✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 24 डिसेंबर 2022💠 वार - शनिवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *भारतीय ग्राहक दिन.*💥 ठळक घडामोडी :- १२९४ - पोप सेलेस्टीन पाचव्याने राजीनामा दिल्यावर पोप बॉनिफेस आठवा सत्तेवर.१७७७ - जेम्स कूकला किरितिमाती तथा क्रिसमस द्वीप पहिल्यांदा दिसले.१८५१ - लायब्ररी ऑफ काँग्रेसला आग.१८६५ - अमेरिकेच्या दक्षिणेतील सेनापतींनी कु क्लुक्स क्लॅन या वर्णद्वेषी संस्थेची स्थापना केली.१९२४ - आल्बेनिया प्रजासत्ताक झाले.💥 जन्म :-१८९९ - पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी, मराठी लेखक.१९२५ - मोहम्मद रफी, भारतीय पार्श्वगायक.१९५९ - अनिल कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :- १८७३ - जॉन्स हॉपकिन्स, अमेरिकन उद्योगपती व दानशूर.१९१४ - जॉन मुइर, अमेरिकन निसर्गसंवर्धक.१८६३ - एम.जी. रामचन्द्रन, तमिळनाडूचा मुख्यमंत्री.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *उत्तर सिक्कीम मध्ये भीषण अपघातात 16 भारतीय जवानांचा मृत्यू; आर्मी ट्रकचा अक्षरश: चुराडा झाला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *कोरोनामुळे चिंता वाढली! आजपासून मुंबई विमानतळावर प्रवाशांची कोविड चाचणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत वाढ, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढच्या एका वर्षासाठी मोफत रेशन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मोदी सरकारचा मोठा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजनेत सुधारणा, 25 लाख जणांना होणार फायदा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा, घसरणीमुळे गुंतवणूकदार रडकुंडीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरल सॅम करन, 18.50 कोटींना पंजाबमध्ये सामिल*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*गोष्टींचा शनिवार-रोज व रॉकी बनवतात निसर्गमित्र👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/I-kl1IrukTM~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*साने गुरुजी जयंतीनिमित्त प्रासंगिक लेख*मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजीपांडुरंग सदाशिव साने ज्यांना आपण सर्वजण साने गुरुजी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. सदाशिवराव व यशोदाबाई यांच्या पोटी जन्मलेला दुसरा मुलगा असून तिसरे अपत्य म्हणजे साने गुरुजी. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांचे वडील सारा गोळा करण्याचे काम करीत होते. साने गुरुजी यांची आई त्यांना श्याम या नावाने प्रेमाने ........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/12/blog-post_23.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मोहम्मद रफी*मोहम्मद रफी हिंदी सिनेमातील महान प्लेबॅक गायक होता.नाटकांच्या आवाजाचा आणि त्यांच्या आवाजाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी आपल्या समकालीन गायिकांबरोबर ओळखले. त्यांना शायनशाह-ए-तारानुम असेही म्हटले जाते. मोहम्मद रफीच्या आवाजात त्यांच्या आगामी काळात अनेक गायकांनी प्रेरित केले. हे सोनू निगम , मोहम्मद अजीज आणिउदित नारायण च्या नाव आहे - या आता अनेक त्याच्या स्वत: च्या ओळख आहे तरी. 1 9 40 ते 1 980 पर्यंत सुरूत्याने एकूण 26,000 गाणी गायली. [2]मुख्य प्रवाहात हिंदी अतिरिक्त गीते गझल , भजने , देशभक्तीपर गीत, कव्वाली समावेश आणि इतर भाषांमध्ये गाणे गायली. कलाकार त्यांच्या संगीत चित्रित आहेत कोठे गुरु दत्त , दिलीप कुमार , देव आनंद , भारत भूषण , Johnnie वॉकर , जॉय मुखर्जी , शम्मी कपूर , राजेंद्र कुमार , राजेश खन्ना ,अमिताभ बच्चन , धर्मेंद्र , जितेंद्र आणि ऋषी कपूर ते गायक अभिनेता व्यतिरिक्त किशोर कुमारदेखील नाव समाविष्ट आहे.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*"कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बॉल' विजेता कोण ? २) अर्जेंटिना या देशाची राजधानी कोणती ?३) भारतातील सर्कसीचे उगमस्थान कोणते ?४) 'गुळाचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते ?५) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण ?*उत्तरे :-* १) लिओनेल मेस्सी, अर्जेंटिना २) ब्यूनस आयर्स ३) सांगली, महाराष्ट्र ४) कोल्हापूर ५) सिकंदर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 साईनाथ नुतिवाड, पेंटर, धर्माबाद 👤 निर्मला बोधरे, सहशिक्षिका, पुणे👤 विठ्ठल मुजळगे, सहशिक्षक, धर्माबाद👤 रणजित बाळासाहेब गुंजाळ, पत्रकार,👤 शिवकुमार शिंदे, धर्माबाद👤 नितेश पांचाळ, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *बायबलमध्ये एक महान बोधकथा आहे. एका अविवाहित स्त्रीच्या हातून घडलेल्या चुकीचा आपल्या सोयीचा अर्थ लावून नादान लोक तिला दगड-धोंड्यांनी ठेचून मारायला धावतात. ती जीवाच्या आकांताने पळत सुटते, खाली कोसळते तेव्हा तिच्यासमोर महाकारूणिक प्रभू येशू उभा असतो. ती त्यांचे पाय धरून आपले प्राण वाचविण्यासाठी गयावया करते. प्रभू तिला अभय देत उभं करतात आणि लोकांना विचारतात 'लोक हो., आपण हिच्या जीवावर का उठलात?' लोकातून क्रोधाने तप्त लाल झालेली वाक्य उत्तरतात 'हि पापीण आहे. हिने फार मोठे पाप केले आहे. हिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही, पुन्हा घोळका ओरडतो..मारा..मारा धोंड्यांनी मारा हिला..**तितक्यात प्रभू पुन्हा धीरगंभीर अन् शांत मुद्रेने त्यांना म्हणतात 'बाबांनो, हिने खरोखरच पाप केले असेल तर तुम्ही मानता त्या कायद्याप्रमाणे ती दोषी आहे आणि दोषीला तुम्हीच शिक्षा देणारे असाल तर पहिला दगड फक्त त्यानेच उचलावा, ज्याने आयुष्यात चुकूनसुद्धा एकही पाप केले नाही. असा प्रस्ताव मांडताच सर्वजण परस्परांच्या नजरा चुकवत एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या हातातील दगडांची पकड सैल झाली. सर्वांच्या हातातले दगड धरतीवर लोळत येशूला शरण गेले. कारण त्या लोंढ्यात एकही निष्पाप नव्हता. प्रत्येकाचे हातून लहान-मोठी पापे झालेलीच होती. ते सर्व माना खाली घालून पराभूतागत पाठमोरे झाले. त्या स्त्रीचे प्राण वाचले. तिने तिची चूक मान्य केली, ती प्रभुभक्त झाली...**"लोकांच्या हातुन गळून पडलेले दगड आजही पूर्ण निष्कलंक माणसाच्या हाताच्या स्पर्शाची वाट पहात तिथेच पडून आहेत..पण निष्पाप हात त्यांना स्पर्शायला पुढे धजले नाहीत."* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••ईश्वरावर श्रध्दा असणे काही चुकीचे नाही,पण ईश्वरच जे काही करेल ते मी स्वीकारेन असे म्हणून त्याच्यावर विसंबून राहणे मात्र चुकीचे ठरेल.ईश्वर ही आपल्यासाठी एक अप्रतक्ष प्रेरणा आहे.जेव्हा तुम्ही तुमच्या प्रयत्नाने आणि जिद्दीने प्रामाणिकपणे काम करता ते काम नक्कीच यशाकडे घेऊन जाते.त्या तुम्ही करत असलेल्या कामामध्ये ईश्र्वर नक्कीच प्रेरणा देतो.केवळ काम न करता मला माझ्या कामात नि जीवनात यश मिळू दे असं म्हणत असाल तर तो तुमचा विचार तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणाराच ठरेल.म्हणून प्रथम आपल्या कामाचा प्रारंभ प्रसन्न मनाने आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करायला सज्ज राहिलातकी,मग तुम्हीच तुमच्या मनातून ईश्र्वराचे आभार मानायला विसरणार नाहीत हे मात्र खरेच आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *सुई आणि वाघ*एक सुई चालली असते वाघाचा बदला घ्यायला. वाटते तिला शेण भेटते शेण म्हाणते, 'सुई ताई कुठे चाललीस? मी येऊ?'सुई म्हणते, 'हटकलेस का मला. मी चालले वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे सुई व शेण यांचा विंचु भेटतो. विंचू दोघांना विचारतो. 'सुई ताई व शेणा कुठे चाललात ? आम्ही येऊ कां ?विंचवाला सुई म्हणते... 'हटकलेस का मला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल पुढे ह्या तिघांना एक काठी भेटते. ती ही विचारते.'सुईताई, शेणा, विंचवा.. कुठे चाललात? मी येऊ का?सुई म्हणते 'हटकलेस का आम्हाला. आम्ही चाललो वाघाचा बदला घ्यायला. चल.सर्वजण वाघांच्या घरात येतात. शेण दारातच बसते. सुई कपाटात बसते. काठी बाथरूम मध्ये बसते, व विंचु तेलाच्या बाटलीत. असे सर्व बसतात.थोडयावेळाने वाघ येतो. दारात शेणावर आपटतो. त्याचे कपडे मळतात. ते धुण्यासाठी बाथरूम मध्ये येतो. तेथे सपासप काठीचा मार बसतो. कपडे पार फाटून जातात. ते व्यवस्थित ठेवण्यासाठी वाघ कपाटाचे दार उघडतो. तेथे सुई वाघाला टोचतच रहाते. सर्व अंग रक्ताने भरलेले असते. म्हणून तेलाच्या बाटलीत वाघोबा आपली शेपूट घालतात. तर विंचू शेपटीला कचाकच चावतो. वाघ मरून जातो.शेण-काठी-विंचू-सुई सर्व आनंदी होतात. वाघाचा बदला घेतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment