✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 06/12/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *महापरिनिर्वाण दिन*💥 ठळक घडामोडी :- ● २०००-थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा 'डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीयपुरस्कार' प्रदान करण्यात आला.● १९९२ - अयोध्येमध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली.त्यामध्ये उसळलेल्या दंगलीत सुमारे १५०० लोक ठार झाले● १९९७ - सायबेरियातील इर्कुट्स्क शहरात रशियाचे ए.एन.१२४ जातीचे विमान रहिवासी भागात कोसळले. ६७ ठार.💥 जन्म :-● १९१४ - सिरिल वॉशब्रूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९४६ - फ्रँक हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९५२ - रिक चार्ल्सवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू, राजकारणी, हॉकीपटू व मार्गदर्शक.● १९७७ - फ्रेड फ्लिन्टॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९७६- क्रांतिसिंह नाना पाटील● *१९५६ - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, भारतीय संविधानकार, कायदेमंत्री व अर्थतज्ज्ञ*● २००५ - देवन नायर, सिंगापूरचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने महाराष्ट्राचा अपमान,17 तारखेला भव्य मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राची शक्ती दाखवू: उद्धव ठाकरे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यातील गोवर रुग्णांची संख्या 836 वर; टास्क फोर्सच्या बैठकीत अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं, 93 जागांसाठी 59 टक्के मतदानाची नोंद, 8 डिसेंबर रोजी होणार मतमोजणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *चंद्रपूर जिल्ह्यातील बाह्मणी परिसरात सोन्याचे साठे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाचाही दुजोरा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *लोकांना बेकायदेशीरपणे परदेशात पाठवण्यास मदत करणाऱ्या पोलिस हवालदाराची हकालपट्टी, गुप्तचर विभागाचे दोन अधिकारीही रॅकेटमध्ये सामील*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवासारख्या दिग्गज टेनिसपटूंचे कोच निक बोलेटिएरी याचं निधन, 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोरोनानंतर महापालिका शाळांतील विद्यार्थी संख्येत 42 टक्क्यांची वाढ, मात्र दहा वर्षात मराठी माध्यमातील संख्या 51 टक्क्यांनी घसरली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*फ्रेश मॉर्निंग बुलेटीन टीमकडून भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Astronomy Club अस्ट्रोनॉमी👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/mTm6aAGdHHE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रज्ञासूर्य विशेषांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••••डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेश मधील महू येथे झाला. त्यांचे मूळ नाव भीमराव असॆ होते. परंतु भारतातच नाही तर परदेशात ते बाबासाहेब या नावानेच सुप्रसिध्द आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते. भीमराव लहान असताना त्यांची आई देवाघरी गेली. तेंव्हा त्यांच्या आत्यानी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उद्योगी, महत्वाकांक्षी आणि शिस्तीने वागणारे होते. लष्कराच्या शाळेत.......खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा व विशेषांक download करून घ्यावे.https://drive.google.com/file/d/1kosTls7MJZs-ZqpbQIfouieMOvY65wbl/view?usp=drivesdk प्रज्ञासूर्य विशेषांक वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवावे~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *बाष्पीभवन व उत्कलन* 📙 ******************************तापमानातील बदल, तापमानातील फरक, द्रव पदार्थांवरील वातावरणातील हवेचा दाब, द्रवपदार्थाचा उत्कलनबिंदू या साऱ्यांचा परिणाम बाष्पीभवन नावाच्या प्रक्रियेवर होत असतो. छोट्या छोट्या उदाहरणांतून हे आपण पाहिले, तर ते समजणे गमतीचे होते. उन्हाळा आल्यावर घरच्या कुत्र्यासाठी ताटलीत घातलेले पाणी संध्याकाळी कदाचित त्याने न पिता देखील नाहीसे झालेले असते. या उलट पावसाळ्यात पाऊस पडायचा थांबला तरीसुद्धा दारातील फरशीवर साचलेले पाणी सुद्धा कित्येक तास तसेच दिसते. कपभर चहा जेमतेम पाच मिनिटात आपण आपल्या गावात बनवतो. पण तोच कपभर चहा बनवायला गिर्यारोहकांना, हिमालयातील आपल्या सैनिकांना किमान पंधरा मिनिटे लागतात. डॉक्टर इंजेक्शन देण्यापूर्वी स्पिरिटचा बोळा फिरवतात; पण इंजेक्शन देऊन होण्यापूर्वीच ती जागा कोरडी झालेली असते. भल्यामोठ्या धरणातील पाणी काटकसरीने वापरूनसुद्धा कमी होत जाते किंवा आपल्याला नियमित पाणी पाऊस मिळतो, याचेही कारण समुद्रातील पाण्याचे, मोठ्या जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन आहे. कोणत्याही द्रवपदार्थाच्या पृष्ठभागावरील कणांचे सतत वायुरूपात रुपांतर होत असते. वातावरणातील आर्द्रता, उष्णता यांचा त्यावर कमी जास्त परिणाम होत राहतो. द्रवाचे तापमान जसे वाढते, तशी ही प्रक्रिया वाढते. मात्र तापमान कमी झाले तरी ती पूर्णत: थांबत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. थंडीच्या दिवसांत तळ्याच्या किंवा नदीच्या काठी उभे राहिलो तर पाण्यातून निघणाऱ्या या कणांनी बनलेल्या वाफा सहज आपल्या दृष्टीला पडू शकतात, त्याही सकाळच्या कडाक्याच्या थंडीत जेमतेम आठ ते दहा सेंटिग्रेड तापमानाला. द्रवाचा उत्कलनबिंदू कमी असला, तर हे बाष्पीभवन वेगाने होत असते. उदाहरणार्थ, पेट्रोल, स्पिरिट, टर्पेंटाइन ठेवलेली बाटली वा मोठा कॅन खोलीत नुसता उघडा राहिला, तरी त्या पदार्थांचा वास काही सेकंदात आपल्याला येऊ लागतो. प्रत्येक पदार्थाचा एक उत्कलनबिंदू ठरलेला असतो. हे अगदी घनपदार्थ वा धातुंनाही लागू आहे. पण आपण येथे मुख्यतः द्रवपदार्थाबद्दलच विचार करणार आहोत. उदाहरणार्थ, पाणी जेव्हा उत्कलनबिंदूएवढे तापवले जाते, तेव्हा त्यानंतर त्याला मिळणाऱ्या उष्णतेतून त्याचे तापमान वाढत नाही, तर पाण्याचे रूपांतर वाफेत होणे सुरू होते. ही वाफ झपाट्याने पाण्याच्या भांड्यातून बाहेर पडताना आपण पाहतो. उत्कलनबिंदूवर हवेच्या दाबाचा परिणाम होतो. दाब कमी झाल्यास उत्कलनबिंदू कमी झाल्याने तापमान कमी राहते. याउलट दाब वाढविल्यास द्रवाचे तापमान अधिक वाढू शकते. या तत्त्वाचा वापर करूनच घरगुती प्रेशर कुकरमध्ये तापमान सुमारे ५ पौंड दाबाखाली ११५ सेंटिग्रेडपर्यंत वाढवून अन्न लवकर शिजवले जाते.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून कोणत्या राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे ?२) पुरुष विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २०२२ स्पर्धेच्या सामन्यात रेफरिंग करणारी पहिली महिला रेफ्री कोण ठरली ?३) विजय हजारे ट्रॉफित सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम कोणी केला ?४) नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेते कोणाला ओळखले जाते ?५) कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?*उत्तरे :-* १) महाराष्ट्र २) स्टेफनी फ्रापार्ट, फ्रान्स ३) ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्र ४) मेधा पाटकर ५) बसवराज बोम्मई *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अमोल सेठ येमुल, पुणे👤 डी. आर. भोसके, येवती👤 अशोक हिंगणे👤 शंकर बोंबले👤 कैलास सोनकांबळे👤 बालाजी गैनवार, चिकना👤 नवनाथ राजीवाडे👤 भगवान चव्हाण 👤 राजेश जाधव उमरेकर👤 माधव हालकुडे👤 प्रा. मंगल सांगळे👤 दत्ता काशेवार👤 विवेक क्षीरसागर👤 देवानंद मुरमुरे👤 नरेश पांचाळ👤 राजेश आंपलवाड👤 कैलास सोनकांबळे👤 बाबासाहेब घागले👤 लवकुमार मुळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*माणसाच्या स्वभावातील 'मी' पणा हाच त्याचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यामुळे 'मी' पणाच्या मगरमिठीतून त्याची सुटका होणे अशक्यप्राय असते. 'मी' पणा म्हणजेच अहंकार. हा अहंकार दगडी भिंतीसारखा असतो. सहज जरी दगडी भिंतीवर आपले डोके आपटले तरी ते रक्तबंबाळ होऊ शकते; परंतु अस्मिता ही खुल्या खिडकीसारखी असते. अशा खिडकीतून स्वच्छ आणि शुद्ध हवा आतून बाहेर खेळत असते. अहंकारी माणसे उगाचच सतत म्हणत असतात की, 'मी हे केले आणि मी ते केले'. 'मी' पणाची अशी वल्गना करण्यापेक्षा अस्मिता बाळगणारी माणसे म्हणत असतात की,'मी देखील हे करू शकतो, मी देखील ते करू शकतो.'**अस्मितापूर्ण भाषेत सौजन्य असते, नम्रता असते, शहाणपण असते. अहंकार हा एखाद्या महावृक्षासारखा असतो. घोर संकटाच्या वादळात तो मुळासकट जमीनदोस्त होऊ शकतो; परंतु अस्मिता लव्हाळ्यासारखी असते. ती वा-याच्या तालावर आनंदाने डोलत असते. अहंकाराच्या महापुरात मोठ मोठे वृक्ष वाहत जाऊन नाहीसे होतात ; परंतु अस्मितेच्या वाटेवर स्वार होऊन छोटीशी मुंगी पैलतीरावर जाऊन हसत असते. आपले जगणे हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. आपल्या जगण्यात आनंद आहे. तो अनुभवायाचा असतो. आपले जगणे आनंदाचे गाणे व्हावे असे वाटत असेल तर अहंकारमुक्त प्रांगणात स्वछंदपणे विहार करायला शिकले पाहिजे. अस्मितापूर्ण आकाशात गरूडभरारी घ्यायला शिकले पाहिजे. आपले जगणे मलयगिरी पर्वतावरील सुगंधित वा-यासारखे व्हावे असे वाटत असेल तर प्रथम आपण अहंकाराचा त्याग केला पाहिजे. कवी बा. भ. बोरकर म्हणतात..."जीवन त्यांना कळले हो । मीपण ज्यांचे पक्व फळापरि गळले हो ॥* ‼ *रामकृष्णहरी*‼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• माझा जसा परमेश्वरावर विश्र्वास आहे तसाच परमेश्वरानंतर पुस्तकावर जास्त विश्वास आहे.आणि परमेश्वराखालोखाल मी पुस्तकालाच मानतो. कारणही तसेच आहे.पुस्तके ही वयाच्या अगदी तिसऱ्या चौथ्यापासून साथ धरली आणि आजही त्यांचीच साथ आहे.पुस्तकामुळेच जीवनाला अर्थ आला,त्यानेच अन्नापाण्याला लावले, संस्कारक्षम बनवले,अज्ञान दूर घालवले,माणूस म्हणून जे काही घडलो ते ह्या पुस्तकामुळेच...!अन्यायाचा प्रतिकार करायला शिकवले त्या पुस्तकांनीच, जीवन कसे जगायचे,जीवनाचा आनंद कसा घ्यायचा,मन स्थिर कसे ठेवायचे,संयम कसा राखायचा,समोरच्या व्यक्तीसमोर आणि जगासमोर कसा व्यवहार करायचा हे पुस्तकांनीच शिकवले.पुस्तकाचा जन्म कधी झाला हे जरी माहीत नसले तरी पुस्तके ही प्रत्येक पिढीला आदर्शच राहून व्यक्तीला,समाजाला आणि राष्ट्राला चांगले आदर्श दिशा देणारे परमेश्र्वरच आहेत.थोरांचे विचार,संतांचे उपदेश,विचारवंतांचे विचार हे पुस्तंकांच्या किंवा ग्रंथांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे कार्य पुस्तकातूनच होते.म्हणून ज्ञानप्राप्तीचा मूळ पाया हा पुस्तकांचाच आहे.प्रत्येकांनी पुस्तकाच्या सानिध्यात राहायला तर हवेच.आपल्या ज्ञानाची भूक शमविण्याचे काम ही पुस्तकेच करतात.एकवेळ उपाशी राहिले तरी चालेल पण पुस्तके आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही अशी भूमिका जर प्रत्येकाने घेतली आणि आपल्या घरात एक पुस्तकांसाठी छोटा खाणा किंवा एखादी जागा ठेवावी आणि नित्यनेमाने त्यातील एखाद्या पुस्तकाचे वाचन करावे.असे जर केले तर आपल्या मनावर असलेला ताण कमी तर होतोच पण एखाद्या संकटातून बाहेर जाण्याचा मार्ग निश्चितच सापडतो.माझे ज्या ज्या वेळी मन कोणत्याही कारणाने अस्थिर झाले असले तरी अशावेळी मी हातात एखादे पुस्तक घेऊन एका कोपऱ्यात वाचत बसतो आणि काही काळानंतर आलेला ताण हळूहळू कमी होतो तो केवळ पुस्तकामुळेच. प्रत्येकाच्या जीवनात जर सुख,शांती,समाधान,संस्कार,योग्य दिशा,जगण्याची आशा यांना मिळवण्याचे एकमेव माध्यम फक्त पुस्तकेच आहेत.त्यांच्या सानिध्यात राहायला शिकले पाहिजे.पुस्तकेच माझ्या खरे जीवन जगण्याचे आशाकेंद्र आहे .अशा पुस्तकरुपी परमेश्वराला शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या हृदयात स्थान आहे हे निर्विवाद सत्य आहे.व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.📚📕📚📕📚📕📚📕📚•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मनाची एकाग्रता*पांडुरंग *' मनाची एकाग्रता कशी करावी '* या विषयाचा अभ्यास करत बसला होता. त्याला जो कोणी भेटावयास येई, त्याच्याकडे तो दुर्लक्ष करायचा. आपल्याच चिंतनात मग्न असायचा. एकदा त्याचे गुरु सहदेव महाराज त्याच्याकडे आले. पाहतात तर पांडुरंग शून्यात नजर लावून बसलेला ! पांडुरंगाचे आपल्या गुरुकडे लक्षही नव्हते. सहदेव महाराज मात्र न रागावता तेथेच थांबले. त्यांनी एक वीट आणली आणि दिवसभर ती वीट एका दगडावर घासत बसले. शेवटी न राहवून पांडुरंगाने महाराजांना विचारले, '' महाराज आपण हे काय करता आहात ?'' सहदेव म्हणाले, '' मला या विटेचा आरसा बनवायचा आहे.'' पांडुरंग म्हणाला, '' महाराज, या विटेला घासून कधी आरसा होईल का ? जीवनभर घासत बसले तरीही विटेचा आरसा होणार नाही.'' ते ऐकून सहदेव हसले. म्हणाले, '' मग तू तरी काय करत आहेस ? वीट जर आरसा होत नसेल, तर मनाचे तरी काय ? मनावरील धूळ जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत साधना करुन तरी काय उपयोग ?मनाची एकाग्रता साधून जे कार्य केले जाते ते सर्वोत्तम असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment