✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 16/11/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक सहनशीलता दिवस* *राष्ट्रीय पत्रकार दिवस*💥 ठळक घडामोडी :- ● २०१३- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची क्रिकेट मधून निवृत्ती .💥 जन्म :-● १९६३-मिनाक्षी शेषाद्री,अभिनेत्री● १९७३-पुलेंल्ला गोपीचंद,बॅडमिंटनपटू● १९२२ - जीन ऍमडाल, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.● १९४० - क्रिस बाल्डरस्टोन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.● १९७१ - वकार युनिस, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-● १२७२ - हेन्री तिसरा, इंग्लंडचा राजा.● २००६ - मिल्टन फ्रीडमन, अमेरिकन अर्थतज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जी -20 संमलेनच्या व्यासपीठावर पंतप्रधान मोदी, जगभरातील 10 नेत्यांची भेट घेणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अशोक चव्हाणांसह महाराष्ट्रातील चौघांचा समावेश*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून ही पदभरती जिल्हा निवड मंडळ तसेच जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे निकटवर्तीय गणेश गुप्ता आणि त्यांच्या पत्नी आभा गुप्ता यांच्या संबंधित जवळपास 30 ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *गोवर संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे बीएमसीला निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *शेतात राबणाऱ्या मराठमोळ्या अविनाश साबळेच्या कष्टांना यश, राष्ट्रीय अर्जुन पुरस्कराने होणार सन्मान*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, निवडणूक आयोगाविरुद्धची याचिका फेटाळली, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*चांगला माणूस ....*पूर्ण लेख खलील लिंक वर वाचता येईलhttp://nasayeotikar.blogspot.com/2021/05/good-man.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *'निऑन साइन्स' म्हणजे काय ?* 📙निआॅन म्हणजे नवीन. हा मूळ ग्रीक शब्द आहे. निआॅन, अरगॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे अगदी विरळ अवस्थेत असलेले वायु सुमारे १८९४ ते १९०० सालांदरम्यान ज्ञात होत गेले. यातील निआॅनचा वापर सर्वप्रथम केला जाऊन लाल रंगाची चमकदार निऑन चिन्हे वा निऑनसाइन्स बनवली गेली. निर्वात काचेच्या पोकळीत निऑन वायू कमी दाबाने भरला जाऊन त्यातुन विद्युतभार पाठवला असता हा वायू चमकदार लाल प्रकाश बाहेर टाकतो. या प्रकाराचा वापर केला जाऊन अत्यंत आकर्षक निआॅन चिन्हांचा वापर जगभर सुरू झाला. नंतर हे अन्य वायू वापरले असता इतर काही रंगांचा प्रकाश मिळू शकतो. हेही लक्षात आले. पण या प्रकारच्या चिन्हांचे नाव मात्र तेच कायम राहिले. या सर्व प्रकारच्या चिन्हांना निआॅन साइन्स म्हणूनच ओळखतात.निअाॅन साइन्सचा प्रकाश हा धुक्यातुनही लक्षात येतो. या गुणामुळे त्याचा फार मोठा व्यावहारिक उपयोग विमानतळावरील दिव्यांसाठी केला जातो. विमानांना मार्गदर्शक म्हणून हे दिवे वापरले जातात. धुक्यामध्ये विमाने हरवण्याचा धोका त्यामुळे टळतो.या विविध वायूंचे मिश्रण अनेक प्रकारे वापरले जाते. क्रिप्टॉन व अरगाॅनचे मिश्रण वापरले असता हिरवट पिवळा प्रकाश मिळतो. प्रकाशमान उजेडासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक फ्लुअोरेसंट दिव्यांत हे मिश्रण वापरतात. मात्र हल्ली डिस्प्लेबोर्डसाठी एलईडीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. या सर्व वायूंना ना वास, ना रंग, ना चन. यांना काही जण 'नोबेल गॅसेस' असेही म्हणतात. यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वायू रेणूस्वरूपातच वातावरणात आढळतो. मोजक्याच वायूंबरोबर यांची संयुगे बनू शकतात. अन्य अनेक मुलद्रव्यांशी यांचा संयोग होऊ शकत नाही. यामुळे एखाद्या रासायनिकदृष्ट्या अस्थिर वस्तूभोवती अन्य कशाचा संबंध टाळण्यासाठी यांचे आच्छादन घालण्याची पद्धत वापरली जाते. या आच्छादनाखाली (ब्लॅंकेट) मूळ पदार्थ पाहिजे तसा जतनही करता येतो.अरगाॅन व नायट्रोजनचे मिश्रण विजेच्या दिव्यांमध्ये वापरले जाते. यामुळे दिव्यांचे आयुष्य वाढते. झेनाॅनचा वापर मुख्यतः फोटो काढायला वापरल्या जाणाऱ्या फ्लॅशबल्बमध्ये केला जातो. दूरवर प्रकाश टाकणाऱ्या झोतांसाठी (सर्चलाईट) झेनाॅनचा वापर केला जातो. काही संशोधनांमध्ये अणुसमुच्चय निरीक्षणातही झेनाॅनचा वापर करतात.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी ही वाया घालवू नये "**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कोणाची एकमताने निवड झाली ? २) 'आदिवासी बिरसा' किंवा 'धरती बाबा' असे कोणाला ओळखले जाते ?३) कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटले जाते ?४) २०२२ चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?५) टी - २० विश्वचषक २०२२ चा विजेता संघ/देश कोणता ?*उत्तरे :-* १) माजी न्या. नरेंद्र चपळगावकर २) बिरसा मुंडा ३) नारायण मेघाजी लोखंडे ४) अचंता शरथ कमल ५) इंग्लंड *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••👤 संतोष पेटेकर, धर्माबाद👤 छोटू पाटील बाभळीकर👤 मोहन कानगुलवार👤 सदानंद बदलवाड👤 महेश देबडवार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*प्रतिकूल परिस्थितीत सहाय्य करणारी माणसं ते निरपेक्ष करत नाहीत. आपण सतत त्यांच्या ताटाखालचं मांजर राहावं, अशी त्यांची धारणा असते. आजन्म लीन राहिलो की, अशी माणसं खुश असतात. पैसा, साधनसंपत्तीच्या जोरावर व्यक्तिगत प्रतिष्ठा जोपासण्याचा उद्योग अत्यंत चिड आणणारा आहे. 'शिक्षकदिनी' संस्थेतर्फे शिपायापासून प्राचार्यापर्यंत त्यांच्याप्रती आदर म्हणून एक छापील प्रमाणपत्र व फूल देऊन अध्यक्षांच्या हस्ते सत्काराचा कार्यक्रम पाहिला. सत्कार स्विकारल्या नंतर शिपाई ते प्राचार्य सर्वजण अध्यक्षांच्या नतमस्तक झाले. मूळ कार्यक्रमच मुळी सर्वांना वार्षिक दीन करण्याचा होता.**समाजव्यवस्थाच अशी बनून गेली आहे की, नोकरदारांना खिंडीत गाठून लीन, दीन, मलीन, अधीन करत ठेवायचे. त्याचं रूपांतर पाठीचा कणा नसलेला संप्रदाय आकाराला येऊ लागला आहे. त्यांना मन, मत, मनगट असून नसल्यासारखे आहे. 'खाल मान्या, हो नाम्या' असं जीणं त्यांनी आयुष्यभर जगायचं. काही कर्तृत्व नसताना संस्थापकांचा मुलगा, नातु, सून, मुलगी अध्यक्ष बनत राहतात, तर शिपाई, लिपीक, प्राध्यापक, प्राचार्य रोज कणाकणाने 'एक दर्जे का नीचे का इन्सान' बनत अस्तित्वशून्य होताहेत.**"समाज घडविणारे घटक अस्तित्वशून्य होणं, समाजाचा बुद्धिजीवी वर्ग मतिहीन करणे, त्यांना मतहीन बनवणे यासारखे सामाजिक अध:पतन दुसरे कोणते असू शकते ?"* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जीवनात आपण केलेल्या कर्माला विशेष असे स्थान आहे.आपण आपल्या चांगल्या कर्माने यशाकडे जातो आणि चांगले कर्म केल्यामुळे आपल्या मनाला समाधान वाटते तसेच तुमच्या चांगल्या केलेल्या कार्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात अर्थात तुमचा चाहता वर्ग अधिक वाढतो.त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे निर्माण होते आणि तुमचे अनुकरण करायला लागतील.हे केवळ तुम्ही करत असलेल्या चांगल्या कर्मामुळेच.जर तुमचेच कर्म चांगले नसतील तर तुम्ही तुमच्या जीवनात अपयशी ठरताल.एवढेच नाही तर तुमच्या प्रत्येक गोष्टीत अपमानही सहन करावा लागेल.लोक तुमच्यापासून दूर पळायला लागतील आणि तुम्ही एकाकीपणे नैराश्यमय जीवन जगायला लागाल.मग तुम्ही या मनुष्य जन्माला येऊन कोणतेही ध्येय साध्य होणार नाही. मग असे जीवन जगण्यात तरी काय अर्थ आहे असे नकारात्मक जीवन जगणे जणू यम यातनाच नाहीत का ?यापेक्षा चांगले कर्म करुन जीवनाला एक नवा अर्थ निर्माण करावे आणि स्वाभिमानाने जीवन जगावे.© व्यंकटेश काटकर, नांदेड.संवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *उपयुक्त जीवन*कोणे एके काळी एक राजा होता. त्याला असे वाटत असे, जगात फक्त मनुष्य हाच उपयुक्त प्राणी आहे. बाकीचे जीव जंतू, किडे यांचा जगाला काही उपयोग नाही. हे सिद्ध करण्यासाठी त्याने आदेश दिला कि, कोणकोणते जीव-जंतू, किडे हे निरुपयोगी आहेत? याची यादी करा आणि मला सांगा. खूप काळ शोध घेतल्यावर त्याच्या माणसांनी असे संशोधन केले कि या जगात जंगली माशी आणि कोळी (जाळे विणणारा कीटक, spider) हे फारशे उपयोगी नाहीत. त्यांचा जगाला काही उपयोग नाही. राजाने तत्काळ आदेश दिला कि या दोन किड्यांना आपल्या राज्यातून नामशेष करावे. याच दरम्यान त्या राज्यावर दुसऱ्या राजाने आक्रमण केले. त्यात या राजाचा पराभव झाला, जीव वाचविण्यासाठी त्याला राज्य सोडून पलायन करावे लागले. राजा पळाला आणि जंगलात गेला. दुसऱ्या राजाचे सैनिक त्याचा पाठलाग करतच होते. त्यांना चुकवून राजा कसातरी एका झाडाखाली झोपला. खूप श्रमामुळे त्याला गाढ निद्रा आली. काही काळाने त्याला नाकावर काही तरी चावत असल्याची जाणीव झाली, पाहतो तर काय एक जंगली माशी त्याच्या नाकाला चावली होती. झोपमोड तर झाली आणि त्याचबरोबर त्याला शत्रूच्या सैनिकांची चाहूल लागली, राजा पुन्हा पळाला आणि उघड्यावर झोपल्यास सापडण्याची भीती वाटल्याने त्याने एका गुहेचा आधार घेतला. राजा गुहेत गेला व काही तासातच गुहेच्या दारावर कोळ्यांनी जाळे विणले, शत्रूचे सैनिक तेथेही आले. त्यांनी त्या गुहेकडे पाहिले व एकमेकात चर्चा केली कि ज्याअर्थी येथे कोळ्याने जाळे विणले आहे त्याअर्थी आतमध्ये कोणीही नसणार, कारण कोळ्याचे जाळे तोडून कोणी आत जावू शकत नाही. गुहेत बसून राजा त्यांचे बोलणे ऐकत होता आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला कि जंगली माशी चावली नसती तर जंगलात सैनिकांच्या हाती तो सहज सापडला असता किंवा कोळ्याने जाळे विणले नसते तर गुहेत येवून सैनिकांनी त्याला मारून टाकले असते म्हणजेच या जगात कोणताही जीवजंतू असा नाही कि ज्याचा उपयोग नाही. प्रत्येकाचे कार्य निराळे आहे.*तात्पर्य-जगात प्रत्येक जीवाचा काही न काही उपयोग आहे. कोणीच निरुपयोगी नाही. त्यामुळे कोणी कुणाला किंवा स्वताला कमी समजू नये.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment