✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 10/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆१९९९-औषधांच्या दुकानांवर विकल्या जाणाऱ्या औषधात प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.◆१९८८ - दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.◆ १९९० - मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.💥 जन्म :-◆ १८९४- व्ही.व्ही. गिरी भारताचे चौथे राष्ट्रपती◆१८६० - पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.◆१९६०-देवांग मेहता,भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व.💥 मृत्यू :-◆१९४२-हुतात्मा शिरीषकुमार.◆ १९४५ - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.◆१९७६ - बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण, शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 मंत्र्यांचा शपथविधी, राज्यभरात फटाके फोडून जल्लोष*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *बिहारमध्ये राजकीय भूकंप, नितीश कुमारांचा भाजपला धक्का देत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, जेडीयू एनडीएमधून बाहेर*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *भारतात जुलै महिन्यात 59 हजार 586 ट्रॅक्टरची विक्री, उत्तरप्रदेश व राजस्थान नंतर महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व क्रांती दिनानिमित्त तब्बल 18 हजार विद्यार्थ्यांसह पालकांकडून सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मराठी चित्रपटसृष्टीमधील तारा निखळला; 'मोरूची मावशी' फेम अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये शिक्षक संघटनेकडून विभागीय आयुक्त कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यात आला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *CWG 2022 : भारताला अथलेटिक्समध्ये अच्छे दिन, कॉमनवेल्थमध्ये 8 पदकं जिंकत रचले अनेक रेकॉर्ड*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Sea Animals समुद्री जीव ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/8xLWx9D-JVA~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *कमवा आणि शिका* सुमारे 60-70 दशकातील शिक्षणाचा विचार केला तर लक्षात येते की गावोगावी प्राथमिक शिक्षणाची देखील सोय नव्हती. उच्च शिक्षण घेणे तर दुरची गोष्ट. ज्याला शिक्षणाची गोडी लागली किंवा महत्त्व कळले असेल ते घरापासून कोसो दूर असलेल्या शाळेत घरदार सोडून शिक्षण घेतले त्यांचे जीवन खरोखरच सफल झाले. त्या काळातील शिक्षण पध्दतीचा विचार केल्यास आज ही अंगावर शहारे येतात.........पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर clik करावे.https://nasayeotikar.blogspot.com/2017/06/blog-post_86.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *अमीबा म्हणजे काय ?* 📙साऱ्या जगात किमान दहा लाख प्रकारचे प्राणी सापडतात. पण प्राणीशास्त्राबद्दल चर्चा सुरू झाली किंवा अभ्यास करायचे ठरवले की सर्वप्रथम नाव निघते ते अमीबाचेच. एकपेशीय प्राणी हे त्याचे वैशिष्ट्य.१६६५ साली रॉबर्ट हुक या इंग्लिश निसर्गप्रेमी शास्त्रज्ञाने पेशी (Cell) हा शब्द प्रथम वापरला. बुचाच्या अभ्यासामध्ये त्याला आढळलेल्या पेशींचे वर्णन त्याने त्यावेळी करून ठेवले आहे. त्यानंतर मायक्रोस्कोपखाली सर्वच गोष्टी न्याहाळल्या जाऊ लागल्या. स्वतंत्रपणे जगू शकणारा. पुनरुत्पादनाची क्रिया स्वतंत्रपणेच करणारा एकपेशीय असा हा अमीबा त्यानंतर प्रसिद्ध पावला. अमीबा दिसण्यासाठी मायक्रोस्कोपची तशी गरज नसते. काही प्रकारचे अमीबा अर्धा मिलिमीटरएवढे मोठे असतात. ते नुसत्या डोळ्यांनीही पाण्याच्या थेंबात दिसतात. साधे भिंग वापरले, तर त्यांची हालचालही न्याहाळता येऊ शकते. काही जाती मात्र अगदी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहाव्या लागतात. जेलीचा एखादा गोळा कसा असावा, तसा हा प्राणी सतत स्वतःचा आकार पालटत हालचाल करत असतो. भक्षाच्या शोधात भटकंती करताना अंगाची वेटोळी लांबुडकी पसरत हा भक्षाच्या दिशेने सरकतो. भक्ष्य आवाक्यात आले की त्याला चहूबाजूंनी प्रथम तो गुरफटून टाकतो. अर्थातच याचे भक्ष्य म्हणजे त्याच्या जीवाच्या आकारास साजेसेच असते. छोटे जीवाणू, प्राणिज व वनस्पती शैवाळ सतत गट्टम करत जाणे हा त्याचा नित्यक्रम.भक्ष्य गुरफटून मग पेशीतील पेशीद्रव्यामध्ये विरघळवण्याची क्रिया सुरू होते. यावर नियंत्रण असते पेशीकेंद्राचे. गरजेप्रमाणे पाणीपण शोषले जात असतेच. पचन पूर्ण झाल्यावर नको असलेला भाग व तत्सम द्रव्ये बाहेर टाकली जातात.साध्या पेशीविभाजन पद्धतीने यांची वाढ होत असल्याने यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असते. पाणी, मग ते कसलेही असो, अमीबाचा वावर तेथे आढळणारच. त्यातल्या त्यात साचलेले पाणी, डबकी, चिखल यांमध्ये यांची वाढ चांगली होते. वाहत्या पाण्यात त्या मानाने अमीबा कमी सापडतात. अमीबा या प्राण्याबद्दल माणसाला सतत जागरूक राहावे लागते. पिण्याच्या पाण्यातून माणसाच्या शरीरात अमीबाचा एकदा का प्रवेश झाला की त्याच्या शरीरात सर्वत्र संचार सुरू होतो. वाढही छान होते. सर्व पचनसंस्था पोखरून काढण्याची ताकद या एकपेशीय प्राण्यात आहे.पोटाचे विविध आजार, पोटदुखी, मोठ्या आतड्याचे आजार, यकृताची गंभीर दुखणी या अगदी लहान प्राण्यामुळे होतात. जेमतेम ३० वर्षांपूर्वी या दुखण्यांसाठी फारसे खात्रीचे उपायही नव्हते. आजकाल मात्र यांवर खात्रीची औषध उपलब्ध आहेत. जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळ असलेला हा अमीबा भारतीय हवामानात सर्व प्रांतांत त्याचे राज्य पसरून आहे.*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?२) 'जीवनशिक्षण' हे मासिक कोणत्या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते ?३) राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतो ?४) अमरवेल ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडते ?५) पृथ्वीचा परिवलन कालावधी किती तास असतो ?*उत्तरे :-* १) मा. जगदीप धनखड २) विद्या प्राधिकरण ३) उपराष्ट्रपती ४) परजीवी वनस्पती ५) २४ तास*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● हेमंत पापळे, अकोला● गणेश मोहिते● राहुल मगरे● रामदास देशमुख● तुकाराम यनगंदलवार● अशोक मगरे● व्यंकटेश पुलकंठवार● माधव परसुरे● अविनाश गायकवाड ● सचिन सुरबुलवाड● दिगंबर भीमराव सावंत● गोविंदराव शिवशेट्टे● संतोष येवतीकर● डॉ. चंद्रकांत पांचाळ● नागराज आहिरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*निराशावादी लोक टोकाचा नकारात्मक विचार करतात. छोट्या संकटाला आकाश कोसळले समजले जाणारे भित्र्या सशासारखे असतात. झाडाचं पान पडलं तरी आकाश कोसळल्याच्या भ्रमाने जीव मुठीत घेऊन पळतात. हताश, निराश, उदास माणसं स्वत: निष्क्रिय होतात व दुस-याला काळजीच्या दरीत लोटत राहतात. अशांना सहानुभूती देण्यापेक्षा धैर्य देणं महत्वाचं. उलटपक्षी वस्तुनिष्ठ माणसं ! 'जीवन त्यांना कळले हो' पठडीतील असतात. ती आशेने हुरळत नाहीत नि निराशेने हताश होत नाहीत. ती व्यक्तिगत भावभावनांच्या कल्लोळात स्वत:स ना विसर्जित करतात, ना हारतात. 'अत दीप भव' म्हणत ती स्वत: अंधा-या वाटेवर पणतीच्या उजेडात चालतात. त्यांच्या हातातल्या मेणबत्तीची मशाल कधी झाली हे त्यांचे त्यांनाही कळत नाही.**अशी माणसं सतत अंतर्मुख होऊन सिंहावलोकन करत विहंगमावलोकनाने नवी स्वप्न कवटाळत ती सत्यात उतरवत राहतात. ते पूर्वग्रहदूषित असत नाहीत नि दुस-यावर विसंबतही नाहीत. वास्तवाचं भान हा त्यांच्या जगण्याचा आधार असतो. भावनेपेक्षा तर्कावर जगणारी ही माणसं खाली जमीन न वर आकाशाचं भान ठेवून जीवन घडवतात. 'मी' आणि 'तू' याच्या पलिकडे आपण असा सामूहिक सद्-भाव व सभ्यता जोपासणारी ही तटस्थ माणसं. त्यांच्या वेदना नि संवेदना दोन्ही क्षितिजे विश्वव्यापी. अशा माणसांना मग दगडातल्या देवापेक्षा माणसातली माणुसकी महत्वाची वाटते. 'जे जे आपणांसी ठावे, ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करूनि सोडावे सकलजन' असा त्यांचा सार्वजनिक सत्यधर्म असतो.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌸🌼🌸🌼🌸🌼🌸🌼🌸 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*✍🏻 लेखणी ✒️* (मराठी कविता) असता सखे तु सोबतीलानकोच वाटते कुणी.. तूझ्यातुन बहरता शब्द प्रेमाचेअन ती मधुर वाणी.. तुझ्या सहवासा गुंतल्यावर अबोलही बोलायला लागतात.. निशब्द जरी बोलणे त्यांचे तुलाच तर कळायला लागतात.. तू असताना सोबतीलामी स्वतःच हरवून जाते.. कदाचित हेच प्रेम असावंअन मी तुझ्यात रंगून जाते.. प्रेम करायला शिकविले तू अन जगण्यास शिकवले.. खचताना मला सखे तू पुन्हा उगण्यास शिकवले..क्रांतीचे शस्त्र तूअन रूपाने देखणी.. वास्तवाचे चित्र तूअन प्रिय माझी लेखणी.. *_कु प्रतिक्षा गजानन मांडवकर_🌹*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जी एक गोष्ट तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते आणि तीच गोष्ट तुमच्या जीवनात मागे खेचण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.ती म्हणजे तुमचे मन.जर तुमचे मन सतत चिंतनशील, प्रयत्नशील, कृतीशील आणि येणाऱ्या प्रत्येक वेळेला तुम्हाला धैर्य देऊन पुढे जाण्यासाठी प्रयत्न करते तसेच तुमच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करुन चांगले जीवन जगण्याची प्रेरणा देते त्या मनाची सकारात्मक बाजू बळकट करणे ही एक तुमच्या जीवनातल्या जमेची गोष्ट आहे.ही ऊर्जा जोपर्यंत तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच मागे खेचनार नाही.जर का तुमची काहीच काम करण्याची इच्छा होत नाही,काम करण्याची इच्छा असूनही तुम्हाला करावेसे वाटत नाही,आजचे काम उद्याला करु,आज नाही केले तर काय बिघडले अशी जेव्हा तुमच्या नकारात्मकतेची उर्जा तुमच्या जीवनात बळावते तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाला एका अधोगतीकडे घेऊन जात आहात हे सिद्ध होते.अशी जेव्हा तुमच्या जीवनात एकाच मनातल्या दोन बाजू जेव्हा तुमच्या जीवनात घालमेल करुन तुमची मानसिकता बदलून टाकतात अशावेळी आपण काही वेळ शांत रहावे आणि आपल्या हातून काही अनुचित घटना होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.आपल्या जीवनाला कोणते मन चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाणार आहे त्याचा विचार करावा.मग आपल्या जीवनाचे जेथे कल्याण होईल त्या चांगल्या सशक्त मनाच्या गोष्टींचा जरुर विचार करावा आणि जीवन समृद्ध करावे.एखादी गोष्ट जरी नकारात्मक विचार करत असेल तर तुमच्या चांगल्या विचारांमुळे ती टिकून शकत नाही आणि मग तुम्ही सातत्याने चांगल्याच गोष्टींचा विचार जीवनात अमलात आणाल हे खात्रीने तुम्ही सांगू शकताल यात शंकाच नाही.© व्यंकटेश काटकर,नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🌱🌸🌱🌸🌱🌸🌱🌸•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *लहानसे घर*सुप्रसिद्ध तत्ववेत्ता सॉक्रेटीस याने आपल्यासाठी एक अतिशय लहान घर बांधले.त्या घराचा तो लहान आकार पाहून त्याच्या एका ओळखीच्या माणसाने त्याला विचारले, "काय हो सॉक्रेटीस ? तुमचा मित्रपरिवार तर बराच मोठा आहे; मग तुम्ही एवढं छोटंसं का बांधलत ?'सॉक्रेटीस म्हणाला, 'बाबा रे ! माझे मित्र दिसायला बरेच असले, तरी प्रत्यक्षात ज्यांना सच्चे मित्र म्हणता येतील असे मित्र मला फारच थोडे आहेत. मी मोठं घर बांधलं असतं तर काय झालं असतं ? माझे सगळे सच्चे मित्र जरी एकाच वेळी घरात आले असते, तरी ते बरंचसं रिकामं राहिलं असतं. मग तूच मला विचारलं असतंस, 'हे काय ? तुमचे एवढेच मित्र ? सगळे मित्र येऊनही, तुमचं घर रिकामंच राहिलेलं दिसतयं !''पण आता मी घर एकदम लहान बांधल्यामुळं, त्या माझ्या थोडया मित्रांच्या येण्यानंही माझं घर पूर्णपणे भरुन जाईल, आणि तसं ते भरलेलं पाहून, तू मला म्हणशील, 'अरे वा !तुमचे मित्र बरेच आहेत की हो, तुमचं घर कसं अगदी भरुन गेलंय !' आणि बर घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठ असाव हे ही तितकेच खरयं.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment