✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 6️⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 6️⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दिनांक :- 27/12/2022💠 वार - मंगळवार••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🌷🌐 . *दिनविशेष . 🌐* 🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*डॉ पंजाबराव देशमुख जयंती*💥 ठळक घडामोडी :-●१७०३ - पोर्तुगाल व इंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) इंग्लंडमध्ये प्राधान्य.● १८३१ - चार्ल्स डार्विन एच.एम.एस. बीगल या जहाजातून गॅलापागोसला जाण्यास निघाला.●१९४५ - २८ देशांनी जागतिक बँकेची स्थापना केली.● १९४५ - कोरियाची फाळणी.●१९४९ - इंडोनेशियाला नेदरलँड्सपासून स्वातंत्र्य.● १९७८ - ४० वर्षांच्या हुकुमशाहीनंतर स्पेन प्रजासत्ताक.💥 जन्म :-● १८९८ - पंजाबराव देशमुख, विदर्भातील सामाजिक नेता, शिक्षण प्रसारक, केंद्रीय कृषिमंत्री.● १९६५ - सलमान खान, भारतीय चित्रपट अभिनेता.💥 मृत्यू :-● १९६५ - देवदत्त नारायण टिळक, मराठी साहित्यिक, संपादक, ज्ञानोदय.● १९९७ - मालती पांडे-बर्वे, मराठी भावगीत गायिका.● २००२ - प्रतिमा बरुआ-पांडे, असमी लोकगीत गायिका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••1⃣ *पोटदुखीच्या त्रासामुळं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण रुग्णालयात दाखल, एम्समध्ये उपचार सुरु*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *व्हीडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक; आयसीआयसीआय बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली; अजित पवारांचा अब्दुल सत्तारांवर आरोप, राजीनाम्याची मागणी; फडणवीसांकडून आरोपांची गंभीर दखल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आयटीआय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 40 रुपयांऐवजी 500 रुपये विद्यावेतन मिळणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कर्नाटकात शाळा,कॉलेज, सिनेमागृह, पब अन् बारमध्ये मास्कसक्ती, नव्या वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ, फुल क्रीम दूध आता 66 रुपये लिटर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांची आई मीनल गावस्कर यांचे मुंबईत निधन, ते 95 वर्षाच्या होत्या*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *मरावे परी अवयवरूपी उरावे*जन पळभर म्हणतील हाय हाय ! मी जाता राहील कार्य काय ?गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातील कविवर्य भा. रा. तांबे यांची कविता रेडियोवर ऐकताना मन एकदम भूतकाळात गेले. इयत्ता दहाव्या वर्गात शिकत असताना .............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_17.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🦈🐟 *मासे* 🐟🦈 ********************मासे हे जलचर प्राणी आहेत. श्वसनासाठी त्यांना कल्ले असतात. शरीरामध्ये जवळपास संपूर्ण लांबीचे पाठीच्या कण्याचे हाड असतेच असते. या तीन महत्त्वाच्या गोष्टी कोणत्याही माशात आढळणारच.सजीवांची उत्पत्ती पाण्यात झाली. त्यांतील अनेक पाण्याबाहेर पडले, पण मासे पाण्यातच राहिले. जगातील पृष्ठवंशीय प्रकारच्या एकूण प्राण्यांतील निम्म्याहून अधिक जाती मासेच आहेत. पाण्यातून बाहेर पडलेले अनेक प्राणी वेगाने हालचाल करू शकतात. पण पाण्याच्या घनतेमुळे, वजनामुळे मासे त्या मानाने खूपच कमी वेगवान असतात.माशांचे शरीर खवल्यांनी भरलेले असते. हे खवलेच त्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात. झीज झाल्यावर पुन्हा नवीन खवले येण्याची क्रिया सतत चालूच असते. खवल्यांमुळे माशांच्या हालचाली चमकदार दिसतात. माशांच्या हालचाली मुख्यत: शरीरातील स्नायूंच्या वेड्यावाकड्या आकुंचन प्रसारणातून होतात. यालाच मदत म्हणून त्रिकोणी पंखाकृतीच्या (फिनच्या) जोड्या काम करतात. माशाच्या छातीजवळचा भाग, तेथीलच तळाजवळचा भाग व पाठीवरचा भाग येथे एकेक पंखांची त्रिकोणी जोडी आढळते. माशांच्या जातीनुसार व आकारमानानुसार या पंखांची ताकद बदलत जाते. मुख्य पंख म्हणजे शेपटीचे. त्यांचा वापर सुकाणूसारखा तर केलाच जातो, पण खेरीज वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीही हे पंख वापरले जातात.माशांची श्वसनक्रिया कल्ल्यांमार्फत होते. एखादा लांबलचक कंगवा असावा, तशी त्यांची रचना असते. तोंडातून घेतलेले पाणी या कल्ल्यांतून सतत बाहेर टाकले जाते. या क्रियेत येथील रक्तवाहिन्या पाण्यातून प्राणवायू शोषून घेतात. तोंडावाटे घेतलेले अन्न मात्र या कल्ल्यातून बाहेर पडू नये, अशी व्यवस्था आतील कडा वळवून केलेली असते. श्वसनक्रिया व अन्न गिळणे या दोन्ही गोष्टी एकदमच केल्या जाऊ शकतात. त्यामुळे अनेक मासे तोंडाने पाणी घेतानाच येणारे पदार्थ म्हणजे लहान मासे, प्लांक्टन वनस्पती, शेवाळे गिळतात व उरलेले पाणी कल्ल्यांवाटे बाहेर टाकतात.माशांचे खाद्य मुख्यतः मासेच. पण या खेरीज अनेक अन्य जलचरांची अंडी, अळ्या, शेवाळी या खाद्यांचीसुद्धा सर्व लहान माशांना गरज भासते. समुद्रातील प्रवाळांच्या खडकांमध्ये शिरून तेथील हे आयते खाद्य पटकावणे हा लहान माशांचा दिवसभरचा उद्योगच असतो. हे सर्व खडक ठराविक आकाराचे असल्याने त्यात शिरकाव करणे व बाहेर पडणे यासाठी ठराविक आकाराची जाडीच चालू शकते. पण याखेरीज काही अगडबंब मासे फारसे कष्ट न करता फक्त आ वासून वाटेत येणारे सर्व लहान मासे फस्त करत जातात. एखादा मध्यम आकाराचा शार्क दिवसभरात एखादा टन मासे सहज संपवतो. यावरून त्यांच्या भुकेची कल्पना येऊ शकेल.मासे व पृथ्वीवरचे अन्य प्राणी यांच्या संवेदना इंद्रियांत फारसा फरक नाही. डोळे तर नेहमीप्रमाणेच काम करतात. कान दिसत नाहीत, पण अन्य प्राण्यांप्रमाणेच तोल सावरणे, ऐकणे या गोष्टींसाठी माशांचे कान उपयुक्त ठरतात. आणखी एका प्रकारे संवेदना जाणवतात. आपल्या कातडीला हात लावल्यावर जशा संवेदना मिळतील, तशाच संवेदना पाण्यातील तरंगांच्या हालचालीतून संपूर्ण लांबीमधील पृष्ठभागातून माशाला मिळतात. याचा वापर करूनच लांबवरचा शत्रू, भक्ष्य, पाण्यावरील अन्य जलचरांचा वावर याचे ज्ञान मासा मिळवत राहतो.माशाचे आयुष्य किती ? मासे पाळले, तर सांगता येईल, अन्यथा अवघडच. पण मोठे मासे कित्येक म्हणजे पन्नासच्या वर वर्षे जगत असावे. लहान मासे मात्र जेमतेम वर्षभरातच आयुष्य संपवतात. याच काळात वाढ, अंडी घालणे वगैरे सर्व गोष्टी घडतात. पृथ्वीवरील सजीवांमध्ये आकारमान व आयुष्य यांची सांगड निसर्गाने घालून ठेवली आहे. मासे गोड्या पाण्यात असतात, समुद्रात, पाणथळीच्या जागी असतात, तसेच खोल डोहात, चिखलाच्या पाण्यात असतात, तसेच नितळ अशा सरोवरात. अत्यंत आकर्षक माशांप्रमाणेच अत्यंत बोजड विचित्र तोंडाचे माशांचे प्रकारही पाहायला मिळतात. जेमतेम चार ते पाच मिली ग्रॅम वजनाच्या छोटय़ा माशांपासून पस्तीस ते चाळीस टन वजनाच्या शार्क माशांपर्यंत माशांचे वजन आढळते.मासे खाणे हा मानवी आहाराचा एक नित्याचा भाग आहे. किंबहुना याचा फायदा म्हणून पृथ्वीवर, जमिनीवर निर्माण होणाऱ्या अन्नात आपण बचत करू शकतो आहोत. अत्यंत पौष्टिक असा आहार माशांपासून मिळू शकतो. या सागरी संपत्तीचा पूर्ण विनियोग करणे माणसाला शक्यच होणार नाही, इतकी ती अफाट आहे. जगातील ज्ञात आकडे एकत्र केले, तर वर्षांकाठी दहा कोटी टन मासे समुद्रातून पकडले जातात. यात गोड्या पाण्यातील माशांचा समावेश नाही.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••“ज्या माणसाजवळ संयम आहे तो प्रत्येक गोष्टीचा धनी असतो.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) ख्रिसमसचा शब्दश: अर्थ काय आहे ?२) फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा २०२२ चा 'गोल्डन बुट'चा पुरस्कार कोणी पटकावला ?३) एका झाडाच्या अन्नरसावर जगणाऱ्या दुसऱ्या झाडास काय म्हणतात ? ४) मांजर नराला बोका तर मांजर मादीला काय म्हणतात ?५) इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे ?उत्तरे :- १) क्राइस्टस मास अर्थात येशूच्या जन्मनिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना २) किलियन मबापे ३) परजीवी ४) भाटी ५) ऑक्सफर्ड विद्यापीठ *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *◆|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|◆* 👤 पूजा बागूल, साहित्यिक, नाशिक*ઉदंड_आયુષ્યાच्या अનંત_શુभेच्छा,* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••*'आपलं असं आहे की आपल्याला खोटं सहन होत नाही.' असं निक्षून सांगणारेही खोटं बोलतच असतात. कित्येकदा 'खोटं' हे ख-यापेक्षा सुंदर वाटतं. शतश: खरं किती लोक बोलत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल. 'खोटं बोला पण रेटून बोला' असं म्हटलं जातं, ते व्यवहारात खूप खपत असतं; नव्हे त्याचीच जीवनाची दुकानदारी नफ्यात दिसते. सतत खरं बोलणारा, कल्पनाविश्वातही असत्याला न शिवणारा महात्मा किंवा संतही प्रसंगी असत्यासमोर हथप्रभ होतो. त्याच्या सत्यावर असत्य विजय धारण करून जातो.* *परंतु माणसाचं अंतर्मन हे सतत सत्य असते. तुम्ही केलेले कृत्य हे काय आहे ? पवित्र आहे कि अपवित्र आहे? खरे आहे कि खोटे आहे? हे फक्त अंतर्मनात नेहमीकरता 'सेव्ह' अर्थात सुरक्षित झालेले असते. मग लोक तुमच्या खोटे दडवून टाकण्याच्या नाटकीपणामुळे प्रभावित होऊन तुमचे खोटे खरे मानू लागले तरी तुमच्या 'इनर माइंड'ला ते मान्य नसते. ते तुम्हाला सतत आठवण करून देत असते की बाबा रे, जगाच्या नजरेत तू निर्दोष नाही हे तुला ठाऊक आहे. सत्यावर असत्याचा 'पेहराव' हा नाटकातील नटाने धारण केलेल्या पात्रासारखा असतो. तो सर्वकाळासाठी नसतो. नटाला नाट्यप्रयोग संपताच सामान्य म्हणजे सत्यस्थितीत परतावेच लागते.* ••● *॥ रामकृष्णहरी ॥*●••🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••जीवनात अनेक प्रश्न गुंतागुंतीचे असतात.असे प्रश्न आपण कितीही सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत.अशावेळी आपण हतबल होतो. त्यातून आपली सुटका व्हावी.काहीतरी मार्ग निघावा असे वाटते. मग आपण जिथे यावर तोडगा निघणार आहे, आपल्या मनाला समाधान मिळणार आहे.अशाठिकाणी जाऊन आपण आपला संसारुपी भवसागर तरुण जाण्यासाठी कुणाचातरी धावा करतो अर्थात परमेश्वराचा.पण परमेश्वर काही येत नाही. परंतू परमेश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे गुरुला पाठविले. जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून ज्यांचे आढळाचे स्थान आपल्या जीवनात आहे.ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा आहे अशा ईश्वररुपी गुरुच्या सानिध्यात राहून त्यांचे मार्गदर्शन घेतो आणि आपल्या जीवनाचे कल्याण करुन घेतो.या जगात सर्वात जास्त आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा देणारे गुरू हेच आपले परमेश्वर आहेत.हे कधीही विसरुन चालणार नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद...९४२१८३९५९०.🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••• *यशाचे बिजगणित*आजोबा! तुम्ही हे कुठले विचित्र गणित सोडविताहात?' अदितीने विचारले. मी माझ्या दैनंदिनीमध्ये काही तरी लिहित होतो व अदिती अजोबाच्या मागे केव्हा येऊन उभी ठाकली हे कळलेच नाही. दैनंदिनीच्या पानावर लिहिले होते- (त+म+ध) न?'हे एक नवे बीजगणित आहे नि मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतोय, आजोबानी टाइमपास म्हणून उत्तर दिले. 'मलाही समजावून सांगा ना!' -अदिती म्हणाली. आजोबानी तिला म्हटले, मी तुला नक्की समजावून सांगेन. आधी मला हे सांग '(त+म+ध) न' याचा अर्थ काय आहे? तुही बीजगणित शाळेत शिकली आहेस ना!' 'सिम्पल आहे, आजोबा! यातील 'ब्रॅकेट' काढून 'तन+मन+धन', असे लिहिले असावे. कारण 'त', 'म', 'ध' हे तिनही अक्षरे 'न'शी गुणिले आहेत ना- अदिती बोलली.'शाब्बास', आजोबा म्हटले- 'चल, आता प्रश्नचिह्नाचा विचार करू. तन, मन, धन अर्पण करणे म्हणजे तरी काय?' 'खूप परिश्रम' घेऊन काम करणे, अदितीने अचूक उत्तर दिले. तन+मन+धन हे परिश्रमाचे सूत्र आहे. 'वाह! क्या बात है!' असे म्हणून आजोबानी तिची पाठ थोपटून कौतुक केले. 'आजोबा! हे ठीक आहे. पण एखादे उदाहरण देऊन समजावून सांगा ना, प्लीज।' अदिती म्हणाली. 'ओके! बघ, तुझ्या अभ्यासाचे उदाहरण घेऊ या. तुला परीक्षेत पहिला नंबर काढायचाय का? अदितीने मान हलवून होकार दिला व आजोबाकडे लक्ष देऊ लागली.'पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही. दूसरे म्हणजे, मन. मनाची एकाग्रता असेल तरच अभ्यासात मन लागेल व चांगला अभ्यास करू शकाल. वर्गात शिक्षकांकडून जे शिकविले जाते, ते चटकन लक्षात राहते. 'मला हे समजले आजोबा! मात्र, हे धन मी कोठून आणू? अदितीने अतिशय योग्य प्रश्न विचारला. मी म्हणालो, तु त्याचा विचार करू नकोस ती माझी व तुझ्या वडीलांची जबाबदारी आहे. मात्र तुला मिळणार्या 'पॉकेटमनी'चा तू चांगल्या कामात उपयोग करू शकते. थोडे-थोडे पैसे जमा करून तू एखादे जनरल नॉलेजचे पुस्तक, ज्ञानवर्धक विषयाचे पुस्तक, डिक्शनरी, कॅल्क्युलेटर वगैरे. खरेदी करू शकते. या माध्यमातून तू 'धना'चा सदुपयोग करू शकते. ''खूप चांगले! 'थॅंक्स!' अदिति खुश होऊन बोलली। 'खरंच, यशाचा हा फॉर्मूला खूप मजेदार आहे.पहिला नंबर येण्याकरीताही हा फॉर्म्युला लागू पडतो. खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले पाहिजे, दररोज थोडेसे खेळले पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे तरच तन अर्थात शरीर स्वच्छ राहिल. आजारी पडलात तर तुमच्याकडून अभ्यासच होणार नाही.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••या पोस्ट विषयी आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment