✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 29/12/2022💠 वार - गुरुवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••💥घडामोडी● १९११ - सुन यात्सेन चीनच्या प्रजासत्ताकचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला.● २००५ - बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्थेत गोळीबार. एक शास्त्रज्ञ ठार, ४ जखमी💥जन्म● १८४४ - उमेशचंद्र बॅनर्जी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पहिला अध्यक्ष, वकील.● १९०० - मास्टर दीनानाथ मंगेशकर, भारतीय नट, गायक.● १९०४ - कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी● १९१७ - रामानंद सागर, भारतीय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक.● १९४२ - राजेश खन्ना भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते.● १९६० - डेव्हिड बून ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.💥मृत्यू● १९६७ - पंडित ओंकारनाथ ठाकूर, भारतीय गायक, संगीतज्ञ.१९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित● १९७१ - दादासाहेब गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी.● २०१२ - टोनी ग्रेग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू व समालोचक*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *वक्तृत्व स्पर्धा जिंकणाऱ्या तब्बल 50 विद्यार्थ्यांना घडवली दिल्लीवारी; हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा अनोखा उपक्रम*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 मुलाखतीत नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटच्या निकषांमुळे उमेदवार अपात्र, अट शिथिल करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *लोकायुक्त विधेयक विधानसभेत बहुमतानं मंजूर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मानले विरोधकांचे आभार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *वर्षभरानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख कारागृहाबाहेर, कार्यकर्त्यांचा जल्लोष; सुप्रिया सुळे, अजित पवार उपस्थित*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *आयटीआर 31 डिसेंबरपर्यंत भरला नाही तर 10,000 रुपये दंड भरावा लागेल, तुरुंगवासही होऊ शकतो*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *रणजी ट्रॉफीत रियान परागचा कहर! 28 बॉलमध्ये कुटल्या 78 धावा, 4 विकेट्सही घेतल्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून होणार सुरू*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*वर्ग-6वा/ The man who never lied 👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/rTmgulFPx4Q~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••लेखाधिकारी संतोष कंदेवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माहितीपर लेखhttps://nasayeotikar.blogspot.com/2019/12/blog-post_26.htmlमाहिती वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *रामानंद सागर*चंद्रमौली चोप्रा उर्फ रामानंद सागर ( जन्म - २९ डिसेंबर १९१७ - मृत्यू - १२ डिसेंबर २००५ ) हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक होते. दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामायण ह्या टिव्ही मालिकेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात असत. २००० साली रामानंद सागरांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने स्न्मानित केले होते.लाहोर येथे जन्मलेले रामानंद सागर १९४० च्या दशकात पृथ्वीराज कपूरसोबत सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहत असत. १९५० साली त्यांनी स्वतःची सागर फिल्म्स नावाची कंपनी सुरू केली. ह्यादरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. १९६८ सालच्या आंखें ह्या सुपरहिट चित्रपटासाठी सागर ह्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. १९८५ साली रामानंद सागरांनी दूरचित्रवाणीकडे लक्ष केंद्रीत केले. १९८६ सालची विक्रम और वेताल ही मालिका लोकप्रिय ठरली तर १९८७ सालापासून सुरू झालेली ७८ भागांची रामायण ही मालिका प्रचंड यशस्वी झाली.सौजन्य :- विकिपीडिया••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*" ज्यांचा निर्धार व संकल्प अतूट आहे, तीच व्यक्ती जीवनात यशस्वी आहे. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या लेखकाचे नाव काय आहे ?२) भारताचा राष्ट्रीय ध्वजातील तीन रंगाचे पट्टे वरून खाली योग्य क्रमाने कसे येतील ?३) आयपीएल २०२३ साठी सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?४) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धला असेही म्हणतात ?५) संगणकातील RAM चे फुल फॉर्म काय आहे ?*उत्तरे :-* १) प्रवीण बांदेकर २) केशरी, पांढरा, हिरवा ३) सम करन, इंग्लंड ४) भूगोलार्ध ५) Random Access Memory *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 संतोष ह. कंदेवार, लेखाधिकारी, नांदेड👤 किशोर प्रभाकर पेंटे👤 सुरेश सुतार👤 विजय रणभीडकर, नांदेड*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*खूप हवे आहे. खूप गोष्टींचा हव्यास आहे. नाव पाहिजे. सन्मान पाहिजे. संपत्तीही हवीच आहे. समजा हे सर्व मिळाले तर त्यापेक्षा अधिक हवे आहे. पाहिजे ते मिळाले नाही तर स्वभाविकपणे निराशा आहे. मिळाले त्यापेक्षा अधिक मिळायला हवे होते. ते मिळाले नाही म्हणूनही निराशा आहे. अशा अवस्थेत,'ये सब मोह है, माया है' असे कोणी सांगतो. त्यातही दिलासा असतो. अखंड धडपड केल्यानंतरही कोल्ह्याला द्राक्ष मिळत नाहीत. त्याला कमालीची निराशा येते. त्या निराशेतून मुक्त होण्यासाठी मग तो त्या द्राक्षांनाच आंबट ठरवून मोकळा होतो. जे मिळत नाही ते 'आंबट' ठरवून मोकळे होणे काय किंवा त्याला 'मोह है, माया है' म्हणत बाद ठरविणे काय दोन्ही निराशेवर मात करण्यासाठी तेवढेच उपयोगी असतात.**अशा ताणाच्या, निराशेच्या वेळी थोडासा 'भ्रम' किंवा थोडीशी 'भूल' माणसांना हवी असते का? ती 'देव' आणि 'धर्म' यातून मिळते का? म्हणून देवधर्माचे व्यापारी नाडवणूक, शोषण करतात. हे उघड सत्य आहे. धर्म ही 'अफूची गोळी' आहे, असे मार्क्स म्हणतो. ऑपरेशनची वेदना नको म्हणून त्या दरम्यान भूल दिली जाते. तेवढ्यापुरत्या का होईना वेदना सुसह्य होतात. 'जगणे ते मरणे' या दरम्यानच्या आयुष्याचे जे ऑपरेशन होत असते. त्यासाठी तर 'देव' आणि 'धर्म' या कल्पनांची आवश्यकता नसेल.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*ज्यांच्या पाठीवर अपेक्षांचे ओझे आहे तो माणूस जीवनात कधीही सुखी आणि समाधानी होऊ शकत नाही.म्हणून माणसाने जीवनात निरपेक्ष वृत्तीने जीवन जगायला शिकले पाहिजे.*© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment