✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 21/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन**जागतिक टेलिव्हिजन दिन* 💥 ठळक घडामोडी :- ● १९७१ - भारतीय वायु सैन्याची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धांतील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.💥 जन्म :-● १६९४ - व्हॉल्तेर, फ्रेंच तत्त्वज्ञानी.● १८५४ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.● १९१० - छ्यान चोंग्शू, चिनी भाषेमधील लेखक, अनुवादक.● १९४३ - लॅरी महान, अमेरिकन काउबॉय.● १९२७: नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म.💥 मृत्यू :- ● १८९९ - गॅरेट हॉबार्ट, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.● १९७० - सर सी.व्ही. रमण, भारतीय शास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *अरुणाचल प्रदेशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ ‘डोनी पोलो एअरपोर्ट, इटानगर’ चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या भारत जोडो यात्रा राज्यातील 14 दिवसांचा प्रवास पूर्ण करत पोहोचला मध्य प्रदेशात.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *मुंबईत सीटबेल्ट सक्तीची अंमलबजावणी, 15 नोव्हेंबरपासून कारवाई सुरु. दोन वेळा मुदतवाढ, आता कारवाईला सुरुवात*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *गोव्यात 'इफ्फी' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात ; आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमांचा डंका !*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *टार्गेट होण्याच्या भीतीने जिल्हा न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात; देशाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची जाहीर खंत*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *राज्यात थंडीचा जोर वाढला, विविध जिल्ह्यात तापमानात घट तर परभणीत मोसमातील निचांकी तापमानाची नोंद*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आधी सूर्यकुमारचं शतक, मग दीपक हुडाच्या 4 विकेट्स, भारताचा न्यूझीलंडवर 65 धावांनी विजय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*शिक्षण पर्व2022 ज्ञानरचनावादी अध्यापन👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/BzJxJ9peKwk~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *प्रसिध्दीचे वलय* माणसांच्या जीवनात प्रसिद्धी खूप महत्वाचा भाग आहे. प्रत्येकांना वाटतं की आपण प्रसिद्ध व्हावं. त्यासाठी नाना प्रकारचे कार्य केल्या जाते. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट ठरावे, यासाठी प्रत्येकाची धडपड चालू असते. पण काही लोकं समाजात असे ही आढळून येतात की, ते प्रसिद्धीपासून चार हात दूर राहतात. तरी देखील ते एक ना एक दिवस प्रसिद्धीस येतात. कारण त्यांच्यामध्ये ती प्रतिभा असते. ......... लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावेhttp://tiny.cc/xnukgzलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *पोटात उठणे म्हणजे काय ?* 📙पोट फुगणे, दम लागणे वा पोट जास्त वेळा वर खाली होणे, या सर्वांनाच खेड्यात 'पोटात उठणे' असे म्हणतात. मग गंडेदोरे, मंत्रतंत्र, पोटावर डागणे असे अनेक उपाय केले जातात. अर्थात यांचा काहीही उपयोग होत नाही. पोटात का उठते याची अनेक कारणे आहेत. 'ड' जीवनसत्वाच्या अभावाने मुडदूस नावाचा रोग होतो. यात हातापायाच्या काड्या व पोटाचा नगारा होतो. पोटात जंत असले व यकृताचा आकार मलेरिया सारख्या रोगाने वाढलेला असल्यास पोट फुगते. दमा झाल्यास श्वासाची गती वाढते व पोट जास्त वेळा वर खाली होते. न्युमोनियामध्येही श्वासाचा दर खूप वाढून पोट जास्त प्रमाणात व वर खाली होते. पोटातील मूत्रपिंड, आतडे यांचा कर्करोग झाल्यास आतड्यांमध्ये अडथळा येऊन अन्न पाणी अडकून पडल्यास किंवा अांत्रपुच्छाचा दाह होऊन सूज आल्यास पोट फुगते. मुत्रपिंडाच्या रोगांमध्ये व पोटाच्या आतील आवरणात पाणी साठल्याने ही पोट फुगते. पोट फुगण्याची अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने असे होत आहे हे ओळखून त्यावर उपचार करणे अगत्याचे ठरते. तरच पोटात उठणे कमी होऊ शकते. अन्यथा नाही.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित* यांच्या पुस्तकातून*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" अंधाराची कारस्थाने रोज घडतात, तरीही रोज सकाळी प्रकाशाचा विजय होतो. "* *संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) फिफा फुटबॉल विश्वचषक २०२२ ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे ?२) टी - २० विश्वचषक २०२२ मध्ये सर्वाधिक धावा कोणी पटकावल्या ?३) भारतात बनविलेल्या पहिल्या क्रुझचे नाव काय ?४) भारतीय सनदी सेवेचे जनक कोणत्या गव्हर्नर जनरल म्हणतात ?५) बिरसा मुंडा यांच्या आई - वडिलाचे नाव काय होते ?*उत्तरे :-* १) कतार २) विराट कोहली, भारत ( २९६ धावा ) ३) गंगा विलास क्रुझ ४) लॉर्ड कॉर्नवॉलिस ५) सुगना व करी *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 प्रशांत शास्त्री, सेवानिवृत्त बँक अधिकारी👤 आबासाहेब विश्वनाथ पाटील, धर्माबाद👤 इलियास बावानी, पत्रकार, माहूर👤 विठ्ठल शिंदे👤 शुभम सुर्या पाटील👤 गंगाधर धुळेकर👤 माधव हर्ष👤 संगीताताई देशमुख, नांदेड👤 सोनू कुलकर्णी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हातात काय आहे? बरेचसे तर हाताबाहेरचे आहे. जन्म-मरण हातात नाही. पुढचा क्षण कसा असावा, ते हातात नाही. भूतकाळ मागे सुटलेला, असल्याच तर ब-या-वाईट आठवणी. भविष्याच्या गर्भात काय दडले, माहित नाही. त्यामुळे त्याची उत्सुकता आणि त्याच्या अनिश्चिततेतून वाटणारी असुरक्षितता. भविष्यातील असुरक्षिततेवर मात करण्यासाठी भविष्याविषयीचे स्वप्नरंजन करणे किंवा कल्पनेचे मनोरे बांधणे हाच काय तो उतारा. हाही उतारा कधी क्षणात उधळला जातो आणि कल्पनेचे मनोरे जमीनदोस्त होऊन जातात आणि उरते ती अगतिकता आणि असहायता.**थोडाफार हातात म्हटल्यापेक्षा चिमटीत आहे तो आताचा वर्तमानातील क्षण. तोही क्षण चिमटीत आहे म्हणता म्हणता निसटतो आणि भूतकाळाच्या शवागारात जमा होतो. वर्तमान हातात असतो, तेव्हा आपण ब-याच वेळा भूतकाळात रममाण असतो. नाहीतर भविष्यातील स्वप्नरंजनात दंग असतो. त्यामुळे हातात असलेला क्षण तसाच सटकून निसटून जातो. क्षणाक्षणाला प्रवाही असलेला क्षण जगता आला पाहिजे. तोच क्षण माझा; ना भूतकाळ माझा. तो तर मेलेला. ना भविष्य माझे; ते तर स्वप्न. आहे ते वर्तमान. यात जगता आले तरच ते जगणे. यासारखी नितांत सुंदर गोष्ट नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रत्येकजण आपल्या जीवनाबद्दल काही ना काही बोलत असतो.जेव्हा तो बोलत असतो तेव्हा त्याच्या जीवनात नव्वद टक्के नकारात्मक भूमिका असते.या जीवनात असे जीवन जगण्यात काय अर्थ आहे ? त्यापेक्षा न दिलेलेच बरे.आता जीवन जगणे असह्य आहे.असा जेव्हा विचार करतात त्यांनी जगण्याला आत्मविश्वास गमावलेला असतो.कोणतीही कृती न करता किंवा हातपाय न हलवता जीवन कसे सुखी बनेल ? हा विचार कधीच ते विसरुन बसले असणार आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनात सदैव नैराश्याचे डोळ्यांसमोर काळे ढग दिसतात.अशी माणसे स्वत:ही जीवनाचा आनंद घेत नाहीत आणि इतरांच्या जीवनातला आनंदही त्यांना पाहवत नाही.अशा नैराश्ययुक्त व नकारात्मक विचार करणा-या माणसांनी थोडी डोळसपणे दुस-याच्या आनंदाने जीवन जगणाऱ्या माणसाकडे थोडा विचार करून पहायला हवे.त्यांची आत्मविश्वासाने व कृतीयुक्त शैलीने व आपल्यासमोर कितीही आणि कोणताही कठीण प्रसंग असो तो हसत हसत सामोरे जाऊन कसे जीवन जगतात याचे थोडे सूक्ष्म निरीक्षण करायला हवे.तसेच त्यांच्या जगण्याची जीवनशैली कशी आणि आपली जगण्याची जीवनशैली कशी हा प्रश्न स्वत:ला विचारुन पाहिला तर नक्कीच कळेल की,आपल्यामध्येच खरी त्रुटी आहे.आपणही त्यांच्यासारखे जीवन जगायला हवे.इतरांच्या जगण्यापेक्षा आपणही चांगले जीवन आपल्या कर्तृत्वाने, आत्मविश्वासाने जगू शकतो अशी शिकवण मिळाल्याशिवाय राहत नाही.नक्कीच चांगले बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेल.मग तो नैराश्यमय जीवन जगणारे नाही अशी प्रेरणा घेऊन व कर्तृत्ववान लोकांचे नक्कीच चांगले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मिळेल.मग तोच जगाला जीवन कसे जगायचे याचे ज्ञान देण्यासाठी तयार होई.म्हणून इतरांच्या लोकांचे चांगले अनुकरण घ्यायला काय हरकत असा सकारात्मक विचार निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *ज्वारीचे तीन पोते.*ही तीन भावाची कथा आहे. तिघेही भाऊ प्रेमाने राहायचे. तिघेही चतुर ,हुशार व इमानदार होते. मोठा भाऊ किराणा दुकान मध्ये काम करायचा. सगळ्यात छोटा भावाने आता फक्त शिक्षण पूर्ण केलं होतं. आणि तिसरा भाऊ पुजारी होता. त्यांच्या बाबाचा मृत्यू झाला होता . एक दिवस त्यांच्या बाबाचे मित्र त्यांच्या घरी आले. ते त्या तिघांचाही आईला म्हणाले, “माझ्या मुलीचे लग्नाचे वय झाले आहे. मला एक छान मुलगा हवा जो माझ्या मुलीला चांगले ठेवण व माझ्या कामाला मदत चांगली करेन.मला तुमचे तिन्ही मुलं चांगले वाटते. म्हणून मी तुमच्या तिनही मुलाची परीक्षा घेणार आहे.” त्यांनी पूर्णपणे परीक्षा चा विचार करून निर्णय घेतला. नंतर च्या दिवशी, त्यांनी सगळ्यांना एक एक ज्वारी चे पोते दिले. आणी म्हणाले, “मी काही कामासाठी बाहेरगावी चाललो. मी दोन-तीन महिन्यांनी येणार. आणि मी बघणार तुम्ही या त्याचे काय केले. नंतर दोन-तीन महिने झाले तरीपण मित्र वापस नाही आला. कमीत कमी एक दीड वर्ष गेले. मग ते परत आले. ते सगळ्यात पहिले पहिल्या भावाजवळ गेले. पहिला भाऊ म्हणाला , “या मी तुमचे स्वागत करत आहे. तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचे पोते दिले होते मी त्या पोत्याला माझ्या दुकान मध्ये विकून टाकले. हे घ्या त्याचे पैसे”. त्याच्यानंतर मित्र दुसऱ्या भावाजवळ गेले. तो म्हणाला “, मी एक पुजारी आहे. माझ्या मंदिरामध्ये खूप सारे गरीब आले होते मी त्यांना ती ज्वारी त्यांच्यात वाटली . आणि मला हे खात्री आहे की त्याचा आशीर्वाद तुम्हालाच भेटेन.” मित्र सगळ्यात शेवटी तिसऱ्या भाऊ कडे गेले. तो भाऊ म्हणाला “, तुम्हाला आठवण आहे तुम्ही मला दीड वर्षाखाली एक ज्वारीचं पोत दिलं होतं. माझ्या शेजारच्या येथे शेत आहे. मी त्याच्या घरी गेलो. त्याला विनंती केली की मी तुमचं अर्ध शेत वाहू शकतो का? तो म्हणाला, “हो”. मि त्या अर्ध्या शेतात एका पोत्याच्या ज्वारीचे 25 पोते बनवले. त्याच्यातले 25 पैकी 5 पोते मी त्यांना विकले.” “हे घ्या पैसे आणि ही 20 पोते”.आता तुम्हाला तर माहीतच असेल की मित्राने आपला कोणता जावई निवडला असेन? अर्थातच तिसरा भाऊ.बोध: मेहनतीचे फळ कधी पण गोडच असते.विचार करून केलेल्या कार्याचे सुयोग्य सुयश नक्कीच दडलेले असते.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment