✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 08/07/2022 वार - शुक्रवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••💥 ठळक घडामोडी :-२०११-रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.)असलेली नाणी प्रथमच चलनात आली.२००६-मुख्य निवडणूक आयुक्त असतांना केलेल्या कामगिरीबद्दल टी. एन.शेषन यांना" रॅमन मॅगॅसेसे पुरस्कार" जाहीर. १९९७-बीजिंग आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६किलो वजनी गटात कुंजुरांनी देवीने रौप्य पदक पटकावले१४९७ - वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.💥 जन्म :-१९०८ - वी. के. आर. वी. राव, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.१९१६ - गोपाळ नीळकंठ दांडेकर, मराठी कादंबरीकार, चरित्रकार.१९५८ - नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.१९७२ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-२००६ - प्रा.राजा राव,तत्वज्ञानाचे प्राध्यापक.२००१ - उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *गोदावरीचे वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी वळवण्याबाबत प्रयत्न करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांना सांगितले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता केंद्र सरकारने पिठाच्या निर्यातीवर घातले निर्बंध*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *आसाममध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत, आतापर्यंत 186 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक बेघर*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा ; नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा होईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असणार, नवे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *संत तुकाराम महाराजांची पालखी पिराच्या कुरोली मुक्कामी; तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा भंडीशेगाव येथे मुक्काम*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नव्याने 5 टक्के जीएसटी, अंतिम बोजा ग्राहकांवर पडणार असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप, महागाई वाढण्याची भिती*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताच्या महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत मालिका 3-0 खिशात घातली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत...*लघुकथा - हाताची जादू ओळखणारा शिक्षक* Audio ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे.https://youtu.be/-R9ZpCSvOokलघुकथा वाचण्या साठी खालील लिंक वर क्लीक करावेhttps://storymirror.com/read/story/marathi/19r6650g/haataacii-jaaduu/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••📙 *सलाईन लावण्याचे काय फायदे होतात ?*'डागदर साहेब, दोन तरी सलाईन लावा बघा' किंवा 'एक बाटली सलाईन तरी लावावीच लागेल' अशी रुग्ण डॉक्टरांची वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. सामान्य लोकांना सलाईन म्हणजे जणू संजीवनीच आहे असे वाटायला लागले आहे आणि साध्या इंजेक्शनपेक्षा सलाईन लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने वैद्यक व्यावसायिकही सलाईनचा वापर सढळ हाताने करू लागले आहेत.सलाईन लावावे असे रुग्णांना व डॉक्टरांना दोघांनाही वाटत असले, तरी पण खरेच का सलाईन आवश्यक असते ? सलाईन म्हणजे सोडियम क्लोराइडचे मिठाचे पाण्यातील द्रावण ! हे शिरेतून द्यावे लागते. त्यामुळे ते लगेच रक्तात मिसळले जाते, एवढ्यात त्याचा फायदा. याउलट ते पोटातून दिले, तर रक्तात शोषण व्हायला एक ते दीड तास लागतो. मग सलाईन केव्हा द्यावे लागते ? संडास वा उलट्या जास्त झाल्यास शरीरातील पाणी खूप कमी होते. व्यक्ती बेशुद्धही होतो. अशा काही वेळेला सततच्या मळमळ व उलट्यांमुळे तोंडाने काहीच देता येत नाही. पोटाच्या शस्त्रक्रियेनंतरही तोंडावाटे काही काळ काहीच देता येत नाही. अशा काही विशिष्ट परिस्थितीमध्येच सलाइन लावणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते. इतर वेळी मात्र तोंडावाटे द्रवपदार्थ देणेच चांगले. कारण शिरेतून काहीही दिल्यास काही जणांना ताप येऊ शकतो. गंभीर वावड्याने रिअॅक्शन येऊ शकते. तसेच सुई वगैरे निर्जंतुक केलेली नसल्यास कावीळ, एड्स यासारखे रोगही होऊ शकतात. त्यामुळे होता होईस्तोवर सलाईन न घेणेच चांगले.सलाईन म्हणजे शिरेतून दिली जाणारी कोणतेही द्रवरूपातील औषधे असा साधारणत: अर्थ लोक घेतात पण प्रत्यक्षात सलाईनचा अर्थ मिठाचे पाणी असाच आहे ! सलाईन लावणे काही अवस्थांमध्ये प्राण वाचवू शकते, हे जरी खरे असले तरी उठसूट सलाईन लावणे आर्थिक दृष्ट्या पडण्याजोगी नसते व कधी कधी ते जीवावरही बेतू शकते.*डॉ. जगन्नाथ दीक्षित व डाॅ. अंजली दीक्षित*यांच्या 'मेडिकल जनरल नॉलेज' या पुस्तकातून मनोविकास प्रकाशन*संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खुप प्रगती होईल*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••१) 'जग ही एक रंगभूमी आहे' हे प्रसिद्ध वाक्य कोणी म्हटले होते ?२) दलाई लामा यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव काय ?३) छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या व्यक्तीला कोल्हापुरात चहाचे दुकान काढून दिले होते ?४) जगातील कोणत्या देशाने लोकशाहीचा प्रथम परिचय करून दिला ?५) जगातील पहिले तरंगते शहराची निर्मिती कोणत्या देशात साकारण्यात येत आहे ?*उत्तरे :-* १) शेक्सपिअर २) कुंदन ३) गंगाधर कांबळे ४) ग्रीस, इ. स. पूर्व ७०० ५) दक्षिण कोरिया*संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● सुरेश तायडे● अनिल बेद्रे● मलेश भूमन्ना बियानवाड● आनंदराव नारायणराव सूर्यवंशी● लालू शिरगिरे● श्रद्धा कळसकर● अशोक पवार● दीपक वानखेडे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*तसे आयुष्यभर मागतच असतो या अर्थाने आपण भिकारीच असतो. हातात भिकेचा कटोरा दिसत नाही, म्हणून तो नसतोच असे नाही. अपेक्षेचे छोटे-मोठे कटोरे घेऊनच आपण फिरत असतो. या अपेक्षेचा कटोरा घेऊन भीक मागण्याची सुरूवात होते घरापासून, घराकडून अपेक्षा असते. आई-वडिल, बायको, मूल, बहिण, भाऊ सर्वांकडून अपेक्षा आहेत. उलटपक्षी त्यांनाही माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा आहेत. म्हणजे चित्र दिसत नसले, तरीही अपेक्षेच्या भिकेचे कटोरे घेऊन परस्परांसमोर उभे आहोत. एक भिकारी दुस-या भिका-यासमोर उभा आहे आणि दोघेही आरोळ्या ठोकताहेत,'देssरेss...बाssबा... काहीतरी.**मला त्यांच्याकडून प्रेम हवे आहे. स्नेह, विश्वास, माझ्या दुखल्या-खुपल्याबद्दलची विचारपुस हवी आहे. आस्था हवी आहे. सर्वच हवे आहे. ज्यांच्याकडून मला हे सर्व पाहिजे आहे, त्यांनाही माझ्याकडून हेच हवे आहे. अपेक्षेच्या कटो-यात त्यापैकी काही पडतही आहे. त्याने मी आनंदी नाही उलट जे नेमके त्यात पडले नाही त्यानेच आधिक दु:खी आहे. जे मिळाले त्याचा आनंद नाही पण जे मिळाले नाही त्याचा दु:खभारच आधिक आहे. मी फक्त मागतोच आहे. याच्याकडून, त्याच्याकडून, घराकडून-दाराकडून, नात्यांकडून-नात्याबाहेरच्या गणगोतांकडून, ओळखी-पाळखीकडून, एवढेच काय अनोळख्यांकडूनसुद्धा.* *॥ रामकृष्णहरी ॥* 🥀🥀🥀🥀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••कलि मंह कनक कामिनि,ये दौ बार फांदइनते जो ना बंधा बहि,तिनका हूॅ अमै बंद ।सारांश महात्मा कबीर सांगतात कलीयुगात जो माया मोहात अडकणार नाही. स्त्रियांच्या फंदात पडून जो स्वतःला बिघडवून घेणार नाही तोच या मायावी जगातून सुखरूप सुटेल. तो सर्वांच्या आदरास पात्र होईल. अन्यथा लोक टिकेला सामोरे जावे लागणार. अपमानाचे बोल सहन करावे लागणार. हे ठरलेलेच. म्हणून सन्मार्गावर चालणार्या माणसानं माया आणि कामिनी यांच्या मोहात पडणं म्हणजे स्वतःला अधोगतिच्या मार्गाला नेणं होय. रामायण घडण्यामागील मुख्य कारण स्त्री लालसेत सापडते, आर्य अनार्य संघर्षाच्या काळात आर्य पुत्र लक्ष्मणाकडून अनार्य कन्या शुर्पनखा या महाबली राजा रावनाच्या बहिणीला तपमानित केलं जाणं. तिला विद्रुप केलं जाणं. दुर्लक्षित कसं होणार ? ती काय गोरगरीबा घरची पोर थोडीच होती ? फूल हुंगून फेकून दिलं किवा तसाच त्याचा चोळामोळा केला तरी त्याची दखल कोण घेतंय ! मात्र इथ राज कुलाच्या इज्जतीचा पेच. सुडाग्निनं पेटलेल्या एका मानिनीनं दुसरीला संघर्षात ओढलं नाही तरंच नवल ! तिथं दोन्ही पैकी एका बाजुची राख रांगोळी होणं स्वाभाविकंच होतं. नेमकी न्यायाची बाजू कोणाची ? चिकित्सा करणारे करत राहतील .मात्र दोन स्त्रियांच्या पात्राभोवतीच हा महासंग्राम फिरत राहतो. महाभारत म्हणजे सत्ता, संपत्ती आणि सुंदरी यांच्या भोवती फिरणारी भावबंदकीच नव्हती का ! त्यातही अपरीमित हानी झालेली. महारती योद्धे माया, मोहिनीतच गारद केल्या गेलेले. आजही जागोजागी त्या बाबींची पूनरावर्त्ती होताना दिसते. अशा प्रकारापासून सावध व्हायला हवे. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्यांना जीवन जगण्याची कला अवगत झाली तो कधीच कुणासमोर जीवन कसे जगावे असं विचारत नाही किंवा कोणतीच तक्रार कुणाकडे करीत नाही.तो कसेही आणि कोणतेही संकट असो त्याला तो आपल्या कलेने तोंड देऊन यशस्वी होतो.परंतु ज्यांना जीवन कसे जगावे किंवा जीवनात आलेल्या प्रसंगाला कसे आणि कोणत्या पध्दतीने तोंड द्यावे हे जमत नाही तो कधीच जीवनात यशस्वी होत नाही आणि होणारही नाही.तो दरवेळी काहीना काही बहाणे करुन आपल्या जीवनाला व जगण्याला दोष देत बसतो.आपल्या नशीबाला दोष देण्यापेक्षा हातपाय हलवून जीवन जगायला शिकले पाहिजे हा सकारात्मक विचार आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवायला शिकले पाहिजे तरच जीवन जगणे आनंददायी होईल अन्यथा दु:खच भोगावे लागतील यांत तीळमात्र शंकाच नाही .© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद ...9421839590/8087917063.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱🌹 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *इसापची समयसुचकता*ग्रीस देशात झांथस या नावाचा एक मोठा माणूस होऊन गेला. त्याच्या घरी इसाप स्वैपाकी होता. एके दिवशी झांथसच्या घरी मेजवानी होती. म्हणून त्याने इसापला आज्ञा केली की, ‘सर्वांत उत्तम असे जे पक्वान्न असेल ते आज पाहुण्यांसाठी कर !’रात्री ठरलेल्या वेळी पाहुणे जमल्यावर सर्वजण जेवावयास बसले. इसापने नुसत्या बोकडाच्या जीभांचे निरनिराळे पुष्कळ पदार्थ तयार केले होते. ते खाऊन पाहुणे फार खूष झाले. तरीही जिभांशिवाय दुसरा कोणताही पदार्थ ताटात नसल्यामुळे झांथस यास थोडेसे आश्चर्य वाटले व रागही आला. तो इसापला म्हणाला, ‘अरे, सर्वांत उत्तम असं पक्वान्न तयार करायला सांगितलं असता तू नुसत्या जिभेचेच निरनिराळे पदार्थ काय तयार करून ठेवलेस ?’ त्यावर इसापने उत्तर दिले, ‘जिभेपेक्षा चांगला असा दुसरा पदार्थ आहे का?’विद्या, तत्त्वज्ञान यांचा उगम जिभेपासून झाला आहे. व्याख्यान, अभिनंदन, लग्न, व्यापार इत्यादी मोठमोठ्या घडामोडी, प्रतिज्ञा या सर्वांचे मुख्य साधन जीभच होय, तिची बरोबरी करणारा दुसरा पदार्थ नाही.’इसापचे हे समयसूचक भाषण लोकांना इतके आवडले की, त्यांनी त्याची फारच तारीफ केली. त्यावेळी झांथस पाहूण्यास म्हणाला, ‘अहो, आजच्याप्रमाणे उद्यासुद्धा रात्री तुम्ही माझ्याकडे जेवावयास यावं, अशी माझी विनंती आहे.’ मग तो इसापकडे पाहून म्हणाला, ‘अरे, आज जसे तू सर्वात उत्तम पक्वान्न तयार केलेस, तसे उद्या तुझ्या मते जे सर्वात वाईट पक्वान्न असेल ते तयार कर.’दुसरे दिवशी सर्वजण जेवायला बसले असता आदल्या दिवशीचेच सर्व पदार्थ जेवणात होते. तेच पदार्थ पाहून पाहुण्यास व झांथस यांना फार आश्चर्य वाटले. मग झांथस इसापला रागाने म्हणाला, ‘अरे, काल जे पदार्थ चांगले होते तेच आज सर्वात वाईट कसे काय झाले?’ त्यावर इसाप उत्तरला, ‘जिभांपेक्षा वाईट असा दुसरा कोणता पदार्थ आहे ? जगात तितकी म्हणून नीचपणाची कृत्ये होतात, त्या सर्वांच्या मुळाशी जीभच कारणीभूत असते. बंड, मारामारी, लबाड्या नि अन्याय यांच्या संबंधाच्या गुप्त बोलाचाली जिभेनेच होतात. त्याचे इशारेही जिभेनेच दिले जातात. मोठमोठी राज्यं, प्रचंड नगरं इतकं नव्हे तर फार दिवसांचे मित्रत्वाचे संबंधसुद्धा जिभेमुळेच नाश पावतात.’ इसापचे हे चातुर्याचे बोलणे ऐकून लोक अगदी चकित झाले.तात्पर्य: कोणत्याही वस्तूकडे निरनिराळ्या दृष्टीने पाहिले असता ती निरनिराळ्या प्रकारची दिसू लागते. त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा उपयोग जसा चांगल्या कामास होतो तसाच वाईट कामातही करता येतो.चांगले शोधून काढणे ही आपली सचोटी.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment