✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 3⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 3⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~📅 दि. 16/07/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 📆 . *दिनविशेष . 📆* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक सर्प दिन* 💥 ठळक घडामोडी :-१९९८- गुजरातमध्ये शाळा प्रवेश करताना पाल्याच्या नावानंतर आईचे नाव लावण्याचा अधिकार असल्याचे शिक्षणमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत माहिती दिली.१९९२-भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ शंकरदयाल शर्मा यांनी निवड ,झाली.१९६९-चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या'अपोलो-११'अंतराळायानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.💥 जन्म :-१९०९ - अरुणा असफ अली,स्वातंत्रसेनानी१९६८ - लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.१९७१ - महमद मकसूद् इनामदार नान्देड१९७३ - शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.१९८४ - कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.💥 मृत्यू :-१८८२ - मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.१९१६ - इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.१९९३-उस्ताद निसार हुसेन खां-पदमभूषण*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9404277298•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *संसदेत काही असंसदीय शब्दांवर बंदी घातल्यानंतर आता आणखी एक नवा आदेश लोकसभा सचिवालयानं खासदारांना दिला आहे. संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं उपोषणं करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *९२ नगरपरिषदांनंतर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.*••••••••••••••••••••••••••••••••••••• 3⃣ *सोमवार १८ जुलैपासून होणारे विधिमंडळाचे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. संसदीय कार्य विभागाने विधानमंडळ सचिवालयाला याबाबत सूचित केले आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. हुजूर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीच्या दुसऱ्या फेरीतही ऋषी सुनक यांनी आघाडी घेतली आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *मुंबई विद्यापीठाने 14 आणि 15 जुलैला होणाऱ्या सर्व विभागांच्या परीक्षांना स्थगिती दिली होती. या परीक्षा आता 18 आणि 19 जुलैला घेण्याचा मुंबई विद्यापीठाने निर्णय घेतला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नॅशनल इंस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क (NIRF)द्वारे महाविद्यालयांचे मानांकन घोषीत करण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजने प्रथम स्थान पटकावले.*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *सिंगापुर ओपन 2022 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पीव्ही सिंधूने एन्ट्री मिळवली असून प्रणॉय आणि नेहवाल यांना मात्र क्वॉर्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 गुगलयान ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••स्टोरी मिररवर प्रकाशित झालेल्या लघुकथा खास आपल्यासाठी क्रमशः देत आहोत... *लघुकथा - एक मत* https://storymirror.com/read/story/marathi/kpeg22xr/ek-mt/detailवाचून आपल्या प्रतिक्रिया जरूर दद्याव्यात~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ कथालेखक *नासा येवतीकर, धर्माबाद*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌊 *भरती केव्हा येते ?* 🌊खरं तर प्रत्येक क्षणी जगात कुठे ना कुठे भरती येतच असते. आणि त्याच वेळेला दुसरीकडे कुठेतरी ओहोटीचा खेळ चालू असतो. त्यामुळे प्रश्न विचारायचाच झाला तर कोणत्याही एका विवक्षित ठिकाणी भरती केव्हा येते असा विचारायला हवा. म्हणजे मुंबईला किंवा रत्नागिरीला किंवा चेन्नईला भरती केव्हा येते असा.पण त्याआधी हे भरती ओहोटीचं चक्र का चालू असतं याचा विचार करायला हवा. जर आपल्याला चंद्र हा उपग्रह नसता तर भरती ओहोटी आली नसती. निदान आज जसा जाणवण्याइतका समुद्राच्या पातळीत जो चढउतार होतो तो झाला नसता. चंद्र पृथ्वीच्या मानानं आकारमानाने लहान आहे. पण तो सूर्यापेक्षा कितीतरी जवळ आहे. न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही दोन वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षणाचं बल असतं. ते त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असतं. म्हणजेच जेवढं वस्तुमान जास्त तेवढं हे बलही जास्त. आणि जवळ अंतर कमी तेवढंही आकर्षण जास्त.पृथ्वीचं आकर्षण चंद्राला जाणवतं. आणि म्हणून तो पृथ्वीभोवती एका ठराविक कक्षेत प्रदक्षिणा घालत राहतो. तसंच चंद्राच्या आकर्षणाचाही प्रभाव पृथ्वीवर पडतो. पण चंद्राचं वस्तुमान पृथ्वीपेक्षा कमी असल्यामुळे पृथ्वीची भूमी तेवढी चंद्राकडे खेचली जात नाही. पृथ्वीवरचं पाणी मात्र द्रवरूप असल्यामुळे चंद्राच्या दिशेने खेचले जाते. साहजिकच त्या बाजूला समुद्राची पातळी वाढते. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजेच १८० अंशावरच्या ठिकाणचे पाणी चंद्रापासून दूर असते. त्यामुळे चंद्राच्या आकर्षणाचे बल कमी होते. तिथले पाणी चंद्राकडे तसं खेचलं जात नाही. पण जमीन थोडीशी का होईना खेचली जाते. त्यामुळे तिथल्या समुद्राचीही पातळी वाढते.या दोन्ही ठिकाणी समुद्राच्या पाण्याला आलेल्या फुगवट्यामुळे त्याच्या काटकोनात म्हणजेच त्यापासून ९० अंशांवर असणाऱ्या ठिकाणचे पाणी किनाऱ्याच्या दिशेने खेचले जाते. सहाजिकच तिथे समुद्राच्या पाण्याची पातळी घटते. ओहोटीचा अंमल सुरू होतो. अशा रीतीने कोणत्याही क्षणी जगाच्या पाठीवर दोन ठिकाणी भरती तर दोन ठिकाणी ओहोटी येत असते.पण पृथ्वी स्वतःभोवती गिरकी मारत असते. त्यामुळे तिच्या पृष्ठभागावरचे वेगवेगळे प्रदेश चंद्राकडे मोहरा फिरवुन राहत असतात. साहजिकच भरती, आणि अर्थातच ओहोटी, येण्याच्या ठिकाणात बदल होत जातो. पृथ्वीची स्वतःभोवतीची गिरकी चोवीस तासात पूर्ण होत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी दिवसातून दोन वेळा भरती येते, तर दोन वेळा ओहोटी येते.*बाळ फोंडके यांच्या 'केव्हा ?' या पुस्तकातून* *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••यशाचे शिखर गाठण्यासाठी काही वेळेला अपयशाच्या पायऱ्या चढाव्या लागतात.*संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) उत्तराखंडमधील रुरकी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्थापनेला १७५ वर्षे झाल्यानिमित्त केंद्र सरकार किती रुपयांचे विशेष नाणे जारी करणार आहे ?२) वार्षिक लैंगिक समानता अहवाल २०२२ नुसार जगातील सर्वाधिक समतावादी देश कोणता ?३) नथ्थुराम गोडसे यांनी कोणत्या तारखेला महात्मा गांधीची हत्या केली ?४) राष्ट्रीय दूध दिवस कधी साजरा केला जातो ?५) व्यंजन म्हणजे काय ?*उत्तरे :-* १) १७५ रू. चे नाणे २) आईसलँड ३) ३० जानेवारी १९४८ ४) २६ नोव्हेंबर ५) ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे करता येत नाही त्या वर्णांना व्यंजन म्हणतात. *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● जयवंत हंगरगे, मुख्याध्यापक● मारोती गाडेकर● सुरेश भाग्यवंत*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*एक भिकारी आयुष्यभर भीक मागत राहिला. भीक मागून मागून जमा करत राहिला. हे नाही ते नाही करत करत आधिक मागत राहिला. देवाला त्याची दया यायची. त्याने कधी कोणाला आयुष्यात काही दिले नाही तर त्याला आनंद व समाधान कसे मिळणार? देवही चिंतेत पडला. देण्याचा आनंद काय असतो हे प्रत्यक्ष समजावून सांगण्यासाठी देवच एक दिवस भिका-याच्या दारावर भीक मागायला उभा राहिला. त्याने आरोळी ठोकली. 'देssरे बाssबाss भिका-याला काहीतरी.' भिका-याच्याच घरी भीक मागायला भिकारी? त्याने कानाडोळा केला, नंतर त्याला समजावण्याचा व धमकावण्याचाही प्रयत्न केला. पण दारावरचा भिकारी हटला नाही. देssरे बाssबा च्या आरोळ्या काही थांबत नव्हत्या.**भिका-याचीही भीक मागायला निघायची वेळ झालेली. परंतु दारावरचा भिकारी हटायला तयार नव्हता. त्यापासून सुटका व्हावी म्हणून शेवटी भीक मागून जमा केलेल्या धान्याच्या ढिगातील एक दाणा उचलून तो भिका-याच्या कटो-यात टाकतो. एक दाणा का होईना भीक मिळाली म्हणून दारातील भिकारी निघून जातो. एक दाणा कमी झाला म्हणून भिकारी हळहळत ढिगा-याकडे बघतो. ढिगा-यावर काहीतरी चमकत आहे हे पाहून तो जवळ जातो. ती चमकणारी वस्तू सोन्याचा दाणा असतो. भीक दिलेला ढिगावरचा एक दाणा कमी न होता सोन्याचा झाला. संपूर्ण धान्याचा ढिगच भिका-याच्या कटो-यात टाकला असता तर..? आता भिका-याने संपूर्ण आयुष्यच देऊन टाकले आहे. पण माझ्यातल्या भिका-याचे काय? त्याला कळले आहे पण अजूनही 'वळले' मात्र नाही.* *॥ रामकृष्णहरी ॥*🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 *श्री संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल- 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌟! ! *कबीराचे बोल* ! !🌟•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• कबीर कलि खोटी भाई , मुनियर मिली न कोय | लालच लोभी मस्कारा , टिंकू आदर होई || अर्थ : हल्लीच्या सामाजिक भानाचं वर्णन करताना महात्मा कबीर ढोंगाला भुलणार्या अर्थात वास्तव न पाहता वरवरच्या सोंगालाच सत्य मानणार्या समाजमनाचं निरीक्षण नोंदवतात. भूगोल सांगतं पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्षापेक्षा जास्त जास्त. भारतीयांच्या मानण्याप्रमाणे गतकाळ ते सांप्रत असे चार युग .१ कृत युग, २ त्रेता युग ,३ द्वापार युग, व ४ कली युग अशी काल विभागणी सांगितली जाते. हल्ली म्हणजे कलीयुगी पूर्वीपेक्षा खोटारडेपणा खूपच वाढलाय. हे युग महाभारताच्या लढाईपासून ते सांप्रतपर्यंत चालूच आहे.या युगी खरे खुरे मुनी , ऋषी , संत भेटणे कठीण झाले आहे. स्वार्थासाठी त्यांची नाटकं करणारे अनेक जण भेटतील. लालचीपणा, मोह यांनी ग्रासलेल्यांना हेच ढोंगी , पाखंडी , खरंं अध्यात्म सोडून थट्टा मस्करी करणारे, द्रव्य लुटणारे, वासनांधच साधू, मुनी म्हणून मिरवत आहेत. अन भक्तजण त्यांनाच डोक्यावर घेवून मिरवतात अन फसगत झाली की वैफल्यग्रस्त होतात. तेव्हा खरा साधून ओळखून त्याच्या ठायी लिन व्हायला सांगितलेला संतांचा कानमंत्र विसरू नये. म्हणजे झालं. एकनाथ डुमणे, मुखेड📱 9096714317•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••तुमची वाणी स्पष्ट, चारित्र्य पवित्र ,जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि जीवन व्यवहार चोख असतील तर तुम्ही इतरांच्या हृदयावर साम्राज्य सहजपणे करु शकाल. अन्यथा ह्या गोष्टी तुमच्या जीवनात नसतील तर तुम्हाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकारही राहणार नाही.आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो आणि मनुष्य म्हणूनच जगणार आहोत हा विचार समोर ठेवून जगण्यासाठी वरील महत्वाच्या चार गोष्टींना जीवनात प्राधान्य द्यायलाच हवे आणि त्या गोष्टी सहज करता येऊ शकतात. सुरुवातीला कठीण जाईल एकदा का सराव झाला की,मग आपोआपच व्हायला लागतात.*व्यंकटेश काटकर,नांदेड.* संवाद..९४२१८३९५९०/ ८०८७९१७०६३.•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *अहंकार नसावा.*एकदा एक मूर्तिकार मूर्ती बनवण्यासाठी दगडाचा शोध घेत होता.तो रस्त्याने जात असतांना त्याला मोठे दोन दगड दिसले ,आणि मुर्तीकाराने ठरविले की या दगडाच्या छान सुबक दोन मुर्त्या तयार कराव्या.दगडाचे निरीक्षण करून मुर्तीकाराने कशी मूर्ती तयार करावी याबाबत मनात आराखडा तयार केला.आणि दोन्ही दगडाला सांगितले की, मी तुमच्यापासून छान मूर्ती तयार करणार आहे तेव्हा तुम्ही मला साथ द्यावी.छन्नी हातोडा घेऊन मूर्तिकार दगडाला आकार देत असतांना पहिला दगड म्हणाला मला त्रास होतो, माझ्यावर घाव करू नका. तेव्हा मुर्तीकाराने दगडाला समजविले की, मी हळूहळू घाव देणार तू तुझ्यातील कडकपणा कमी कर. थोडा नरम हो म्हणजे मला घाव घालायला त्रास होणार नाही व तुला पण जास्त त्रास होणार नाही.पहिला दगड स्वतःतील अहंपणा सोडायला तयार नव्हता.मुर्तीकाराने दुसऱ्या दगडाला समजविले दुसरा दगडाने स्वतःमधील कठीणपणा कमी करून नरमपणा घेतला व काही दिवसातच अतिउत्तम , सुंदर अशी राधाकृष्णची मूर्ती मुर्तीकाराने तयार केली.मूर्तीची स्थापना झाली तेव्हा बाजूला पडलेला कडक मोठा दगड बघून त्याचा उपयोग लोकांनी नारळ फोडण्यासाठी केला.मुर्तीकाराचे ज्या दगडाने ऐकले त्या दगडाची मूर्तीत रूपांतर झाले व सर्व लोक भक्तिभावाने पूजा करायला लागले. कुंकूम तिलक लावून हारापर्ण करतात, छान वस्त्र परिधान करतात आणि ज्या दगडाने स्वतःचा अहंकार सोडला नाही , मुर्तीकाराचे ऐकले नाही त्या दगडाला जीवनभर नारळाचे घाव सहन करावे लागते.पूजा करणारे लोक अंगावर पाय देऊन राधाकृष्णच्या मूर्तीची पूजा करायला जातात. त्यावेळी अहंकारी दगडाला खूप दुःख झाले पण वेळ गेलेली होती.*तात्पर्यः अहंकारपणाने वागल्यास स्वतःचेच नुकसान होते म्हणून अहंकार अंगी नसावा.**संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in📱 9403046894•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार ~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment