✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 03/08/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇. *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••◆ *क्रांतिसिंह नाना पाटील जयंती*💥 ठळक घडामोडी :-■२००४-राज्यपाल महमंद फजल यांच्या हस्ते सोलापूर विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन झाले.■ १९६० - नायजरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.■ १९७५ - बोईंग ७०७ प्रकारचे खाजगी विमान मोरोक्कोच्या अगादिर शहराजवळ कोसळले. १८८ ठार. ■ १९४८-भारतीय अणू ऊर्जा आयोगाची स्थापना झाली.(Indian Atomic Energy Commission)💥 *जन्म* :-●१९००-क्रांतिसिंह नाना पाटील,स्वातंत्र्य सैनिक ,समाजसुधारक.● १९३९ - अपूर्व सेनगुप्ता, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९५६ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.● १९५७ - मणी शंकर, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.● १९६० - गोपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू. 💥 *मृत्यू* :-◆ १९९३ - स्वामी चिन्मयानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.◆ २००७ - सरोजिनी वैद्य, मराठी लेखिका, समीक्षिका.◆ १९५७-देवदास गांधी,पत्रकार,हिंदुस्थान टाईम्स चे संस्थापक,महात्मा गांधींचे पुत्र.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शिंदे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुख्यमंत्री पदावर विराजमान असणारे आणि जेजुरीला भेट देणारे एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *औरंगाबाद महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अभिजीत चौधरींनी पदभार स्वीकारला*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *नागपूर : जिल्ह्यातल्या प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचे नाव आलेच पाहिजे. यासाठी मतपरिवर्तन करून प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांचा दृष्टीकोण बदलण्यासाठी पुढाकार घ्या. लोकांमध्ये जनजागृती करा, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *वसई पूर्वेतील रहिवाशी असलेल्या आलिया पवार यांनी गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी सुरु केली आहे. दोन सत्रांत झोपडपट्टीतील सुमारे 30 ते 40 मुलांना त्या मोफत शिकवणी देत आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारताने पाचव्या दिवशी भारताने दोन सुवर्णपदक खिशात घातली असून दोन रौप्य पदकंही जिंकली आहेत. एकूण 13 पदकं जिंकली आहेत.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *आशिया चषक 2022 चं वेळापत्रक जाहीर, 27 ऑगस्टला सुरुवात, तर 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना, बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली*•••••••••••••••••••••••••••••••••••••8️⃣ *भारताने वेस्ट इंडीजवर मिळवलेल्या या विजयाने भारताने मालिकेत 2-1 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात भारताचा सूर्यकुमार यादव सामनावीर ठरला.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Birds Name👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/EmGAyBlKj0Q~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सर सलामत तो ......* हिंदीत एक म्हण आहे सर सलामत तो पगडी पचास, त्यानुसार गाडी चालवताना आपल्या डोक्यावर हेल्मेट असेल तर यदाकदाचित अपघात झालाच तर डोक्याला मार लागत नाही. उपचाराच्या खर्चापेक्षा काळजीसाठी लागणारा खर्च खूप कमी असतो. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोकं. कारण त्या डोक्यात मेंदू सुरक्षित असतो........ पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे....https://nasayeotikar.blogspot.com/2019/02/blog-post_24.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *आपल्या शरीरात एकूण किती जनुकं आहेत ?* 📙आपल्या यच्चयावत अनुवांशिक गुणधर्मांचा आराखडा डीएनए या रसायनाच्या रेणूंमध्ये सांकेतिक रूपात साठवलेला असतो. शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या केंद्रात असलेल्या डीएनएमध्ये ही माहिती साठवलेली असते. या डीएनएची रचना दुहेरी गोफासारखी किंवा गोल गोल जिन्यांसारखी असते. या जिन्याच्या पायऱ्या समोरासमोरच्या कठड्यांना जोडलेल्या नायट्रोजनयुक्त घटक रेणूंच्या बनलेल्या असतात. प्रत्येक पायरी ही समोरासमोरच्या दोन रेणूंच्या जोडगोळीची बनलेली असते. या घटक रेणूंच्या अनुक्रमाक अनुवांशिक गुणधर्मांची माहिती साठवलेली असते. या माहितीचा एकक म्हणजे एक जनुक.आपल्या शरीरातल्या डीएनएमध्ये एकूण तीन अब्ज पायऱ्या म्हणजेच नायट्रोजनयुक्त घटक असतात. तीन पायऱ्या मिळून जो एक कोडाॅन होतो तो प्रथिनांच्या साखळीतील एका घटकाविषयीचा आराखडा सांकेतिक रूपात आपल्यात दडवून ठेवतो. याचा अर्थ झाला की असे किमान एक अब्ज कोडाॅनं आपल्या शरीरात असतात. जनुकं अशा काही कोडाॅनची बनलेली असतात. काही जनुकं थोड्याच कोडाॅनची असतात, तर काहींची लांबी त्याच्या कितीतरी पट असते. त्यामुळे शरीरात एकूण नक्की किती कोडाॅन आहेत याची माहिती नव्हती; पण एकूण कोडाॅनच्या संख्येवरून किमान एक लाख तरी जनुकं शरीरात असावीत, असा अंदाज केला गेला होता. मानवाच्या यच्चयावत जनुकसंचयाचं वाचन करण्याचा 'ह्युमन जीनोम' हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यापूर्वी मूषक वगैरेसारख्या काही प्राण्यांच्या जीनोमचं वाचन करण्यात आलं होतं. त्यातून त्या प्राण्यांच्या शरीरातल्या एकूण जनुकांच्या संख्येची माहिती मिळाली होती. त्यावरूनही हा अंदाज योग्य वाटत होता.पण प्रत्यक्षात जेव्हा मानवी जनुकसंचयाचं वाचन सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे झुकू लागलं तसा वैज्ञानिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ही संख्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचं दिसून आलं. आजमितीला अशी चाळीस हजार जनुक असावीत असं या प्रकल्पात सहभागी झालेल्या बहुतेक वैज्ञानिकांचे मत आहे. ते सर्व मान्य आहे असं नाही. कारण ऐकून डीएनएपैकी कितीतरी भाग कोणत्याच प्रथिनाच्या उत्पादनात सहभागी नसल्याचं दिसून आलं आहे. याला जंक डीएनए किंवा इन्ट्राॅन असं म्हणतात. प्रथिनांच्या उत्पादनात सहभागी असलेल्या डीएनएला एक्झॉन असे म्हणतात. या दोन्हींची एकमेकांमध्ये गुंफण झालेली आहे. म्हणजे दोन एक्झॉनच्यामध्ये काही इन्ट्राॅन आहेत. तसंच एका जनुकामध्ये एकाहून अधिक एक्झॉन असतात आणि ते काही इन्ट्राॅनमुळे एकमेकांपासून अलग झालेले असतात, हेही दिसून आलं आहे. म्हणूनच काही वैज्ञानिक या ४० हजारांच्या आकड्याला मान्यता द्यायला तयार नाहीत. त्यांच्या मते खरी संख्या त्याहून कितीतरी अधिक असावी; आणि ७० ते ८० हजार जनुकं शरीरात असावीत, असा त्यांचा दावा आहे. जसजशी हय़ुमन जिनोमची अधिक तपशीलवार माहिती हाती येत आहे तसतसा यापैकी कोणता दावा खरा आहे यावर अधिक प्रकाश पडणार आहे.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात."**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) भारताचे पहिले दलित राष्ट्रपती कोण होते ?२) बुद्धिबळ खेळाचा विश्वचषक समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा पहिल्यांदाच कोणत्या देशात सुरू आहे ?३) 'रानपिंगळा सरंक्षण दिन' केव्हा साजरा केला जातो ?४) कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?५) लवंग हा मसाल्याचा पदार्थ झाडाच्या कोणत्या भागातून मिळतो ?*उत्तरे :-* १) के. आर. नारायणन २) भारत ( १८८ देश, १७०० खेळाडू ) ३) २४ ऑक्टोबर ४) कार्बन, हायड्रोजन, प्राणवायू ५) फुलांपासून *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● अजय बिरारी● पोतन्ना चिंचलोड, येवती● प्रदीप कार्ले● उत्तमराव नरवाडे● भवरसिंग*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*काहीही विपरीत घडले की त्याबद्दल इतरांना जबाबदार धरण्याची एक सार्वत्रिक प्रवृत्ती असते. आपली चूक कबूल करण्याऐवजी त्याला इतर लोक कसे दोषी आहेत, हेच बहुतेक जण सांगत असतात. चूक कबूल करण्यात बहुतेकांना कमीपणा वाटतो. त्यामुळे आपले चूक असले, तरी ते योग्य आहे असाच हेका अनेकजण लावतात. सार्वजनिक पातळीवर तर हे चित्र आणखी गडद होते आणि समाजातील सर्वच वाईट गोष्टींसाठी शासन यंत्रणेला दोषी ठरविले जाते. जनकल्याणाचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा असतात आणि बहुतेकदा अपेक्षाभंग होतो.**देश आपल्यासाठी काय करणार यापेक्षा आपण देशासाठी काय करणार असे जाॅन. एफ. केनेडी यांनी म्हटले होते. 'मी साधा माणूस, मी काय करणार' असे उत्तर प्रत्येक जण देऊ शकतो. मात्र साधा माणूस खूप काही करू शकतो. सार्वत्रिक नियमांचे पालन करणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, अफवा न पसरविणे अशा अनेक गोष्टी आपण करू शकतो. चांगला नागरिक बनण्याची सुरूवात घरापासून होते. सार्वजनिक नियमांचा आदर राखण्याची प्रवृत्ती मुलांमध्ये विकसित केली तरी पुष्कळ. लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, याची जाणीव न ठेवता मोठी माणसे गैरवर्तन करतात. त्यामुळे पुढील पिढीही तेच शिकते.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*पाऊस*आला आला महापूर झाला हाहाकारपूरामध्ये वाहून गेला जगण्याचा सार ...मित्रा, पूरामध्ये वाहून गेलाजगण्याचा सार ...व्हरका वासे वापरलेलं गोदाकाठी घर होतंभान हरपून सारं कसं घरासाठी जगनं होतंउध्वस्त झालं घर वाहून गेला संसार ...पूराच्या त्या पाण्यानं घर निघालं न्हाऊनघराचं अस्तित्व माझ्या सारं गेलं वाहूनअस्तित्वासाठी आता फिरतो दारोदार ...माहित नाही कसा असतोजमीनीचा सातबारामाझ्या जवळ नाही की होआठाचा ही उतारारहिवासी इथला मी ना ओळख ना आधार ...*अनुरत्न वाघमारे, नांदेड*9673643276•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे. मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या प्रगतीकडे नेण्याचे काम करते.- व्यंकटेश काटकर,नांदेड. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *भेट**एकदा एका राजाने खुश होऊन लोहाराला चंदनाची बाग भेट दिली. लोहाराला चंदनाच्या झाडांच्या किंमतीचे ज्ञान नव्हते त्यामुळे त्याने त्याचा कोळसा करून विकला. हळू हळू सम्पूर्ण बाग रिकामी झाली.**एक दिवस असेच राजा त्याच्या घरा जवळून जात होता, राजाला वाटले लोहार आता खुप श्रीमंत झाला असेल. परंतु प्रत्यक्ष पाहिल्यावर लोहाराची परिस्थिति पहिल्या सारखीच आहे असे दिसले राजाला आश्चर्य वाटले.**सत्य समजल्यानंतर राजाने त्याला विचारले तुझ्याकडे एखादे लाकुड़ शिल्लक आहे का ? तेव्हा लोहारने कुऱ्हाडीचा दांडा दाखविला.**राजाने त्याला चंदनाच्या व्यापाऱ्या कडे पाठवले. तेंव्हां त्या छोटयाश्या तुकडयाचे त्याला खुप पैसे मिळाले. लोहार खुप रड़ू लागला, त्याने राजाला अजुन एक बाग देण्याची विनंती केली तेव्हा राजा म्हटला "अशी भेट वारंवार भेटत नाही."* *मित्रांनो आपले आयुष्य त्या लोहारा सारखेच आहे मानवी जीवनाच्या मुल्यांचे महत्व, आपल्याला जीवनाचे शेवटचे श्वास चालू असताना समजते.पण...**त्यावेळेस आपण म्हणतो देवा मला अजुन थोड़ा वेळ दे, परंतु त्यावेळी वेळ मिळणे अशक्य असते.**मानवी जीवन अनमोल आहे.* *असे जीवन परत मिळणार नाही.**बोध* *या जगात दुर्लभ गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे, मनुष्य देह. हा देह ही आपल्या जीवनाची अमूल्य भेट आहे या देहाचा कोळसा करायचा की, चंदन हे आपले आपण ठरवायचे.* *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *बुलेटीन बाबत प्रतिक्रिया* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💐 *_फ्रेश मॉर्निंग बुलेटीनच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा_* 🌹 वाचनाला पर्याय नाही. समाज अप्रगल्भ राहू द्यायचा नसेल तर सातत्याने वाचन लेखन व्हायला पाहिजे. त्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आजकाल फेसबुक वगैरे मुळे लोक पटकन कशावरही विश्वास ठेवतात व कमी कालावधीत अनेकापर्यंत पोहोचण्याचा उत्तम माध्यम आहे. आणि हे सर्व आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होत आहे आणि मी ते दररोज वाचतो व हजारो मित्रांना शेअर करीत असताना मनस्वी आनंद होतो.महत्त्वाचे म्हणजे अनेकांचे अंधकारमय जीवन पुन्हा प्रकाशमय झाल्याचे उदाहरणे आहेत.एकंदरीत आपल्या समुहाच्या माध्यमातून एक उत्तम समाजसेवा करण्याची संधी प्राप्त झाली त्यामुळे श्री येवतीकर सरांसह सर्वांचे मनःपूर्वक आभार.पुढील वाटचलीस मंगलमय शुभेच्छा...🙏✍ _श्री शिवानंद चौगुले,चिंचवड_ _विशेष कार्यकारी अधिकारी_•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment