✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 21 डिसेंबर 2022💠 वार - बुधवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आज उत्तर गोलार्धातील सर्वात लहान दिवस असून रात्र सर्वात मोठी असते*💥घडामोडी●१६२० - विल्यम ब्रॅडफोर्ड आणि मेफ्लॉवर पिल्ग्रिम्स प्लिमथ, मॅसेच्युसेट्स मध्ये प्लिमथ रॉक या ठिकाणी उतरले. यांची वसाहत म्हणजे अमेरिकेतील ब्रिटीश वसाहतींची मुहूर्तमेढ होय.● १९५८ - चार्ल्स दी गॉल फ्रांसच्या अध्यक्षपदी. युनियन देस् देमोक्रातेस् पुर ला रिपब्लिक पक्षाला ७८.५%चे बहुमत.● १९०९ - अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा खून केला.● १९६८ - अपोलो ८चे केनेडी स्पेस सेंटरहून उड्डाण. फ्रँक बॉर्मन, जेम्स लोव्हेल आणि विल्यम ऍंडर्स अंतराळात.● १९८७ - फिलिपाईन्सच्या तब्लास सामुद्रधुनीत प्रवासी फेरी दोन्या पाझ आणि तेलवाहू जहाज व्हेक्टर १ मध्ये टक्कर. १,०००हून अधिक ठार.💥 जन्म :-● १९६३- गोविंदा, हिंदी चित्रपट अभिनेता● १९५९-कृष्णम्मचारी श्रीकांत, भारतीय क्रिकेटपटू● १९०३ - भालचंद्र दिगंबर गरवारे उद्योगपती.● १९२१ - पी.एन. भगवती भारताचे सतरावे सरन्यायाधीश💥 मृत्यू :-● १८२४ - कंपवाताचा मानवी मेंदुशी संबंध आहे हे सिद्ध करणारे जेम्स पार्किन्स● १९४५ - जनरल जॉर्ज पॅटन दुसऱया महायुद्धातील यूरोपमधील अमेरिकन सेनापती.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पुण्यातील भिडे वाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या; बाबा आढावांची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती असल्याचा दावा, तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *बृहन्मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; राज्य सरकारचं कोर्टात स्पष्टीकरण.. सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *प्रजासत्ताकदिनी परेडसाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता, अंतिम निवडीसाठी १४ राज्यांना आमंत्रण, त्यात महाराष्ट्राचा समावेश नाही*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दिल्लीच्या रामलीला मैदानात जमले 50 हजार शेतकरी, केंद्राचे तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची करून दिली आठवण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार असून दुखापतीमुळे रोहित शर्मा व नवदीप सैनी अनफिट*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-6वा/Ecofriendly celebration👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/SKXBbzS1ZNM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *उपक्रम :- वाचू आनंदे*इयत्ता पहिली ते आठवीसाठी उतारा खालील लिंकवर उपलब्ध आहे.http://projectforchild.blogspot.com/2019/12/21-2019.htmlउपक्रम वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *📙 सस्तन प्राणी 📙*आईच्या पोटातुन जन्म घेणारे आईच्या दुधावर लहानपणी पोषण होणारे सर्व प्राणी म्हणजे सस्तन प्राणी होत. यांनाच 'मॅमल' असेही इंग्रजीत म्हणतात. मानव, मांजरे, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, घोडे, माकडे, जिराफ, हत्ती, डॉल्फिन व देवमासे हे सगळे सस्तन प्राणिगटात मोडतात. पृथ्वीवर एकूण चार हजार प्रकारचे सस्तन प्राणी सापडतात.इतर सर्व प्राणी अंडी घालतात. पण सस्तन प्राण्यांमध्ये मादीच्या पोटातच अंड्याची वाढ गर्भाशयात होते. पूर्ण वाढीचा काळ संपल्यावरच मग नवजात प्राणी आईच्या शरीरातुन वेगळा होतो. पण या पद्धतीतही तीन प्रकारचे बदल निसर्गात आढळले आहेत.गर्भाशयातील पोषण हे बाळाला जोडलेल्या नाळेद्वारे होते. हा एक प्रकार. त्याला इंग्रजीत (Placental) असे म्हणतात. हा बहुतेक सर्व जातींत दिसतो. दुसरा म्हणजे कांगारूचा. या प्रकारात (Marsupial) अगदी छोटा जीव आईच्या पोटाला असलेल्या एका पोतडीत जन्माला येतो. तेथेच राहतो, वाढतो. आईच्या दुधावर त्याचे पोषण होते. मोठा झाल्यावर मग आईपासुन तो सुटा होतो. तिसरा (Monoreme) प्रकार म्हणजे सशाचा आकार, पण बदकाचे पाय असा लांबुडका, शेपटी असलेला 'डक बिल्ड प्लॅटिपस' या जातीचा प्राणी. तो फक्त ऑस्ट्रेलियातच सापडतो. खरे म्हणजे हा प्राणी अंडी घालतो. पण त्याची पिल्ले मात्र आईच्या दुधावरच वाढतात. म्हणुन त्याला सस्तन गटात घेतले आहे. सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे देवमासा किंवा निळा व्हेल. सर्वात उंच जिराफ, सर्वात दांडगा हत्ती. स्वत:ला सर्वात हुशार समजणारा माणूस.'सृष्टीविज्ञान गाथा' या पुस्तकातुन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ३५ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन कोठे पार पडणार आहे ?२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा विजेता देश कोणता ?३) सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे राहतो या बिंदूला काय म्हणतात ?४) 'डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?५) २१ डिसेंबर २०२२ रोजी दिवस किती तासांचा आहे ?*उत्तरे :-* १) चंद्रपूर २) अर्जेंटिना ३) विंटर सोल्सटाईल ( हिवाळा आयन दिवस ) ४) रायगड ५) १० तास ४७ मिनिटे *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 लक्ष्मी जैपाल ठाकूर, गोंदिया👤 मन्मथ खंकरे👤 श्रीमती माणिक नागावे, साहित्यिक, कोल्हापूर👤 गजानन गायकवाड👤 संभाजी तोटेवाड👤 जयश्री फुले👤 माधव मुंडकर*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *खरंतर मनाच्या कुपीत अत्तरासारखा जपून ठेवावा, असा अनमोल ठेवा असतो 'घर.' परस्परांशी लळा लागला की जुळून आलेले जन्माचे ऋणानुबंध घराला घरपण देतात. मग घरच मंदिर होऊन जातं. एकमेकांच्या स्वप्नांसाठी प्रार्थनेच्या स्वरांनी भरलेली घरं कुणालाही हवीहवीशी वाटतात. काही घरांची दारं मात्र सदैव बंद असतात. मनाची कवाडं जिथं बंद असतील, तिथं घराची कवाडं कशी उघडतील? अशा घरांच्या उंचीवरून घरातल्या रास्त आनंदाची मोजदाद होत नसते. तर आनंद हाच घरांचा, तिथल्या माणसांच्या उंचीचा मापदंड असतो. ज्या घरात कटुतेच्या भारानं मनं गुदमरलेली असतात, त्या घरातला प्रपंच सुखाचा कसा होईल?**कृत्रिम वस्तूंच्या, बेगडी जगण्याच्या मायावी जाळ्यात अडकत चाललो आहोत का आपण? हे जाळं भल्याभल्यांना मोहवतं. घर जर आपुलकीवर, माया-ममतेच्या भिंतींवर उभं असेल तर येत्या जात्या वाटसरूंनाही ते आपलं वाटतं. जिथं तृप्तीची वीणा झंकारत असते. माझ्या घरातली सारी माणसं माझी आहेत ही भावनाच सा-यांना जोडून ठेवते. अशा मनस्वी माणसांच्या अस्तित्वाचं सर्वांना आकर्षण असतं, चुंबकासारखं. सुखी संसार त्याचीच परिणती असते. ही अथांग तृप्तीची गोळाबेरीज संपत्तीच्या पलिकडची असते."साधे गवत फुलण्याला सुख म्हटले मी, सहज भेटलेल्या जगण्याला सुख म्हटले मी, अवती भवती झगमगती नक्षत्रे होती, पण वातीच्या जळण्याला सुख म्हटले मी"* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपण आपल्या दैनंदिन जीवनात काय केले आहे हे आपण जिथे नोंद करुन ठेवलेली असते.त्यात काल,आज आणि उद्या या तिन्ही काळाचा उलगडा केलेला असतो.आपण आपल्या जीवनात कसे वागलो आहोत त्याचीही नोंद केलेली असते.कधी आपल्याला विस्मरण झालेले असेल तर ते स्मरण करुन देण्याचे काम ती करते.आपण किती खरेखोटे जीवनात इतरांशी बोललो किंवा वागलो त्याचाही हिशोब ती आपणच नोंदवलेल्या शब्दांत आपल्यासमोर आरशासारखे काम करते.ती एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेली असते.तिला आपण कधीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरु शकत नाही.एवढे प्रेम ती आपल्यावर करते आणि आपण तिच्यावर करतो.ती आपल्याला आपल्या जीवनात सतत प्रेरणा देते आणि आपल्या जीवनाला तिला पाहून, वाचून सावरतो अशी प्राणप्रिय वस्तू म्हणजे डायरी अर्थात आपली रोजनिशी.जी माणसे जीवनात खरे यशस्वी होतात ती आपल्या जीवनात घडलेल्या, घडून गेलेल्या आणि घडणाऱ्या घटनांची सत्यतेची नोंद करतात आणि त्यासाठी ती डायरी अत्यंत मोलाचे काम करते.तीच आपल्यासाठी कोणत्याही काळात न बदलणारी,सत्य उलगडून आपल्यातील दोष दूर करण्यासाठी जाणीव करून देणारी खरी मैत्रीण असते ती आपल्या जीवनात असायलाच हवी नाहीतर आपल्या जीवनातले दुसरे कोणीही एवढे काम करणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *राजा आणि संत*एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्या तपश्चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्था जायचा तेव्हा ते संत त्यांच्याशी बोलत असत. त्याच यात्रेकरूकडून त्यांना तेथील राजास त्या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्यास निघाला. जेव्हा संतांना ही गोष्ट कळाली.तेव्हा त्या दोघांना वाटले की आता राजा येणार व त्याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्यास येईल, त्याच्याबरोबर अनेक माणसे येतील, त्यां माणसांच्या संगतीने अजून काही माणसे येतील व अशाने या वनातील शांती भंग पावेल व एकांत मिळणार नाही व एकांत नसल्याने आपणास ध्यानसाधना करता येणार नाही. राजा आम्हाला दोघांना सामान्य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्या संताने दुस-याला म्हटले,'' तू स्वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्यावर म्हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्त ज्ञान मी माझ्या शिष्यांना दिले आहे.'' राजाने व त्याच्याबरोबरच्या लोकांनी हे भांडण पाहिले व विचार करू लागले हे साधू संत तर सामान्य माणसाप्रमाणेच भांडत आहेत व त्यांनी सर्वांनी असल्या साधूसंतांचा संग नको म्हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा व लोक जाताच दोन्ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले व गळाभेट घेतली. दोन्हीही साधू आपल्या साधनेत रममाण झाले.तात्पर्य : चांगली गोष्ट घडवून आणण्यासाठी कधीकधी असा देखावा करावा लागतो.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment