✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/12/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• बहरैन - राष्ट्रीय दिन. बांगलादेश - विजय दिन. कझाकस्तान - स्वातंत्र्य दिन.💥 ठळक घडामोडी :- ● १९९८ - ऑपरेशन डेझर्ट फॉक्स - अमेरिका व युनायटेड किंग्डमने इराकवर बाँबफेक केली.● १९७१-भारत-पाक युद्ध,पाक सैन्याची शरणागती,बांगलादेश ची निर्मिती.● १९०३- मुंबईतील ताजमहाल हॉटेल पॅलेस ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.💥 जन्म :-● १७९० - लिओपोल्ड पहिला, बेल्जियमचा राजा.● १८८२ - सर जॅक हॉब्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९५२ - जोएल गार्नर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● २००४- लक्ष्मीकांत बेर्डे,मराठी चित्रपट अभिनेता● १९६०-चिंतामण गणेश कर्वे,मराठी कोशकार व लेखक● १५१५ - अफोन्सो दि आल्बुकर्क, पोर्तुगालचा भ्रमंत.● १९२२ - गेब्रियेल नारुतोविझ, पोलंडचा पहिला राष्ट्राध्यक्ष*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *नुकसान भरपाईच्या रकमेत प्रती हेक्टर दुपटीने वाढ, महसूल व वन विभागाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *एसीसी आणि अंबुजा सिमेंट यांनी त्यांचे कारखाने बंद केल्याने सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांवर आली उपासमारीची वेळ*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची घेतली भेट*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समृद्धी महामार्गावर औरंगाबाद जवळील वैजापूर येथे कारला भीषण आग*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *नंदुरबार मिरचीची बाजारपेठ ढासळली, लाखोंचा खर्च मात्र हजारो क्विंटल मिरची पाण्यात, अवकाळी पावसाने नुकसान*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नागपूर येथील डॉ. आंबेडकर रुग्णालय कंत्राटीवरच; श्रेणीवर्धनचा प्रस्ताव रखडला, 1165 कोटींचा प्रकल्प थंडबस्त्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *FIFA World Cup 2022 : मोरक्कोला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Story-Alyonushka👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/FmvW7rOOdaU~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• एक देश, एक ओळखपत्रhttp://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_7.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🐝 *मधमाशा* 🐝 ******************नैसर्गिकरीत्या माणसाला ज्ञात असलेला गोड पदार्थ म्हणजे मध. साखरेचा वापर सुरू होण्याआधी अनेक ठिकाणी मधाचाच वापर केला जात असे. आजही मध आरोग्यदायी समजला जातो. हा मध मधमाशा गोळ्या करतात. मधमाशा जगभर आढळतात. संख्येने प्रचंड प्रमाणावर आढळणारी ही जात एखाद्या जमातीप्रमाणे वा कुटुंबाप्रमाणे राहते. अर्थातच एका पोळ्यामध्ये आढळणाऱ्या मधमाशा या त्या कुटुंबाच्याच घटक असतात. त्या तेथेच जन्माला येतात व वाढतात.षटकोनी आकाराची, एकात एक गुंतलेली सलग रचना असलेली मधाची पोळी वा स्वतःची वसतिस्थाने बांधण्याचे काम कामकरी माशा करतात, तर या पोळ्यात राहून फक्त अंडी घालून ती वाढविण्याचे काम राणी माशी करत असते. मुंग्या व अन्य किटकांच्या प्रमाणे या बाबतीत खूपच साधर्म्य आढळते. मोजकेच नर या पोळ्यात असू शकतात. नवीन राणीमाशीबरोबर संयोग झाल्यावर हे नर काही काळातच मरूनही जातात व राणीमाशी स्वतःचे घर बांधायला घेते. नवीन पोळे जन्माला येते.ज्या जंगलात ज्या प्रकारची झाडे असतील, फुले असतील, त्यांतील मध गोळा करून तो पोळ्यात साचवण्याचे काम मधमाशा अथकपणे करत असतात. हा मधाचा साठा जसजसा वाढत जातो, तसतसा पोळ्याचा आकार वाढत जातो. पोळे हे मुलत: नैसर्गिक मेणाचे बनलेले असते. मधाची चव फुलांनुसार बदलते.फुलामधील मध स्वतःच्या सोंडेने शोषून घ्यायचा व तो पोळ्यात आणून साठवायचा, ही क्रिया करत असताना मधमाशी आणखीही दोन कामे करते. एका फुलाचे परागकण पंखांना लागतात, ते दुसऱ्या फुलावर नंतर टाकले जाऊन वनस्पतींचे पुंसवन होते. याचवेळी मागील पायांना लागलेले परागकण पोळ्यात आणले जातात व ते नुकत्याच अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्यांना खायला दिले जातात. यांवरच त्यांचे पोषण होते. काही काळातच त्यांचे पूर्ण मधमाशीत रूपांतर होते. मधमाशीचे आयुष्य हे सहसा ऋतूपरतेच मर्यादित असते. त्यातही ती जर कोणाला डसली तर शरीराच्या मागील टोकाला असलेली नांगी काटेदार रचनेमुळे तेथेच रुतून अडकते. नांगी शरीराला जोडणाऱ्या स्नायूंनाही दुखापत होऊन मधमाशी स्वतःचा जीव गमावते. ही वस्तुस्थिती लक्षात घेतली म्हणजे मधमाशी उगाचच हल्ला करून चावणार नाही, याची खात्री पटेल. पोळ्याला धोका आहे, हे कळल्यावर मात्र हजारो माशा आसपासच्या सर्वांवर हल्ला चढवतात.मधमाशांचा मध गोळा करण्याचा गुण लक्षात घेऊनच मधुमक्षिकापालन पेटी तयार केली गेली आहे. यात पोळे तसेच ठेवून सेंट्रीफ्युगल फोर्सने मध फक्त काढून घेतला जातो. रिकाम्या पोळ्यात मधमाशा पुन्हा मध गोळा करू लागतात.मधमाशा व गांधील माशा या दोन जाती तशा पोटजातीच आहेत. फक्त गांधीलमाशा मध गोळा करत नाहीत. त्यांची पोळी लहान असतात. त्या चावल्या तर जास्त त्रास होतो. आकाराने मधमाशीपेक्षा मोठ्या व लालभडक रंगाच्या असतात.मधमाशा एकमेकांना संदेश कसा देतात, हे मोठे विलक्षण आहे. एखादी माशी फुलांचा शोध घेऊन आल्यावर ती एक प्रकारचा नर्तनाचा प्रकार करून तिच्या सहचरींना फुलांची दिशा व अंतर यांची माहिती पुरवते. बघता बघता पोळ्यातील माशा तिकडे जातात. या संदेशव्यवस्थेचे अजूनही नीटसे आकलन झालेले नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) देशाची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस कोणत्या शहरादरम्यान धावली ?२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गावाचे नाव काय आहे ?३) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून एकूण किती द्विशतके झाली आहेत ?४) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनास काय म्हणतात ? ५) भारतातील राष्ट्रीय पक्षांची नावे सांगा.उत्तरे :- १) नवी दिल्ली ते वाराणसी २) वडनगर, गुजरात ३) सहा ४) महापरिनिर्वाण दिन ५) भाजप, काँग्रेस, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी, तृणमूल *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 मा. खा. हेमंत पाटील, हिंगोली लोकसभा खासदार👤 डॉ. वसंत काळपांडे, मुंबई👤 डॉ. गजानन चौधरी, नांदेड👤 डॉ. शिवशक्ती पवार, नांदेड👤 उमेश कोटलवार, सहशिक्षक, रत्नागिरी👤 योगेश गुजराथी, धर्माबाद👤 शिवकुमार उपलंचवार, देगलूर👤 विजय सोनोने, सहशिक्षक, वाशीम👤 नरेश पांचाळ, धर्माबाद👤 श्याम पेरेवार*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*कोणतेही नाते प्रत्येक क्रियेने उज्ज्वल करता येणे, ही खरी सार्थकता. परंपरेने किंवा संस्कृतीने जी सणावारांची यादी केली, त्या प्रत्येक सणाचा अन्वयार्थ नव्याने शोधायला हवा; तरच आनंद-परमानंद-ब्रम्हानंद या पाय-या चढता येतील. वाद आणि भांडणाच्या प्रकारात जो अडकतो त्याचा फास आधिकाधिक घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्नेहभावनेतून जग जोडले पाहिजे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक दिवस स्नेहाद्रता पेरत येतो, म्हणून सण हे उत्सवांचे प्रतीक म्हणून साजरे व्हावेत.**नात्यांचा, घटनांचा अर्थ लावत आपल्याला मनाचा स्वयंविकास जेव्हा साधता येईल, तेव्हाच सगळे सण-उत्सव प्रतीकरूप होतील. रोजचा दिवस येतो आणि जातो. रोजच्या कामात मग्न असणारे आपण काही नवीन करतो का, किंवा जे कुठलेही काम करतो त्याच्यात काही नवीन शोधतो का ? नसल्यास ते जमले पाहिजे. नित्यनूतनतेचा ध्यास जोवर लागत नाही, तोवर आयुष्यातून शिळेपणा जाणार नाही. प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेने जगण्याच्या अनेकविध अंगांकडे पाहता आले पाहिजे.* *॥ रामकृष्णहरी ॥*💥💥💥💥💥💥💥💥💥 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••हल्ली कुटुंबाची व्याख्याच सिमित झाली आहे.याचे कारणही तसेच आहे.आपापल्या स्वार्थापुरतं क्षेत्र निर्माण करुन तेवढ्यापुरतंच मर्यादित करुन जीवन जगताना दिसत आहे.आई-बाबा,भाऊ-बहीण, आजी-आजोबा आणि इतरही नाते नात्याची असलेली आणि विणलेली घट्ट वीण कुठल्यातरी कमी संस्कारामुळे ,स्वार्थामुळे सैल झाली आहे त्यामुळे आता ही नाती एकमेकांपासून दूर गेली आहेत हे पहायला मिळते.आपल्याच पिढीला नाते काय असते आणि कसे असते कुणाला काय म्हणावे हे सांगताना एखाद्या गोष्टीत सांगितल्याप्रमाणे होत आहे.अशा सर्व गोष्टींमुळे येणा-या पिढीच्या मानसिकतेवर फार मोठा आघात होत आहे.त्यासाठी कुटुंब आणि कुटुंबातील सारे सदस्य आपुलकीने,प्रेमाने, थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली टिकवण्याची गरज आहे,प्रत्येकातील असणारा स्वार्थरुपी नाते संपुष्टात आणायला हवे,घरामध्ये कमावणा-या व्यक्तींचा सन्मान आणि न कमावणा-या व्यक्तींचा अपमान आणि तिरस्कार करणे टाळायला हवे.हे जर आपण आपल्यामध्ये प्रथम सुधारणा करून येणा-या पिढीला आदर्श संस्कारांची मात्रा त्यांना अधिक प्रमाणात दिली तर नात्यांची घट्ट वीण तयार होऊन एकमेकांबद्दल प्रेम,आदर,नाती, संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.कुटुंब म्हणजे काय आणि नाते कसे असते हे निश्चितपणे पिढीला समजेल.मग ते कधीही कुणाच्या नात्यापासून दुरावणार नाहीत की,कुणाची मने दुखावणार नाहीत.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀🍃🥀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *राणीने घेतलेली परीक्षा*एकदा शिबा राज्याच्या राणीने राजा सलोमन या प्रसिद्ध आणि चतुर राजाचा चातुर्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. एके दिवशी ती फुलांचे दोन हार घेऊन राजाकडे गेली. दोन्ही हार दिसायला अगदी सारखे दिसत होते. पण एक हार खरोखरचा फुलांचा होता; तर दुसरा हार कागदी फुलांचा होता. राणीने दोन हातात दोन हार धरले ती राजाच्या समोर उभी राहिली ती राजाला म्हणाली, " हे चतुर, राजा या दोन हारा पैकी कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे मला सांग. जागेवरून न उठता तू मला याचे उत्तर दे."दोन्ही हार बारकाईने पाहिले.दोन्ही हार सारखे दिसत होते.कोणता हार खऱ्या फुलांचा आहे हे त्याला ओळखता येईना. हार फक्त पाहून त्यातील फरक ओळखणे अवघड आहे, हे त्याला कळले. राजा विचार करू लागला. त्याला एक नामी युक्ती सुचली. महालाच्या एका बाजूला फुलबाग होती. राजाने सेवकाला महालाच्या त्या बाजूची खिडकी उघडायला सांगितली. सेवकाने खिडकी उघडली. त्या बरोबर बागेतील मधमाश्या आत आल्या आणि राणीच्या उजव्या हातातील हाराभोवती फिरू लागल्या.राजाने स्मित केले आणि म्हणाला, " माझ्या बागेतील मधमाशांनी मला तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले आहे. तुझ्या उजव्या हातातील हार खऱ्या फुलांचा आहे." राणीने राजाला आदराने अभिवादन केले आणि म्हणाली," हे राजा, तुझे उत्तर बरोबर आहे. तू खरोखरच हुशार आहेस."*तात्पर्यः माणसाने योग्यवेळी शक्तीचा, बुद्धीचा, व युक्तीचा वापर केला तर जीवनात कोणतीही परीक्षा, गोष्ट अवघड नाही.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment