✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/09/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ १९३५ - स्वस्तिकचे चिन्ह असलेला ध्वज (चित्रीत) नाझी जर्मनीने आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.★ १९४७ - जपानला टायफून कॅथलीन या मोठ्या वादळाचा तडाखा ज्यात १,०७७ ठार.★ २००८ - लेहमान ब्रदर्स या कंपनीने दिवाळे काढले💥 जन्म :-★ १२५४ - मार्को पोलो, इटालियन फिरस्ता.★ १८६० - सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.★ १८७६ - शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.★ १९०९ - सी.एन. अण्णादुराई, तामीळनाडूचे मुख्यमंत्री.💥 मृत्यू :-★ १९२६ - रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन तत्वज्ञानी आणि नोबेल पारितोषिक विजेते★ १९७३ - गुस्ताफ सहावा अॅडॉल्फ, स्वीडनचा राजा.★ २००८ - गंगाधर गाडगीळ, मराठी लेखक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मॉस्कोतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आणि तैलचित्राचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कारात, राष्ट्रपती मुर्मू राहणार उपस्थित, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालं*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सणासुदीच्या काळात एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठवाडा, तेलंगणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा केला जावा, अशी सूचना यूजीसीने दिली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आंतरराष्ट्रीय बाजारात पाम तेलाच्या किंमतीत ४० टक्के घट झालीये. त्यामुळे खाद्य तेल लवकरच स्वस्त होणार, ऐन सणासुदीच्या काळात सामान्यांना दिलासा मिळणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *महाराष्ट्र केसरी स्पर्धा पुण्यात होणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार पुणेकरांना या वर्षाच्या अखेरीस कोथरूडमध्ये अनुभवायला मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• * 🎯 🚀 *गौरव - गाथा* 🎯 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. वर्षा ठाकूर - घुगे मॅडम, यांच्या संकल्पनेतील अभिनव उपक्रम*मराठवाडा मुक्तीसंग्राम गौरव गाथा*भाग - सातवामराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा गोविंदराव पानसरे यांची माहिती जरूर पहा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना देखील दाखवावेVideo खालील लिंकवर उपलब्ध.https://youtu.be/di-nkoyfGwg~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 निवेदन - नासा येवतीकर 📢* विषय शिक्षक, कन्या शाळा धर्माबाद,📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *‘ओझोन डे’* जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने दोन महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत. त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर. यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही. हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टीच झाली नसती. मात्र, या ओझोनच्या थरालाच वाढत्या प्रदूषणामुळे भगदाड पडले असून, ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ‘ओझोन डे’ साजरा करण्याची वेळ आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर (ट्रोपोस्फिअर) असे नाव आहे. मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे, वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात. तपांबराच्या पुढे ५० कि.मी.अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर (स्ट्रॅटोस्फिअर) असे म्हणतात. वातावरणातील एकंदर ओझोनपैकी १० टक्के तपांबरात आहे, तर ९० टक्के स्थितांबरात आहे. त्यातही भूपृष्ठापासून १५-३० कि.मी. पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे. या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे २६८ रेणू ओझोनचे असतात. या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. पारंपरिक स्थितांबर (ओझोन स्तर)ला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या सीएफसी वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बन (एचएफसी)चा वापर होऊ लागला. त्यातही वेगवेगळे प्रकार असल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक सात टक्क्यांनी वाढली. जागतिक तापमानाचा धोका आणखी वाढला आहे. त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे. त्यामुळे ३६५ दिवसांमध्ये एकदाच ‘ओझोन डे’ साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही. रोजच हा दिवस साजरा करावा..संदर्भ. डॉ. पी. डी. राऊत. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Actions speaks louder than words.* *( कृती ही शब्दांपेक्षा/गोष्टी हाकण्यापेक्षा जास्त सांगून जाते. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) केंद्र सरकारने नुकतेच 'राजपथ' च्या ऐवजी आता कोणते नामकरण केले आहे ?२) जगातील कोणत्या कंपनीने चक्क रोबोटची मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) म्हणून नियुक्ती केली आहे ?३) संत ज्ञानेश्वरांच्या बहिणीचे नाव काय होते ?४) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले ?५) विम्बल्डन किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?*उत्तरे :-* १) कर्तव्यपथ २) चिनी मेटाव्हर्स ३) मुक्ताबाई ४) सिडनेहॅम कॉलेज ५) सानिया मिर्झा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ डॉ. हंसराज वैद्य◆ श्रीनाथ संतोष येवतीकर◆ शीतल वाघमारे◆ विजय धडेकर◆ मनोज साळवे◆ माधव पांगरीकर◆ अभिमन्यू चव्हाण◆ राजेंद्र होले◆ एकनाथ जिंकले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*सर सी.व्ही.रमण एकदा भौतिकशास्त्राच्या संशोधक पदासाठी मुलाखती घेत होते. मुलाखती संपवून निघताना एक विद्यार्थी त्यांना तिथंच घुटमळताना दिसला. नोकरीसाठी नाकारला गेलेला तो तरूण येरझारा मारताना पाहून सर रमण रागावले. त्याच्या हेतूबद्दल शंका येऊन रमण यांनी त्याला फटकारलं. तो तरूण नम्रतेने म्हणाला,'सर, गैरसमज करून घेऊ नका. नोकरी मिळावी म्हणून वशिला लावण्यासाठी मी थांबलो नाही. आपल्या कार्यालयाकडून येण्या-जाण्याचं भाडं चुकून आधिक मिळालं आहे. ते परत करण्यासाठी मी संबंधीत बाबूला शोधत आहे.**त्याचे हे विचार ऐकून सर रमण प्रभावित झाले. त्यांना सुखद धक्का बसला आणि ते म्हणाले,'मित्रा, तुझं भौतिकचं ज्ञान कमी आहे. प्रयत्नानं ते वाढवता येईल. पण तुझ्या अंतरीचा प्रामाणिकपणा दुर्लभ आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा ही मूल्य कितीतरी मोठी आहेत. संशोधक म्हणून तुझी निवड झाली, असं समज.' हा निवडीनंतरचा आकस्मिक आनंद त्याच्या डोळ्यात मावला नाही. निर्णय ऐकताक्षणीच तरूणाच्या डोळ्यांना धारा लागल्या. कृतज्ञतेच्या धारा! संघर्षाच्या वादळातही त्यानं अंतरीचा सत्याचा दिवा विझू दिला नव्हता. परीक्षेच्या व ज्ञानाच्या पलिकडे काही जीवनमूल्यं असतात, हे समजून घेत कुण्या गरजवंताच्या गुणांची कदर करणारे 'रमण' असतात जगात, आणि निवड झाली नसतानाही कुणाचे पैसे परत करण्यासाठी अस्वस्थ होणारे इमानदार तरूणही!* *॥ रामकृष्णहरी ॥* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *।। विचार ।।*बुध्दीवंत करतात चांगला विचारम्हणूनच असतो चांगला आचारजो चांगले विचार करून बोलतोत्याच्या जीवनात असतो सदाचारजास्त संपत्तीची आस धरूनकमविणारा करतो सदा भ्रष्टाचारमैत्री वाढेल आणि टिकेल हीजर असतील आपले सुविचारवाईट बोलण्याने साथ तुटतेम्हणून करू नये कधी अविचार मोकळेपणाने जो करतो संवादसमाजात त्याचा होई मुक्त संचार - नागोराव सा. येवतीकर, मु. येवती ता. धर्माबाद 9423625769•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सोन्याचा व्यापार करणारा व्यापारी किंवा सोन्याचे दागिने बनवणारा सोनार सोने पाहिल्याबरोबर किती चांगले आहे हे आपल्या नजरेने,हातात घेऊन आणि एका विशिष्ट दगडाच्या कसोटीवर घासून ओळखतो त्याचप्रमाणे चतुर,चाणाक्ष आणि मनकवड्या व्यक्ती समोर असणा-या आणि समोर आलेल्या व्यक्तींना आपल्या नजरेंनी तेव्हाच ओळखतात.कोण चांगल्या विचारांची,कोणत्या कारणासाठी आपल्याकडे आली आहेत,ती कोणत्या हेतूने आली आहेत,कोणत्या स्वभावधर्माची आहेत,आपण त्यांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे किंवा आपण त्याला मदत करायची का नाही याचे ज्ञान नक्कीच असते.यावरुनच माणसे आपल्या नजरेने पहायला,वाचायला आणि शिकायला पाहिजे.यासाठी आपल्याला माणसांच्या मनाचे थोडे शास्त्र आपणही शिकले तर भविष्यात होणारे संभाव्य धोके टळू शकतील आणि आपले जीवन सुखावह होऊ शकेल.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *साप आणि खेकडा*एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?*तात्पर्य - राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment