✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 11/11/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- ◆ १९६६ - जेमिनी १२ अंतराळयानाचे प्रक्षेपण.◆ १९६८ - मालदीवमध्ये प्रजासत्ताक राष्ट्राची स्थापना.💥 जन्म :-◆ १९२४ रुसी मोदी, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-◆ २००४ - यासर अराफात, पॅलेस्टाइनचा शासक, दहशतवादी*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जीएसटी आणून प्रत्येक गोष्टीवर कर लावून समस्या वाढवल्या, राज्यात भारत जोडो यात्रेत नांदेड येथे आयोजित सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केलं लक्ष्य*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पुण्यात अन्न, औषध प्रशासनाचा कारवाईचा धडाका सुरुच; 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होणार आहे. यूपीमधील रामपूरच्या सत्र न्यायालयाने स्थगिती देण्यास दिला नकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केवळ 14 महिलांनाच तिकीट, गुजरात निवडणुकीसाठी भाजपची 160 उमेदवारांची यादी जाहीर*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना हायकोर्टाचा दणका, बँकेनं कोचर यांच्याबाबत घेतलेले निर्णय वैध ठरवत त्यात कोणताही हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*शून्यातून विश्व साकारणाऱ्या सरकारी शाळा*जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा म्हटले की, प्रत्येकांच्या डोळ्यासमोर एक वेगळेच चित्र उभे राहते. ज्या चित्रात त्या शाळाची, तेथील परिसराची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्याच्या बाबतीतचे चित्रण भयानक दिसून येते. या शाळांची स्थिती कधीच सुधारणार नाही, अशी धारणा प्रत्येकाची बनलेली आहे. या शाळांत फक्त गरिबांची मुलेच शिकतात म्हणून यास गरिबांची शाळा असे सुध्दा संबोधले जाते. सरकारी यंत्रणेमार्फत चालविण्यात येणारी ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नियंत्रणाखालील.............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_15.htmlwww.nasayeotikar.blogspot.com लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य कसे चालते ?* 📙बर्याच जणांना मुत्रपिंड म्हणजेच जननेंद्रिय असे वाटते. हे चुकीचे आहे. मूत्रपिंडाचा संबंध शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी आहे. तर जननेंद्रियांचा संबंध पुनरुत्पादनाशी आहे. माणसाच्या शरीरात घेवड्याच्या 'बी'च्या आकाराची दोन मूत्रपिंडे असतात. ३ x २ x १ इंच असा त्यांचा आकार असतो. मूत्रपिंडाचे कार्य गाळणीसारखे असते. शरीरात चयापचयामुळे अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. यात युरिया, युरोबिलीनोजेन, मृत पेशीतील घटक आदींचा समावेश होतो. मूत्रपिंडामध्ये रक्त गाळले जाते. शरीराला आवश्यक असणाऱ्या गोष्टी रक्तातच राहतात; पण अतिरिक्त पाणी, क्षार व टाकाऊ किंवा विषारी पदार्थ रक्ताबाहेर काढले जातात. यालाच आपण लघवी म्हणतो. मूत्रपिंडातून मूत्रवहिन्यांद्वारे लघवी मूत्राशयात गोळा होते. मुत्रसंचयानंतर लघवी करण्याची इच्छा निर्माण होते व मूत्रमार्गाद्वारे लगेच शरीराबाहेर पडते.विषारी, टाकाऊ पदार्थ शरीराबाहेरील टाकण्याखेरीज शरीरात पाणी व क्षार यांचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे कार्य मूत्रपिंडे करतात. मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रोगात मूत्रपिंडावर परिणाम होऊन ती अकार्यक्षम बनतात. काही सांसर्गिक रोगांमुळेही त्यांचे कार्य बंद पडू शकते. असे झाल्यास रक्तातील विषारी पदार्थांचे (जसे युरिया, अमोनिया) प्रमाण वाढते व यांचा मेंदू तसेच इतर इंद्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे व्यक्ती कोमात जाते व मरण पावते. जिवंत राहण्यासाठी मूत्रपिंडे कार्यरत असणे अत्यंत आवश्यक आहे. एक निरोगी मूत्रपिंडदेखील दोन मूत्रपिंडांचे कार्य करू शकते.मूत्रपिंडांच्या कायमस्वरूपी रोगांमध्ये ज्यात त्यांचे कार्य पूर्णपणे बंद पडते. डायलिसिस वा मूत्रपिंडावरोपण हे दोन उपचार करता येतात. या दोन्ही पद्धतीत काही धोके असले तरी त्यामुळे रुग्णाचे आयुष्य आणि काही वर्षांनी वाढण्याची शक्यता असते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यांना वाचवतात ते असामान्य !**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम शरण नेगी यांनी पहिले मतदान केव्हा केले ?२) 'जंगलाचं देणं' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?३) काश्मीर हरीण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे ?४) फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वोत्कृष्ट कंपनी कोणती ?५) कोकण रेल्वेचे जनक कोणाला म्हटले जाते ?*उत्तरे :-* १) फेब्रुवारी १९५२, देशाची पहिली लोकसभा निवडणूक २) मारूती चितमपल्ली ३) दाचीगम ४) samsung कंपनी, दक्षिण कोरिया ५) ई श्रीधरन *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 शिवकुमार ईबीतवार👤 ऋषिकेश बेळकोनीकर👤 माधव तनमुदले👤 रणजित लोखंडे👤 ज्ञानेश्वर आंचेवाड👤 बालाजी पांडागळे👤 सूर्यकांत राखोंडे👤 राजेश कुमार👤 शेषराव पाटील👤 संदीप पिकले👤 दिवाकर अष्टेकर👤 मल्लेश कमळे👤 राम वाघमारे👤 ऋषी देसाई*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'मनुष्यस्वभाव' अगदी विपरित असतो. तो कायम दुस-याचे अनुकरण करण्यात मग्न असतो. त्याला 'स्वधर्म' पाळण्यापेक्षा परधर्माचे आकर्षण जास्त असते. जसे गुलाबाच्या झाडाने कमळाचे फूल उगवण्याचा अट्टहास करणे. परंतु अशा प्रयत्नात अपयश हे ठरलेले असते. खरं म्हणजे गुलाबाच्या झाडाने उत्तम गुलाबाचे फूल उगवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तोच त्याचा 'स्वधर्म' असतो. कमळाचे फूल उगवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ परधर्माचे अनुकरण करणे होय. स्वत:ची फूले लहान निपजली तरी चालतील, परंतु दुस-याची मोठी फुले आपली मानणे हा अधर्म होय.**मनुष्याने आपला धर्म ओळखून, सारी क्षमता पणास लावून कार्य केले तर त्याचे 'कल्याणच' होईल. अन्यथा स्वधर्म सोडून नको त्या गोष्टींच्या मागे लागत राहिले तर वाट्याला केवळ दु:ख येईल. "दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचे नसून त्याचा स्वधर्म आहे प्रकाश देणे !"* *॥ रामकृष्णहरी ॥*🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मोहित चा अनुभव*मोहित ची शाळा सुटली. तो घरी निघाला. वाटेत त्याला आई दिसली. तिच्या हातात दोन मोठ्या पिशव्या होत्या त्या खूप जाड असाव्यात, असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. “अग आई, काय घेऊन चाललीस एवढं? ” मी आईला विचारले.तिच्या हातातील एक पिशवीघेऊ लागलो. “अरे हळू सामान सांडेल त्यातलं.” ती म्हणाली.“अगं आई, किती जड आहे पिशवी! काय आहे एवढ्यात ? मी म्हणालो. “हे आपल्या महिन्याभरच्या किराणा आहे” आई म्हणाली. एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले, तीही किती जाड होते, आणि त्याने आईचे हात लालेलाल झाले होते. “एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई?” किती लागले असावेत? असे आईच मला उलटून प्रश्न विचारून राहिली. मी सांगितले रक्कम एकूण आई हसू लागली आणि म्हणाली “, वा रे वा, तुझं ध्यान! वस्तूचे भाव गगनाला भिडले कुठे आहेस तू? बाजारात फिरत जा, मग तुला समजेल. मग महेश म्हणाला “आई जेव्हा माझ्या शाळेला सुट्टी असते तेव्हा आपण किराणा दुकान मध्ये जाऊ म्हणजे मला तुला मदत करता येते व माझे व्यवहार ज्ञान ही वाढते.*तात्पर्यः वेळेचा सदउपयोग करून अनुभव मिळवणे व ज्ञान वाढविणे,कामात मदत होणे.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment