✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 17/12/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.● १३९८ - तैमूर लंगने दिल्लीजवळ सुलतान नसिरुद्दीन मेहमूदच्या सैन्याचा पाडाव केला.● १९२६ - लिथुएनियातील उठावात अंतानास स्मेतोनाने सत्ता बळकावली.● १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.● १९६१ - गोवा मुक्तिसंग्राम - भारतीय सैन्याने गोव्याला पोर्तुगालपासून मुक्त केले.● १९६७ - ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान हॅरोल्ड होल्ट पोर्टसी, व्हिक्टोरियाजवळ समुद्रात पोहत असताना गायब.● १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.● १९७० - पोलंडमध्ये ग्डिनिया शहरात सैनिकांनी कामगारांवर गोळ्या झाडल्या. सुमारे २५ ठार.● २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.💥 जन्म :-● १९०१: मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी● १९०८ - विल्लर्ड लिब्बी,कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धतीचा शोध लावणारा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.● १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह ● १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम ● १९७८: हिंदी चित्रपट अभिनेते रितेश देशमुख💥 मृत्यू :- ● १९२९ - मनुएल गोम्स दा कॉस्टा, पोर्तुगालचा ९६वा पंतप्रधान आणि १०वा राष्ट्राध्यक्ष.● १९६४ - व्हिक्टर फ्रांझ हेस, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.● १९६७ - हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा पंतप्रधान.● १९८५: नाटककार, कथाकार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर ● २०००: अॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक जाल पारडीवाला● २०१०: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! प्रचाराच्या तोफा थंडावल्या! रविवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी..*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई होणार चकाचक! लवकरच नियुक्त होणार 5 हजार स्वच्छतादूत; दंडात्मक कारवाई नाही तर, जागरुकतेवर भर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *भारत जोडो यात्रेचे 100 दिवस आणि 2800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण ; पाच राज्यांच्या यात्रेनंतर राहुल गांधी आता राजस्थानमध्ये*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *महाविकास आघाडीच्या मुंबईतील मोर्चासाठी अटीसह परवानगी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *'एलएसीवरील परिस्थिती भारताच्या नियंत्रणात', तवांग चकमकीवर ईस्टर्न कमांडच्या प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नियोजित ट्रेन सुटण्याच्या एक तास आधी पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचा, रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पुजारा- गिलचं शतक, भारताकडून दुसऱ्या डावाची घोषणा; बांगलादेशसमोर 513 धावांचं लक्ष्य, तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशला 471 धावांची गरज*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*गोष्टींचा शनिवार- कथा-रंगेबिरंगी खेळणी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rjpFGoRXVBA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~ *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतीय गणितज्ञ व शास्त्रज्ञ* http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/indian-scientist.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *मनुष्यप्राण्याचे मूळ* 📙 **************************प्रत्येकाला आपल्या पूर्वजांबद्दल एक गूढ आकर्षण असतेच. मग समस्त शास्त्रज्ञांना मानवजातीच्या मुळाबद्दल प्रचंड आकर्षण वाटत राहिले, तर त्यात नवल ते काय ? पृथ्वी कशी निर्माण झाली व माणूस कसा निर्माण झाला, याबद्दलची चर्चा कधीही व कुठेही रंगतच जाते.अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सध्याचे निष्कर्ष सांगतात की, पूर्व आफ्रिकेच्या भागात चाळीस लाख वर्षांपूर्वी आदिम मानवाचे वास्तव्य होते. एकूण चार विविध टप्प्यांतून सध्याच्या होमो सेपियन्स या मानवजातीची उन्नती होत गेली आहे. होमो सेपियन्स म्हणजे 'शहाणा माणूस'.ते चार टप्पे असे,१. *ऑस्ट्रेलोपिथेकस अफारेन्सिस*२. *ऑस्ट्रेलोपिथेकस रोबस्टस*३. *होमो इरेक्ट्स*४. *होमो सेपियन्स*अंदाजे अडीच लाख वर्षांपूर्वी सध्याचा मानवप्राणी सध्याच्या स्वरूपात उत्क्रांत झाला असावा. प्रथम आफ्रिकेत वास्तव्य असलेला मानवप्राणी हळूहळू समशीतोष्ण व थंड हवामानाकडे वाढत जाणाऱ्या संख्येमुळे स्थलांतर करू लागला. जसजसे स्थलांतर पसरत गेले, तसतसे हवामानातील घटकांनुसार रंग, ठेवण, शरीराची जडणघडण यातही बदल होऊ लागले. उत्तरेकडे ज्या जाती पसरल्या, त्यांना 'ड' जीवनसत्त्वाची गरज भागवण्यासाठी अधिक सूर्यप्रकाशाची गरज पडू लागली. सूर्यप्रकाश तर कमी होता. मग कातडीखालील रंगद्रव्यांची निर्मिती हळू हळू कमी होत कातडीतील काळेपणा कमी झाला. याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशाला ज्या प्रदेशात तोंड द्यावे लागते, अशा पूर्वेकडच्या लोकांची गालांचे खाडे उंचावून डोळे मिचमिचे व बारीक होत गेले. कायम बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या मंडळींना अधिक उबेची गरज असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर चरबी वाढून उघड्या चेहऱ्याच्या संरक्षणाची निसर्गत: सोय झाली. बर्फाळ प्रदेशातील लोक गुबगुबीत चेहर्याचेच का, याचे उत्तर यामुळेच मिळते.माणसाचे स्थलांतर पृथ्वीवर कसे झाले, हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे ठरेल. पूर्व आफ्रिकेच्या प्रदेशातून प्रथम उत्तरेकडील भागात, नंतर पूर्वेकडील भागात मानव हळूहळू पुढे सरकत राहिला. युरोपमधील मोजका भाग व्यापून संपल्यावर आशिया खंडांकडे त्याचा मोर्चा वळला. सैबेरियातील काही भाग त्या काळी बर्फामुळे अलास्काच्या भागास जोडलेला होता. अतिशीत अशा या भागातून उन्हाळ्याच्या काळात बहुधा अमेरिका खंडात माणसाचा चंचुप्रवेश झाला. अलास्कापासून मग खाली उतरत उतरत त्याने सर्व अमेरिका खंड व्यापले. पॅसिफिक समुद्रातील मोजकी बेटे सोडली तर मानवाने सारे जग कित्येक हजार वर्षे व्यापलेलेच आहे. या बेटांवरील वस्ती मात्र जेमतेम सात आठ हजार वर्षांतली असावी.आपण जेव्हा विविध संस्कृतींचा विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरची वर्षे असतात हजारांत. मानवी मूळ शोधतानाची वर्षे आहेत लाखांत, हे येथे पक्के ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. या लाखो वर्षांबद्दलचा पुरावा कुठल्याही लिखित स्वरूपात तर आपल्या हातात नाहीच. जे निरनिराळ्या अवशेषांतून हाती लागत आहे, त्यातूनच आपण उलगडा करून इतिहासाची पाने उलटत जातो.मानवी वस्ती जगभर पसरत गेली, स्थायिक होत गेली; पण प्रत्यक्ष शेतीची लागवड करण्याची सुरुवात मात्र जेमतेम दहा हजार वर्षांपूर्वीच झाली. या लागवडीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतराची दिशा या वेळी भारत, मध्य आशिया ते युरोप व खाली उत्तर आफ्रिका अशी उलटी होती. ती लाट आफ्रिका खंडात जेव्हा पोहोचली, तेव्हा त्याआधीची कित्येक हजार वर्षे अस्तित्वात असलेली मूळ जात पुन्हा दक्षिणेकडे ढकलली गेली. सध्याची बांटू ही जात म्हणजे मूळ आफ्रिकन वास्तव्य केलेली मानवी जात समजली जाते.*"सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'एक जिल्हा एक खेळ' योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?२) नुकताच भारताचा ७७ वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?३) काळ्या सोन्याचा जिल्हा ( दगडी कोळसा ) असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?४) अलीकडे कोणत्या मेट्रोने यशस्वीरीत्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला आहे ?५) एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकविणारे भारतीय क्रिकेटपटूंची नावे सांगा.*उत्तरे :-* १) उत्तरप्रदेश २) आदित्य मित्तल ३) चंद्रपूर ४) नागपूर मेट्रो ५) सचिन तेंडुलकर - २०० धावा, वीरेंद्र सेहवाग - २१९ धावा, रोहीत शर्मा - २०९, २६४, २०८ धावा, ईशान किशन - २१० धावा*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 डॉ. उषा रामवानी गायकवाड, ठाणे👤 विक्रम पतंगे, नांदेड👤 रामचंद्र पाटील बन्नाळीकर, धर्माबाद👤 डॉ. सुधीर येलमे, संपादक👤 विजय होकर्ने, प्रेस फोटोग्राफर, नांदेड👤 डॉ. प्रदीप आवटे👤 श्रीनिवास नरडेवाड, धर्माबाद👤 केशव कदम👤 नारायण मुळे, धर्माबाद👤 प्रतापसिंह मोहिते, बार्शी👤 दिगंबर बेतीवार, नांदेड👤 जितेंद्र वल्लाकटी, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*आपण नेहमी खरं बोलावं, असं म्हणतो. मग माणसं खोटं का बोलतात? स्वार्थासाठी! स्वत:ला लपविण्यासाठी! खरं ते झाकण्यासाठी! जितकं आपण स्वत:ला झाकण्याचा प्रयत्न करू तितकं आपण केव्हा ना केव्हा तरी समाजापुढं चक्क उघडं पडु शकतो. अनेक माणसं बोलताना 'मी म्हणतो तेच खरं' असं ठासून म्हणतात; परंतु 'खरं तेच माझं' म्हणणारी माणसं फारच कमी असतात. दहा वेळा खोटं बोललं की, लोकांना ते खरं वाटतं; पण खरं तेच केव्हातरी उघडकीस येतं. आपण स्वत: जसे असाल तसे समाजपुढे दिसावे हे चांगले असते. परंतु आपण स्वत: जसे नसतो तसं समाजापुढं दिसावं हे काही चांगलं नाही.**आपण नेहमीच खोटं बोलावं आणि समाजापुढं आपण नेहमीच खरं बोलतो असं भासवावं हे काही भल्या माणसाचं लक्षण नाही. आपण नेहमीच स्वार्थीपणानं जगावं आणि आपण नेहमी नि:स्वार्थीपणानं जगतो असं समाजापुढं भासवावं हे काही सभ्य माणसाचं लक्षण नाही. आपण एकदा का खोटं बोललो की, ते लपविण्यासाठी अनेकदा खोटं बोलावं लागतं. खोट्याला अनेक वाटा असतात. ख-याला मात्र पर्याय नसतो. खोटं बोलणं खोट्या पैशासारखं असतं. खरं बोलणं बंध्या रूपयासारखं असतं. खरं ते खरंच असतं आणि खोटं ते खोटंच असतं, हे काळच उघडकीस आणतो. म्हणून 'सत्य' हाच आपल्या जीवन यशाचा खरा सोबती समजला पाहिजे. 'सत्य' हेच आपल्या जीवनवैभवाचं खरं रहस्य समजलं पाहिजे.* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्याप्रमाणे सीमेवर लढणाऱ्या जवानांचे एक ध्येय निश्चित केलेले असते.ते ध्येय म्हणजे " जिंकू किंवा मरु..."समोर असलेल्या शत्रूला तोंड दिले तर आपण विजयी होऊ नाहीतर ठरवलेल्या ध्येयापासून थोडेजरी मन डळमळीत झाले तर निश्चित केलेले ध्येय पूर्ण करु शकत नाही.याचा अर्थ असा होतो की,आपण आपल्या ध्येयापासून दूर जात आहोत म्हणजे आपला पराभव निश्चित तर आहेच त्याचबरोबर आपला जीवही गमवावा लागत आहे.आपण आपल्या जीवनात अयशस्वी होत आहोत.त्यामुळे कोणताही जवान ध्येयापासून परावृत होत नाही.त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनात जर चांगले ध्येय निश्चित केले तर त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करायला लागा तरच ते ध्येय पूर्ण करु शकाल. नाही तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापासून दूर राहाल.नाहीतर आपणच आपले गुन्हेगार ठरु शकू.त्यामुळे आपल्या जीवनात नैराश्य तर येईलच आणि आपल्या जीवनात जगण्याला काही अर्थ राहणार नाही असे वाटायला लागेल.आपणच आपले अपराधी आहोत असे वाटायला लागेल.त्यापेक्षा आपले ध्येय निश्चित करुन आत्मविश्वासाने पुढे आगेकूच करायला लागा.तुमचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.मनाची सकारात्मकता डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे चालायला शिका म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनात खरोखरच यशस्वी होऊ शकाल यात वादच नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🛣☀🛣☀🛣☀🛣☀🛣☀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वस्तूची किंमत*एके ठिकाणी एक रेशमाचा किडा होता. तो एके दिवशी आपला रेशमी कोश विणत होता. त्यावेळी शेजारी एक कोळी होता. तो मोठय़ा चपळतेने आपले जाळे विणत होता. तो कोळी त्या किड्याकडे तिरस्काराने पाहून त्याला म्हणाला, 'अरे, माझ्या जाळ्यासंबंधी तुझे काय मत आहे? हे जाळे मी आज सकाळी प्रारंभ केले व आता ते अर्धेअधिक पुरेसुद्धा झाले. एवढे मोठे व इतके सुंदर जाळे मी इतक्या थोड्या वेळात विणले तरी तू आपला रेंगाळतच बसला आहेस.' त्यावर रेशमाचा किडा शांतपणे उत्तरला, 'अरे, तू वाटेल तेवढी बढाई मारलीस तरी तुझ्या व माझ्या जाळ्यातील अंतर सगळ्यांना माहीत आहे. गरीब बिचार्या निरपराधी प्राण्यांना पकडण्यासाठी तू ते जाळे पसरले आहेस, त्याचे आयुष्य किती क्षणिक आहे बरे? एखाद्या मुलाने हे जाळे पाहिले तर तो एका क्षणात याचा नाश करून टाकेल. उलट माझ्या जाळ्यापासून जे रेशीम निघेल, त्याची वस्त्रं पुढे एखाद्या राजाच्याही अंगावर बघावयास मिळतील.तात्पर्यःकोणत्याही वस्तूची किंमत मोठ्या आकारावरून न ठरवता लहानशी वस्तू देखील अतिशय उपयुक्त आणि मौल्यवान असते..*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment