✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट~~~~~~~~~~~~~~~~~~~ 4⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 4⃣ ( फ्रेश शालेय परिपाठ )🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00 ( रविवार आणि सुट्टी वगळून )~~~~~~~~~~~~~~~~~~~*नोट :- सोमवार दि. 17 ऑक्टोबर ते 08 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सुट्टी असल्याने दि. 09 नोव्हेंबर पासून पूर्ववत सुरू होईल.*~~~~~~~~~~~~~~~~~~~🎇 दि. 15/10/2022 वार - शनिवार•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🌷 🎇 . *दिनविशेष . 🎇* 🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*जागतिक विद्यार्थी दिन* *वाचन प्रेरणा दिन* *जागतिक हात धुवा दिवस* 💥 ठळक घडामोडी :-★ १९३२ - टाटा एअरलाइन्सच्या (नंतरचे एअर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.★१९७० - एरोफ्लोत फ्लाइट २४४ या विमानाचे तुर्कस्तानला अपहरण.★ १९९७ - शनिकडे जाणाऱ्या कॅसिनी अंतराळयानाचे केप केनॅव्हरल येथून प्रक्षेपण.★ १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले.💥 जन्म :-◆१९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक.◆ १९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती.💥 मृत्यू :-◆१९१८ - साई बाबा (शिर्डी).◆ १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक.*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*📱 9604481084•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••1⃣ *एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार येत्या २० ऑक्टोबरपासून १० ते ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ*•••••••••••••••••••••••••••••••••••••2⃣ *मुंबई : राज्य शासनातील अराजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम १२ हजार ५०० एवढी रक्कम अग्रीम मंजूर*•••••••••••••••••••••••••••••••••••••3⃣ *राज्यात दरवाढीसाठी महावितरणने राज्य विद्युत नियामक आयोगाशी केली चर्चा, राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार असल्याची शक्यता*•••••••••••••••••••••••••••••••••••••4⃣ *मुंबईत १ नोव्हेंबरपासून सहप्रवाशांना सीटबेल्टची सक्ती, अन्यथा मोठा दंड भरावा लागणार*•••••••••••••••••••••••••••••••••••••5⃣ *केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखांची केली घोषणा, 12 नोव्हेंबरला मतदान तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल.*•••••••••••••••••••••••••••••••••••••6⃣ *अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांचे निधन, ते 82 वर्षाचे होते, धार्मिक विधी न करता केलं देहदान!*•••••••••••••••••••••••••••••••••••••7⃣ *पोलीस भरतीचा मार्ग मोकळा, पोलिसांची 11 हजार 443 पदं भरतीला देण्यात आली मंजुरी देण्यात आली, लवकरच होणार पोलीस भरती*•••••••••••••••••••••••••••••••••••••*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*📱 9960358300~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🖥️ चरित्रात्मक माहिती 💻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••वाचन प्रेरणा दिन त्यानिमित्ताने .........*मिसाईल मॅन ते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम👇**व्हिडीओ-लिंक👇*https://youtu.be/6du7dSL9qdI~~~~~~~~~~~~~~~~~~~🎥 व्हिडीओ निर्मिती - *एम. डी. भोसले, सहशिक्षक, प्रा. शाळा मंगनाळी ता. धर्माबाद जि. नांदेड*📱9011200230~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *✈ 🚀 काव्यांगण ✈ 🚀*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••15 ऑक्टोबर - डॉ. ए पी जे अब्दुल कलाम जयंती निमित्ताने काव्यपुष्पांजली*।। वाचन प्रेरणा दिवस ।।*वाचनाने मिळते आम्हा ज्ञानज्ञानाने होतो आम्ही सज्ञानविचारवंतांची असे एकच भूखवाचनातून मिळते त्यांना सुखरिकामा वेळ वाचनात घालवीविचारांना फुटेल नवी पालवीवाचनाने होते लेखन समृद्धलहान असो वा असो वयोवृद्धवेड लागेल जेंव्हा पुस्तके वाचनाचीविसर पडेल तेंव्हा सर्व जगाचीदिसमाजी काही करावे चिंतनडोक्यात होईल ज्ञानाचे सिंचन~~~~~~~~~~~~~~~~~~~✍ *नासा येवतीकर, विषय शिक्षक, कन्या शाळा, धर्माबाद जि. नांदेड*9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌷🍃 *विशेष माहिती* 🌷🍃•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *जागतिक टपाल दिन*‘चिट्ठी आयी है, आयी है…’ या हिंदी सिनेमातील गाजलेल्या गाण्यातून पत्राचे महत्त्व वर्णन केलेले आहे. ही पत्रे वाटप करणार्या टपाल खात्याची ९ ऑक्टोबर १८७४ रोजी स्वित्झर्लंडमधील बर्न येथे ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाली होती, म्हणून आजचा दिवस ‘विश्व टपाल दिन’ म्हणून साजरा होत आहे. हा निर्णय टोकियोत १९६९ साली भरलेल्या युनियनच्या परिषदेत घेण्यात आला होता. जगभरची टपाल व्यवस्था सुरळीत नि तत्परतेने चालू रहावी, हा या युनियनच्या स्थापनेमागचा हेतू होता. गेल्या ३५ वर्षात ‘युनेस्को’च्या सहकार्याने प्रस्तुत संघटना या दिवशी तरुण मंडळींसाठी पत्रलेखन स्पर्धा आयोजित करते व विश्व टपालदिनी स्पर्धकांना बक्षीस वाटप करते. विविध देशातल्या शाळा-कॉलेजातील मुले स्पर्धेत भाग घेऊन ही बक्षीसे मिळवीत असतात. यंदाचे बक्षीस व्हिएतनामच्या शाळकरी मुलीने पटकाविले आहे. जगभरातील देशात टपालाची मुक्त, मोकळी ये-जा व्हावी हे पोस्टल युनियनचे उद्दिष्ट आहे. पूर्वीच्या काळी प्रवासी दूरदूरचा प्रवास करून टपाल वितरण करीत. १६०० ते १७०० च्या काळात अनेक देशांनी एकत्रित होऊन आपसात करार केले व टपाल वाटपाची योजना आखली. इ.स. १८०० च्या अखेरीस जगभर टपाल वितरणाचे बर्यापैकी जाळे निर्माण झाले होते. अर्थात त्यात त्रुटी होत्या, क्लिष्टता होती व भरवसा नव्हता. ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ची स्थापना झाल्यावर टपाल व्यवस्थेत लक्षणीय फरक पडला. आज टपाल व्यवस्थेला आधुनिकीकरण, नवतंत्रज्ञानाशी स्पर्धा आणि विस्तार या बाबींची दखल घ्यावी लागत आहे. नैरोबीला पोस्टल युनियनची दोन वर्षांपूर्वी एक परिषदेत या विषयी तीव्र पडसाद उमटले. पोस्टखात्याच्या उदासिन वृत्तीबद्दल या परिषदेतील चर्चासत्रात टीका झाली. या परिषदेत ११६ देशातील ५५० हून जास्त प्रतिनिधी हजर होते. इ.स. २००९ चा सोहळा हा पर्यावरणाशी निगडित होता व त्याची घोषणा होती ः ‘हरित प्रगतीसाठी टपालसेवेची बांधिलकी’ व तत्संबंधी परिषद पोर्तुगालमध्ये भरली होती. गतवर्षीची परिषद कातारला आयोजित करण्यात आली होती. पत्र लिखाण ही एक कला आहे. तो जगभरच्या साहित्याचा एक महत्त्वपूर्ण भाग बनून आहे. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक संपर्क जाळ्यांच्या गराड्यात पत्र लिखाण नामशेष होत चालले आहे, ही खेदाची बाब आहे. पूर्वीच्या गुलाबी प्रेमपत्रांची सर सध्याच्या एस.एम.एस.ना काय येणार? पूर्वी प्रेमीजनांच्या नि नातलगांच्या पत्रांची वाट बघण्यात जी मजा यायची ती या ‘क्विक्’ संक्षिप्त संदेश प्रणालीने हरवून टाकली आहे. बर्याच लोकांना पोस्टाची तिकिटे गोळा करण्याचा छंद असतो. जागतिक टपालदिनी त्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. परंतु सध्याचा पोस्टाचा गोंधळाचा कारभार बघता पूर्वीच्या काळी कबूतरांचा वापर होई, तशी वेळ तर येणार नाही ना, ही भीती उगाचच वाटते. *संकलन :- श्याम बसप्पा ठाणेदार, पुणे*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• 🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*" तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही पण तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलतील." - डॉ. एपीजे अब्दुल कलाम**संकलन :- सौ. सुभद्रा खेडकर, बीड*📱 9403593764•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••१) माजी राष्ट्रपती डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा झाला ?२) 'वाचन प्रेरणा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?३) 'जागतिक हात धुवा दिवस' केव्हा साजरा केला जातो ?४) 'जागतिक विद्यार्थी दिवस' केव्हा साजरा केला जातो ?५) राष्ट्रीय नवोन्मेष ( नवकल्पना ) दिन केव्हा साजरा केला जातो ? *उत्तरे :-* १) १५ ऑक्टोबर १९३१ २) १५ ऑक्टोबर ३) १५ ऑक्टोबर ४) १५ ऑक्टोबर ५) १५ ऑक्टोबर *संकलन :- जैपाल ठाकूर*जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया📱9765943144•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••● गोविंद सखाराम पवळे● फारुख शेख, लोहा● मंगेश फड● संतोष मदनुरकर● मोहन भुसेवार● पृथ्वीराज राहेरकर● शिवराज काटेवाडे● सुभाष मेंटेवाड● संजय कदम● रमेश कामाडी*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा* [ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर 9423625769 येथे पोस्ट करावे. ]•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• ••• ● ‼ *विचार धन*‼ ● ••••••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••*दोन पायांवर उभं राहून काटेरी बाभळीची छोटी छोटी पानं लुसूलुसू खाणारी बकरी पाहिलीत का तुम्ही? समोरचे दोन पाय बाभळीच्या झाडाला लावून मागच्या दोन पायांवर अवघड आसनात उभी असते. पोटातल्या भुकेमुळं त्या आसनावरची पकड मजबूत असते. त्यामुळं तोल जात नाही. उलट एक आकर्षक डौल तयार होतो. शिवाय काटे टाळून छोटी छोटी पानं खाण्याचं कसब खासच. एखाद्या योग्याला ध्यान लागावं तसं बकरीने या आसनात मन एकाग्र केलेलं असतं. डोंगराच्या अवघड कपारीत बरेचदा बकरी दिसते. त्या अवघड कपारीत बकरी जाते कशी? हा गहन प्रश्न आहे. त्या कपारीतून पाय घसरला तर खाली खोल दरी असते. म्हणजे त्या बकरीची शेवटची ब्या-ब्या ही कुणाला ऐकू येणार नाही. पण त्या जीवघेण्या कपारीत बकरी जाते, यामागे असते फक्त भूक !**भक्ष्यावर झेप मारणारा पक्षी किंवा वाळक्या पानांवर पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी चालणारा चित्ता डिस्कव्हरी चॅनलवर हमखास दिसतो. आभाळातून नेमकेपणानं भक्ष्य हेरून त्यावर झाप मारून भक्ष्याला अलगद उचललं जातं, यातलं वेळेचं नियोजन कमाल असतं. एक क्षण जरी इकडचा तिकडं झाला तरी शिकार निसटू शकते. पाण्यावर झाप मारून पाण्यातला मासा अलगद उचलणारा पक्षी तर अद्भूत असतो. जेंव्हा पोपट राघू गाभूळ्या कैरीवर उलटा होऊन कैरी टोकरतो..उलटं टांगून घेणा-या राघूची झेंड्यासारखी हलणारी शेपूट भुकेची पताका होऊन फडकत असते.* *"जेंव्हा जेंव्हा कोणी भुकेविरूद्ध संघर्ष करायला पाय रोवून उभा राहतो..तेंव्हा तेंव्हा तो सुंदर दिसू लागतो."* ••●‼ *रामकृष्णहरी* ‼●••🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆🦆 *श्री. संजय नलावडे, मुंबई* *मोबाइल - 9167937040*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• अहंकाररुपी माणूस सुरुवातीला दुसऱ्यावर आपला प्रभाव टाकायला जातो, परंतु सुरुवातीला लोकांना माहित नसते म्हणून त्याच्यातील वर्तनाकडे पाहून थोडे दुर्लक्ष करतात.पुन्हा पुन्हा जर असे वर्तन करत असेल तर त्याची प्रतिमा इतरात किंवा चारचौघात काय आहे हे चांगलेच ओळखायला लागतात आणि नंतर त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवत नाहीत.जर स्वत:चेच तुणतुणे वाजवत असेल तर येणाऱ्या काही काळात त्याच्या अहंकाराचे डफडेच वाजवून टाकतात.त्यामुळे त्याची कोणतीच प्रतिष्ठा समाजामध्ये राहत नाही.मग तो जीवनात एकटा पडतो.इतरही लोक त्याच्यापासून दूर जायला लागतात.त्याच्या अहंकाराने त्याचे सगळे संपलेले असते.म्हणून माणसाने कधीही अहंकाराची भाषा करु नये.एकदा माणसाच्या अंगात अहंकाररुपी राक्षस शिरला की,त्यांचे सर्वस्व संपलेच आहे असे समजावे.© व्यंकटेश काटकर, नांदेडसंवाद.९४२१८३९५९०/८०८७९१७०६३.🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••🎭 *आजची फ्रेश बोधकथा* 🎭•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ••••••••••••••• *हुबेहूब कला अवगत असणे.*एक मूर्तिकार मूर्ती व पुतळे अगदी हुबेहूब बनवी. ज्याची मूर्ती वा पुतळा तो तयार करी, ती व्यक्ती वा देव प्रत्यक्षच त्याच्या चित्रशाळेत अवतरल्याचा भास होई. त्याने खुर्चीवर बसलेल्या व एका हातात काठी घेतलेल्या रखवालदाराचा पुतळा तयार केला होता. त्या पुतळय़ाला तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या घराच्या पुढच्या फाटकापाशी नेऊन ठेवी. तो इतका हुबेहूब होता की, खराखुराच रखवालदार पहार्यावर बसला असल्याचा चोर-दरोडेखोरांचा समज होऊन ते त्या मूर्तिकाराच्या घराच्या आसपास फिरकण्याचा विचार सोडून देत.नामवंत कलावंत म्हणून त्याच्या पन्नाशीच्या, साठीच्या व पंचाहत्तरीच्या वेळी त्याचे अनेक शहरांतून सत्कार झाले होते. आता 'आपला शंभरीनिमित्त जंगी सत्कार व्हावा' एवढी एकच इच्छा त्याच्या मनात उरली होती, म्हणून तो प्रकृतीची फार काळजी घेत होता. यमदूताला हुलकावणी देण्यासाठी त्याने स्वत:चे नऊ पुतळे केले होते. अगदी हुबेहूब स्वत:सारखे.एकदा त्याला आपल्याला न्यायला आपल्या घराकडे काही यमदूत येत असल्याची चाहूल लागली. तो पटकन आपल्या चित्रशाळेत गेला व तिथे ठेवलेल्या आपल्या नऊ पुतळय़ांत दहावा पुतळा म्हणून निश्चलपणे बसून राहिला. यमदूत त्या चित्रशाळेत शिरले. पाहतात, तो तिथे एकासारखे एक असे दहा मूर्तिकार! काही म्हणजे काही फरक नाही! यातल्या कुणाला घेऊ जावे? हा त्यांच्यापुढे पेच पडला.तेवढय़ात त्यांच्यापैकी एक डोकेबाज यमदूत आपल्या सहकार्यांना मुद्दाम म्हणाला, 'बाबांनो, असे गोंधळून जाण्यासारखे काय आहे? कारण खर्या मूर्तिकारात जे एक व्यंग आहे, ते त्याच्या बाकीच्या नऊ पुतळय़ांत दाखवायचे राहून गेले आहे.त्या बुद्धिवान यमदुताच्या या विधानाने अपमानित झालेला तो मूर्तिकार पटकन उठून म्हणाला, 'उगाच जीभ आहे म्हणून काही तरी बडबडू नकोस. माझ्यात असलेला कोणता दोष तुम्हाला दिसला.हे मुर्तीकार आम्हांला माहिती होते तु बोलणार जर तुझ्याबद्दल मी काही बोललो नसतो तर आम्हाला चिञकार कोण ते ओळखायला आले नसते. चल आता आमच्याबरोबर तु.*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*जि.प.प्रा.शा. गोजेगावता.हदगाव, जि. नांदेडhttp://www.pramilasenkude.blogspot.in•••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका 9423625769 येथे कळवावे. •••••••••••••••ஜ۩۞۩ஜ•••••••••••••••~~~~~~~~~~~~~~~~~~~*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*📱 9423625769~~~~~~~~~~~~~~~~~~~*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू याफ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार.~~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment