✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 13/12/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- ● २००२ - ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.● २००३ - प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.💥 जन्म :-● १८१८ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.● १८५४ - थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.● १९२४ - विद्याधर पुंडलिक, साहित्यिक● १९२८ - सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका💥 मृत्यू :- ● १९८६ - स्मिता पाटील, हिंदी चित्रपट अभिनेत्री● १९९४ - विश्वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.● १९९६ - श्रीधर पुरुषोत्तम लिमये ऊर्फ शिरुभाऊ, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.● २००५ - रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माता, निर्देशक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला, नागपूर- शिर्डी विना वातानुकुलीत बस सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गेमिंग कंपन्यांकडून 23,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अर्थ राज्यमंत्र्यांकडून माहिती सादर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *खाद्यपदार्थ आणि भाजीपाला झाला स्वस्त, किरकोळ महागाई नोव्हेंबरमध्ये 5.88 टक्क्यांवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयटीए अवॉर्डमध्ये एबीपीचा डंका, जिंकला सर्वाधिक लोकप्रिय हिंदी वृत्तवाहिनीसाठी पुरस्कार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांचीही उपस्थिती होती.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *नाशिकमध्ये तब्बल बावीस वर्षांनी साहित्य जत्रा, जानेवारीत मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *FIFA World Cup : इंग्लंडवर मात करून फ्रान्स सेमीफायनल्समध्ये, पुढची लढत मोरोक्कोशी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••*Story-Who is better?👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/5iYAdB8uFlQ~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका हेच उपयोगी*स्वतःच्या विकासावर कुटुंबाचे विकास अवलंबून असते. कुटुंबाच्या विकासावर गावाचा विकास आणि मग राज्य व देशाचा विकास होतो. या विकासासाठी शिक्षण हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणाशिवाय कोणाचेही विकास अशक्य आहे. शिक्षणामुळे दोन डोळ्याचे माणसे तिसऱ्या डोळ्याने डोळस होऊ शकतात. अन्यथा डोळे असून ही आंधळ्याची अवस्था होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हटले आहे की, विद्येविना मति गेली, मतिविना नीती गेली, नितिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, एवढे अनर्थ सारे एका अविद्येने केले........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *'इ' जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घ्याव्या का ?* 📙अशक्तपणात वाटतो या कारणासाठी अनेक लोक टॉनिकच्या बाटल्या फस्त करत असतात. बी कॉम्प्लेक्सची इंजेक्शने, तर खेडय़ापाडय़ातील प्रशिक्षण न झालेल्या गावठी डॉक्टरांकडेही असतात. टॉनिक, व्हिटॅमिन्स घेण्याचे हे वेड शहरी भागातील सुशिक्षित लोकांमध्येही आढळते. मागणी तसा पुरवठा हे जरी खरे असले तरी बर्याचदा फायदा उकळणारी मंडळी इतरांची दिशाभूल करून निरुपयोगी असे पदार्थ बाजारात आणतात व त्याची गरजही निर्माण करतात. लोकांचे अज्ञान डॉक्टरांची धंदेवाईक वृत्ती व औषधी कंपन्यांनी अधिक नफा मिळवण्याची वृत्ती या सर्वांमुळे टॉनिकचा खप वाढतोच आहे.या व्हिटॅमिन्स / टॉनिकच्या स्पर्धेत गेल्या काही वर्षांत 'इ' जीवनसत्त्वाचा प्रवेश झाला आहे. अनेक जाहिरातीत जीवनसत्त्व 'इ' दररोज वापरल्याने सुदृढपणा येतो शक्ती येते. असे लिहिलेले असते. हे खरे आहे काय ते आता पाहू.जीवनसत्त्व 'इ' म्हणजेच टोकोफेराॅल, वनस्पतीज तेले, सरकी, सूर्यफुलाच्या बिया, अंड्याचे बलक तसेच लोणी या पदार्थांमध्ये जीवनसत्त्व 'इ' विपुल प्रमाणात आढळते. प्रौढ व्यक्तीला दर दिवशी दहा मिलिग्रॅम इतके जीवनसत्त्व 'इ' लागते. प्रत्येकाला जीवनसत्त्व 'इ' ची नितांत गरज असते हे जरी खरे असले तरी या जीवनसत्त्वाची कमतरता कोणाच्याही शरीरात निर्माण झाल्याचा पुरावा आजतागायत आढळलेला नाही. त्यामुळे जीवनसत्त्वाच्या गोळ्या दररोज घेण्याची काही गरज नाही असे म्हणता येते. शिवाय जीवनसत्त्व 'इ' चे प्रमाण खूप जास्त झाल्यास मानवी लिम्फोसाइट या पांढर्या रक्तपेशींवर विपरीत परिणाम होतो असे प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले अाहे. या सर्व बाबींचा विचार करता इ जीवनसत्व दररोज घेऊ नये, हे तुम्हाला पटलेच असेल.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार ?"**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत ?२) HIV चे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांत पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो ?३) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक केलेल्या खेळाडूचे नाव काय ?४) सागरी तसेच तपकिरी शेवाळमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते ? ५) राज्यातील 'धान उत्पादकांचा जिल्हा' असे कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते ?*उत्तरे :-* १) सुखविंदर सिंह सुक्खू २) दक्षिण आफ्रिका ३) ईशान किशन, भारत ( १२६ चेंडूत २०० धावा ) ४) आयोडीन ५) गोंदिया *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 अनिल गायकवाड, सहशिक्षक, बिलोली👤 रोहन कुरमुडे, धर्माबाद👤 उज्वल मस्के, साहित्यिक, बीड👤 राजेश वाघ, बुलढाणा👤 विनोद राऊलवार👤 श्रीनिवास भोसले, नांदेड👤 राजेश जी गडाख, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.**थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्या व्यक्तीच्या मनात संशयाने घर केलेले असेल तर त्याचे जीवन जगणे अवघड होऊन बसते.त्याच्या मनात नेहमी कोणत्याही व्यक्तीबद्दल संशयी दृष्टीनेच पाहतो.अशा पाहण्याने स्वत:च्या जीवनाचे नुकसान तर होतेच पण इतरांच्या जीवनातही संशयाचे विष कालवून त्याचे मनही अस्थिर करुन टाकते.अशा परिस्थितीत मग चांगले जीवन जगायला अवघड जाते.अशा संशयी व्यक्तींच्या सानिध्यात न राहणेच योग्य ठरेल.संशय हा संशयी व्यक्तींचा मित्र असतो तर इतरांचा शत्रू.म्हणून अशा शत्रूला आपल्यापासून चार पाऊले दूरच ठेवायला हवे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रयत्नांती यश*एकदा दोन राज्यांच्यात युद्ध झाले. त्यात एक राजा पराभव झाला. पराभूत राजा शौर्याने लढला होता. पण त्याचे सैन्य थोडे होते. विजय राजाचे सैनिक पराभूत राजाला शोधत होते. त्यांना त्या राजाला ठार मारायचे होते. म्हणून राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याचा धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरील एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. कोळी गुहेच्या भिंतीवर फार मेहनतीने जाळे विणत होता. तो सरपटत भिंतीवर चढायचा. मधेच एखादा धागा तुटायचा आणि कोळी जमिनीवर पडायचा. असे बरेचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही. तू चिकाटीने झाडे विनतच राहिला. अखेर जाळी विनत विनत तो छतापर्यंत पोहोचला.राजाने विचार केला, " हा सरपटणारा छोटासा प्राणी सुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझे प्रयत्न का बर सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे." त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्याने आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली आणि बलवान सैन्य उभारले. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रू बरोबर युद्ध केले. अखेरीस त्याने लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धडा शिकवला, हे त्याच्या कायम लक्षात राहिले.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो ,त्यालाच यश मिळते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment