✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 21/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-★ इ.स.पू. ३६६ - जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले इफेसूस येथील आर्टेमिसचे मंदिर आगीत जळून नष्ट.★ १८३१ - लिओपोल्ड पहिला (चित्रात) स्वतंत्र बेल्जियम देशाचा पहिला राजा बनला.★ १९६० - सिरिमावो भंडारनायके सिलोनची पंतप्रधान व जगातील पहिली महिला सरकारप्रमुख बनली.★ १९६९ - अपोलो ११चे अंतराळयात्री नील आर्मस्ट्राँग व बझ आल्ड्रिन चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले.💥 जन्म :-★ १६९३ - थॉमस पेल्हाम-होल्स, ब्रिटनचा तिसरा पंतप्रधान.★ १८९९ - अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक व साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता.★ १९३० - आनंद बक्षी, भारतीय गीतकार.💥 मृत्यू :-★ १७९६ - रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.★ २००१ - शिवाजी गणेशन, प्रसिद्ध भारतीय अभिनेता*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ओबीसींना बांठिया आयोगानुसार राजकीय आरक्षण लागू, दोन आठवड्यात रखडलेल्या निवडणुका जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ * महाराष्ट्रातील राजकीय पेच ; पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार, 27 जुलैपर्यंत प्रतित्रापत्र आणि दस्तावेज दाखल करण्याचे निर्देश..*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *200 कोटी कोविड लसीकरणाचा आकडा गाठला! PM मोदींचे लस उत्पादकांना पत्र, भारताचा 200 कोटी कोरोना लसींचा विक्रम, बिल गेट्स यांच्याकडून अभिनंदन*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती, 134 मतांनी विजयी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्टपासून विशेष मोहीम, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल; मुंबई, चेन्नईसह 6 संघामध्ये रंगणार टी-20 क्रिकेटचा थरार!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना पंतप्रधान मोदींकडून विजयी मंत्, बर्मिंगहॅम येथे येत्या 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सला सुरुवात होणार आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - भिजवणारा पाऊस*https://storymirror.com/read/story/marathi/y4627myp/bhijvnnaaraa-paauus/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 📙 *फ्ल्यू म्हणजे काय ?* 📙कोणी शिंकले, खोकले, ताप आला की 'फ्ल्यू' झाला असेल, असा सरसकट निष्कर्ष काढला जातो; पण तो खरोखर फ्ल्यू नसतोच. फ्ल्यू म्हणजे एन्फ्ल्युएंझा हा भयंकर रोग. एन्फ्लूएन्झा विषाणूंमुळे होतो. या विषाणूंचे तीन प्रकार असतात. दर काही वर्षांनी या रोगाच्या साथी येतात व त्या जगभर पसरतात. १९१८ मध्ये या रोगाने २ कोटींहून जास्त लोकांचे बळी घेतले. याच काळात भारतात ६० लाख लोक मृत्यूमुखी पडले. विषाणूच्या संरचनेत सदोदित होणाऱ्या बदलांमुळे या विषाणूसाठी प्रतिबंधक लस तयार करता येत नाही वा केलीच तर ती फार काळ उपयुक्त ठरत नाही. या रोगात थंडी वाजून ताप येणे, हातपाय दुखणे व खोकला अशी लक्षणे दिसतात. न्यूमोनिया नावाचा भयानक गुंतागुंतीमुळे अनेकजण मृत्युमुखी पडतात. या विषाणूवर औषधे उपलब्ध नाहीत व जी आहेत ती प्रभावी नाहीत. लस उपलब्ध आहेत, पण त्या वापरात येण्यापूर्वीच बऱ्याचदा बऱ्याच जणांना हा रोग झालेला असतो. श्वसनाच्या मार्गाने हा रोग एकापासून दुसऱ्याला होतो.एन्फ्लूएन्झाचा प्रतिबंध करण्याच्या उपायांना आजवर फार मर्यादित यश मिळाले आहे. लसीकरण हे सर्वात प्रभावी शस्त्र असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणामकारक उपयोग करण्यातच अडचणी येतात. त्यामुळे साथीच्या काळात घरातील वायूवीजन चांगले राखणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, रुग्णांना रुमालाने चेहरा झाकण्यास सांगणे व घराबाहेर न पडण्याचा सल्ला देणे, हे उपाय करावे लागतात. असा हा महाभयंकर एन्फ्लूएन्झा. तुम्ही ज्याला चुकून फ्ल्यू म्हणता ते असते साधे सर्दी पडसे. उपचार घेतल्यास आठवड्यात व न घेतल्यास सात दिवसांत बरे होते ते !*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून, मनोविकास प्रकाशन *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*Confidence is a key to success.* *( आत्मविश्वास ही यशाची गुरूकिल्ली आहे. )**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) स्वतः ची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले व एकमेव राज्य कोणते ?२) सिंगापूर ओपन महिला बॅडमिंटन स्पर्धा २०२२ चे जेतेपद कोणी पटकावले ?३) भारतातील पहिले कार्बन - न्यूट्रल विमानतळ म्हणून कोणते विमानतळ बांधले जात आहे ?४) नवी मुंबई विमानतळाचे कोणत्या नावाचे नामकरण करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?५) दोनदा उपराष्ट्रपतिपदावर राहिलेले उपराष्ट्रपती किती व कोणते ?*उत्तरे :-* १) केरळ २) पी. व्ही. सिंधू , भारत ३) लेह विमानतळ ४) लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ ५) दोन - सर्वपल्ली राधाकृष्णन ( १९५२ - ६२ ) , मो. हमीद अन्सारी ( २००७ - १७ ) *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● संजीव गंजगुडे, अध्यक्ष, मराशिप बिलोली● श्रीकांत कांता विनायकराव● शशी खंडाळकर,रत्नागिरी● कवयित्री सोनाली चंदनशिवे● शिवराज मोरडे● विजय वाटोरे, हिमायतनगर● रविकांत कुलकर्णी, देगलूर● वृषाली शिंदे,मुंबई● चिंतामणी जाधव,मुंबई*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*उद्योगी पुरूषालाच लक्ष्मी पसंत करते. दुबळी माणसे दैवात नाही असे म्हणत राहतात. नशीबात नव्हते असे रडगाणे गात राहतात. दैवावर, नशीबावर मात करून आपल्या स्वकर्तृत्वाने सामर्थ्य गाजविणे त्यांना कधीच जमत नाही. प्रयत्न करूनही जर काहीही यश मिळाले नाही तर दोष कुणाचा ? अशावेळी तो तुझा दोष नाही असे संस्कृत सुभाषितकार सांगतात. बरेच लोक अपयशाचे खापर दुस-यावर फोडतात. स्वत:च्या चुकांकडे पहात नाही. प्रत्येकाने रोज आत्मपरीक्षण करावे. प्रत्येक दिवशी आपले वर्तन कसे झाले याचा विचार करावा. आज मी पशूसारखा तर वागलो नाही ना? आज माझे वर्तन सज्जन माणसासारखे झाले आहे ना? हे तपासून पहावे.**प्रत्येकाचे हातून कळत-नकळत चुका होत असतात. पण तारुण्याच्या उन्मादात, सत्तेच्या-पैशाच्या कैफात माणसाला त्याची जाणीव होत नाही. तसेच माणसाला आपल्यातील अवगुणांचीही जाणीव होत नाही. "कासया वर्णू इतरांचे दोष, माझे ठायी काय वाण असे?"असे संत तुकारामांनीही म्हटले आहे. वाईट माणसांच्या संगतीमुळे चांगली माणसे बिघडल्याची अनेक उदाहरणे आपणांस सांगता येतील. वाईट संगतीमुळे काही व्यसनाधीन होतात तर कधी कधी नैराश्याने आपले जीवनच संपवितात. धोक्याच्या वळणावर जागं करणारे फार क्वचितच भेटतात. 'जीवन कसं जगावं' याचं मार्गदर्शन करणारे 'दिपस्तंभ'सारखे असतात.* *॥ रामकृष्णहरी ॥*🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• प्रेमभाव एक चाहिए , भेष अनेक बनाय |चाहे घर में वास कर , चाहे बन को जाए || अर्थ मानवाचा धर्म मानवता . मानवता जपायची तर मानवाच्या अंतरात प्रेमभावनेचे अधिष्ठान महत्वाचे आहे. त्या शिवाय मानवता व मानव्य कसं प्रवाहित होणार ? भौगोलिक व भौतिक परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी भिन्न वेष परिधान करा . विभिन्र प्रकारच्या (उपलब्धतेनुसार महालापासून झोपडीपर्यंत) वास्तूत किवा वनात वास्तव्य करा ते परिस्थितीनुरूप स्वाभाविक आहे. परंतु त्यात अवडंबर असता कामा नये. सत्य व प्रेमभाव हाच खर्या जीवनाचा मुलाधार आहे. त्यामुळे जीवनाची गोडी व सुंदरता वाढते म्हणून माणसाने अशाश्वत अवडंबराच्या व बुवाबाजीच्या नादी लागून जगण्याला विनाकारणच अंधानुकरणी व भंपक बणवू नये . ते मानवतेला पूरक असू शकत नाही. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जिद्द,मेहनत आणि प्रयत्न हे तुमच्या हाती घेतलेल्या कामासाठी वापरलेले कौशल्य आहे.यामुळे तुमचे काम अधिक चांगले व उत्कृष्ट दर्जाचे होण्यास मदत करते. कोणतेही काम जेव्हा हाती घ्याल तेव्हा ह्या तीन गोष्टी आपल्या अंगी बाळगणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्येच आपली प्रगती सामावलेली असेल.- व्यंकटेश काटकर,नांदेड. संवाद..9421839590.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *मदतीचा हात*भगवान बुद्ध त्या काळात आपल्या शिष्यगणांसह गावोगावी जात होते. एका गावाच्या वेशीवर एक वृद्ध आपल्या मोठ्या टोपलीतून भाजी विकण्यास बसला होता.ती टोपली जड होती व त्याला तेथून दुसरीकडे जायचे होते म्हणून येणार्या - जाणार्या वाटसरुंना तो आपल्या डोक्यावर टोपली ठेवण्यास मदत करण्याची याचना करत होता. पण कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. ते शिष्यगणही मजा बघत होते. हे पाहताच भगवान बुद्ध स्वतः पुढे झाले व त्यांनी वृद्धाच्या डोक्यावर टोपली उचलून दिली. त्या वृद्धाने त्यांना ओळखले होते.तो म्हणाला, सार्या जगाच्या दृष्टीने ते कोणीही असोत, पण माझ्या दृष्टीने माझ्या मुलासारखे आहेत ! त्याचे बोलणे ऐकून शिष्य आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, हे कसे शक्य आहे ? तो वृद्ध उत्तरला, जगात प्रत्येक मुलगा हा आपल्या मातापित्यांचा आधार असतो. त्यांचे कष्ट उपसण्यास नेहमीच मदत करत असतो.आज त्यांनीही मला मदत केली आहे. माझे कष्ट हलके केले आहेत. मग ते माझ्या मुलासमानच नाहीत का ? सार्या शिष्यांनी त्या वृद्धाचे पाय धरले व क्षमा मागितली. *संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment