहींना वाटत असेल तर ते चुकीचे आहे त्यापेक्षा ज्यांच्याकडे आई-वडील आहेत, तो निरंतर त्यांची सेवा करतो,त्यांचे मन कधीही दुखवत नाही, त्यांना वंदन करुन दैनंदिन कामाला लागतो,त्याला कशाचाही गर्व नाही अशी माणसे या जगात फार श्रीमंत आहेत आणि भाग्यवानदेखील आहेत.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोठीच त्याची सावली*सूर्य नुकताच मावळत होता. एक कोल्हा त्याच्या गुहेतून आळसावत उठला. त्याला शिकारीला जाण्याची तशी घाई नव्हती. त्या जंगलात भरपूर गुबगुबीत हरणे व मांसल ससे होते. एखादा प्राणी कोल्हय़ाला सहज सापडायचा. कोल्हय़ाने आसपास नजर फिरवली तर सूर्याच्या किरणामुळे गुहेच्या भिंतीवर पडलेली त्याची सावली त्याला दिसली. स्वत:ची मोठी सावली पाहून कोल्हा खूश झाला व स्वत:शीच म्हणाला,'' वा! मी आकाराने किती मोठा आहे!! मी जर एवढा मोठा असेन तर त्या क्षुद्र सिंहाला मी का घाबरू? तो सिंह स्वत:ला जंगलाचा राजा समजतो. आज मी त्याला दाखवतो की जंगलाचा खरा राजा कोण आहे!'' कोल्हय़ाचे हे वाक्य हवेत विरते न विरते तोच त्याला एक जोरदार गर्जना ऐकू आली. मागोमाग कोल्हय़ाच्या मोठय़ा सावलीला त्याहीपेक्षा मोठय़ा सावलीने झाकून टाकले. ती सिंहाची सावली होती. त्याने एक पंजा कोल्हय़ाला मारताच कोल्हा धूळ चाटू लागला.''आता सांग, जंगलाचा खरा राजा कोण आहे?''''आपणच आहात, हुजूर'' जखमी झालेला कोल्हा कण्हत म्हणाला. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment