✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 23/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :- १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.💥 जन्म :-१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार💥 मृत्यू :- १९३७: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस१९५९ : अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर२०१९ : दैनिक नवाकाळचे संपादक,'अग्रलेखांचे बादशाह' नीलकंठ खाडिलकर*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *खालावलेला शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये केरळ पॅटर्न राबवण्याची तयारी, सरकारकडून नवा प्रयोग करण्यात येणार. *•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन 'रोजगार मेळाव्यात' 71 हजार युवकांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. सरकारी नोकरी देण्यासाठी सरकार मिशन मोडवर असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज असून सरकारने आदेश दिल्यानंतर कारवाई केली जाईल असं लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवदी यांनी म्हटलं आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता UPI पेमेंटवर निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक व्यवहारा प्रमाणेच UPI पेमेंट मर्यादा घालण्याचा संबंधित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी बोलणी सुरु आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *17 हजार मुलांचं गोवर लसीकरण पूर्ण,आरोग्य विभागाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टीम इंडिया आणि न्युझीलंड यांच्यातील तिसरा टी20 सामना पावसामुळे बरोबरीत, टीम इंडियाने 1-0 ने जिंकली मालिका*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *फिफा विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, मेस्सीचा अर्जेंटिना संघ सौदी अरेबियाकडून 2-1 ने पराभूत*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*The sky is falling-story👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/wMNG3jvIugw~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *स्मार्टफोनचा विळखा, वेळीच ओळखा*अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण कालांतराने या मूलभूत गरजामध्ये अजून कांही वस्तूची वाढ होत गेली त्यात प्रामुख्याने मोबाईलचा समावेश करणे अगत्याचे आहे. आज माणसाला एक वेळ अन्न, वस्त्र किंवा निवारा यांची कमतरता असेल तर चालून जाईल मात्र खिशात मोबाईल नसेल तर ती व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, अशी परिस्थिती सर्वत्र निर्माण झाल्याचे............वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_22.html लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *नागीण का होते ?* 📙तुमच्या घरात किंवा शेजारीपाजारी कोणालाही 'नागीण' झाल्याचे तुम्हाला समजले असेल, तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण नंतर नागिन म्हणजे त्वचेवर येणारे विशिष्ट प्रकारचे पुरळ हे पाहिल्यावरच कळले असेल. कांजण्या हा रोग विषाणूंमुळे होतो. या विषाणूंसारख्या दुसर्या विषाणूंमुळे नागिन हा रोग होतो. कांजण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू सुप्तावस्थेत राहतात व कित्येक वर्षांनी मज्जारज्जुतून एखाद्या नसेमार्फत त्वचेवर फोड निर्माण करतात. नागिनीची तीव्रता वयाबरोबर वाढते. मोठ्या वयात जास्त त्रास होतो. हे विषाणू मज्जापेशी व त्यांच्यामधून मज्जातंतुतुच्या रेषेवर वाढतात. आजाराची सुरुवात त्या मज्जातंतूंच्या मार्गावर खूप दुखणे सुरू होऊन होते. तीन चार दिवसांत तेथील त्वचेवर लालपणा येतो व पाठोपाठ पाण्याने भरलेले दुखरे फोड येतात. पाच सहा दिवस हे फोड वाळायला लागतात व खपली धरते. फोड गेले की दुखणे थांबते. काही वेळा सहा महिन्यांपर्यंत दुखरेपणा टिकतो. सामान्यतः बरगड्यांमधील नसांच्या रेषेवर फोड येतात. नागिन हा रोग त्रासदायक असला तरी सहसा फारसे गंभीर परिणाम होत नाहीत; पण डोळ्यात जर फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते. असायक्लोव्हीर या महागड्या औषधाने पुरळ लवकर बरे होते. पण आग होणे मात्र कमी होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे ती म्हणजे इतर विषाणूजन्य रागांप्रमाणेच हाही रोग काही दिवसांत आपोआप बरा होतो. वेदना कमी होण्यासाठी ऍस्पिरिन, पॅरासिटेमॉल या औषधांचा वापर करता येतो. वेदना खूप दिवस होऊनही बंद न झाल्यास संबंधित नस मारून टाकतात. अर्थात यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार उपचार घ्यावे.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन ०२० ६५२६२९५०*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" जेव्हा कठीण परिश्रम केले जातात तेव्हा ते विजयाचे क्षण घेऊन येतात. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) जी - २० शिखर परिषदेचा अध्यक्ष म्हणून भारत केव्हापासून औपचारिकपणे अध्यक्षपद स्वीकारणार आहे ?२) टी - २० विश्वचषक २०२२ चा मालिकावीर किताब कोणी पटकावला ?३) बाळासाहेब ठाकरे कोण होते ?४) वनमहोत्सवाचे जनक कोण ?५) सूर्यप्रकाश पृथ्वीच्या किती भागावर पडतो ?*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २०२२ २) सम कुरेन, इंग्लंड ३) व्यंगचित्रकार, शिवसेनेचे संस्थापक, हिंदुहृदसम्राट ४) के. एम. मुंशी ५) निम्म्या *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 जुगलकिशोर बोरकर👤 सुनील बंडेवार, धर्माबाद👤 जगन्नाथ भगत👤 आदित्य खांडरे👤 कपिल दगडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारतभूमी संत-महंतानी, समाजसुधारकांनी पावन केली आहे. लोककल्याणासाठी चंदनासारखा देह झिजवत त्यांनी मानवता समृद्ध केली. काही अलौकिक प्रलोभनांमध्ये भोळ्याभाबड्या लोकांना अडकवून स्वत:ची वैभवी दुकानं थाटणं हे संतांचं ध्येय नसतं. त्यांच्या माणूसधर्माच्या शिकवणूकीचं आपल्याला मोल नसतं. संतांच्या जीवनात कुठलाच झगमगाट नसतो, चमत्कार नसतात. 'माणूस' घडवणं हेच त्यांचं ध्येय असतं. संतांना ना स्वत:ची जात असते, ना कोणता धर्म! कुठल्या विशिष्ठ विचारांचा त्यांच्यावर पगडा नसतो. ते स्वत:च्या वाटेवरुन स्वतंत्रपणे चालत राहतात.**स्वर्ग-नरकाच्या जटील जाळ्यात संत अडकत नाहीत. कुणाला अडकवत नाहीत. जमिनीवरल्या सहज जगण्याचे व अंतरीच्या शाश्वत सुखाचे मंत्र ते देत राहतात. त्यांचं नातं केवळ सत्याशी असतं, सत्य कटू असतं. म्हणून आपण दगड मारतो सत्याच्या पुजा-यांना. यात संत असतात तसे वैज्ञानिक-विचारवंतही असतात. खरंतर या महामानवांच्या निमीत्तानं आपण सत्यालाच दगड मारत असतो. सत्याचा मार्ग गर्दीचा नसतो, पण खडतर असतो. म्हणूनच येशूला आपण क्रूसावर चढवलं. बुद्ध-महावीर यांना दगड मारले. एडिसनला मंदबुध्दी ठरवलं आणि गॅलिलिओला वेड्यात काढलं. विचारवंताना गोळ्या झाडणारेही आपणच. किती निष्ठुर आहोत आपण ! इमानाला सजा व दांभिकाची पूजा ! सत्याच्या मुखवट्यांना हार घालायचे, महानतेचे मुकुट चढवायचे ही आपली व्यवस्था, हे आपले करंटेपण.* *॥ रामकृष्णहरी ॥*☀☀☀☀☀☀☀☀☀ *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्याकडे एक श्रद्धा अशी आहे की,घरात एखादा पाहुणा किंवा एखादी पाहुणी आली की,तुमच्या पायगुणाने आमचे खूप चांगले झाले आहे असे म्हणतो.हे कितपत योग्य आहे ? मला तरी ते मान्य नाही.जर असे काही होत असेल तर आपण रोजच पाहुण्यांना येण्याबद्दल आग्रहाचे निमंत्रण दिले असते.काहीच न करता असे जर होत असेल तर खुप काही आपण झालो असतो.विचार करायची गरज नाही,काम करायची गरज नाही किंवा प्रयत्नही करायची गरजही नाही.आपण चांगले विचार मनात आणले आणि मन लावून काम केले तर घरातही प्रसन्न वातावरण निर्माण होते.अशा परिस्थितीत बाहेरच्यांचे येणे हा निव्वळ योगायोग आहे असेच समजायचे.आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला विचारुन पाहिले तर ते आपल्याला खरेही वाटणार नाही.अशी श्रद्धा ठेवणे म्हणजे एक कल्पनाच आहे असे समजावे.ही डोळस श्रद्धा नसून एक अंधश्रद्धा समजावी.अशा प्रकारच्या कितीतरी श्रद्धा आहेत त्या आपण ज्ञानाच्या माध्यमातून,कर्तृत्वाच्या माध्यमातून आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातून सिध्द करता येते.त्यासाठी ' केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.' ह्याप्रमाणे जीवन जगायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आमचे चुकले*एकदा सानेगुरुजी रेल्वेने प्रवास करत होते. त्यांच्या शेजारचे प्रवासी शेंगा ,संत्री खात होते .टरफले, साली खाली टाकत होते. त्यांचे खाऊन झाल्यावर गुरुजी उठले. साली गोळा केल्या कागदात बांधून ठेवल्या. प्रवाशाला खंत वाटली नाही.आणखी टरफले साली गोळा केल्या. कागदात बांधून ठेवल्या गुरुजी आपल्या जागेवर बसले. शेंगा खाणारा प्रवाशांना खंत वाटली नाही. नंतर पुढच्या स्टेशनवर एक प्रवासी त्या डब्यात चढला. साने गुरुजींना पहातात त्यांनी वाकून नमस्कार केला. तेव्हा शेजारी ची प्रवासी मंडळी चमकली. त्यांनी चौकशी केली. चौकशी करतात सानेगुरुजी आहेत हे त्यांना कळले. ते सर्वच खजील झाले व म्हणाले गुरुजी आमचे चुकले क्षमा करा” गुरूजी नम्रपणे म्हणाले “, मी कोण तुम्हाला क्षमा करणार? गाडीमध्ये आपण सर्वजण बसतो. प्रवास करतो गाडी स्वच्छ ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे गाडी घाण होऊ नये म्हणून मी ती स्वच्छ केली. अशी गुरुजींची वृत्ती! आपल्या जीवनात कोणतीही काम कधीच हलके मानले नाही.*बोध: आपण कोठेही कचरा करु नये. आणि जर का झाला असेल तर तर त्याला व्यवस्थितपणे टाकावे. स्वच्छता ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे ,कर्तव्य आहे.आपली चूक आपण मान्य करावी आणि नंतर अशी चूक होणार नाही ही दक्षता घ्यावी.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment