✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 09/12/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• टांझानिया (पूर्वीचे टांगानिका) - स्वातंत्र्य दिन💥 ठळक घडामोडी :- १९४६ - न्युरेम्बर्ग खटला सुरू.१९६१ - टांगानिकाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य.💥 जन्म :-१६०८ - जॉन मिल्टन, इंग्लिश कवी.१९१९- ई. के. नयनार, केरळचा मुख्यमंत्री.१९२३ - बॉब हॉक, ऑस्ट्रेलियाचा तेविसावा पंतप्रधान.💥 मृत्यू :- १५६५ - पोप पायस चौथा.१६६९ - पोप क्लेमेंट नववा. *संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मुंबई: गुजरातमध्ये तब्बल सातव्यांदा भाजपने (BJP) बाजी मारली असून जवळपास 157 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँगेसचा 39 जागांवर विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यातील सात हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी होणार मतदान, अर्ज माघार घेण्याची मुदत काल 7 डिसेंबरला संपली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका सज्ज, 15 दिवसात कार्यादेश जारी करणार; आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सरकारी नोकरीसाठी तृतीयपंथीयांना अर्जासाठी पर्याय देण्यास दिरंगाई होत असल्याची हायकोर्टाने घेतली गंभीर दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *पुणे :- मावळचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे हृदयविकाराने निधन; भाजपामध्ये मोठी पोकळी निर्माण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कोल्हापुरात पहिल्यांदाच राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे आयोजन देशभरातून येणार स्पर्धक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*At the Science fair👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/Gq_A5KR_H8w~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जनसेवेतच ईश्वराचीही सेवा*माणसाच्या आयुष्यात संकटे आली की, त्याला कुणाचा तरी आधार हवा असतो. हा आधार शारीरिक जरी नसला मानसिक असला तरी त्यांना ते पुरेसे असते. त्यामुळे दुःखी, कष्टी माणसे देवाचा धावा करताना दिसून येतात. सुखाचा वेळी कशाचीही आठवण न करता खा, प्या, मजा करा अशी माणसे दुःखाच्या वेळी, कठीण समयी देवाचे स्मरण करतात. वर्षातून कमीतकमी एकदा..............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_8.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *उलटी का होते ?* 📙उलटी होण्याची अनेक कारणे आहेत. कधी जास्त खाल्ल्याने अजीर्ण होऊन उलटी होते; तर काही जणांना बस, बोट लागून उलटी होते. हे तुम्ही अनुभवले असेल. पोटाला नको असलेला पदार्थ जठरात आला की मळमळ व्हावयास लागून उलटी होते. विषारी पदार्थ, काही औषधी, जास्तीचे जेवण, अति तेलकट पदार्थ, दारू यामुळे जठरातून हे पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी प्रक्रिया सुरू होते व हे पदार्थ तोंडावाटे बाहेर टाकले जातात. म्हणजे उलटी होते.खराब अन्नातून विषबाधा झाल्यामुळे उलट्या व जुलाब होतात. आंबट पाणी पडण्याची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये अधिक तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने उलटी होते. पचनसंस्थेच्या आजारांव्यतिरिक्त मेंदूच्या आवरणाच्या सुजेतही उलट्या होतात. या सुजेमुळे मस्तिष्क जलाचा दाब वाढून मज्जातंतूवर दाब येऊन उलट्या होतात. ती उलटी खूप जोरात होते. पोटात नको असलेला पदार्थ गेलेला असल्यास उलटीचे बाहेर पडतो. अशा वेळेस उलटी होण्यास मदत करावी. उलटी जुलाब होतच राहिले तर मीठ, साखर, पाणी थोडे थोडे सारखे देत राहावे. आम्लपित्तामुळे उलटी होत असल्यास ती अँटासिड गोळ्यांनी थांबते. गरोदर स्त्रियांमध्ये उलटी कोरडे पदार्थ खाल्ल्याने थांबते. थांबत नसल्यास अधिक तपासणी करावी लागते. तसेच जंतूसंसर्गामुळे उलट्या जुलाब होत असतील तर त्याची चिकित्सा करावी लागते. उलटी थांबत नसल्यास उलटीत रक्त किंवा लाल काळा करडा रंग दिसल्यास उलटीसोबत ताप, कावीळ, बेशुद्धी, मानतात ताठरणे अशी लक्षणे असल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे न्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••१) विदर्भात पहिला रेशीम कोश खरेदी बाजार कोठे भरला ?२) ग्लोबल एअरलाईन सेफ्टी रँकिंगमध्ये प्रथम तीन देश कोणते ?३) जगातील सर्वात गरीब देश कोणता ?४) नागपूर ते शिर्डी या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची लांबी किती किमी आहे ?५) जगातील पहिले गोल्ड ATM केव्हा व कोठे सुरू करण्यात आले ?*उत्तरे :-* १) बडनेरा, अमरावती २) सिंगापूर, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण कोरिया ३) कांगो ४) ५२० किमी ५) २०१०, अबुधाबी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अक्षय जाधव पाटील👤 प्रतीक यम्मलवार👤 सुहास रुक्मिणी दाभाडे👤 जय सिंग चौहान👤 आदित्य नलावडे, मुंबई*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*विकार आणि त्यावरील उपाय याचं सूत्रं स्वत:चं स्वत:ला शोधावं लागतं. एकदा ते सापडलं की मनामधील वैषम्य, मत्सर, तिरस्कार गळून पडायला सुरूवात होते. ही प्रक्रिया मन:शुद्धीकडे घेऊन जाणारी असते. एकदा ही अवस्था प्राप्त झाली, की मन गंगेसारखं निर्मळ नि प्रवाही होतं. एका सुंदर व निरामय जीवनानुभूतीकडं ते आपल्याला घेऊन जातं. संत कबीरांनी अतिशय सोप्या शब्दांत ही अवस्था मांडली आहे.* *" बुरा जो देखन मैं चला,* *बुरा न मिलिया कोय,* *जो दिल खोजा आपना,* *मुझसे बुरा न कोय !"**आपलं मन हरवलं, त्यातील संवेदना संपल्या, तर जगातील सर्वात वाईट मीच आहे, हे चिंतन मनाला वास्तवाची जाणीव करून देणारं असतं. संत कबीर म्हणतात......**"एकदा मन शुद्ध झालं की जगणं सुंदर होतं नि आम्ही हवेहवेसे वाटायला लागतो."* ••●🌼 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपण आपल्या दररोजच्या जीवनात एक चांगला विचार केला आणि आचरणात आणला तर अनेक चांगल्या गोष्टींवर विजय मिळवू शकतो.तो विचार आपल्यासाठी प्रेरणा व इतरांसाठी प्रेरणादायी ठरु शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात जे वाईट विचार सदैव घोळत असतात आणि त्या विचारांमुळे त्यांच्या प्रगतीऐवजी दिवसेंदिवस अधोगती व्हायला लागते ती अधोगती आपल्या सानिध्यात आल्यामुळे व आपल्या चांगले विचार ऐकल्यामुळे थांबू शकते.आपल्या एका चांगल्या विचारांमुळे इतरांच्या जीवनात चांगली प्रगती होत असेल तर आपण आपल्यासाठीच नाही तर इतरांसाठी व समाजासाठी काहीतरी चांगले केल्याचे समाधान वाटेल.चांगल्या विचारातून केव्हाही चांगलेच उगवले जाते हे मात्र नक्की आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भली खोड मोडली*एका इसम जवळ एक गाढव होते. तो माणूस मीठ विकण्याचा व्यवसाय करीत असे. दररोज सकाळी मिठविक्या गाढवाच्या पाठीवर मिठाच्या पिशव्या लागत असे. आजूबाजूच्या गावात विकायला नेत असे. त्याला जाताना अनेक ओढे आणि छोट्या नद्या ओलांडाव्या लागत असे. एके दिवशी नदी ओलांडत असताना गाढव अचानक धडपडले. गाढवाच्या पाठीवरील मिठ पाण्यात विरघळले. त्यामुळे गाढवाचे बरेचसे ओझे हलके झाले. मीठविक्या त्यादिवशी गाढवाचं नाराजीने घरी परतला. पण त्यादिवशी गाढवाला चांगलाच आराम मिळाला. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मिठी विकायला निघाले. वाटेतील पहिला ओढा ओलांडत असतानाच गाढवाने मुद्दामून पाण्यात डुबकी मारली. गाढवाच्या पाठीवरचे ओझे हलके झाले. मिठी विक्या त्यादिवशी घरी परतला. पण गाढवाने मुद्दामच पाण्यात डुबकी मारली, त्याच्या लक्षात आले. तो गाढव खूप रागावला. त्याने गाढवाला मारले आणि म्हणाला, " हे माझं मूर्ख जनावर मला जादा हुशारी दाखवतयं. याला मी नक्कीच धडा शिकवीन." दुसऱ्या दिवशी मीठविक्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या पिशव्या लादल्या. गाढवाने कालचीच युक्ती करायचे ठरवले. ओढा येताच त्याने पाण्यात डुबकी मारली. पण आज झाले उलटेच! पिशवीतील कापसाने पाणी शोषून घेतले. त्यामुळे गाढवाच्या पाठीवरचे ओझे अधिकच जड झाले. गाढवाला पाण्यातून बाहेर येण्यासाठी त्याला खूप त्रास झाला. त्याला चांगलीच अद्दल घडली. त्या दिवसानंतर गाढवाने कामचुकारपणा केला नाही. पाण्यात मुद्दाम डुबकी मारण्याची खोट त्याने सोडून दिली.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment