✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/09/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९७१-कतारला स्वातंत्र्य मिळाले.◆ १९१६-अँनी बेझंट यांनी 'होमरूल लीग 'ची स्थापना केली.💥 जन्म :-● १९६५ - चार्ली शीन, अमेरिकन अभिनेता.● १९७६ - विवेक ओबेरॉय, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-● १९६७ - अनंत हरी गद्रे, मराठी समाजसुधारक.● १९९१ - फ्रँक काप्रा, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जगाला कळणार 'मेड इन इंडिया'ची ताकद, पहिली स्वदेशी युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलात सामील, भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा; पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित'*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाकडून अखेर मुंबई महापालिकेत परवानगीचा अर्ज, शिवाजी पार्क मैदानासाठी सदा सरवणकरांकडून अर्ज दाखल*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *पटसंख्येच्या तुलनेत राज्यात शिक्षकांची संख्या अधिक, सुविधा असतानाही शिक्षणाचा दर्जा का सुधारत नाही ? प्रशांत बंब यांचा सवाल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *BMC निवडणुकीत नवीन समीकरण ? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यात राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मान्सूनचा परतीचा प्रवास लांबला, सप्टेंबर महिन्यातही जोरदार पाऊस; IMD ने वर्तवला सुधारीत अंदाज*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महाराष्ट्रात पुन्हा वादळ उठणार, आता काँग्रेसचा गट फुटणार ? देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाणांच्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण; भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचं अशोक चव्हाण याचं स्पष्टीकरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानने हाँगकाँगला पराभूत करत सुपर 4 मध्ये मिळवली एन्ट्री ज्यामुळे आता पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान हा हायवोल्टेज सामना रविवारी पार पडणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कै. सायन्ना गुरुजी येवतीकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राज्यस्तरीय*ऍक्टिव्ह टीचर्स अवॉर्ड 2022* http://nasayeotikar.blogspot.com/2022/09/active-teachers-award-2022.htmlसर्व विजेत्यांचे मनस्वी अभिनंदन .......!________________________•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Telling the time👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Np63m86Rvu4~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *कार्बनचक्र म्हणजे काय ?* 📙पृथ्वीवरील प्रत्येक सजीवामध्ये कार्बनचे अस्तित्व आहे. मात्र वातावरणातील कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण अत्यल्प आहे. प्राणवायूशिवाय कोणताच सजीव जगात नाही, हे आपल्याला माहीत आहेच. हवेतील प्राणवायू कायम राखण्याचे महत्त्वाचे काम वनस्पती करत असतात. हे काम जर झाले नसते, तर वातावरणातील प्राणवायू कधीच संपला असता. रात्रंदिवस वनस्पती हे जे काम करत असतात, त्यातून कार्बनचक्र अव्याहत चालू राहते. क्लोरोफिल या हिरव्या द्रव्याचा या प्रक्रियेत महत्त्वाचा भाग असतो. बहुतांश वनस्पती क्लोरोफिलचा वापर करून स्वतःचे अन्न तयार करतात. जमिनीतून मिळवलेले पाणी व अन्य अनेक रसायने यांचा यासाठी वापर होतो. मुख्यत: शर्करा तयार करताना वनस्पती सूर्यप्रकाशाचा दिवसा उपयोग करून घेतात. या क्रियेत वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. ही क्रिया पुढील प्रमाणे होते -Energy + 6H2O ⬆ 6CO2 »» C6H12O6 + 6O2 ⬆यातून ग्लुकोज तयार होऊन तिचा वनस्पती वापर करतात व हवेमध्ये ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. रात्रीच्या वेळी मात्र सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने ही क्रिया घडत नाही. फक्त वनस्पतींचे श्वसन चालू राहते. त्यात प्राणवायू आत घेतला जाऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारेच मिळवला जातो. वनस्पतींच्या फांद्या, खोड, पाने बनवण्यात कार्बनचा मोठा वाटा असतो.वनस्पतीचे आयुष्य संपल्यावर शिल्लक राहतो, तो कार्बनचाच मोठा भाग असतो. मात्र हवेतील प्राणवायूचे प्रमाण कायम राखण्यात या सार्या प्रक्रियेचा मोठा वाटा असतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ इतिहास हा काळाचा साक्षीदार असतो आणि सत्याचा प्रकाश असतो. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) महाराष्ट्राचे कृषिमंत्री कोण आहेत?२) एका वन-डे सामन्यात सर्वाधिक विकेट कोणी घेतले ?३) पृथ्वीवर पूर्व -पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक आडव्या रेषाना काय म्हणतात ?४) लष्करावर खर्च करण्यात जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो ?५) ९० अंश मापाच्या कोनाला काय म्हणतात ?उत्तरे :- १) अब्दुल सत्तार २) चामिंडा वास, श्रीलंका ( ८ बळी ) ३) अक्षवृत्ते ४) तिसरा ५) काटकोन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सौ. शिवकांता बिज्जेवार, नांदेड● महेंद्र सोनेवाने, साहित्यिक, गोंदिया● आशिष हातोडे● राज कुमारे● प्रदीप पंदिलवाड● भिमराव सोनटक्के*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*"जो घाबरतो तो वाया जातो. पाण्यात पडल्यावर जो संयम ठेवत नाही, तो शेवटी गटांगळ्या खातो." 'बी' पेरलं की लगेचंच त्याचं झाड तयार होऊन त्याची फळं खायला मिळावीत, एवढा उतावीळपणा असणारी काही माणसं पाहायला मिळतात. पण असं होत नाही, उलट असं न झाल्याचं दुःखं मात्र नक्की होत असतं. म्हणून कोणत्याही कामात माणसानं संयम राखणं आवश्यक आहे. दुःखं कितीही मोठं असलं तरी 'काळ' हा त्यावर इलाज आहे. पण त्यासाठी काही वेळ जाऊ देण्याची वाट मात्र पहावी लागते. तेवढी वेळ जाऊ देण्याइतका संयम माणसाला ठेवावा लागतो. दुःखात व्यसनाच्या आहारी जाणे किंवा आत्महत्या करून घेणे, या गोष्टी माणसाच्या हातून घडतात.**याबरोबरच कामात प्रचंड घाई करणारी माणसंसुद्धा पाहायला मिळतात. 'अति घाई, संकटात नेई' असं रस्त्यावरील फलकांवर वाचायलाही मिळते. विशाल वटवृक्षाची सुरुवात एका छोट्याशा कोंबापासून होते. जर हे "उगवलेलं कोंब मध्यातच वाळून गेलं तर ते वाया जातं. त्याप्रमाणं 'उतावीळ' माणसाची बुद्धी वाया जाणारीच समजावी. "कोंब वाळल्यावर जसं त्याचा वटवृक्ष बनणार नाही हे आपल्याला कळतं, तसं उतावीळपणा केल्यानं काम पूर्ण होणार नाही, हेही आपण समजून घेतलं पाहिजे.* ••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●•• 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कविता - स्पंदने*-----------जमाना बदलला म्हणेआता काॅम्पुटर आला.....कामं व्हायला लागलीत पटपटपण जिवंत हाताला कामचउरलं नाही.....बेकारांचे कारखाने मात्र निर्माणहोतायतं क्षणाक्षणाला...दारिद्र्यांचे आक्रोशमाॅनिटरमध्ये साचत नाहीतआणि वात्सल्याची स्पंदनंकि बोर्ड मध्ये नाचत नाहीत..,म्हणे आम्ही ग्लोबल झालो...शेजार्यांच्या अंत्ययात्रे दिवशीदार लावून घेणारी संस्कृतीनिर्माण झाली या तंत्रज्ञानामुळं...तुम्ही कितीही पुढे जा,पण..आईच्या दूधानं तृप्त झालेल्यालेकराचा ढेकरातील आनंदमोजण्याचं यंत्र तुम्हीशोधू शकणार नाहीहे मात्र नक्की.....-आबासाहेब निर्मळे.नविन वसाहत पेठ वडगांव,ता.हातकणंगले जि.कोल्हापूर.9028090266.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काही लोकांच्या बाबतीत पैसा म्हणजे सर्वस्व आहे आणि पैशामुळे काहीही मिळवता येते.पैशामुळे तुम्हाला तुमच्या भौतिक सुविधा मिळवता येतात परंतु इतरांचे मन मिळवता येत नाही.इतरांचे मन जिंकायचे असेल तर या ठिकाणी पैसा चालत नाही.त्यासाठी हवे तुमचे उदार अंतःकरण,तुमची दुस-याबद्दलची आत्मियता,प्रेम इतरांना दिलात तर तेही तुमच्यावर अधिक प्रेम करायला लागतील.यासाठी तुमच्या जवळ असलेल्या पैशाची गरज नाही.एवढे सत्य आहे पैशाने सारे काही खरेदी करता येईल पण जगात असलेल्या सर्व जीवांचे मन आणि प्रेम कधीच खरेदी करता येत नाही.मग तुमच्या जगण्याला काय अर्थ आहे ?© व्यंकटेश काटकर, नांदेड९४२१८३९५९०/८०८७९१७०६३ •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *योग्य निर्णय*एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा ... पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला..मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला?कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला.मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्या मुळे, माझे जीवनपण बदलले,मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते ! आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देइल.*तात्पर्य : जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment