✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 20/12/2022 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस*💥घडामोडी● १५२२ - नाइट्स ऑफ ऱहोड्सची सुलेमान द मॅग्निफिसन्टपुढे शरणागति. जीवनदान मिळालेले हे सरदार माल्टात वसले व नाइट्स ऑफ माल्टा म्हणून प्रसिद्ध झाले.● १८०३ - लुईझियाना खरेदी पूर्ण.● १९४५-मुंबई-बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू.💥जन्म● १५३७ - जॉन तिसरा, स्वीडनचा राजा.● १९४२-राणा भगवान दास,पाकिस्तानातील पहिले हिंदू मुख्य न्यायाधीश💥मृत्यू● २१७ - पोप झेफिरिनस.● १९५६-डेबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ संत गाडगेबाबा ● १९९६: बलुतंकार दलित लेखक दगडू मारुती तथा दया पवार*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाला काही कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *शैक्षणिक सत्र 2023-24 साठी जेईई मेन 2023 जानेवारीतील परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याची विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात आहे मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *न्यायाधीश, पत्रकार डगमगले तर लोकशाही कोसळणार; न्या. बी.एन. श्रीकृष्णा यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *कोरेगाव भीमा येथे 31डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत मद्यविक्रीस बंदी,शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सोलापूरमध्ये विमानतळही हवे आणि सिद्धेश्वर साखर कारखानाही! शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आर्थिक मदतीसोबतच लम्पी बाधित जनावरांवर मोफत उपचार करा; सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा वर्ल्डकप २०२२च्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*वर्ग-6वा/News Flash👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/QLqM1Dx4aCY~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• प्रतिलिपी डॉट कॉम वरील स्पर्धागत आठवणीचा हिंदोळा मधील लघूकथा *लहानपण देगा देवा*वीस-पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात कोणाच्या घरी लाइट नव्हते तर टीव्ही दुरची गोष्ट. रेडियो नावाची चालती बोलती वस्तू मात्र घरोघरी दिसून यायची. आकाशवाणी केंद्रचे अनेक चाहते होते. मात्र टीव्हीचे दिवाने अगणित होते. पण बघायला कुठे मिळायचे. ते दिवस आजही जशास तसे आठवते. टीव्ही वर दर रविवारी *रामायण* मालिका चालू झाली होती. गावात कुणाकडे ही टीव्ही नव्हती तेंव्हा तीन ........वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी खालील प्रतिलिपीच्या लिंक वर वाचन करावे आणि आपल्या मित्रांपर्यंत share करावे.https://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar-nasa/lahanpanलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *अश्फाकउल्ला खान*अश्फाकउल्ला खान यांच्यासारखा ध्येयवेडा क्रांतीकारक आपण कल्पना करू शकणार नाही अशा आनंदाने फाशी गेला.फाशीच्या एक दिवस आधी ते छानपैकी हसून हसून गप्पा मारत होते आणि भेटणार्यांना म्हणायचे , मित्रांनो, उद्या माझ लग्न होणार."दुसर्या दिवशी सकाळी त्यांना लवकर उठवण्यात आलं, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी थोड्याच वेळात होणार होती , मरणाच्या उंबरठ्यावर असूनही त्यांच कवीमन नदीच्या पाण्यासारखं निखळ होत. तेवढ्या क्षणातसुद्धा त्यांनी काही शेर लिहून ठेवले होते , त्यापैकी एक असा ,"फनाह है हम सबके लिए, हम पै कुछ नही मौकूफ !वफा है एक फकत जाने की ब्रिया के लिए ॥(अर्थ : नष्ट तर सगळेच होणार आहेत, फक्त आम्ही एकटे थोडेच आहोत.न मरणारा तर केवळ एक परमात्मा आहे.)अश्फाकउल्ला खान यांचे सहकारी आणि आदर्श रामप्रसाद बिस्मिल हे सुद्धा अचाट प्रतिभेचे कवी होते. काकोरी कटाचे प्रमुख म्होरक्या म्हणून त्यांच्यावर खटला चालवला गेला, तसे ते फार शिकलेले नव्हते पण मुख्य कोर्टात आपल अपील त्यांनी स्वतःच लिहिल होतं. ज्यावेळेस त्यांना फाशीच्या तख्तावर उभ करण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले -I wish the downfall of the British Empire.(ब्रिटिश साम्राज्याचे पतन हीच माझी सर्वात मोठी ईच्छा आहे)अश्फाक यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९०० चा...चार भावंडांमध्ये सर्वात लहान त्यामुळे थोडे लाडके... घरची परिस्थिती उत्तम..सुखवस्तू असलेल्यांपैकी...महाविद्यालयीन दिवसांत १९२२ मध्ये त्यांचा संबंधरामप्रसाद बिस्मिल यांच्याशी आला. दोघेही चांगले मित्र होतेच पण बरोबर उत्तम उर्दू शायर देखील होते.राम प्रसाद हे टोपणनाव (तखल्लुस) 'बिस्मिल' तर, अशफाक 'वारसी' आणि नंतर 'हसरत' या उपनावाने लिहायचे... 'काकोरी कटाची' योजना दोघांच्या नेतृत्वाखालीच पार पडली आणि कटात दोषी आढळल्यामुळे दोघांना एकाच तारखेला, दिवशी आणि एकाच वेळी फाशी दिली गेली... केवळ जेल वेगळे (फरिजाबाद आणि गोरखपुर)देशाच्या स्वातंञ्यासाठी आपल्या कुटुंबकबिल्याचा त्याग करून तेवत असणाऱ्या धगधगत्या अग्निकुंडात सर्वस्व अर्पण करणार्या या सच्च्या क्रांतीकारकांना एक त्रिवार कुर्निसात...!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा अंतिम सामना कोणत्या दोन देशात झाला ?२) 'मिसेस वर्ल्ड २०२२' या स्पर्धेची मानकरी कोण ठरली आहे ?३) दृष्टिहीन टी - २० विश्वचषक स्पर्धा २०२२ कोणत्या देशाने जिंकली ?४) 'भवानी मातेचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?५) बुलेटच्या एका चाकावर अडीच किमीचा प्रवास करण्याचा विक्रम करून गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या स्टंटमॅनचे नाव काय आहे ?*उत्तरे :-* १) अर्जेंटिना व फ्रान्स २) सरगम कौशल, भारत ३) भारत ४) उस्मानाबाद ५) मनीष राठी, मु. जिंदरान, हरियाणा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 शंकर हासगुळे, सहशिक्षक, बिलोली👤 पल्लवी टेकाळे, कुपटी, माहूर👤 परमेश्वर नन्नवरे, सहशिक्षक, उस्मानाबाद👤 विठ्ठल नरवाडे, सहशिक्षक, धर्माबाद👤 गजानन मुडेले, देगलूर👤 सोपान हेळंबे, उमरी*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••. *"गेले द्यायचे राहून,* *तुझे नक्षत्रांचे देणे !* *माझ्यापास आता कळ्या,* *थोडी ओली पाने !!"**पाने ओली असेतोवरच ती देण्याघेण्यात मजा आहे. कोरडी पाने कुरकुरतात. माणसाच्या आयुष्यात प्रत्येक टप्याचा एक वेगळा 'गोडवा' आहे.**बालपण कसे टिपूर टिपूर निरागसतेने भरलेले, पौगंडावस्थेत अदमु-या कुतूहलाचे काहूर, तारूण्यात भन्नाट मस्ती, चाळीशीत पोक्त पालवी, पन्नाशी हा फळे चाखायला सुरूवात करण्याचा काळ, साठीनंतरचे आयुष्य म्हणजे सेकंड इनिंग खरेतर बोनसच. त्यासाठी लागणारी तंदरूस्ती टिकवावी लागते. यातही 'दैवं चैवात्र पंचम'नामे घटक असतो, त्याने प्रभाव दाखवल्यास सगळेच देणे-घेणे राहून जाते, विशेषत: घेणे. 'दिल अभी भरा नही' सिच्यूएशनला भरल्या ताटावरून, भरल्या घरातून, रंगल्या मैफलीतून उठून जाणा-यांची 'वही कोरीच' राहते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• तुमच्या आशारुपी पंखांना खूप पसरु द्या.कारण तेच पंख तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी मदत करतात.त्यांना जर संकुचित वृत्तीने तुमच्याच मनामध्ये जवळ करुन ठेवलात तर तुमच्या मनातल्या असलेल्या इच्छा पूर्ण कशा होतील ? त्यापेक्षा त्या पंखामध्ये आत्मविश्वासरुपी बळ निर्माण करुन त्यांना नवे काहीतरी करण्यासाठी पसरु द्या म्हणजे तुम्हाला आनंदाने आणि समाधानाने जीवन जगण्यासाठी संधी निर्माण करुन देतील.पक्षी आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात ते पंखाच्या बळावरच ना ! मग पंखच पसरले नसते किंवा एखादी बाजू पंख विरहित असली तर कसे बरे आकाशात विहार करु शकले असते नाही ना ? मग तसेच मानवी जीवनाचे आहे. आशारुपी पंखांचे तसेच आहे त्यांनाही थोडे स्वातंत्र्य द्या आणि जीवनरुपी आकाशात स्वच्छंदपणे विहार करायला प्रेरणा द्या.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *पारंगत*खूप वर्षापूर्वी रामपूर गावात एक आंधळा माणूस राहात होता. तो कोणत्याही पक्ष्यांला, प्राण्याला हात लावून तो कोणत्या प्रकारचा प्राणी आहे हे ओळखण्यात तो फार हुशार आणि प्रसिद्ध होता. एकदा एका माणसाने एक लांडग्याचे पिलू त्याच्याकडे परीक्षेसाठी आणले. आंधळ्याने त्याला जवळ घेऊन अंग चाचपून पाहिले, पण त्याची नीट परीक्षा त्याला झाली नाही. मग तो थट्टेने त्या लांडग्याच्या पोराला म्हणाला, 'अरे, तू कुत्र्याचं पिलू आहेस की लांडग्याचं हे मी खात्रीपूर्वक सांगू शकलो नाही, तरी तुला मेंढराच्या कळपात सोडण्याचा सल्ला मी कधीही देणार नाही.!'*तात्पर्य :- सुंदर जरी गाढवाचे पोर दिसले तरी त्याचा गाढवपणा कधीही लपत नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment