✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/11/2022 वार - मंगळवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती*💥 ठळक घडामोडी :- ● १९८९ - सचिन तेंडुलकरने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.💥 जन्म :-● १९५४ - आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की, पोलंडचा तिसरा राष्ट्राध्यक्ष.● १९६१ - झहीद अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.● १९६८ - पीटर मार्टिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १९८२ - आचार्य विनोबा भावे (महाराष्ट्र) भारत*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार तयार असल्याचं सांगितलं.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया, विनयभंगाच्या गुन्ह्यापेक्षा राजकारणातून संन्यास बरा, असं म्हणत राजीनामा देत असल्याचं आव्हाडाचं ट्वीट*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही; दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पुण्यात हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार; 16 नोव्हेंबरपर्यंत गारठा कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेस कडून विभागनिहाय जबाबदारीचे वाटप. बडोदा विभागाचे निरीक्षक म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची नियुक्ती. तर मुकुल वासनिक यानांही काँग्रेसकडून जबाबदारी.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *टाटा समूहाची मोठी तयारी, एअर इंडियामध्ये तिन्ही विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू -रिपोर्ट*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आयसीसीच्या सर्वोत्तम संघात विराट, सूर्याला स्थान; तर हार्दिकची 12वा खेळाडू म्हणून निवड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जलसाक्षरता : काळाची गरज*वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://nasayeotikar.blogspot.com/2021/03/23032021.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *निर्मलक (डिटर्जंट - Detergent) कसे काम करते ?* 📙भारतात निर्मलकांचा वापर १९६० च्या दशकात सुरू झाला. त्यांचे मुख्य काम म्हणजे पाण्याच्या साहाय्याने सर्व प्रकारचा मळ व तेलकटपणा मोकळा करून धुण्याच्या मिश्रणात उतरवणे. थोडक्यात पाण्याची पदार्थ 'विरघळवण्या'ची ताकद निर्मलक वाढवतो. मळलेले कपडे, तेलकट भांडी, तेलाचे मातीचे हात धुण्याची वेळ येते, तेव्हा त्याची हमखास आठवण येते. थोडासा विचार केला, तर निर्मलक आपल्या जीवनात किती व्यापक रीतीने शिरला आहे, हे लक्षात येईल. तो उपलब्ध नाही असे चार दिवस जरी गेले तरी आपले सगळे व्यवहार अडून बसतील. प्रक्षालक व निर्मलक म्हणजे व्यवहारात 'डिटर्जंट' हाच शब्द जास्त सहज वापरला जातो.पहिला डिटर्जंट बनवला गेला, त्याला आता किमान ७५ वर्षे झाली. फ्रिट्झ गुंथर या जर्मन संशोधकाने हा डिटर्जंट क्रूड ऑईलपासून बनवला होता. पण त्यानंतर कित्येक वर्षे त्याचा व्यावहारिक उपयोग केलाच गेला नाही. सुमारे १९५० च्या दशकात याचे व्यावसायिक उत्पादन सुरू झाले. सध्या ढोबळमानाने असे म्हणता येईल की, अल्फिलबेंझीन व सल्फ्युरिक अॅसिड यांच्या साह्याने तयार झालेल्या संयुगातील अॅसिडचा भाग सोडा अॅश वापरून काढला जातो. राहतो तो डिटर्जंट.डिटर्जंट तयार झाला तरी त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी आणखी काही खास प्रक्रिया केल्या जातात. फेस आल्याशिवाय 'साबण' वापरला असल्याचे समाधान मिळत नाही म्हणून फेसाळणारे काही घटक त्यात मिसळले जातात. रक्त, घाम, तेल यांचे डाग निघावेत म्हणून खास वितंचके (Enzymes) त्यात घालतात. याखेरीज कपडे अधिक शुभ्र दिसून चकाकी यावी, यासाठी ऑप्टिकल व्हाइट्नर घालण्याची पद्धत आहे. डिटर्जंटची पावडर जितकी हलकी, जितकी तिची लाही मोठी, तितकी ती लवकर काम करते. यासाठी तयार डिटर्जंट मोठाल्या ढवळून काढणाऱ्या मिक्सरमधून काढला जातो. त्यात आकर्षक दिसण्यासाठी हलकासा रंग व छान सुगंधी वास मिसळला जातो.याच वेळी काम करणाऱ्या हातांची कातडी, कपडे, भांडी, धुण्याच्या वापरातील बादल्या यांवर रासायनिक अपायकारक प्रक्रिया होऊ नये, ही पण काळजी डिटर्जंट घेत असतो. डिटर्जंटच्या आधी काम करणारा साबण व कॉस्टिक सोडा हा काम करणाऱ्याला त्रासदायक तर ठरेच, पण त्याची चिकट लगदास्वरूपी लुकणे कपड्याला चिकटून राहत असत. डिटर्जंट वापरायलाही खूपच सोपा असतो. पाण्यात झटकन विरघळवुन त्या मिश्रणात कपडे बुडवतात येतात. त्यामुळे अनेक कपडे एकदम धुवुन निघू शकतात.डिटर्जेंटचा वापर सुरू झाला आणि जवळपास दशकभराने नवीनच समस्या समोर उद्भवताना आढळू लागल्या. आज या समस्यांनी समोर थोडेसे आव्हान व थोडेसे गंभीर स्वरूप धारण केले आहे. सगळ्या वापरातला डिटर्जंट गटारावाटे जेव्हा एकत्र होतो, तेव्हा पाण्यातील जंतू त्याचे विघटन करू शकत नाहीतच; पण या डिटर्जंटमुळे पाण्यातील प्राणवायूच्या प्रमाणावर परिणाम होऊ लागतो. हे पाणी नदीत गेल्यास तेथील जलचरांवर त्याचा दुष्परिणाम दिसून त्यांची संख्या रोडावू लागते.यावर उपाय शोधणे चालू आहे. प्रयोग चालू आहेत; पण अजून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. डिटर्जंट तयार करणे फारसे अवघड नाही. अगदी घरगुती स्वरूपातही तो तयार करता येतो. कच्चा माल आपल्या देशात सहज उपलब्ध आहे. पावडर स्वरूपातील, वडी स्वरूपातील किंवा द्रव स्वरूपातील डिटर्जंट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत.आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे डिटर्जेंट तयार करणारी एक भारतीय कंपनी कसलीही आधुनिक यंत्रणा, वीज यंत्रे न वापरता डिटर्जंट तयार करते, विकते व तिची आज भारतीय डिटर्जंटच्या विक्री मध्ये निम्म्यापेक्षा जास्त टक्केवारी आहे. या उत्पादनासाठी फारसे शिक्षण न झालेल्या गृहिणींचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो आहे. 'निरमा' हे तिचे नाव.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" हजारो मैलांचा प्रवास पहीले पाऊल पुढे टाकल्यानेच सुरू होतो. "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) बिरसा मुंडा यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ?२) 'अबुआ दिशुम अबुआ राज' म्हणजे 'आमचा देश आमचा राज' हा नारा कोणी दिला ?३) 'आदिवासी समाजक्रांतीचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?४) बिरसा मुंडा यांचे निधन केव्हा झाले ?५) बिरसा मुंडा कोण होते ?*उत्तरे :-* १) उलिहातू, झारखंड ( १५ नोव्हेंबर १८७५ ) २) बिरसा मुंडा ३) बिरसा मुंडा ४) ९ जून १९०० ( रांची कारागृह ) ५) आदिवासी नेता, स्वातंत्र्य सेनानी व लोकनायक *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 व्यंकटेश विरेश पाटील, येवती👤 सुनील शिंदे, पांगरी👤 राहुलकुमार सातव, कुपटी, माहूर👤 भगवान भूमे, देगलुर👤 अशोक चिंचोलीकर, धर्माबाद👤 दिनेश येवतीकर, येवती👤 कमलेश परब👤 मारोती कानगुलवार, येवती👤 गंगाधर मरकंठवाड, येवती👤 सोनाली कडवईकर, रत्नागिरी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*झोका काय नि पाळणा काय. स्वप्नात नेणारी ही जादूभरी दुनिया. चंद्र दिसतो आकाशात. हाती येणार नसतो बाळाच्या. पण हात उंच करून धरू पाहणारे हात थांबत नाहीत. आनंद, दु:ख, भीती, ग्लानी, नीज. झोका थांबला की बाळ रडते. झोका दिला की गुंग होते. वास्तवापासून दूर नेतो झोका. विसरायला लावतो जे नको असते. देह आणि मनाचा खेळ सगळा.**जत्रा भरते तेव्हा उंच उंच रहाटपाळणे असतात तिथे. लहानपणी नव्हते एवढे उंच पाहण्यात. चार पाळण्याचे, कमी उंचीचे गावच्या जत्रेत असायचे..त्यात बसण्याची ओढ आणि उतरण्याची घाई असायची. एकेक पाळणा हाताच्या साह्याने फिरवत, पाळणा उंच जाई., खाली येई, गती वाढत जाई. उंच जाताना उचलण्याचा गोळा पोटात आणि खाली येताना भीतीचा खड्डा पोटात. उच्च आनंद आणि प्राणस्पर्श होणारी भीती. आयुष्यात येणा-या अशा अनेक प्रसंगाच्यावेळी हे भान ठेवावंच लागतं. नेमक्या वेळी नेमकी गोष्ट व्हायलाच हवी. नाहीतर साधी गोष्टसुद्धा प्राणस्पर्शापर्यंत घेऊन जाते आपल्याला.* *दोन दोरांच्या हातांनी* *झोका देहास वेढतो* *मनालाही वेटाळून* *झोका प्राणास छेडतो.* ••●🌸 ‼ *रामकृष्णहरी* ‼🌸●•• 🌸🌸🌸🌸🌸🌸 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्या व्यक्ती स्वत:च्या सौंदर्याकडे कधीच पाहत नाहीत परंतु जगाचे अर्थात इतरांचे सौंदर्य कसे अधिक चांगले दिसेल यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यातच त्यांच्या सौंदर्यात अर्थात इतरांच्या सौंदर्यात समाधान मानतात.जेव्हा अशी व्यक्ती समाजात क्वचित पहायला मिळते ते इतरांचे अहोभाग्य समजावे.हे लोक स्वत:कडे आणि स्वत:च्या जीवनाकडे कधीच झुकून पाहत नाहीत.त्यांना स्वत:च्या जीवनात काही रस नसतो.रस असतो तो जगाकडे आणि जगाला सुंदर करण्याकडे.अशी व्यक्ती कधीच स्वार्थी वृत्तीची नसते.म्हणूनचइतरांच्या हृदयात सामावले जातात.उलट ज्या व्यक्ती आपले स्वत:चे सौंदर्य अधिकाधिक कसे खुलेल आणि इतरांपेक्षा आपण कसे खुलून दिसू,लोक आपल्याकडे कसे पाहतील अशी जर भावना असेल तर ती व्यक्ती स्वार्थी आणि मतलबी समजावी.अशा व्यक्तींना कुठेही स्थान मिळत नाही.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आईचे प्रेम*एकदा एका परीने जाहीर केले,"ज्या प्राण्याचे पिल्लू सर्वात जास्त सुंदर असेल, त्याला मी छान बक्षीस देईन." ते एकूण सर्व प्राणी एका ठिकाणी जमा झाले. त्यांनी आपल्याबरोबर आपली पिले आणली होती. परीने एकामागून एक सर्व पिलांना निरखले. तिने माकडिणीच्या पिलाचे चपटे नाक पाहून म्हटले, "किती कुरुप आहे हे पिल्लू! या पिलाला कधी बक्षीस मिळणारच नाही." परीचे हे बोलणे एकूण त्या पिलाच्या आईला खूप वाईट वाटले. तिने आपल्या पिलाला ह्दयाशी धरले आणि ती पिलाच्या कानात कुजबुजली. " माझ्या लाडक्या बाळा, तू अजीबात मनाला लावून घेऊ नकोस.माझे तुझ्यावर अतीशय प्रेम आहे. माझ्यासाठी तूच बक्षीस आहेस. मला इतर कोणतेही बक्षीस नको. ईश्वर तुला दीर्घायुष्य देवो."तात्पर्यः 'आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.' आईची महती जगात महान आहे.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment