✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 05/12/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन*💥 ठळक घडामोडी :- १९४५ - फ्लाइट १९, फोर्ट लॉडरडेल, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाच्या ५ टी.बी.एम.ऍव्हेन्जर जातीच्या विमानांची स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोनात गायब.१९८९ - फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी.ची गती गाठून विश्वविक्रम रचला.💥 जन्म :-१३७७ - ज्यान्वेन, चीनी सम्राट.१४४३ - पोप ज्युलियस दुसरा.💥 मृत्यू :- १५६० - फ्रांसिस दुसरा, फ्रांसचा राजा.१७९१ - वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट, मध्यकालीन युरोपियन शास्त्रीय संगीतकार.१९२६ - क्लोद मोने, फ्रेंच चित्रकार.२०१३ - नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिव्यांगजन आंतरराष्ट्रीय दिवसाचे औचित्य साधून दिव्यांगजनांच्या सक्षमीकरणातील योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या वर्ष 2021 व 2022 च्या राष्ट्रीय पुरस्कारांचे झाले वितरण*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात अमरावतीची हवा सर्वात स्वच्छ, तर चंद्रपूरची हवा देशात सर्वाधिक प्रदूषित*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून समृद्धी महामार्गाचा पाहणी दौरा, फडणवीसांच्या हातात स्टेअरिंग, शिंदे-फडणवीसांचा एकाच कारनं प्रवास*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पंढरपुरात माऊली कॉरिडॉरमुळे खुद्द विठुरायालाही व्हावं लागणार विस्थापित, पुरातन ताकपीठे, विठ्ठल मंदिराचे अस्तित्व धोक्यात*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोरोनापेक्षा घातक विषाणूचं सावट; आता कॅमल फ्लूचा धोका, FIFA मुळे जगाची चिंता वाढली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *महापरिनिर्वाण दिनासाठी पालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली आहे, तात्पुरता निवारा, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पाणी, शौचालये, स्नानगृह उभारण्यात येणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *रोमहर्षक सामन्यात भारत पराभूत, एक गडी राखून बांगलादेशचा विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *वाचू आनंदे**06 डिसेंबर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन*••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••http://nasayeotikar.blogspot.com/2022/12/dr-b-r-ambedkar.html••••••••★••••••••••★••••••••••★•••••••••••।। विनम्र अभिवादन ।।~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *पल्स पोलिओ म्हणजे काय ?* 📙पोलिओ अर्थात बाल पक्षाघात हा सामान्यत: पाच वर्षांपेक्षा लहान वयाच्या मुलांना होणारा एक सांसर्गिक रोग आहे. तीन प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. हा विषाणू दूषित पाण्यामार्फत पसरतो. पोलिओच्या रुग्णाच्या विष्ठेचा पाण्याशी संपर्क येऊन ते दूषित होते. हेच पाणी निरोगी व्यक्ती प्यायल्यास तिला पोलिओ होऊ शकतो.पोलिओ हा रोग ९९% व्यक्तींमध्ये अत्यंत सौम्य स्वरूपाचा असतो. ९५% लोकांमध्ये तर कोणतीही विशिष्ट लक्षणे दिसत नाही. ३ ते ४% लोकांमध्ये ताप आढळून येतो. १% लोकांमध्ये मान व पाठ आखडणे, दुखणे अशी लक्षणे दिसतात. १% हून कमी रुग्णांमध्ये मात्र मज्जासंस्थेवर विषाणू आक्रमण करतो. याची परिणती एकतर श्वसन बंद पडून मृत्यू होण्यात किंवा हात पाय कायमस्वरूपी लुळे पडण्यामध्ये होते.पोलिओ हा गंभीर रोग असला तरी तो टाळणे सहज शक्य आहे. बाळाला जन्मल्यावर लगेच आणि त्यानंतर ते ६, १०,व १४ आठवडय़ांचे तसेच नंतर दीड वर्षांचे झाल्यावर पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन दोन थेंब पाजल्यास या रोगापासुन बाळाचे नक्कीच संरक्षण होऊ शकते. भारतात लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला गेल्याने या रोगाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे.जागतिक आरोग्य संघटनेने २००५ पर्यंत पोलियोचे जगातून निर्मूलन करण्यासाठी धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. याला 'पल्स पोलिओ' असे म्हणतात. या कार्यक्रमाअंतर्गत विविध देशातील पाच वर्षांखालील बालकांना विशिष्ट दिवसांना पोलिओची लस दिली जाते. त्यामुळे सर्व बालकांच्या आतड्यांमध्ये लसीतील (रोग निर्माण करू न शकणारा) विषाणू प्रस्थापित होतो. साहजिकच रोगकारक विषाणूला राहण्यासाठी कोणत्याच बालकांचे आतडे मिळत नाही. परिणामी तो पर्यावरणात येतो व काही आठवड्यांनी नष्ट होतो. पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवली गेल्यास जगातून निर्मूलन होणारा देवी नंतरचा दुसरा रोग पोलिओ ठरेल यात शंका नाही. दुर्दैवाने काही व्यक्ती गैरसमजापोटी आपल्या बाळांना पोलिओची लस देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांच्या बालकांना पोलिओ होण्याचा धोका निर्माण तर झालाच आहे पण पोलिओ निर्मूलनाच्या अभियानालाही खीळ बसत आहे. म्हणूनच अमिताभ बच्चन तसेच शाहरुख खान सारखे लोकप्रिय अभिनेते तसेच सचिन तेंडुलकरसारखे महान खेळाडू सर्व जनतेला पल्स पोलिओच्या दिवशी सर्व बालकांना 'दो बूंद जिंदगी के' देण्याचे टीव्हीवरून आवाहन करताना दिसत असतात !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" सर्वात अधिक संकटे घेऊन येणारा क्षण आपल्याबरोबर येणार्या संकटासोबत विजयश्रीही घेऊन येतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) गुजरातमध्ये मतदारांत जागृती व्हावी यासाठी केवळ एका मतासाठी कोणत्या ठिकाणी मतदान केंद्र बनविण्यात आले होते ?२) जगात सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी मॅडरिन भाषा कोणत्या देशाची आहे ?३) २०२२ च्या IPL अंतिम सामन्यादरम्यान सर्वाधिक प्रेक्षकांच्या ( १,०१,५६६ प्रेक्षक ) उपस्थितीसाठी कोणत्या स्टेडियमचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने गौरव झाला ?४) केरळमधील कोणत्या ठिकाणाला 'दक्षिण काश्मीर' म्हणून ओळखले जाते ?५) भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण ( FSSAI ) ने कोणत्या प्राण्याला खाद्य प्राणी ( food animal ) म्हणून मान्यता दिली आहे ?*उत्तरे :-* १) बाणेज, उना विधानसभा क्षेत्र २) चीन ३) नरेंद्र मोदी स्टेडियम, गुजरात ४) मुन्नार हिल स्टेशन ५) याक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 विकास गणवीर, नागपूर👤 साईनाथ कल्याणकर, येवती👤 सूर्यकांत स्वामी👤 राज डाकोरे👤 संतोष रामराव शिंदे👤 अशोक चिंचलोड, येवती,👤 राजेश गटलावार👤 राजू अलमोड👤 योगेश पडोळे*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ? माझ्या घरात आज मी आहे.... उद्या मी नसेन....**माझ्या जागी एक मिणमिणता दिवा असेल. दहा दिवसांनी तो दिवा विझेल. मग त्या जागी माझा एक फोटो असेल, लाकडी चौकट, कोरीव नक्षीकाम केलेला, हसरा चेहरा असलेला एक फोटो...**काही दिवसांनी माझ्या लटकलेल्या फोटोवर साचलेली धूळ असेल... त्या फोटोची पातळ काच वेडीवाकडी तडकलेली असेल.. काही वर्षांनी माझा तो हसरा फोटो भिंतीवरच्या छिद्रातून खिळ्यासकट निखळलेला असेल... आणि मग त्यानंतर पिढ्यान्- पिढ्या माझ्याच घरात, माझ्या नावाचं फक्त उरलेलं एक छिद्र असेल.....!**"आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानांत मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'सत्कर्माच्या सप्तरंगी उत्सवात' करायला काय हरकत आहे...?"* ••●🌻‼ *रामकृष्णहरी* ‼🌻●•• 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पडलेल्या घराच्या भिंतीआत्मविश्वासाने आणि परिश्रमाने उभ्या करतायेतात नि घर उभे करता येते,परंतु चार माणसांची मने जर तुटली तर ती माणसं पुन्हा जोडणेआणि त्यांचे हृदयात घर करणे अतिशय अवघड आहे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवनातील तणाव दूर करणे.*एका शिक्षिकेने अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली. प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील की हा ग्लास भरलेला आहेकी रिकामा ? पण एक स्मित हास्य करुन मॅडमने प्रश्न केला, " या ग्लासचं वजन किती असेल कुणी सांगेल का ?"कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम. एक जण तर म्हणाला - मॅडम, अर्धा किलो ! मॅडमने पुन्हा एकदा स्मितहास्य करुन बोलण्यास सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने फारसा फरक पडणार नाही !मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार नाही. एकतास धरुन ठेवला तर हात दुखेल आणि दिवस भर असाच ठेवला तर . ? तर हात खुप जड होईल, ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ...आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं. क्षण भर विचार करा ,काही वाटणार नाही. पण मनात धरुन बसालतर ... तुमचं मन पण असंच जड होत होत बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार नाहीत ! तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा व कायम आनंदी रहा. मनाला हलकं करा आणि निरंतर अल्हाददायक जीवन जगायला शिका ... आयुष्यखुप सुंदर आहे .....!आयुष्य जगण्याच्या दोन पध्दती :१) जे आवडते ते मिळवायला शिका.२) जे मिळवले आहे तेच आवडून घ्यायला शिका.नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment