✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 01/12/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जागतिक एड्स दिन💥 ठळक घडामोडी :- ◆१९६३ - नागालॅंड भारताचे १६वे राज्य झाले◆ १९६५ - भारताच्या सीमा सुरक्षा दलाची स्थापना💥 जन्म :-◆ १०८१ - लुई सहावा, फ्रांसचा राजा.◆ १०८३ - ऍना कॉम्नेना, बायझेन्टाईन इतिहासकार.◆ १९८० - मोहम्मद कैफ, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :- ◆ ११३५ - हेन्री पहिला, इंग्लंडचा राजा.◆ १९७३ - डेव्हिड बेन गुरियन , इस्त्रायलचा पहिले पंतप्रधान.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *युनायटेड नेशन फाऊंडेशनच्या डेटा व्हॅल्यू अॅडव्होकेट फेलोशिपसाठी जगभरातून निवडलेल्या सात कार्यकर्त्यांमध्ये भारतातून मयुरी धुमाळ हिची निवड झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *राज्यात समान नागरी कायदा लागू व्हावा यासाठी योग्य वेळी विचार करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *कोराना काळात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या 597 परिचारिकांना कायमस्वरुपी करणार, शासनाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *सध्या देशात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तांदळाची खरेदी सुरु आहे. मागील वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत तांदळाच्या खरेदीत मोठी वाढ झाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'टोयोटा'ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन, मृत्यूसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामनाही पावसामुळे रद्द, त्यामुळे भारताला वनडे मालिका गमवावी लागली*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कथा - सुंदर*त्याचं नाव सुंदर, तसं त्याचं कामही सुंदर त्याप्रमाणेच मन ही सुंदरच होतं. परंतु सारेच जण त्याला बंदर म्हणायचे. कारण ही तसेच होते, मूळात तो दिसायचा आफ्रिका देशातील निग्रो लोकांसारखा एकदम काळाकुट्ट, अगदी बारीक नाक आणि गरगरीत लहान डोळे गालात खोल........वरील कथा पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा.http://kathamaala.blogspot.com/2017/05/blog-post_90.html कथा वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🐤गोष्ट नव्या कावळा चिमणीची 🐧 कावळा चिमणीचा शेजारी .कावळ्याचं घरं शेणाचं , चिमणीचू घर मेनाचं.पाऊस झाला .कावळ्याचं घर गेलं वाहून, तो गेला चिमणीकडे धावून .चिमणी पिलातचं होती व्यस्त, कावळा भिजभिजला मस्त . दिवस गेला , महिने गेले , वर्षे गेली .चिमणीचे पिलू भरारी घेऊन गेलं परदेशी .त्याच्या आठवणीनं चिमणी रोज रडे, फोटो त्याच्या घेऊन उशाशी . पिल्लू परदेशातून पैसे पाठवी , चिमणीला पिलूचं हवे होतं , पैसे नको म्हणून खर्च न करता नुसतेच साठवी ...! चिमणी अखेर आजारी पडली , तेव्हा कोणी नाही आले धावून .शेवटी कावळ्यानेच मदत केली , तर चिमणीचे डोळे गेले अश्रूंनी वाहून . कावळा म्हणाला चिमणीला , "विचार करु नको फार, लक्षात ठेव मात्र, घरासोबत जोडावे मित्रही चार . मित्र जर असतील पक्के ,त्यांच्यासोबत काढता येते, आपले आयुष्य अख्खे .....!*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) 'जागतिक एड्स दिवस' केव्हा साजरा केला जातो ?२) एड्स होण्याची मुख्य कारणे कोणती ?३) जगात सर्वात प्रथम एड्सचा रुग्ण कोठे सापडला ?४) एड्सची लक्षणे कोणती ?५) भारतात एड्सचा पहिला रुग्ण कोठे सापडला ?*उत्तरे :-* १) १ डिसेंबर २) HIV रुग्णाचे रक्त दिल्याने, दुषित रक्त असलेल्या इंजेक्शनमधून, HIV बाधित आईकडून स्तनपान झाल्यावर, असुरक्षित लैंगिक संबंधामुळे इत्यादी ३) अमेरिका ( १९८१ ) ४) कित्येक आठवड्यापासून ताप येणे, खोकला येणे, वजन कमी होणे, तोंड येणे, सतत जुलाब, झोपतांना घाम येणे, भूक न लागणे इत्यादी ५) मुंबई ( १९८६ )*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ श्याम दरबस्तेवार, शिक्षक◆ हेमंत भेंडे, शिक्षक◆ राजकुमार दाचावार, शिक्षक◆ श्याम नरवाडे◆ मारुती गिरगावकर, शिक्षक◆ विठ्ठलराव मुजळगे, शिक्षक◆ मारोती दिंडे◆ श्रीकांत लाडे◆ सुभाष सोनटक्के◆ शिवाजी पुरी◆ श्याम पाटील◆ विश्वनाथ पांचाळ◆ बालाजी कलकोटे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जगात प्रचंड विविधता आहे. किंबहुना, विविधता हेच जगाचे सौंदर्य आहे. तीच मानवतेची ताकद आहे; परंतु दुर्दैवाने विविधता आणि विषमता यातील फरक लक्षात न घेतल्यामुळे मानवा-मानवांत जात, पात, धर्म, पंथ यावरून गटतट पडले आहेत. समाजाला एकत्र ठेवण्याऐवजी, मतलबी मंडळींनी स्वार्थासाठी समाजात भांडणे लावून दिली आहेत. त्यातून अतिरेकी विचाराची माणसे निर्माण झाली आहेत. त्यातून हिंसाचार वाढीला लागला आहे. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. सज्जनांची पीछेहाट आणि दुर्जनांचा विजय होताना दिसत आहे.**भारताला साधुसंतांचा देश म्हटले जाते. प्रचंड मोठी सांस्कृतिक परंपरा असलेला भारतीय माणूस मूलत: विचारी आहे. त्यामुळे फोलपट बाजूला ठेवून सार ग्रहण करणे त्याला सहज शक्य आहे. दोन धर्मांच्या तत्वज्ञानात अंतर असू शकते. धर्माच्या भाषा वेगवेगळ्या असू शकतात; परंतु कोणत्याही धर्माचा हेतू वाईट असू शकत नाही. रजनीश एकदा म्हटले होते, की, इश्क, प्रेम आणि अहिंसा हे एकाच मनोवृत्तीसाठी वापरलेले वेगवेगळे शब्द आहेत. वरवर विचार करणा-याला ते पटत नाही; पण खोलवर विचार केला असता हे पटायला लागते. आपल्या शरीराची ठेवण अलग अलग असू शकते, भाषा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु आपल्या ह्रदयाची ठेवण, रक्ताचा रंग हे मात्र एकच असते. हे आपण पक्के ध्यानात ठेवायला हवे. मनुष्यजन्म दुर्मिळ आहे, त्याचा सदुपयोग करायला हवा.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांच्या मुखावाटे निघणारे शब्द जर अडखळत असतील तर त्या शब्दांमध्ये ठाम विश्वास नसतो किंवा मनातले विचार स्पष्टपणे मांडता येत नाहीत.अशी ज्यांची परिस्थिती झालेली असते तेव्हा एकतर मनातून खचलेला असेल किंवा कुणाच्यातरी दडपणाखाली असेल.अशा परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर पहिल्यांदा आपल्या मनातली जी काही भीती असेल किंवा दडपण असेल ते काढून टाकायला हवे.अशावेळी आपला आत्मविश्वास आपणच वाढवला पाहिजे.माझ्या मनावर कुणाचेही दडपण नाही किंवा जरी असले तरी ते काहीच करु शकत नाही.आपण त्याला खंबीरपणे प्रत्युत्तर देऊ आणि आपण पूवस्थितीत येऊ अशी धारणा मनामध्ये उत्पन्न करुन पूर्वीसारखे जीवन जगू असा विश्वास जागृत करायला हवा तरच मग आपल्या मुखावाटे निघणारे शब्द स्पष्टपणे यायला लागतील आणि आपले जे काही विचार असतील ते समोरच्या व्यक्तीला समजायला लागतील यात काही संशय नाही.जर आपणच घाबरायला लागलो तर समोरची व्यक्तीही आपल्याला जास्तच घाबरून टाकेल आणि आपला जो काही आत्मविश्वास आहे तोही कमी करुन टाकेल.म्हणून परिस्थिती कशीही असो त्या परिस्थितीला घाबरुन न जाता त्याला तोंड द्यायला शिकले पाहिजे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍀🌸🍀🌸🍀🌸🍀🌸🍀•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जीवन**समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली*... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि**"समुद्र चोर आहे".**त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि**"समुद्र पालनकर्ता आहे".**एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते**"समुद्र खुनी आहे".**एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो**"समुद्र दाता है".**अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते**लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो* *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...**भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता**जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment