✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎇 दि. 06/08/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 . 🎇 *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-◆ १९६२ - जमैकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.◆ १९६६ - ब्रॅनिफ एरलाइन्स फ्लाइट २५० हे विमान नेब्रास्कातील फॉल्स सिटीजवळ पडले. ४२ ठार.💥 जन्म :-◆ १९७० - एम. नाइट श्यामलन, अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.◆ १९९० - जॉनबेनेट रामसे, अमेरिकन बालकलाकार.💥 मृत्यू :-◆ १९९१ - शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.◆ २००२ - एड्सगर डिक्स्ट्रा, डच संगणकशास्त्रज्ञ.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 50 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता 14.2 किलोचं एक सिलेंडर 999.50 रुपये म्हणजेच जवळपास 1000 रुपयांना मिळणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मेघगर्जनेचीही शक्यता आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंचा राजीनामा नामंजूर, कारवाईची टांगती तलवार कायम*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *राज्यभर सरकारकडून ‘आमचे गुरुजी‘ ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेत शिक्षकांचे फोटो लावण्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाली असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबईत गोविंदांसाठी आता 10 लाखांचा विमा, देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून भाजपची मोहीम, नितेश राणेंची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आठव्या दिवशी भारत २० पदकासह पदकतालिकेत सातव्या स्थानावर*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीर स्मृती मानधनानं 2 हजारहून अधिक धावा केल्या आहेत. भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 2 हजार धावांचा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय क्रिकेटपटू ठरलीय.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🎖️ *ज्ञानवर्धक*🎖️ *🖥️ संस्कारमोती चॅनल 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••*Learn Insects Name कीटकांची ओळख👇**व्हिडीओ-लिंक👇**https://youtu.be/CYdSAiXcBsE~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *सारिका आचमे, नांदेड*📱9960217083~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *एक पाऊल स्वच्छतेसाठी ......!*स्वच्छता आणि आरोग्य या दोन गोष्टी एकमेकांस पूरक आहेत. जेथे स्वच्छता असेल तेथे राहणाऱ्या लोकांचे आरोग्य देखील चांगलेच असते. मात्र आपण पाहतो की आजूबाजूला किती अस्वच्छता केली जाते. हे लोक असे का बरे वागत असतील ? याचा शोध घेतले असते असे दिसून येते की यांना शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्व कोणी सांगितले नाहीत त्यामुळे ही मंडळी अशी गैरवर्तणुक करीत असतील कदाचित. म्हणून भविष्यात भारत स्वच्छ दिसावा यासाठी आजच्या शालेय मुलांना याबाबतीत माहिती देणे आवश्यक वाटते............पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे.........https://nasayeotikar.blogspot.com/2018/03/blog-post_25.htmlलेख वाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर द्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ स्तंभलेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌞 *सूर्याचं उर्वरित आयुष्य किती आहे ?* 🌞सूर्य हा एक तारा असला तरी तो चिरंजीव नाही. त्याचाही एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे. सूर्याचा जन्म अवकाशातील पोकळीत तयार झालेल्या एका धुलीकण आणि वायू यांच्या ढगातून - नेब्युलामधून झाला. त्याला आता जवळजवळ साडेचार अब्ज वर्षं झाली. सुरुवातीला या ढगाला रूप आकार का काहीही नव्हतं. काही लाख वर्षं उलटल्यानंतर त्या ढगामधल्या हायड्रोजन वायूनं पेट घेतला. त्याच्या अणूंचं मिलन होत त्यातून हेलियम अणूंची निर्मिती होऊ लागली. या नाभिकीय प्रक्रियेपायी सूर्य प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित करू लागला. तो स्वयंप्रकाशित झाला. त्याचा तारा बनला. तेव्हापासून ही अणूसंमीलनाची प्रक्रिया सूर्याच्या अंतरंगात चालूच आहे. त्या ऊर्जा उत्सर्जनापायी सूर्याकडे केंद्रापसारी बल प्राप्त झाल्यामुळं ते त्याच्या केंद्रभागाकडे खेचणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाला विरोध करत सूर्याला स्थिर बनवत राहिलं आहे.सूर्याच्या अंतरंगातील हायड्रोजन वायूचा साठा अमर्यादित नाही. एक ना एक दिवस तो संपून जाईल. तसं झालं की त्याच्या अंतरंगातल्या अणुभट्ट्या विझतील. त्यानंतर त्यात साचून राहिलेलं हेलियम हे इंधन बनून त्याच्या अणूसंमीलनाची प्रक्रिया सुरू होईल. त्या वेळी सूर्याचं प्रसरण होईल. तो लाल राक्षसी तारा रेड जायंट बनेल. त्यावेळी त्याचा व्यास वाढल्यामुळे तो बुध आणि शुक्र यांना आपल्या कवेत घेईल. ते ग्रह जळून जातील. काही खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचित आपल्या पृथ्वीचीही तीच गत होईल.हेलियमचा साठा ही कालांतराने संपुष्टात येईल. तसं झालं की परत एकदा अणूसंमीलनाच्या भट्ट्या बंद पडतील. त्या वेळी सूर्याच्या बाहेरच्या कडेवरचे पदार्थ उडून जातील आणि सूर्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल. त्याच्या अंतरंगात फक्त कार्बनच असेल. एखाद्या हिर्यासारखं त्याचं स्वरूप होईल. त्यावेळी त्याचं आक्रमण आजच्या पृथ्वीइतकंच राहील. त्याच्या अंतरंगातली उष्णता त्याचा प्रकाश टिकवून ठेवील; पण अणुभट्ट्या बंद पडल्यामुळे ही उष्णता टिकून राहणार नाही. हळूहळू सूर्याचं तापमान कमी कमी होत जाईल आणि तो विझून जाईल. एक आकाशस्थ गोल म्हणून ही त्याची अखेर असेल.स्वयंप्रकाशित गोल म्हणजे तारा ही व्याख्या आपण प्रमाण मानली, तर ज्या क्षणी त्याचं श्वेतबटूत रूपांतर होईल त्याच क्षणी त्याची तारा म्हणून अखेर होईल. ही वेळ आजपासून साधारण पाच ते सात अब्ज वर्षांमध्ये येईल. अशी खगोलशास्त्रज्ञांची अटकळ आहे; पण तो संपूर्ण विझून जाईपर्यंतचा काळ ध्यानात घ्यायचा म्हटलं तर त्याची अखेर काही हजार अब्ज वर्षांनंतर होईल.*डाॅ. बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*“ श्रमातून जे फळ मिळते ते सर्व प्रकारच्या सुखात अत्यंत मधुर असते. ”**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ कोणते ?२) भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती कोण ?३) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात ?४) फ्यूज तार कशापासून बनवलेली असते ?५) सर्वात लवकर येणारे पिक कोणते ?*उत्तरे :-* १) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ २) रामनाथ कोविंद ३) दिनमान ४) शिसे व टिन ५) मका *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● नरसिंह पावडे देशमुख● सुदर्शन पा. जोगदंड● शंकरलाल जैस्वाल● राजेंद्र पोकलवार● गंगाधर दगडे● दीपक पा. हिवराळे● हर्ष पाटील● इरेश वंचेवाड*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तुम्ही दु:खाचा स्विकार कराल तेंव्हाच सुखाच्या निकट पोहचाल. आयुष्याचा खरा अर्थ कळेल. राजपुत्र सिद्धार्थ दु:खाचा शोध घेतो, म्हणून ते तथागत गौतम बुद्ध होतात. हेच फार मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर लिहून ठेवलं गेलंय, ते कुणीच पुसून टाकू शकत नाही. संकटातून, समस्यांतून बाहेर कसे पडायचे, हे विद्यापीठात शिकविले जात नाही. माणसाने स्वयंअध्ययनातून खूप काही शिकायचे असते. आजच्या नव्या पिढीला हे अध्ययन करू द्यायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. खुशी काही सेकंदांची असते. समाधान हे काही दिवसांचं असतं आणि ज्ञान अर्थात जीवन-जाणिवा ह्या आयुष्यभरासाठी असतात.**दुर्दैवाने मुलांना पाच रूपयांची कॅडबरी देऊन किंवा पाच-पन्नास पैशांचं चाॅकलेट देऊन खुश करण्याचं काम घरादारातून जोरकसपणे सुरू आहे. दु:खापासून त्यांना दूर ठेवण्यात येत आहे. त्यांना दु:खाची तोंडओळख करून दिली जात नाही. एक सुरक्षाकवच त्यांच्याभोवती पालक उभे करताहेत. सहाजिकच मुलांना दु:खाचा सराव होत नाही. मग जराशा दु:खाने ही मुले हडबडून जातात अन् आत्महत्येचे अर्थही माहीत नसलेले हे कोवळे जीव मारणारा कवटाळून बसताहेत. म्हणून दु:ख कळण्यासाठी दु:खाची उदाहरणे त्यांच्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, हे आपणांस ठाऊक, पण त्यांच्यापर्यंत ते पोहचत नाही. माणूस दु:खातून उभा राहून स्वत:चे अस्तित्व सिद्ध करतो. हीच दु:खाच्या रियाजाची सामुग्री आहे. तिचा अवलंब करणे म्हणजे दु:खाचा रियाज करणे होय.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌟! ! *काव्यांगण - रोज एक कविता* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••पुढील आठवड्यासाठी विषय*" रक्षाबंधन / स्वातंत्र्य दिन / तिरंगा "**श्रावण सम्राट* ( अष्टाक्षरी रचना )येता श्रावण सम्राटसडा सांडतो प्राजक्त,भ्रमरांची ती विमानंनिलांबरी ही आरक्त //१//लेकीबाई माहेरालाचिऊताई खेळे पाणी,सणवार, खेळ, झोकेदुग्ध गाभारा कहाणी //२//खेळ ऊन पावसाचाधरा पिकं नक्षीदार,अन् रंगीत फुलांचानेसे शालू बुट्टेदार //३//श्रावणाच्या स्वागतालासप्तरंगी इंद्रधनू,पोथी, पुराणं अंगणीतृप्त सर्जा, कामधेनू //४//घट दुधाचे सांडतीभूमी पुष्प अलंकृत,गंधाळला गाभाराहीसुवासिनी सालंकृत //५//सौ. सरोज सुरेश गाजरे.भाईंदर, ठाणे९८६७३९४००१•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• लोक तुम्ही तुमच्या जात असलेल्या चांगल्या ध्येयाकडेही वेगळ्या दृष्टीने पाहत असतात आणि आपल्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्नही करतात,परंतु त्यांच्या अशा वृत्तीमुळे आपण आपले चांगले ध्येय सोडायचे नाही.लोक तर या जगात चांगल्यालाही नाव ठेवतात आणि वाईटालाही नाव ठेवतात.त्यांच्याकडे पाहून आपण काहीही करायचे नाही जे आपणास आणि आपल्या मनास योग्य आहे आणि लोकांना फायद्याचे आहे आपण निश्चित केलेल्या ध्येयापासून त्रास होणारे नसेल तर नक्कीच त्या ध्येयाकडे मार्गक्रमण करावे. तरच आपले आणि इतरांचे कल्याण होईल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०/८०८७९१७०६३🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मासा आणि हंस*एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.*तात्पर्य :-*मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment