✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 20/07/2022 वार - बुधवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन* 💥 ठळक घडामोडी :-२०००-अभिनेते दिलीपकुमार यांना 'राजीव गांधी राष्ट्रीय सदभावना पुरस्कार' जाहीर.१९०३ - फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली. १९६९-अपोलो -११या अंतराळयानातून गेलेला नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव बनला.१९४७ - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.१९९२ - टी.यु. १५४ प्रकारचे विमान त्ब्लिसीजवळ कोसळले. ४० ठार.१९९६ - स्पेनमध्ये विमानतळावर दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. ३५ ठार.💥 जन्म :-१९११ - बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.१९१९ - सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.१९२९ - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.१९५० - नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.१९७६ - देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.💥 मृत्यू :-१९२३ - पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.१९२७ - फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे अव्वल स्थानी आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीची कारवाई*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, भंडाऱ्यात पूरस्थिती कायम, जनतेचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचं आव्हान, उपमुख्यमंत्री चंद्रपूर, वर्ध्याला भेट देणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *अग्निपथ योजनेवरील तीन याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, योजना रद्द करण्याची मागणी*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *डॉलरच्या तुलनेत रुपया ऐंशीच्या उंबरठ्यावर, महागाईविरोधात काँग्रेसचं संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *प्रसिद्ध गजल गायक भूपिंदर सिंह यांचं निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, दीर्घकालीन आजारामुळे मुंबईतल्या रुग्णालयात सुरु होते उपचार*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *भारताने ५४ व्या आशियाई स्पर्धेत आपल्या पदकांचा धडाका कायम राखला. आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या डॉक्टर मंजिरी भावसारला कांस्यपदक*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - साहस*https://storymirror.com/read/story/marathi/0gnisi1w/saahs/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ⏰ *एक सेकंद म्हणजे किती काळ ?* ⏰काळ मोठी अजब चीज आहे. ती एक अमूर्त कल्पना आहे. तरीही आपण तिचं मोजमाप करत असतो. वास्तविक दोन निरनिराळ्या घटनांमध्ये काही अवधी जावा लागतो आणि हा नेहमीच एकसारखा नसतो, हे ध्यानात आल्यानंतर त्या अवधीचं मोजमाप करण्याचं काहीतरी साधन असावं, असं वाटायला लागतं. त्यातूनच काळ या संकल्पनेचा उगम झाला. आपण मोजतो तो दोन नैसर्गिक घटनांमधला अवधी. त्या मोजमापाला काळ म्हणतो. म्हणजे मोजमाप होतं ते त्या अवधीचं, काळाचं नाही.तरीही काळ नावाची एक मोजपट्टी अमलात आणल्यानंतर त्याचं प्रमाणीकरण करणं आवश्यक झालं. दोन अवधीतल्या काळाची मात्रा किती हे समजणं आवश्यक होतं. त्यासाठी मग वरचेवर होणाऱ्या एका आवर्तनातून जाणाऱ्या घटनेची निवड करण्यात आली. त्या दोन आवर्तनातील अवधीला काळाचं एकक मानण्यात आलं. त्यातून मग सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या अवधीला एक दिवस मानण्यात येऊ लागलं. एकदा पूर्णचंद्र दिसल्यानंतर परत त्याचं दर्शन होईपर्यंत असे कितीतरी दिवस जावे लागतात, हे समजल्यानंतर त्या दिवसांचा एक महिना मानण्यात आला. त्याच सुत्राचं बोट धरत वर्ष या एककाची मात्रा ठरवण्यात आली.नंतर असं दिसून आलं, की आपल्या नेहमीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की त्यांच्यामधल्या अवधीचं मोजमाप करण्यासाठी दिवस हे एकक फार मोठं होतं. त्यापेक्षा लहान एककाची त्यासाठी गरज आहे. मग दिवसाचे लहान लहान भाग करून त्यांची एककं करण्याची कल्पना पुढे आली. त्यातूनच मग घटिका, तास, पळं किंवा तास, मिनिटं आणि सेकंद वगैरे एककांची निश्चिती करण्यात आली. तरीही एक तास म्हणजे नेमका किती अवधी किंवा एक सेकंद म्हणजे नेमका किती काळ, हे प्रमाणित करणं गरजेचं होतंच. तसं करायचं तर मग वरचेवर चक्राकार रितीनं होणाऱ्या घटनेचा शोध घ्यायला हवा होता. दिवसाचं प्रमाण ठरवताना पृथ्वीचं स्वतःभोवती होणारं चक्राकार परिभ्रमण विचारात घेण्यात आलं होतं. अशीच काही दिवसांत कितीतरी वेळा होणारी आवर्तनं आहेत काय, याचा शोध सुरू झाला. अणूंच्या अंतरंगातल्या रचनेचा उलगडा झाल्यानंतर त्यांची रचनाही सौरमालिकेसारखी असल्याचं स्पष्ट झालं. अणुकेंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन प्रदक्षिणा घालत असतात, हे दिसून आलं. त्यामुळे मग अणूंमधील आवर्तनांचा विचार होऊ लागला. त्यातूनच हे दिसून आलं की काही अणू आपल्या निरनिराळय़ा ऊर्जापातळींमध्ये सतत वर खाली जात असतात. एखाद्या नटखट मुलानं एक पायरी चढावं मग एक पायरी उतरावं, परत एक पायरी चढावं असा खेळ खेळावा तसे हे अणू एका ऊर्जा पातळीतून वरच्या पातळीत उडी घेतात आणि परत खालच्या पातळीत येतात. त्यांची ही आवर्तनं अविरत चालू असतात. त्या आवर्तनांवर थंडीवार्याचा हवेच्या दाबाचा कशाचाही परिणाम होत नाही. त्यामुळे मग त्यांचाच आधार सेकंदाचं प्रमाणीकरण करण्यासाठी घेण्यात आला. सिझियम या मूलद्रव्याचे अणू एका सेकंदात ९ अब्ज आवर्तनं पूरी करतात आणि त्यात काहीही बदल होत नाही, हे दिसून आल्यानंतर सेकंदाची व्याख्या त्या संदर्भातच करण्यात आली. अचूकपणे बोलायचं तर सीझियमच्या अणूची ९,१९२,६३१,७७० आवर्तनं पूर्ण होण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक सेकंद, हे आता जगभर मान्य झालं आहे.*बाळ फोंडके यांच्या 'किती ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता तेव्हा तुमचे ओझे पुर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••१) 'कॉमनवेल्थ गेम्स २०२२' कोठे आयोजित करण्यात आले आहे ?२) झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ?३) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२२ या वर्षासाठी NIRP क्रमवारीत सर्वोत्कृष्ट शिक्षणसंस्था म्हणून कोणत्या शिक्षणसंस्थेने प्रथम क्रमांक पटकावला ?४) उस्मानाबादचे कोणते नामांतर करण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ?५) उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून कोणाची निवड करण्यात आली आहे ?*उत्तरे :-* १) इंग्लंड २) द्रौपदी मुर्मू ३) IIT मद्रास ४) धाराशिव ५) मार्गारेट अल्वा *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● साईनाथ माळगे● गंगाधर पालकृतवार● लक्ष्मण दावणकर● मोहन कुलकर्णी● दत्तात्रय तोटावाड● व्यंकट चिलवरवार● श्रीराम भंडारे● राहूल लोखंडे● दिनेश राठोड● सचिन पिसाळ● साईकुमार ईबीतवार● करुणा खंडेलोटे● ज्ञानेश्वर कोकरे*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.**रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.**महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.**"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."* ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●•• ⚜⚜⚜⚜⚜संजय नलावडे, चांदीवली, मुंबई 9167937040•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ज्ञान भक्ति वैराग्य सुखपीव ब्रह्म लौ ध़ायेआतम अनुभव सेज सुख,तहन ना दूजा जाये। ज्ञान भक्ति वैराग्य सुखजलद ब्रम्हानंद दायीआत्मानुभव प्राप्तीचीसर अन्यत्र कुणा न येई महात्मा कबीर अनुभव ज्ञानाची महत्ती विषद करताना म्हणतात , 'ज्ञान,भक्ति,वैराग्य सुख प्राप्तीद्वारे जलद गतीने ईश्वराचा साक्षात्कार होईल. ईश्वराची दिव्यताही अनुभवता येईल. हा मार्ग ईश्वरी लिला जाणून घेण्यासाठी महत्वपूर्ण ठरणारा आहे. मात्र आत्मानुभव आत्मा आणि परमात्म्याचंं मिलन घडवून आणतो. जेव्हा आत्माच परमात्म्याच्या रुपाशी एकरूप होऊन जातो. तिथे अन्य कुणाला प्रवेश कसा मिळणार बरे ! जीव आणि शिवाच्या एकरूपतेत मनाचाच मनाशी संवाद घडून येतो. विश्वातील नश्वरता व विकारांना त्याठायी यत्किंचितही स्थान उरत नाही. निसर्गाची सर्वव्यापकता व समदृष्टी त्या जीवात्म्याच्या ठायी स्थापित होते. हा स्थितप्रज्ञतेचा सर्वोत्कट आविष्कार असतो. त्याच्यावर कोणत्याही प्रलोभनाचा प्रभाव पडत नाही . कारण तो स्वतःच अविनाशी विश्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••जो माणूस जसा विचार करतो त्याच विचारानुसार जीवनात वागतो.जर चांगले विचार असतील तर त्यांचे परिणाम त्याच्या जीवनात आणि इतरांराच्याही जीवनात चांगलेच होतील. आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नसतील, उपदेशात्मक असतील तर ते नक्कीच जीवनात फलदायी ठरु शकते.अशी माणसे स्वत:च्या आणि इतरांच्याही जीवनात नवे चैतन्य आणू शकतात.ते कधीही वाईट विचारांना आपल्या जीवनात थारा देत नाहीत,त्यांना कुणाचेही नुकसान होऊ नये असेच वाटते. परंतू वाईट विचार करणारी माणसे कधीच आपल्या जीवनात यशस्वी होत नाहीत आणि इतरांच्या चांगल्या चाललेल्या जीवनात बाधा आणल्याशिवाय राहत नाहीत.अशी माणसे दुष्ट प्रवृतीची असतात.त्यांना स्वत:चे आणि इतरांचे काय आणि किती नुकसान होत आहे याचे भान देखील राहत नाही.अशावृत्तीच्या माणसांपासून केव्हाही दूरच राहिलेले बरे.© व्यंकटेश काटकर,नांदेड.📲 9421839590•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एकदा राजाने सेवकाला अचानक तीन प्रश्न विचारले.**१) ईश्वर कुठे राहतो ?**२) ईश्वर कसा मिळेल ?* *आणि**३) ईश्वर काय करतो ?* *अचानक हे प्रश्न ऐकून सेवक गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.* *सेवक घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, सेवक म्हणाला ''मुला आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.* *सेवकाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन सेवक दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. सेवकाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.* *सेवक म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"* *मुलाने विनंती केली की, महाराज, एक पेला दूध - साखर घालून आणा. दुध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.* *परंतु महाराज यात साखर दिसते का ? महाराज म्हणाले नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज!* *तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरातअसून तो दिसत नाही.* *महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला* *''महाराज थोडे दही मागवाल का?''महाराजांनी दही मागवले. मग पुत्र म्हणाला ''महाराज! यात लोणी दिसतो का? "महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल" पुत्र म्हणाला "महाराज देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन- साधना-तपश्चर्या करावीच लागेल,* *मंथुनी नवनीता।* *तैसे घे अनंता।।* *"महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो?"* *पुत्र म्हणाला महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य'' पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो" महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. आणि तो पुत्र स्वतः सिंहासनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे" महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही".* *बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो, त्याने ठरविले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो.* *तुका म्हणे नोहे* *काय त्या करिता!**चिंतावा तो आता विश्वांभर!* *"दुखी"रहना है तो, सब मे कमी खोजो,* *और**"प्रसन्न" रहना है, तो सब मे "गुण" खोजो.!* *...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा* *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा !* *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,**पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment