✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 19/11/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक शौचालय दिन**आंतरराष्ट्रीय पुरूष दिन**महिला उद्योजकता दिन**राष्ट्रीय एकात्मता दिन*💥 ठळक घडामोडी :- ● १९६९ - अपोलो १२तून चांद्रमोहिमेवर गेलेल्या पीट कॉन्राड आणि आणि ऍलन बीनचे चंद्रावतरण.● १९९८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.💥 जन्म :-● १८२८ - मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई.● १९१७ - इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.● १९७५-सुष्मीता सेन ,अभिनेत्री● १९२८- दारा सिंग ,मुष्टियोद्धदा व अभिनेता💥 मृत्यू :-● १९३१ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *महाराष्ट्रातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, गौतम नवलखा यांना 24 तासांत घरात नजरकैदेत पाठवण्याचे दिले आदेश.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *देशातील पहिले खासगी रॉकेट 'विक्रम एस'चे यशस्वी उड्डाण, या रॉकेटचे विक्रम हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरुन देण्यात आलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन विधेयकाचा मसुदा जारी, 500 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *भारताला 2028-29 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर त्यासाठी पुढील पाच वर्षे सतत 9 टक्के दराने GDP वाढवावा लागेल, असं रिझव्र्ह बँकेचे माजी गव्हर्नर म्हणाले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रांचा एका वर्षाने कार्यकाल वाढवला, 18 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कोरोना काळातील निर्बंध हटवल्यानंतर शिर्डीच्या साईचरणी भरभरुन दान, वर्षभरात 398 कोटी रुपये अर्पण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *न्यूझीलंड वि. भारताचा पहिला टी-२० सामना पावसामुळे झाला रद्द*••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक शौचालय दिनानिमित्त प्रासंगिक लेख*मोबाईल महत्वाचे की शौचालय*जगभरातील सुमारे एक अब्ज जनता आज ही उघड्यावर शौचास जाते आणि भारत देश यात अव्वलस्थानी असल्याचे मत संयुक्त राष्ट्राच्या तज्ञानी पिण्याचे पाणी व स्वच्छतेसंबंधीच्या एका अभ्यासाचा शुभारंभ करताना नुकतेच व्यक्त केले आहे. उघड्यावर मलमूत्र विसर्जन करण्याच्या बाबतीत.........पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावेhttps://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_49.html?m=1 लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फेफरे किंवा फीट येणे* 📙 *****************************एखाद्या शाळेचा वर्ग चालू असतो किंवा मैदानावर खेळाचा तास चाललेला असताना एखादा मुलगा बघता बघता उभ्याचा आडवा पडतो. नुसता तो आडवाच पडतो असे नव्हे तर त्याच्या तोंडातून फेस येतो, तो डोळे फिरवतो, क्वचित दातखीळ बसते व त्याच वेळी त्याचे हातपायपण पिळवटले जातात, ताठ होतात. काही वेळा त्याची बेशुद्धी काही क्षणच टिकते, तर काही वेळा विशेष औषधोपचार करून त्याला शुद्धीवर आणायला लागते. यालाच फेफरे येणे, फिट येणे असे म्हणतात. एपिलेप्टिक सीझर असे या आजाराचे स्वरूप सांगितले जाते; पण वस्तुतः हा आजार नव्हे, तर ही एक शारीरिक स्थिती आहे. मेंदूचे कामकाज चालू असताना तेथे सतत विद्युत संवेदना निर्माण होऊन शरीरभर पाठविल्या जात असतात. या संवेदनांच्या स्वरूपात तीव्र बदल झाल्यास फेफरे येते. फेफरे येण्याच्या काळात मेंदूच्या कामाचा आलेख (Electro-Encephalo Graph) काढला, तर त्यावरून ही स्थिती नीट समजते.एखाद्याला फेफरे येते म्हणून त्याच्या आयुष्यातील अन्य गोष्टींवर काही विपरीत परिणाम झालेला असतोच, असे मात्र नाही. काही वेळा याउलट मात्र असू शकते. मेंदूच्या गंभीर आजाराचे दृश्य स्वरूप म्हणून प्रथम फेफरे येणे ही स्थिती उद्भवलेली आढळून येते. उदाहरणार्थ मेंदूमध्ये उद्भवणाऱ्या कॅन्सरमध्ये, ब्रेनट्युमरमध्ये फेफरे ही पहिली तक्रार असू शकते.फेफरे येते, त्यावेळी अशा माणसाभोवती गर्दी न करता त्याला आहे तेथेच नीट कुशीवर वळवून झोपवावे. मान मागे करावी म्हणजे श्वास घ्यायला अडचण होत नाही. घशात लाळ साचून अडथळा येत नाही. दातखीळ बसत आहे. असे वाटल्यास एखादी लाकडी वस्तू दातात धरायला द्यावी व दोन दातांमध्ये ठेवावी. त्यांचे कपडे, पट्टा सैल करावा. त्याला कधीही पाणी पाजण्याचा प्रयत्न करू नये. बहुधा काही मिनिटांतच फेफरे जाते. त्यामुळे तात्काळ धावपळ करून डॉक्टर गाठण्याची गरज पडत नाही.फेफरे येण्यावर अलीकडे चांगली औषधे उपलब्ध असून या स्थितीवर खुपसे नियंत्रण मिळवण्यात यश मिळत आहे. सामान्यपणे लोकसंख्येच्या एक टक्क्यापेक्षा थोड्या कमी लोकांत हा प्रकार आढळतो. वाहन चालवणे, विस्तवाजवळ वा धोक्याच्या जागी काम करणे व पोहणे या गोष्टी मात्र फेफरे येणाऱ्यांनी कायम टाळाव्यात; कारण या तिन्हींमध्ये त्यांच्या जीवाला धोका उद्भवतो.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून**संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) डॉ. सलीम अली यांचे पूर्ण नाव काय ?२) जगाची एकूण लोकसंख्या किती आहे ?३) बिरसा मुंडा यांची समाधी कोठे आहे ?४) भारतीय उद्योगाचे जनक कोण ?५) हत्तीरोग ( हत्तीपाय रोग ) कोणता डास चावल्याने होतो ?*उत्तरे :-* १) सलीम मोईझुद्दीन अली २) ८ अब्ज ३) डिस्टिलरी पुल, रांची ४) जमशेदजी टाटा ५) क्युलेक्स *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 सिध्देश घोले, माणगाव जि. रायगड👤 डॉ. विनायक माराले👤 संजय येरणे👤 श्वेता नरसुडे👤 कैलास पाटील खरबाळे👤 वैभव धुप्पे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••वर्तमान स्थितीमध्ये आपण कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीसाठी खूप विचार करतो.हे माझ्या हातून पूर्ण होईल का ? पूर्ण होईल का असा जेव्हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो तेव्हा नक्कीच समजून घ्यायचे की,आपला आत्मविश्वास डळमळीत झाला आहे.हा आत्मविश्वास जर आपल्याला मजबूत किंवा ठाम ठेवायचा असेल तर आपल्या मनाची कामातली एकाग्रता सातत्याने ठेवायला हवी.सद्यस्थितीत मला हे काम पूर्ण करायचे आहे आणि ते करावेच लागणार त्यांच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही अशी मनाची धारणा ठेवली आणि काम केले तर नक्कीच तुमचे काम पूर्ण होईल.त्या कामातून आलेले यश हे तुमच्या पुढच्या कामासाठी आणि पूर्णतेसाठी शुभसंकेत आहेत.त्यामुळे अजून पुन्हा जोमाने काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.मग ते वर्तमानातील असो की भविष्यातील असो.तुमचा आत्मविश्वास आणि तुमच्या कामातील सातत्य हेच तुमच्या यशाचे खरे रहस्य आहे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अपमान आणि उपकार*एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे."*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment