✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 07/07/2022 वार - गुरूवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 💥 ठळक घडामोडी :-१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.💥 जन्म :-१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार.१९८१ - भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी💥 मृत्यू :-१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीचा सर्वसामान्यांना झटका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी झाली वाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांचा राजीनामा, उपराष्ट्रपती किंवा राज्यपालपदी वर्णी लागण्याची शक्यता*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *शिवसेनेचे 11 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती, भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी सेना खासदारांचं पत्र*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णा, पंचगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडणार, जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा, प्रशासनाच्या नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सूचना*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापुरात रेड अलर्ट, एनडीआरएफच्या टीम्स तैनात*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *ज्ञानोबांच्या पालखीचं खुडूस फाट्याजवळ दुसरं गोल रिंगण, तर तुकोबा रायांची पालखी बोरगाव मुक्कामी जाणार, माळीनगरमध्ये तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रोहित शर्माला विश्रांती, तर शिखर धवनकडं कर्णधारपद!*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - फेसबुक मैत्री*https://storymirror.com/read/story/marathi/fn07z43i/phesbuk-maitrii/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌺 *फुल केव्हा फुलतं ?* 🌺**************************फुलांनी केवळ कवींनाच वेड लावलंय असं नाही; आपल्या सर्वांच्याच चित्तवृत्ती फुलांना पाहून फुलतात. त्यांचे मनमोहक रंग, त्यांचे आकार, त्यांची रचना, त्यांचा डौल खरोखरंच मोहून टाकणारे असतात. म्हणूनच असावं कदाचित, पण आपल्या आयुष्याच्या प्रत्यक क्षणाची साथ फुलं करतात. जन्म झाला म्हणून जशी फुलांची उधळण होते तशीच शेवटच्या प्रवासाला निघतानाही फुलांच्या माळांनी निरोप दिला जातो. प्रेयसीला भेट म्हणून गुलाब देता देताच त्या प्रणयाचं आयुष्याच्या साथीत रुपांतर करतानाही फुलांच्या माळांची देवाणघेवाण करून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येतं.हे असे आनंदाचे दिवस वर्षात केव्हाही येऊ शकतात. तरीही प्रत्येक वेळी आपल्याला फुलं मिळत राहतात. म्हणजे ती सदासर्वकाळ फुलतात असं समजायचं का ? तसं नाही. कारण काही फुलं ठराविक हंगामातच मिळतात. काही दिवसाउजेडीच उमलतात तर रातराणीसारखी काही रात्रीच्या वेळीच आपल्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकतात. ब्रह्मकमळ तर एकदाच आणि तेही मध्यरात्रीच फुलतं. मग हे फुलं नेमकी फुलतात तरी कधी ?हे समजून घ्यायचं असेल तर आधी ती फुलतातच का, हे ध्यानात घ्यायला हवं. ती फुलतात ते आपल्याला आनंद देण्यासाठी नाही, तर वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेत फुलांचं उमलणं एक कळीची भूमिका बजावत असतं. फुलांमध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असे परागकण असतात. त्यांच्या मिलनातूनच बी तयार होतं आणि पुढच्या पिढीची नांदी म्हटली जाते. हे मिलन होण्यात कीटक आणि पक्षी मोलाची मदत करतात. त्या मदतगारांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं तर काही आमिष दाखवायला हवं. त्यांना आधी आकर्षित करायला हवं. ते करण्यासाठीच फुलं फुलत असतात. त्यांची ती रंगीबेरंगी छबीही तेच काम करत असते. त्यामुळे ते जेव्हा आकर्षित होतील तेव्हा फुलण्यानेच कार्यभाग साधत असतो.तरीही निरनिराळ्या वनस्पतींची वर्गवारी करणाऱ्या कार्ल लिनैस यानं फुलांचीही त्यांच्या उमलण्यावरून तीन गटात विभागणी केली आहे. काही फुलं हवामानानुसार उमलतात काही कोमेजतात. त्यांना लिनैसनं 'मिटिअाॅरिची' असं म्हटलं आहे. काही दिवसाच्या लांबीनुसार आणि कार्यक्रम आखतात. म्हणजे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात या वेळा बदलतात. त्यांना त्यानं 'ट्रॉपिची' हे नाव दिले आहे. उरलेली सगळी तिसऱ्या म्हणजेच इक्निनोक्टेल्स या गटात घातलेली आहेत. ती हवामानाची किंवा दिवसरात्रीच्या लांबीची पर्वा न करता दिवसाच्या ठरावीक वेळी फुलतात आणि ठरावीक वेळी कोमेजतात.ज्याँ बातिस्त लमार्क या फ्रेंच वैज्ञानिकाला असं दिसून आलं की फुलण्याच्या वेळी फुलांची उष्णता वाढलेली असते. आपल्या गंधाचा दूरदूरवर फैलाव करण्यासाठी ही वाढीव उष्णता कामी येते, असे त्यानं दाखवलं आहे. काही फुलं तर आसमंताच्या तापमानापेक्षा आपलं तापमान ३५-४० अंशांनीही वाढवू शकतात. तेव्हा फुलांचं तापमान वाढू लागलं की ती फुलतात असंही म्हणता येईल.*बाळ फोंडके यांचा 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••प्रार्थना करणाऱ्या हातापेक्षा मदत करणारे हात जास्त पवित्र असतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) सर्वात कमी वयात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागली होती ?२) कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावांचा विक्रम कोणी केला ?३) मोबाईल फोनचे जनक कोण ?४) 'समाजस्वास्थ्य' हे मासिक कोण चालवित होते ?५) जगात 'बिटकॉईन' या आभासी चलनाला कायदेशीर मान्यता देऊन 'बिटकॉईन सिटी' बनविण्याची योजना आखणारा पहिला देश कोणता ?*उत्तरे :-* १) शिवराज पाटील, ४२ व्या वर्षी, १९७८ साली २) जसप्रीत बुमराह, भारत ( २९ धावा ) ३) मार्टिन कूपर, अमेरिका ४) र. धो. कर्वे ५) एल. साल्वाडोर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● दत्ताहारी पाटील कदम बेलगुजरीकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष, धर्माबाद● प्रज्ञा घोडके, साहित्यिक● रमेश चांडके, हैद्राबाद● ऋषीकेश देशमुख, साहित्यिक● सय्यद युनूस, मुख्याध्यापक, उर्दू हायस्कुल● संदीप डोंगरे● महेश जोशी, पत्रकार● श्रीकांत माने● प्रकाश गोरठकर● विजय पाटील रातोळीकर● माधव कांबळे● आशिद लाव्हाळे● ज्वालासिंह घायाळे● दिगंबर पांचाळ● हरी ओम राठोड● व्यंकट ताटेवाड● लक्ष्मण कांबळे● पिराजी कटकमवार● हणमंत जाधव● जगन्नाथ पुलकंठवार● बालासाहेब पेंडलोड● साईनाथ वाघळे● गजानन काठेवाडे● साईनाथ हामंद● शंकर रामलू बलीकोंडावार*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••••• ●🚩🚩 ‼ *विचार धन*‼ ● 🚩🚩••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *टाळ वाजे....मृदंग वाजे..* *वाजे हरीची वीणा.....!* *माऊली निघाले पंढरपुरा..* *मुखाने विठ्ठल- विठ्ठल म्हणा.!**हा सगळा भक्तीसागर, विठु नामाच्या गजरात तल्लीन होऊन, नाचत-गाजत एकजीव होऊन माऊलीं सोबत दिवसभर पायी चालत संत स्वरूप वारकरी, आपल्या विठुच्या दर्शनाला पंढरीकडे चालत असतात. क्षणभर वाटतं की अथांग सागर संथ झाला. ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष करीत हा आषाढी वारी पालखी सोहळा पुढे सरकत असतो.**या वारीमध्ये असेही काही क्षण असतात जे मनाला सुखद प्रसन्नता देतात. विठ्ठल-विठ्ठल नामाचा अखंड गजर...भागवत धर्माचे प्रतीक असलेली आसमंतात फडकणारी पताका...चहूबाजूंनी उत्साहीत वैष्णवांचा भक्तीसागर... आणि वायुवेगाने धावणारा अश्व...अशा भक्तीमय वातावरणात लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा एक क्षण म्हणजे...' रिंगण ' सोहळा..!* *दिंड्या गरूड टके पताकांचे भार ।* *होतो जयजयकार.... नामघोष ॥* 🚩 *॥ रामकृष्णहरी ॥*🚩 *विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥*🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल-9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबिराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• पाहन पूजै हरि मिलैतो मै पूजूँ पहार ।ताते तो चक्की भलीपीसि खाय संसार ।सारांश : दगड-धोंडे पूजणार्यांचा समाचार घेताना महात्मा कबीर म्हणतात की दगाड-धोंडे पूजल्यामुळे इच्छित साध्य झालं असं होईल, मनोकामना पूर्ण होतील किवा देवाची प्राप्ती होणार असेल तर मी अख्खा पर्वतच पूजायला तयार आहे. त्यापेक्षा दगडापासून बनलेल्या जात्याची काळजी घ्यायला मला आवडेल. कारण हे जातं धान्य भरडण्याच्या कामी येतं. त्यापासून पीठ मिळतं. त्यामुळे जगातील जीवांची भूक तरी भागते. श्रद्धेच्या नावाखाली लोक दगडा-धोंड्याला पूजत राहातात. काही जण रंग फासलेले किंवा हळदी-कुंकू लावलेले दगड दिसताच हात जोडतात. गाडीवरून जाताना मंदिर येताच गाडीचा भोंगा वाजवतात. जसा काही मंदिरातला देव झोपलाय अन आवाज देवून हे त्याला जागं करित आहेत. पहावं ते नवलंच ! एकाचं बघून दुसरा करणार अन ती प्रथाच होणार. आज संगणक युगात वावरताना आंतरजालात दडलेलं जगाचं ज्ञान संगणकावर एका क्लिक मध्ये आपल्यासमोर येतं. संगणक माहिती आदान प्रदानाचं यंत्र आहे. .हे माहित असून सुद्धा त्याला चालू करण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा करणारे . त्यावर धर्माचे सांकेतिक ठसे उमटवणारे, अज्ञानाचं जोखड वाहणारे ढोंगी बुवा, मौलवी यांचं विज्ञानानंच बणवलेल्या माईकवरून 'ये विज्ञान फिज्ञान सब झुट है । म्हणनं अन विज्ञान शिकलेल्या श्रोतृ समुदायाकडून माना हलवून प्रतिसाद देणं किती ढोंगी व भंकस पणाचा कळस आहे बरं हा ! अशी मानसिकता पाहिली की दया यायला लागते. कोणता संस्कार व शिकवण देत आहेत बरं आपल्या वर्तन अन करणीतून भावी पिढ्यांसाठी ! खरंच का जगू शकत नाही माणूस ढोंगाशिवाय ! का झिडकारत नाही अज्ञानाची काजळी ? विज्ञान आणि मानवतावादाचा मेळ घालत विचारचनं विवेकाचे दीप प्रज्वलित करता आले तर जीवनात दररोजच दिवाळी साजरी होईल. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• आपण आपले सुखी जीवन जगण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो आणि सुखी जीवन जगण्यासाठी पैसा कमवतो.तो पैसा एवढा कमवतो की,त्या पैशापायी आपण काय करत आहोत हा समजायला मार्ग सापडत नाही.ज्या गोष्टींसाठी आपण पैसा मिळवला आहे त्यासाठी तर जरुर वापरायला पाहिजे.आपल्या सुखासाठी तर आपण कमवतोच पण आपल्यासारखे सुख इतरांनाही मिळावे असे वाटत असेल तर आपल्या कर्तृत्वाचे हात अशांसाठी पुढे करा की, त्यातून तुमम्हालाही समाधान वाटले पाहिजे.जे अनाथ,अपंग,अंध,निराधार,वृध्द आहेत त्यांना तुमच्याकडून कशाची तरी अपेक्षा आहे अशांना आपण आपल्या केलेल्या कमाईतून काहीतरी मदत करुन जीवनाचे सार्थक करावे.याही व्यतिरिक्त समाजकार्य, देशकार्यासाठीही जे शक्य आहे ते आपल्या परीने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या आपण कमवलेल्या कमाईचे सार्थक होईल.केवळ आपण आपलाच स्वार्थ साधण्यासाठी पैसा कमावला तर त्यात आत्मिक समाधान लाभणार नाही.वेळ निघून गेल्यावर असे होऊ नये की,आपण एवढे कमावले आहे त्यातून आपण आपल्या स्वार्थासाठीच केले आहे पण इतरांसाठी काहीच केले नाही.अशा पश्चातापात पडण्यापेक्षा आपला हात अशांसाठी साठी पुढे करा की,खरी गरज त्यांना आहे.एक आपला हात पुढे केला तर अनेक तीर्थयात्रा करुनही पुण्य मिळणार नाही तेवढे पुण्य आणि समाधान मिळेल.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🌹🌱🌹🌱🌹🌱🌹🌱 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुशार कावळा*दुपारची वेळ होती, कडक ऊन पडले होते. एका कावळ्याला खूप तहान लागली होती. तो तहाने पोटी व्याकुळ झाला होता. तो इकडे तिकडे पाणीच शोधू लागला. दूर एक शेत होते. शेताच्या कडेला एक मडके होते. कावळा मडक्या जवळ गेला. मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते. कावळ्याने पाणी पिण्यासाठी आपले तोंड मडक्यात घातले, परंतु तरीही कावळ्याची चोच त्या पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. कावळ्याने थोडा विचार केला. इकडे तिकडे पाहिले. मग त्याला एक छोटीशी नळी दिसली. त्याने ती नळी चोचीत पकडली. व तो मडक्याजवळ गेला. एक नळीचे टोक मडक्यात बुडविले. चोचीने पाणी वर ओढले. हुशार कावळा पाणी प्याला. काव काव करत उडून गेला.तात्पर्यः कोणतेही काम समय सूचकतेने व युक्तिवादाने केले तर चांगले पार पडते.〰️〰️〰️〰️〰️〰️*✍संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार. ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment