✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 29/11/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :- १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.२०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.२०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.💥 जन्म :-१९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. १९०८ - एन.एस. क्रिश्नन, तमिळ चित्रपट अभिनेता.१९३२ - जाक शिराक, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.१९७७ - युनिस खान, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- १९५९ - गोविंद सखाराम सरदेसाई - मराठी इतिहासकार१९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. २०११ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यात यावे, त्यासाठी जागांची निश्चिती करावी. गंभीर रूग्णाला एअर लिफ्ट करण्याकरता वैद्यकीय मदतीसाठी हेलिपॅडचा उपयोग होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *सहावी ते बारावीपर्यंतच्या मुलींना शाळेत मोफत सॅनिटरी पॅड द्या! याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाची केंद्रासह राज्यांना नोटीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *नुकसानभरपाईबाबत शेतकऱ्यांचा सरकारला 4 डिसेंबरपर्यंतचे अल्टिमेटम, अन्यथा कुठल्याही ठिकाणी कोणत्याही वेळात 'जलसमाधी' घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *आता गोवरसाठीही क्वारंटाईन! गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करा, टास्क फोर्सचे जिल्हा प्रशासन आणि महापालिकांना निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *PSI, कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी पदाच्या मुख्य परीक्षा पुढे ढकलल्या.. प्रशासकीय कारणास्तव वेळापत्रकात बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात 'ठाकरेंची सेना' उतरणार रस्त्यावर; चक्काजाम करणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत एका षटकामध्ये 7 सिक्सर साग झंझावाती द्विशतकासह केला वर्ल्ड रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Story-The Nightingale and the nobleman👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EgGfP7iJmFc~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *शिक्षकांना शिकवू द्या ...*शाळाबाह्य कामावर बहिष्कार टाकल्यामुळे 27 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई झाल्याची बातमी वाचण्यात आली. राज्यातील बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे शिक्षक. कोणत्याही सरकारी कामासाठी सहज उपलब्ध होणारा आणि सांगितलेले काम मुकाट्याने करणारा कर्मचारी म्हणजे शिक्षक. वास्तविक पाहता शिक्षकांचे...........वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2017/11/blog-post_27.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *म्हाताऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात ?* 📙वृद्धावस्था आली की माणसात अनेक बदल होतात. डोक्यावरचे केस गळायला लागतात व टक्कल पडते. तोंडातील दात हलायला लागतात व नंतर तोंडाचे बोळके होते. बोटांना कंप सुटतो, दृष्टी अधू होते, उत्साह कमी होतो. अशा या बदलांमुळे व्यक्ती चिडचिडी होते. त्यात भर म्हणजे विस्मरणही व्हायला लागते. त्यामुळे वृद्धत्व म्हणजे एक रोग असे वाटायला लागते.चेहऱ्यावर सुरकुत्या का पडतात, याविषयी माहिती घेऊ. त्वचेखाली स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या दिशेने काटकोनात त्वचेची हालचाल होत असल्याने त्वचेच्या वारंवार घड्या पडतात. व तेथे नंतर सुरकुत्या पडतात. चेहऱ्याच्या त्वचेखाली इतर शरीराच्या त्वचेखाली असणारा जाडसर थर (deep fascia) नसतो व स्नायू व त्वचेचे थर एकमेकांत जखडलेले असतात. त्यामुळेही त्वचेवर जास्त ताण येतो व सुरकुत्या पडतात.दुसरे म्हणजे त्वचेखालील मेद पदार्थांचे प्रमाण कमी होते. साहजिकच त्वचा सैल व ढिली होते. तिसरे म्हणजे स्नायूंमधील ताण वयोमानानुसार कमी होतो. त्यामुळे त्वचेमध्ये खोवले जाणारे स्नायू शिथिल होतात व त्वचाही सैल होते. सर्व इंद्रियांवर त्वचेची जीवनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे या त्वचेची लवचिकता कमी होऊन ती सैल पडते. या सर्व गोष्टींमुळे सैल पडलेल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात. तोंडातील दात पडल्याने जबड्याच्या हाडाची झीज झाल्याने चेहऱ्याचा आकारही बदलतो व त्वचा आणखीनच सैल होते. परिणामी वृद्ध व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात. सुरकुत्या सर्व शरीरावर पडतात परंतु चेहऱ्यावर ती बाब जास्त प्रकर्षाने जाणवते.*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••"अनेक वेळा चांगले क्षण/ आशीर्वाद हे कठोर प्रसंगांच्या वेशभूषेत येतात."*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 साईनाथ बोईनवाड👤 योगेश खवसे👤 पोतन्ना गुंटोड👤 प्रमोद पाटील बोमले*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*संत तुकाराम महाराज यांचा अतिशय सोपा दिसणारा अभंग आहे,'बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ॥' येथे तुकोबा एक खूप मोठं मानसशास्त्रीय गूढ कमीत कमी शब्दांत उकलून देत आहेत. जसे बोलतो तसेच वागणारा माणूस भेटला तर त्याला मी वंदन करीन, असे तुकोबा म्हणतात. म्हणजे अशी माणसे दुर्मिळ आहेत का ? असा प्रश्न पडतो. माणसाचे आचरण त्याच्या चारित्र्याशी विसंगत असेल तर असण्यात आणि भासवण्यात एक दरी निर्माण होते. आपण ज्यांना चांगली माणसं म्हणतो त्यांच्याही असण्यात आणि दाखवण्यात व्यक्तिमत्वात दरी असतेच.**असण्याच्या आणि भासवण्याच्या मध्ये केवढी दरी आहे हे पाहिले पाहिजे. ती जेवढी मोठी तेवढा माणूस लहान आणि ती जेवढी लहान तेवढा माणूस मोठा, असे एक समीकरण मांडता येईल. असे होण्याच्या मागे एक बाह्य कारण आहे. आपल्या कृतीचे समर्थन करणे ही मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी गुन्हेगारही गुन्हा का करावा लागला याचं समर्थन करत असतो. म्हणूनच मग 'बोले तैसा चाले' अशी व्यक्ती दुर्मिळ असते. आणि अशी व्यक्ती सापडलीच तर तो परीस असतो, तो इतरांचेही सोने करू शकतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कासवाची चतुराई*एकदा एक कासव जंगलाकडे जायला निघाला. त्याला कोल्हा दिसला. कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता. कासव घाबरला. कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले. कोल्ह्याने कवच पाहिले. आपल्या पायाने कवचाला ओरखडले. कोल्ह्याला वाटले," हा तर दगड आहे. “कोल्हा पुढे निघून गेला. कासवाने हळूच मान बाहेर काढली. ते पाण्यात शिरले. कासवाने कोल्ह्याला आवाज दिला.. कोल्ह्याने मागे वळून पाहिले. तो स्वतःशीच म्हणाला अरे! शिकार हातची गेली..*बोध: चतुराईने केलेले काम चांगलेच व उपयोगी असते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment