✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 14/11/2022 वार - सोमवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *बालदिन*💥 ठळक घडामोडी :- १९७१ - मरीनर ९ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत पोचले.१९७५ - स्पेनने पश्चिम सहारातून पळ काढला.💥 जन्म :-१८८९ - जवाहरलाल नेहरू, प्रथम भारतीय पंतप्रधान१९२४ - रोहिणी भाटे, मराठी कथकनर्तिका.१९४२ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.💥 मृत्यू :-१९१४ - वेंगायिल कुन्हीरामन नयनार, मल्याळम लेखक, पत्रकार.१९७७ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, भारतीय तत्त्वज्ञानी.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ई-केवायसी पूर्ण न केल्याने मराठवाड्यातील साडेपाच लाखापेक्षा अधिक शेतकरी 'पंतप्रधान निधीला' मुकणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई विमानतळावर वेगवेगळ्या दोन घटनेत 61 किलो सोनं जप्त करण्यात आलंय. एकाच दिवशी कारवाई करत कस्टम विभागाने 32 कोटी किंमतीचं सोनं जप्त केलं आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *तब्बल २५०हून अधिक लेखक, माजी संमेलन अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी साहित्यिकांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला दर्शवलाय पाठिंबा...*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *देशात धान्याचा तुटवडा भासणार नाही, तांदळाची मोठ्या प्रमाणात खरेदी : केंद्र सरकार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत 617 गोवर संशयित रुग्ण, पालिकेकडून मुंबईत नऊ लाख घरांचे सर्वेक्षण, गोवंडीत केंद्रीय समितीचा आढावा*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचं कोल्हापुरात अपघाती निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *टी20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून केला पराभव*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*भारताचे शिल्पकार आणि जगाचे शांतीदूत - पंडीत जवाहरलाल नेहरू* http://nasayeotikar.blogspot.com/2017/10/blog-post_27.htmlवरील लेख पूर्ण वाचण्यासाठी निळ्या अक्षरावर टिचकी मारा._चित्रांकन :- विनायक काकुळते, नाशिक_लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *रांजणवाडी म्हणजे काय ?* 📙रांजणवाडी होण्याचा अनुभव आपण कधी ना कधी तरी घेतलेला असतोच. 'काहीतरी चोरून खाल्ल्यावर रांजणवाडी होते बरं का !' असंही कोणी आपल्याला गमतीने म्हटलेले असते. रांजणवाडी हा डोळ्यांचा आजार आहे. पापण्यांच्या मुळाशी पू साठायला लागून हा रोग होतो. आपल्या पापण्यांच्या मुळाशी तैलग्रंथी असतात. त्यांना 'झीज' ग्रंथी असे म्हणतात. या ग्रंथीचे तोंड बंद होऊन आता ग्रंथीतील स्राव साठून त्यामध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या ठिकाणी पूर साठावयास लागतो. पापणी लाल, सोडलेली दिसते. डोळ्यांची उघडझाप करताना दुखते. स्पर्शाने वेदना होतात यालाच रांजणवाडी असे आपण म्हणतो.रांजणवाडी पिकल्यावर आपोआप फुटते व पू निघून गेल्यावर पापणी पूर्ण बरी होते.रांजणवाडीची नुसती सुरुवात असल्यास गरम पाण्यात कपडा बुडवून त्याने शिकल्याने रांजणवाडी एक दोन दिवसांत जिरू शकते. जिरली नाही तर तरी पिकण्यासाठी शेकल्याने मदत होते व ती लवकर फुगून फुटते. सुजेच्या सुरुवातीस पू निघण्यासाठी पापणी दाबून प्रयत्न करू नये. त्यामुळे कधी कधी तेथील जंतुसंसर्ग रक्तवाहिन्यांद्वारे मेंदूमध्ये नेला जाऊन मेंदूमध्ये संसर्ग होऊ शकतो. शेकणे या उपायांसोबतच आणखी एक उपाय घरच्या घरी करता येतो. लसणाच्या पाकळीचा रस सकाळ संध्याकाळ दोन दिवस लावला तर रांजणवाडी जिरते. वारंवार रांजणवाडी होणे हे शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याचे लक्षण असू शकते. त्यामुळे असे होणार्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एखादे वेळी त्यांना मधुमेहही झालेला असू शकतो.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातूनमनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••" खोटारडा जेव्हा खर बोलतो, तेव्हा कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही.”*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?२) पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?३) 'बाल दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'चाचा नेहरू' कोणाला म्हटले जाते ?५) भारतात प्रथम बाल दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?*उत्तरे :-* १) पं. जवाहरलाल नेहरू २) बाल दिवस ३) १४ नोव्हेंबर ४) पं. जवाहरलाल नेहरू ५) १९६५*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 सुहास चटने👤 सुभाष चंदने👤 शीतल चौगुले👤 खंडू सोळंखे👤 योगेश पाटील बादलगावकर👤 विनोद पांचाळ👤 मोहन लंगडापुरे👤 भारत शेळके👤 रितेश जाधव👤 निखिल थोरमोठे👤 विजय सदानंद👤 वसंत यशवंतकर*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*रोज सकाळी देवपूजा करून आपल्या कामाला लागणारी अगणित माणसे आपल्या अवतीभवती असतात. आपणही देवपूजा करीत रोजचे एक कर्म उरकत असतो. या सगळ्या क्रियेमध्ये भाव किती ? हा खरा आजचा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी असे म्हटले आहे की,* *भावेविण भक्ती। भक्तिविण मुक्ती।* *बळेविण शक्ती। बोलू नये॥**या सगळ्या मुळाशी भाव ही गोष्ट मोलाची आहे. ती नसेल तर देवपूजा ही फक्त रोजच्या अनेकविध घटनांपैकी एक होऊन राहते. मन जर विकारांनी भरलेले असेल, तर तिथे भावशक्ती बळ धरू शकत नाही.**संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास अथवा अलिकडचे संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज या सर्वांनाच समाजाने तत्कालीन कालखंडात जी वागणूक दिली ती बहुतांश नकारात्मकच होती, असे आपल्या लक्षात येईल. पण तरीही कोणत्याही परिस्थितीत या सर्वांनी आपल्या मनातला देवाबद्दलचा स्थायीभाव ढळू दिला नाही. आपल्या मनात असलेले कार्य भावनांच्या बळावर ते करीत राहिले, त्यामुळे ते संतत्वाला पोहचले. हे संतत्व आपल्याला आयुष्यात कळले पाहिजे. ते एकदा कळले, की समस्याग्रस्त आयुष्यही सुलभ वाटू लागते. हे सगळे वाटणे आयुष्यात उतरण्यासाठी आपली पहिली पायरी आपल्या हातुन रोज होणा-या 'देवपूजे'ची आहे. ती देवपूजा आपण मनोभावे करू या..!* ••●🌼‼ *रामकृष्णहरी* ‼🌼●•• 🌼🌼🌼🌼🌼🌼 *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई* 📱 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद.9421839590/ 8087917063.🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कोळ्याने राजाला धडा शिकवला*एकदा दोन राज्यात युद्ध झाल. त्यात एका राजाचा पराभव झाला .पराभुत राजा शोध घेत होता .त्यांनी त्या राजाला ठार मारायचे होते, म्हणून तो राजा जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाला .आणि एका गुहेत जाऊन लपला. तो खूप दुःखी झाला होता. त्याच्या धीर खचला होता. एके दिवशी राजा गुहेत स्वस्थपणे पहुडला होता. भिंतीवरी सरपटणारा एका लहानशा कोळ्याने त्याचे लक्ष वेधले. तो सरपटत भिंतीवर चढायचा. असे बऱ्याचदा घडले. पण कोळ्याने आपला प्रयत्न सोडला नाही राजाने विचार केला. हा सरपटणारा छोटा प्राणीसुद्धा आपले प्रयत्न सोडत नाही. मी तर राजा आहे. मग मी माझा प्रयत्न का बरे सोडले? मला पुन्हा प्रयत्न केलाच पाहिजे. त्याने शत्रु बरोबर पुन्हा युद्ध करण्याचा निश्चय केला. राजा जंगलातून बाहेर पडला आणि आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना भेटला. त्यांनी आपल्या राज्यातील शूर माणसे एकत्र केली. सर्व शक्तीनिशी त्यांनी आपल्या शत्रु बरोबर युद्ध केले. अखेरीस त्यांनी लढाई जिंकली. त्याला त्याचे राज्य परत मिळाले. एका कोळ्याने आपल्याला धङा शिकविले,हेत्याच्या कायम लक्षात राहिला.*तात्पर्यः जो अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करतो, त्यालाच यश मिळते.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment