✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 15/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-१९९७-पर्यावरणवादी कार्यकर्ते महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगॅसेसे पुरस्कारासाठी निवड.१९५५-भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना 'भारतरत्न'हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.💥 जन्म :-१९४९-माधव कोंडविलकर,दलित साहित्यिक.१९३२-नरहर कुरुंदकर,विद्वान,टीकाकार आणि लेखक.१९२७-प्रा.शिवाजीरावभोसले,विचारवंत,कुलगुरू(डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)१९०३-के.कामराज, स्वातंत्रसैनिक,खासदार व तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री.१६११-मिर्झा राजे जयसिंग.💥 मृत्यू :-२००४-डॉ बानू कोयाजी, सामाजिक कार्यकर्त्या.१९९९-इंदूताई टिळक,सामाजिक कार्यकर्त्या.१९९९-जगदीश गोडबोले,पर्यावरणवादी लेखकव सामाजिक कार्यकर्ते.१९७९ - गुस्तावो दियाझ ओर्दाझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 तारखेला देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. देशातील सध्याचे राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडं जड असून त्यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उत्तर प्रदेशाला भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान 28 महिन्यात पूर्ण झालेल्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचे करणार उद्घाटन*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शाळा देखील बंद आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला मोठा निर्णय, इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 20 ऐवजी 31 जुलै रोजी होणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईच्या माय उडान ट्रस्टकडून मुंबई महापालिकेच्या शाळेत सुसज्ज कॉम्प्युटर लॅबचं उद्घाटन, पालिकेच्या भायखळा पश्चिमेच्या शाळेत झाली ही लॅब सुरू, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना या माध्यमातून कॉम्प्युटरचं प्रशिक्षण तसंच कोडिंगही शिकवण्यात येणार आहे*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *सामान्यांच्या खिशाला बसणार झळ, चुरमूरे, पापड, दही, लस्सी, ताक गूळ, खांडसरी साखर याच्यावर 5 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा सरकारने घेतला निर्णय*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ EMM Negative रक्तगट असणारी देशातील पहिली आणि जगातील दहावी व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तींना रक्तदानही करता येत नाही किंवा इतरांचे रक्तही घेता येत नाही.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित! निवडणूक आयोगाची माहिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - आईचे घर*https://storymirror.com/read/story/marathi/zv24dxqu/aaiice-ghr/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *इसीजी म्हणजे काय ?* 📙ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम, याला आपण 'हृदयस्पंदनालेख' असेही म्हणू शकू.आजकाल एखाद्या व्यक्तीला अचानक चक्कर आली, डोळ्यासमोर अंधारी आली वा छातीत धडधडले, तर इसीजी काढून घेण्याचा सल्ला दिला जातो. चाळीशी ओलांडल्यानंतर दर दोन वर्षांनी इसीजी काढून घेणे श्रेयस्कर, असेही म्हणतात. इसीजी काढण्याच्या या वाढत्या प्रमाणामुळे, हृदयाबद्दलच्या जिज्ञासेमुळे, हृदयविकाराच्या भीतीमुळे आपल्याला इसीजी म्हणजे नेमके काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्याची जिज्ञासा असेल. इसीजी म्हणजे काय हे आता पाहू.हृदयाच्या स्नायूंच्या आकुंचन प्रसारणात विद्युतलाटा व विद्युत प्रवाह तयार होतात. याची नोंद शरीराच्या विविध भागांवर (छाती, पाय इ.) संवेदनशील असे इलेक्ट्रोड ठेवून करता येते. कारण हे विद्युतप्रवाह हृदयापासून सर्व ठिकाणी पसरवले जातात. या विद्युतप्रवाहाच्या शक्तीनुसार एका यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढता येतो. इसीजी हे डॉक्टरांसाठी वरदानच ठरले आहे. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या हृदयस्पंदनालेखात P,Q,R,S व T या विद्युतलाटा (Waves) असतात. त्यांचे निरोगी लोकांसाठीचे आकार (उंची, रुंदी इ.) तसेच एकमेकांतील (त्या लाटांचे) अंतर ठरलेले असते. हृदयाच्या वेगवेगळ्या विकारांवरून या आलेखात बदल घडून येतात व त्यावरून रोगाचे निदान करता येते. हृदयाचा आकार, हृदयाची गती, जास्तीचे ठोके वा न पडणारे ठोके, हृदयातील जवनिका, कर्णिका या कप्प्यांमधील सुसंवाद, हृदयाच्या स्नायूंचा रक्तपुरवठा इत्यादी अनेक गोष्टींची माहिती यामुळे मिळू शकते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही बदल इसीजीमध्ये सापडू शकतात. अशा व्यक्तींनी वेळीच आहार, विहार यावर नियंत्रण ठेवले; तर पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. यावरून इसीजीचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. इसीजी काढण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता तो काढण्यापूर्वी खरेच तो काढण्याची गरज आहे काय, याचा साधकबाधक विचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••ज्ञानी डोळ्याने जगतो, तर अज्ञानी कानाने जगतो.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) ब्रह्मांडाचे आतापर्यंतचे ( जुलै २०२२ ) सर्वोत्तम रंगीत चित्र नासाच्या कोणत्या दुर्बिणीने टिपले आहे ?२) 'मिल्कमॅन ऑफ इंडिया' असे कोणाला म्हटले जाते ?३) 'द फर्स्ट कपल टू वॉक अराउंड इंडिया' हा २०२२ चा राष्ट्रीय विक्रम कोणी केला ?४) भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने केव्हा संमत केला ?५) स्वरादी म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) जेम्स वेब अंतराळ दुर्बीण २) डॉ. वर्गीज कुरियन, श्वेतक्रांतीचे जनक ३) बेनी कोट्टाराथील व मॉली बेनी, कोच्ची ४) १८ जुलै १९४७ ५) ज्या वर्णाच्या सुरुवातीस स्वर आहे त्यास स्वरादी म्हणतात. ( अं, अ: ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● श्रीकांत जोशी● राजेश्वर डोमशेर, मुख्याध्यापक● गंगाधर बिजेवार● बालाजी हिवराळे● शुभम बतुलवार● शंकर हांड्रे● संतोष ईबीतवार● आनंद गाजेवार● विष्णू शिंदे● नवाज शेख● वसंत सिरसाट● राजू कदम● उत्तम पाटील चोळाखेकर● विष्णुराज कदम● विजयकुमार पाटील घुळेकर● सचिन खंडगावे● पांडुरंग चंदवाड● प्रणित राखोंडे● वसंत बोनगिरे● सुनील बेंडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *सारा अंधारच प्यावा* *अशी लागावी तहान ॥* *एका साध्या सत्यासाठी* *देता यावे पंचप्राण ॥**असं जगावेगळ पसायदान कवी म.म.देशपांडे यांनी 'तहान' या कवितेत मागितलं आहे. त्याचं तीव्रतेने स्मरण व्हावं अशी परिस्थिती आज आपल्या देशात आहे. कोणत्याही क्षेत्राकडे जा सारा अंधार आहे. अपवाद वगळले तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातून सत्य हद्दपार झालेलं आहे. असत्याच्या अंधारात संवेदनशील मनाची घुसमट होत आहे. 'सत्यमेव जयते' ही या देशाची घोषमुद्रा आहे. तथापि समाजाचं, देशाचं नेतृत्व करणा-यांपासून तर रूग्णांची सेवा करण्याची शपथ घेतलेल्या डाॅक्टरांपर्यत सर्वांनी तिचे पदोपदी धिंडवडे काढले आहेत. सर्वच क्षेत्रात असत्यानं, अप्रमाणिक वृत्तीनं थैमान घातलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतमातेची दु:स्थिती आधिकच चिंतनीय झाली आहे. 'सत्य हे जीवनमूल्य लोप पावत आहे. 'असत्य' उजळ माथ्यानं वावरत आहे.**खरंतर सत्य, सत्याचा शोध, सत्याचा उद्धार आणि आचरण, सत्याचा पुरस्कार याला वैभवशाली परंपरा आहे. भीष्मनिती सांगते, 'सत्य हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. माणसाचा सर्वश्रेष्ठ आधार आहे. शाश्वत कर्तव्य आहे. आसक्तीचं जाळ फक्त सत्यच तोडू शकतं. सत्य म्हणजेच अमरत्व. सत्यासाठी केलेला त्याग मानवी जीवनात सर्वश्रेष्ठ आनंदाचा उगम असतो. सदाचरणी माणूसच इतरांच्या हितासाठी दक्ष असतो आणि या मार्गानंच त्याचं स्वत:चही हित साधलं जातं. सत्यासारखं तप, पुण्य नाही. असत्यासारखं पाप नाही. ज्याच्या ह्रदयात सत्य असतं त्याच्या ह्रदयात परमशक्ती वास करते.*••● ‼ *रामकृष्णहरी* ‼●••🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆संजय नलावडे, मुंबई9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर जीवन कुछ नहीं,खिन खारा खिन मीठकलहि अलहजा मारिया,आज मसाना ठीठ।सारांश जीवन क्षणभंगूर आहे. क्षणापूर्वी ते होते अन क्षणानंतर ते असेल अशी कोणीही खात्री देवू शकत नाही. जीवनाची नश्वरता पटवून देताना महात्मा कबीर म्हणतात, जीवन म्हणजे काहीही नाही. या क्षणाला ते खारट अनुभव देत असेल तर दुसर्या क्षणी ते कडवटपणाला गोडीमध्ये बदलू शकते. जीवनाचा मधूर अनुभव देवु शकतं. जो वीरयोद्भा काल युद्धामध्वे आपलं नैपुण्य पणाला लावून बाजी प्राणपणाने लढून आपल्या बाजूने ओढून आणण्यामध्ये यशस्वी झाला म्हणून त्याचे सर्वत्र कौतुक सोहळे साजरे झाले. सर्वांनी जयमाला गळ्यात घालून त्याचा जय जयकार केला गेला. ज्याने काल मैदान मारले तो स्वतःच आज चितेवर स्मशानी निपचित अचेतन पडला आहे. मृत्यूने भल्याभल्यांना सोडलेले नाही. तिथे सामान्य जीवांचं काय खरं आहे. घारीने भक्ष्यावर झडप घालावी तशी काळ कोणत्याही क्षणी झडप घालू शकतो, म्हणून माणसानं आपल्या हाती जे काही आयुष्य शिल्तक राहिले आहे. त्याचा सदुपयोग करून घ्यायला हवा व जीवन सत्कारणी लावायला हवे , म्हणजे सत्कर्माच्या किर्तीने मृत्यू पश्चातही जीवनाचा परिमल दरवळत राहातो. मृत्यू साक्षात पुढ्यात उभा राहिला तरी त्याचे भय राहात नाही एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••काळजी केल्याने कोणतेच प्रश्न मिटत नसतात तर अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे टाकतात.त्या काळजीमध्ये तुमच्या आजच्या कामावर लक्ष नसल्यामुळे तुमचे काम निकृष्ट दर्जाचे होऊ शकेल.त्यामुळे तुम्ही अधिक काळजी करायला लागाल.त्यापेक्षा काळजी न करणे सर्वात मोठा शहाणपणा आहे.ज्याची तुम्हाला काळजी वाटते त्याकडे लक्ष न घालणे सगळ्यात चांगले.आजच्या कामात अधिक लक्ष घातले आणि मन लावून काम केले तर त्या कामात गढून जाल.चांगले काम झाल्याचे समाधान तर वाटेलच आणि काळजी पण दूर होईल.काळजी कोणतीही असो.आजची असो की उद्याची.तो काळ तुमच्या काळजीमुळे थांबणार का ? नाही ना.मग आपले मन प्रसन्न ठेवा.येणा-या आणि हाती असलेल्या कामात अधिक लक्ष घाला मग तुम्हाला तुमचे समाधान मिळेल.समाधान हे काळजीला उत्तम पर्याय आहे हे कधीही विसरु नका.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद..९४२१८३९५९०.💠🌹💠🌹💠🌹💠🌹💠•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*हे विश्वची माझे घर, प्रेमातील व्यापकता*‘संत तुकाराम महाराजांनी देहू गावाबाहेरच्या एका ऊसाच्या मळ्याची काही दिवस राखण केली; म्हणून त्या मळ्याच्या मालकाने त्यांना पंचवीस-तीस उसांची एक मोळी दिली. दोरखंडाने बांधलेली ती मोळी खांद्यावर घेऊन संत तुकाराम महाराज घराकडे चालले असता वाटेत खेळणारी मुले त्यांना विचारू लागली, ‘‘तुकोबा, एवढे ऊस तुम्ही कोणासाठी घेतले हो ?’’ ते म्हणाले, ‘‘बाळांनो, अरे तुमच्यासाठीच. बंडू हा ऊस घे तुला, गुंडू हा तुला, धोंडू हा घे, तू पण.. हा, तू घे… हा, तू घे.’’ असे म्हणत तुकोबा ज्या वेळी त्यांच्या घरी पोहोचले, त्या वेळी त्यांच्या खांद्यावर एकच ऊस आणि त्याच्या भोवतीचे दोरखंडाचे भले मोठे वेटोळे एवढेच काय ते शिल्लक राहिले होते. तो प्रकार पाहून तुकाराम महाराजांची पत्नी आवळी भरपूर रागावली. आपल्याला मिळालेला सर्व ऊस लोकांच्या मुलांना देऊन आपल्या मुलांना काही आणले नाही; म्हणून ती तुकाराम महाराजांना नको नको, ते बोलली आणि रागाच्या झपाट्यात तिने तो उसाचा तुकडा खाली आपटला. त्यावेळी त्याचे तीन तुकडे होऊन एक तुकडा तिच्या हातात राहिला आणि दोन तुकडे जमिनीवर पडले. तेव्हा संत तुकाराम महाराज शांतपणे तिला म्हणाले, ‘‘आवळे, किती ग धोरणी तू ? आता तू सारखे वाटे केलेस. जो तुकडा तुझ्या हातात राहिला, तो तुझा आणि खाली जे पडले त्यांतील एक माझा अन् दुसरा मुलांचा !’’ ही त्यांची शांत वृत्ती पाहून बायकोला फार पश्चात्ताप झाला.तात्पर्य :- ‘हे विश्वची माझे घर’, असे वाटत असल्यामुळे संत तुकाराम महाराजांनी आपली आणि लोकांची मुले असा भेदभाव कधीच केला नाही*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment